आजच सकाळी एका अंत्यसंस्काराला जाऊन आलो. वय अंदाजे २७ ते २८ एका २ वर्ष वयाच्या मुलाची माता. कारण स्वाईन फ्लु.
या वर्षी गेल्या वर्षासारखी जागरुकता कोठेही दिसत नाही. असे का?
काय करू शकतो आपण यासाठी. मनात खिन्नता आहे.
वाईट वाटले. स्वाईन फ्लू होऊन गेला पण शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने त्याचा सामना केला म्हणून कळले नाही केवळ १-२ ताप येऊन बरा झाला अशीही उदाहरणे आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.
स्वाईन फ्लूवर लसही आली आहे. ती ही घेता येईल.
"एकोळी धाग्यात वांझोट्या चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आजुबाजुला (खिशाला परवडतील) असे मास्क वाटता येतील" अशी प्रतिक्रीया सुचली होती पण उगीच पुन्हा वादंग नको म्हणुन देत नाहिये.
बाकी दरवेळी साधारण गणपतीच्या आधीच हा राक्षस कसा काय वर येतो काय माहित.
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 2:40 pm | अविनाशकुलकर्णी
वाचुन वाईट वाटले...
7 Aug 2010 - 2:45 pm | नि३
पुणेकरांनो हा शब्द खटकला...
जागरुकता हि सगळी कडेच हवी की फक्त पुण्यातच
7 Aug 2010 - 2:50 pm | आप्पा
कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही. पुण्यातील घटना आहे म्हणुन पुण्याचा उल्लेख आला आहे.
7 Aug 2010 - 2:52 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे म्हणूनच इथे पुणे विरुद्ध इतर असा सामना होणार नाही अशी अपेक्षा करतो आणि झालाच तर त्यात भाग घेणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.
7 Aug 2010 - 2:51 pm | llपुण्याचे पेशवेll
वाईट वाटले. स्वाईन फ्लू होऊन गेला पण शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने त्याचा सामना केला म्हणून कळले नाही केवळ १-२ ताप येऊन बरा झाला अशीही उदाहरणे आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.
स्वाईन फ्लूवर लसही आली आहे. ती ही घेता येईल.
7 Aug 2010 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार
"एकोळी धाग्यात वांझोट्या चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आजुबाजुला (खिशाला परवडतील) असे मास्क वाटता येतील" अशी प्रतिक्रीया सुचली होती पण उगीच पुन्हा वादंग नको म्हणुन देत नाहिये.
बाकी दरवेळी साधारण गणपतीच्या आधीच हा राक्षस कसा काय वर येतो काय माहित.
7 Aug 2010 - 4:27 pm | इंटरनेटस्नेही
+१