(सदर लेखनाची प्रेरणा एका वाक्यात सांगायची, तरः च्यायला, मग आम्हीच काय पाप केलं ? असे म्हणता येईल.)
प्रविन्भप्कर आणि सुजय कुलकर्णींच्या लेखनाने आमचे डोळे खाडकन उघडले. आज जगातले सर्वात महत्वाचे प्रश्न, म्हणजे इंचाइंचाने मागे सरणारे कश्मीर (आणि वर सरकणारा हिमालय), ग्लोबल वॉर्मिंग, मेक्सिको खाडीतील तेल गळती, पुण्यातील परप्रांतीय मुलींची नशाखोरी, पॅराग्लायडिंगच्या छायाचित्रांमुळे वाढलेला इनोचा खप, ह्या सगळ्यांसाठी आयटीतल्या बायका जबाबदार आहेत, अशा आमच्या संशयावर जणू शिक्कामोर्तब झाले.
आमचा हा संशय फार जुना आहे. मनोगतावरून आम्हाला आणि आमच्या देवगडच्या एका मित्राला काढून टाकण्यात, (आणि नंतर उपक्रमावर रिपीट परफॉर्मन्स घडवून आणण्यात) आयटीतील काही बायका (आणि रसायनशास्त्रातले काही अजब पुरुष रसायन) ह्यांचा हात होताच, असे आमचा देवगडचा मित्र आजही छातीठोकपणे सांगतो. पण यापेक्षाही अधिक खात्री पटली, ती आमच्या एका मित्राच्या कहाणीमुळे. तीच कहाणी इथे थोडक्यात ऐकवतो. (सत्यकथा ह्या मासिकांत येणार्या कथांइतकीच ही सत्य आहे, ह्याची खात्री असू द्यावी.)
आमचा मित्र, तिकडला कोल्हापूर साईडचा. मनाने अतिशय निर्मळ वगैरे. सगळं तारुण्य निबंधलेखनात गेलं. वेगवेगळ्या दैनिकांचे उपसंपादक त्याला करीना, बिपाशा, दीपिका सारखे क्यूट आणि सेक्सी वाटायचे. व्हायचं तेच झालं. पत्रकार झाला. कोल्हापूरच्या तरुण भारतात, राजारामपुरीचे विशेष बातमीदार म्हणून फेमस झाला. तुंबलेल्या नाल्यांच्या प्रश्नावर त्याने महानगरपालिकेस धारेवर धरले. शेवटी महापौरांनी खास त्यांच्या स्वतःच्या भट्टीवरची पहिल्या धारेची पाजली, तेव्हा धार जरा बोथट झाली.
अशीच अनेक समाजोपयोगी कामे करत ३५ वर्षाचा झाला, तोपर्यंत म्हातारी अंथरुणाला खिळली होती. लग्न केलं नाहीस, तर भूत म्हणून मानगुटीला बशीन म्हणाली, तेव्हा पोरी बघायला लागला. पण तोवर सर्व देखण्या, मनमिळावू, गुणी मुलींना देखणी, मनमिळावू, गुणी बाळे झाली होती. आता ३०-३२ वर्षांची लग्नाची मुलगी मिळून मिळणार कुठे ? म्हणून त्याने आयटी इण्डस्ट्रीकडे मोहरा वळवला.
हिंजवडीला पोहोचला. तिथल्या एका मल्टिनॅशनलच्या कॅफेटेरियात आमच्या ओळखीने प्रवेश मिळवून दिवसेंदिवस शोध करायचा. एकदाची ६५ किलोखालील एक मुलगी दिसली. नेत्रपल्लवी वगैरे झाली. तिच्या जाड भिंगाच्या चष्म्यांत ह्याला आपले प्रतिबिंब दिसले, तेव्हा "तुमने मुझे अपने नजरोंमे बसा लिया है" वगैरे काही काही बोलला. आणि प्रपोज केले.
तिने त्याचा रिझुमे मागितला, तेव्हाच खरे तर त्याला धोक्याची जाणीव व्हायला हवी होती. पण प्रेमात पडलेल्याला आणि जॉब शोधणार्याला अक्कल नसते, म्हणतात. आयटीतली मुलगी शोधायची म्हणून खरे तर आमच्या मित्राने सहा महिन्यात जे२ईई वगैरे शिकून घेतले होते. तर मुलाखत अशी झाली.
मुलगी: काय स्किल्सेट ?
मित्रः काय असाच थोडाफार, इकडे तिकडे, काहीतरी. तसं घरातलं वातावरण सोवळं, त्यामुळे लग्नासाठी आवश्यक स्किल्सेट स्वतःच बिल्ड केला.
मुलगी: अच्छा, म्हणजे सेल्फ मोटिव्हेटेड, क्विक टु लर्न, वगैरे.
मित्रः हो, तसेच म्हणा. सुरुवात अगदी एफ-१ की पासून.
मुलगी: हायबर्नेट वगैरे ?
मित्रः हो, करतो की. दर शनिवार रविवारी.
मुलगी: स्प्रिंग ?
मित्रः ओढून बघा. ताणेन पण तुटणार नाही.
मुलगी: कुठे कुठे वापरलेत हे स्किल्स ?
मित्रः तशी संधी कमीच मिळाली, आणि मिळाली तीही अनपेड.
मुलगी: व्हेअर डू यू सी युअरसेल्फ इन फाईव्ह इयर्स ?
मित्रः हियर ओन्ली. विथ यू.
बस, त्या "विथ यू" ने त्या जाड भिंगाच्या चष्म्याखाली वाफ जमायला लागली. आणि महिन्याभरात आमच्या मित्राचे लग्न झाले.
बाहेरून अगदी आनंदी वाटणारे युगल. पण आमचा मित्र आमच्या पार्ट्यांना येणे बंद झाले, केस गळायला लागलेच होते, पण आता चंद्रकोर उगवायला लागली होती. सतत विमनस्क दिसायचा. म्हणून एकदा हिंजवडीहून परतताना त्याला गाठला. आणि बळेबळेच दोन पेग पाजले. मग मित्र खुलला, आणि त्याने अनेक किस्से सांगितले. सगळे काही इथे लिहिण्यासारखे नाहीत. (अधिक माहितीसाठी इच्छुकांनी व्यनि करावा. किंवा जाऊ द्या,उगाच सर्वर ची ब्यांडविड्थ कशाला वाया घालवता?)
लग्नानंतर काहीच दिवसांनी, रोज कॅफेटेरियात खायचा कंटाळा आला, म्हणून बायकोला त्याने कुकर लावायला सांगितला.बायकोने आधी कांकूं केले, पण एक नवीन स्किल्सेट रिझ्युमेवर टाकता येईल, म्हणून भात केला. तर पहिल्याच घासात खडा. "अगं, तांदूळ निवडून घेतला होतास का ?" दाताचा टवका थुंकत मित्र म्हणाला. तर बायको खेकसली. "तू मला भात करायला सांगितला होतास. खडे नसलेला, असं स्पेक मध्ये होतं का ? प्रॉडक्ट रिलीज झाल्यानंतर स्पेक बदललेलं कसं चालेल ? पुढच्या वर्शनला ही व्हॅल्यू अॅडेड सर्विस म्हणून कन्सिडर करीन."
नंतर दर शुक्रवारी ती वीकली स्टेटस रिपोर्ट मागायला लागली. एका आठवड्यात त्याच्या रिपोर्टमध्ये घर झाडल्याची फक्त तीनदा नोंद होती, म्हणून "आय हॅव नोटेड धिस फॉर युवर अॅन्युअल इव्हॅल्युएशन", म्हणाली.
भाजी आणणे, कपडे धुणे, घर साफ करणे, अशा प्रत्येक कामासाठी, एक एक बगझिला टिकेट बनवायची, आणि घरी येऊन रोज डॅशबोर्ड उघडून बग-स्टेटस रिव्ह्यू करायची.
मित्र हे सर्व उदास होऊन सांगत असताना, मला उगीच डोक्यात काहीतरी चमकले. मी म्हटले, "पण, काय रे, 'ते' तरी व्यवस्थित होते ना ?" मित्राच्या डोळ्यात पाणी तरळल्या सारखे वाटले.
"वीकली स्टेटस सॅटिस्फॅक्टरी वाटले, तर शनिवारी नक्की. माझी सगळी बगझिल्ला टिकेट्स रिझॉल्व्ड फिक्स्ड असणे आवश्यक आहे, तरच."
मित्र पुढे सांगत होता.
"आमच्या म्हातारीचे काय खरे नाही. तिने अल्टिमेटम दिले, की नातवाचे तोंड पाहिले नाही, तर भूत म्हणून दोघांच्याही मानगुटीला बसेन, म्हणून."
"अरे, पण तुमच्या दोघांच्या मानगुटी कधीच जवळजवळ नसतात. एकदम दोघांच्या मानगुटीवर कशी बसेल ती ?" माझा माफक विनोदाचा प्रयत्न.
मित्राने आवंढा गिळला, आणि पुढे सांगू लागला.
"मी भीत भीतच बायकोला सांगितले. तर, आश्चर्य असं, की ती खूपच खूष झाली. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कंटाळा आला, आता प्रॉडक्ट डेव्हलप करायला मिळणार म्हणून तिला आनंद झाला होता. तिच्या बरोबरच्या -- म्हणजे वयाने आणि आकारानेही-- काही मुली म्हणे अमेरिकेत आयटीत होत्या. त्या हिला ईमेलवरून खिजवायच्या. कारण त्या प्रॉडक्ट करायच्या, आणि ही सर्विस. त्यामुळे स्वतःचे प्रॉडक्ट म्हटल्यावर, तिला एक विकृत आनंद झाला.
तिने रोडमॅप डॉक्युमेंट लिहायला सुरुवात केली. टाईमलाईन्स, प्रोसेसेस, सगळ्या डॉक्युमेंट केल्या. अरे इतके डिटेल मध्ये प्लॅनिंग केले. आता रिक्वायरमेंट देणारी कस्टमर म्हणजे आमची म्हातारी. मग हिने एक पॉवरपॉइंट तयार केले, चित्रे वगैरे काढून, अगदी डिटेलवार. आणि कोल्हापुरात म्हातारीला प्रेझेंटेशन देऊन आली. इंटरमिडिएट डिलिव्हरेब्ल्स ची चित्रे पाहून म्हातारीचे डोळे पांढरे झाले. डेव्हेलपमेंटसाठी वॉटरफॉल मॉडेल वापरावे, का अजाईल प्रोसेसेस ह्यावर बरेच दिवस विचार झाला. शेवटी, अजाईल इज इन, वॉटरफॉल इज सो सेव्हन्टीज, म्हणून ते ठरले. स्प्रिंट प्लॅनिंग मंथली करायचे ठरले, कारण फीचर इंप्लिमेंट करून क्यू-ए, डिप्लॉयमेंट वगैरे व्हायला एक महिना लागतो म्हणे."
मी अवाक होऊन पहात होतो. हसावे की रडावे काही कळत नव्हते. मी सहानुभूती दाखवण्यासाठी आणखी एक पेग मागवला. मित्र मात्र लगेच उठला, आणि म्हणाला, "नको रे, जातो आता घरी. आज तिसरा मंथली स्प्रिंट रिव्ह्यू आहे. उद्यापासून नवीन स्प्रिंट सायकल सुरू होणार. प्रोजेक्ट डिले झाले, तर बेंचावरच्या मंडळींना अॅडिशनल रिसोर्स म्हणून प्रोजेक्टवर टाकेल ती."
असा आमचा निर्मळ मनाचा उमदा मित्र, ह्याचे आयटीतल्या मुलीने कसे वाटोळे केले, बघा. या एका उदाहरणावरून तुम्हाला सहज कळले असेल, की जगातले सगळे प्रॉब्लेम्स आयटीतल्या बायकांमुळे झालेले आहेत.
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 11:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
शेवटच्या वाक्यातला 'आयटीतल्या' हा शब्द चुकून पडला आहे का!!
3 Aug 2010 - 12:00 pm | मिसळभोक्ता
शेवटच्या वाक्यातला 'आयटीतल्या' हा शब्द चुकून पडला आहे का!!
बाकी क्षेत्रातला अनुभव नाही बॉ !
3 Aug 2010 - 12:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खुलाशाबद्दल धन्यवाद! :-)
=)) =)) =)) =)) =))
4 Aug 2010 - 10:50 am | सविता
पुढच्या पानावर जाऊ नये म्हणून इथे प्रतिसाद देतेय!!!
अशा प्रकारे तुमचेही शतक झालेकी!!!!
अभिणंदण!!!!
3 Aug 2010 - 11:34 am | शिल्पा ब
डोळे पाणावले बघा... दुष्ट मेल्या या आय टीतल्या बायका....साधा स्वयंपाकसुद्धा येत नाही म्हणे आणि लग्न करताहेत.... नवर्याचं कसं होणार सांगा बरं?
इथे हल्लीच एक तद्न्य आले आहेत त्यांची शिकवणी लावा पाहू..
मग ? बायकांना स्वयपाक नको का यायला? तेच तर महत्वाचं नाही का ओ ?
4 Aug 2010 - 8:48 am | आजानुकर्ण
श्री. सुजय कुलकर्णी यांच्या लेखाप्रमाणेच हा लेखही विनोदी वाटला. उत्तम विनोदी लेख. दोन्ही लेखांमध्ये अतिशयोक्ती, अपेक्षाभंग आणि वास्तवता यांचे बेमालूम मिश्रण आहे. दोन्ही लेखांमध्ये विशिष्ट व्यक्तिसमूहाला स्टीरिओटाईप करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र लेख खुसखुशीत जमले आहेत.
मात्र एका लेखावर स्त्रीमुक्तीची धुळवड आणि लेखकाला शिवीगाळ व्हावी आणि दुसऱ्या लेखावर लेखकाचे चांगभले व्हावे हा न्याय काही समजला नाही.
हे कोणी समजावून सांगेल काय?
5 Aug 2010 - 5:39 am | मिसळभोक्ता
मात्र एका लेखावर स्त्रीमुक्तीची धुळवड आणि लेखकाला शिवीगाळ व्हावी आणि दुसऱ्या लेखावर लेखकाचे चांगभले व्हावे हा न्याय काही समजला नाही.
मलाही हा न्याय समजला नाही. म्हणूनच नवे-जुने सदस्य "अन्याय, अन्याय" म्हणून ओरडत असावेत.
सुजय कुलकर्णी आणि एकंदरीत सर्वच कुलकर्ण्यांनी तेराव्या शतकापासून मराठी साहित्याला मिळालेला कुलकर्णींचा वारसा चांगला सांभाळला आहे, असे वाटते. मी सुजय कुलकर्णीचा फ्यान आहे, हे तर जगजाहीर आहे.
(बाब्या-कार्टे-समभाव-न्याय-पुरस्कर्ता) मिसळभोक्ता
3 Aug 2010 - 11:34 am | विनायक प्रभू
सु. कु. मार व ह्यांचे अभिनंदन.
मिभो ना लेखन करण्यास उद्युक्त केल्याबद्दल.
प्र. भा. क. र. ना शास्टांग.
3 Aug 2010 - 12:54 pm | गणपा
हा हा हा, अगदी असच म्हणतो.
बाकी काय फरक पडो ना पडो, आयटी तल्या काकवा / खापर पणजोबा लोक्स स्वयंपाक शिको वा ना शिको, पण या धुळवडीनंतर अस्स्ल १००% मिभो पेस्शल लेखन वाचायला मिळाल हे भरुन पावलं.
त्या नव्या(?) पाखरांना (पंगा शेठ कंसा बदाल स्वारी हां.) १०० गुन्हे माफ ;)
जियो मिभोकाका (जियो शब्द जुन्या मालकांकडुन साभार.)
3 Aug 2010 - 6:49 pm | प्रभो
अस्स्ल १००% मिभो पेस्शल लेखन वाचायला मिळाल हे भरुन पावलं.
3 Aug 2010 - 11:38 am | शेखर
क्लास... पुर्वीसारखेच तडकेदार लेखन...
3 Aug 2010 - 9:14 pm | धनंजय
असेच म्हणतो.
3 Aug 2010 - 11:40 am | Nile
इथे खपलो! =)) =))
सदर प्रतिक्रीया श्री सुजय कुलकर्णी अन प्रविन्भपकर यांना सादर अर्पण.
3 Aug 2010 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार
षटकारच !!
3 Aug 2010 - 3:58 pm | लिखाळ
हा हा .. सहमत..
मजा आली :)
3 Aug 2010 - 11:56 am | ऋषिकेश
एका वेळी अनेक आघाड्यांना टोलवणारी अगदी तुफान फटकेबाजी .. शेवटी मिभो इज मिभो!!
ह ह लो पो हे वे सां न ल
आणि हो साक्षात मिभोंना लिहिते केल्याबद्दल सुकुंचे आभार! :)
3 Aug 2010 - 2:21 pm | सागर
शेवटी मिभो इज मिभो!!
खास करुन आयटी वाल्यांना तर जास्त खुसखुसायला होईल ;)
भन्नाट लिव्हलय मिभो तुम्ही =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
3 Aug 2010 - 11:50 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =)) =))
मिभो फटका!!!!
मिभो, व्यनि करतोय. ;)
3 Aug 2010 - 2:15 pm | केशवसुमार
=)) =)) =)) =)) =)) =))
मिभो फटका!!!!
मिभो, व्यनि करतोय. ;)
3 Aug 2010 - 4:38 pm | श्रावण मोडक
दोनदोन संपादक मिभोंशी व्यनिमनीच्या गोष्टी करू लागले!!! ;)
'आणिबाणी'ची पहाटचिन्हे तर नाहीत ना ही?
3 Aug 2010 - 11:51 am | चिरोटा
म्हातारीला द्या वर पाठवून क्लाउड कॉम्प्युटिंग करायला आणि युनिक्सच्या बिछान्यावर fork() ला बोलवा.
3 Aug 2010 - 11:59 am | मिसळभोक्ता
"ई यू एन यू सी एच" तर नाही ना म्हणायचे तुम्हाला ?
शेवटी ज्याची त्याची आवड, म्हणा.
3 Aug 2010 - 11:52 am | इन्द्र्राज पवार
या एका उदाहरणावरून तुम्हाला सहज कळले असेल, की जगातले सगळे प्रॉब्लेम्स आयटीतल्या बायकांमुळे झालेले आहेत.
मिभोभाऊ.... योगायोग म्हणजे मी देखील कोल्हापूरचाच आहे (ते तुम्हालाही माहित आहेच म्हणा...) आणि कोसला, बिढार, हिंदू वाले नेमाडे यांच्या भाषेत "कारा" ही आहे. पण आता दोनाचे चार होतील लवकरच, पण त्यासाठी तुमच्या या लेखाची आठवण जरूर ठेवावी लागेल. तुमचा कोल्हापुरातील पत्रकार मित्र सोशिक दिसतो, पण सर्वच तसे असणार नाहीत त्यामुळे बायको बघताना पु.ल.देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे "नाक जागच्या जागी असले की बास !" असे वागावे.
3 Aug 2010 - 1:24 pm | प्रकाश घाटपांडे
जागच्या जागी सगळ असल म्हणजे झाल असा त्याचा अर्थविस्तार केला जातो.
3 Aug 2010 - 2:02 pm | इन्द्र्राज पवार
"जागच्या जागी सगळ असल म्हणजे झाल असा त्याचा अर्थविस्तार केला जातो."
नक्कीच, पण ते पु.लं. असल्यामुळे त्यांनी तशी वा तितकी लिबर्टी घेतली नाही (भाऊ पाध्ये, चित्रे वा कोलटकरांनी जरूर घेतली असती.)
मला वाटते असेच एका लेखकाचा (या संदर्भातच) एक सल्ला आहे ~~ "अरे, शेवटी एक लक्षात ठेव, अंधारात सगळी मांजरे काळीच !"
3 Aug 2010 - 2:06 pm | मिसळभोक्ता
"अरे, शेवटी एक लक्षात ठेव, अंधारात सगळी मांजरे काळीच !"
ह्म्म्म.. मांजर आडवे जाणे ह्याला अपशकून का मानतात, ह्याचा थोडा खुलासा झाला.
3 Aug 2010 - 5:48 pm | असुर
" पाध्ये अणि काळं मांजर" असा नवा (?) स्क्रीन-प्ले लिहायचा विचार आहे!!
-- असुर
3 Aug 2010 - 11:53 am | सहज
सुकुभौंना धन्यु!
3 Aug 2010 - 11:56 am | विंजिनेर
ख प लो.
अशक्य फटके.
मिभो तुम्हाला माझ्या कडून एक पोर्श भेट ;)
3 Aug 2010 - 12:01 pm | निखिल देशपांडे
खतरनाक..
टिपीकल मिभो..
मिभोंना लिहिते केल्याबद्दल आभार...
एक एक पंचेस सही आहेत
3 Aug 2010 - 12:02 pm | विनायक प्रभू
सुकु आणि भप्कर यांना 'जेवण बिवण' मधे खुपच प्रॉब्लेम्सना आता पर्यंत सामोरे जावे लागले आहे असे वाटते असे तर मिभो ना सुचवायचे नाही ना?
3 Aug 2010 - 12:09 pm | मिसळभोक्ता
तरीच म्हटलं अजून कुणाला कोचावर (सायकियाट्रिस्टच्या) झोपवलं कसं नाही मास्तरांनी.
वरील दोन्ही प्रेरणादायी लेखांमध्ये "जेवण/स्वैंपाक" ऐवजी "बिवण/बिंपाक" टाकून वाचा. खूप मजा येईल.
(घासकडवी मास्तर सत्याच्या खूपच जवळ पोहोचले होते: "लग्नाआधी एकटाच स्वयंपाक करायचो, आता दोघेही करतात" असे त्यांनी कबूल केले होते.)
3 Aug 2010 - 12:13 pm | विनायक प्रभू
मी तेच केले.
हसुन हसुन मेलो.
म्हणुनच प्रतिक्रिया दिली नाही.
पण बिंपाक चा अंदाज बरोबर वाटतोय एकं दरीत.
नविन शब्दाबद्दल धन्यवाद.
काय पाक मनोवृत्ती हो तुमची.
3 Aug 2010 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अचानक पुलंच्या फुलराणीचा बाप आठवला .... ;-)
उगाच नाही घासकडवी लगेच गुर्जी झाले!!
3 Aug 2010 - 4:34 pm | असुर
आवरा!
>> अचानक पुलंच्या फुलराणीचा बाप आठवला ....
हे लै भारी!!!
ह.ह.पु.वा!
गाडी गुर्जींच्या गावाला गेलीये! गुर्जी, जेवायचं 'बिवायचं' काहीतरी बघा की!
--असुर
3 Aug 2010 - 11:12 pm | राजेश घासकडवी
काल रात्री जरा अंमळ भरपेट जेवण करून लवकर झोपलो, तर तेवढ्यात तुम्ही एवढा सगळा दंगा माजवून ठेवलात.
असो. मिभो, तुमचे जुने लेख पुन्हा पुन्हा वाचायचा अंमळ कंटाळा आला होता. तेव्हा हा लेख लिहिण्याची स्फूर्ती दिल्याबद्दल दोन्ही नव्या (?) सदस्यांना धन्यवाद.
आयटीतल्या स्त्रियांमुळे निर्माण होणारे प्रश्न तीन दिवसांत तिसऱ्यांदा वाचले, पण यावेळी सहज ओघवत्या भाषेत, आणि खुमासदार शैलीत (शुद्धलेखन व अतिरेकी टिंबं वगैरेंविषयी मी काही बोलत नाही...). मजा आली.
लेख इतक्या पटकन होण्यासाठी बरीच माकडं लावलेली दिसतात, पण सध्या रेसेशन असल्यामुळे दे वर्क फॉर पीनट्स...
3 Aug 2010 - 12:05 pm | अवलिया
हा हा हा
लै भारी.. !
3 Aug 2010 - 12:11 pm | नितिन थत्ते
ज ब रा
3 Aug 2010 - 12:12 pm | योगी९००
ह. ह.पु.वा..
आज पहिल्यांदा मि.भो. यांची प्रतिमा दिसली.. बघूया आज कोण विरजण घालते ते..
शेवटी, अजाईल इज इन, वॉटरफॉल इज सो सेव्हन्टीज, म्हणून ते ठरले. स्प्रिंट प्लॅनिंग मंथली करायचे ठरले, कारण फीचर इंप्लिमेंट करून क्यू-ए, डिप्लॉयमेंट वगैरे व्हायला एक महिना लागतो म्हणे."
पण daily scrum चे काय? त्याचा कोठेच उल्लेख नाही.
3 Aug 2010 - 12:19 pm | मिसळभोक्ता
ह्या स्प्रिंट सायकल मध्ये, फक्त ५-६ दिवसच डेली स्क्रम उपयोगाचा असतो, म्हणे.
4 Aug 2010 - 1:17 am | आनंदयात्री
>>ह्या स्प्रिंट सायकल मध्ये, फक्त ५-६ दिवसच डेली स्क्रम उपयोगाचा असतो, म्हणे.
खिक्क !!!
बाकी अजाईल म्हटले की मॉकिंग आलेच ;)
-
आंद्या स्क्रम मास्टर
3 Aug 2010 - 12:15 pm | छोटा डॉन
=)) =)) =)) =))
एका दगडात किती पक्षी हो ?
भयंकर जबरदस्त लेख हो मिभोकाका !!!
शेवटचा प्रतिसाद कहर आहे ...
प्रथेप्रमाणे हा लेख ट्रान्सलेट करुन काही अमराठी आयटी जनांना ( किंवा जणींना ) आचुन दाखवण्यात येईल व त्यांच्या प्रतिक्रियांचे भले मोठ्ठे खरडखेचर / व्यनीखेचर / प्रतिसादखेचर मिभोकाकांना फेकुन मारण्यात येईल.
3 Aug 2010 - 12:58 pm | मिसळभोक्ता
सर्वांना धन्यवाद. खरड्खेचराच्या प्रतीक्षेत.
विशेष म्हणजे आदरणीय प्रविन्भप्कर ह्यांनी प्रतिसाद देऊन आम्हाला कायमचे उपकृत केले आहे. हे म्हणजे गल्लीत टेनिस बॉल क्रिकेट खेळताना साक्षात तेंडुलकरने आमच्या कव्हर ड्राईव्हची तारीफ करण्यासारखे आहे.
3 Aug 2010 - 1:05 pm | Nile
मी प्रविन्भप्कर यांच्या मिभोकाकांना उद्देशुन "तुम्ही हुशार आहात" ची वाट बघत आहे. ते अमृताचे बोल ऐकले की मन कसे तृप्त होईल... ;-)
3 Aug 2010 - 1:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
मिभोकाका, आजचा दिवस तुमच्या नावे!!
3 Aug 2010 - 12:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा लेख 'धर्म' आणि 'अनुभव' या क्याटेगरीत?? मिभोकाकांचा विजय असो, विजय असो, विजय असो!
3 Aug 2010 - 12:18 pm | ज्ञानेश...
धन्यवाद !
3 Aug 2010 - 12:20 pm | बद्दु
ह. ह. पु. वा
3 Aug 2010 - 12:26 pm | Pain
तिच्या बरोबरच्या -- म्हणजे वयाने आणि आकारानेही--
प्रोजेक्ट डिले झाले, तर बेंचावरच्या मंडळींना अॅडिशनल रिसोर्स म्हणून प्रोजेक्टवर टाकेल ती.
:D :D :D :D :D :D :D :D
अप्रतिम!
3 Aug 2010 - 12:48 pm | मस्त कलंदर
=))
मजा आली वाचताना..
मिभो काकांना लिहिते करणार्यांचे आभार!!! (त्यांना अनुल्लेखाने मारायला आम्ही पुणेरी नाही तरीही)
3 Aug 2010 - 1:21 pm | ऋषिकेश
अजून थोडी आठवलेली माहिती:
स्क्रममधे दर स्प्रिंटच्याशेवटी 'शोकेस' मिटिंग असते..
डेली 'स्टँडअप' कॉल असतो
प्रोजेक्टच्या आधी 'मास्टर' स्टोरी लिस्ट असते
रोज बदलणारा "बर्न अप" चार्ट असतो
3 Aug 2010 - 1:30 pm | मिसळभोक्ता
अगदी अगदी !!!
डेली स्टँड अप १०-१५ मिन्टांपेक्षा जास्त नको म्हणतात ;-)
शेवटी अजाईल म्हणजे तरीकाय हो, बी इंग रिस्पॉन्सिव्ह टु चेंजिंग रिक्वायरमेंट्स.
3 Aug 2010 - 1:33 pm | ऋषिकेश
:)
अजूए एक तत्त्व राहिलेच
व्हॉट कस्टमर वाँट्स कॅनबी फुलफिल्ड बाय ओन्ली अटेंडिंग इट्स ६०% रिक्वार्मेंट्स. (रेस्ट ऑल इज फॉर प्लेजर)
3 Aug 2010 - 1:38 pm | मिसळभोक्ता
(रेस्ट ऑल इज फॉर प्लेजर)
का कोण जाणे, प्लेजर म्हटले की "अत्याधुनिक उपकरणे" आठवतात.
त्यामुळे आफ्टर ६०% रिक्वायरमेंट्स आर मेट, स्टार्ट युजिंग "अत्याधुनिक उपकरणे", असे काहीतरी दिसते.
जय हो !
3 Aug 2010 - 1:40 pm | ऋषिकेश
=))
__/\__
फारच हसत असल्याने यापुढे काहि लिहिता येणार नाहि
3 Aug 2010 - 5:29 pm | विजुभाऊ
डेली स्टँड अप १०-१५ मिन्टांपेक्षा जास्त नको म्हणतात
पावलो कोएलो चे "एलेवन मिनिट्स" वाचून काढलय बहुतेक ;)
3 Aug 2010 - 1:31 pm | नंदन
अशक्य!, ठार मेलो हसून हसून =)) =))
[तरी एका अपाचे प्रोजेक्ट ज्यात ओपन-सोर्स इम्प्लिमेंटेशन आहे त्याचा उल्लेख हवा होता - डेटा इन्टेन्सिव्ह डिस्ट्रिब्युटेड अॅप्लिकेशन्ससाठी तरी ;)]
3 Aug 2010 - 1:47 pm | रणजित चितळे
छान वाटले वाचुन
3 Aug 2010 - 2:35 pm | स्वछंदी-पाखरु
वरील पुर्ण लिखाणात पी. एम.पी. बद्दल दोघांचे पण ज्ञान नसेल असे वाटले........
प्रोजेक्ट क्म्पंलीट नसेल होत तर संपर्क साधा..........
3 Aug 2010 - 2:39 pm | घाटावरचे भट
म हा न ! ! !
3 Aug 2010 - 2:46 pm | डी.प्रासाद
सुजय कुलकर्णींचा हा लेख मी मझ्या एका मैत्रिनिला दाखवला होता ती पन 'आय.टी.' त आयटीमधे काम करते...
तीचा पारा असा काय वर गेला... का बस...
म्ह् ने की आम्ही पन काम करतो मग तुम्ही स्वयपाक नको करयला...
....
च्यायला करायच कही नही हो... पन उद्या म्हनतील ... झाडू मारा... कापडे ध्वा .....येवद्यात थाब्ल्या तर नशीब नाहीत .... पोर बी.............
3 Aug 2010 - 2:47 pm | स्वाती दिनेश
अ श क्य लिहिले आहे... मि भो इन फुल फॉर्म...
झाडावर बसून पॉपकॉर्न खाऊन संपले आता मचाणच बांधून ठेवायला हवे आहे काल परवाचे काही धागे आणि त्यावरचा मिभोंचा हा षटकार बघताना वाटते आहे,:)
स्वाती
3 Aug 2010 - 2:59 pm | अनिल २७
भन्नाट लिहिले आहे.. मिभोराव.. आजपासून मी तुमचा पंखा!! बाकि काहि म्हणा, आय टी तली बाई म्हणजे हमखास टी आर पी खेचणार...
3 Aug 2010 - 3:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो अनिलसेठ, मिभोकाका आयटीतले असले तरि बाई नाहीयेत ...
(पळा आता, मिभोकाका हाणताहेत!)
3 Aug 2010 - 3:10 pm | अनिल २७
धन्यवाद आदितीबाई.. आज तुम्हि माझे डोळे उघडलेत..!!
3 Aug 2010 - 3:35 pm | अर्धवट
आयाय ग...
च्यायला लचकाच तोडतय.. मिभोभौ...
मस्त...
3 Aug 2010 - 4:25 pm | चतुरंग
काय ती फटकेबाजी! =)) =)) =))
मिभो इज बॅक इन अॅक्शन. यू मेड माय डे!!! :) :)
(तरी बरं फक्त सॉफ्टवेअरचाच उल्लेख झालाय अजून हार्डवेअर प्लॅट्फॉर्म्स वगैरे आलेले नाहीत. ;) )
(खुद के साथ बातां : रंगा, मिभोची 'हाडूप' हत्तीवरुन मिरवणूक काढावी का?)
(सिस्टिम्स्)चतुरंग
3 Aug 2010 - 4:54 pm | शुचि
>> प्रोजेक्ट डिले झाले, तर बेंचावरच्या मंडळींना अॅडिशनल रिसोर्स म्हणून प्रोजेक्टवर टाकेल ती.>>
ही ही
मस्त!!!
3 Aug 2010 - 5:04 pm | आंबोळी
साष्टांग नमस्काराचि स्मायली कशी टाकतात?
3 Aug 2010 - 5:06 pm | चतुरंग
<०()8=<
3 Aug 2010 - 6:40 pm | कवितानागेश
मला एक शंका सतावतेय...
स्वैपाक उत्तम करणे इतकेच फुसके 'क्वलिफिकेशन' लग्नासाठी पुरते का?
स्वभावाचे काय?
उत्तम स्वैपाक करणारी ' कैदाशीण' चालेल का?
माझ्या पाहण्यात आहेत काही.....
कळवा मला, कर्तव्य असेल तर!
3 Aug 2010 - 7:01 pm | ब्रिटिश टिंग्या
तुम्ही दररोज आरश्यात पाहता का?
4 Aug 2010 - 6:29 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>उत्तम स्वैपाक करणारी ' कैदाशीण' चालेल का?
स्वयंपाक न करणाऱ्या कैदाशिणीपेक्षा बरीच की नाही. अशा पण खूप आहेत माझ्या पाहण्यात. जालावर पण आहेत म्हणे काही :-)
3 Aug 2010 - 8:10 pm | मी-सौरभ
मिभो झिंदाबाद!!
मिभो झिंदाबाद!!
मिभो झिंदाबाद!!
मिभो झिंदाबाद!!
मिभो झिंदाबाद!!
मिभो झिंदाबाद!!
पावन झालो हा लेख आनी प्रतिसाद वाचून......
अवांतरः या लेखाला मुखप्रुष्ठावर अढळ स्थान द्यावे .......
3 Aug 2010 - 10:11 pm | चावटमेला
आयला, जबराट...
मिभोंना, शिर साष्टांग नमस्कार...
बादवे, satire कसे लिहावे याचे क्लासेस कधी सुरु करताय? पटकन जॉईन होतो :)
3 Aug 2010 - 10:21 pm | शिल्पा ब
मला हा ब्लोग खुप आवड्ला
3 Aug 2010 - 11:16 pm | आमोद शिंदे
अरे इथला माझा प्रतिसाद का उडवला? मला वाटलं ह्या धाग्यावर धूडगूस घालायची खुली सूट आहे :)
4 Aug 2010 - 12:53 am | पांथस्थ
आजचा दिवस सार्थकी लागला.
बाय द वे, आजचा दिवस दर वर्षी मिपावर "IT Womens Day" म्हणुन साजरा करण्यात यावा अशी संस्थळ चालकांना नम्र विनंती :)
4 Aug 2010 - 1:10 am | दिनेश
लगे रहो मिभो..मजा आली. कोदा लेखनातून थोडी सुटका झाली..
दिनेश
4 Aug 2010 - 3:01 am | बन्ड्या
एकदम पिक्चरच पाड्लात ......
लय भारी.
... बन्ड्या कोल्हापूरी
4 Aug 2010 - 4:19 am | स्वाती२
ज ब रा!
4 Aug 2010 - 6:41 am | सहज
१००वा प्रतिसाद!!!!
कार्येशु मंत्री, कर्मेशु दासी, भोज्येशु माता, शयनेशु रम्भा, रुपेशु लक्ष्मी, क्षमया धरित्री, सत्कर्म नारी, कुलधर्म पत्नी आजकाल मिळत नाही म्हणता?