इंटर व्ह्यु २

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
15 Jun 2010 - 11:11 pm

सरः एक मोठ्या कंपनीचे मालक. अपत्यहीन. आपल्या संपत्तीचा सुयोग्य विनियोग करण्यासाठी एक सब्सिडरी रिसोर्स डेवलपमेंट कंपनी काढण्याची इच्छा बाळगुन असलेले.
एच.आर.: सर्व नियम तोडुन जगलेला. A Total Freak...
............................................................................................
वर्तमान
"त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय देउ ह्याचा विचार करत होते. पण खोटे बोलुन चालणार नव्हते. ते शक्य नव्हते. कोण आहेत ते. रिअ‍ॅक्शन आणि स्टीम्युलस रिस्पॉन्सचा खुपच अभ्यास आहे त्यांचा. इंटरेस्टींग प्रोफाइल असे उत्तर मी देणार होते...
एवढ्यात तेच म्हणाले," Is this about Dad's business failure and that too because of some trusted employee."

मी थक्क झाले."
.........................................................................................

भुतकाळः
त्याला कॉलेजमधे एकच मित्र होता. समदु:खी. दोन्ही घरांची श्रीमंतीकडुन गरीबीकडे वाटचाल. पावसाळ्यात सुद्धा स्लिपर्स. प्लास्टीकच्या पिशव्यात घरुन बांधुन आणलेल्या चपात्या कँटीनमधे जवळ बसलेल्या सहकार्‍याच्या राहीलेल्या सांबार किंवा चटणी मधे बुडवुन खायच्या. प्रॅक्टीकल नंतर चणे आणि पाणी. सुट्टीच्या दिवसात काम करुन घरी हातभार लावणे क्रमप्राप्त. इंटर नंतर दोघांनीही शिक्षण बंद करुन नोकरी पकडली.
त्याला नोकरी मिळाली. साहेब मिळाला तो पण अवलिया. इंजिनियरिंग ची डीग्री अर्धवट सोडुन ह्युमन सायकॉलॉजीत डॉक्टरेट केलेला. यु.एन. च्या भारतातील प्रकल्पाचा अधिकारी. त्या दोन वर्षात मुंबईच्या गल्ली बोळातुन झोपड्यांतुन फिरताना आयुष्याचे गणितच बदलले.
........................................................................................

"सर, He reports to none चा अर्थ काय? ते तुमच्या कंपनीत काम करतात ना? आणि ते असताना ह्या इंटर व्ह्यु ची गरज काय?"
हम्म.
ते फक्त त्यांच्या मर्जीने सात दिवसांकरता आले होते. कन्सलटंट म्हणुन.त्या दिवशी त्यांनी इतर ३ अगदी अनुभवी उमेदवार रिजेक्ट केले. जाताना एक एनवलप दिले आणि म्हणाले " Open this if Saritaa returns. That should be in 2 weeks."

क्रमशः

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अनामिक's picture

15 Jun 2010 - 11:27 pm | अनामिक

या भागाला क्रमशः आहे की लेख संपला?
अजूनही काहिच कळत नाहिये...

-अनामिक

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 11:29 pm | शिल्पा ब

या भागात फारशी काही लिंक लागली नाही...बहुदा मला आधीचा भाग सुद्धा कळला नसावा....पुढचा भाग आल्यावर बघू कै कळतंय का..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

हवालदार's picture

15 Jun 2010 - 11:31 pm | हवालदार

कोणी सोप्या भाषेत सान्गेल काय?

कसले हुश्शार हो तुम्ही .. इतकं क्रिप्टिक लिहिता इतकं क्रिप्टिक लिहिता की काही समजतच नाही. म्हणजे नक्कीच 'लय भारी' असणारे. कस्स कस्स जमतं बुवा तुम्हाला?

गणपा's picture

16 Jun 2010 - 4:08 am | गणपा

पहिल्या भागात हाती काही तरी लागतेय अस वाटल होत म्हणुन मोठ्या उत्साहाने धागा उघडला.
पण हे इतक कोड्यात लिव्हलय मास्तरन कि आता वाटतय पहिल्या भागात बहुतेक भ्रमच झाला आसावा.
त्यामुळे आता समाप्त दिसे पर्यंत प्रतिसाद राखुन ठेवतोय.

- ( भ्रमिष्ट ) गणा

(अंतरात्मा की आवाज : छ्या कसली अवदसा सुचली नी झोपायच्या आधी हा धागा उघडला)

धमाल मुलगा's picture

16 Jun 2010 - 2:19 pm | धमाल मुलगा

गणपाइतकाच मीही गंडलोय.
चला, इतके प्रतिसाद वाचुन लक्षात आलं आपण एकटेच नाही गंडलेले :D

मास्तुरे...च्यायला...लेख लिहिल्यावर मत्वाच्या पाइंटाची यादी व्यनि करत जा हो मलापण!
उगं तिच्यायला डोक्याला भुंगा लागतो. ~X(

स्वप्निल..'s picture

17 Jun 2010 - 12:36 am | स्वप्निल..

त्यासोबत लेख समजण्यासाठी पुर्वतयारी कशी करायची ते सांगा :T

उगाच वाचुन ~X(

पण आता ह्या भागात काय चालले आणि काय वाचले कशा कशाचाच मेळ लागत नाही.

वेताळ

डॉ.श्रीराम दिवटे's picture

16 Jun 2010 - 1:39 pm | डॉ.श्रीराम दिवटे

जराशी असंबंध वाटतंय खरं, पण चालू देत...

*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2010 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी, लेखातले फक्त सब्सिडरी रिसोर्स डेवलपमेंट कंपनी येवढेच कळले ;)

तेवढे पुरेसे आहे, नाही का ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

16 Jun 2010 - 2:30 pm | छोटा डॉन

तुम्ही लै पुढे गेलात की पराशेठ.

आम्ही आपलं पहिल्याच वाक्य "सरः एक मोठ्या कंपनीचे मालक " हे वाचले आणि त्यातला "मालक" शब्द वाचुनच पुअढे काही कळण्याची आशा सोडली.
असो.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

Nile's picture

16 Jun 2010 - 3:00 pm | Nile

म्हणजे मालक दिसल्यावर तुम्ही लगेच चपला घातल्या म्हणा ना...

-Nile

छोटा डॉन's picture

16 Jun 2010 - 4:09 pm | छोटा डॉन

मालक = अगम्य
मालक = अनाकलनिय

मग काय करणार पुढे वाचुन ? घातल्या आम्ही चपला लगेच !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

आंबोळी's picture

16 Jun 2010 - 4:07 pm | आंबोळी

आम्ही आपलं पहिल्याच वाक्य "सरः एक मोठ्या कंपनीचे मालक " हे वाचले आणि त्यातला "मालक" शब्द वाचुनच पुअढे काही कळण्याची आशा सोडली.

आम्ही तरीही थोडी आशा ठेउन पुढे वाचत गेलो ... पण

साहेब मिळाला तो पण अवलिया
इथे आमचेही अवसान गळाले....

आंबोळी

गणपा's picture

16 Jun 2010 - 4:19 pm | गणपा

कंदिलधार्‍या लै बेक्कार
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्रमोद देव's picture

16 Jun 2010 - 6:04 pm | प्रमोद देव

ह्यांना आम्ही कधीच गंभीरपणे घेत नाही. :D

आर्र तिच्या...शरदिनीतैला वाला बी मास्तरच की....हे म्हंजी मास्तरचा वर्ग...मग कसं झेपनार आमच्यासारख्या सामान्य मान्साला? :O

रेवती's picture

16 Jun 2010 - 7:18 pm | रेवती

अजूनतरी काहीही समजत नाहिये.

रेवती

अर्चिस's picture

16 Jun 2010 - 9:38 pm | अर्चिस

'तलावात मगरी आहेत. तलावात पोहण्यास सक्त मनाई आहे. वाचलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल!!'

अर्चिस

समंजस's picture

17 Jun 2010 - 1:36 pm | समंजस

छान मास्तर!! नेहमीप्रमाणेच खास प्रभुगुर्जी स्टाईल मधे (क्रिप्टीक की काय ते) :)
पण दुसर्‍या भागातील खुलाश्यामुळे बरचसं कळायला लागलंय[असं मला वाटतंय :) .....पुढील भागांची वाट बघतोय]

त्या दोन पाकिटात काय असावे? आणि दोन पाकिटांची आवश्यकता का :?

[स्वगतः लश्कराच्या भाकर्‍या भाजणार्‍यांचा शोध ? ]

राघव's picture

17 Jun 2010 - 2:17 pm | राघव

मास्तर नेहमीच असे क्रिप्टिक लिहितात अन् डोक्याला खाद्य पुरवून जातात.
थोडे समजले थोडे नाही समजले.. पुढे समजेल अशी आशा ठेवतो अन् वाट बघतो आहे. :)

राघव