सुढाळ ढाळाचें मोती.....

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
27 May 2010 - 11:45 pm

रत्ने, मणी, खडे - एक संकलन -हा लेख काल मीमराठीवर वाचला आणि चर्चा सुरु झाली ती वेगवेगळ्या रत्नांवर. खरे सांगायचे तर मूळ धागा होता रामायण कालीन रत्ने, मणी- खडे या विषयावर .प्रतिसाद लिहीताना असे वाटले की विषयांतर होते आहे म्हणून आज वेगळेसे टिपण लिहीले. या टिपणाच्या सुरुवातीला काल लिहीलेला प्रतिसाद टाकतो आहे .त्यांनतर आजचा धागा पुढे लिहीला आहे.

बसरा मोतीनिदान भारतात तरी आता मिळत नाही.जुन्या दागीन्यातून काढून एखादा जव्हेरी विकत असेल तरच . बाकी बसरा मोती बगदाद मधून आपल्याकडे यायचे असे जाणकार सांगतात.मध्ये एकदा व्यापार्‍याने खरा बसरा मोती दाखवला होता. त्याच्या कडे एक अंगठी रीमेक साठी आली होती त्यातला.
बसरा मोती पांढरा नसतो. गायीच्या दुधावर आलेली साय ज्या रंगाची असते तितका पिवळसर असतो.चमक मनाला भूल पाडेल अशी असते.
सध्या बाजारात मिळणारे मोती चायनीज मोती म्हणून ओळखले जातात्ए मोती आकारानी छान गोल असतात त्यामुळे दागीन्यात वापरायला बरे पडतात.
बसर्‍याचा आकार गोलाकार नसतो.बसलेल्या बेसनाच्या लाडवासारखा दिसतो. गुजरात मध्ये खंबातला अजूनगी जुने बसरा मोती मिळतात.
ग्राहकाने खरा मोती मागीतला तर जव्हेरी खरा मोती वेडावाकडा असतो असे सांगतात. तरीही ग्राहकाने आग्रह केला तर वेडावाकडा जो मोती दाखवला जातो तो मोती नसतो.तो मोती नसून उलटा वळलेला शिंपला असतो. त्याला बहुतेक मदर ऑफ पर्ल असे म्हणतात. याची मोठी शंभर दोनशे ग्रामची लादीच मिळते .मग त्याचे तुकडे करून नैसर्गीक मोती म्हणून विकले जातात.
सध्या महागातला मोती म्हणजे वेनेझुलन मोती. पण बसरा मोती वेगळाच आणि महागही.
दहाएक वर्षापूर्वी ऐकीव किंमत सत्तावीस हजार रुपये केरट एकानी सांगीतली होती.
पुष्कराज ह्या खड्याबद्दलही बरेच प्रवाद आहेत पण ते विषय आला की लिहीतो.

********************************************************************

काल बसरा मोत्याचा विषय निघाला आणि श्री संत ज्ञानेश्वरांच्या एका रचनेची आठवण झाली.

काही शब्द ताबडतोब आठवेनात म्हणून संग्रह बाहेर काढला आणि पूर्ण रचना मिळाली.

सुढाळ ढाळाचें मोती ।अष्टै अंगे लवे ज्योती

जया होय प्राप्ती । तो चि लाभे.

संतानी नरदेह आणि जन्माचे वर्णन सुढाळ म्हणजे सुघड अशा मोत्याची उपमा देत म्हटले आहे की असे मोती आठ
अंगानी प्रकाश उजळतात.

आता मोत्याची आठ अंगे शोधणे भाग झाले .

थोड्या प्रयत्नानी ती पण माहीती मिळाली.पण अपूर्णच.

सहा अंगाची माहीती कळली.
आदर्श म्हणावे अशा मोत्याची लक्षणे म्हणजे ते पूर्ण वर्तुळाकार , तेजस्वी ,तुळतुळीत वजनदार , कोमल आणि

निर्मळ असावे.

पण ही लक्षणे सहाच झाली बाकीची दोन काही मिळाली नाहीत.

दोषांची यादी मात्र मिळाली.फाट ,नर पोटनर करवा , छाटे ,खळगे .

मोत्याच्या माथ्यावर फुटका भाग असला तर फाट.

मोती चिरल्यासारखी आडवी रेघ दिसली तर ती नर.

खोलगटपणा असला तर करवा आणि वेगळ्या रंगाचे ठिपके दिसले तर छाटे.

पण आता परीस्थिती अशी आहे की खरे मोती मिळतच नाहीत त्यामुळे या गुणदोषाची यादी फारशी उपयोगाची नाही.

उपयोगाची नसलेली तरीही रंजक अशी मोत्याची माहीती म्हणजे पूर्वी चालत असलेली मोत्याचे भाव सांगण्याची पध्दत.

मोत्याचा भाव चवावर सांगीतला जायचा.

आता चव हे काही वजनाचे माप नाही. तत्कालीन वजनाचे माप होते रती. रती म्हणजे तोळ्याचा बासष्ठावा भाग.रतीचे आणखी बारीक माप म्हणजे तंदुल.तांदूळाच्या सोळा दाण्याचा भार म्हणजे एक रती.

चव म्हणजे वजनभाराचे माप नसले तरी वजनभाराचा एक फॅक्टर असे आपण म्हणू या.
मोती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे मोत्याचा लॉट विक्रीस यायचा. त्याची किंमत काढण्याची पध्दत अशी होती.

लॉटचे वजन रतीत करायचे. त्याचा वर्ग करायचा .त्या वर्गाला पंच्चावन्नानी गुणायचे आणि शहाण्णवानी भागायचे.जो आकड येईल त्याला लॉटमधल्या मोत्यांच्या संख्येने भागायचे. असे करून जे उत्तर आले ते चवात आले. हे सगळे उपदव्याप करायचे कारण असे की लॉटमध्ये मोत्यांची संख्या कमी असली की चव वाढायचे आणि पैसे जास्त मिळायचे.बाकी पंचावन आणि शहाण्णवाचा काय गुणाकार आणि भागाकार का करायचा याचे उत्तर मात्र मिळाले नाही.

आता मात्र कॅरेटच्या हिशोबाने बाजार चालतो.एक कॅरेट म्हणजे दोनशे मिलीग्राम. पाच कॅरेट म्हणजे एक ग्राम.

मोत्यांची माहीती उगाळावी तितकी कमीच आहे. किंबहुना सगळ्याच रत्नांची माहीती उपसावी तेव्हढी कमीच आहे.

मी दिलेली माहीती कदाचीत गुगलवर नसेल म्हणून येथे दिली .

बाकी आमच्या सारख्या संतांना जडजवाहीर काय कामाचे ?

आम्ही आपले तुकोबा सांगतात तशी मानस पूजा करतो आणि सगळी रत्ने ज्याची त्याला अर्पण करतो.

रत्नांची कुंदले मोतीयाचा तुरा । शिरपेच बरा कलगीवरी

पाचरत्न मोती माणिक हिरक । अर्पिले सुरेख हार यांचे

कंठी ,भुजबंद ,पोंची ,कमरबंद । मुद्रिका स्वच्छंद नानापरी

तुका म्हणे माझ्या इच्छेच्या कारणे । ऐशीम भूषणे ल्याला देव.

तुम्ही मात्र खरेदीसाठी पैसे जमा करा मग आणखी काही तरी लिहीतो.

इतिहासविचार

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

28 May 2010 - 12:01 am | ऋषिकेश

वा! रत्नजडीत लेखन खूप आवडले

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

धनंजय's picture

28 May 2010 - 2:35 am | धनंजय

+१

विसुनाना's picture

28 May 2010 - 12:08 pm | विसुनाना

असेच.

Nile's picture

28 May 2010 - 12:13 pm | Nile

हेच

-Nile

श्रावण मोडक's picture

28 May 2010 - 12:59 pm | श्रावण मोडक

++

बिपिन कार्यकर्ते's picture

28 May 2010 - 2:35 pm | बिपिन कार्यकर्ते

+++

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2010 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

++++

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

28 May 2010 - 12:06 am | टारझन

हे रत्ने , हिरे किंवा मोती फिती आम्हाला दगडासमान ... काही कौडीची किम्मत वाटत नाही मला त्यांची :) उगाच शरीराला नसतं ओझं ;)
पण रामदासांच्या लेखाला मात्रं रत्नजडीत किंमत हो !! अगदी मौल्यवान :)

बाकी मी आजवर बरीच लोकं पाहिली .. लै दागीने , खडे आंगठ्यांचा शौक ... सगळ्या बोटांत आंगठ्या पाहिल्या .. पण एकानंही "मधल्या" बोटात आंगठी घातली नव्हती ... सांगा का ? सांगा .. सांगा ना ... !!

- मोतीदास

एक's picture

28 May 2010 - 11:30 pm | एक

बहुतेक वेळा (ड्रायव्हींग करताना) "वेगळया" कारणासाठी वापरतात..

तिथे क्न्फ्युजन नको (बोट दाखवतोय का अंगठी दाखवतोय?) मेसेज क्लियर हवा म्हणून अंगठी घालत नसतील.

(खरं कारणः मधलं बोट शनीचं बोट म्हणून ओळखतात म्हणून घालत नसावेत)

-(डायवर) एक

पाषाणभेद's picture

29 May 2010 - 8:03 am | पाषाणभेद

हो पण मधल्या बोटासाठीही अंगठी मिळते बाजारात. जाणकार सांगतीलच.

बाकी लेख म्हणजे लेख.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

सुनील's picture

28 May 2010 - 12:11 am | सुनील

छान माहिती.

बाकी, मोत्यांसारखे दात, हे वर्णन बसरा मोत्यांना लागू होत नसावे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हुप्प्या's picture

28 May 2010 - 12:22 am | हुप्प्या

तांत्रिक माहिती आणि सांस्कृतिक माहिती यांचा छान मेळ.

मदनबाण's picture

28 May 2010 - 12:24 am | मदनबाण

छान माहिती...

मदनबाण.....

Jealousy is nothing more than a fear of abandonment.

सहज's picture

28 May 2010 - 7:15 am | सहज

मस्त!

तुम्ही मात्र खरेदीसाठी पैसे जमा करा मग आणखी काही तरी लिहीतो.

लै भारी.

एक नंबरी.

(पुखराज)चतुरंग

स्वाती दिनेश's picture

28 May 2010 - 12:22 pm | स्वाती दिनेश

मोत्यांसारखे पाणीदार लेखन!
असेच म्हणते,
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 2:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पैसे जमवणं कठीण आहे. पण तुम्ही लिहाच काका.

(गाजरपारखी) अदिती

दत्ता काळे's picture

28 May 2010 - 1:33 pm | दत्ता काळे

बरीचशी माहीती मला नवीन होती. उपयुक्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच लेखन "मोत्यासारखे पाणीदार" असे मी ही म्हणतो.

आनंदयात्री's picture

28 May 2010 - 2:25 pm | आनंदयात्री

छान. माझ्या आजोबांच्या जुन्या अंगठीतला मोती तुम्ही म्हणता तो असावा काय अशी शंका येत आहे. अर्थात आता आजोबा नसल्याने कळणे थोडे दुरापास्त आहे.

-
(हिर्‍यामोत्यातला) आंद्या

पिंगू's picture

28 May 2010 - 2:37 pm | पिंगू

म्हणजे माझे दात खरच मोत्यासारखे आहेत ह्यात शंकाच नाही.. :) बाकी लेख मात्र मोतिया आहे..

स्पंदना's picture

28 May 2010 - 3:17 pm | स्पंदना

मग हे हैदराबादी मोती काय म्हणायचे?

काही म्हणा पण मोत्यांना जे पाणी असत ते बाकी कुठल्याही रत्ना मधे नसत.

लेखण खुपच माहीती देणार्...धन्यवाद.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

क्रान्ति's picture

28 May 2010 - 8:48 pm | क्रान्ति

माहिती मिळाली मोत्यांबद्दल. बसरा मोत्याच्या मोलाचा लेख लिहिलात रामदासकाका. अशीच बाकी रत्नांबद्दल पण लेखमाला लिहा. :)

क्रान्ति
अग्निसखा

अरुंधती's picture

28 May 2010 - 9:29 pm | अरुंधती

मोत्यांबद्दलची माहिती रोचक! :-)

गुगलल्यावर बसरा मोत्याची ही काही छायाचित्रे मिळाली!


अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

एक's picture

28 May 2010 - 11:31 pm | एक

पुष्कराज वर पन लवकर येवू दे.

-एक

तो एकदम चोकस छे !!!
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

संजा's picture

29 May 2010 - 7:02 pm | संजा

खुप माहितीपुर्ण व मनोरंजक लेख.

शंका.
>>> तत्कालीन वजनाचे माप होते रती.
१)मग रतीचे माप कसे काढायचे ?

संजा
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

रामदास's picture

29 May 2010 - 9:01 pm | रामदास

यासाठी सराईत नजरेची आवश्यकता आहे.
माझ्या ओळखीचे एक सदगृहस्थ रतीच्या ओल्या पावलावरून अदमासे कितवा महीना ते सांगायचे.

बाळकराम's picture

29 May 2010 - 7:32 pm | बाळकराम

रामदास काका, मस्त मोत्यासारखाच "चमकदार" लेख!

पण, माझ्या अल्पमतिप्रमाणे, एक छोटीशी शंका आहे-

१ रती=१ गुंज= अदमासे १२५ मिलिग्राम ( पूर्वी गुंजेच्या बिया वापरीत वजनासाठी ज्या exactly १२५ मिग्रॅ असतात)
आणि १ तोळा= ११.२५ ग्राम
मग १ रती हा तोळ्याचा ६२वा भाग कसा काय हे गणित कळले नाही बुवा?

बाळकराम

रामदास's picture

29 May 2010 - 8:58 pm | रामदास

रती आणि गुंज एक नसावे. गुंज आणि वाल सोन्याच्या हिशेबासाठी जास्त करून वापरायचे.तरीपण पुन्हा एकदा जुन्या नोट्स वाचून बघतो.