सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 May 2010 - 3:45 am

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा
जवळी मज करा
होवू निसंग
आता बाजूस करा हो कमरबंद ||धृ||

कितीक दिसानं येता आज घरा
डोळं लावूनी वाटं उभी अशृ नाही थारा
कसर काढा आता जल्माभरची
मी संगती असता करा लढाई बेधूंद

आता बाजूस करा हो कमरबंद ||१||

तुम्ही जरी शत्रू मारीले, धुळ चारीले
तुरे खोवीले, बिल्ले लाविले छातीवरी
काय कामाची अशी मुलूखगिरी
होईल सवत करील दोघात अंतर रूंद

आता बाजूस करा हो कमरबंद ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०५/२०१०

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

24 May 2010 - 6:08 pm | आंबोळी

दगडफोड्याने लै फोडलय....
बेष्ट!

आंबोळी

टारझन's picture

24 May 2010 - 6:16 pm | टारझन

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

पण षिर्षक वाचुन मरायला टेकलो =))

बाकी हा पाभ्या लेका ... एखादा म्हैला आय.डी. काढुन अशी काव्य टाकली तर रोमांच तरी अनुभवता येतील ;) नाव पाषाणभेद .. आणि कविता स्त्रीयाचणेची ?

- (तलवार धारी) टारझन गोल्डस्वार्ड

पाषाणभेद's picture

24 May 2010 - 7:56 pm | पाषाणभेद

टारझन भाऊ, (भाऊ म्हणनं महिलांच्या दृष्टीने सेफ आहे. म्हणून म्हटले हो भाऊ. ) तुम्हाला काय माहिती की हा आयडी पुरूषाचा आहे म्हणून. कदाचित तो महिलेचाही असू शकतो. भडकमकर मास्तर हे नाही का ताई झाले होते. असो. भाऊ.

अन भाईचा आयडी आहे असे न समजता पाषाणभेदनी असे वाचा मग. हय काय न नाय काय, काय?
:-)

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

परिकथेतील राजकुमार's picture

24 May 2010 - 6:21 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

हाणतेज्यायला !!

मी संगती असता करा लढाई बेधूंद

आता बाजूस करा हो कमरबंद ||१||

ह्या ओळी काळजाला भिडल्या.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

लढाईच एकदम यथार्थ वर्णन केले आहे. वाचक अगदी लढाई संपेपर्यत टिकुन रहातात . ;)
वेताळ

पाषाणभेद's picture

24 May 2010 - 8:00 pm | पाषाणभेद

काय ये की, लावनी जास करूनशान पेशवेकाळात फुलली. आन त्या वक्ताला सैनिक मुलूखगिरी/ लढाया करूनशान लय कटाळा करायचे. त्यास्नी मग कायतरी इरंगूळा नगो का? म्हून मंग लावन्या व्ह्यायच्या.

आताच्या काळात सैनिकांना आसले काय प्रोगराम कराया मिळत न्हाईत. म्हून पुण्यासारख्या ठिकानी सैनिक लोकं- मागल्या म्हैन्यात केलेत तशे- चाळे करत्यात. आसो.

वरल्या पयल्या कडव्यात आताच्या जमान्यातल्या सैनिकांसाठी 'बंदूक' हा शबूद वापराया हारकत न्हायी.

आन जुन्या जमान्यात छापखान्यात खिळे कमी र्‍हायचे आन काय काय येळेला खिळे अ‍ॅडजेस्ट करावा लागायचे. तसला परकार दावण्यासाठी शिर्षकात 'तलवारी' ऐवजी 'तल्वार' लिवेल हाय. (ही सुचना टारझन 'भाऊ' साठी बरं का रे भावड्या!)

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

फटू's picture

24 May 2010 - 8:09 pm | फटू

आमी "सुंदरा मनामधी भरली" च्या चालीवर म्हनुन बगितली आनी जमली पन.

लिवित र्‍हा. वाचायलाय आमी हावच. :P

- फटू

पाषाणभेद's picture

24 May 2010 - 8:29 pm | पाषाणभेद

क्या बात है!
फटूजी, जरा ती चाल पटकन ऐकवा ना राव! नाय म्हंजे मुळ लि़ंक दिली तरी चालल.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

बॅटमॅन's picture

7 May 2012 - 4:48 pm | बॅटमॅन

फोडॅक्स बगा येकदम!!!