(पूर्वसूत्रः "चला सुरू करा!!" देवकाकांनी घोषणा केली. सगळे सिद्धहस्त साहित्यिक समोरच्या पानातील देवकाकाहस्त मेजवानी फस्त करण्यासाठी तुटून पटले.....)
डांबिसकाकांनी एकदा समोरच्या पानावरून नजर फिरवली....
साखरभात, जिलेबी, मोतीचूर, पुरण पोळी! सर्व गोड मेन्यू....
चिंबोरीच्या लालभडक रसरशीत कालवणाला आणि नारळाच्या दुधाने सुरमटलेल्या सोड्याच्या खिचडीला चटावलेल्या डांबिसकाकांना घास काही घशाखाली उतरेना......
मग त्यांनी पंगतीत आजूबाजूला नजर फिरवली....
समोरच्याच रांगेमध्ये बसलेल्या स्त्रियांच्या पंगतीत त्यांना प्राजु दिसली....
"काय पुतणीबाई, बरं आहे ना?" काकांनी पृच्छा केली....
"हो काका, बरं आहे" पुतणी उद्गारली, "पण हे देवकाका आहेत ना, ते अतिशय दुष्ट आहेत!!!"
"का गं बाई?" डांबिसकाका आश्चर्याने विचारते झाले, " अगं इतकी चांगली मेजवानी जुळवून आणलीये देवकाकांनी! आणि तु त्यांना दुष्ट का बरं म्हणतेस?"
"अहो, मी त्यांना सांगितलं होतं की चांगला श्रीखंडपुरीचा बेत ठरवा पण त्यांनी माझं न ऐकता हा जिलेबीचा बेत ठेवला!!!", प्राजु.
"बरं झालं श्रीखंडपुरीचा बेत नाही ठेवला ते!!!", शेजारीच बसलेली पैठणी, आपलं.. रेवती ,नथीआडून म्हणाली, "श्रीखंड केलं असतं तर तू इथेही त्यात तुझ्या चारोळ्या टाकत बसली असतीस!!!!"
प्राजुला काहीतरी खरमरीत प्रत्युत्तर द्यायचं होतं पण जर रेवतीशी वाकडेपणा घेतला तर फर्मास आप्पे कसे खायला मिळणार असा उत्क्रांतीवादी दूरदर्शी विचार करून प्राजु काहीच बोलली नाही....
इतक्यात मुक्तसुनीतांनी आवाज दिला. " मंडळी!!! मी एक श्लोक म्हणतो, ऐका हं...."
"हरीच्या घरी शेवया तूप पोळ्या...
हरी वाढितो ब्राम्हणां वेळोवेळा....
असे ब्राम्हण जेवुनि तृप्त झाले...
विडा दक्षिणा देवुनि बोळविले....
"म्हणजे असं बघा मंडळी, की या मिपारूपी गोकुळात हा देवकाका रूपी हरी आपल्याला आज हे जिलेबीरूपी अमृत.........."
एका साध्या सोप्या श्लोकाचं मुक्तसुनीतरूपी पुराणिकबुवा क्लिष्ट शब्दांत निरूपण करू लागलेले पहाताच समस्त पंगतवासीयांनी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि आपलं चित्त समोरच्या मेन्यूवर केंद्रित केलं......
"मी याच श्लोकाचं विडंबन ऐकवतो, ऐका...", केशवसुमारांनाही आता कंठ फुटला....
आपल्या काव्यगुरूचं विडंबन ऐकण्यास डांबिसकाकाही सिद्ध झाले...
"ऐका हं," केशवसुमारांनी गळा खाकरून सुरवात केली....
"हरीने पळविल्या, राधिकेच्या चोळ्या...."
"पुरे!!!!!!!!!", समस्त पंगतवासीयांनी एका सुरात केशवसुमारांना गप्प केलं......
'सालं या मिपाकरांना काव्य कशाशी खातात ते समजतच नाय!!!!" असा विचार करून आणि बर्लिन इथे होणार्या आगामी मराठी सहित्यसंमेलनात ही कविता वाचून दाखवायचीच असा निश्चय करून केशवसुमार गप्प बसले.....
बराच वेळ डांबिसकाकांनी त्या गोड जेवणाशी लढाई करायचा असफल प्रयत्न केला. शेवटी पानातल्या फक्त जिलेब्या संपवल्या आणि त्यांनी पानावरून उठण्यासाठी देवकाकांची परवानगी मागितली.....
"मठ्ठा!!!!!!!", देवकाका गरजले. आपल्याला मठ्ठ म्हटलेलं पाहून डाबिसकाकाही अस्वस्थ झाले.....
"च्यायला, शेवटी असा मनसुबा होता होय!!! मला जेवायला बोलवून मग भर पंगतीत असा अपमान करायचा डाव होता काय!!!!", डांबिसकाकांच्या मनात हे विचार येतात न येतायत तोवर एका वाढप्याने त्यांच्या समोरच्या वाटीत एक पांढरं पाणी आणून ओतलं....
"मठ्ठा प्याल्याशिवाय कुठे भोजन पूर्ण होतं का?", देवकाका विचारते झाले....
डांबिसकाका बिचारे मुंबईत जन्माला आलेले आणि मुंबईतच वाढलेले! त्यांना मठ्ठा काय माहिती? त्यांनी त्या पाण्याचा वास घेतला.....
त्या आंबूस वासानेच त्यांचं पोट ढवळून आलं....
आता मात्र देवकाकांच्या रागलोभाची पर्वा न करता ते पंगतीतून उठले आणि आंचवायला गेले....
डांबिसकाका हात-तोंड धुतायत तोवर मागून अवाज आला....
"कं? झेवलास नं पोटभर?"
डांबिसकाका एकदम दचकलेच!! मिपावर हा इतका बोल्ड साहित्यिक कोण आलांय असं वाटून त्यांनी मागे वळून पाहिलं!!
बघतात तर मागे ब्रिटिश उभा!!
"अं, हो, हो! तुला 'जेवलास का?' असं म्हणायचंय नाही का? हो, हो, जेवलो!!", डांबिसकाकांनी हुश्श्य केलं, "काय बाल्या, तुला आवडलं की नाही जेवण?"
"जल्लां तं जेवन!!!"
"कां रे? तुला आवडलं नाही जेवण?"
"तसां नाय, पन इचिभनं, सगलां गोड गोड!!! तोंड सगलां गोड झालांय!!!"
डांबिसकाका समजून नुसतेच हसले. बाल्या पुढे म्हणाला, "ए डांबिसदादूस! येतंस काय माज्ये घरला? जरा ताजा जिताडा नं जवल्याची चटनी खावंयात!!!!"
डांबिसकाकांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी हळूच आत डोकावून पाहिलं तर देवकाका पुढल्या पंगतीची तयारी करण्यात गुंतले होते.......
"चल चल जाऊया! कुणाचं लक्ष नाही असं बघून इथून सटकूयांत!!", असं म्हणून ते बाल्याबरोबर निघणार तोच त्यांच्या कानावर आवाज पडला....
"काय रे, तुमचं दोघांचं इथे काय गुफ्तगूं चाल्लंय?"
"काय नाय तात्या! ते आपलं... हे आपलं......" बाल्याने उगाच वेड पांघरलं.....
"हो ना! हा बाल्या सांगत होता की देवकाकांनी मेन्यू काय झकास केला होता!!!", डांबिसकाकांनी बाल्याला सहाय्य देण्याचा प्रयत्न केला......
पण तो खमंग तात्या होता!! तो काय एव्हढ्यावर ऐकतोय?
"ते काही नाही!! तुमचा काय बेत चालला होता ते सांगा आधी!!!" तात्या.
आता साक्षात तात्याशी खोटं कसं बोलणार? तेही मिपाच्या मेजवानीत? झालं, सगळा बेत त्याला सांगणं भाग पडलं......
तात्याने क्षणभर विचार केला आणि मग म्हणतो कसा,
"चला, मी पण येतो तुमच्यासोबत!!!"
आता च्याट पडायची पाळी बाल्या आणि डांबिसावर आली.....
"अवो तात्या, अवो तुमी कसं येनार?", बाल्याने कसेबसे उद्गार काढले....
"हो ना! अहो आमचं एक ठीक आहे!!", डांबिसकाका म्हणाले, " आम्ही पसार झालो तर कुणाला पत्ताही लागणार नाही! पण तुम्ही? आणि मग तुमच्या सिद्धहस्तपणाचं काय?"
तात्याने एक नजर या दोघांकडे टाकली. एक नजर पंगतीवरून फिरवली.....
"च्यामारी, सिद्धहस्तपणा मारला फाट्यावर!!" तात्याने आपला पेटंट सिद्धहस्त उद्गार काढला, "चला, जिताडा खायच्या आधी एकेक पेग मारूयात!!"
असं म्हणून त्याने या दोघांच्या खांद्यावर एकेक हात ठेवला आणि ती तिक्कल झमझम बारच्या दिशेने चालू लागली.......
(संपूर्ण)
[डिस्क्लेमरः या कथेतील व्यक्तिरेखा खर्या असल्या तरी प्रसंग कल्पित आहेत. देवकाकांनी आम्हाला खरंच मेजवानी दिली असा जर कुणाचा समज झाला असेल तर तो केवळ योगायोग समजावा (आणि लगेच देवकाकांकडे पार्टी मागायला जाऊ नये!!!). या कथेमध्ये आलेल्या सर्व मिपाकरांना ह. घेतल्याबद्दल धन्यवाद!!! एक महत्वाचा संदर्भ सुचवल्याबद्दल श्री. मुक्तसुनीत यांचे विशेष आभार!!! आम्ही (आईशप्पत!!!) त्यांचे पुढले निरूपण चुपचाप ऐकून घेण्याचा णिश्चय केलेला आहे!!!!]
प्रतिक्रिया
7 Apr 2009 - 7:10 am | प्राजु
म्हणजे शेवटच्या भागांत माझ्या आणि रेवती मध्ये भांडण लावायचा विचार दिसतो आहे..;)
हा भाग सुद्धा भारी!
आवांतर : काका, अहो.. ते श्रीखंड -आम्रखंड... जिलेबी हे असले प्रकार माझ्या कोल्हापूरी घशातून खाली उतरतच नाहीत. हां आता.. आवडीने खाते तो एकमेव गोड पदार्थ म्हणजे रस-मलाई.. पण ती ही नव्हतीच पंगतीत. :(
असा उत्क्रांतीवादी दूरदर्शी विचार करून प्राजु काहीच बोलली नाही....
बरं बरं... टोमणे कळतात बरं आम्हाला सुद्धा. इथे कशाला मेला आणलाय तो उत्क्रांतीवाद! :) :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Apr 2009 - 7:15 am | सँडी
प्रत्येक वाक्याला हास्याचे फवारे!
"कं? झेवलास नं पोटभर?"
=))
अगदी मस्त!
मजा आली.
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
7 Apr 2009 - 7:35 am | घाशीराम कोतवाल १.२
पिडा काका तु कय लिवतस कय लिवतस
लय भारी ........... :)
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
7 Apr 2009 - 7:36 am | प्रमोद देव
डांबिसकाका बिचारे मुंबईत जन्माला आलेले आणि मुंबईतच वाढलेले
अहो डांबिसकाका, हे देवकाकाही मुंबईतच जन्मले हो! आणि त्यांची कर्मभूमीही मुंबईच आहे आणि मरेपर्यंत तीच राहील. त्या डांबिसकाकांसारखे अमेरिकेत जाऊन नाही बसणार म्हटल. ;)
असं म्हणून त्याने या दोघांच्या खांद्यावर एकेक हात ठेवला आणि ती तिक्कल झमझम बारच्या दिशेने चालू लागली.......
तरीच म्हटलं, ही अशी वजनदार मंडळी मध्येच कुठे गायब झाली ? :?
त्यामुळेच पुढची पंगत झालीच नाही. कारण?
अहो कारण काय विचारता? सगळेजण त्या तिकलीच्या मागे गेले ना! ;)
देवकाका एकटेच खिन्नपणे त्या जिलबीच्या ढिगाकडे पाहात बसले. आता ही कुणाला वाढायची? असा विचार करत..........
बाकी काय म्हणा डंबिसकाका, लेख मस्तच उतरलाय. उगीच नाय आम्ही तुम्हाला सिद्धहस्त म्हटलं! :)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
7 Apr 2009 - 9:58 am | नरेश_
देवकाका एकटेच खिन्नपणे त्या जिलबीच्या ढिगाकडे पाहात बसले. आता ही कुणाला वाढायची? असा विचार करत..........
असं विचारात पडून कसं चालेल देवकाका, मिपावरच्या सिद्धहस्त प्रतिक्रिया देणार्यांना बोलवा . करा पंगत. मी येईनच (न बोलवता ) ;)
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
7 Apr 2009 - 7:53 am | विसोबा खेचर
अरे डांबिसा, इतक्या लौकर समाप्त? अजून येऊ देत ना...
बाकी धमालच लिहिलं आहेस! पंगत डोळ्यासमोर उभी राहीली..
"कं? झेवलास नं पोटभर?"
डांबिसकाका एकदम दचकलेच!! मिपावर हा इतका बोल्ड साहित्यिक कोण आलांय असं वाटून त्यांनी मागे वळून पाहिलं!!
बघतात तर मागे ब्रिटिश उभा!!
हा हा हा! हे सर्वात भारी.. :)
चल तर मग, बाल्याच्या घरी मोहाची पिऊ आणि जिताडा खाऊ! :)
तात्या.
7 Apr 2009 - 7:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंगत लवकर उरकून घेतल्याबद्दल पिडाचा निषेध...!
>>"बरं झालं श्रीखंडपुरीचा बेत नाही ठेवला ते!!!", शेजारीच बसलेली पैठणी, आपलं.. रेवती ,नथीआडून म्हणाली, "श्रीखंड केलं असतं तर तू इथेही त्यात तुझ्या चारोळ्या टाकत बसली असतीस!!!!"
>>"हरीने पळविल्या, राधिकेच्या चोळ्या...."
>>कं? झेवलास नं पोटभर?"
वरील निरिक्षण आणि लेखकाच्या सर्जनशीलतेला पैकीच्या पैकी मार्क दिले ! :)
-दिलीप बिरुटे
7 Apr 2009 - 9:58 am | नंदन
सरांशी सहमत आहे. दुसरा भाग मस्त जमला आहे, पण अजून भाग वाचायला आवडतील. पंगतीचे नाही तर आब-ए-झमझमचे :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
7 Apr 2009 - 9:50 am | मुक्तसुनीत
येलोनॉटी ,
च्यामारी सगळेच्या सगळे फटाके दणदणीत लागलेले आहेत ! समर जोरात आहे एकदम ! दोन्ही भाग पुनःपुन्हा वाचले. दिलखुलास हसलो. फारा दिवसांनी मिपावर निर्भर विनोदाचा शिडकावा पहायला मिळाला ! असला निर्विष आणि दर्जेदार विनोद वाचायला मिळाला याबद्दल तुमचे अभिनंदन.
बाय द वे, एखाद्याची थट्टा सुद्धा अशी करता यायला हवी , की ज्याची थट्टा होते त्यानेही दिलखुलास दाद द्यावी. एकूण आंतरजालीय जगात आउट्-ऑफ्-व्होग् स्टाईल बनली आहे ही ;-)
7 Apr 2009 - 9:51 am | रामदास
चुकून आधी टाकला गेला वाट्टे.
हरकत नाही. मधले चार पाच भाग सलग येऊ द्या आता.
7 Apr 2009 - 10:00 am | श्रावण मोडक
म्हणतो...
7 Apr 2009 - 10:41 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
7 Apr 2009 - 7:22 pm | धनंजय
म्हणतो.
फॉर्मच्या शिखरावर रिटायर व्हायचे असते, चढत्या फॉर्मच्या वेळी नाही!
7 Apr 2009 - 10:12 am | प्रकाश घाटपांडे
आणि डांबिसकाकांची मात्रा लागू पडली. होस्टेलवर मराठी व्याकरणातल्या काना मात्रात स्वारस्य नसणार्या काही विदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याच्या बहाण्याने काही चावट मुले याचा वापर करीत.रात्री राउंड मारण्यास आलेल्या रेक्टर वर इंप्रेशन मारण्यासाठी या विदेशी विद्यार्थ्यांना रेक्टरशी असा संवाद साधण्यासाठी प्रवृत्त करीत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Apr 2009 - 11:28 am | प्राची
काका,
१ नंबर लेख झाला आहे.वाक्यावाक्याला हास्याची कारंजी उसळत होती. =)) =)) =))
लै भारी लै भारी लै भारी.... =D> =D> =D>
मुक्तसुनीत यांनी सांगितल्याप्रमाणे-
एखाद्याची थट्टा सुद्धा अशी करता यायला हवी , की ज्याची थट्टा होते त्यानेही दिलखुलास दाद द्यावी. एकूण आंतरजालीय जगात आउट्-ऑफ्-व्होग् स्टाईल बनली आहे ही
१००% सहमत.
7 Apr 2009 - 2:29 pm | जयवी
दोन्ही पंगती छान झाल्या हं :)
पंगतीत आम्हाला मात्र अजूनही शोधतो आहोत ;)
7 Apr 2009 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
पिडाकाका पंगत जरा घाईघाईत उरकल्या सारखी वाटते बॉ.
बार मध्ये सिद्धहस्त लेखकांना आमच्या सारखे फाजील लेखक भेटतात असा एक फर्मास भाग येउ द्या आता ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 Apr 2009 - 3:53 pm | अनिल हटेला
सहमत !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
7 Nov 2014 - 12:28 pm | विजुभाऊ
बार मध्ये सिद्धहस्त लेखकांना आमच्या सारखे फाजील लेखक भेटतात असा एक फर्मास भाग येउ द्या आता
परा...... ते वाचायला येईल इतपतच टैट्ट व्हावं लागेल तुला
7 Apr 2009 - 4:04 pm | क्रान्ति
अगदी पेशवाईतली पंगत झालेली दिसतेय! नथ, पैठणी, जेवणाचा बेत, अगदी जोरदार! आम्ही हसून हसून बेजार! पिडाकाका, खूपच मस्त!
=)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
7 Apr 2009 - 4:15 pm | क्लिंटन
पिडांकाका,
पंगतीचे वर्णन आवडले पण पंगत जरा संपल्यासारखं वाटलं. अजून येऊ द्या.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
7 Apr 2009 - 5:38 pm | चतुरंग
पिडाकाका, पंगत अशी आटोपता येणार नाही तुम्हाला!
चला टाका पुढचे भाग पटापट नाहीतर रोज तुमच्या खरडावहीत येऊन त्रास देईन! ;)
चतुरंग
7 Apr 2009 - 6:12 pm | रेवती
पंगत २ आवडली.
मला उगीचच पेशव्यांच्या काळात गेल्यासारखे वाटले.
प्राजु, तुला श्रीखंड आवडत नाही तर काय आवडतं?
परवाच व्य. नि. मधे म्हणालीस की श्रीखंड म्हणजे छान!;)
पुरणाच्या पोळ्या नको म्हणतेस... आता काय करावं?
रेवती
7 Apr 2009 - 6:17 pm | शितल
रेवती,
तु काळजी करू नको मी प्राजुला माझ्या बाजुला बसवते, आणि तिची श्रीखंडाची वाटी मी फस्त करते ;)
बाकी पिडाकाकांनी पंगत भारी मांडली आहे.
रेवती आणि प्राजु तील संवाद आवडला. :)
7 Apr 2009 - 7:17 pm | अवलिया
फार लवकर आटोपते घेतले असे वाटते
चतुरंगशी सहमत
--अवलिया
7 Apr 2009 - 8:47 pm | टिउ
चौफेर फटकेबाजी!!!
7 Apr 2009 - 9:08 pm | नितिन थत्ते
पोट भरले नाही. अजून जिलब्या आणा डांबिसकाका.
खराटा
(रंग माझा वेगळा)
8 Apr 2009 - 1:20 am | केशवसुमार
आमचा प्रतिसाद इथे वाचा
(पंगतीत गप्प केलेला) केशवसुमार
8 Apr 2009 - 1:27 am | धनंजय
आमचा प्रतिसाद इथे वाचा :
छान!
9 Apr 2009 - 12:17 am | पिवळा डांबिस
आमचा प्रतिसाद इथे वाचा
अहो गुरुदेव, 'तिथे' वाचू हो, पण तोच मस्त प्रतिसाद इथे लिहिलेला असतांना तो खोडलात कशासाठी?:)
अहो पंगतवासीयांनी तुमच्या विडंबनाला नको म्हटलं होतं, तुम्हाला पंगतीत बसून भोजन करायला नको म्हटलं नव्हतं हो!!!!!:)
एक कवी रुस्सला,
इथला प्रतिसाद पुसला,
आपली ताट-वाटी घेऊन
कोपर्यात फुगून बस्सला...
:)
8 Apr 2009 - 12:06 pm | ब्रिटिश
क भारी लीवलय रं.
डांबीसदादूस भारतात आल्याव पक्का फोन कर. मस्त पंगत झमवु बग.
सोताशीच : राच्च झेवताना हलूहलू न पेरमान झेवाचा. आंगाला लागतय बग.
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
8 Apr 2009 - 10:03 pm | अनंता
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
8 Apr 2009 - 9:56 pm | संदीप चित्रे
'ज' चा 'झ' करण्याची आयडिया आवडलीच एकदम.
30 Dec 2009 - 9:58 am | विजुभाऊ
लै भारी हे वाचलेच नव्हते.
30 Dec 2009 - 11:03 am | कानडाऊ योगेशु
पंगत २ ऐवजी चुकुन पतंग २ असेच वाचले.! :D
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.