सिंहगड माझ्या नजरेने....

दशानन's picture
दशानन in कलादालन
14 Dec 2009 - 12:25 pm

रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही.

महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड दिसतो कसा ह्यांची मनात खुप हुरहुर लागून राहिली होती व गडावर पोहचतात चारीबाजूची गर्दी पाहताच मन निराशेने भरले. जसे एखाद्या पिकनिक स्पॉटचे वातावरण असते तसेच वातावरण गडावर ही दिसत होते, चारचाकी-दुचाकी गाड्यांचे ताफेच्या ताफे उभे होते. छोट्या छोट्या टपरीमध्ये हॉटेल्स चालू होती, घरगुती जेवणापासून एक धाबा पण गडावर पाहिला नवल वाटले. चिंचा विक्रेत्यापासून विविध स्टिकर विकणारे, भाजलेल्या शेंगा व मक्याचे कणीस विकणारे ह्यांच्या मुळे गड असा गजबजून गेला होता. सुंदर मुली आपल्या आपल्या बुजगावण्यांना संभाळत आईसक्रिम खात इकडे तिकडे बागडत होत्या.

मला क्षणभर शंका वाटली व मनात आले चुकुन आपण सिंहगड सोडून कुठल्या तरी पिकनिक स्पॉटवर तर नाही ना आलो. पण थोड्याच वेळात जेव्हा मी थोडा पुढे गेलो तेव्हा शिवाजी महाराजांचा अर्धकार पुतळा दिसला व त्याच्या जवळच गडाची माहीती.

मी सर्वांना निरखत पाहात गडाच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र पसरलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या, पान-गुटखाचे पाऊच व घाणीचे साम्राज्य हे पाहून थोडे मन विचलित होत होते. गडावर असलेली छोटेखानी हॉटेल्स पाहून खरोखर नवल वाटले, एतिहासिक वास्तू च्याजवळ प्रदुषण निर्माण करणारे कोणतेच कार्य होता कामा नये असा आदेश ह्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हे शक्यतो महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याला माहीत नसावे की काय असा हाल.

गडावर पाहण्यासारखं काही राहिलेच नाही आहे, दारुचे कोठार, घोड्यांचा पागा, टिळक भवन व थोडीफार वाचलेली तटबंदी. निसर्गाच्या अवकृपे पेक्षाही जास्त अवकृपा मानवाने केली आहे ह्या गडावर. एखादे नितांत सुदर स्थळ कसे बरबाद करता येईल ते आपल्या कडून शिकावे जगाने. आरडाओरडा, दंगा ह्यांची रेलचेल दिसत होती. जेथे जेथे कोपरा मिळाला तीथे तीथे आपले बस्तान माडंलेले प्रेमीयुगल व त्यांचे प्रणयचाळे.

गडाच्या तटबंदीबरोबर पुर्ण दोन चक्कर मारली गडावर फोटो घ्यावे असे काही दिसलेच नाही, व जेथे काही फोटॉ घेऊ असा विचार येत होता तेथे माणसांची गर्दी कमी होत नव्हती त्यामुळे आसपासच्याच निसर्गाचे फोटो काढले त्यातील काही निवडक फोटो येथे देत आहे.

प्रवाससमाजजीवनमानछायाचित्रण

प्रतिक्रिया

माधुरी दिक्षित's picture

14 Dec 2009 - 12:27 pm | माधुरी दिक्षित

राजे पुण्याची भटकंती चालु केलीत वाटत :)

दशानन's picture

14 Dec 2009 - 1:34 pm | दशानन

माधुरी दिक्षित जी,

तुम्ही बरोबर ओळखलंत, सध्या काहीच काम नसल्याने भटकंती चालू आहे व काही पुस्तके देखील वाचत आहे लवकरच लेख लिहणार आहे.

तुमच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

प्रसन्न केसकर's picture

14 Dec 2009 - 12:59 pm | प्रसन्न केसकर

अहो सिंहगडावर इतिहास पहायला जातात की घडवायला? परंपरा जुनी आहे. तिथे कश्याला जातात हे समजुन घ्यायला
http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=222839
हे वाचा.

दशानन's picture

14 Dec 2009 - 1:12 pm | दशानन

श्री. पुनेरी-जी,

हे मला माहीतच नव्हतं.

तरी एका मित्राने सल्ला दिला होता की जाऊ नकोस तिकडे मनस्ताप होईल पण तरी ही गेलो मनस्ताप झाला पण नितांत सुंदर असा निसर्ग देखील पहावयास मिळाला त्याचा आनंद झाला.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

14 Dec 2009 - 2:17 pm | अवलिया

मनस्ताप आणि आनंद एकाच वेळी कसा होवु शकतो ह्याचा विचार करत आहे. कधी कधी मनस्तापाचा आनंद होतो, कधी आनंदाचा मनस्ताप होतो. परंतु दोन भिन्न अशा मानसिक उर्मींचे एकाच वेळी अनुभुती होणे आणि ती शब्दांत मांडता येणे यासाठी उच्च दर्जाच्या बौद्धिक आणि मानसिक संपन्नतेची गरज असल्याचे प्रतिपादन एका विचारवंताने केले होते. मध्यंतरी अशा द्वैअनुभवांच्या शृंखलेतुन मानवाची उन्नती न होता अधोगती होत आहे असा विचार प्रवाह जोर पकडु लागला होता आणि त्याविषयी अधिक चर्चा साहित्यसंमेलनात करावी की काय अशी चर्चा झाली होती. परंतु अध्यक्षपदाच्या रस्सीखेचात जे जिंकले त्यांना आनंद आणि हरलेल्यांना मनस्ताप झाल्याने असा द्वैअनुभव न मिळाल्याने, आपल्याला ज्या गोष्टींचा अनुभव नाही त्या अस्तित्वातच नसतात असा पुरोगामी विचार मांडुन अशा चर्चासत्रास परवानगी नाकारली. माझा पास आणि झोपण्याची तयरी फुकट गेली. असो.

--अवलिया

श्रावण मोडक's picture

14 Dec 2009 - 2:38 pm | श्रावण मोडक

साहित्याच्या सौंदर्यशास्त्रानुसार, लेखन ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक एकाचवेळी अनुभवांच्या वेगवेगळ्या स्तरांवर वावरत, जगत असतो. त्या-त्या स्तरांनुसार त्याच्या मनामध्ये निर्माण होणारी प्रतिमा आणि प्रतिबिंबे लेखनाच्या जातकुळीनुसार त्याच्या आविष्कारात उतरत असतात. तसेच येथे घडते आहे. एकीकडे म्हटले तर समृद्ध निसर्ग, पण त्याचवेळी त्याची होत असलेली लूट, तेथे असणारी हिरवाई आणि एरवीचा उजाडपणा असे दोन स्तर स्वच्छपणे दिसतात. त्या-त्या स्तरांवरचा अनुभव एकाचवेळी लेखक मांडतो आहे. तेव्हा मनस्ताप आणि आनंद येथे एकत्र येणारच. त्यासाठी आवश्यक उच्च-प्रतिभा प्रस्तुत लेखकाकडे आहे हे नक्की.
एका गाजलेल्या कादंबरीच्या लेखिकेशी संवाद साधण्याचा योग अलीकडेच आला. त्यावेळी त्यांनी असे अनुभव आणि वाचक यांच्यातील अंतराबद्दल बोलताना सांगितले की, लेखक जसा त्याच्या लेखनातील व्यक्तिरेखेशी तादात्म्य पावला पाहिजे, तसाच वाचकही त्या व्यक्तिरेखांशी तादात्म्य पावला पाहिजे. तसे झाले तरच ते लेखन यशस्वी म्हणता येते. वास्तवात, असे होणे म्हणजेच एक मोठे द्वंद्व एकात्म करणे होय. लेखकाचे काम ते हेच, असे या विदुषीचे म्हणणे आहे. तुमच्या उत्तरार्धातील अनुभवाशी हे वर्णन तादात्म्य पावते का हे मात्र तुम्हालाच ठरवावे लागेल.

दशानन's picture

14 Dec 2009 - 2:44 pm | दशानन

श्रावण मोडक-जी,

अतीशय उच्च प्रतिसाद.
लेखकच्या मनातील उलाघाल तुम्ही नेमक्या शब्दात व्यक्ती केली आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

14 Dec 2009 - 2:50 pm | अवलिया

@ श्री रा रा मोडकजीसाहेब ..

आपल्या माहितीबद्दल धन्यवाद !
आपल्याकडुन अशाच बहुमुल्य मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
आपण म्हणता तशी उच्चप्रतिभा लेखकाकडे आहे या आपल्या मताशी सहमत आहे. आपण आपल्या प्रतिसादात शेवटी आम्हास आमचा अनुभव वगैरेवर काही चिंतन करायचा सल्ला दिलेला आहे त्याबद्दल आपला मनापासुन आभारी आहे. त्या चिंतनावरची टिपण्णी प्रस्तुत धाग्यावर अनावश्यक असल्याने व्यनी मधुन केल्यास आपल्याला हरकत नसेल अशी आशा आहे.

काही दिवसांपुर्वी सौदर्याचे साहित्य अशा विषयी चर्चा करतांना माझी गाठ एका नवोदित तरुणींना मार्गदर्शन करणा-या पुर्वकाली अभिनेत्री म्हणुन कारकिर्द गाजवुन नृत्याचे विशेष नैपुण्य प्रदान करण्याचा दावा करणा-या एका संस्थेच्या संचालिकेशी पडली होती. मानवी मनामधे अनंत भावभावनांचे कल्लोळ असतांना मनातील भावभावनांच्या विपरीत एकच भाव चेह-यावरुन दृष्टोत्पत्त करुन त्यात प्रेक्षकांना स्वअनुभुतीची भावना निर्माण करण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण सदरहु अभिनेत्री करत असते. यामधे दोन भावनांचे मिश्रण होता कामा नये असे तिचे म्हणणे पडले. त्यावर आपले बहुमोल विचार कळाल्यास आपला ऋणी राहील.

पुनश्च एकवार धन्यवाद !

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2009 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक-जी आणी अवलिया-जी वाह !! अतिशय सुंदर प्रतिसाद.

तुमच्या सारख्या जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनासाठी खरेतर ह्या मिपावर यावेसे वाटते. तुमचे लेखन व प्रतिसाद दोन्हीही कायमच ज्ञान वृद्धींगत करणारे असतत. आपल्या लेखनातील खोली, लांबी , रुंदी हि मराठी साहित्याला एक वेगळेच आयाम मिळवुन देते.

तुमच्या प्रतिक्रीया वाचल्यावर पुन्हा एकदा नव्या नजरेने (खरेतर ह्या नव्या नजरेचे श्रेय तुम्हालाच) हा लेख वाचला आणी बर्‍याच अव्यक्त गोष्टी बोलक्या झाल्या. काही वेळा लेखकापेक्षा लेखाच्या प्रतिक्रीया लेख जास्ती उलगडुन दाखवतात हेच खरे.

तुम्ही दोघांनी तुमच्या तुम्ही उल्लेखलेल्या व्यक्तींबरोबरच्या संवादाच्या इ-मेल येथे उपलब्ध करुन दिल्यात तर मी आपला खुपच आभारी राहिन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

14 Dec 2009 - 3:23 pm | धमाल मुलगा

श्री.राजकुमार-जी,
आपल्या ह्या प्रतिक्रियेमुळे, 'डोक्यात आहेत विचार पण उमटेना अक्षरही' अशी काहीशी परिस्थिती होती त्यामधुन सुटका झाल्याची जाणिव झाली.
श्री.मोडक-जी आणि श्री.अवलिया-जी ह्यांच्या उपरोल्लेखित प्रतिक्रियांमधुन जे ज्ञानकण मिळाले त्याबद्दल फार फार काही लिहु इच्छित होतो परंतु ते कसं लिहावे हे समजत नव्हते. आपण माझ्याच विचारांना शब्दबध्द केलेत की काय अशी एक पुसटशी शंका येऊन गेली. :)

असो,
श्री. राजे-जी,
आपला सिंहगडावरील हा लेख मनास फार भावला. खरोखरीस ह्या दुर्गाची परवड उघड्या डोळ्यांनी पहावत नाही. ह्या आणि अशा पर्यावरणविरोधी वाटचालींना आळा घालण्याची मागणी करणारे पत्र मी लवकरच प्रशासनाला पाठवणार आहे. त्याबद्दलची चर्चा चालु आहे.

-ध.

श्रावण मोडक's picture

14 Dec 2009 - 11:40 pm | श्रावण मोडक

दोन भावनांचे मिश्रण होता कामा नये असे तिचे म्हणणे पडले. त्यावर आपले बहुमोल विचार कळाल्यास आपला ऋणी राहील.
अगदी, अगदी. अशी मते महत्त्वाची असतात. पण इथे ते अवांतर ठरण्याची शक्यता असल्याने आणि धाग्याचा खफ होऊ नये, यासाठी आपण व्य.नि.तून बोलूया. कसे?

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2009 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

गडाची चांगली ओळख करुन देत आहात.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-स्वादिष्ट चिरोटे

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

दशानन's picture

14 Dec 2009 - 1:30 pm | दशानन

श्री परिकथेतील राजकुमार जी,

धन्यवाद.
मी लिहित आहे खुप मोठे भाग आहेत लवकरच लिहतो पण मी भाग - १ असे न लिहाता तुम्हाला कसे बरे कळाले की मी पुढील भाग देखील टंकणार आहे ते.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

परिकथेतील राजकुमार's picture

14 Dec 2009 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार

'बुजगावणे' शब्दप्रयोग चुकीचा वाटतो. 'ध्यान' असा शब्दप्रयोग उचित आहे. ध्यान शब्दाला प्रतिशब्द म्हणुन बुजगावणे वापरला तर तो चुकिचा ठरेल. बुजगावणे हा शब्द शेतीचा मुक रक्षक अशा अर्थाने वापरला जातो. ध्यानांच्या मुक्ती संघटना असतात पण बुजगावण्यांची संघटना नाही.

सावकाश पाटमांडे

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

दशानन's picture

14 Dec 2009 - 2:02 pm | दशानन

परिकथेतील राजकुमार -जी,

छान छान.
तुम्ही एकदम चांगला शब्द लक्ष्यात आणून दिलात माझ्या.

धन्यवाद बरं का.. लगेच बदल करतो.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

14 Dec 2009 - 1:35 pm | अवलिया

छान !

--अवलिया

झकासराव's picture

14 Dec 2009 - 1:36 pm | झकासराव

राजा
फोटो चांगले आहेत.
कुठ सिंहगडावर गेलात वाट चुकुन.
जिकडे फारशी गर्दी नाहि अशा ठिकाणी जायच तर सांगा की.
जाउ सोबत. :)

दशानन's picture

14 Dec 2009 - 1:43 pm | दशानन

झकासराव-जी,

प्रतिसादासाठी धन्यवाद.
तुम्हाला अशी कुठली जागा माहीत असेल तर सुचवा कार्यक्रम ठरवू आपण मिळून.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

वर्णन आणि फोटो आवडले

दशानन's picture

14 Dec 2009 - 1:45 pm | दशानन

जयपाल -जी,

तुम्ही ही एकदा जाऊन या तिकडे.
खुप पाहण्यासाठी हिरवळ देखील तिकडे आहे.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

सहज's picture

14 Dec 2009 - 1:43 pm | सहज

लेखमाला वाचतो आहे.

पुढील भागात "बस्तान माडंलेले प्रेमीयुगल व त्यांचे प्रणयचाळे" तसेच सिंहगडावर फेमस झुणका भाकर, वाडग्यातले दही, भजी येउ द्या. जमल्यास त्याच्या रेशीपीची नवी लेखमाला. सिंहगडावरचे पदार्थ....

:-)

दशानन's picture

14 Dec 2009 - 1:49 pm | दशानन

सहज-जी,

पुढील लेखाचा पाया उभाकरण्यासाठी मला पुन्हा एकदा सिंहगड भेट द्यावी लागेल ह्यावेळी थोडी दंतपिडा होती त्यामुळे वर खाणे टाळलेच होते पण तुम्ही म्हणत आहात तर लिहतो. तसे पाहता सिंहगड माझ्या घराजवळून जवळच आहे.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

विजुभाऊ's picture

16 Dec 2009 - 1:31 pm | विजुभाऊ

राजमान्य राजश्री आपली लेखकन्या छानच आहे.
नवनवे शब्द आपण ज्या तडफेने वापरता ती वाखाणण्याजोगी आहे. आपल्या पारखी नजरेतून सुटले असेल परंतु "तसे पाहता सिंहगड माझ्या घराजवळून जवळच आहे."
या वाक्यात व्याकरण दृष्ट्या ठाऊक नाही पण भौगोलीक दृष्ट्या काहितरी मिष्टेक ( याला काही लोक दुमत असे म्हणतात) असावी. घराजवळून जवळ म्हणजे नक्की पाय. एखादी गोष्ट जवळून जवळ किंवा दूर कशी असु शकते. ती घरापासून जवळ अथवा घरापासून दूर असू शकते.
माझे आडनाव मराठी भाषीक नसल्याने कदाचित असेल व त्यापरत्वे भाषेचे भौगोलीक ज्ञा कमी असू शकेल अशी मला शंका आहे.
परंतु आपण देशाच्या राजधानीत राहिल्याने आपले ज्ञानाबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. परंतु मला या वाक्याच्या रचने बद्दल बहुमोल मार्गदर्शन करावे ही विनन्ती आहे.

दशानन's picture

16 Dec 2009 - 1:56 pm | दशानन

श्री विजुभाउ -जी,

तुम्ही विचारलेला प्रश्न उच्च आहे व त्यावर सवंग चर्चा अपेक्षीत आहे मला सध्या मी व्याकरणावरचे एक पुस्तक वाचत आहे ते संपले की लगेच तुम्हाला व्यनी करतो ह्या विषयी.

असो,

पण तुम्ही वेळात वेळ काढून येथे प्रतिसाद टंकलात त्या बद्दल तुमचे आभार.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

विनायक प्रभू's picture

14 Dec 2009 - 1:46 pm | विनायक प्रभू

जगदंब

अवलिया's picture

14 Dec 2009 - 1:51 pm | अवलिया

मला नाही धन्यवाद दिलेस भिकार*+ ! माजलास काय ?

खुलासा -
* - इथे आणि + इथे कोणती अक्षरे येतात ह्याबद्दल मिपाकर अजिबात अनभिज्ञ नाहीत त्यामुळे खुलासा नसला तरी चालेल! ;)
-संपादक

--अवलिया

श्रावण मोडक's picture

14 Dec 2009 - 1:53 pm | श्रावण मोडक

सत्कारणी लावलेला दिसतोय. वा. अभिनंदन.

दशानन's picture

14 Dec 2009 - 1:58 pm | दशानन

श्रावण मोडक्-जी,

हो खुप मोकळा वेळ होता काय करावे हा प्रश्न समोर आवासून उभा होता तेव्हा वेळेचा चांगला उपयोग व्हावा व थोडे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळ पहावी ह्या उद्देशानेच गेलो होतो.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

धाग्याचा ख.फ. बनवु नका.
मालक लै बिझी आस्ले म्हणुन काय झालं ? सर्व बातम्या लगेच पोचतात.(मालीक के आदमी चारों ओर फैले हुए है/ हा हा हा )आपला आय.डी. रद्द होऊ शकतो.

दशानन's picture

14 Dec 2009 - 2:06 pm | दशानन

जैपाल जी,

मालक,

तुम्हाला कुठे एक ही प्रतिसाद अवांतर वाट आहे का ?
कृपया तुम्ही गुगल वरुन सर्च मारलेले फोटो दाखवून आम्हाला भीती घालू नका.

बाकी,

सल्लासाठी तुमचे परत एकदा धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

निखिल देशपांडे's picture

14 Dec 2009 - 2:04 pm | निखिल देशपांडे

सिहंगडाच्या असापासच्या निसर्गात सुद्धा मोबाईलचे टॉवर ह्यातच सगळे काही आले.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

दशानन's picture

14 Dec 2009 - 2:31 pm | दशानन

निखिल देशपांडे जी,

शक्यतो मला असे वाटते की ते मोबाईल टॉवर नसावेत कारण माझ्या मोबाईलची रेंज येत नव्हती तेथे. ते रेडिओ टॉवर असावेत.

बाकी,

सरकारने निसर्ग व टेक्नोलॉजीला हातात हात घालून चाला असा आदेश दिला असू शकतो.

प्रतिसादासाठी धन्यवाद.
*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Dec 2009 - 2:57 pm | फ्रॅक्चर बंड्या

ते आकाशवाणीचे टॉवर आहेत..
फार अगोदर पासुन.....

binarybandya™

दशानन's picture

14 Dec 2009 - 3:07 pm | दशानन

फ्रॅक्चर बंड्या जी,

महत्वपुर्ण माहीती साठी धन्यवाद.
लेखाबद्दल ही चार शब्द लिहले असते तर आवडले असते मला.
असो.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

प्रसन्न केसकर's picture

14 Dec 2009 - 4:58 pm | प्रसन्न केसकर

ते दुरचित्रवाणीचे आहेत. दुरदर्शन सुरु झाले तेव्हाच ते बसवले. तेव्हा आम्ही खडकवासला येथे रहात होतो आणि दुरदर्शनवर झालेला पहिला कार्यक्रम म्हणजे आमच्या जीवन शिक्षण विद्या मंदीर, खडकवासला आणि यशवंत विद्यालय, खडकवासला या शाळांमधील विद्यार्थ्यांचे सामुहिक स्वागतगीत.

दुरदर्शनचे प्रक्षेपण तिथे सुरु झाले तेव्हा कर्मचारी पुण्यात रहात अन कामाला तिथे जात. त्यांच्यासाठी खास मिनिबस असे परंतु ती जेमतेम दुर्गाच्या पायथ्यापर्यंत जात असे. त्यानंतर घनदाट जंगलातुन कर्मचारी गिर्यारोहण करत वर जात. यथावकाश त्या बससाठी वरपर्यंत रस्ता करण्यात आला असे स्मरते.

गडावर झुणका-भाकर, ठेचा, दही, ताक, खवा वगैरे जेवण घेऊन आजुबाजुच्या आतकरवाडी, मोगरवाडी, कल्याण वगैरे गावातील ग्रामस्थ येत. त्याची मजा औरच असे. आता गडावरच हॉटेले झालेली असुन तेथे शाकाहारी तसेव मांसाहारी जेवणाखेरीज मिसळपाव, कांदाभजी, कांदापोहे सारखे पदार्थ पण मिळतात परंतु चव व मजा कमी झाल्यासारखी वाटते.

गडावर देवटाके नावाचा शिवकालीन पाण्याचा दगडात बांधलेला तलाव आहे. पुर्वी तो तुडुंब भरलेला असला तरी त्यात टाकलेले नाणे तळाशी दिसे. त्याचे गोड पाणी औषधी आहे असे म्हणत व पुण्यातील काही प्रतिष्ठीत मंडळी रोज ते घरी प्यायला मागवत. आता त्यात शेवाळ साठले आहे.

गडाभोवती सर्वत्र पुर्वी घनदाट जंगल होते व त्यात वन्य पशु पक्षी मुबलक असत. त्याकाळी अनेक हौशी शिकारी तेथे शिकार करत. नंतर शिकारीला बंदी आली परंतु जंगल बरेचसे कापले गेले.

दशानन's picture

14 Dec 2009 - 6:54 pm | दशानन

श्री पुनेरी,

उपयुक्त माहीतीसाठी धन्यवाद.

मनोरे : - एक नवीन शब्द माहीत झाला आजच डायरी मध्ये लिहून ठेवतो.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

sneharani's picture

14 Dec 2009 - 2:48 pm | sneharani

फोटो मस्तच आलेत.
आवडले.

दशानन's picture

14 Dec 2009 - 2:54 pm | दशानन

स्नेहाराणी-जी,

धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्हे, पुणे येथे मुक्काम

टारझन's picture

14 Dec 2009 - 3:31 pm | टारझन

अतिशय उद्बोधक चर्चा चालू आहे. सिंहगड मला नेहमीच आकर्षीत करत आलेला आहे. इतका की मी एकदा गाडी बंद केली तरी ऑटोमॅटिक तिकडे ओढला गेलो. घरापासून तब्बल ६७ किलोमिटर मी असाच आकर्षित होऊन गेलो.
ह्यामुळे मला बजाज डिस्कव्हर ची अ‍ॅड आठवली. ;)
असो बदलिन.
मुख्य सांगायचं म्हणजे राजेंनी खरोखरंच लेख आवरता घेतला आहे. आपल्या राजेंनी स्वराज्याच्या स्थापने च्या कोडिंग फेज मधे आपला वन ऑफ द बेस्ट रिसोर्स "तानाजी मालुसरे" ह्याला हा किल्ला सर करायला पाठवलं होतं ! तानाजी यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हा किल्ला राजे शिवाजींना मिळवून दिला होता. तेंव्हा शिवाजी राजांचे डोळे अक्षरशः पाणावले होते. त्यांच्या सन्मानार्थ काढलेले ते उद्गार अतिशय सुरेख होते. राजे म्हणतात ... "गड आला .. पण सिंह गेला" ह्याच कारणामुळे आपण ह्या किल्ल्याला सिंहगड असं म्हणतो.

राजे .. ह्यावर एक मालिका होऊन जाऊंद्या .. " लुफ्त घ्या.. किल्ल्या-बिल्यांच्या इतिहासाचा" !

- किल्लेवडी

दशानन's picture

14 Dec 2009 - 3:42 pm | दशानन

श्री टारझन-जी,

तुमच्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
पुर्ण माहीती माझ्या पुढील लेखात तुम्हाला वाचावयास नक्की मिळेल.
राजेंचे ते वाक्य आज देखील मला सिंहगडावर कानी पडल्यासारखं वाटतं पण आजकालच्या नीच वृत्तीच्या लोकांनी गड्याचे भजे करुन टाकले आहे ह्या बद्दल खुप खुप वाइट वाटत आहे.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

छोटा डॉन's picture

14 Dec 2009 - 3:48 pm | छोटा डॉन

टारझनशी १००% सहमत.
( आजकल आंतरजालावर लिहण्याचे व त्यातुन कुणाशी सहमत होण्याचे प्रसंग फारच कमी येतात हे उगाच आपले जाताजाता नमुद करुन जातो.)

लेख फारच अप्रतिम आहे, एक छायाचित्र १००० शब्दांचे काम करुन जाते हे आज मनाला पटलेच. पण काही छायाचित्रे फारच त्रोटक वाटली, अशा प्रकारच्या लेखनासाठी व्यासंग हवा हे राहुन राहुन वाटले. असो, आता राजे पुढे सुधारतील अशी अपेक्षा आहे.
वर लेखात जी उद्बोधक माहिती ( उदा : छोट्या छोट्या टपर्‍या, चिंचा विक्रेत्यापासून विविध स्टिकर विकणारे, भाजलेल्या शेंगा व मक्याचे कणीस विकणारे , सर्वत्र पसरलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या, पान-गुटखाचे पाऊच व घाणीचे साम्राज्य , कोपरा मिळाला तीथे तीथे आपले बस्तान माडंलेले प्रेमीयुगल वगैरे वगैरे ) दिली आहे त्याच्या समर्थनार्थ काही फोटो टाकले असते तर बरे झाले असते. उद्या उठुन तुम्हाला तुम्ही सिंहगडावर कशाला गेल्ता असे विचारले तर त्याच्या समर्थान्र्थ ह्याचा उपयोग झाला असता.
असो, आता पुढे सुधरा ...

आता ह्या निमित्ताने आंतरजालावर किल्ले पालथे घालण्याची ( पक्षी : पायी फिरण्याची , किल्ल्यावर टल्ली होऊन किल्लाच पालथा घालण्याची नव्हे ) टुम निघाली तर आश्चर्य वाटु नये.
तसे आम्ही राजे ह्यांना ट्रेन्डसेटर म्हणुन ओळखतोच ...

तर त्यांनी ह्या निमित्ताने "किल्ले ऽऽऽ फिरवा " नावाचा विषेशांक काढावा अशी मी त्यांना विनंती करतो.
माझे जिब्राल्टरच्या खरडकावर उभे राहुन काढलेले २ फोटो आहेत, ते ही तुमच्या ई पत्त्यावर पाठवतो.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

दशानन's picture

14 Dec 2009 - 3:54 pm | दशानन

श्री छोटा डॉन जी,

सविस्तर प्रतिसादाचा आपला नियम येथे देखील पाळलात हे पाहून आनंद झाला.

तुम्ही म्हणता तशी मी चुक केली असावी अशी अंधूकशी शक्यता आहे, पण पुढील वेळी मी योग्य ते फोटो योग्य त्या कोनातूनच घेईन ह्याची खात्री बाळगावी.
वर तुम्ही जी माझी स्तुती केली आहे त्याबद्दल मी सविस्तर चर्चा खरडवही वर तुमच्याशी करतोच.

तरी ही प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया's picture

14 Dec 2009 - 3:54 pm | अवलिया

श्री रा रा छोटाजी डॉनजीसाहेब यांच्याशी सहमत आहे.

त्यांनी प्रस्तुत केलेली विशेषांकाची सुचना अतिशय स्वागतार्ह्य आहे. अशा संकल्पनेला सर्व लेखकांनी उचलुन धरले पाहिजे. अतिशय उपयुक्त आणि बहुमोल सुचना करण्यात यांचा खारीचा वाटा असतो हे मी नमुद करु इच्छितो. त्यांच्या सुचनांचा योग्य तो विचार व्हावा.

धन्यवाद.

--अवलिया

छोटा डॉन's picture

14 Dec 2009 - 3:49 pm | छोटा डॉन

टारझनशी १००% सहमत.
( आजकल आंतरजालावर लिहण्याचे व त्यातुन कुणाशी सहमत होण्याचे प्रसंग फारच कमी येतात हे उगाच आपले जाताजाता नमुद करुन जातो.)

लेख फारच अप्रतिम आहे, एक छायाचित्र १००० शब्दांचे काम करुन जाते हे आज मनाला पटलेच. पण काही छायाचित्रे फारच त्रोटक वाटली, अशा प्रकारच्या लेखनासाठी व्यासंग हवा हे राहुन राहुन वाटले. असो, आता राजे पुढे सुधारतील अशी अपेक्षा आहे.
वर लेखात जी उद्बोधक माहिती ( उदा : छोट्या छोट्या टपर्‍या, चिंचा विक्रेत्यापासून विविध स्टिकर विकणारे, भाजलेल्या शेंगा व मक्याचे कणीस विकणारे , सर्वत्र पसरलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या, पान-गुटखाचे पाऊच व घाणीचे साम्राज्य , कोपरा मिळाला तीथे तीथे आपले बस्तान माडंलेले प्रेमीयुगल वगैरे वगैरे ) दिली आहे त्याच्या समर्थनार्थ काही फोटो टाकले असते तर बरे झाले असते. उद्या उठुन तुम्हाला तुम्ही सिंहगडावर कशाला गेल्ता असे विचारले तर त्याच्या समर्थान्र्थ ह्याचा उपयोग झाला असता.
असो, आता पुढे सुधरा ...

आता ह्या निमित्ताने आंतरजालावर किल्ले पालथे घालण्याची ( पक्षी : पायी फिरण्याची , किल्ल्यावर टल्ली होऊन किल्लाच पालथा घालण्याची नव्हे ) टुम निघाली तर आश्चर्य वाटु नये.
तसे आम्ही राजे ह्यांना ट्रेन्डसेटर म्हणुन ओळखतोच ...

तर त्यांनी ह्या निमित्ताने "किल्ले ऽऽऽ फिरवा " नावाचा विषेशांक काढावा अशी मी त्यांना विनंती करतो.
माझे जिब्राल्टरच्या खरडकावर उभे राहुन काढलेले २ फोटो आहेत, ते ही तुमच्या ई पत्त्यावर पाठवतो.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

प्रभाकर पेठकर's picture

14 Dec 2009 - 9:01 pm | प्रभाकर पेठकर

सिंहगडावर अनेकदा जाणे झाले आहे, अजुनही होते आहे.
गडाचा इतिहास आकर्षित करतोच पण आता त्या इतिहासात नविन भर काही पडत नाही त्यामुळे आता तिथे मिळणारी खेकडा भजी, झुणका भाकर आणि मातीच्या सुगडातलं दही हेच आकर्षण उरले आहे.

मध्यंतरी सुप्रसिद्ध इतिहासकार श्री. निनाद बेडेकर ह्यांच्या समवेत सिंहगडाची भ्रमंती केली (३०-४० इतिहासप्रेमींचा जथा होता). गडावर लिहून ठेवलेल्या माहिती व्यतिरिक्त ज्ञानात जास्त काही भर पडली नाही पण तरीही आत्तापर्यंतच्या अनेक फेरफटक्यांपेक्षा ती भ्रमंती जास्त आनंद देऊन गेली.

गडावरील उपहारगृहे, टपर्‍या, स्टॉल्स, प्रेमी युगुले ह्या बद्दल कधी वाईट वाटले नाही मात्र तिथे जो कचरा केला जातो (पर्यटकांकडून) त्या बद्दल फार वाईट वाटते. विषेशतः जिथे जिथे पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत त्यात तरी पर्यटकांनी कचरा टाकू नये असे वाटते.

वरील लेख आणि छायाचित्र छान आहेत. तरीपण, प्रत्यक्ष गडाची काही छायाचित्रे असती तर अधिक उचित झाले असते असे वाटते. पुढील लेखनात (पर्यटकांसकट) गडांची छायाचित्रे असतील अशी अपेक्षा आहे.

अभिनंदन.

------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.

दशानन's picture

15 Dec 2009 - 9:33 am | दशानन

श्री प्रभाकर पेठकर-जी,

तुमचे म्हणणे मला पटत आहे, खरोखर कच-याचे काही तरी करावयास हवे, एखादी मोहिम ठरवता येते का पाहतो पुढील वेळी. चार्-पाच जणे व जेवढा जमेल तेवढा कचरा गोळा करुन खाली घेऊ.

मला हॉटेल्स / धाबा बद्दल वावडे नाही आहे पण एखाद्या स्मारकाच्या आत ( पुर्ण गड हा स्मारक आहे असे समजतो आहे मी) अश्या पध्दतीने असू नये एवढेच म्हणणे. प्रेमी युगुले ह्या बद्दल मलाही वाईट वाटत नाही पण १० मीटरच्या आत चार चार जोडे बसलेले आहेत असे समजले तर विचार करा गडावर किती युगुले असतील ;) त्याच्यामुळे गड दर्शनास व्यत्यय येत होता हे नक्की कारण भिडस्त स्वभाव उगाच दोघे जण बसले आहेत व आपण मध्ये जाऊन खाली दरी मध्ये काय दिसते हे पाहत राहणे आवडत नाही ना ;)

गडावर फोटो घ्यावे असे काही दिसलेच नाही पण तरी ही काही फोटो येथे अपलोड आहेत पहावेत.

http://picasaweb.google.com/rj.jain/Trip

बाकी प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

शक्तिमान's picture

15 Dec 2009 - 12:06 am | शक्तिमान

लेखापेक्षा प्रतिक्रिया जड असा प्रकार झाला आहे! :P
असो एकूणच मनाची उलघाल चांगली व्यक्त केली आहे राजे...

३०० कोटीचे जे स्मारक बांधण्याबरोबरच, जरा किल्ल्यांवरही लक्ष ठेवावे "महाराष्ट्र" सरकारने ही माफक अपेक्षा!

दशानन's picture

15 Dec 2009 - 9:37 am | दशानन

शक्तिमान-जी,

३०० कोटीचे जे स्मारक बांधण्याबरोबरच, जरा किल्ल्यांवरही लक्ष ठेवावे "महाराष्ट्र" सरकारने ही माफक अपेक्षा!

वाह वाह क्या बात कही है आपने !
एकदम मनातील वाक्य बोलून गेलात पहा आपण.

अरे हो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

टुकुल's picture

15 Dec 2009 - 5:58 am | टुकुल

श्री. राजे,
तुमच्या नजरेने आम्हाला सिहंगड दर्शन झाले, त्याबद्द्ल धन्यावाद.

अवांतरः लेखाचे प्रतीसाद म्हणजे चाय पे़क्षा किटली झास्त गरम : -)

--श्री, टुकुल

दशानन's picture

15 Dec 2009 - 9:39 am | दशानन

टुकुल-जी,

तुम्हाला माझा लेख आवडला ह्यातच सर्वकाही आले.

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

शाहरुख's picture

15 Dec 2009 - 8:06 am | शाहरुख

एखाद्या किल्ल्यावर जाऊन तिथली गर्दी बघून "छे बुवा, भारीच गर्दी इथे..सगळी लोकं इथेच का येतात किल्लेरोहण करायला" हे म्हणणे फारच विनोदी आहे बुवा.

आणि च्यायला, कंपूबाजांनी रतीब लावलाय की नुसता..

दशानन's picture

15 Dec 2009 - 9:47 am | दशानन

श्री शाहरुख -जी,

छान विनोद होता आवडला.
मी वर गर्दी बद्दल तक्रार केली नसावी मी गर्दिच्या मानसिकते बद्दल तक्रार केली आहे असे मला वाटते.

असो,

प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

मॅन्ड्रेक's picture

15 Dec 2009 - 9:41 am | मॅन्ड्रेक

मागच्या आठ्वड्यात लोह्गड येथे गेलो होतो .
मजकुर लिहित आहे , परतु फोटो ड्कवता येत नाहि.

मदत हवी आहे.
at and post : Xanadu.

ज्ञानेश...'s picture

15 Dec 2009 - 11:57 am | ज्ञानेश...

श्री राजे-जी,
तुमचा छोटेखानी लेख आणि त्याखालचे मोठेखानी प्रतिसाद आवडले.
टारजण यांच्या प्रतिसादातली गोष्ट वाचूण ज्ञानात भर पडली.

धन्यवाद.

दशानन's picture

15 Dec 2009 - 12:05 pm | दशानन

श्री ज्ञानेश -जी,

तुम्हाला लेख आवडला हे आर्जवून तुम्ही येथे नमुद केले त्याबद्दल तुमचे आभार.

धन्यावाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

दशानन's picture

16 Dec 2009 - 9:40 am | दशानन

कुणीतरी मला अलीकडे सल्ला दिला होता की लिहायचे ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी. मी तेंव्हाच लिहितो जेंव्हा एकादी गोष्ट माझ्या काळजाला भिडते. उगीच 'उचलली लेखणी लावली कागदाला' किंवा 'उचलले बोट, लावले कीबोर्डला' असा माझा खाक्या नाहीं.
सर्व रसिकांचे प्रतिसादासाठी धन्यवाद.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

दशानन's picture

22 Dec 2009 - 11:31 pm | दशानन

दुनिया घेऊन येते आपला धागा वर.... ह्या ना त्या कारणाने. आम्हीच स्वतःच धागा वर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो.
उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;)

असो,

प्रतिसाद द्या.

=))

बदलीन.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©