मन आंब्याचा मोहोर....!

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
28 Mar 2008 - 2:01 am

मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी..
मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी..

मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..

मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..
मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान..

मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग..
मन पावसाची धार, भिजवील अंग अंग..

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा...

मन विद्युल्ल्ता पात,धरेवर कोपणारा..
मन बरसता मेघ,जलामृत सांडणारा..

मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..

मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं...
मन चांदणं टिपूर, जणू नक्षत्रांचं देणं...

- प्राजु

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Mar 2008 - 2:11 am | विसोबा खेचर

वा प्राजू, केवळ अप्रतीम कविता...!

मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..
मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान..

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा...

या ओळी सर्वात जास्त भावल्या!

आपला,
(मनवेल्हाळ!) तात्या.

इनोबा म्हणे's picture

28 Mar 2008 - 2:19 am | इनोबा म्हणे

प्राजु....जबरा कविता बरं का!

मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा...

मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..

मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं...
मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं...

या ओळी विशेष आवडल्या...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

चकली's picture

28 Mar 2008 - 2:28 am | चकली

प्राजु....मस्त कविता

पण
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. सांगशील का

चकली
http://chakali.blogspot.com

इनोबा म्हणे's picture

28 Mar 2008 - 2:45 am | इनोबा म्हणे

मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही..
आपल्याला नातवंडांवर प्रेम करणारी आजी माहीतीय का हो! खेडेगावात म्हातार्‍या माणसाला 'वाळली काठी' किंवा 'वाकली काठी' असे म्हणतात.(जून्या मराठी पिक्चरमधे ऐकले नाही का?"मी काय बाबा! वाळली काठी,कधी कटकन मोडेन सांगता येत नाय") :)

आम्हाला जे समजले ते आम्ही सांगीतले,तरीही समजले नसेल तर प्राजुलाच विचारा.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

चतुरंग's picture

28 Mar 2008 - 2:41 am | चतुरंग

किती बरं वाटलं म्हणून सांगू!फारच छान काव्य, सर्व ओळी आवडल्या!
बहुधा विडंबनावरच्या वेदनेतून जन्माला आले असावे!:)

चतुरंग

सचिन's picture

28 Mar 2008 - 3:12 am | सचिन

प्राजु,
अतिशय उत्तम कविता !

मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..
... हे म्हणजे एकदम उच्च !!

कसं काय सुचतं बुवा !!!

मीनल's picture

28 Mar 2008 - 3:41 am | मीनल

माझं मन हिला कसं काय कळ्ळल?
माझं एकटीच ?की तुमचं ही ?
आपल्या सर्वांच?????

मन वढाय वढाय ,नाही कधी समजले..
मन माझं अन तुझं,तेच प्राजुने लिहिले.

प्राजु's picture

28 Mar 2008 - 5:25 am | प्राजु

तात्या, इनोबा, सचिन,
धन्यवाद.

चकली ताई,
इनोबांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे.

चतुरंग,
धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं..

मिनल,
एकदम भारीच... धन्यवाद प्रतिसादासाठी.

- (सर्वव्यापी)प्राजु

चकली's picture

28 Mar 2008 - 9:42 pm | चकली

धन्यवाद!

मला अंदाज होता पण कुतुहूल होते कि तुम्हाला काय म्हणायचे आहे..बाकी छान. आवड्ली.

चकली
http://chakali.blogspot.com

वरदा's picture

28 Mar 2008 - 8:47 am | वरदा

प्राजु शब्दच नाहीत मस्तच आहे
मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग..
मन पावसाची धार, भिजवील अंग अंग..


किती छान लिहिलयस्....खूप अर्थपूर्ण...

बेसनलाडू's picture

28 Mar 2008 - 8:49 am | बेसनलाडू

छान. कविता आवडली.

मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..

मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं...
मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं...

हे विशेष आवडले.

अवांतर - टिपूर चे टंकताना चुकून 'ठिपूर' झाले आहे का? मला 'पिठूर' सुचले (पिठूर चांदणे). असो.

(वाचक)बेसनलाडू

प्राजु's picture

28 Mar 2008 - 8:57 am | प्राजु

बे.ला. ,
ते ठिपूर चुकुन झाले आहे.. पण संपादन कसे करणार? आणि पिठूरही छान आहे. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव's picture

28 Mar 2008 - 9:40 am | प्रमोद देव

प्राजु इतक्या सुंदर कवितेबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन

मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..

मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान..
मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान..

मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग..
मन पावसाची धार, भिजवील अंग अंग..

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा...
ह्या ओळी तर खासच आहेत.

चेतन's picture

28 Mar 2008 - 11:28 am | चेतन

मस्तचं...

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा...

अप्रतीम!

लयं भारी... प्राजु ताई

थोडे माझेही शब्दं

मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातं

मनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं...

मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखं

मनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं...

आपला पंखा

(मनस्वी) चेतन

नंदन's picture

28 Mar 2008 - 12:04 pm | नंदन

'मन'स्वी कविता!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

28 Mar 2008 - 12:09 pm | आनंदयात्री

प्राजु कविता आवडली !

उदय सप्रे's picture

28 Mar 2008 - 2:05 pm | उदय सप्रे

प्राजु,
अतिशय छान !

स्वाती राजेश's picture

28 Mar 2008 - 3:20 pm | स्वाती राजेश

प्राजु कविता मस्त आहे गं...
मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी
मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी

ही पहिलीच ओळ खास आहे..

मनस्वी's picture

28 Mar 2008 - 4:13 pm | मनस्वी

मला कविता आवडली.

सुवर्णमयी's picture

28 Mar 2008 - 5:11 pm | सुवर्णमयी

प्राजु कविता आवडली.
मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी..
मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..

मस्तच!

सुधीर कांदळकर's picture

28 Mar 2008 - 7:46 pm | सुधीर कांदळकर

सफर घडली.
ही ओळ जास्त सुंदर की ती?

धन्यवाद. अशाच सुंदर कविता येऊ द्यात. शुभेच्छा.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

शैलेश's picture

28 Mar 2008 - 9:46 pm | शैलेश

कविता खूपच सुंदर झाली आहे. सहज ओघ आणि आशयघन, एकमद मस्त!

शैलेश

प्राजु's picture

28 Mar 2008 - 11:58 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून धन्यवाद..

- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या काही संस्थळावर एवढ्या सुंदर कवितेला अवघे ५-६ प्रतिसाद मिळावेत आणि अवघ्या सातशेच्या घरात सभासद असलेल्या आमच्या मिपावर चांगले १७ ते १८ दिलखुलास दाद देणारे प्रतिसाद मिळावेत ही मी मिपाची रसिकता मानतो आणि तिला दाद देतो!

आपला,
(कट्टर मिपाकर!) तात्या.

सर्वसाक्षी's picture

29 Mar 2008 - 12:20 am | सर्वसाक्षी

कविता आवडली.

मीनल's picture

29 Mar 2008 - 4:04 am | मीनल

आधी लिहायच राहून गेले.म्हणून अजून भर घालते आहे.----

ओळीचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा उत्तम मेळ आहे.
तसेच आधीची ओळ आणि त्या नंतरची ओळ यात ही संबंध आहे.
ते संबंध मग मनाशी जोडलेले आहे.
तेच आपल्या मनाला भिडतात.

वाचकाला विचार करायला लावतात या ओळी.
म्हणजे मन हे आकाशातल्या अंगणातली बगळ्यांची माळ कशी?
मन हे प्रतिबिंब कसे?
मग फूल कसे ,थेंब कसे ,पात कसे ? वगैरे वगैरे.
वाचक आपला अर्थ लावतो.तो `मना`ला जोडतो .
अर्थ उलगडत जातात.कविता अधिकाधिक अर्थपूर्ण,खरी,वास्तव होत जाते.

कवयित्रीने सरळ सरळ काहीच सांगितले नाही मनाबद्दल.
मन `हे` `ते`च आहे असे म्हणते.
दोन गोष्टींचे साम्य दाखवते आहे.पण `सारखे ,जसे ,तसे ,या प्रमाणे``या शब्दांचा वापर केलेला नाही.
Simile नाही .तर Metaphor आहे.
यामुळे ते विचार करायला लावते.
दोहोंमधले साम्य शोधायला लावते.
कधी सोपे आहे .कधी आडवळणाचे!

यमक ही ओढून ताणून जुळवलेले नाही.
बहिणा बाईंच्या `मन वढाय वढाय ` या अष्टाक्षरी सारखे आसल्यामुळे मी ही कविता त्या चालीवर गायली.
अधिक गोड वाटते.

भूपाळी ,समयी ,समई,कुंकू ,सुहासिनी याशब्दांअधून सोज्ज्वळता दिसते आहे.`परंपरे`चा पुसटसा स्पर्श आहे.
तळ ,कोकिळा ,मोती ,चांदण यातून वातावरणात साधेपणा उभा केला आहे .मनाला भावतो तो.

खरी कवयित्री जाणून बूजून काही करत नाही.फक्त छान छान ओळी लिहित जाते.
प्राजूचे ही `साम्याचा शोध घ्यायला लावणे` ,`Metaphor मुद्दाम वापरणे` असे हेतूपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट आहे.
मीच विचार केला कवितेचा ,ती का आवडली ?याचा.ही उत्तर मिळाली मला.
ती लिहून काढली इथे मिपावर.

म॑ला वाटायला लागले आहे की प्राजूने ही इतका विचार केला नसेल `मन` लिहिताना.
म्हणजे मनाचा केला असेल (कारण त्या शिवाय इतके सुंदर कसं लिहायला जमेल?)
पण कवितेचा नाही.

अजून खूप आहे लिहिण्यासारख.नाही का?
ते तुम्ही लिहा.

प्राजु's picture

29 Mar 2008 - 6:17 am | प्राजु

मिनल,
अगं मी ही नव्हता इतका विचार केला माझ्याच या कवितेचा. पण तुझं रसग्रहण वाचून खूप बरं वाटलं.
तू हि कविता किती वेळा वाचलीस आणि इतका सुंदर अर्थ लावलास?
ही कविता तुझ्याच नावावर करून टाकावी असे वाटते आहे मला.. :))
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

कारकुन's picture

29 Mar 2008 - 4:15 am | कारकुन

प्रयत्न चांगल आहे पण बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर
.. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...असल्या चोथा झालेल्या कविकल्पना गोळा करुन त्यावर मन, प्रेम, जीवन, आत्मा असलं काहीही लिहुन पाडता येणार्‍या कविता आम्हालातरी आवडत नाहीत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
-कारकुन

प्राजु's picture

29 Mar 2008 - 6:17 am | प्राजु

कारकून साहेब...
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

वरदा's picture

29 Mar 2008 - 5:26 am | वरदा

तुम्हाला काहीच नाही बुवा आवडत्..लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नाही आवडत्..इतक्या सुंदर ओळीतला अर्थ नाही भावत असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा .......

प्राजु's picture

29 Mar 2008 - 6:19 am | प्राजु

अगं सोडून दे ना.... असतात काही माणसं अरसिक आणि माणूसघाणी... काय करणार त्याला आपण? :))
पण जगन्मित्र तात्यांच्या मिपावर अशी माणसेही प्रेमळ आणि रसिक होतील अशी आशा आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

कारकुन's picture

29 Mar 2008 - 7:23 am | कारकुन

प्राजुताई तुमची कविता टूकार वाटली म्हणून कोणीही माणूसघाणी आणि अरसिक बनत नसतं. तुमच्या अश्या व्यक्तिगत पातळीवर उतरण्याने लोक तुम्हाला फक्त 'वा वा' म्हणत राहतील पण तुम्हाला तुमचे कच्चे दुवे कधीच कळणार नाहीत. तुम्हीच तुमची कविता प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघा. असो! पुढच्यावेळेस काहीतरी सकस लिहा. आणि जरा वृत्त/छंद ह्याकडॅ पण बघा काव्यात गेयता देखिल असवी

(अरसिक) कारकुन

मीनल's picture

29 Mar 2008 - 7:42 am | मीनल

तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघीतली.
खरे आहे तुमचे म्हणणे.
पण असे आधिच लिहिले असते तर मला वाटत अधिक पटले असते.

कविता गेय आहे .मन वढाय वढाय ची साधीशी चाल जमते आहे .
प्रत्येक कविता गेय नसते.

कविता `पाडणे `हे जरा दुखवणारे होते असे मला वाटते.
प्रतिक्रिया देताना जरा संभाळून शब्दाचा वापर केल्यास तो जास्त परिणाम कारक असतो असा माझा अनुभव आहे.

हे कुठेही लागू होते नाही का ?
लहान मुलीने काढलेले चित्र कितिही बेकार असल तरी ते कसे चांगले करता येईल हे सांगणे अधिक परिणाम दखवेल.

That`s it !
End of topic from my side .

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 6:39 am | विसोबा खेचर

असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा .......

हे मस्त! :)

अगं जाऊ दे वरदा, तू उगाच अशी भडकू नकोस. त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे...

तात्या.

कारकुन's picture

29 Mar 2008 - 7:12 am | कारकुन

त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे...
धन्यवाद तात्या! तुझ्याकडून हेच अपेक्षीत होतं. नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. 'माणुसघाणा' 'अरसिक' असल्या उपाध्या घेउन वैयक्तिक हल्ले होणार!!

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 7:18 am | विसोबा खेचर

नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही.

ती कविता सुमार होती हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :)

एकंदरीत मिपावर अगदी विरुद्ध आवडीनिवडीची मंडळी आहेत हे चांगलंच आहे. मीनलसारखी कुणी या कवितेचं सुंदर रसग्रहण करते, तर तुझ्यासारख्या कुणाला ती सुमार वाटते. चलता है..!

असो, संपवुया हा विषया आता इथेच...

तात्या.

कारकुन's picture

29 Mar 2008 - 7:25 am | कारकुन

हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :)

अर्थातच तात्या.माझ्यासाठी देखिल विषय संपला.

पिवळा डांबिस's picture

29 Mar 2008 - 6:49 am | पिवळा डांबिस

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा..
मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा...
हे विशेष आवडलं. मन प्रसन्न झालं

मीनल's picture

29 Mar 2008 - 7:27 am | मीनल

प्राजु ,वरदा ,
तात्या म्हणतात ते बरोबर आहे.
कारकून साहेबांनी त्याचे मत सांगितले .त्याचा आदर करावा.
`सगळ्यांना आपले लिखाण आवडावे `ही अपेक्षा रास्त वाटत असली तरी नेहमी शक्य नाही.

तिसरं माणूस होऊन त्रयस्त नजरेने पाहिल तर --
करकून साहेबांनी लिहिल्या प्रमाणे बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर
.. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...या विषयांवर अनेकांनी लिखाण केले आहे हे खरे की नाही?

त्याचा चोथा झाला की मुरंबा हा मुद्दा वादाचा आहे.
कारकुनांच्या मते चोथा झाला.
पाण तोच `चोथा वापरून तू काही लिहून पाडलेस.
माझ्या आणि अजून काहींच्या मते रुचकर मुरंबा केलास!
मला तरी चोथ्या पासून काही नविन करता येणार नाही.एक वाक्य ही नाही.कविता `पाडायचं`तर दूरच!

पण मला वाटत की स्वतःच्या मत प्रदर्शनाला मिपावर मोकळिक असावी.
दु.म्.--कारकून साहेबांचा विषयाशी आक्षेप दिसतो आहे.
तुझ्या लेखन शैलीशी नसावा.

कारकून साहेब ,
कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो?
तसले(चकलीच्या साच्यासारखे) साचे कुठे मिळतात?
मी पण एक घेऊन ठेवावा म्हणते.कधीतरी सणावारात,सभा ,समारंभात उपयोगी होईल हो .
तुम्ही पाडल्या आहेत का कविता?एखादी तरी?
आम्हाला वाचायला आवडतील.

सर्किट's picture

29 Mar 2008 - 7:39 am | सर्किट (not verified)

कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो?

हा हा हा !

खूपच सोपी आहे,

थोदे मन, थोडी मैत्री, थोडे चोथे.. की झाली कविता...

जसे,

थोडी दारू, अर्धांगिनी, तिचा बाप, की झाले विडंबन..

- सर्किट

सर्किट's picture

29 Mar 2008 - 7:37 am | सर्किट (not verified)

असो.

माझे मत कार्कुनासारखेच आहे..

तोच तोच चोथा, पुन्हा त्याच मनाच्या शेपटीच्या बोडख्याला तूप लावले आहे.

काय तरी नवीन टाका बॉ !

प्राजू, कविता तशी वाईट नाहीये.

पण अगं ह्या सगळ्या उपमा, रूपके ह्यांची इतकी चवून चावून माती झालीये (सगळ्या पचनेंद्रियांमधून जाऊन) की उगाच वा वा म्हणण्यात काय अर्थ आहे ?

सुमार म्हणण्यासारखी नाही नक्कीच..

पण एक लक्षात घे , की दिल ह्या शब्दाने सुरू होणार्‍या आणि संवादात किमान ३०% वेळा दिल असणारे चित्रपट आपण खरंच मनावर घेतो का ?

मी ह्या तुझ्या कवितेचे विडंबन करायला घेणार होतो.. हिंदी-मराठी मिश्रीत..

प्रत्येक मन ह्या शब्दाच्या ठिकाणी दिल टाकायचे, आणि मग मजाच मजा..

उदा:

दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल
दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..

किंवा असेच काही तरी..

तुझ्या प्रत्येक दोन ओळीत अशींच डिस्कनेक्ट आहे ग !

उगाच वाकलेल्या शरीराचा आणि काठीचा उल्लेख करून माझ्या सारख्या सर्व सामन्य रसिकांना रडायला येत नाही !

तुझी मैत्रिण असतो, तर मीही रसग्रहण वगैरे लिहिले असते.

पण मी चीनच्या प्रेमातही नाही, आणि तुझी मैत्रिणही नाही, मग काय करू सांग.

दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!

- सर्किट

मीनल's picture

29 Mar 2008 - 7:50 am | मीनल

चीनच्या प्रेमाच काय कनेक्षन ?
डिस्कनेक्टेड आहे ते इथे!

आता पुठिल रसग्रहण सर्किटच्या लेखानाचं बर का?
कारण तो माझा मित्र ना?मग काय करू ?सांगा बरे?
रसग्रहण आणि मैत्री हे तेवढ कनेक्टेड .कसं????????

सर्किट's picture

29 Mar 2008 - 7:58 am | सर्किट (not verified)

ये पुठिल पुठिल क्या है ?

मीनलताई, आपले गद्यच इतके डिस्कनेक्टेड आहे ना, की पद्य किती असेल, ह्या गंभीर विचारात मी आहे !

- (आपला मित्र) सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2008 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ. सर्कीट,
दिल मानता नही है, जरी मानवांचा दिलदिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..
या पेक्षा.......
दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटकादिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!
या ओळींना मी दाद देईन !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर's picture

29 Mar 2008 - 9:45 am | कोलबेर

दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!

दिलीप नाव सार्थकी लागले. आजपासून आम्ही तुम्हाला 'दिलवाले दिलीप बिरुटे' म्हणून ओळखू :))

विसोबा खेचर's picture

29 Mar 2008 - 7:47 am | विसोबा खेचर

प्राजूच्या कवितेइतकीच मी मीनलच्या प्रतिसादांनाही दाद देईन!

खूपच बॅलन्स माईंडेड प्रतिसाद...!

तात्या.

मीनल's picture

29 Mar 2008 - 7:58 am | मीनल

आभार तात्या.

आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी .
आता फक्त वाचन करणार या विषयाचे.
किती काथ्याकूट करणार हो एखाद्या विषयाचा?
कंटाळा येतो .चोथा होतो त्या विषयाचा.
.
.
.
.

हे पहा पुन्हा `चोथा`!!
बस !! पुरे झाल आता.

सर्किट's picture

29 Mar 2008 - 8:02 am | सर्किट (not verified)

आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी .

धन्यवाद !!!!

जियो !!

जसे येथील धर्ममार्तंडांनी (सॉरी धर्ममार्तंडकाकांनी) दारू हा विषय विडंबनकारांसाठी रद्द ठरवला आहे, तसेच सर्व कवींनी, ह्या धर्ममार्तंडांची तक्रार येण्याआधी "मन" हा विषय संपवला, तरच इष्ट होईल.

- (दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा) सर्किट

कोलबेर's picture

30 Mar 2008 - 12:18 am | कोलबेर

दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा

मन स्कॉचचा हो पेग.. सोडा नाही त्यात सांभाळावा वेग
मन मिलिट्रीची रम.. भरपूर सोडा, पाणी त्यात कम

(मनकवडा) कोलबेर

डिस्क्लेमर : हे लिखाण विडंबन (म्हणण्याच्या लायकीचे) नाही.. समस्त धर्ममार्तंड काकांनी नोंद घ्यावी :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2008 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनाचे विविध कंगोरे एका लयबद्ध शब्दरचनेतुन व्यक्त झालेले आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

29 Mar 2008 - 9:31 am | मदनबाण

आपली कविता मला फार आवडली
अगदी मनापासुन.....

(आमराईत राहणारा मनमोकळा)
मदनबाण

वरदा's picture

30 Mar 2008 - 12:07 am | वरदा

मलाही कविता मनापासुन आवडली..अगं हेच सगळे शब्द आम्हीही ऐकलेत आणि वाचलेत पण सगळ्यांना जमतय का चार ओळी तरी लिहायला... निदान मला तरी नाही...
माझा नुसता कविता वाईट म्हणण्यावर आक्षेप नव्हता पण कविता त्याच झाल्यात...वाढदिवस शुभेच्छा देणं नेहेमीच झालंय्..हा सूर चुकीचा आहे....अशा कितीतरी गोष्टी नेहेमीच्या असतात तरीही त्या पुन्हा पहायला ऐकायला मजा येते.....म्हणून सारखा हा रडका सूर लावू नये......तुम्हाला नसेल करायचं विश कुणाला तर नका करु काय बोर आहे हे कशाला?

मनीषा's picture

21 Oct 2015 - 4:13 pm | मनीषा

सुंदर कविता !