एका वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन सांगायचं तर,
"धर्म संस्थापना्र्थाय संभवा मी युगे युगे"
हे म्हणणं खरं करण्यासाठी ह्या "पंढरीच्या विठ्ठलाने " -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
रि.प पक्षाच्या शंभर कौरवानी गेली आठ वर्ष अमेरिकेत आणि जगात धुमाकूळ घालून मनुष्यधर्म बुडवला. बुशरूपी दुर्योधनाने इराकच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करून लाखो निरपराध लोकांना यमसदनी पाठवलं.सादाम जरी दुष्ट असला तरी ९/११ ला तो कारणीभूत नव्हता.ब्रिटनचा पंतप्रधान टोनी ब्लेअर शकूनीमामा त्याला सामील झाला होता.
"यु गेट वॉट यु डिझर्व्ह"
ह्या म्हणण्याप्रमाणे ह्यावेळी डोकं ठिकाणावर ठेवून अमेरिकन जनतेने आपला प्रेसिडेन्ट निवडला. बरेच वेळेला तीस पसतीस टक्के मतदान करणारी जनता ह्यावेळी पन्नास पंचावन्न टक्क्यावर मतदान करायला आली होती. पंढरीच्या विठोबाकडे जशी भक्तांची गर्दी जमते तशीच ह्या विठोबाच्या सभेला लोक जमत असत,
"विठ्ठल विठ्ठल गजरी,अवघी दुमदुमली पंढरी "
तसंच ह्याचं भाषण ऐकून लोकांचं व्हायचं.
"यस वीई क्यान"
हे त्याचं पालूपद एव्ह्डं लोकाना आवडायचं की पहिली दहा मिनटं ह्या वाक्याचा गजर व्हायचा.
"जय हरी विठ्ठल जय श्री विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल"
ह्या धरतीवर "ओबामा,ओबामा,ओबामा "
असा लोक आणखी तीन मिनिटं गजर करायची.
प्रायमरी निवडणूकीत आयोवा स्टेट मधून ओबामा जास्तीत जास्त मतानी निवडून आला.गंमत म्हणजे आयोवा स्टेट मधल्या लोकवस्तीत गोर्या लोकांचं प्रमाण पंचाणव टक्के आहे.आणि ह्या पंचाणव टक्के गोर्या लोकानी विठोबाला निवडून देऊन अख्या देशाला दाखवून दिलं की वारे असे वाहत आहेत.
हा सत्तेचाळीस वर्षाचा तरूण सत्तेवर आणला गेला. राजकारणाच्या वयोमनात सत्तेचाळीस वर्ष म्हणजे ओठ पिळले तर दुध येईल असलं वय. नाहीतरी अमेरिकन राज्यकर्ते, वय झालेले, पोटाच्या घड्या पडलेले ढेरपोटे,डबल चीन-हनुवटी-असलेले कुणीतरी शागिर्द हात पकडून ओढत ओढत स्था्नापन्न करण्यासाठी लागणारे, दंतांजीचे ठाणे सुटले,फुटले दोन्ही कान,नन्ना म्हणते मान अश्या काहीशा वयाचे सिनेटर किंवा कॉन्ग्रेसमन औषधाला पण सापडणार नाहीत. आता एखादा म्हातारा अपवाद असलाच तर विरळाच.आणि अपवादाने तो जर असलाच तर मग तो प्रचंड कार्य करीत असलेलाच असल्याने, एव्हडी वर्ष सतत निवडून येत असावा.पण प्रकृतीने मात्र तो शेवग्याच्या शेंगे सारखा असायला हवा. अमेरिकन जनता शक्यतो ढेरपोट्यांना निवडून द्यायला तयार नसते.नव्हेतर असले लोक ही आपल्या "इमेजचा" विचार करून निवडणूकीत उभं राहायला दोनदा विचार करतात.
जसं,
"विठू माझा लेकूरवाळा,संगे गोपाळांचा मेळा"
तसंच ह्या विठूने बाळ गोपाळांना-बर्याच तरूण अमेरिकनना- आपल्या भोवती जमवलं होतं.
"मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म साधावा"
ह्या म्हणण्याप्रमाणे ह्या बाळ शिवरायाने मेक्सीकन,एशीयन,लॅटोनोझ असे मावळे जमवले होते. त्या शिवाय त्याची विठ्ठल सेना जवळ जवळ नव्याणव टक्के त्याच्या बाजूची होती.हायटेक प्रणाली वापरून इंटरनेटवरून
"तुम एक पैसा दोगे तो दस लाख मिलेंगे"
असा मेसेज देऊन त्याने सर्व साधारण मतदाराकडून पाच,पाच,दहा, दहा डॉलर घेऊन दशलक्षानी डॉलर्स जमा केले.त्याचा त्याला निवडणूकीत प्रचारासाठी वापर करून खूप फायदा झाला. एक वेळ अशी आली होती की हिलरी क्लिन्टन हवालदिल झाली.कर्ज काढून काढून थकली. आणि एकदा पत्रकारांसमोर अक्षरशः रडली होती.हा विठोबा आता ऐकत नाही.असं पाहून प्रे.क्लिन्टन पण हताश होऊन एकदा म्हणाला होता,
"हे विठ्ठलपंथी लोक राज्य करू शकणार नाहीत, असं इतिहास सांगतो."
पण जेव्हा विठोबाची सरशी व्ह्ययला लागली,आणि आपली बायकोची निवडून येण्याच्या शक्यता कमी झाल्याचं पाहून प्रे.क्लिन्ट्न म्ह्णणाल्याचं आ्ठवतं,
"कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।"
ओबामा यापुढे मागे बघायला तयार नव्हता.एका मागून एक तो राज्य जिंकायला लागला.एकदा क्लिन्टनबाई चिडून म्हणाली होती,
"ओबामा,शेम ऑन यु"
पण ओबामा शांतीचा मेरू होता.त्याला पत्रकारानी विचारलं होतं,
"तुला कुणाची चीड कशी येत नाही?"
ओबामाने आपल्या कोटाच्या दोन्ही बाह्या खांद्यावर झटकून दाखवलं,आणि म्हणाला,
"मी कुणी काही म्हटलं तर असं करतो."
शेवटी पंढरीचा विठू डेमॉक्रटीक पार्टीचा उमेदवार म्हणून निवडला गेला.रिपब्लिकन पार्टीचा बुढ्ढा जॉन मेकेन त्याच्या विरूद्ध उभा होता.
पुढचा इतिहास पुढच्या भागात.
कमशः....
अमेरिकन श्रीकृष्ण
प्रतिक्रिया
14 Oct 2009 - 9:20 am | विंजिनेर
व्वा सांमत आजोबा!
विठोबा आणि ओबामाची तुलना कशी करता? साम्यस्थळे दाखवा की थोडी तरी... ओबामाचा सावळा वर्ण सोडून ..
बाकी अशी वादग्रस्त सांगड घालायची कल्पना छान!
प्रतिसाद भरभरून येणार बघा...
14 Oct 2009 - 9:42 am | ज्ञानेश...
तुलना पटली नाही.
"Great Power Comes With Great Responsibilities"
14 Oct 2009 - 4:27 pm | स्वाती२
+१
15 Oct 2009 - 7:50 pm | मदनबाण
"पंढरीच्या विठ्ठलाने " -ओबामाने- ह्यावेळी अमेरिकेत जन्म घ्यायचं ठरवलेलं दिसतंय असं मला वाटतंय.
शब्दच संपले !!!
कमशः....
ओबामा ओबामा सॉरी विठ्ठला !!! विठ्ठला !!!
अमेरिकन श्रीकृष्ण
अमेरिकन संजय अजुन काय काय पाहावयास लावणार हे शुभ्र घरच जाणे !!!
(अजित कडकड्यांनी यापुढे ओबामांची भजने म्हंटली तर त्याची चाल कशी असेल बरं :?)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
14 Oct 2009 - 10:01 am | चिरोटा
शांततेचे नोबेल मिळवणार्या या अमेरिकन विठोबाने १३,००० वारकरीअफगाणिस्तानात पाठवायला मंजूरी दिली आहे.
http://news.yahoo.com/s/afp/20091013/wl_afp/usafghanistanmilitarytroops_...
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
16 Oct 2009 - 10:55 am | बेभान
ओबामामध्ये सामर्थ्य आहे आणि जग ते लवकरच पाहील..
असो बॅक ऑन ट्रॅक..जे "वारकरी" पाठविलेले आहेत ते पहा
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=55014&boxid=194143421&pgno=4
14 Oct 2009 - 10:02 am | सखाराम_गटणे™
लेख वाचला. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
काही संदर्भ देउन तुलना केली तर अधिक रंजक होइल.
इतक्क्या लवकर ओबामाचे अवलोकन करणे म्हणजे घाई होईल असे मला वाटते. २-३ वर्षे होउ द्यात.
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
14 Oct 2009 - 5:15 pm | स्वाती२
आमच्या इंडियानाने रंग बदलला याचे कारण फक्त इकॉनॉमी. Bear Stearns पडले आणि 'My Man Mich' आणि 'Obama' चे फलक एकत्र लॉनवर उभे राहिले.
14 Oct 2009 - 9:00 pm | मिसळभोक्ता
केस अगदीच हाताबाहेर गेली आहे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Oct 2009 - 12:50 am | टारझन
अगदी, हेच म्हणतो :)
आजोबांच्या स्वभावाची आता अंमळ कल्पना यावी.... मागे सुद्धा एक अतिशय वादग्रस्त विडंबण (पुष्टावलेला उस ...हळूच चिर काढणं आणि थेंब थेंब रस पडणं वगैरे) करून त्याचं आज्जिबात न पटणारं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं :)
-- आंबेचोख्ता
(विरजणाच्या दह्याचा दाबून दाबून चक्का करून मिळेल)
15 Oct 2009 - 10:20 am | पिवळा डांबिस
विठोबा आणि पुंडलीकाची जोडी मस्त जमलीये....
काका, दोन विटा फेकून ठेवा...
बघंया विठ्ठल उभो रवतां काय तो!!!!
:)
-श्रीखंडभोक्ता
(चक्क्याचे विलायती केशर घालून स्वादिष्ट श्रीखंड करून मिळेल! डेमोक्रॅटस नॉट अलाऊड!!!)
14 Oct 2009 - 9:19 pm | छोटा डॉन
सामंतकाकांबद्दल आदर आहेच पण ही "ओबामा" आणि "विठ्ठल"यांची तुलना पटली नाही आणि आवडली तर त्याहुन नाही.
प्रथमदर्शनी दोघांच्यात काहीच साम्य दिसत नसताना ओढुन ताणुन तुलना किंवा संदर्भाने लिखाण करणे मला पटत नाही.
अर्थात हे विनोदाने घ्यावे एवढी विनोदबुद्धी मला जरी असली तरी "थेट विठ्ठलाशी तुलना" हे जरा जास्तीच होते.
नुसता सिंपल ओबामाच्या वाटचालीविषयी लिहले असते तर कदाचित चालले असते, असो. बाकी तुम्ही तुमचे ठरवा ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
15 Oct 2009 - 10:25 am | llपुण्याचे पेशवेll
डाण्याशी सहमत. जिथे सगळे ओबामा संपतात तिथे आमचा वारकरी चालू होतो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
15 Oct 2009 - 10:27 am | पिवळा डांबिस
एवढी विनोदबुद्धी मला जरी असली तरी
डॉन्या उगाच बोलू नकोस...
सिद्ध कर.....
:)
14 Oct 2009 - 9:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो- मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो- वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ (सौजन्य गुगलबाबा )
मी सर्वांच्या हृदयात आहे.... असे एक गीतेतील वचन आहेच. त्यामुळे लेखनातील तुलना पाहता मला मात्र लेखाचे, लेखनातील कल्पनेचे कौतुकच आहे. मला बॉ आवडला लेख !
अजून येऊ द्या...!
अवांतर : पांडुरंगाचे रुप पाहून शंकराचार्यांना पांडुरंगअष्टकम स्फुरले, ओबांमांना पाहुन तुम्हालाही तसेच होत आहे. :)
-दिलीप बिरुटे
14 Oct 2009 - 9:52 pm | सुधीर काळे
संभवामि युगे युगे असे लिहायला हवे. परस्मैपदी प्रथमपुरुषी एकवचनाचे ते रूप आहे.
अवलियासाहेबांना विचारा. जास्त नीट सांगतील.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
14 Oct 2009 - 10:03 pm | अवलिया
प्रासादशिखरस्थः अपि काकः न गरुडायते ।
(राजवाड्याच्या मनो-यावर बसला म्हणुन कावळा गरुड होत नाही.)
बाकी चालु द्या.. लेखमालेसाठी शुभेच्छा! :)
दिवाळी सर्वाना सुख समृद्धीची जावो हीच सदिच्छा ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
14 Oct 2009 - 10:21 pm | चतुरंग
असा येताजाता कुणीही विठोबा होत असता तर मग तो पंढरीचा सावळा २८ युगं कर कटेवरी घेऊन उभा आहे तो वेडाच म्हणायचा की!
सुंदर ते ध्यान, सुंदऽऽर ते ध्यान उभे विटेवरि, विटेवरि, विटेवऽऽऽरि! :)(संदर्भ - पुलं)
(बालपणी विटांवर बसणारा)चतुरंग
14 Oct 2009 - 10:59 pm | सुधीर काळे
मी सभासद असलेल्या आणखी एका फोरमवर वाचनाचा छान व्यासंग असलेली एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचे मत खाली दिले आहे.
Quote
"नोबेल पुरस्कार हा जगातला सर्वोत्तम सन्मान समजला जातो. नोबेलच्या संघटनेने स्पष्ट केले आहे की आदल्या वर्षी काहीतरी मोठे कार्य केल्यासच हा सन्मान मिळू शकतो. थोडक्यात सांगायचे तर आयुष्यभर केलेल्या मेहनतीचे चीज करण्यासाठी हा पुरस्कार नाहीय.
फक्त शांतता पुरस्कार नॉर्वेस्थित नोबेल कमिटी देते. (इतर बक्षिसे स्वीडनवरून जाहीर होतात) या कमिटीचे ओबामाबद्दल एकमत आहे. ही कमिटी म्हणते कीं ओबामांनी शांततेसाठी गेल्या वर्षी इतर कुणाहीपेक्षा जास्तीत जास्त काम केले आहे.
Unquote
संपूर्ण २००९ या वर्षी ओबामा यांनी बुश-४३ च्या धोरणाची खिल्ली उडवली. बुश-४३ यांच्या सर्व गोष्टीत एकतर्फा मनमानी करण्याच्या धोरणाविरुद्ध ओबामांनी तोफखानाच उघडला. अमेरिकेच्या राजकारणात खूप रस असल्यामुळे मी सगळ्याच राष्ट्रपती-निवडणुकांच्या प्रचार प्रक्रियेचे खूप वाचन करतो व टीव्हीवर दाखवण्यात येत असलेले कार्यक्रमही पहातो. प्रायमरीज पासून ते दोन आखरी नेत्यांमधील वादविवादांचे (debates) थेट प्रक्षेपणही मी नेहमी पाहिले आहे. ओबामा व मॅकेनच्या बाबतीतही मी ते पाहिले आहे. ओबामाने युरोपीय मित्रांना बरोबर घेऊन जागतिक हालचाली करण्यावर भर दिला, मुस्लिम राष्ट्रांबरोबर नवे धोरण राबवण्याची योजना आखली, "ग्वांटानेमो बे"सारखे अवैध तुरुंग बंद करायचे ठरवले व ती त्याची पहिली Executive order होती. आपल्या उद्घाटनाच्या भाषणातही परस्पर हित व परस्पर आदर या पायावर मुस्लिम राष्ट्रांबद्दलच्या नवीन धोरणाची मुहूर्तमेढ केली. इराणबरोबर कुठल्याही पूर्व अटी न घालता वाटाघाटी करायची तयारी त्यांनी प्रचारसभातही दाखवली होती व त्याप्रमाणे इराणी नववर्षाच्या शुभेच्छा थेट इराणी जनतेला ऐकवून एक धाडसी पण इराणी नेत्यांना अडचणीत टाकणारा प्रयोग केला. आजही सुरक्षा परिषदेत व नंतर जिनीव्हा येथेही इराणला पकडीत घेऊन अण्वस्त्रांच्या योजना रद्द करविण्याची त्यांची धडपड चालूच आहे. एकाच वेळी बुशने केलेला राडा उपसत असतानाच इतर अनेक फळ्यांवर ते लढत आहेत.
९ महिन्यात दाखवण्यासारखे कांहींच नाहीं हे खरे आहे, पण त्यांनी हा ध्यासच घेतला आहे असं म्हटल्यास ते चूक ठरणार नाहीं. बघू पुढे त्यांच्या प्रयत्नांना किती यश यतं ते.
सुधीर काळे
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
15 Oct 2009 - 5:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाटत नाही, तसं असेल तर सुब्रमण्यन् चंद्रशेखरना पन्नास वर्ष ताटकळत ठेवलं नसतं. किंवा पुरस्कारतरी दिला नसता....
अदिती
15 Oct 2009 - 7:29 pm | विंजिनेर
काळेंचे बरोबर आहे. तांत्रिक दृष्ट्या(अल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रानुसार) मागील वर्षी विविध क्षेत्रात अमुलाग्र आणि क्रांतीकारी कार्य करणार्याला हे पारितोषिक देण्यात यावे. पण बघायला गेले तर नोबेल विजेत्यांनी त्या त्या विषयाला आयुष्य वाहून घेतले असते - सरासरी ३० वर्षांहून अधिक काळ अत्युच्च दर्जाचे संशोधन /कार्य केल्या शिवाय सहसा नोबेल साठी विचार केला जात नाही. साहित्यात तर डोरिस लेसिंगला ६० वर्षांनी मिळाले असे म्हणतात !!
अपवाद फक्त शांततेच्या पुरस्काराचा. हा बरेच वेळा वादग्रस्त ठरत आला आहे (हेन्री किसिंजर, यासर अराफत + राबिन आणि आता ओबामा..) फरक येव्ह्ढाच की नोबेल निवड समितीने पुढे येऊन मनमोकळे स्पष्टीकरण दिले आहे(समिती असे करायला बांधिल नाही).
15 Oct 2009 - 7:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला आत्ता वेळ नाही म्हणून, पण यादी शोधता येईल ज्या भौतिकशास्त्रज्ञांना अनेक वर्ष, दशकं वाट पहावी लागली.
शांततेबद्दलच्या नोबलबद्दल बोलत असलात तर गोष्ट वेगळी ...
(अतिमाहितीमुळे संभ्रमात) अदिती
15 Oct 2009 - 10:11 pm | सुधीर काळे
हा मुद्दा फक्त नॉर्वेस्थित मंडळाने दिला आहे जे फक्त शांताता पुरस्कार देतात. बाकीचे पुरस्कार स्वीडनस्थित मंडळें देतात.
पण बर्याचदा हा शांतता पुरस्कार जाहीर झाल्यावर कै. आल्फ्रेड नोबेल त्याच्या थडग्यात कूस बदल असावा (turn in his grave) असा माझा बर्याच वर्षांपासून कयास आहे.
तिमूर-तिमूरच्या होर्ता व एका बिशपला दिला तोही असाच चक्रावणारा निर्णय होता, पण परिणाम तिमूर स्वतंत्र होण्यात झाला.
अराफत व राबिन याना पुरस्कार देणे म्हणजे जरा कहरच होता! त्यांच्या हातावरचे रक्तही वाळले नव्हते.
कोणी सांगावे? उद्या जर पाश्चात्य देशांबरोबर दिलजमाई झाली बिन लादेनलाही हा पुरस्कार दिला जाईल.
एक तर शांतता पुरस्कार सर्वांना कळतो व (त्यामुळेच) या पुरस्काराबद्दल प्रत्येकाला मत असते. एरवी नुकताच नोबेल मिळालेला तामिळ तरुण दुचाकीवरून ऑफिसला जाई यापेक्षा जास्त माहिती १ टक्का जनतेलाही नसेल. मग बरोबर-चूक हा प्रश्न फार दूर राहिला. पण शांतता पुरस्कारावर माझ्यासकट सर्वांना मत असते.
वेळ मिळाल्यास यादी काढून पहा.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
15 Oct 2009 - 10:50 pm | लंबूटांग
टॅग बंद केला.
15 Oct 2009 - 12:16 am | वाटाड्या...
सामंत काका..
हे सगळं खरं असेलही...पण मला सांगा ह्या डेमोक्राटीक पक्षाला आपल्या भारतीयांचा इतका पाठींबा आहे. पण ह्या पक्षाचे सरकार आहे तर मग आमच्या सारख्या होतकरू तरूण लोकांना ह्यांच सरकार आल्यापासून इमीग्रेशन विभाग नको इतका त्रास कसा काय देतोय? ओबामा पण डेमोक्राटीक पक्षाचाच आहे ना?
मनापासून सांगतो, हे सरकार आल्यापासुन रिपब्लिकन परवड्ले पण डेमोक्राटीक नको असं आम्ही इथले न-नागरीक लोक नेहेमी म्हणत असतो. ह्यांच्यामुळे आम्हाला इतका त्रास होतोय की त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त लोक मायदेशाला परत गेले ..त्यामुळे आपले इथले नागरीकही हबकले आहेत कारण त्यातल्या बर्याच लोकांचे धंदे आहेत, मंडळं आहेत ज्यांना निम्म्यापेक्षा जास्त पैसे आमच्या सारख्या लोकांकडुन मिळत असतो.
आता बोला, की ओबामा धोरण योग्य की अयोग्य?
- वा
15 Oct 2009 - 2:43 am | लंबूटांग
थोडी गल्लत होते आहे असे वाटते. मला असे वाटते की रिपब्लिकन जरी निवडून आले असते तरी देखील हे आज न उद्या झालेच असते.
पहिली गोष्ट म्हणजे ह्या इमिग्रेशन च्या restrictions अथवा नवीन नियमांना ढासळलेली अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. जसे राज ठाकरे म्हणतो त्याचप्रमाणे भूमीपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे अशा काहीशा अर्थाचे नवीन नियम आहेत.
तुमचा रोख एच१-बी विसा च्या नवीन नियमांवर आहे असे वाटते.
सोप्या भाषेत सांगायचे तर आता अमेरिकन कंपन्यांना जर qualified अमेरिकन नागरिक उपलब्ध नसेल तरच एच१-बी विसा स्पॉन्सर करता येईल. ह्यातून अमेरिकन university मधून मास्टर्स अथवा त्याहून मोठी डिग्री मिळवलेली आहे असे विदेशी नागरिक वगळले आहेत. म्हणजेच त्यांना अमेरिकन नागरिकांप्रमाणेच समजले जावे.
हे करून काय साध्य झाले तर, भारत आणि इतर देशातील लोकांना इथे बोलावून अमेरिकन्सना द्याव्या लागणार्या पगारापेक्षा थोडा कमी पगार देऊन काम करून घेण्याला आळा बसला. त्यामुळे अमेरिकन्सना त्या नोकर्या उपलब्ध झाल्या. I feel this is perfectly fair to save your own country's economy.
Also, instead of cheap labor they want qualified labor, even though they have to pay more money.
असो, सामंत काकांनी केलेली तुलना मलाही पटली नाही.
ओबामा promising वाटतो तरी आहे पण म्हणून त्याला विठ्ठलाची उपमा म्हणजे अति होते आहे असे वाटले.
15 Oct 2009 - 7:59 am | श्रीकृष्ण सामंत
वाटाड्या...,
बर्याचश्या प्रमाणात लंबूटांग यानी आपल्याला उत्तर दिलं आहे. जरी त्यांच्या उत्तराशी मी पुर्ण सहमत नसलो तरी.
तुमच्या विचारदृष्टी प्रमाणे तुमचं मत तुम्हाला बरोबर वाटणं सहाजीक आहे.आणि ओबामाचा दृष्टीकोन निराळा असूं शकतोच ना?
"बरेच वेळा जे अधिकारात् असतात त्यांचं खोटं पण खरं असतं..." इति अमिताभ बच्चन "सरकार" ह्या सिनेमात.
मला प्रत्येकाच्या मताचा आदर आहे. लंबूटांग यांना वाटत असलेल्या माझ्या "तुलनेबद्दलच्या" मताला धरून सुद्धा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Oct 2009 - 8:19 pm | वाटाड्या...
"मला असे वाटते की रिपब्लिकन जरी निवडून आले असते तरी देखील हे आज न उद्या झालेच असते." -- - कशावरुन???
पहिली गोष्ट म्हणजे ह्या इमिग्रेशन च्या restrictions अथवा नवीन नियमांना ढासळलेली अर्थव्यवस्था कारणीभूत आहे.तुमचा रोख एच१-बी विसा च्या नवीन नियमांवर आहे असे वाटते. "भूमीपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे"- --- बरोबर आहे....
Also, instead of cheap labor they want qualified labor, even though they have to pay more money - पटलं नाही....कारण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या काळात तुम्ही लोक आलात त्याच काळात फक्त "qualified labor" मिळत होता? आता काय फक्त "cheap labor" मिळतो का? काहीही...
काहीही फालतु कारणं सांगुन हे लोक विसा / पिटीशन रीजेक्ट करतात आणि तेव्हा जेव्हा कंपनीला (अमेरीकन) ..(अमेरीकन च्या नावाखाली देशी दुकानं नाही ही बाब स्पष्ट करु इछितो) आम्ही हवे असतो...किती हास्यास्पद आहे. तुमचा ओबामा म्हणाला होता ना की सत्तेवर आलो की युद्ध बंद करणार..कुठे बंद झालय. उलट अजुन ४७००० सैनीक नेण्याचा विचार चालु आहे.
अर्थात रि.प. वाले सुद्धा काही कमी नाहीत. ओबामावर वैयक्तीत टीका करतात हे बरोबर नाही. किती लुटालुट करतात हे युससीआयसवाले ह्याची तुम्हाला कल्पना आहे का?
२००२ ला मंदी होती तेव्हा किती लोकांचे जॉब्स गेले आणि किती लोकांचा विसा / पिटीशन रीजेक्ट झालं ह्याचा तुमच्याकडे तपशील आहे का?
15 Oct 2009 - 9:27 pm | लंबूटांग
"मला असे वाटते की रिपब्लिकन जरी निवडून आले असते तरी देखील हे आज न उद्या झालेच असते." -- - कशावरुन???
वेल. मग ओबामा नसता आला आणि दुसरे कोणी आले असते तर असे नसते झाले असे कशावरून :). केवळ बाहेरून लेबर मागवणे बंद करण्याचा सोपा उपाय करून जर इथल्या लोकांना नोकर्या उप्लब्ध होणार असतील तर मला तरी असे वाटते की कोणीही हेच केले असते.
जसे महाराष्ट्रात लोकांना राग यायला लागला आहे की हे लोक बाहेरून येऊन इथे काम करतात आणि आमच्या लोकांना नोकर्या मिळत नाही आहेत. तसेच काहीसे.
Also, instead of cheap labor they want qualified labor, even though they have to pay more money - पटलं नाही....कारण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या काळात तुम्ही लोक आलात त्याच काळात फक्त "qualified labor" मिळत होता? आता काय फक्त "cheap labor" मिळतो का? काहीही...
पहिली गोष्ट म्हणजे मी २ वर्षांपूर्वीच इथे आलो जेव्हा recession सुरू झाले. त्यामुळे ज्या काळात तुम्ही लोक आलात हे म्हणणे गैरलागू :)
In fact, मला तुम्ही म्हणता आहात त्याच्या अगदी उलटे म्हणायचे आहे.
मला इतकेच म्हणायचे होते की आता पहिल्यासारखे कोणताही computer degree or even NIIT अथवा तत्सम course करून इथे येण्याचे दिवस गेले. पहिले बर्याच कंपनीज केवळ कमी पैसे द्यावे लागतात म्हणून outsourcing करत अथवा विदेशी लोकांना hire करत भले त्यांना इथे बोलावून ट्रेनिंग द्यावे लागत असे. तसे आता करता येणार नाही. केवळ qualified उमेदवारालाच नोकरी मिळेल आणि त्यात अमेरिकन्स ना प्राधान्य दिले पाहिजे असे नवीन रूल्स सांगतात.
युद्ध बंदी वगैरे पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि मी ओबामाला देव वगैरे काही मानत नाही त्यामुळे तो करेल ते सगळेच बरोबर असेही माझे म्हणणे नाही.
काहीही फालतु कारणं सांगुन हे लोक विसा / पिटीशन रीजेक्ट करतात आणि तेव्हा जेव्हा कंपनीला (अमेरीकन) ..(अमेरीकन च्या नावाखाली देशी दुकानं नाही ही बाब स्पष्ट करु इछितो) आम्ही हवे असतो...किती हास्यास्पद आहे.
जर अमेरिकन कंपनीला तुम्ही हवे असाल आणि तुमचे पेपर वर्क करेक्ट असेल तर सहसा असे होत नाही पण कधी कधी अमेरिकन एम्बसी फालतू कारणे सांगते हे मान्य. पण परत तिथे ओबामाचा काय संबंध.
USCIS च्या लुटालुटीची अतिशय चांगली कल्पना आहे :) आत्ताच MS पूर्ण झाल्यावर OPT साठी 340$ भरावे लागले. Renew करायला परत वेगळे पैसे. नंतर एच१ साठी परत पैसे भरावे लागणारच आहेत. एकाच गोष्टीचे समाधान आहे की इथे काम लवकर व्हावे म्हणून १००० लोकांना पैसे चारावे लागत नाहीत.
असो. USCIS ही वेगळी संस्था आहे त्यामुळे ओबामाच्या धाग्यात थोडे अवांतर होते आहे.
२००२ ला मंदी होती तेव्हा किती लोकांचे जॉब्स गेले आणि किती लोकांचा विसा / पिटीशन रीजेक्ट झालं ह्याचा तुमच्याकडे तपशील आहे का?
नाही. देसी लोकांच्या बर्याच कहाण्या ऐकल्या आहेत. प्रचंड महाग गाड्या finance केलेल्या असताना रस्त्यावर सोडून पळून गेल्याच्या.
असो २००२ ची मंदी ही इतकी तीव्र नव्हती माझ्या माहितीप्रमाणे.
15 Oct 2009 - 10:07 pm | चिरोटा
१९९० साली H1B आणला तेव्हाही त्याचा असाच उद्देश होता-to bring Best and brightest from every field.ही वेळ आणि भारताने आर्थिक क्षेत्र खुले करणे एकाच वेळी जुळून आल्याने सॉफ्ट्वेयर कंपन्यांनी इक्डे दुकाने उघडली.पण ह्यापेक्षाही स्वस्त म्हणजे इकडची माणसे तिकडे नेणे.त्यात गुंतवणूक खूपच कमी होती. UC Davis च्या एका प्राध्यापकाने ह्यावर चांगले लिखाण केले आहे.जिकडे संगणका संबंधीत विशेष काहीच शोध लागले नाहीत तिकडचे संगणक अभियंते 'best and brightest' कसे असा सवाल त्यांनी अमेरिकन सरकारला केला होता. असो. बॅक टू ओबामा.!!
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
16 Oct 2009 - 10:52 am | बेभान
ओबामामध्ये सामर्थ्य आहे आणि जग ते लवकरच पाहील..
ओबामाबद्दल भारतात जो तिरस्कार निर्माण झाला आहे तो त्याच्या अमेरिकन जॉब्ज वाचविण्यासाठी केलेल्या विधांनावरून. अमेरिकन नागरिकांच्या हितास तो जर प्राधान्य देत असेल त्यामुळे त्याच्या आऊटसोर्सींगसारख्या निर्णयांवर भारतीयांनी आक्षेप घेण्याचा प्रश्नच येत नाही. राज ठाकरे जो महाराष्ट्रींयाकरिता करतो ते ठीक आणि ओबामा जो अमेरिकन नागरिंकासाठी करतो ते चुक. हे बरंय..! असो बॅक ऑन ट्रॅक..जे "वारकरी" पाठविलेले आहेत ते पहा
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=55014&boxid=194143421&pgno=4
16 Oct 2009 - 11:03 am | चिरोटा
"ओबामाबद्दल भारतात जो तिरस्कार निर्माण झाला आहे तो त्याच्या अमेरिकन जॉब्ज वाचविण्यासाठी केलेल्या विधांनावरून"
व्यक्तिशः ओबामांबद्दल तिरस्कार असण्याचे कारण नाही.globalization चे ब्रम्ह्ज्ञान जगाला शिकवणार्यांचे पाय शेवटी मातीचेच आहेत हे ओबामांच्या विधानावरुन स्पष्ट झाले.
भेंडी
16 Oct 2009 - 6:06 pm | श्रीकृष्ण सामंत
"आपलो तो बाबो
आणि
दुसर्याचो कार्टो"
असा विचार करून कसं चालेल?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
16 Oct 2009 - 10:52 pm | एक
~X(
हे ओबामांवरचे लेख वाचून असलंच डोक्यात येतं.. यापेक्षा सोज्ज्वळ प्रतिक्रिया देऊ शकत नाही.. क्षमस्व!!