ज्यूरी ड्यूटी

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
3 Oct 2009 - 12:29 pm

"पंचांचा निकाल काहीही असो, मी निरपराधी आहे असेच माझे मत आहे. या जगाचे नियमन करणारी.........", लोकमान्य टिळक.

लहान असतांना मराठी दुसरीत गेलेली ही वाक्यं!!!!
मला नेहमी प्रश्न पडत असे की जर लोकमान्य टिळकांना पंचाचा निकाल मान्य नाही तर ते टॉवेल का नाही वापरत?
बाबांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी हसून सांगितलं की ए येड्या, इथे पंचा म्हणजे अंग पुसायचा नाही तर पंच म्हणजे ज्यूरी......
मी लगेच बाबांना म्हटलं की मला ही ज्यूरी दाखवाच...

पण स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे ही ज्यूरी पहाणं माझ्या नशिबी नव्हतं. ब्रिटिशांच्या काळात कोर्टातल्या केसेस सोडवतांना सामान्य नागरिकांचा ज्यूरी म्हणून उपयोग केला जायचा म्हणे! स्वतंत्र भारताच्या सरकारचा सामान्य नागरिकांच्या सद्सदविवेकबुद्धीवर फारसा विश्वास नसल्यामुळे ही ज्यूरी सिस्टम भारत सरकारने मोडीत काढली असावी......

अनेक वर्षे लोटली. तरीही मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात ज्यूरीबद्दल कुतुहल जागृत होतं....
आणि अचानक परवा मला एक समन्स बजावण्यात आलं....

"तुमची पुढल्या आठवड्यात ज्यूरीसाठी पंच म्हणून गरज आहे. तेंव्हा अमूक दिवशी व्हेन्चुरा फेडरल सुपिरियर कोर्टात सकाळी आठ वाजता हजर रहा!!!!!

तुझ्या आयला तुझ्या!!!
साधं बोलावणं नाही काही नाही, एकदम समन्स?

आजवर "शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये:" ही बापजाद्यांची शिकवण नियमितपणे पाळत आलो होतो.....
पण आता कोर्टाचं समन्स म्हणजे काही इलाजच नाही....
नाही पाळलं तर साले माझ्याविरुद्ध वॉरंट काढून मला कैद करून न्यायचे आणि विनाचौकशी ग्वान्टानामो बे तुरुंगात महिनोनमहिने खितपत ठेवायचे!!!!!

झक मारत ठरलेल्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून (हरामी साले!!!) एक तास ड्राईव्ह करत आठ वाजता कोर्टाच्या आवारात हजर झालो.....
तिथे हल्ली नव्यानेच सुरू केलेल्या प्रथेनुसार यथासांग सिक्युरिटी चेकिंग वगैरे होतंच!!!! त्यांना बहुतेक ओसाम बिन लादेन उत्साहाने अमेरिकेत ज्यूरी म्हणून येतोय असंच वाटत असावं!!!!!
बाकी या अमेरिकनांच्या विनोदबुद्धीलाही तोड नाही! जिथे साक्षात पिढीजात अमेरिकन नागरिक ज्यूरी ड्यूटी चुकवायचा शर्थीने प्रयत्न करतात तिथे टेररिस्ट कुठले यायला बसलेत? बोअर होऊनच मरतील ना ते!!! असो...

सिक्यूरिटीवरच्या ऑफिसरला पॅन्ट उचलून मोजे वगैरे दाखवल्यावर माझ्याकडे डेंजरस असं काही नाही याची त्याला खात्री पटली. त्या आनंदात त्याने माझे खिसे तपासलेच नाहीत. त्याच्या दृष्टीने मी खिशात हत्यार घेऊन आत गेलो तरी हरकत नव्हती, फक्त मोज्यात ते हत्यार दडवलं नसल्याशी कारण......

आत गेलो तर तिथे माझ्यासारखेच इतर सुमारे दोनशे बकरे कोंडलेले आढळले. प्रत्येकाच्या तोंडावर एकवीरा देवीला बळी द्यायला आणलेल्या बकर्‍याचे भाव होते....
तिथे जाऊन एका खुर्चीवर स्थानापन्न झालो...

सुमारे पंधरा-वीस मिनिटांनंतर आज मधुबाला जर हयात असती आणि ऐशी वर्षांची असती तर कशी दिसली असती तशी दिसणारी सुमारे साठीतली एक महिला स्टेजवरच्या मायक्रोफोनपाशी आली...
तिने आमच्या बापाला झापल्या सारख्या कडक स्वरात आमचं स्वागत केलं.....
आम्ही तिथे हजर होऊन किती देशसेवा करतोय याबद्दल आमचं अभिनंदन केलं.....
आम्ही ज्यूरी ड्यूटीसाठी हजर होऊन कसं मोठं देशकार्य करतोय याची आम्हाला जाणीव करून दिली.....
पण हे सगळं सांगतांना स्वर मात्र, "भडव्यांनु! आपणहून आलांत म्हणून ठीक!! आला नसतांत तर तुमची सालटी सोलून वर मीठ शिंपडलं असतं!!!!" स्टाईल!!
हे सरकारी स्वागत गोड मानून आम्ही आंबट चेहरा करून तिथे बसलो.....

थोड्याच वेळात एक हिरोसारखा दिसणारा मनुष्य तिथे आला....
हे सुपिरियर कोर्टाचे जज्ज आहेत अशी त्यांची ओळख करून देण्यात आली....
हे हिरोसारखे दिसणारे जज्ज? असेल बुवा!!! हॉलिवूडच्या इतक्या जवळ असल्याने इथले जज्जदेखील हिरोसारखे दिसत असतील!!!
किंबहुना इथले जज्जच दिवसा जज्जगिरी आटोपून रात्री हॉलिवूडला शूटिंगसाठी जात असतील!!! आपल्याला काय माहिती?.... आम्ही आमच्या मनाची समजूत काढली....
जज्जसाहेबांनी अत्यंत म्रूदू आवाजात आमचे पुन्हा आभार मानले आणि ज्यूरीविषयीची त्यांची अपेक्षा आणि नियम आम्हाला समजावून सांगितले.....

हा सुपिरियर जज्ज जर इतका नरम तर मघाशी त्या थेरड्या मधुबालेला कसला माज चढला होता?
पण पोलीस कमिशनरपेक्षा हवालदार जास्त उर्मट या अनुभवाची अमेरिकन आवृत्ती आम्ही अनुभवली होती म्हणा ना!!!

असो. जज्जसाहेबांच्या म्हणण्याचा मतितार्थ इतकाच की आम्ही शांतपणे आमचे नांव पुकारले जाण्याची वाट पहात तिथे दिवसभर बसून रहावं. नांव पुकारलं गेल्यास आम्हाला कुठल्यातरी केसवर ज्यूरी म्हणून निवडण्यात येईल! पुकारा न झाल्यास आम्ही संध्याकाळी तसंच घरी जावं (आणि आपापल्या बायकोला आपल्या मर्दुमकीची कथा स्वता:च रचून सांगावी!!!)

टू बी फेअर, हे सांगणं आवश्यक आहे की त्या रूममध्ये आम्हाला आमचं दिल बेहेलवण्यासाठी असंख्य मासिकं होती. दोन बिग स्क्रीन टीव्ही होते. कंप्यूटर वापरू इच्छिणार्‍यांसाठी मुबलक टर्मिनल्स होती आणि मुख्य महणजे इंटरनेट सेवा मोफत उपलब्ध होती.....
आणि महत्त्वाचं म्हणजे त्या खुर्च्या अत्यंत आरामदायी होत्या, जणू कोचासारख्याच!!!

पण आम्हाला त्या सुविधांची गरजच नव्हती....
आम्ही आधीच तयारी म्हणून आमच्याबरोबर रणजित देसाईंचं "श्रीमान योगी" बरोबर घेऊन गेलो होतो. आम्ही तो ग्रंथ काढून वाचायला सुरवात केली....

शेजारी बसलेल्या एका तिशीतल्या ब्लाँन्ड अमेरिकन महिलेने आमच्या पुस्तकात नजर खुपसून पाहिलं. अनोळखी लिपी पाहून ती आम्हालाच ओसामा बिन लादेन समजली असावी.....
आम्हीही तिच्या लो कट ब्लाऊजमध्ये नजर खुपसून पाहिलं. निरिक्षण करण्यासारखं तिथे फारसं काही नव्हतं. म्हणून मग आम्ही पुन्हा श्रीमान योगीत लक्ष घातलं.....

शिवाजी महाराजांच्या जन्माचं कथानक चालू होतं......

असाच किती वेळ गेला कोण जाणे.....

अचानक आमचं नांव पुकारलं गेलं......

आता शिवाजी महाराज अफझलखानाचं पोट फाडायला निघाले होते.....

आम्हीही त्याच आवेशात कोर्टरूममध्ये एका जज्जसाहेबांच्या पुढे जाऊन हजर झालो......

(लोकांना आवडलं तर क्रमशः)

देशांतरविनोदअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

3 Oct 2009 - 12:37 pm | सहज

आवडलं
आवडलं
आवडलं

टारझन's picture

3 Oct 2009 - 8:34 pm | टारझन

आम्हीही तिच्या लो कट ब्लाऊजमध्ये नजर खुपसून पाहिलं. निरिक्षण करण्यासारखं तिथे फारसं काही नव्हतं. म्हणून मग आम्ही पुन्हा श्रीमान योगीत लक्ष घातलं.....

=)) =)) =)) =)) पाहुन पाहिला तर फ्लॅटस्क्रीन टिव्ही .. असो .. हल्ली चष्मा लागला असावा .. कैच्याकै वाचतोय =))
येऊण द्या काकासाहेब..

- केशरी डांबीस

गणपा's picture

3 Oct 2009 - 9:31 pm | गणपा

पिडां काका जबरा..
येउद्या एक से एक केसेस..

प्रभो's picture

5 Oct 2009 - 4:03 pm | प्रभो

मस्त....आणी टार्‍याशी सहमत

(केशरी टार्‍याचा ज्युली आवडणारा मित्र)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विशाल कुलकर्णी's picture

6 Oct 2009 - 12:32 pm | विशाल कुलकर्णी

च्यामारी तोडलत राव ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुप्रिया's picture

3 Oct 2009 - 12:37 pm | सुप्रिया

आवडलं. पुढचा भाग येऊ द्या पटापट.

दशानन's picture

3 Oct 2009 - 12:38 pm | दशानन

आरारारा !

लै भारी... लिव्हा लिव्हा... !

येलो नॉटी =))

नको तिकडे लगेच लक्ष जाते हो तुमचे आजोबा.

=))

=))

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2009 - 1:17 pm | पिवळा डांबिस

नको तिकडे लगेच लक्ष जाते हो तुमचे आजोबा.

आयला दिल्लीकर तुम्ही आणि आम्हाला शिकवतां?
हिपोक्रसीची ही लिमिट आहे!!!!
:)

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2009 - 12:47 pm | प्रभाकर पेठकर

झकास, मस्त, उत्तम, आवडलं. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे. अभिनंदन.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

लंबूटांग's picture

3 Oct 2009 - 1:07 pm | लंबूटांग

ड्राय डे चे सेलिब्रेशन जोरात वाटते ;)

श्रीमान योगी चे लेखक रणजित देसाई आहेत. शिवाजी सावंतांनी "छावा" हे पुस्तक लिहीले आहे :)

(श्रीमान योगीची अगणित पारायणे केलेला) लंबूटांग

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2009 - 1:15 pm | पिवळा डांबिस

पुस्तक तेच!
लेखक तुम्ही म्हणता तो!
सुधारणा करतो...

लंबूटांग's picture

3 Oct 2009 - 1:29 pm | लंबूटांग

वाट बघतो आहे :)

बॉस्टनला असताना मलाही असेच एक पत्र आले होते आणि मी दुर्लक्ष केले होते. माझ्या रूममेट ने सांगितले की online जाऊन एक फॉर्म भर की मी येऊ शकत नाही कारण मी स्टुडंट विसा वर आहे. नाही केलेस तर तुझ्याविरुद्ध वॉरंट काढू शकतात.. मला आधी अजिबात खरे वाटत नव्हते.

पण च्यायला इतकी मज्जा असेल तिथे तर पुढच्या वेळेस बोलावणे आले तर नक्कीच गेले पाहिजे :)

अवांतरः 'तुम्ही' काय म्हणता हो मला :(

माझ्या माहिती प्रमाणे अमेरिकन सिटिझन असल्याशिवाय ज्युरी ड्युटी कुणालाही कायद्याने करता येत नाही.
"मी अमेरिकन सिटिझन नाही"
एव्हडं खाली लिहून दिल्यास चालतं.नव्हेतर फॉर्मच्या खाली मी सिटिझन नाही असा बॉक्स असतो त्यात खूण केली की झालं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

लंबूटांग's picture

5 Oct 2009 - 5:15 pm | लंबूटांग

मी तेच कारण दिले होते की मी सिटीझन नसून स्टुडंट विसा वर आलो आहे. पण मला रूममेट म्हणला की जे काही कारण असेल ते भरून फॉर्म पाठव नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम्स होतील उगाच.

आता पुढील वेळी आमंत्रण येईल आणि तेव्हा मी सिटीझन असेन तर जाईन :)

दिपक's picture

3 Oct 2009 - 1:20 pm | दिपक

ज्यूरीकाका पुढे काय झालं? सांगा लवकर

अनिल हटेला's picture

5 Oct 2009 - 5:38 pm | अनिल हटेला

फस्स-क्लास वर्णन....

पू भा प्र..........

(चीरी मीरी ज्युरी)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

अवलिया's picture

3 Oct 2009 - 1:30 pm | अवलिया

आजोबा येवु द्या पुढचा भाग... अर्थात लक्ष देण्यासारखं काही मिळालं नाही तर तुम्ही टंकणार म्हणा!!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

घाटावरचे भट's picture

3 Oct 2009 - 1:40 pm | घाटावरचे भट

हा हा हा... महान!! अणुभव वाचायला आवडेल. येऊ द्या पुढचे भाग लवकर.

शक्तिमान's picture

3 Oct 2009 - 1:51 pm | शक्तिमान

वा वा, नवीन अनुभव!
डांबिसकाका पुढे लिहा... वाचायला नक्कीच आवडेल!

नंदन's picture

3 Oct 2009 - 2:03 pm | नंदन

पण हे सगळं सांगतांना स्वर मात्र, "भडव्यांनु! आपणहून आलांत म्हणून ठीक!! आला नसतांत तर तुमची सालटी सोलून वर मीठ शिंपडलं असतं!!!!" स्टाईल!!
हे सरकारी स्वागत गोड मानून आम्ही आंबट चेहरा करून तिथे बसलो.....

=)) मस्त, सुरुवातीचे हे चौकार-षटकार वाचून मजा आली.

टू बी फेअर, हे सांगणं आवश्यक आहे की त्या रूममध्ये आम्हाला आमचं दिल बेहेलवण्यासाठी असंख्य मासिकं होती. दोन बिग स्क्रीन टीव्ही होते. कंप्यूटर वापरू इच्छिणार्‍यांसाठी मुबलक टर्मिनल्स होती आणि मुख्य महणजे इंटरनेट सेवा मोफत उपलब्ध होती.....
आणि महत्त्वाचं म्हणजे त्या खुर्च्या अत्यंत आरामदायी होत्या, जणू कोचासारख्याच!!!

-- करा कवतिकं त्या जळ्ळ्या मेल्या अमेरिकेची. गव्हर्नरला 'आय ओ यू' काढायची पाळी आली तरी करा लेको उधळपट्टी (हो की नाही, नाना?). कधी काटकसरी होणार तुमचं सरकार देव जाणे.

असो, आता तुमचा आवडता प्रश्न - पुढचा भाग केव्हा? ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

7 Oct 2009 - 11:56 pm | मिसळभोक्ता

आता तुमचा आवडता प्रश्न - पुढचा भाग केव्हा?

असेच म्हणतो !

आणि डांबीसकाका, पुस्तक वाचताय "निश्चयाचा महामेरू" चे, आणि बघताय "बहुत जनांसी आधारू" कडे ? शोभतं का हे तुम्हाला ? (या वयात, असे लिहिणार होतो. पण आवरले.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विनायक प्रभू's picture

3 Oct 2009 - 2:27 pm | विनायक प्रभू

इथ कोर्टाच्या बाकात रक्तपिपासु ढेकणे असतात.
खिसा रिकामा तरी सुद्धा लो कट....
काय कळेना बॉ?

प्रमोद देव's picture

3 Oct 2009 - 2:30 pm | प्रमोद देव

खुसखुशीत लेखन.

अवांतरः आपल्या इथेही 'ज्युरी' पद्धत आहे. निदान ग्राहक न्यायालयात तरी आहेच. बँकेत काम करणारा माझा एक मित्र अधून मधून ह्या कामगिरीवर जात असे. ह्या कामासाठी त्याला बँकेतून भरपगारी सुट्टी मिळायची आणि वर शासनाकडून मानधनही मिळायचे.

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

मीनल's picture

3 Oct 2009 - 5:58 pm | मीनल

अजून लिहा. मस्त आहे.
कुठेही अतिरेक नाही, प्रामाणिक लेखन आहे.
मिपा अजून पर्यंत लेखन झालेले नाही असा विषय आणि अनुभव आहे.

मला कंपॅरेटिव्ह लिखाण आवडत.
अमेरिकेच लिहिताना भारताचा अनुभव, उदाहरण,उल्लेख मजेदार आहे.
मीनल.

वेताळ's picture

3 Oct 2009 - 6:15 pm | वेताळ

एकदम नव्या दुनियेत घेवुन गेलात कि एकदम. दुसरा भाग लवकर येवु दे.
वेताळ

विदेश's picture

3 Oct 2009 - 10:08 pm | विदेश

त्याच आवेशात 'जुडगे' साहेबाला किती 'पिडलं ' नि फाडलं
हे वाचायला जास्त उत्सुकता ताणू नको रे बाबा! पटकन क्रमशः लिहून मोकळा हो!

भाग्यश्री's picture

3 Oct 2009 - 10:42 pm | भाग्यश्री

ज्युरीकाका येऊद्या पटकन.. आवडले! :)

स्वाती२'s picture

4 Oct 2009 - 5:07 am | स्वाती२

आवडले. पुढचा भाग येऊ दे लवकर.

निमीत्त मात्र's picture

4 Oct 2009 - 5:40 am | निमीत्त मात्र

छान ओघवती शैली आहे. पुढचे भाग वाचायला नक्कीच आवडेल. पण पंचा/टावेल असले (अती)पानचट विनोद थोडे कमी केले तर पुढच्या भागात अजून मज्जा येईल.

पण दुर्दैवाने स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे

ही वाक्यरचना मात्र अतिशय खटकली. विनोदनिर्मीतीसाठी का असेना भारतमाते विषयी असे उद्गार काढू नयेत.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Oct 2009 - 10:35 am | प्रकाश घाटपांडे

पण दुर्दैवाने स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे

ही वाक्यरचना मात्र अतिशय खटकली. विनोदनिर्मीतीसाठी का असेना भारतमाते विषयी असे उद्गार काढू नयेत.

ही वाक्ये असहाय्य वेदना निर्मितीतुन आली आहेत असे आम्हाला वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2009 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण दुर्दैवाने स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे
ही वाक्यरचना मात्र अतिशय खटकली.

सहमत आहे ! :|

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

पिवळा डांबिस's picture

5 Oct 2009 - 5:53 am | पिवळा डांबिस

तुमच्या विनंतीला मान देऊन वाक्यात बदल केला आहे....

संदीप चित्रे's picture

4 Oct 2009 - 10:05 am | संदीप चित्रे

ज्युरी ड्युटीबद्दल नुसतं ऐकलंय पण स्ट्रेट फ्रॉम दि 'बकराज' माऊथ पहिल्यांदाच अनुभव ऐकायला मिळतोय.
वाचतोय ... नक्की लिहा :)

देवदत्त's picture

4 Oct 2009 - 11:11 am | देवदत्त

आवडले. पुढील भाग लवकर टाका :)

प्रसन्न केसकर's picture

4 Oct 2009 - 2:19 pm | प्रसन्न केसकर

आत्तापर्यंत ज्युरी ट्रायलवर जॉन ग्रिशामचे खिळवुन ठेवणारी नॉवेलं वाचलीत पण आता माय मराठीत पिडांकाकांचे अनुभव वाचायला मिळणार तर.... येऊ देत!

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Oct 2009 - 2:56 pm | बिपिन कार्यकर्ते

पिडांकाकांचा अजून एक जबरदस्त अनुभव... टाका हो पुढचे भाग पटापट.

सुमारे पंधरा-वीस मिनिटांनंतर आज मधुबाला जर हयात असती आणि ऐशी वर्षांची असती तर कशी दिसली असती तशी दिसणारी सुमारे साठीतली एक महिला

म्हणजे अगदी "खंडहर बताते है की इमारत कितनी बुलंद है..." असं का? ;)

(लोकांना आवडलं तर क्रमशः)

तुम्हाला असलं लिहिणं शोभत नाही हां मालक... च्यायला तुम्ही लिहिलं आणि पब्लिकला आवडलं नाही असं कधी झालंय? उगाच आपलं असलं काही लिहून भाव खायचा हे काय बरं नाय हां!!!!

बिपिन कार्यकर्ते

सुमीत भातखंडे's picture

5 Oct 2009 - 12:10 am | सुमीत भातखंडे

अर्थातच आवडलं.
लवकर येवुद्यात पुढचा भाग

अमोल केळकर's picture

5 Oct 2009 - 4:47 pm | अमोल केळकर

सहमत
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चतुरंग's picture

5 Oct 2009 - 6:15 am | चतुरंग

नेहेमीप्रमाणेच खुसखुशीत वर्णनाने पार्श्वभूमी तयार केली आहेत!
पुढे काय?

(मिलॉर्ड)चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Oct 2009 - 8:54 am | llपुण्याचे पेशवेll

डांबिसकाका लेख छान झाला आहे. पण थोडे केससंबंधी लिहून मग केसिरीज मालिकेप्रमाणे "जूरी डांबिसराव योग्य न्याय-निवाडा करतील?, लोकांचा जूरी डांबिसराव यांच्या न्यायबुद्धीवरचा विश्वास सार्थ होईल?" अशा प्रकारचे थोडी जाहीरात केली असती तर अजून मजा आली असती. :)
बाकी, तिथे खाण्यापिण्याची काय सोय होती?

-(रामशास्त्री) पेशवे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2009 - 9:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हीहीहीही ...

सकाळी सकाळी मजा आली ... काका, पुढचा भाग लवकरच लिहा.

अदिती

मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.'s picture

5 Oct 2009 - 10:31 am | मधु मलुष्टे ज्य...

व्वा मस्त.. पुढचा भाग कधी लिहिणार?

--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.

विजुभाऊ's picture

5 Oct 2009 - 3:02 pm | विजुभाऊ

लोकाना आवडले तर क्रमशः
अर्र्.................ही एका क्रमशः सम्राटाची शोकांतिका..........
ल्ह्या ओ बिंदास ल्ह्या.
बाकी तुम्हाला हे वेगळे सांगायला नकोच.
चि. टारुला तुमच्या ह्रद्य लिखाणातला लो कटच फक्त का दिसावा हा प्रश्न क्रमशः पडतो ?
अवांतरः शेंगा खाल्य्याचे गाणे " बोला जय जय जय टिळकांचा....गुरुजी नव्हते वर्गात" हे गाणे मला चौथ्या यत्तीत होते. त्यावेळेस शिवाजी म्हाराजांचा इतिहास होता टिळ्कक वगैरे त्या नन्तरच्या यत्तेत आले.
तुम्हाला मराठी दुसरीत या ऐवजी इंग्रजीत दुसरीत असे म्हणायचे आहे का?

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 3:02 pm | श्रावण मोडक

पुढे?

भडकमकर मास्तर's picture

5 Oct 2009 - 4:07 pm | भडकमकर मास्तर

मस्त लेख..
लवकर पूर्ण करा..

अवांतर : भारतात जूरी सिस्टीम ६० च्या दशकापर्यंत होती आणि कोणच्यातरी सेलिब्रिटीच्या प्रसिद्ध ( !!?) खटल्यात काहीतरी घोळ झाला म्हणून ती पद्धत बंद केली अशी चर्चा मिपावरच्याच "एक रुका हुआ फैसला" च्या चर्चेत वाचल्याचे आठवते.
( तोपर्यंत मलाही वाटत होते की स्वतंत्र भारतात जूरी पद्धत नव्हती)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

सहज's picture

5 Oct 2009 - 4:53 pm | सहज
स्वाती दिनेश's picture

5 Oct 2009 - 5:46 pm | स्वाती दिनेश

पुढे?
लवकर टाका पुढचा भाग..
स्वाती

ऋषिकेश's picture

5 Oct 2009 - 9:35 pm | ऋषिकेश

मस्त मजा आली
पुढील भाग येऊ दे लवकर

ऋषिकेश
------------------

धनंजय's picture

5 Oct 2009 - 9:40 pm | धनंजय

पुढच्या भागाची वाट बघतो आहे.

प्रभो's picture

8 Oct 2009 - 12:28 am | प्रभो

५०... प्रतिसाद...
अभिनंदन पिडांकाका...नानास स्वारी...

(नानाचा दोस्त)प्रभो

हर्षद आनंदी's picture

8 Oct 2009 - 9:07 am | हर्षद आनंदी

काकांनी अटकेपार झेंडा लावला ;)

खुमासदार शैली... येऊदे पुढचा भाग लवकरात लवकर..

"भडव्यांनु! आपणहून आलांत म्हणून ठीक!! आला नसतांत तर तुमची सालटी सोलून वर मीठ शिंपडलं असतं!!!!" स्टाईल!!
हे सरकारी स्वागत गोड मानून आम्ही आंबट चेहरा करून तिथे बसलो.....
=)) =)) =))
=)) =)) =))

अनोळखी लिपी पाहून ती आम्हालाच ओसामा बिन लादेन समजली असावी..... आम्हीही तिच्या लो कट ब्लाऊजमध्ये नजर खुपसून पाहिलं. निरिक्षण करण्यासारखं तिथे फारसं काही नव्हतं. म्हणून मग आम्ही पुन्हा श्रीमान योगीत लक्ष घातलं.....
का हो, डोळे फिरले का झीट आली?
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

शेजारी बसलेल्या एका तिशीतल्या ब्लाँन्ड अमेरिकन महिलेने आमच्या पुस्तकात नजर खुपसून पाहिलं. अनोळखी लिपी पाहून ती आम्हालाच ओसामा बिन लादेन समजली असावी.....
आम्हीही तिच्या लो कट ब्लाऊजमध्ये नजर खुपसून पाहिलं. निरिक्षण करण्यासारखं तिथे फारसं काही नव्हतं.

बस्स.... मस्तच पारखी नजर ...!

क्षमस्व पण पुढचे भाग आलेत का वो...???

शाहिर's picture

1 Aug 2011 - 5:10 pm | शाहिर

आवडल !