भुभु गीत

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जे न देखे रवी...
17 Sep 2009 - 9:14 pm

भुभु लोक भानंदाने भरुन भाउ दे रे
तुझे भीत भाण्यासाठी भुर लावु दे रे ॥धृ.॥

भुभ्र भुरे भाळुन भाल्या भिळ्या भिळ्या लाटा
भानभुले भेवुन भजल्या या भिरव्या वाटा
भ्या भुंदर भात्रेसाठी मला भाउ दे रे ॥१॥

भोर भेशरांचे भुलती पहाटेस भारी
भर्‍यातुनी भिडदा भिडदा भाजती भतारी
भोवळ्यात भौंदर्याच्या भुला भाहु दे रे ॥२॥

भ्रांत भ्रांत भुक्कडरात्री भंद भंद तारे
भुभु प्रेम घेउन येती भंधभुंद वारे
भांदण्यात भानंदाच्या मला न्हाउ दे रे ॥३॥

एक एक भक्षत्राचा भिवा लागताना
आणि भुले होण्यासाठी भळ्या जागताना
भौर्णिमा भ्वरांची माझ्या तुला भाहु दे रे ॥४॥

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

17 Sep 2009 - 9:46 pm | प्राजु

कै च्या कै..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

17 Sep 2009 - 9:55 pm | अनिल हटेला

भू भू......

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

गणपा's picture

17 Sep 2009 - 10:22 pm | गणपा

परकाशशेठ वेळ जात नाही का?
ह. घेणे.

विकास's picture

18 Sep 2009 - 6:45 am | विकास

भा भा ! भेकदम भस्त भ्रकाशराव!

भुमची भ्रतिमा भेकदम भुललीय भी भविता भिहीताना!

भुलेशू :)

भिकास

गुंडोपंत's picture

18 Sep 2009 - 7:15 am | गुंडोपंत

भ्रांत भ्रांत भुक्कडरात्री भंद भंद तारे
भुभु प्रेम घेउन येती भंधभुंद वारे
भांदण्यात भानंदाच्या मला न्हाउ दे रे ॥३॥

हे सही आहे. मोठ्याने म्हणून पाहायला फार मजा आली.

आपला
गुंडोपंत

युयुत्सु's picture

18 Sep 2009 - 9:50 am | युयुत्सु

कवितेत मधली अमूर्तता (abstractness) आता रसिकमान्य झाली आहे. पण घाटपाण्ड्यांनी विडंबनामध्ये अमूर्तता आणून मराठी विडंबनाला जी नवी दिशा दिली आहे त्याबद्द्ल त्यांचे कवतुक करावे तेवढे थोडेच आहे. विडंबनाचा हा नवा प्रकार "सहज विंडबन" अथवा "मुकत विंडबन" म्हणून काव्यरसिक स्वीकारतील अशी मी आशा करतो...

अजिंक्य's picture

18 Sep 2009 - 1:50 pm | अजिंक्य

मजा आली कविता वाचताना. भुभुकाराचे निराळेच रूप पाहायला मिळाले. :)
अजिंक्य.

दशानन's picture

18 Sep 2009 - 4:20 pm | दशानन

हॅ हॅ हॅ !

अवलिया's picture

18 Sep 2009 - 5:22 pm | अवलिया

हॅ हॅ हॅ

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विशाल कुलकर्णी's picture

18 Sep 2009 - 5:40 pm | विशाल कुलकर्णी

भह्ही भविता... =))

भाचुन भुटलो, भुटलो...भिंध्या-भिंध्या भालो ! =))

सस्नेह
भिशाल
*************************************************************

भाम्ही भिथेही भडीक भसतो "भैसी भक्षरे भेळविन!"

बाकरवडी's picture

18 Sep 2009 - 5:54 pm | बाकरवडी

वा वा !
अश्शी कविता अख्या त्रिखंडात कोणी लिहीली नसेल. मस्तच .

:B :B :B बाकरवडी :B :B :B

प्रशांत उदय मनोहर's picture

19 Sep 2009 - 6:13 pm | प्रशांत उदय मनोहर

असेच म्हणतो.
आपला,
(तीनदा डावीकडून आणि तीनदा उजवीकडून नर्डी) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये.... ते विकत घ्यावं किंवा घरी उगवावं.

:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

युयुत्सु's picture

18 Sep 2009 - 6:08 pm | युयुत्सु

भारविच्या किरातार्जुनीय या महाकाव्यात एक एकाक्षर श्लोक आहे तो आठवला -

न नोननुन्नोनुन्नोनो नाना नाना ननाननु|
नुन्नोनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननूत् ||

अर्थ विसरलो आहे. क्षम्स्व!

प्रकाश घाटपांडे's picture

18 Sep 2009 - 8:36 pm | प्रकाश घाटपांडे

उत्तम मंत्र . यातुन इष्टनकारापत्ती फलप्राप्ती घडते.नस्तित्वातुन अस्तित्वाकडे प्रवास चालू होतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

तनाना तनाना तनाना तनाना
धीं S तनाना देरे ना, एक तेचि नाना,
धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब नाना
धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब नाना
धिरधिर धीं तननननन
धिरधिर धीं तननननन
धितां ता धितां ता धितां ता धितां ता,
......
('घाशिराम'मधील रविंद्र साठेंनी गायिलेला तराणा)

तसेच 'नाना माउसकुरी' ह्या गायिकेचीही आठवण झाली.

सुबक ठेंगणी's picture

18 Sep 2009 - 8:44 pm | सुबक ठेंगणी

गाण्यात एवढे भ????
भ चा भलताच कलात्मकतेने वापर केलेला आहे.

चतुरंग's picture

18 Sep 2009 - 8:47 pm | चतुरंग

भकारगीताची भानामती भयंकर भावली! ;)

भयतुरंग

JAGOMOHANPYARE's picture

18 Sep 2009 - 10:04 pm | JAGOMOHANPYARE

( ओम भग भुगे भगिनी भागोदरे भग मासे ओम फट स्वाहा....) भप्रतिम.. !

तात्या विन्चूचा दुसरा भाग येतोय, त्यात द्या हे गाणे.. ! :)

पर्नल नेने मराठे's picture

19 Sep 2009 - 1:33 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म..........
भुभु

मीनल's picture

19 Sep 2009 - 6:19 pm | मीनल

काय म्हणाव तरी काय आता?
मीनल.