स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.
(पहिला पेग होवुन गेला आहे, वैचारीक चर्चा सुरू आहे अशी जागृत अवस्था अशातच पेग २ आगमन)
मी - घे ! फिश फ्राय चांगलं आहे... सध्या पिंडाचं गोळं खावुन खावुन वैतागला असशील..
तो- हं... काय करणार परंपरा असतात, त्या पाळाव्या लागतात... नाही पाळल्या तर बाप्पा ढुंगणावर टिमकी वाजवेल ना! बर ते जावु दे, ती हल्ली लिहित नाही...
मी - नाही लिहित... टिंगल होते म्हणे
तो - हं.. पुरषोत्तममधे गाजणारे नंतर समाजापुढे यायला घाबरतात हेच खरे
मी - जावु दे ना आपल्याला काय करायचे? तो बघ कसे वैचारीक लिहतो हल्ली..
तो - वैचारीक ? दे सोडुन, फार्मुला लेखन आहे ते
मी - फारमुल्ला ? तो कसा आहे
तो - फार जुना फार्मुला आहे.. मागल्या शतकात एका मोठ्या इतिहाससंशोधकाने वापरला होता, तसेच एका महान लेखिकेने वापरला होता.
मी - अरे पण आहे काय हा फारमुल्ला?
तो - सांगतो की ... समज अ, ब, क, ड या चार संख्या आहेत. अ हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध करायचेच असे आधीच ठरवायचे..
मी - हं.. बर..
तो- विविध संदर्भ वगैरे शोधुन, इकडुन तिकडुन पुरावे मिळवुन अ हा ब पेक्षा आणि क हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध करायचे.. शब्दांचे फुलोरे मांडुन, सजवुन लेख तयार करायचा आणि सगळ्यात शेवटी लिहायचे यावरुन सिद्ध होते अ हा ड पेक्षा लहान आहे... आहे काय आणि नाही काय ?
मी - अरे पण... ब हा क पेक्षा लहान आहे हे कोण सिद्ध करणार ? ते नको का करायला ?
तो- वेडाच आहेस. असे करायला लागल्यावर अ हा ड पेक्षा नेहमीच लहान आहे हे सिद्ध होत नाही ना ... कधी कधी अ हा ड पेक्षा मोठा असतो
मी - मग काय अर्थ ह्याला...
तो - तीच तर गंमत असते. ब हा क पेक्षा लहान आहे की नाही हे सिद्ध करायचेच नाही. त्याची अनेक कारणे असतात..
मी - काय काय ?
तो - एक तर काही वेळा ब हा क पेक्षा मोठा असतो त्यामुळे तसे मान्य केले तर अ हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध होत नाही, आणि करायचेच झाले तर खुप अभ्यास करावा लागतो, जो शक्य नसतो..
मी - हं.. अजुन..
तो - किंवा ब हा क पेक्षा लहान असला तरी क हा ड पेक्षा लहान आहे हे किंवा अ हा ब पेक्षा लहान आहे हे सिद्ध केलेले चुकीचे असते..
मी - हं..
तो - किंवा अ हा सगळ्यांपेक्षा मोठा असतो.. कारण दिलेला संख्या क्रम गुणवत्तेच्या उतरत्या मुल्याने असतो...
मी - हं..
तो - किंवा अ, ब, क, ड ही तुलना करण्यायोग्यच नसतात, पण ओढुन ताणुन अ ची मानहानी करण्यासाठी केलेला हा उपद्व्याप असतो
मी - अच्छा असा सोपा फारमुल्ला असेल तर मी ही दोन चार वैचारीक लेखन पाडतो की..
तो - कशाला? थोडी फार इज्जत शिल्लक आहे तुझी ती का घालवतोस..
मी - मग काय करु ?
(पेग २ समाप्त)
तो - वैचारिक लेखन सोडुन बाकी काहीही कर .. हे तर चालुच रहाणार.. तोवर आपलं जहाल आणि मादक चालु ठेवु...खास परदेशी माल आहे
मी - मग काय...करा रिपीट..
तो - करा करा. सहज सहज होत असेल तर करा रिपीट...
मी - येस्स रिपीट... पण... सहजच परवानगी असेल तरच कारण दुस-या पेगानंतर जे जे बोलु ते रिपोर्ट हायकमांडला जातात ...
(भाग २ समाप्त)
प्रतिक्रिया
10 Sep 2009 - 4:23 pm | श्रावण मोडक
रिपीट!
10 Sep 2009 - 4:26 pm | सहज
म्हणजे कायतरी समजले असे लिहा हो लवकर.
10 Sep 2009 - 4:41 pm | दशानन
थांबा ओ... माझी जरा उतरु दे... काय लिहले आहे ते मला तरी कळू दे आधी ;)
11 Sep 2009 - 6:13 am | नाटक्या
परत सुरु केलीत राजे? कधी पासून?
स्वगतः च्यायला आता राजे साकिया चा पुढचा भाग कधी टाकता असे म्हणत मागे लागणार!! ;-)
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
10 Sep 2009 - 4:28 pm | प्रभो
हे वाचून मलाही २ पेग मारावे वाटतायत..
10 Sep 2009 - 4:45 pm | धमाल मुलगा
राजे,
डायरेक्ट तिसराच भरा मग ;) नायतर क ब क ड चं क ड बो ळं करतील दारुडे!
10 Sep 2009 - 5:52 pm | घाशीराम कोतवाल १.२
धमु बाळ वहीणी साहेब ऑन्लाईन आहेत जोड्यान मारतील ;)
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
10 Sep 2009 - 5:59 pm | मदनबाण
रिपीट... ;)
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
10 Sep 2009 - 8:15 pm | पाषाणभेद
लवकर संपवला आज?
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
11 Sep 2009 - 1:02 am | प्राजु
चकल्या, कडबोळ्या... शेवया सगळं एकातच का , राजे??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Sep 2009 - 9:40 am | दशानन
चकल्या, कडबोळ्या... शेवया सगळं एकातच का , राजे??
बैलपोळा गेला...
आता दिवाळी येणार ना... मग थोडी आतिषबाजी करायची आहे ना ;)
11 Sep 2009 - 1:33 pm | अवलिया
चालु द्या.... !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
11 Sep 2009 - 3:50 pm | दशानन
काय वो.. चालू !
द्या :?
12 Sep 2009 - 4:28 am | पाषाणभेद
(भाग २ समाप्त) ???
म्हणजे अजून बैठक संपली नाही का?
खरे आहे म्हणा, बसल्यानंतर वेळ काही समजत नाही.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या