मात्र रात्रीची गोष्ट ....भाग १

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
29 Aug 2009 - 3:07 pm

***
स्थळ - नेहमीचेच रात्रीचे ठिकाण.
वेळ - नेहमीची 'बसायची' वेळ.
पात्र - मी आणि नेहमीचा मित्र.

(सुरवात नुकतीच होत असल्याने कोण काय बोलत आहे हे नीट कळत नाही, जसजसा वेळ जातो तसं नीट कळायला लागतं, अशी सुरवातीची उन्मनी अवस्था)

मी - हाटेल चांगल चालायला लागलं रे... सुरवातीला आपण यायचो तर अगदी फुटकळ लोक यायचे

तो- तर आता चांगले चालु आहे. फॅमिली रुम, बार, गार्डन, टेरेस वेगवेगळे भाग आहेत. जो तो आपापल्या चॉईसने जातो

मी - ते बरे आहे नाही तर तुला मला पाहुन सगळे फॅमिलीवाले पळुन गेले असते

तो - तर काय .. एक तर माकडाचे चेहरे आपले.. भाषा खराब

मी - पण आपल्याला तोंडावर बोलतं का कुणी?

तो - सज्जन माणसे आहेत ती .. आपल्यासारखी नालायक थोडीच

मी - तो हल्ली दिसत नाही... गांडुळाचा कारखानदार.. आहे की गचकला ?

तो - असेल ... असेल... धाडकन येईल तर आपल्याला धावावे लागेल सावरकर बनुन...

मी - हा हा पण चांगला आहे माणुस..

तो - माणुस चांगलाच असतो परिस्थिती त्याला वाईट बनवते. आता तो दुसरा आठवतो का तुला..

मी - हो आठवतो की.. चांगला होता... आखातात गेला आणि ... असो. बाकी काय चाललय?

(तेवढ्यात एक जोरदार गलका ऐकु आला. वेटरला हाक मारली)

तो - काय रे? रेड पडली का? लायसन नाहीये.. मागचा दरवाजा उघडतो ना नीट?

वेटर- रेड कुठली ? तो वेडा आला आहे.

मी - कोण? इथे तर सगळेच वेडे आहेत.

वेटर - नाही.. हे येडं वेगळच आहे. कामधंदा करणा-या लहान मुल असणा-या बायांना पकडुन तुम्ही दुध कसे पाजता? डायपर वापरता की दुपटे? असले प्रश्न विचारतो.. आणि भंडावुन सोडतो. नव-यांना सांगतो.. तुमचे आता काही खरे नाही. फार दंगा करतो.

तो - अरे मग हाकलुन द्यायचे ना?

वेटर - कुणाकुणाला हाकलणार? अजुन एक वेडा येईल थोड्या वेळाने. हातात माती घेवुन येतो आणि पटकन कुणाच्याही ताटात माती टाकुन पळुन जातो...

मी - अरे मग, मालक काय गोट्या खेळतोय का? कुठे आहे मालक?

वेटर - तो काय कोप-यात बसला आहे गुणगुणत.. हल्लीच त्यांनी मानवतावादी परिषदेचे सदस्यत्व घेतले आहे. त्यामुळे अशा वेड्यांना संरक्षण आणि बाकीच्यांना फाट्यावर मारणे चालु आहे... ऑर्डर काय आणु ?

तो - अरे हो.. वेड्यांचे चाळे चालुच रहाणार.. जवळ आला तर भादरुन काढु.. तोवर आपले चालु ठेवु

मी - मग काय... मागवा नेहमीचेच..

(पेग १ आगमन)
.
.
.
(पेग १ समाप्त)

तो - रिपीट...

मी - येस्स रिपीट...

(भाग १ समाप्त)

मौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

29 Aug 2009 - 3:14 pm | सुनील

सुरुवात ठीक. पुढचे भाग पटापट टाका!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक's picture

29 Aug 2009 - 4:38 pm | श्रावण मोडक

किती रात्री आहेत या एकूण, राजे? मजा येणार हे नक्की.
चुकलं की काय? रात्री नव्हे, किती पेग आहेत?

झकासराव's picture

29 Aug 2009 - 4:46 pm | झकासराव

राजे वीकेंड सुरु झाला तर तुमचा. =))
हळुहळुच लक्षात आल. सुरवातीला एकदम कळालच नाय. :)

अवलिया's picture

29 Aug 2009 - 5:23 pm | अवलिया

हम्म. चर्चा वाचण्यास उत्सुक.
चालु द्या ! बसलो आहे शेंगा फोडत !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निखिल देशपांडे's picture

29 Aug 2009 - 5:35 pm | निखिल देशपांडे

वाचतो आहे राजे
येवु द्या पुढचा पेग

निखिल
================================

सहज's picture

29 Aug 2009 - 7:30 pm | सहज

राजे येउ द्या भारी!

हा मातीचा कारखानदार नक्की कोण :?

अबोल's picture

29 Aug 2009 - 8:46 pm | अबोल

डायपर वापरता की दुपटे? असले प्रश्न तुम्हाला येण्याअगोदर राजे तुम्ही लवकर काय ती ढोसा व कलटी मारा.

मदनबाण's picture

30 Aug 2009 - 12:37 am | मदनबाण

वाचेश्... :)
पुभाललि...

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

पाषाणभेद's picture

30 Aug 2009 - 12:17 pm | पाषाणभेद

काय राजे, कथा सत्यकथा समजायची काय?

लवकर पुर्ण करा.

रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2009 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तिसर्‍या पेगाच्या सॉरी भागाच्या प्रतिक्षेत.

अजुन एक वेडा येईल थोड्या वेळाने. हातात माती घेवुन येतो आणि पटकन कुणाच्याही ताटात माती टाकुन पळुन जातो...

राजे, कोण हो हा वेडा कुंभार ! :?

-दिलीप बिरुटे

मराठमोळा's picture

30 Aug 2009 - 12:33 pm | मराठमोळा

राजे,

एवढा छोटा भाग? असो,
वाचत आहे, येऊ द्या पुढचा भाग मोठा आणी लवकर.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!