मात्र रात्रीची गोष्ट भाग ४

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
13 Sep 2009 - 1:30 pm

मात्र रात्रीची गोष्ट भाग ३

*********

स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.

(तिसरा पेग होवुन गेला आहे, अवांतर चर्चा सुरू आहे अशी स्वप्नावस्था.... अशातच पेग ४ आगमन)

मी - काल फिरत फिरत त्या पेठेत गेलो होतो..

तो- हं... दिवाळीची जोरदार तयारी चालु आहे सध्या तिथे

मी - आपला तो भेटला होता... तिकडेच खरेदी करणार आहे या वेळेस दिवाळीची

तो - हं.. इथली रंगीत कापडं त्याला आवडत नाहीत, डिसेंन्सी नसते म्हणे... घालता येत नाही, अंगात बसत नाही हे सांगत नाही

मी - जावु दे ना आपल्याला काय करायचे? पण तो का पुढे पुढे करायला लागला हल्ली..

तो - हल्ली ? दे सोडुन, जुनेच आहे ते हाडुक चघळणारं आणि तो अगदी शेम टु शेम. फक्त याला भाद्रपदाची वाट पहावी लागत नाही

मी -हॅ हॅ हॅ ...

तो - मग तु काही खरेदी करणार की नाही...

मी - अरे अजुन काही ठरवले नाही, तशी आपली पेठ काय... राजाच्या घरी रोज दिवाळी

तो - ते पण खरेच पण मग मला समजत नाही आपल्या पेठेतले दुकानदार बावचळले का?

मी - म्हणजे?

तो - अरे ! आपली पेठ येवढी सजलेली असतांना, वेगवेगळी दुकाने मांडलेली असतांना, गि-हाइकी चालु असतांना, सेल्स प्रमोशनच्या नावाखाली सँम्पल्स वाटायला त्या पेठेत कशाला जातात?

मी - अरे पण... धंदा वाढायला नको का?

तो- वेडाच आहेस. अरे इथे माल पुरवता पुरवता नाकात दम येतो. इथली पेठ सगळ्यात जास्त टर्नओव्हरची आहे. इथेच धंदा नीट करायचा सोडुन तिथे जाहिराती कशाला ?

मी - सांगणार कोण या दुकानदारांना.....

तो - वर तिथल्या तथाकथित फुकट्यांची बोलणी ऐकायची, आम्ही माल मागवलाच नव्हता, तुम्ही कशाला पाठवला. तुमच्या पेठेत तुम्ही गळ्यातच मारत असाल.. वगैरे वगैरे...

मी - काय काय ?

तो - तर... मग बसले गप्प मुंडी खाली घालुन

मी - हम्म. च्यायचा घो... इथल्या पेठेत गि-हाइकाशी बोलणार नाही... वसकन अंगावर येतात.. माल घ्यायचा तर घ्या नाही तर फुटा

तो - गरज आपल्याला आहे ना म्हणुन सेलर्स मार्केट आहे आपली पेठ

मी - हं..बदलेल का रे कधी?

तो - कशाला? आहे ते ठीक आहे..

(पेग ४ समाप्त)

मी - म्हणजे हे असेच चालु रहाणार

तो - हम्म.. हे असेच चालु रहाणार.. तोवर आपलं चालु ठेवु...

मी - मग काय...करा रिपीट..

तो - येस्स रिपीट.

(भाग ४ समाप्त)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

13 Sep 2009 - 1:38 pm | मदनबाण

करा रिपीट... ;)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

श्रावण मोडक's picture

13 Sep 2009 - 1:52 pm | श्रावण मोडक

सेल्चे फंडे... चौथ्या पेगनंतर विक्री जास्त होते का हो? ;)

दशानन's picture

13 Sep 2009 - 2:10 pm | दशानन

ते मनस्थिती व परस्थितीवर अवलंबून आहे ना ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2009 - 4:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भरा पुढचा पेग !
आणि कडक भरा.. :)

पाषाणभेद's picture

13 Sep 2009 - 9:36 pm | पाषाणभेद

लवकर भरा राजे.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

टारझन's picture

13 Sep 2009 - 11:42 pm | टारझन

दोघांच्या ड्वायलॉगांत एक लाईनचा स्पेस आहे ना .. तिथे अंमळ दोन लाईन्स ची स्पेस द्या राजे .. भाग अंमळ मोठा दिसेल ..
आणि हो .. युयुत्सु टेक्निक वापरल्यास दुप्पट मोठा दिसेल !

बाकी चालु द्या .. सगळे भाग काही मिनिटांत वाचले .. उत्तम :)
बिपीनचा आणि सामंतकाकांचा लेख एकापाठोपाठ वाचलेले .. एक तास कसा गेलेला कळलेच नव्हते .
असो ..

--
II मोजे II

अवलिया's picture

14 Sep 2009 - 9:18 am | अवलिया

रिपीट ! :)

अवांतर - चपला तयार आहेत ना ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

14 Sep 2009 - 9:22 am | दशानन

का भोऊ :?

आम्ही काय वंगाळ नै बोललो.. चार लोक हॉटेलात बसून जे बोलले तेच आम्ही टेबलावर बसून बोललो... :|

अवलिया's picture

14 Sep 2009 - 9:25 am | अवलिया

नियम विसरु नका...

आम्ही करतो ते "प्रेम" आणि तुम्ही करता ते "ल फ डे".

बाकी चर्चा खव मधुन :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.