बायको बरोबर भाजीला गेलो, पिशवी तिच्या हातात होती
खरेदीला घेतलेल्या पैशाची, माझ्या खांद्यावर जड पोती
आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला
दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला
तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता
पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता.
कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज
तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज
डाळीचा मग नाद सोडला, चिकन आणलं भाराभर
त्यादिवशी मला पटलं, `घर की मुर्गी दाल बराबर'
दाल मे कुछ काला है, मोठा कठीण आलाय काळ
महागाईसमोर कुणाचीच शिजेनाशी झालीय डाळ
आमच्या संसाराचं चाक असं महागाईत फसलंय
सरकारसुद्धा आमचं कसं मूग गिळून गप्प बसलंय!
प्रतिक्रिया
15 Aug 2009 - 2:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'वाढत्या महागाईचे' वास्तव आणि उपहास कवितेत जबरा उतरला आहे.
तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता
पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता.
स्सही ! :)
अवांतर : ओगले साहेब, विश्व साहित्य संमेलनाच्या विशेषांकात तुमची 'चुकले का हो' ही हजल प्रा. विसुभाऊ बापटांच्या 'मराठी काव्याचा रंजकतेचा प्रवास' या लेखात वाचायला मिळाली. अभिनंदन !!!
-दिलीप बिरुटे
17 Aug 2009 - 12:38 am | टारझन
वा !! ओगले साहेब नेहमी छाण कविता करतात !!
प्रसंगानुरुप आणि सत्य वर्तमानस्थितीवर ते नेहमी परखड आणि स्पष्ट कविता करतात !! ह्या कवितेत त्यांनी महागाईवर केलेला उहापोह फारच आवडला !!
- टारझन
15 Aug 2009 - 3:31 pm | स्वाती२
कविता आवडली.
15 Aug 2009 - 3:41 pm | क्रान्ति
आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला
दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला
तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता
पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता.
कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज
तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज
लै भारी! एकदम सही!
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
15 Aug 2009 - 4:22 pm | प्रशांत उदय मनोहर
सुरेख कविता
प्रशांत
15 Aug 2009 - 4:38 pm | अवलिया
आयला ! जबरा कविता .... मस्त... ! :)
विशेष आवडले.. !
--अवलिया
15 Aug 2009 - 5:08 pm | सहज
मस्त आहे कविता.
:-(
15 Aug 2009 - 5:29 pm | प्रमोद देव
:)
15 Aug 2009 - 5:57 pm | प्रियाली
सहसा कविता वाचण्याच्या भानगडीत पडत नाही पण या कवितेला दाद दिल्यावाचून राहावले नाही.
16 Aug 2009 - 4:32 am | शाहरुख
असेच म्हणतो..
16 Aug 2009 - 6:47 am | एकलव्य
महागाईने क्लिनबोल्ड झालेला - एकलव्य
15 Aug 2009 - 6:46 pm | स्वाती दिनेश
आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला
दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला
उपरोध आवडला.
स्वाती
15 Aug 2009 - 8:12 pm | चतुरंग
ओगलेसाहेब, फारा दिवसांनी उत्तम उपरोधिक काव्य वाचायला मिळाले! :)
(फुळकवणी आमटी पिणारा)चतुरंग
6 Sep 2009 - 5:01 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
15 Aug 2009 - 8:56 pm | मदनबाण
अविनाशराव कविता छानच आहे. :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
16 Aug 2009 - 5:25 am | प्राजु
कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज
तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज
खूप दिवसांनी उपरोधात्मक कविता वाचायला मिळाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Aug 2009 - 9:00 am | दशानन
लै भारी... आवडली!
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
16 Aug 2009 - 9:09 am | विसोबा खेचर
एक नंबर कविता...! :)
तात्या.
16 Aug 2009 - 9:10 am | सुनील
कविता आवडली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Aug 2009 - 11:12 pm | प्रभाकर पेठकर
सुरेख व्यंगकाव्य. अभिनंदन.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
16 Aug 2009 - 11:27 pm | श्रावण मोडक
सहमत. वरील सर्वांशीच.
17 Aug 2009 - 10:03 am | ऋषिकेश
मस्त कविता.. मस्त विषय.. मस्त मांडणी
मजा आली
ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ०२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "दाम करी काम येड्या...."
17 Aug 2009 - 10:47 am | नरेंद्र गोळे
(तूर) डाळ महागली म्हणून आणली हडाळ |
खा आता चूनभात, अन् झुणकाभाकर तिखटजाळ ||
हडाळ = हरभर्याची डाळ
चून = घट्ट पिठले (विदर्भाकडे फार लोकप्रिय असते. आमचे भूतपूर्व कुलगुरू चूनभात खातच लहानाचे मोठे झाले होते.)
17 Aug 2009 - 11:43 am | अभिज्ञ
कविता फारच आवडली.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
17 Aug 2009 - 4:41 pm | दिपक
एकदम जबराट कविता ! :)
17 Aug 2009 - 4:50 pm | अनिल हटेला
आवडली कविता !!
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
17 Aug 2009 - 4:55 pm | सूहास (not verified)
सू हा स...
5 Sep 2009 - 2:09 pm | सुधीर काळे
ओगले साहेब,
कविता फारच आवडली. ज्याने मला पाठविली होती त्याला विचारले पण त्यालाही तुमचे नाव माहीत नव्हते (व ही कविता इथे प्रसिद्ध झाल्याचे मला माहीत नव्हते.) म्हणून मी आपल्याला 'क्रेडिट' देऊ शकलो नाहीं. क्षमस्व. ही कविता "मी मराठी"वर प्रसिद्ध झाली होती पण कवीचे नाव नव्हते असे तो म्हणाला.
पुन्हा एकदा अतीशय चांगली कविता केल्याबद्दल अभिनंदन!
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
6 Sep 2009 - 8:18 pm | अविनाश ओगले
९९४ वाचकांचे आणि २८ प्रतिक्रियाकारांचे मन:पूर्वक आभार...
18 Sep 2009 - 1:55 pm | बाजीराव
झकास कविता... आवडली. बेळगावात कोमसापचे सम्मेलन भरणार असल्याचे काल महेश म्हणाला. केव्हा?
18 Sep 2009 - 2:17 pm | अजिंक्य
छान कविता. उपरोध आवडला.
अजिंक्य.