भाकरी फिरवणे... साहेबांच्या पक्षाची , टीम इंडियाची व युवराजांच्या लग्नाची...

बामनाचं पोर's picture
बामनाचं पोर in जनातलं, मनातलं
26 Jul 2009 - 1:56 pm

तिन्ही मिटींगचा विषय :- भाकरी फिरवणे .. फक्त संर्दभ वेगवेगळा आहे.. ;)

---------
१)
ठिकाण:- प. महाराष्ट्रातला साखर कारखाना... निमंत्रित:- पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य..
उगाच वाद नको म्हणून साहेबांची एकट्यांची जागा स्टेजवर .. बाकी सगळे समोर ..

साहेबांनी एक उस खाली आपटून दोन तुकडे केले..अन म्हणाले " ह्म.. करा सुरवात.. " सगळ्यानी एकदम कल्ला सुरु केला.

" आरक्षणाच्या आंदोलना मुळे २-३ जागा हातच्या गेल्या.. एव्ह्ढ ताणून धरायची काय गरज होती.. "
" काय म्हणालात .. समाजाने गठ्ठा मतदान केल. म्हणून ८ तरी जागा आल्या.. आरक्षणाच्या नावाने बोलायच काम नाही. "
" डान्सबार बंद झाल्यामूळे फार नुकसान झाले .. बारमालकांचा विरोध झालाच आणी वरुन 'रसद' कमी पडली ... "
" अगदी बरोबर आहे.. कार्यकर्ते दमल्यावर श्रमपरीहार करणार तरी कसा.. !! डान्सबार बंदी महागात पडली.. आताही निकालानंतरही काही जेष्ठ नेत्यांची प्रतिमा..... "
--वाक्य पुर्ण व्हायच्या आतच खास परवानगी काढून हजर असलेल्या डॊक्टर साहेबांनी आक्रमक रुप धारण केले.. ( boxing champion असल्यान . " attack is best defence " हे त्यांन चांगले माहीत आहे.. )
" आमचे नाव घेताना जपुन जरा.. .. घरात आता हत्यारे अन पैसे ठेवायचे का झंडु पंचारिष्ठ अन ऎरंडेल तेलाचा साठा करुन ठेवायचा.. अजुन चौकशी चालू आहे ,काय काळं/पांढर ठरतं नाही तोवर आमच्या कडे बोट दाखावायचे काम नाही.. जास्त बोलला तर आत्ता राजीनामा देतो बघा , सातच खासदार मग"...
तेव्हढ्यात एक नव-निर्वाचीत तलवार उपसून गरजले.. " कोण पक्षवैगरे काय माहीत नाही.. आम्ही स्वत: संघर्ष करून निवडुन आलो आहोत.. आदेश देण्याची सवय आहे आम्हाला, ऎकण्याची नाही... "
आता मात्र गोंधळ फार वाढु लागला.. मग साहेबांनी हस्तक्षेप केला " आता झाले ते ठिक आहे.. विधानसभेच्या वेळेला काय करायचे ते बोला.. वांद्रेकर सामान भरुन तयार आहेत. ’वर्षा’वर येण्याकरता . त्यांना कसे थोपवायचे ते बोला" ..

परत सगळ्यांना तोंड फुटलं...

" प्रस्थापितांना बदला . नव्या चेहरयांना संधी द्या... "
" अहो पण , प्रस्थापित सोडले तर हाय कोण आपल्या कडे.. ८ वर्से झाली कोण नवीन दिसतय का तुम्हाला ? "
" चिन्ह बदला.. 'घड्याळ' म्हन्ल तर कवातरं बंद पडायचच् ते.. त्या पेक्षा 'हातोडा' घेउ.. एक घाव दोन तुकडे. "
" सरकारमान्य डान्सबार चालू करा.. बारबालांना ड्रेसकोड ठरवून देउ.. म्हणजे सगळ्याची सोय झाली... "
" ४०% आरक्षण द्या .. मग बघा कशी धपाधप एक गठ्ठा मत पड्तात ते.. "
" माझ्या जिल्ह्यात मीच काय ते बघणार.. दुसरयाने नाक खुपसायचे नाही... "

सगळ्यांना शांत करुन शेवटी साहेबांनीच एक फर्मास प्रस्ताव मांडला..

" शिवाजी पार्कवर व्यवस्थित रसद पोचवा. काय हवं नको बघा . त्यांचे ’इंजीन’ राज्यभर पळाले पाहीजे.. नाहीतर काही यंदा लक्षणं बरोबर दिसत नाहीत. वांद्रेकर नक्की शपथ घेणार , तुम्हाला सगळ्यांना कारखान्यावर साखरेचे उतारे मोजत बसावं लागेल. "

याला मात्र सगळ्यानी एकमताने मंजुरी दिली....

====

२) ठिकाण:- क्रिडांगणावरची ड्रेसिंग रुम... निमंत्रित :- t-20 मधे हरलेली टीम-इंडिया .. विषेश उपस्थिती:- मोदी ( तेच ipl वाले.)

इथे सगळॆच दोषी त्यामुळे सुरवात करायच धाडस कोणालाच होइना... अखेर गंभीरने कोंडी फोडली...

" वो ipl ने बहोत हालत बनादी अपनी.. बहोत थक गये... " मग प्रत्येकाने आपली पुंगी वाजवायला सुरवात केली..
" १२ round मैच तो बहोत है .. वोभी २० ओव्हरका .. मतलब हर गैंद को बहोत जोर लगाके मारना पडता है.. फोर या सिक्स ..वो टीमका मालिक हिसाब रखता है सबका .. "
" सही बोलता है यार.. फिल्डिंग करते टाईम भी बहोत भागना पडता है.. उपरसे ये मालिक / मैनेजर लोगोंका नाटक.. "
" अरे मेरे टीमको तो दो मैच हारने के बाद एसी से नॊन-एसी रुम भेज दिया.. उपरसे बोलता है 'बिसलेरी नही नल का पानी चलेगा ना ?' "
" ये सबके बाद भी जीता वो ऑस्ट्रेलिया का कैप्टन . "..

अशी सगळी टिका ऎकल्यावर मोदींनी आपल्या जवळची पाकीटे प्रत्येकाला नावानिशी वाटली.. आपापले 'आकडे' बघून सगळ्यांचा मुड एकदम पालटला.. सगळ्यांच्या 'खात्याला' चालना देणारे ipl याही पेक्षा जोरात चालले पाहीजे यावर सगळ्यांचे एकमत झाले.

टीमचा फिटनेस न राखता आल्या बद्दल फिजीओ व डॉक्टर दोघांची हकालपट्टी करण्यात आली. त्याच्यां जागी नवीन येणारयांना सोपे जावे म्हणून प्रत्येकाने आपले
" काय दुखतं आहे " हे न लपवता लिहुन द्यायचे ठरले . त्या साठी फिरवलेला कागद मिळाल्यावर विरूची चुळबुळ सुरु झाली.. धीर करुन त्याने शेवटी विचारले..

" ए धोनीभाई.. इधर सबके नामके सामने एकही लाइन है .. मला पुरणार नाही यार. त्यापेक्षा मी " काय दुखत नाही " ते लिहू का ? म्हणजे एका ओळीत मावेल."

शेजारी बसलेल्या झहीरने ’मम’ म्हणुन त्याला अनुमोदन दिले..

====

३) तिसरी मिटींग मात्र अगदी गोपनीय....

अणुकरार झाल्यावर बघू.. ! , आता विश्वासमत ठरावानंतर नक्की.. ! .. येव्हढी निवडणूकांची गडबड संपल्यावर बघायला सुरवातच.. ! आता मंत्रीमंडळ एकदा फायनल झाले की निवांतच ना, मग तेव्हा नक्की !!

अशी काहीतरी कारणे काढुन युवराज दर वेळेला लग्नाचे पुढे ढकलात आहेत.. आता मात्र हायकमांड व निष्ठावंतांनी पक्कं ठरवले आहे की यंदा बार उडवायचाच.... बाकी फार शिक्रेट मैटर असल्याने लग्नाचे ठिकाण कदाचीत 'Màscali' इथे आहे येवढंच कानावर आले. ... खर-खोटे कळेलच आता...

------
काय म्हणालात ?? हे ’Màscali’ काय ? अहो हे आपल्या क्वात्रोची मामांचे गाव नाही का , इतके पण कसे माहीती नाही तुम्हाला ...

विनोदविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jul 2009 - 8:58 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म्म... जोरदार. येऊद्या अजून.. बाकी पुणे प्रकरणात 'मान'कापायला युवराजानी स्पेषल लक्ष घातले असे ऐकून आहे. अन्यथा 'त्यां'च्या पुढे सर्वांच्या 'प्रतिभा' फिक्या पडल्या होत्या.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

टारझन's picture

26 Jul 2009 - 9:39 pm | टारझन

वा !! सुरेख !! केवळ अप्रतिम लिखाण !!
अजुन येउन द्या पोर साहेब

- टारझन
(सहि विडंबण सेवा बंद करण्यात आली आहे)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jul 2009 - 11:30 pm | बिपिन कार्यकर्ते

बा.पो. ... लेखन आवडलं.

बिपिन कार्यकर्ते