आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोर्या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वार्याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेचं
प्रपोजल् व्हायची वाट बघत
प्रतिक्रिया
16 Jul 2009 - 11:00 am | नितिन थत्ते
वा वा बेसनलाडू.
सुंदर कविता.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
16 Jul 2009 - 11:08 am | विशाल कुलकर्णी
मस्त !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
16 Jul 2009 - 11:49 am | पाऊसवेडी
>> डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
मस्त खूपच सुंदर !!
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
16 Jul 2009 - 12:58 pm | ऋषिकेश
लै भारी!....
वेलकम ब्याक!
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
16 Jul 2009 - 12:58 pm | श्रावण मोडक
छान. आवडली.
16 Jul 2009 - 1:46 pm | दत्ता काळे
फार सुंदर कविता.
16 Jul 2009 - 3:35 pm | जागु
मस्त, आवडली.
16 Jul 2009 - 8:57 pm | प्राजु
सुंदर!!!
अतिशय सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jul 2009 - 9:06 pm | क्रान्ति
तरल, नाजूक, सुंदर कविता! खूप खूप आवडली.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
16 Jul 2009 - 10:35 pm | पिवळा डांबिस
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
क्या बात है, बेला, जियो!!!
एकूण सगळीच कविता सुंदर!!!
अभिनंदन!!
17 Jul 2009 - 1:35 am | केशवसुमार
क्या बात है, बेलाशेठ, जियो!!!
सुंदर कविता!!!
अभिनंदन!!
(आस्वादक)केशवसुमार
16 Jul 2009 - 10:38 pm | पिवळा डांबिस
रिपीट झाल्यामुळे प्रकाटाआ...
16 Jul 2009 - 11:13 pm | अवलिया
वा ! मस्त !!
--अवलिया
=============================
क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)
16 Jul 2009 - 11:16 pm | लिखाळ
वेगळीच आणि मस्त :)
कविता आवडली.
-- लिखाळ.
16 Jul 2009 - 11:19 pm | चतुरंग
आवडली! :)
(टपोरा)चतुरंग
16 Jul 2009 - 11:40 pm | धनंजय
मेंदीचे ठिपके तर औरच.
17 Jul 2009 - 7:41 am | नंदन
आहे, सुरेख कल्पना. कविता आवडली. इंग्रजी शीर्षक अजिबात खटकत नाही, हे विशेष.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Jul 2009 - 12:53 am | सुवर्णमयी
कविता आवडली
17 Jul 2009 - 5:04 am | बबलु
लै भारी !!!
लाडू पेटलाय राव :)
17 Jul 2009 - 6:34 am | मदनबाण
मस्त...
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
17 Jul 2009 - 7:36 am | दिपाली पाटिल
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
कविता तर एकदम भारी आहे बरं का!!! पण कुणासाठी तरि स्पेश्शल लिहिल्यासारखी वाटतेय. ;)
दिपाली :)
17 Jul 2009 - 8:23 am | विसोबा खेचर
सुंदर कविता..!
जियो...
तात्या.
22 Jan 2016 - 9:31 pm | राघव
सुंदर लिहिलंय!!