PHUN _ खेळ, शिक्षण ,करमणुक एकसाथ

बोका's picture
बोका in जनातलं, मनातलं
20 Jun 2009 - 1:07 pm

मुंबइच्या नेहरू सायन्स सेंटर मध्ये पहिल्या दालनात शिरताच 'एनर्जी बॉल' नावाचे यंत्र दिसते. यात एक टेनिस चेंडू एव्हढा, पण वजनदार गोळा उंचावरुन उतारवर सोडला जातो. मग हा गोळा घरंगळत, वेगवेगळी वळणे घेत, वाटेतील वस्तुंना धक्के देत जमीनीवर येतो. गोळ्याचा हा आकर्षक प्रवास भौतिकशास्त्रातले काही नियम तुम्हाला शिकवतो.

टाँम अँन्ड जेरी च्या एका भागात, टाँम जेरी ला मारण्यासाठी काही साध्यासोप्या वस्तू वापरून एक किचकट , लांबलचक यंत्रणा बनवतो. यात एक टेबलफॅन चालू होतो - त्याच्या हवेने एक खेळण्यातली शिडाची बोट पुढे सरकते- ती बोट पुढे जाउन कहीतरी ढकलते- .......-अशा एकामागुन एक अनेक क्रिया घडून चाकूने एक दोरी कापली जाते व तीला लटकवलेले वजन खाली पडते.

वरील दोन्ही यंत्रांसारखी यंत्रे तुम्हाला घरी बनवता येतील Phun हे सॉफ्टवेअर वापरून !
Phun हा एक भौतिकशास्त्रावर आधारित खेळ आहे. यात तुम्हाला काही सोप्या वस्तू वापरून तुमची स्वतःची यंत्रे बनवता येतात.

यंत्रे बनवण्यासाठी तुम्हाला मिळतात ... ठोकळे, चाके, दोरी, स्प्रींग, गिअर, मोटर, पाणी, उतार, चढण वगैरे ...

यंत्र बनवून झाल्यावर ते कसे चालेल हे पाहता येते. ( सिम्यूलेशन ).

यंत्र अधिक गमतीशीर बनवण्यासाठी गुरुत्वाकर्षण, घर्षण कमी जास्त करता येतात.

खेळ, शिक्षण ,करमणुक एकसाथ !

हे सॉफ्टवेअर फुकट आहे व लिनक्स , म्याक , विंडोज सर्वांसाठी उपलब्ध आहे. फक्त संगणक थोडा वेगवान हवा.

phun ची एक झलक इथे पहा.

कसे वापरावे ते इथे पहा

कलातंत्रविज्ञानशिक्षणमौजमजाशिफारसअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

20 Jun 2009 - 1:48 pm | मराठमोळा

सॉफ्टवेअर आवडले!!
लहान मुले तसेच मोठ्यांसाठी सुद्धा बुद्धीला थोडी चालना देणारे आणी गमतीदार सुद्धा. मेकॅनिकल ईंजीनीयरसाठी तर छानच. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अजय भागवत's picture

20 Jun 2009 - 3:39 pm | अजय भागवत

त्या प्रणालीने खूप वैविध्यपूर्ण करामती करुन दाखवल्या आहेत त्या चित्रफिती मधे, धन्यवाद हा दुवा दिल्याबद्दल!!!