मायबापहो,
मिसळपाववर गेले बरेच महिने येवून आस्वाद घेत होतो. काहीतरी आपणही करावे असे बरेच दिवस वाटत होते पण धाडस होत नव्हते. जरी व्यवसाय लिहिण्याचा असला तरी ललित अक्कल नाही ना कधी लिहिण्याची शैली तयार केली. आज मुलाची शाळा सुरु झाली आणी गेले काही दिवस डोक्यात घोळत होते ते काळ्यावर उतरावे अशी ऊर्मी आली. त्यामुळे हे लिहिले. ओनामा तर केलाय पण भट्टी जमली आहे असे काहि वाटत नाही पण चुका पोटात घाला आणी जर लिहून अजून छळू नये असे वाट्ले तर तसेही कळवा.
पुनेरी
आज नऊ जून..... गोटूची शाळा आज परत सुरु झाली. गोटू म्हणजे आमचा सुपुत्र _ वय वर्षे चार आणी शाळा म्हणजे सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल
आमचा गोटू आता जूनियर केजी वर्गात गेला. तशी तो शाळेत जायला लागून दीड-दोन वर्षे झाली पण आत्तापर्यंत प्ले ग्रुप, मिनी केजी अश्या वर्गात असल्यामुळे एबीसी फोनेटिक्स सह घडा घडा म्हनने, पोएम पाठांतर, फ्रुटस, फ्लोवर ओलखने, रोड-वे, एयर-वे, रेलवे, वाटर-वे वेहिकल ओलखने, थोड़े क्राफ्ट आणि पेंटिंग एवढाच अभ्यास. त्यामुले अजुन शाळेचा फील आला नव्हता.
जूनियर केजी म्हणजे अभ्यासाची सुरुवात याची जाणीव शनिवारीच आली. सुट्टीचा मुहुर्त साधून मी आणी बायको शाळेत गोटूची पुस्तके घ्यायला गेलो होतो. अर्थातच गोटू बरोबर होता. "बाबा आता शाळा सुरु होणार ना? मग मला माझे सगळे मित्र भेटतील ना? अर्चना टीचर आणी प्रीता टीचर पण भेटतील ना?" एक ना अनेक, गोटू सतत प्रश्न विचारत होता आणी त्याला उत्तरे देता देता माझी पुरेवाट होत होती. मधेच बायको गोटूला "आत्ता आपल्याला तुझ्या नवीन टीचर भेटतील, त्याना गुड मॉर्निंग म्हणायचे, नाव सांगायचे" असे शिकवणीवजा सांगत होती. एकदाचे शाळेत पोचलो आणी गोटू एकदम चेकाळला , "बाबा, ए बाब्या.... तो बघ सिंदाल दरक घसरगुंडी खेलतोय. तो माझ्या वर्गात आहे." थोड्या विचारांती लक्षात आले सिंदाल हा सिद्धांत चा गोटू ने त्याला जमेल तसा केलेला उच्चार होता.
वर्गात नविनच टीचर होत्या. त्यानी गोटूला नाव विचारले आणी तो चक्क लाजला. अरेच्या नेहमी एवढा डेअर-डेविल वाटणारा गोटू चक्क बुजला? "होते असे कधी कधी. ओळख नसल्याने मुले बुजतात पण एक दोन दिवसात सरावतात," टीचरनी आम्हाला धीर दिला. "बघालच मग," म्हणावेसे वाटले त्याना. पण तोवर गोटू सरावला होता आणी टीचरना गुड मॉर्निंग म्हणत होता. टीचर छान हसल्या आणी त्यानी एक भली मोठी पिशवी आमच्या हातात दिली. बापरे! केवढे तिचे वजन? दीड-दोन किलो सहज असेल. उघडून पाहिले तर आत दहा-बारा पुस्तके, दोन फुलस्केप वह्या, एक पोएमची सीडी, क्रेयॉन्सचा बॉक्स, पेंसिल बॉक्स, खोड-रबर, शार्पनर आणी काय काय?
"हे सगळे रोज घेऊन यायचे शाळेत," बायकोचा चिंतातूर प्रश्न. एवढासा आमचा गोटू एवढे वजन घेउन स्कूलबस मधे कसा चढ़नार-उतरणार हा प्रश्न तिच्या चेहर्यावर! "आता घरी गेल्यावर सगळ्या वह्या-पुस्तकांवर नाव वगैरे लिहा आणी मंगळवारी सगळी पुस्तके पाठवा. काही आम्ही इथे ठेवून घेवू मग रोज दोन-तीनच पुस्तके आणी वह्या आनाव्या लागतील,"टीचरनी परत विको वज्रदंती स्माईल देत सांगितले. मी आणी गोटू नविन पुस्तके बघत होतो तर बायको जरा बाजूला गेली आणी थोड्या वेळाने हसत परतली. "गेल्या वर्षी गोटूला होत्या त्या अर्चना टीचर भेटल्या मला. त्या म्हणाल्या काही काळजी करू नका. थोड़े दिवस त्या ही जूनियर केजी च्या क्लास मधे जाणार आहेत, नविन टीचरबरोबर मुले रुळेपर्यंत," तिने सांगितले आणी जीव जरा भांड्यात पडला. मग जाऊन दप्तर खरेदी, दुकानात मुलांची आणी त्यांच्या आई-बापांची ही गर्दी.... ते हनुमान चे दप्तर हवे, मला सुपरमन चे..... सगला गिल्ला. गोटूला स्पायडरमनचे हवे होते.
त्यानंतर युनिफॉर्म खरेदी. तिथेही मुलांची आणी पालकांची खचाखच गर्दी... नवीन कपड्याचा, बुटांच्या लेदरचा छान वास... चड्डीची ट्रायल घ्यायला गोटू लाजला. "असू देत! बरोबर बसेल मापात! आणी नाहीच बसली तर बदलून घ्या केव्हाही," दुकानदार काकानी भरवसा दिला.
घरी आल्यापासूनच गोटू मनाने शाळेत पोचला होता. दोन दिवस फक्त सगळी पुस्तके मांडून बसला. सगळ्या पुस्तकातली चित्रे पाहिली, नविन पुस्तकाचा वास घेत बसला. मग दोन दिवस फक्त पुस्तक _ ए, बी, सी, डी करत सगळ्या पुस्तकाची कव्हर वाचली.
काल सन्ध्याकाळी आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. एरवी हॉटेलात जेवणे गोटूला खूप आवडते पण काल सगळे लक्श घरी कधी पोहोचतो याकडे. घरी पोहोचलो आणी कुठ्लीही खऴखळ न करता गोटू झोपला ही. बहुतेक रात्रभर शाळेची स्वप्ने पहात होता आणी मी आणी बायको त्याच्या पुस्तक्-वह्याना कवर घालत होतो.
पहाटे सहा वाजताच गोटूचा गजर सुरु. "बाबा, ए बाब्या! ऊठ! आज माझी शाळा सुरु होतेय. मला तयार व्हायचेय मग तु मला बाय कर. आठ वाजता बस येणार पण सात वाजताच गडी तयार ना! अगदी दप्तर खान्दयाला लावून. नाचत नाचत गेला बस स्टॉपवर तर इतर मुलेही जमली होती. माने काका आणी गाडे काका बस घेऊन आले तर सगळी मुलं खुश.
दुपारी परत घरी आल्यावर गोटू सगळ्या गमती सांगत होता. "टीचर छान आहेत. त्यानी टीव्ही वर कार्टून दाखवली आणी नावे विचारली. मी बरोबर बोललो तर गुड बॉय म्हणाल्या...." बायको बोलती झाली, "आठवते? आजोबांच्या वेळी म्हणे शाळेच्या पहिल्या दिवशी ओनामाशीढ्म (ओम नम सिद्धम!) म्हणायचे. आपण श्री गणेशाय नमा म्हणायचो. आणी ह्याच्या ईंग्लीश मीडीयम मधे काय तर कार्टून."
तेव्हढ्यात गोटू उत्तरला,"अग! पण रोजच्यासारखी सगळ्यात आधी मोरया मोरया मी बाळ तान्हे ही प्रार्थना आम्ही म्हणलीच ना!"
प्रतिक्रिया
9 Jun 2009 - 3:30 pm | पर्नल नेने मराठे
गोटु मस्तच :D
चुचु
9 Jun 2009 - 4:08 pm | मैत्र
छान झाला ओनामा !
9 Jun 2009 - 4:15 pm | छोटा डॉन
सुंदर आहे अनुभवकथन, आवडले.
आत्ताच कुठे शाळा सुरु झाली आहे, आत रोजच असे वेगवेगळे अनुभव येतील, त्यांचेही असेच लेखन येऊद्यात.
आम्ही वाट पाहु ...
आणि हो, लिखाणाची शैली व ते आवडेल का ह्यचे टेन्शन लिहणार्याने घेऊ नये, आपण आपले लिहुन मोकळे व्हायचे. "स्वान्तसुखाय" लिखाण केले ना मग कश्शा कश्शाचा त्रा होत नाही.
शिवाय आपले मिपाकर चांगले आहेत हो, तुमचे ते जरुर कौतुक करतील व प्रोत्साहन देतील ...
तो शॉर्टमे बोलु तो, लिखते बना, टेन्शन नका घेऊ, कसे ?
------
गोटू डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
9 Jun 2009 - 10:32 pm | क्रान्ति
१००% सहमत!
लेख अगदी सहज आणि मस्त जमलाय! गोटूला शुभेच्छा आणि आशिर्वाद!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
10 Jun 2009 - 2:07 am | टारझन
सर्वप्रथम .. पुणेरी बॉस .. लेख आवडला आहे .. आणि शैली वगैरे डेव्हलप होईल जेंव्हा थोडंफार तरी लिखाण कराल .. अलगद मनापासून जस्साच्या तस्सा अनुभवलेला लेख असल्याने रोजच्याच जिवणातला वाटला .. आणि मनाला भाऊन गेला ...
अवांतर (पुनेरी... खालील वाक्यांचा आपल्याशी संबंध नाही)
च्यायला ह्या डाण्याच्या ... डाण्या .. तुझ्या ह्या असल्या आश्वासनांमुळेच काही लोकांचं फावतं .. तु मारे चांगल्या हेतून बोलून जातो बे .. मग पब्लिकची छाती फुगते आणि एकेका सुस्कार्या सरशी तो ४-४ लेख पाडतो.. आता ते कोणत्या कॉलीटीचे .. ते सांगायला हवं का बे? आम्हाला एक तं वाचायचं अॅडिक्शन ... एकदा दोनदा तिनदा ......... बेचाळीसदा... अठ्ठेचाळीसदा ... .. बावण्ण दा ... ........................... शेंच्यूरी ... किती सहन करायचं बे मग ते ?
- (चांगल्या लेखांना चांगले'च' प्रतिसाद देनारा) टारझन नजरकैदी
9 Jun 2009 - 5:24 pm | शार्दुल
गोटुचा फोटु टाका स्पायडरमन द्प्तरासहीत्,,,बाकी लेख आवड्ला,,
नेहा
9 Jun 2009 - 7:00 pm | रेवती
फारच गोड ओनामा!
ह्या एवढ्याश्या मुलांना काय आणि किती अभ्यास असतो आजकाल....
पण तुमच्या मुला प्लीज खेळू द्या भरपूर! :)
सिद्धांतचा उच्चार फारच गोड!
पालकांनाच खूप उत्साह असतो मुलांच्या शाळेच्या वस्तू आणायचा.
मलाही आहे! इतकी मजा येते! आता पुन्हा सप्टेंबरमध्ये अशीच मुलाबरोबर जाईन स्कूलसप्लाय आणायला. पहिल्या इयत्तेत ढब्बू रेघांचे कागद्.....मोठ्ठी अक्षरं काढायला....दुसर्या इयत्तेत दुरेघी कागद्.......आणि असच काहीबाही. मजा येणार.
रेवती
9 Jun 2009 - 9:53 pm | संदीप चित्रे
मुलांना ओझं वागवायला लावत नाहीत ही स्प्रिंग डेलची पद्धत आवडली.
माझा मुलगाही चार वर्षांचा आहे :) इथे युनिफॉर्म नसल्याने लेकाला त्या रूपात बघायच्या आनंदाला मुकावं लागतंय..
तुमच्या मुलाला खूप शुभेच्छा. रेवती म्हणाल्याप्रमाणे त्याने खूप खूप खेळावंही :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
9 Jun 2009 - 10:44 pm | चतुरंग
अगदी मनापासून लिहिलं आहेत! मुलावरचं तुमचं प्रेम दिसतं.
मुलांना पुस्तकवह्यांच्या ओझ्यात न दडपणारी 'स्प्रिंग डेल' चांगलीच आहे म्हणायचे! त्याला भरपूर खेळू दे. ही वर्ष परत येत नाहीत. बागडणारी मुलं बघता बघता मोठी होतात आणि आपण त्यांच्या निरागस हसण्याखेळण्याला पारखे होतो!
(माँटेसरीतला)चतुरंग
10 Jun 2009 - 1:07 am | बिपिन कार्यकर्ते
अहो पुनेरी साहेब.... तुमचा गोटू आणि त्याचा ओनामा भलताच आवडला. वाचताना अगदी डोळ्यासमोर आला... पटकन त्याचा गालगुच्चा घ्यावासा वाटला :)
बिपिन कार्यकर्ते
10 Jun 2009 - 1:14 am | टिउ
मस्त नाव आहे...अजुन पण गमती जमती येउ द्या! :)