"रच्याकने" जाता जाता कविता पाडली
"पुलेशु"च्या पावसात टंकून टाकली
" कृ ह घ्या" च्या उपदेशे माझी सटकली
" डू आयडी" ची पिल्ले तेव्हा जन्माला घातली
"हा का ना का", "हा का ना का" नेहमी वाटले
"ह ह पु वा", "ह ह पु वा" क्वचितच झाले
"म आं जा" च्या संक्षेपांची यादी आटपली?
"पु भा प्र" च्या आशेवर आठोळी संपली :)
~~~~~~~~~~~~~~~~
शब्दार्थ:
म आंजा= मराठी आंतर-जाल
रच्याकने = रस्त्याच्या कडेने
पुलेशु= पुढील लेखनास शुभेच्छा
कृ ह घ्या= कृपया हलके घ्या
डू आयडी= माझे clones
हा का ना का= हाय काय नाय काय
ह ह पु वा= हसून हसून पुरे वाट
पु भा प्र= पुढील भागाची प्रतिक्षा
प्रतिक्रिया
6 Jan 2026 - 1:14 pm | सोत्रि
पु भा प्र
- (संक्षिप्त) सोकाजी
6 Jan 2026 - 1:45 pm | मूकवाचक
हे. वे. सां. न ल (हे वेगळे सांगणे न लगे)
6 Jan 2026 - 3:37 pm | गवि
चोप्य पस्ते..
https://misalpav.com/node/20113
(..चाल.. कोणतीही..)
विचारमैथुन चालू असावे
जेव्हा काही कामच नसते
कचेरीमधे लेखन प्रसवत
चोप्य पस्ते..चोप्य पस्ते..
(...चाल बदलून...)
अंगलटीला उलटुन येता
प्रतिक्रियांच्या पचपच पिंका
ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका
पेरुन द्याव्या विकीलिंका..
(..चलन बदलून...)
बोटावरची थुंकी बदलणे
रुमाल टाकुन जागा धरता
प्रकाटाआ डुकाटाआ
अशक्य होईल बूच मारता.
(..चालचलन आणि वृत्त बदलून..)
अच्रत ब्वलत शीबै नैकै
पुलेशुभेच्छुक पुभालटा
तर्रीभरला शाब्दिकरस्सा
इथे उकळतो रटारटा..
(.. चाल सोडून...)
डायरिया जिलब्या अन चपला
ठोठो हसता कोणी खपला
काळेबेरे काही नाही
शब्दकोष टेंपोत बसवला..