आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख
ए०आय० आणि उत्पादकता
-- राजीव उपाध्ये
माझी कन्या शाळेत असताना बर्याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्यापैकी पुढे होती. बौद्धिक आणि शारीरिक चापल्याचा घनिष्ट संबंध असल्याचे विज्ञानाने आता मान्य केला असल्याने माझ्या या जुजबी निरिक्षणांमध्ये शास्त्रीय तथ्य असल्याचे नंतर लक्षात आले.
हा गंमतीदार ’अभ्यास’ सांगायचा उद्देश असा की नवे तंत्रज्ञान आल्यावर जे अगोदर धावत सुटतात, ते त्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा उठवतात. चॅटजीपीटीचे लोकार्पण झाल्यापासून मी रोज या तंत्रज्ञानाविषयी येणार्या बातम्यांवर नजर ठेऊन होतो. जवळजवळ ३ महिने गेल्यानंतर भारतीय ब्लॉगर्सनी ए०आय०ची दखल घ्यायला सुरुवात केली. सांगायचा मुद्दा, आपण याही खेपेला नव्या तंत्रज्ञानाला संगणकाच्या आगमनाच्या वेळी दिला तसा थंडा प्रतिसाद दिला (हे अर्थात माझे वैयक्तिक मत आहे).
ए०आय० किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता हे असे तंत्रज्ञान आहे की ज्याने आजवर निर्माण झालेल्या तंत्रज्ञानापेक्षा सर्वात जास्त गुंतागुंतीचा प्रभाव मानवी जीवनावर टाकला आहे. ’बृह्त्भाषा प्रतिकृती’ (लार्ज लॅंग्वेज मॉडेल) अवतीर्ण होण्यापूर्वीच अनेक जणांनी धोक्याच्या घंटा वाजवायला सुरुवात केली होती. पण "मग सावकाश बघू" या धारणेमुळे बहुसंख्य लोकांनी या इशार्यांकडे दूर्लक्ष केले.
आज भारतीय माध्यमातून ए०आय० बद्दल जे लिहीले किंवा दाखवले जाते, त्यात मला नकारात्मक सूर जास्त सापडतो. मराठीत पण ए०आय० बद्दल बोलणारे अनेक मातब्बर तज्ज्ञ ए०आय० कसा वापरावा याबद्दल अवाक्षर न काढता धोक्यांबद्दलच जास्त बोलताना दिसतात. विशेषत: अलिकडे अमेरीकेतील एम०आय०टी०ने मेंदू निष्क्रिय होण्याबद्दल इशारा देणारा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे, असे मला वाटते. कारण प्रत्यक्षात अनेक लोकोत्तर तंत्रज्ञानांच्या आगमनावेळी असे इशारे देण्यात आले होते. उदा० इमेल तंत्रज्ञन आले तेव्हा लोकांना हाताने पत्र लिहीणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व वाटू लागले होते. तसेच इमेलमध्ये भावनिक ओलावा नाही म्हणून नाक मुरडले जायचे. अनेकजण मी इमेल बघत नाही, इंटरनेट वापरत असे अभिमानाने सांगायचे. पण नंतर इमेलने आणि संदेशनातील नंतरच्या प्रगतीने मानवी आयुष्य किती व्यापले हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे ही नकारात्मता जर अशीच कुरवाळली गेली तर तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणून पण भारत मागे पडेल अशी मला भीति वाटते. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की अस्तित्त्वाला धक्का देणार्या, सर्व उपकारक आणि अपकारक तंत्रज्ञानांशी शेवटी मनुष्यप्राण्याने असे ना तसे जुळवून घेतले. ज्यांनी जुळवून घेतले नाही त्यांचे अस्तित्व अर्थातच धोक्यात आले.
मी ए०आय० कडे कसे बघतो?
"उत्पादकता वाढवणारा एक जीवलग सखा" अशी माझी ए०आय० बद्दलची धारणा आहे. असा किंवा अशासारखा सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तरच ए०आय०चा जास्तीत लाभ मिळवून उत्कर्ष साधता येईल असे माझे स्पष्ट मत आहे.
समजा तुम्हाला अल्पमोली, आखुडशिंगी, बहुदुधी अशी गाय एखाद्याने आणून दिली तर ती तशी खरोखर आहे का हे अधूनमधून तपासणे ही किमान जबाबदारी मालक म्हणून तुम्ही पार पडणे आवश्यक आहे. तात्पर्य, नोकर कितीही विश्वासू असला तरी किमान देखरेख ही ठेवावीच लागते. ए०आय० बाबत पण नेमके तसेच आहे.
ए० आय० कडून १०० टक्के अचूक उत्तरांची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे. ही अपेक्षा पूर्ण न झाल्याने अनेक जण ओशाळताना दिसतात. पण ए०आय०ची थापेबाजी आता खुपच कमी/नगण्य झाली आहे. पण तरीही शंका आल्यास किंवा पुरेशी काळजी घेण्यासाठी एकच प्रश्न एकाच वेळेला, वेगवेगळ्या वेळेला, भाषा बदलून एकापेक्षा अधिक ए०आय० ना विचारल्याने विश्वासार्ह उत्तरे मिळायची शक्यता वाढते. तसेच एका ए०आय०ने दिलेले उत्तर दुसर्या ए०आय०कडुन तपासून घेता येते.
बर्याच ए०आय० सेवा देणार्या कंपन्यांनी माफक सेवाशुल्कात भारतात सेवा देणे चालू केले आहे. ज्याना शक्य आहे त्यांनी अशा सशुल्क सेवांचा अवश्य फायदा उठवला पाहिजे. हे पैसे आपली "उत्पादकता" वाढल्याने नंतर लगेच वसूल होतात.
एक ताजे उदाहरण-
मी शेअर बाजारातला एक छोटा गुंतवणूकदार आहे. मला कुणाचे सल्ले न घेता गुंतवणूक करायला आवडते. पूर्णपणे स्वत:च्या भरवशावर शेअरबाजारात गुंतवणूक करताना दोन गोष्टींचे पथ्य पाळावे पाळावे लागते - एक म्हणजे समभागाचे तांत्रिक विश्लेषण (technical analysis) आणि दुसरे म्हणजे कंपनीच्या उद्योगाचे पायाभूत विश्लेषण (fundamental analysis).
नैसर्गिक देणग्यांमुळे (पॅटर्न शोधणे) आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे तांत्रिक विश्लेषणामध्ये मी ए०आय०च्या मदतीने अभ्यास करून बर्यापैकी प्रावीण्य मिळवले, पण पायाभूत विश्लेषण करण्यात मी कमी पडत होतो. ही उणीव भरून काढायला मला ए०आय० ची होत असलेली मदत अनन्यसाधारण आहे.
वेगाने व्यवसायात प्रगती करणार्या कंपन्या ओळखणे हे माझ्यासारख्या अनेकांना आह्वानात्मक असते. सर्वच लोकाना कंपन्यांचे ताळेबंद आणि त्यावरुन योग्य ते निष्कर्ष काढणे किंवा कंपनीच्या भविष्याविषयी अंदाज बांधणे जमत नाही. साहजिकच या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी मी ए० आय० लाच प्रश्न विचारला -
"Help me to find good low valued stocks which have promising future in Indian markets. Suggest some strategies."
मला त्याने समभागांचे संख्यात्मक (ऐतिहासिक कामगिरी) आणि गुणात्मक विश्लेषण कसे करायचे याबद्दल काही सूचना केल्या. यातील संख्यात्मक विश्लेषण करण्यासाठी आज असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. पण समभागाच्या गुणात्मक विश्लेषणात त्याने - व्यवस्थापनाची गुणवत्ता (Management Quality), कंपनीची व्यवसायात स्पर्धात्मक आघाडी (Competitive Advantage), व्यवसायाचे भवितव्य (Growth Prospects) हे निकष तपासण्यास सांगितले. आता मुख्य समस्या अशी की माझ्या वैयक्तीक मर्यादांमुळे मला एखाद्या कंपनीचे असे ’गुणात्मक विश्लेषण’ अजुनही जमत नाही. त्यामुळे मी अर्थातच पुढचा प्रश्न विचारला -
"How to find out about management quality of a company?"
यावर जेमिनी या ए०आय०ने मला एक लांबलचक निकषांची यादी दिली. ती बघितल्यावर यात थापा नाहीत याची खात्री करण्यासाठी एका दुसर्या (डीपसिक) ए०आय०ला ही यादी तपासायला सांगितले आणि आवश्यक असेल तर भर टाकायला सांगितले. मला तात्काळ कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा ठरवणार्या निकषांची सुधारित आणि अंतिम यादी तयार करून मिळाली.
मी ग्रोक या ए०आय० ची सशुल्क सेवा वापरतो. वरील यादीतील निकष वापरून कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे, तसेच व्यवसायाचे भवितव्य यावर पुन:पुन: माहिती मिळावी यासाठी ग्रोकमध्ये कायम स्वरूपी सूचना देता येतात. हा सर्व उद्योग केल्यावर मग प्रत्यक्ष चाचणीसाठी माझ्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ गडगडलेले आणि चांगली कामगिरी करत असलेले समभाग तपासले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. ग्रोकने दिलेली उत्तरे ~१००% अचूक होती.
माझ्या ऐकीव माहीतीनुसार प्रसिद्ध तत्त्वज्ञ विट्जेन्स्टाइन असे म्हणत असे - माणसाचे जग किती मोठे तर त्याच्या भाषेच्या वापरा एव्हढे. तसेच कितीही नाही म्हटले तरी माणसाची सुबत्ता त्याच्या घरातील नोकरचाकरांच्या संख्येवर, दारातील गाड्यांच्या संख्येवर ठरते. लवकरच माणसाची उत्पादकता त्याच्या ए०आय०च्या वापरावरून निश्चित केली जाईल याची मला खात्री आहे.
प्रतिक्रिया
21 Sep 2025 - 9:03 am | मारवा
1
AI संदर्भात व्यक्तिगत माझा फारसा कुठलाही सखोल अभ्यास नाही. मात्र AI मध्ये आज जो माझा एक मित्र अमेरिकेत प्रत्यक्षात काम करतो त्याच्याशी जेव्हा बोलणे होत असते तो एक मुद्दा सतत मांडतो. तो असा की AI संदर्भात त्याची costing हा सर्वात मोठा अडथळा आज तरी आहे. त्याला लागणारा खर्च आणि मिळणारा परिणाम यात आज तरी मोठी gap आहे. अर्थात हे व्यापक एकूण overall AI industry संदर्भातील त्याचे निरीक्षण/ मत आहे. कुठल्याही particular AI च्या वापराबाबत किंवा टूल बाबत नाही.
2
मी स्वतः एक लहान शुद्ध ट्रेडर आहे अर्थात हा माझा मुख्य व्यवसाय नाही. ( शुद्ध शाकाहारी च्या धर्तीवर मी गुंतवणूकदारं नाही) तर पुन्हा माझ्या मर्यादित अनुभवानुसार AI किमान शुद्ध ट्रेडिंग मध्ये "फारसे" उपयोगाचे मला तरी आढळलेले नाही. अर्थात यात माझीही मर्यादा असेल. पण तरीही माझा भारतातील काही उत्कृष्ठ शुद्ध ट्रेडर्स शी संबंध आला त्यातील अनेकांनी या मताला दुजोरा दिला. अर्थात पुन्हा हा डाटा पुन्हा मर्यादित आहे. Fundamental analysis त्यातील मुख्यतः सांख्यिकी आणि clearly defined data मुळे उपयुक्त नक्कीच असावे.
21 Sep 2025 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वाह ! मटा च्या लेखाबद्दल अभिनंदन.सध्या सर्वत्र बोलबाला आहे तो, ए०आय० बद्दल. शहर ते खेडे सर्वच ए०आय० बद्दल बोलतात. आपण शेयर बाजाराच्या समभागाच्या विश्लेषणासाठी त्याचा वापर केला आणि त्याचा आपणास फायदा झाला.. व्यक्तिगत शेयर बाजाराच्या अशा विश्लेषणाचा किती फायदा होत असेल हे निश्चित सांगू शकत नाही.. शेयर बाजार नुसता विश्लेषणावर चालत नाही तर त्यावर परिणाम करणारे विविध घटक असतात, त्यामुळे अचानक उसळी घेतलेली शेयर क्षणार्धात जमिनीवर येतात या अनपेक्षित घटनांचे अचूक विश्लेषण कसे करू शकेल असा प्रश्न पडतो.
अर्थात आपण त्यातील जाणकार आहात आपल्या लेखनाचा AI च्या वापराचा फायद्याबद्दल पुढील काळात अजुन लिहिते राहालच. लेखाबादल अभिनंदन.
ता.क. अल्बेनियातील मंत्रीमंडळात स्थान मिलवलेल्या AI अर्थात बॉटचा उपयोग भविष्यात त्याची उपयोगिता लक्षात येईल.
-दिलीप बिरुटे
21 Sep 2025 - 2:00 pm | कानडाऊ योगेशु
ए.आय मुळे ज्ञान हे बर्याच प्रमाणात मुक्त होईल. जात पात आधारीत कौशल्ये/ज्ञान ह्याची मक्तेदारी कधीच इतिहास जमा झालेत पण त्याची जागा शैक्षणिक पात्रतेने घेतली होती इथेही अडचण ही आहे कि एखाद्याला तशी इच्छा वा पोटेन्शियल असेल तरी विशिष्ठ पात्रता अर्हित केल्याशिवाय तत्सम शिक्षण मिळणे दुरापास्त होते. उदा.अ ही व्यक्ती कविता करते व त्याला त्याच्या कवितांना संगीत द्यायची इच्छा आहे. आतापावेतो अ लाएखाद्या संगीतकार/गायकाला गाठावे लागत होते त्याची फिज द्यावी लागत होती पण ए.आय ने ही कविता ते गाणे ही मधली गॅपच भरुन काढली आहे. संगीत निर्माण करुन देणारे एखादे ए. आय . टूल हे काम अगदी मिनिटात करुन देते. आता इथे ह्या म्युझिशियन गायक वगैरेंचे गरज तशी संपल्याचे भासते पण त्याच वेळी प्रचंड प्रमाणात जे हौशी नवशे गवशे अश्या टूल चा वापर करुन ह्याच संगीतकार गायकांकडुन ही गाणे फाईन ट्युन करु शकतात.
21 Sep 2025 - 2:30 pm | कंजूस
लेखाबद्दल अभिनंदन.
एआइ म्हणजे "दुसऱ्याचे बघायचे वाकून" इंटरनेट आणि माहितीचा खजिना यांचा वापर करून.
तुमच्या शेअर गुंतवणुकीचे उदाहरण घेऊ. बाजारात कुणी कुणी या गुंतवणुकीतून किंवा गुंतवणुकीची उलाढाल/ एक प्रकारची धरसोड करून त्याची संपत्ती वाढवत आहे. त्याची युक्ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. पण ती कळणार कशी? एआइ तिथे येऊन कोणत्यातरी प्रकारे ती माहिती मिळवून आपल्याला देईल अशी आशा ठेवणे.
उदाहरण दुसरे. उद्योग मासे पकडणे.
आपल्या गावात/तालुक्यात/..... कुणीतरी मासे पकडतोय आणि त्याला खूप मासे मिळत आहेत पण आपल्याला मिळत नाहीत. मग आपण काय करतो? चवकशा करतो कोण कुठे कधी मासे पकडतो. त्यांचे अनुकरण करतो. एआइ अशी माहिती ठिकठिकाणाहून मिळते का तपासतो आणि आपल्याला आणून देतो.
अशी माहिती कुठून मिळते? ज्यांना असे करायचे माहीत आहे ते लोक आपल्याकडील माहिती निरिच्छपणे जालावर ओतत आहेत. त्यांनी ते केलेच नाही तर एआइ बंद पडेल.
21 Sep 2025 - 3:30 pm | युयुत्सु
प्रतिसादांबद्दल धन्यवाद! थोडा व्यस्त असल्याने मोकळा झालो की उत्तर देतो. त्यात मोदींच्या भाषणाची उत्सुकता आहेच...
21 Sep 2025 - 11:44 pm | गामा पैलवान
युयुत्सु,
लेख चांगला जमलाय. तुम्ही बरेच परिश्रम घेऊन लिहिता ( कृबु वापरून वा अन्यथा ) याचं कौतुक आहे.
एक शंका आहे. तुम्ही म्हणता की :
यांतनं एक प्रश्न उपस्थित होतो. समजा मी तुमच्या माहितीचा ग्राहक आहे. माहितीचा ओघ तुमच्याकडून माझ्याकडे वाहतोय. तुम्ही कृबु वापरून काही माहिती गोळा केली व मला दिली. ती माहिती आता मी वाचणार. यांत तुमचा मेंदू कमी काळ व्यग्र ( = एंगेज्ड ) होता. कारण की कृबुने तुमच्या कामाचा बराचसा भार उचलला. पण मला मात्र पूर्ण लक्ष देऊन माहिती वाचावी लागणार. माझा मेंदू पूर्णवेळ व्यग्र राहणार.
हे थोडं अस्थायी वाटंत नाही का ? हा एक प्रकारचा अन्याय आहे.
हाच प्रश्न मी माझ्या एका मित्रास विचारला. तो म्हणाला की 'बिनडोक' माहितीचा वापर 'डोक्याने' करावा लागेल असं स्वप्नांतही वाटलं नव्हतं. कुठे नेऊन ठेवलंय हे जग माझं. मी म्हंटलं की कृबुने 'बिनडोक' या शब्दाची व्याख्याच बदलून टाकलीये. हीच मोठी प्रगती नव्हे काय? मग आम्ही दोघेही जोरजोरात हसू लागलो.
बाकी, विनोदाचा भाग वगळता यावर पुढे काही चर्चा करता येईल काय?
आ.न.,
-गा.पै.
अवांतर :
विट्जेनस्टेईन ( = विज्जेनस्टेईन ) चं नाव जरा सांभाळून घ्या बरंका. मी तुमच्या ज्ञान वा समज यावर भाष्य करीत नाहीये. ही फक्त एक धोक्याची सूचना समजा. माझा हा संदेश आठवला : https://www.misalpav.com/comment/1178078#comment-1178078
22 Sep 2025 - 11:02 am | युयुत्सु
श्री मारवा आणि प्रा० बिरूटे
ए०आय० ची व्यक्तीगत अनुभूती हत्ती आणि आंधळे या गोष्टीसारखी आहे.
तरीपण वेगवेगळ्या अभ्यासानुसार लिखाण, कोडींग, सल्लामसलत, ग्राहकसेवा, उत्पादनक्षेत्र इ० मध्ये ए०आय०ने नि:संशय रचनात्मक योगदान दिले आहे.
जिथे ए०आय०चे प्रयोग फसले आहेत तिथे अवास्तव अपेक्षा, दर्जाहीन एकत्रीकरण, विस्कळीत गुंतवणूक अशी कारणे दिली जातात. प्रत्यक्षात व्यक्तीगत पातळीवर ए०आय० बराच उपकारक ठरला आहे आणि आस्थापनांच्या पातळीवर अजुनही लोक धडपडत आहेत (https://explodingtopics.com/blog/ai-statistics)
बाकी ट्रेडींग मध्ये म्हणाल तर माझ्या अनुभवावरून इतकंच सांगू शकेन की मॉडेल्स वरचेवर ट्य़ून करावी लागतात. कधीकधी पूर्णपणे टाकून द्यावी लागतात.
प्रा० बिरूटे - तुमचा मूळ मुद्दा मला मान्य आहे - एखाद्या कंपनीची पायाभूत कामगिरी चांगली आहे. म्हणून तो शेअर बाजारात चालतोच असं नाही. याचा अनुभव मी पण घेतला आहे. तरी पण आंधळेपणाने गुंतवणूक करायची की डोळसपणे, हे निश्चित ठरवून मग उडी मारणे केव्हाही चांगले.
कंजूस आणि कानडाऊ योगेशु
ए०आय० ची रीझनिंगची क्षमता वेगाने वाढली असल्याने, नुसती माहिती गोळा करून ए० आय० थांबत नाही तर त्यात सुसंगती/विसंगती शोधुन ती सादर केली जाते. याचा संशोधनात होणारा उपयोग अनन्यसाधारण आहे. या रीझनिंगची क्षमतेकडे अजुनही गंभीरपणे बघितले जात नाही असे मला वाटते.
गा०पै०
माहितीचा प्रपात त्रासदायक होत असेल तर माहितीचा सारांश काढायला पण ए०आय० तत्परतेने मदत करतो. विज्जेन्स्टाईनबद्दल म्हणाल तर- तुम्ही ज्याला शेंदूर लावला आहे, तो माझ्यासाठी देव असेलच असं नाही.
22 Sep 2025 - 11:56 am | कंजूस
माझा रोख ऐआइच्या स्रोताबद्दल आहे, तो किती जलद आणि तारतम्य पद्धतीने काम करतो याच्या साशंकतेबद्दल नाही.
जर मूळ माहिती इंटरनेटवर आणून टाकली गेली नाही तर एआइ लंगडे पडते. काही माहिती छापील पुस्तकांत असते व कॉपीराइट बंधनामुळे एआइला ती मिळवायला कमितकमी आणखी साठ वर्षे थांबावे लागेल.
22 Sep 2025 - 12:11 pm | युयुत्सु
ओके.मुद्दा समजला!
22 Sep 2025 - 11:13 am | युयुत्सु
माझ्या लेखाच्या निमित्ताने आणखी एक अस्सल आणि ताजा अनुभव-
हा लेख लिहित असताना नेट वर एक बातमी झळकली. Integrated Industries या पेनी स्टॉकने पाच वर्षात १ लाखाचे ८ कोटी केले (https://www.livemint.com/market/stock-market-news/003-to-24-15-multibagg...)
साहजिकच माझे कान टवकारले गेले. मी पेनी स्टॉकच्या वाटेला सहसा जात नाही.
मग ग्रोकला लेखात लिहील्या प्रमाणे ’ग्रोथ प्रॉस्पेक्ट’ बद्दल विचारले, तेव्हा त्याने विस्तृत चर्चा करून ७/१० मार्क दिले. म्हणून मी लगेच थोडी खरेदी केली (१७ सप्टेंबर). आज हा स्टॉक २५ % वर आहे.
ए०आय० चिरायु होवो!
कृपया हा गुंतवणूक सल्ला नाही याची नोंद घ्यावी. आंधळेपणे शेअरबाजरात व्यवहार करणे धोक्याचे आहे. आपला अभ्यास पुरेसा नसेल तर मान्यताप्राप्त गुंतवणूक तज्ञांचाच सल्ला घ्यावा.
22 Sep 2025 - 12:45 pm | गवि
हम्म...
23 Sep 2025 - 7:41 am | कंजूस
इथे म्हणजे शेअर मार्केट बद्दल एआइ ठीक आहे.
बाजाराचा कल, चढ उतार यांचे इकडे उपलब्ध असतात त्यांचा वापर करून एआइ इतर सल्लागार सल्ला देतात तसे काम करते.
23 Sep 2025 - 10:49 am | सुबोध खरे
ए आय एवढं उत्तम असेल बाजाराच्या कलाबद्दल तर ते वापरणारे आता पर्यंत अब्जाधीश झाले असते.
उदा. दरमहा १० % चक्रवाढ व्याजाने पैसे मिळवणारे.
पण तसं होताना दिसत नाही.
मी पण माझ्या वैद्यकीय कामात ए आय वापरतो. माझ्या अल्ट्रासाउंड यंत्रात ए आय आणि मशीन लर्निंग आहे. त्याने काम सोपे होते. परंतु त्याला एक मर्यादा आहे.
दुर्दैवाने माणूस म्हणजे असेम्ब्ली लाईन मधून काढलेले एक उत्पादन नाही. त्यामुळे एका माणसाचा एक अवयव दुसऱ्या माणसात यंत्रासारखा सहज बसवता येत नाहीच. त्यामुळे काही माणसांमध्ये आढळणारे आडाखे इतर माणसांत बरोबर लागू होत नाहीत.
आपल्यापैकी प्रत्येक माणूस हा एकमेव आणि अद्वितीय आहे.
शिवाय जेवढे ज्ञान जालावर उपलब्ध आहे. त्याचे सार फक्त सगळे ए आय देऊ शकतात.
प्रत्यक्ष वापरात त्याचा भरपूर फायदा होईलच असे नाही.
एके काळी संगणक आला तेंव्हा वैद्यकीय व्यवसाय उताराला लागेल असे दर्पोक्तीने सांगणारे संगणक अभियंते आजही मी पाहतो आहे. जसं वय वाढतं आहे तसे ते स्वतःच्या शरीराबद्दल संगणकाऐवजी जिवंत डॉक्टरच्या सल्ल्याने जाताना दिसतात.
23 Sep 2025 - 12:18 pm | गवि
तुम्ही म्हणता ते आज शंभर टक्के खरं आहे. एआय मनुष्याला रिप्लेस करू शकत नाही. पण हे अतिशय उच्च अनुभवी तज्ज्ञ आणि दुसऱ्या टोकाला अगदी शारीरिक श्रमाचे काम करणारे लेबर यांनाच अधिक लागू होते. मधला एक वर्ग आहे. बैठे कार्यालयीन काम करणारा, हिशोब, लिखापढी, कायदेशीर कागदपत्रे, किंवा मग चित्रे, लोगो, आर्ट वर्क (खास करून कमी किंवा मध्यम बजेटवाल्या कंपन्यांसाठी) करून देणारे छोटे कलाकार, संगीतकार, ललित किंवा अन्य लेखक या सर्व बुद्धिजीवी वर्गावर मात्र एआयच्या रूपात कुऱ्हाड पडत चालली आणि पुढेमागे तिची धार कमी होईपर्यंत एक दोन पिढ्या ती कापून काढणार हे स्पष्ट आहे.
अगदी वैद्यकीय क्षेत्रात देखील.. आत्ता तुम्ही म्हणता ते योग्य आहे. पण पुढचे सांगता येत नाही. तो खूप वेगाने अंतर कमी करतो आहे. अधिक डेटा, अधिक वापर, अधिक ट्रेनिंग, अधिक प्रगल्भता असं यापुढचं एआयचं रुप असेल. काहींना उपकारक, काहींना भयावह..
23 Sep 2025 - 12:39 pm | युयुत्सु
श्री० गवि
तो खूप वेगाने अंतर कमी करतो आहे.
या वास्तवाचे आकलन सर्व पातळ्यावर होत नाहीये, ही दूर्दैवाची गोष्ट आहे. मानवी सल्ला आणि एआय चा सल्ला यातील दोष आणि बलस्थानं ज्यांना समजतील तेच यापुढे यशस्वी ठरतील. मानवी सल्ला पैसे टाकूनही "प्रामाणिक"पणे दिला जाईल असे सध्याच्या दिवसात वाटत नाही. तो केवळ नशीबाचा भाग बनला आहे. ए०आय० चुकू शकतो पण "स्वतःच्या फायद्यासाठी" तरी चुकीचे सल्ले देणार नाही. हा मोठ्ठा फरक लोकांना कळेल, तेव्हा मी ११ (कदाचित १११) सत्यनारायण घालेन.
परवा एका अर्थतज्ञाचे एच्१बीवरील निर्बंधांविषयी विश्लेषण ऐकले - ए०आय० वरील भरवशामुळे एच्१बी वाल्यांना लत्ताप्रदान केले गेले आहे, असा एकंदर सदर अर्थतज्ञाचा सूर होता आणि ते मला पुर्ण पटले.
23 Sep 2025 - 1:24 pm | गवि
स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे पण करवित्याच्या फायद्यासाठी नक्कीच चुकीचे सल्ले देऊ शकतो.. नव्हे देतोही. याविरुद्ध जगभरात वेगवेगळी एथिकल एआय फ्रेमवर्क्स येत आहेत. माझे कार्यक्षेत्र सध्या याच संबंधात केंद्रित असल्याने मॉडेल डिसेप्शन, नॉन बायस, ट्रान्स्परंसी, ट्रस्ट हे अत्यंत महत्वाचे शब्द बनले आहेत.
जे दोष मानवात आहेत ते एआय मध्ये येणारच. ते टाळण्यासाठी अधिकच जास्त कडक कायदे येणार आणि येत आहेत. पण ते अंमलात आणणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. त्यामुळे एआय निष्पक्ष, प्रामाणिक उत्तरे देईल असे मानणे भाबडेपणा ठरेल.
अर्थात तुमचा मुख्य मुद्दा योग्यच आहे.
23 Sep 2025 - 2:39 pm | अभ्या..
बैठे कार्यालयीन काम करणारा, हिशोब, लिखापढी, कायदेशीर कागदपत्रे, किंवा मग चित्रे, लोगो, आर्ट वर्क (खास करून कमी किंवा मध्यम बजेटवाल्या कंपन्यांसाठी) करून देणारे छोटे कलाकार, संगीतकार, ललित किंवा अन्य लेखक या सर्व बुद्धिजीवी वर्गावर मात्र एआयच्या रूपात कुऱ्हाड पडत चालली आणि पुढेमागे तिची धार कमी होईपर्यंत एक दोन पिढ्या ती कापून काढणार हे स्पष्ट आहे.
ह्यातली कुर्हाड एआय असली तरी चालवणारे जे हात आहेत त्यांच्याकडे अजून एक जस्टिफिकेशन आहे. "अमुकतमुक गोष्टीला इतके पैसे सांगत होतात ना तुम्ही, इ त का वेळ लागेल म्हणून ताणत होतात तुम्ही, तुम्हाला जमणारच नाही ह्या थाटात होतात ना तुम्ही, बघा आता तेच काम एआय वापरुन फुकटात केले मी. एआय वापरुन दोन मिनिटात केले मी, एआय वापरुन घरबसल्या केले मी."
हे 'मी' केले म्हणणार्यां सुमारांची सद्दी एआय संपवेल तेंव्हा परत बॅक टू बेसिक्स काय?
का "एआय प्लीज खाजवशील काय?"
23 Sep 2025 - 3:06 pm | गवि
अधिकाधिक खोल जाणाऱ्या मुद्द्याला हात घातलास.
खूप आहे यात लिहिण्यासारखे आणि विचार करण्यासारखे.
मी केले म्हणा किंवा करून घेतले म्हणा.. हा मुद्दा फार मोठा ठरणार नाही दीर्घकाळात.
पण शेवटी मूल्य नावाची गोष्ट चिरंतन आहे. सर्वांनाच एखादी गोष्ट घरबसल्या, दोन मिनिटांत, जागच्याजागी, .. आणि जवळपास फुकट, साध्य होऊ लागली की कोणत्याही पदार्थाचे सोने करणारा परीस सापडला तर सोन्याची जी अवस्था होईल तीच या सर्व कलांची होईल यात शंकाच नाही. कचरा वाढत चालला आहे. कोणतेही तंत्रज्ञान दीर्घकाळ सर्वांना फुकट देणे कोणालाच शक्य नाही. जेव्हा त्याची खरी किंमत मोजावी लागेल तेव्हा या सुमारांची सद्दी खाडकन संपेल.
शिवाय त्या तंत्रज्ञानाला हवे तसे वाकवू शकणे हेही शक्य आहेच. त्यातून विश्वासार्हता हेही मूल्य जेव्हा ढासळायला लागेल तेव्हा आपोआप कंट्रोल येईल. निवडक आणि दर्जेदार या विशेषणांना आत्तापेक्षा अधिक "मूल्य" येईल. हे सर्व कोणत्याही कायद्यांनी नव्हे तर बाजाराच्या नियमांनी घडेल.
23 Sep 2025 - 3:13 pm | अभ्या..
कोणत्याही पदार्थाचे सोने करणारा परीस सापडला तर सोन्याची जी अवस्था होईल तीच या सर्व कलांची होईल यात शंकाच नाही.
नाही गविराज,
सगळेच सोन्याचे झाल्यानंतर (आयवील लव धिस मोमेंट यू नो) परिसाची किंमत काय ह्याचा विचार करा.
सोने मुबलक झाले तरी ते सोने आहे, परीस हा त्यानंतर फक्त दगड आहे.
23 Sep 2025 - 3:19 pm | अभ्या..
म्हणून अजूनही वाटते की काय सोन्याचे करायचे (किंवा सोन्याचे काय करायचे) ते कळणारा ईंटेलिजन्स तो ट्रु इंटेलिजन्स.
23 Sep 2025 - 3:43 pm | गवि
दोन्हीची किंमत एकामागून एक घसरत शून्याकडे जाणे अटळ.
23 Sep 2025 - 3:48 pm | गवि
अर्थात यामागे असे (कदाचित चुकीचे) गृहीतक आहे की परीस सहज उपलब्ध आहे किंवा सहज स्वस्तात मोठ्या स्केलवर बनवता येतोय.
एरवी परिसाचे निर्माते एकत्र येऊन कधी ना कधी तो दुर्मिळच कसा राहील हे किंमतीच्या किंवा तुटवड्याच्या मार्गाने सुनिश्चित करतील ही जास्त शक्यता. सर्वकाही फिरून पुन्हा तिथेच येते. मूल्य नसेल तर कशाला काही दीर्घकालीन अस्तित्व नाही.
23 Sep 2025 - 3:59 pm | अभ्या..
मूल्य नसेल तर कशाला काही दीर्घकालीन अस्तित्व नाही.
अॅक्चुअली.
एक मस्त केस स्टडी आहे, आपल्याच पुण्या मुंबईच्या मध्ये घडलेली.
राजा रविवर्म्याने मळवलीला स्टुडिओ टाकला. स्टुडिओ म्हणा प्रिंटिंग प्रेस म्हणा, नाव त्याचे चित्रशाळा.
त्यासाठी पैसा वापरला तो मोठमोठ्या राजा रजवाड्यांची चित्रे रंगवून मिळालेला.
चित्रे हिंदू देवतांची प्रामुख्याने,
सुरुवातीला व्हिज्युलाईज करणार रविवर्मा,
मॉडेल्स घेणार भारतीयच.
रंगवणार तोच.
रिप्रॉडक्शन साठी त्याचे आर्टवर्क बनवणार तोच.
ते घेऊन त्याच्या प्रती छापणार जर्मन्स.
विकणार सगळ्या हिंदुस्थानात.
घेणार सगळी गरीब जनता ज्यांना रविवर्म्यासारख्याच थोर चित्रकरांची चित्रे विकत घेणे परवडत नव्हते.
रविवर्म्यावर केस पडली अश्लीलता आणि नग्नतेच्या दर्शनाची.
.
आता पूर्ण ह्या सगळ्यात कीती, कोणती मूल्ये आणि ती कशी पणास लागली बघा....
24 Sep 2025 - 11:29 am | मारवा
आता पूर्ण ह्या सगळ्यात कीती, कोणती मूल्ये आणि ती कशी पणास लागली बघा....
यातून तुम्हाला काय सुचवायचे आहे ?
यात तर मला सरळ अर्थशास्त्र दिसत आहे . कुठली मूल्ये पणाला लागली या मध्ये नेमकी ?
24 Sep 2025 - 3:59 pm | अभ्या..
यात तर मला सरळ अर्थशास्त्र दिसत आहे
धन्यवाद.
कळावे
24 Sep 2025 - 8:44 pm | मारवा
जाता जाता
"When art critics get together they talk about Form and Structure and Meaning. When artists get together they talk about where you can buy cheap turpentine"
Pablo Picasso
23 Sep 2025 - 10:04 pm | सोत्रि
AI च्या फारच वरवरच्या माहितीवरून असं म्त झालेलं असू शकतं. AI चा आवाका फक्त सार देणं ह्याच्या फार पलिकडे गेला आहे आणि प्रचंड वेगाने तो घातांकीय (exponential) वेगाने वाढतो आहे.
BlackRock ही बलाढ्य investment company AI प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरते, बाजाराचे कल, 'सेंटीमेंट अॅनालिसीस' वापरून, शोधून त्यानुसार Event Detection करू शकते.
चॅटजीपीटीला खालिल प्रश्न विचारा,
How does BlackRock use AI models for trading?
- (AI समर्थक) सोकाजी
24 Sep 2025 - 9:24 am | सुबोध खरे
एक ४५ वर्षाचा निरोगी माणूस निम सरकारी नोकरीत आहे त्याचा पगार ५०,००० आहे पण त्याला निवृत्तीवेतन नाही तर त्याला ६० वर्षानंतर दरमहा किती रुपये लागू शकतील?
या सरळ सध्या दिसणाऱ्या प्रश्नाचे सरळ उत्तर ए आय देऊ शकेल का? सध्या तरी नक्कीच नाही.
भविष्यात - कदाचित हो.
मानवी आयुष्य हे गणित नाही त्याचे अनेक पैलू आहेत.
तीस वर्षांपूर्वी संगणकाबद्दल छातीठोक पणे बोलणाऱ्या संगणक अभियंत्यांसारखेच सध्याचे ए आय चे समर्थक बोलत आहेत.
तेंव्हा चालू द्या
24 Sep 2025 - 9:31 am | गवि
ए आय नेमके यासाठी आहे. आत्ता तपशीलवार लिहिणं जमणार नाही. म्हणून इतकेच.
तुम्ही विचारलाय तशा प्रश्नाचं उत्तर इन फॅक्ट एआयच अधिक चांगले देईल. त्याच्याकडे असे खूप खूप "पैलू" नोंदवून त्यांना योग्य ते वेटेज देण्याचे सामर्थ्य आहे. अगदी लक्षावधी पैलू आणि असंख्य मिती.
24 Sep 2025 - 9:50 am | सुबोध खरे
गवि साहेब
मी ए आय चा विरोधक मुळीच नाही उलट त्याचा अभ्यासक, ग्राहक आणि समर्थकसुद्धा आहे.
माझ्या स्वतःच्या क्षेत्रात याचा आम्ही फार मोठा उपयोग करून घेतो आहोत.
रेडिओलॉजी हा विषय सर्वात आधुनिक (१८९५ मध्ये क्ष किरणांचा शोध लागेपर्यंत हा विषय अस्तित्वातच नव्हता) संगणकाचा सर्वात प्रथम आणि सर्वात जास्त उपयोग करून घेणारा आहे.
तसेच या विषयाचे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आहे.
परंतु ज्या तर्हेने काही लोक सर्व काही ए आय च आहे म्हणतात त्याबद्दल आश्चर्य वाटते
24 Sep 2025 - 10:01 am | गवि
तुम्ही विरोधक आहात असे माझेही मत नाहीच..
आणि मी देखील खास समर्थक आहे असेही नव्हे.
:-)
24 Sep 2025 - 10:38 am | युयुत्सु
श्री० खरे यांनी विचारलेला प्रश्न किंचित सुधारणा करून विचारला -
एक ४५ वर्षाच्या निरोगी माणसाचा वर्तमान मासिक पगार ५०,००० रुपये आहे आणि त्याला निवृत्तीवेतन (पेन्शन) नाही. प्रश्न हा आहे की वयाच्या ६० वर्षानंतर (म्हणजे निवृत्तीनंतर) चे आयुष्याचे प्लॅनिंग करण्यासाठी कोणते घटक विचारात घेतले पाहिजेत? मला शक्य तेव्हढी मोठी प्रश्नावली दे.
यावर मिळालेले उत्तर असे (मराठीच्या चुका काढू नयेत) -
### निवृत्ती नियोजनासाठी विचार करण्याचे घटक: विस्तृत प्रश्नावली
तुमच्या प्रश्नानुसार, ४५ वर्षांच्या निरोगी व्यक्तीला (मासिक पगार ५०,००० रुपये, पेन्शन नाही) वयाच्या ६० वर्षानंतरच्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी विविध घटक विचारात घ्यावे लागतात. हे घटक वित्तीय, आरोग्य, कुटुंबीय, जीवनशैली, जोखीम, महागाई इत्यादींशी संबंधित आहेत. मी शक्य तितकी मोठी आणि विस्तृत प्रश्नावली तयार केली आहे, जी तुम्हाला स्वतःचे मूल्यमापन करण्यास मदत करेल. ही प्रश्नावली विविध श्रेणींमध्ये विभागली आहे, जेणेकरून प्रत्येक घटक स्पष्ट होईल. ही प्रश्नावली भारतातील निवृत्ती नियोजनाच्या अभ्यासांवर आधारित आहे, जसे की डेमोग्राफिक फॅक्टर्स, वित्तीय साक्षरता, जोखीम सहनशीलता, बचत सवयी, आरोग्य खर्च आणि सरकारी योजना.
प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना, तुम्ही तुमची सद्य स्थिती, उद्दिष्टे आणि जोखीम विचारात घ्या. ही प्रश्नावली १००+ प्रश्नांची आहे, जेणेकरून ती शक्य तितकी मोठी आणि सर्वसमावेशक होईल. उत्तरांवर आधारित, तुम्ही वित्तीय सल्लागाराशी चर्चा करू शकता.
#### १. वैयक्तिक आणि डेमोग्राफिक घटक (Demographic Factors)
हे घटक तुमच्या वय, शिक्षण, उत्पन्न आणि कुटुंबावर आधारित आहेत, जे निवृत्ती नियोजनावर प्रभाव टाकतात.
1. तुमचे सध्याचे वय किती आहे? (उदा., ४०-५०, ५०-६०)
2. तुमचे लिंग काय आहे? (पुरुष/स्त्री/इतर)
3. तुमचे वैवाहिक स्थिती काय आहे? (विवाहित/अविवाहित/घटस्फोटित/विधवा)
4. तुमचे शिक्षणाचा उच्चतम स्तर काय आहे? (उदा., हायस्कूल, पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट)
5. तुमचे शिक्षणाचे विशेषज्ञता काय आहे? (उदा., कॉमर्स/व्यवसाय, विज्ञान, कला, इतर)
6. तुमचे सध्याचे व्यावसायिक स्थिती काय आहे? (वेतनधारी, व्यावसायिक, स्वयंरोजगारित, इतर)
7. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे? (उदा., २.५ लाखांपेक्षा कमी, २.५-५ लाख, ५-१० लाख, १० लाखांपेक्षा जास्त)
8. तुमच्यावर किती आर्थिक अवलंबित व्यक्ती आहेत? (उदा., मुले, वृद्ध आई-वडील; संख्या: ०, १-३, ४ किंवा जास्त)
9. तुम्ही शहरी किंवा ग्रामीण भागात राहता का?
10. तुमचे घराणे किती सदस्यांचे आहे, आणि गेल्या १० वर्षांत त्यात काय बदल झाले आहेत?
11. तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करता का? (ऑर्गनाइज्ड/अनऑर्गनाइज्ड सेक्टर)
12. तुम्ही किती वर्षांपासून काम करत आहात?
13. तुम्ही कधी विदेशात काम केले आहे का, आणि त्याचा तुमच्या निवृत्तीवर कसा प्रभाव पडेल?
#### २. वित्तीय साक्षरता आणि ज्ञान (Financial Literacy)
वित्तीय ज्ञानाशिवाय नियोजन अशक्य आहे; हे घटक तुमच्या माहितीवर आधारित आहेत.
14. तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट (चक्रवाढ व्याज) आणि त्याचा बचतीवर कसा प्रभाव पडतो हे समजते का? (हो/नाही)
15. महागाई (इन्फ्लेशन) पैशाच्या मूल्यावर कसा प्रभाव टाकते हे तुम्हाला माहित आहे का? (हो/नाही)
16. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी (पैशाचे वेळेनुसार मूल्य) आणि त्याचे निवृत्ती नियोजनातील महत्व तुम्हाला माहित आहे का? (हो/नाही)
17. विविध गुंतवणूक पर्याय (उदा., शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स) आणि त्यांचे जोखीम व परतावा तुम्हाला माहित आहेत का? (हो/नाही)
18. गुंतवणुकीत विविधता (डायवर्सिफिकेशन) जोखीम कमी करण्यासाठी कशी मदत करते हे तुम्हाला माहित आहे का? (हो/नाही)
19. तुम्ही कधी वित्तीय सल्लागाराकडून सल्ला घेतला आहे का? (हो/नाही; हो असल्यास, कोणाकडून?)
20. तुम्ही वित्तीय साक्षरता कार्यशाळा किंवा सेमिनारमध्ये भाग घेतला आहे का? (हो/नाही; हो असल्यास, किती उपयुक्त होते?)
21. तुम्हाला सरकारी योजना जसे NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम), APY (अटल पेन्शन योजना), PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) यांच्याबद्दल माहित आहे का? (हो/नाही)
22. तुम्ही स्वतः वित्तीय योजना बनवण्यात किती आत्मविश्वास बाळगता? (खूप, काहीसे, तटस्थ, नाही, पूर्णपणे नाही)
23. तुम्ही वित्तीय उत्पादनांची वेबसाइट्स किंवा ब्रोकर्सद्वारे गुंतवणूक कशी करावी हे समजता का? (हो/नाही)
24. तुम्ही तुमच्या वित्तीय ज्ञानाचे स्व-मूल्यमापन कसे कराल? (१-५ स्केलवर, १=कमी, ५=उच्च)
25. तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म्स (उदा., अॅप्स, ऑनलाइन टूल्स) वापरून निवृत्ती नियोजन करता का? (हो/नाही)
#### ३. जोखीम सहनशीलता आणि दृष्टिकोन (Financial Risk Tolerance and Attitude Towards Retirement)
जोखीम घेण्याची क्षमता आणि निवृत्तीबद्दलचा दृष्टिकोन नियोजनावर प्रभाव टाकतात.
26. तुम्ही उच्च परताव्यासाठी आर्थिक नुकसानाची जोखीम घेण्यास तयार आहात का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत)
27. तुम्ही जोखीमपूर्ण गुंतवणुकीत (उदा., शेअर्स, डेरिव्हेटिव्ह्स) निवृत्ती निधीसाठी गुंतवणूक कराल का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत)
28. तुम्ही सध्याच्या खर्चाला प्रतिबंध घालून निवृत्तीसाठी बचत करू शकता का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत)
29. निवृत्ती नियोजन तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे? (१-५ स्केलवर)
30. तुम्हाला निवृत्तीनंतर आरामदायी जीवनासाठी किती पैशांची गरज पडेल हे स्पष्ट आहे का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत)
31. तुम्ही नवीन गुंतवणूक योजनांचा शोध घेता का ज्या निवृत्ती फायदे देतात? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत)
32. तुमच्याकडे निवृत्तीसाठी बचत योजना आहे का, आणि तुम्ही ती पाळता का? (हो, नाही, कधीकधी)
33. तुम्ही निवृत्ती नियोजनाला प्राधान्य देता का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत)
34. तुम्हाला निवृत्तीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे का? (उदा., उत्साही, चिंतित, तटस्थ)
35. तुम्ही जोखीम टाळण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकी (उदा., फिक्स्ड डिपॉझिट) पसंत करता का? (हो/नाही)
36. महागाई, व्याजदर कमी होणे किंवा कर वाढ याबद्दल तुम्ही किती चिंतित आहात? (१-५ स्केलवर)
37. तुम्ही अॅन्युइटी (जीवनभर उत्पन्न देणारी योजना) खरेदी करण्यास इच्छुक आहात का? (हो/नाही; हो असल्यास, किती टक्के संपत्ती?)
#### ४. बचत आणि गुंतवणूक सवयी (Savings and Investment Habits)
बचत ही निवृत्तीची आधारभूत आहे, विशेषतः पेन्शन नसताना.
38. तुम्ही महिन्याच्या उत्पन्नाचा किती टक्के बचत करता? (उदा., १०%, २०%, ३०%+)
39. तुमची बचत मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी आहे? (निवृत्ती, आपत्कालीन फंड, शिक्षण, इतर)
40. तुमच्याकडे विशिष्ट निवृत्ती बचत खाते आहे का? (हो/नाही; हो असल्यास, कोणते?)
41. तुम्ही कोणत्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करता? (उदा., म्युच्युअल फंड्स, फिक्स्ड डिपॉझिट, इन्शुरन्स, रिअल इस्टेट, शेअर्स, PPF, NPS, इतर)
42. तुम्ही वार्षिक किती रक्कम निवृत्तीसाठी बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
43. तुम्ही निवृत्ती वय कोणते ठरवले आहे, आणि त्यानंतर उत्पन्न कसे मिळेल?
44. तुम्ही सध्या किती बचत केली आहे? (उदा., ५ लाखांपेक्षा कमी, ५-१० लाख, १० लाखांपेक्षा जास्त)
45. तुम्ही बचत सुरू करण्यास उशीर केला आहे का, आणि त्याबद्दल पश्चाताप आहे का? (हो/नाही)
46. तुम्ही तुमच्या बचतीचे वार्षिक तपासणी करता का? (हो/नाही; किती वेळा?)
47. तुम्ही डायवर्सिफाइड पोर्टफोलिओ (विविध गुंतवणुकी) राखता का? (हो/नाही)
48. तुम्ही ऑनलाइन चॅनेल्स (उदा., बँक अॅप्स) द्वारे गुंतवणूक खरेदी करता का? (हो/नाही)
49. तुम्ही फायनान्शियल अॅडवायझर किंवा कुटुंब/मित्रांच्या सल्ल्यावर अवलंबून आहात का? (हो/नाही)
50. तुम्ही सरकारी योजनांमध्ये (उदा., APY, NPS) भाग घेता का? (हो/नाही; हो असल्यास, किती योगदान?)
#### ५. आरोग्य आणि वैद्यकीय घटक (Health and Medical Factors)
आरोग्य खर्च निवृत्ती निधीचा मोठा भाग खातो.
51. तुम्ही सध्या निरोगी आहात का, आणि तुम्हाला कोणते दीर्घकालीन आजार आहेत का? (हो/नाही)
52. निवृत्तीनंतर आरोग्य खर्चासाठी किती निधीची गरज पडेल असे तुम्हाला वाटते?
53. तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का? (हो/नाही; हो असल्यास, किती कव्हरेज?)
54. तुम्ही क्रॉनिक आजार (उदा., डायबिटीज, हृदयरोग) साठी तयारी केली आहे का? (हो/नाही)
55. निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्च सोशल इन्शुरन्सपेक्षा जास्त होतील अशी चिंता आहे का? (हो/नाही)
56. तुम्ही आरोग्य तपासणी नियमित करता का? (हो/नाही; किती वेळा?)
57. तुम्ही निवृत्तीनंतर लाँग-टर्म केअर (उदा., नर्सिंग होम) साठी योजना केली आहे का? (हो/नाही)
58. तुम्ही आरोग्य खर्चासाठी वेगळा फंड तयार करत आहात का? (हो/नाही; किती?)
59. जीवन अपेक्षा (लाइफ एक्स्पेक्टन्सी) किती वर्षांची अंदाजे आहे? (उदा., ७०, ८०, ९०+)
60. तुम्ही व्यायाम, आहार इत्यादींमुळे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करता का? (हो/नाही)
#### ६. कुटुंब आणि सामाजिक समर्थन (Family and Social Support)
कुटुंब समर्थन कमी होत असल्याने हे महत्वाचे आहे.
61. निवृत्तीनंतर तुम्ही कुटुंबावर (उदा., मुले) अवलंबून राहाल का? (हो/नाही)
62. तुमचे कुटुंब जॉइंट किंवा न्यूक्लियर आहे? आणि त्यात बदल होत आहेत का?
63. तुम्ही मुले किंवा कुटुंबाला निवृत्ती निधी देण्याचे विचार करता का? (हो/नाही)
64. तुम्ही निवृत्तीनंतर कुटुंबाजवळ राहण्याची योजना आहे का? (हो/नाही)
65. तुम्ही कम्युनिटी अॅक्टिव्हिटीज किंवा रिटायरमेंट ग्रुप्समध्ये भाग घ्याल का? (हो/नाही)
66. तुम्ही कुटुंबीयांवर आर्थिक भार टाकू नये म्हणून योजना केली आहे का? (हो/नाही)
67. तुम्ही वारसा (इनहेरिटन्स) नियोजन केले आहे का? (हो/नाही; कोणाला देणार?)
68. तुम्ही कुटुंबीयांसोबत निवृत्ती योजनेची चर्चा केली आहे का? (हो/नाही)
#### ७. महागाई, आर्थिक जोखीम आणि अर्थव्यवस्था (Inflation, Economic Risks and Economy)
महागाई आणि बाजारातील बदल निधी कमी करू शकतात.
69. महागाईचा तुमच्या बचतीवर कसा प्रभाव पडेल असे तुम्हाला वाटते? (उच्च, मध्यम, कमी)
70. व्याजदर कमी होण्याची चिंता आहे का? (हो/नाही)
71. कर वाढ किंवा नवीन करांचा प्रभाव कसा पडेल? (उच्च, मध्यम, कमी)
72. आर्थिक अनिश्चितता (उदा., मंदी) साठी तुम्ही तयार आहात का? (हो/नाही)
73. तुम्ही महागाई-समायोजित (inflation-adjusted) उत्पन्नाची योजना केली आहे का? (हो/नाही)
74. बाजारातील उतार-चढाव (मार्केट व्होलॅटिलिटी) साठी तुम्ही कसे तयार आहात?
75. तुम्ही गॅरंटीड उत्पन्न (उदा., फिक्स्ड रिटर्न्स) पसंत करता का? (हो/नाही)
76. तुम्ही कॅपिटल प्रिझर्वेशन (मूळ रक्कम सुरक्षित) साठी प्राधान्य देता का? (हो/नाही)
#### ८. कर आणि कायदेशीर घटक (Tax and Legal Factors)
कर बचत आणि कायदे महत्वाचे आहेत.
77. तुम्ही कर-मुक्त गुंतवणुकी (उदा., PPF, NPS) वापरता का? (हो/नाही)
78. निवृत्तीनंतर कर दायित्व किती असेल असे तुम्हाला वाटते?
79. तुम्ही विल (will) किंवा एस्टेट प्लॅनिंग केली आहे का? (हो/नाही)
80. सरकारी पेन्शन योजनांचे नियम तुम्हाला माहित आहेत का? (हो/नाही)
81. तुम्ही कर सल्लागाराशी चर्चा केली आहे का? (हो/नाही)
82. निवृत्तीनंतर कर वाढण्याची शक्यता किती आहे? (उच्च, मध्यम, कमी)
#### ९. निवृत्ती उद्दिष्टे आणि जीवनशैली (Retirement Goals and Lifestyle)
निवृत्तीनंतरचे जीवन कसे असेल हे ठरवा.
83. निवृत्तीनंतर तुम्ही किती आरामदायी जीवन जगू इच्छिता? (वर्णन करा)
84. तुम्ही निवृत्तीनंतर काम कराल का (पार्ट-टाइम)? (हो/नाही)
85. तुम्ही प्रवास, छंद किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी बजेट ठेवले आहे का? (हो/नाही)
86. तुम्ही निवृत्तीनंतर घर बदलाल का (उदा., छोटे घर)? (हो/नाही)
87. तुम्ही निवृत्ती निधीचा किती टक्का खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे? (उदा., ४% नियम)
88. तुम्ही निवृत्ती फंड गॅप (कमी पडणे) साठी योजना केली आहे का? (हो/नाही)
89. तुम्ही निवृत्ती उद्दिष्टांसाठी लिखित योजना आहे का? (हो/नाही)
90. तुम्ही निवृत्तीनंतर सामाजिक योगदान (उदा., स्वयंसेवा) कराल का? (हो/नाही)
#### १०. इतर घटक आणि मूल्यमापन (Other Factors and Assessment)
91. तुम्ही निवृत्ती नियोजनासाठी AI किंवा टेक टूल्स वापरता का? (हो/नाही)
92. तुम्ही सोशल मीडिया किंवा इन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यावर अवलंबून आहात का? (हो/नाही)
93. तुम्ही ग्रॅट्युइटी (gratuity) किंवा इतर लाभांचा विचार केला आहे का? (हो/नाही)
94. निवृत्तीनंतर उत्पन्न स्रोत कोणते असतील? (उदा., गुंतवणूक, किराया)
95. तुम्ही आपत्कालीन फंड (emergency fund) तयार केला आहे का? (हो/नाही; किती महिन्यांचा?)
96. तुम्ही जीवन विमा किंवा टर्म इन्शुरन्स आहे का? (हो/नाही)
97. तुम्ही निवृत्ती नियोजनातील संघर्ष (उदा., सध्याचा खर्च vs. बचत) कसे हाताळता?
98. तुम्ही तुमच्या योजना वार्षिक अपडेट करता का? (हो/नाही)
99. तुम्हाला निवृत्ती नियोजनातील सर्वात मोठी आव्हान काय वाटते? (खुला प्रश्न)
100. एकूणच, तुम्ही तुमच्या निवृत्ती नियोजनाबद्दल किती समाधानी आहात? (१-५ स्केलवर)
101. तुम्ही रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरून तुमचा फंड अंदाज लावला आहे का? (हो/नाही)
102. तुम्ही क्लायमेट चेंज किंवा पर्यावरणीय बदलांचा निवृत्तीवर प्रभाव विचारात घेतला आहे का? (हो/नाही)
103. तुम्ही निवृत्तीनंतर परदेशात राहण्याची योजना आहे का? (हो/नाही)
104. तुम्ही तुमच्या योजना कुटुंब किंवा सल्लागाराशी शेअर करता का? (हो/नाही)
105. शेवटी, तुम्ही निवृत्ती नियोजन सुरू करण्यासाठी काय बदल कराल? (खुला प्रश्न)
ही प्रश्नावली पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमच्या उत्तरांचे विश्लेषण करू शकता आणि आवश्यकता असल्यास व्यावसायिक मदत घ्या. हे भारतातील अभ्यासांवर आधारित आहे, ज्यात पेन्शन नसलेल्या व्यक्तींसाठी वैयक्तिक बचत आणि योजना महत्वाच्या आहेत. जर अधिक तपशील हवा असेल, तर सांगा!
###########
आता या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देऊन परत प्रश्न विचारून बघितल्या अधिक विश्वासार्ह उत्तरे मिळतील याची मला खात्री आहे.
टीप- या धाग्यावर शांत पणे आनंद घेत भोंडला खेळल्या बद्दल धन्यवाद!
24 Sep 2025 - 10:47 am | सोत्रि
युयुत्सु, तुम्ही उगाच लोड घेत आहात.
खरोखर झोपेत असलेल्याच उठवता येते.
- (जागा असलेला) सोकाजी
24 Sep 2025 - 10:55 am | युयुत्सु
खरोखर झोपेत असलेल्याच उठवता येते.
तुमचा मुद्दा १००००१% बरोबर आहे. अशा लोकांना मी अगोदरच राईट ऑफ केले आहे. पण अशा प्रश्नांमुळे इतर लोकांची दिशाभूल होउ नये म्हणून हा खटाटोप आहे.
24 Sep 2025 - 11:32 am | सुबोध खरे
है शाबास
१०५ व्हेरिएबल्स आणि त्यात प्रत्येकात ३-४ पर्याय म्हटल्यावर १०५ चा तिसरं किंवा चौथा घात इतके प्रचंड पर्याय म्हणजे अक्षरशः लाखो व्हेरिएबलस झाले.
आणि एवढे सर्व व्हेरिएबल्स टाकल्यानंतरही "आवश्यकता असल्यास व्यावसायिक मदत घ्या"
हे आहेच कि.
म्हणूनच म्हटलं
चालू द्या.
24 Sep 2025 - 10:42 am | सोत्रि
क्या रे ये! घोडा चतुर ... घोडा चतुर ...
एक पे रेहना, य तो घोडा बोलो, या चतुर बोलो!
- (ए आय पडोसनचा पडोसी) सोकाजी
24 Sep 2025 - 11:42 am | मारवा
Either or
असा आग्रह कशासाठी.
डॉ खरे स्पष्ट सांगत आहेत की ते ai चे ग्राहक आहेत वापरत आहेत.
त्यांचा आक्षेप कदाचित त्याच्या मर्यादेवर असावा.
माझा आक्षेप मला एखाद्या गोष्टी बद्दल mixed feelings असतील काही भाग आवडत असेल काही अजिबात पटत नसेल तर हरकत काय आहे.
मिश्र भूमिका= दांभिकता
हे समीकरण अतिशय चुकीचे आहे.
24 Sep 2025 - 11:46 am | मारवा
संगणक शाप की वरदान
ही dichotomy अत्यंत चुकीची आणि rigid अशी आहे.
अमुक तमुक शाप की वरदान
या मध्ये आग्रह हा एका बाजूनेच निर्णय घ्या असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात असे कधीच होत नाही
सुरुवात जोडीदारापासून करून बघा
ते ही सोडा अनेक बाबी या मिश्र स्वरूपाच्या असतात.
सोपेकरण करणे ही चांगली बाब असली तरी नेहमी करता येत नाही.
24 Sep 2025 - 8:50 pm | सुबोध खरे
एक उदाहरण देतो आहे
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून फुप्फुसाच्या सिटी स्कॅन मध्ये बारीकशा गाठी ज्या काही वेळेस डोळ्याने स्पष्ट दिसत नाहीत किंवा नजरचुकीने राहून जातात अशा गाठी दिसून येतात. या गाठीचे नंतर विश्लेषण केले जाते.
हे दुधारी शास्त्र आहे.
कारण यात जे कर्करोग मानवी बुद्धिमत्तेला दिसले नाहीत ते दिसून येतात आणि त्याच्या वर उपचार त्वरित होतो.
आता याची दुसरी बाजू अशी आहे कि अनेक गाठी कर्करोगाच्या नसतात ज्या इतर वेळेस मानवी नजरेस पडल्याचं नसत्या.
पण एकदा त्या नजरेस पडल्या कि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक होते. कारण तो कर्करोग आहे का? हे कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा नक्की सांगू शकत नाही
जोवर तुम्ही बायोप्सी करत नाही तोवर त्या गाठी खात्रीने कर्करोगाच्या नाहीतच हे सांगता येत नाही. म्हणजे बायोप्सीचा अहवाल येत नाही ( याला साधारण एक आठवडा लागतो) तोवर रुग्णाचा आणि नातेवाईकांचा जीव टांगणीवर लागतो.
आता तुमच्या फुफुसात सुई घालण्यासाठी प्रथम त्या जागेवर भूल द्यावी लागते. सुई आत गेल्यावर कधी कधी फुप्फुस पंक्चर होते. मग त्याची उस्तवार करावी लागते.
एवढा अव्यापारेषु व्यापार केल्यावर बायोप्सीत ती गाठ धोकादायक नाही हे सिद्ध होते. उलट अशी गाठ शोधली नसती तर बरे झाले असते असे लक्षात येते.
आता यात कृत्रिम बुद्धिमत्ता चांगली कि वाईट?
हे उत्तर ०-१ असे बायनरी नाही.
अशा गाठींना INCIDENTALOMA म्हणतात.
About 30% of all chest computed tomography (CT) scans contain one or more pulmonary nodules.
Even in smokers — those at highest risk for lung cancer — nodules are usually benign; in the National Lung Screening Trial, 96% of all nodules (and 93% of nodules ≥ 6 mm) were benign.https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5809217/
आता तुम्ही सिगरेट पित असलात/ नसलात तर तुम्ही या ४ %( किंवा ७ %) मध्ये आहेत का कि ९६ % हे काही कृत्रिम बुद्धिमत्ता सांगू शकत नाही.
Nodules smaller than 6 mm do not need to be routinely followed up, given that such nodules have been determined to be very low risk. In those nodules that require follow-up, chest CT is usually recommended between 3 and 12 months.
वरील वाक्य सांख्यिकीसाठी उत्तम आहे पण आपल्या फुप्फुसात एक गाठ आहे हा किडा ज्याच्या डोक्यात शिरला आहे त्याला शांत मनाने झोप लागत नाही कि रोजच्या कामात लक्ष लागत नाही. मग तो शेअर बाजारात असो कि बँकेत नोकरी करत असो.
सुदैवाने आपल्याकडे तुम्ही रुग्णालयात जाऊन बायोप्सी करून आपली मन:शांती मिळवू शकता. इंग्लंड सारख्या देशात जोवर डॉकटर ठरवत नाहीत तोवर तुम्हाला पुढचा सिटी स्कॅन करता येत नाही. म्हणजे तुम्ही लटकलात.
ऑब्जेक्टिव्ह विचार करता येतो कि ९६ % हा कर्करोग नाही पण मानवी मनाची चिंता कशी मोजणार.
एक शांत डोह आहे निळेशार पाणी आहे सर्व कसं छान चाललेलं दिसतंय. मध्येच त्या डोहात एक मगर पाण्याखालून वर येते आणि त्या शांततेच्या चिंध्या उडतात अशी स्थिती रुग्णाची होते.
हे कृत्रिम बुद्धिमत्तेला कसे कळेल आणि तिच्याकडून सांत्वनाचे दोन शब्द मिळतील का?
माहिती नाही.
विरहार्त मनाचे स्मित
सरले, गालावर आसू ओघळले-
होता हृदयाची दो शकले
जखमेतुन क्रंदन पाझरले-
घाली फुंकर हलकेच कुणी..
अशी हलकी फुंकर घालायला जवळचा माणूसच लागतो. कृत्रिम बुद्धिमत्ता नाही
असो.
25 Sep 2025 - 8:45 am | युयुत्सु
तिच्याकडून सांत्वनाचे दोन शब्द मिळतील का?
सांत्वन करणारी कृत्रीम बुद्धीमत्ता उपलब्ध आहे.
25 Sep 2025 - 9:53 am | सुबोध खरे
वा!
च्युईंग गम सारखं आहे हे.
कितीही चघळा पोटात काही जात नाही
आणि
काही काळाने स्वादही राहत नाही.
केवळ थुकण्याच्या लायकीचं.
कुणी मोठ्या माणसाने पाठीवरून हात फिरवावा त्याच्या ऐवजी इंग्रजी लकबीने dont worry म्हणण्यासारखं
चालू द्या
25 Sep 2025 - 11:03 am | गणेशा
खरे साहेब यांच्याशी खूप दिवसा नंतर एखाद्या मुद्द्यावर सहमत आहे
24 Sep 2025 - 10:11 am | युयुत्सु
तुम्ही विचारलाय तशा प्रश्नाचं उत्तर इन फॅक्ट एआयच अधिक चांगले देईलज्या
हे ज्यांना समजणार नाही (आणि समजून घ्यायची तयारी आणि कुवत नाही) ते लवकरच आउटडेट होतील. मला बिरबल आणि बादशहाच्या एका गोष्टीची आठवण झाली. बादशहाकडे एक ज्योतिषी आला. बादशहाने त्याची ख्याती ऐकली होती. ज्योतिषी म्हणाला, मी सर्वांचे भूत-भविष्य-वर्तमान जाणतो.
बादशहाने त्याला दुसर्या दिवशी दरबारात यायला सांगितले आणि बिरबलाला त्याची परीक्षा घ्यायला सांगितले. दुसर्या दिवशी दरबार भरला तेव्हा बिरबल आणि ज्योतिषी हजर झाले. बिरबलाने आपल्या उपरण्यामध्ये एक पाखरू लपवून आणले होते. ते पाखरू त्याने हातात धरले आणि ज्योतिषाला म्हणाला,
"माझ्या हातात जे आहे ते जिवंत की मेलेले आहे हे सांग?"
हे असे विचारले जाणारे प्रश्न बिरबलासारखे आहेत. पण ए०आय० ज्योतिषासारखे दावे करत नाही.
कळीचा मुद्दा असा (ज्याकडे मुद्दामून दूर्लक्ष केले जाते) वरील "साध्या" प्रश्नाने नियोजन करून आयुष्याचे प्लॅनिंग करणे सहज शक्य आहे. उदा० या प्रश्नाच्या अनुषंगाने नवी माहिती जशी उपलब्ध होईल, तसा प्रश्न अपडेट करण्याने अधिक उपयुक्त सूचना ए०आय० कडून मिळू शकतात. वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करायला ए०आय० मदत करतो. उअपाय सुचवतो. हे ए०आय० चे बलस्थान आहे. सध्याच्या ए०आय० ची रीझनींगची क्षमता अचाट आहे.
उदा वरील प्रश्नाला ग्रोक ए० आय० ने दिले उत्तर असे -
एक ४५ वर्षाच्या निरोगी माणसाचा वर्तमान मासिक पगार ५०,००० रुपये आहे आणि त्याला निवृत्तीवेतन (पेन्शन) नाही. प्रश्न हा आहे की वयाच्या ६० वर्षानंतर (म्हणजे निवृत्तीनंतर) त्याला दरमहा किती रुपयांची गरज पडू शकते.
हे अनुमान काढण्यासाठी काही मूलभूत गृहीतके घेतली आहेत:
- निवृत्तीचे वय: ६० वर्षे (आजपासून १५ वर्षांनंतर).
- वार्षिक पगारवाढ दर: ७% (भारतातील सरकारी/निम-सरकारी क्षेत्रातील सरासरी वाढ लक्षात घेऊन).
- निवृत्तीनंतर आवश्यक उत्पन्न: निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या पगाराच्या ८०% (रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये सामान्यतः ७०-८०% चा रेशो वापरला जातो).
- महागाई दर: ७% (भारतातील ऐतिहासिक सरासरी ७.३७% आहे).
### गणना:
- आजचा पगार: ५०,००० रुपये/महिना.
- १५ वर्षांनंतरचा अंदाजित शेवटचा पगार: ५०,००० × (१.०७)^१५ ≈ १,३८,००० रुपये/महिना.
- निवृत्तीनंतर दरमहा आवश्यक रक्कम: १,३८,००० च्या ८०% ≈ १,१०,००० रुपये.
हे अनुमान आहे आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार (जसे की जीवनशैली, वैद्यकीय खर्च, महागाईतील बदल) ते १,००,००० ते १,५०,००० रुपयांपर्यंत असू शकते. निवृत्तीपूर्वी बचत आणि गुंतवणुकीद्वारे (जसे SIP, PPF, NPS) हे साध्य करता येऊ शकते. व्यावसायिक आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे उचित ठरेल.
दर तीन किंवा सहा महिन्यानी नवी माहिती बदलेले संदर्भ विचारात घेऊन, ए०आय० च्या लक्षात आणून देऊन, हा प्रश्न परत-परत विचारला गेला पाहिजे. पण आजकाल मला नम्र लोकांना मदत करायला आवडते.
23 Sep 2025 - 11:00 am | युयुत्सु
ना०मू० काकांचा हटवादीपणा
हटवादी लोकांमुळे देशाचे कसे नुकसान होते याचा उत्तम नमूना - https://www.msn.com/en-in/news/india/if-murthy-and-sikka-had-agreed-ca-f...
24 Sep 2025 - 12:29 pm | गणेशा
कामात busy असल्याने प्रतिसाद वाचले नाहीत.
आणि प्रतिसाद लिहायला वेळ लागेल मला.
पण यावर विस्तृत लिहू शकेल मी..
म्हणजे तुम्ही जे गुंतवणुकी बद्दल लिहिले आहे, त्या विषयी.. Still ते कसे screener (queries ) इतके योग्य नाहीच माहिती देऊ शकत..तसेच एक AI options bot बनवला होता मी गेल्या वर्षी(मी fundamental नुसार गुंतवणूक करतो, पण बनवला होता) . पण त्याच्या मर्यादा वगैरे..
आणि या बाबतीत लिहू शकतो.. कदाचित वेगळा लेख लिहावा का हा विचार करतोय..जो कि माझ्या अगोदरच्या मार्केट च्या धा ग्याचा पुढचा भाग असेल.
जरी मी DATA & AI field मध्ये आहे, आणि काही काल AI technical architect होतो.. तरी DATA या angle वर लिहू शकतो..
AI बद्दल मी तितका positive नाहीये.. पण फक्त data शोधून देणे या बद्दलच फक्त AI सिमीत नक्कीच नसला पाहिजे..
निवांत लिहिल. अर्थात वेळ मिळाला तर
24 Sep 2025 - 12:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्वप्रथम म.टा. मध्ये लेख आल्याबद्दल अभिनंदन!!
दुसरे म्हणजे आपण गुंतवणुक सल्लागार किवा किमानपक्षी तुम्हाला उपयोगी पडलेल्या चांगल्या टिप्स देणार असाल (ए आय वापरुन) तर होणार्या फायद्याच्या ५% फी मी द्यायला तयार आहे. यात केवळ शुद्ध पैसे कमवायचा हेतू आहे. टिका किवा उपरोध नाही.
24 Sep 2025 - 1:17 pm | गणेशा
या पेक्षा तुम्ही स्वतः का शिकत नाही?
असो, personal
accenture ला च असल्यास भेटू तिथे :-) मग बोलू.
अवांतर :
मी असे खूप पैसे कमवले असते, परंतु, एक तत्व मी पाळतो, share market मध्ये कोणाकडून पैसे नाही घायचे आणि द्यायचे पण नाही..
तुम्ही ज्या टिप्स म्हणतायेत त्याचा अभ्यास आणि का असे फुकट दिलेय मी माझ्या friends ना जे अभ्यास करत नाही आणि जिवाभावाचे मित्र options आणि trading मध्ये उगाच गटांगळ्या खात होते.
ते लाखो च्या profit मध्ये आहेत आता :)
एकच उद्देश जेंव्हा पैसे जास्त बनतील तेंव्हा तो आनंद उपभोगायला तुमच्या जवळ मित्र पाहिजेत आणि ते हि तो आनंद साजरा करू शकतील..
नेमके खूप कामात असल्याने जास्त लिहू शकत नाहीये..
Just इथले प्रतिसाद हि वाचलेत आता.
धागा भरकटवण्याचा उद्धेश नाही.. नंतर नीट बोलेन
24 Sep 2025 - 1:29 pm | गणेशा
खूपच fast प्रतिसाद लिहिला.. आता वाटतेय उगाच लिहिला प्रतिसाद. Update करता येईना.
असो..
मूळ लेखा बद्दल.
24 Sep 2025 - 3:03 pm | टर्मीनेटर
अत्यंत भंपक लेख!
लेख आणि सगळे प्रतिसादही वाचले... मध्यमवर्गीय नसलेल्या माणसाने त्याच्या दृष्ठिने असलेल्या टिपिकल मध्यमवर्गीय विचारसरणीतून लेख लिहिलाय असे वाटले.
१०५ मुद्द्यांची प्रश्नावली तुम्ही दिली आहेत. त्याची माझ्या पद्धतीने (वास्तविक) उत्तरे दिली तर काय रिझल्ट्स येतील ह्याची कल्पना आहे का? कल्पना नसूदे पण अशी त्यांची उत्तरे येतील ह्याची कल्पना तरी केली असेल का?
मला ह्या विषयावर तुमच्याशी चर्चा करायला नक्कीच आवडेल!
(मागे 'सोने खरेदी' ह्या विषयावर तुमच्याशी चर्चा करायची खूप ईच्छा होती पण ती काही (मला वैयक्तिकरित्या अजिबात पसंत नसलेल्या प्रशासकीय कराणांमुळे पूर्ण होऊ नाही शकली ह्यासाठी अत्यंत दिलगीर आहे) आता ही चर्चा कदाचित होऊ शकेल असे वाटते आहे ( हा कदाचित माझा गैरसमज असू शकेल)
असो... ह्या विषयावर तुमच्याशी चांगली चर्चा होऊ शकेल असे वाटते.....
24 Sep 2025 - 4:27 pm | युयुत्सु
श्री० राजेंद्र मेहेंदळे
मला फी घेऊन सल्ले देण्याचा कोणताही उद्योग करायचा हेतू नाही.
24 Sep 2025 - 4:35 pm | युयुत्सु
श्री० टर्मीनेटर
तुमच्या भावना पोचल्या पण मुद्दे समजले नाहीत. सध्या सोने हा माझ्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय नसल्याने मी हातातले काम टाकून वेळ देऊ शकेन की नाही माहित नाही. पण तुमचे लिखाण, अभ्यास, विचार जर लक्षात घ्यावेसे किंवा प्रतिसाद देण्या योग्य वाटले तर अवश्य देईन. पण अगोदर तुम्ही तुमची बाजू मुद्देसूद मांडा.
टीप - तुम्हाला माझा लेख भंपक वाटल्याबद्दल मला अजिबात राग नाही. चिंता नसावी.
24 Sep 2025 - 4:42 pm | युयुत्सु
तुमची बाजू मांडताना पूर्ण विचार करा! मला तुमची बाजू भंपक वाटली तर चर्चा होणार नाही.
24 Sep 2025 - 5:01 pm | धर्मराजमुटके
आजकालच्या चर्चा वाचून "विद्या विनयेन शोभते" सुविचार इतिहासजमा झालाय असे वाटत आहे.
24 Sep 2025 - 5:10 pm | अभ्या..
सध्या विद्या फक्त सिध्दार्थ रॉय कपूरला शोभते.
विनय (पाठक) स्ट्रगलिंग अॅक्टर आहे अजूनही,
सिध्दार्थ प्रचंड यशस्वी निर्माता आहे.
24 Sep 2025 - 5:50 pm | धर्मराजमुटके
विनय (पाठक) स्ट्रगलिंग अॅक्टर आहे अजूनही ?
माझ्या मते तो "चलो दिल्ली" चित्रपटातनंतर यशस्वी झालाच आहे.
24 Sep 2025 - 5:57 pm | टर्मीनेटर
'कुठला मुद्दा समजला नाही ह्यावर कृपया प्रकाश टाकावा...'
सध्याच काय सोने हा तुमच्यासाठी कधीच महत्त्वाचा विषय नव्हता, पण टूल किटचा एक भाग म्हणुन तुम्ही त्यावर लिहिले होते आणि ते किती भंपक होते हे जगजाहीर आहे. आणि असल्या फालतुगिरीवर व्यक्त होण्यासाठी प्रत्येकवेळी मी तरी अजिबात वेळ देऊ शकत नाही Sorry to say!
पण ते असो...
आता हा भंपक लेख लिहिताना तो फक्त AI विषयी असता तरी हरकत नव्हती पण त्यात तुम्ही शेअर बाजार घुसवलात ही गोष्ट माझ्या दृष्टीने हकरतीस पात्र आहे!
असो... खरोखर AI बद्दल कळवळा असेल तर यंदाच्या दिवाळी अंकाची थीम AI आहे तेव्हा त्यात आपण काहीतरी उद्बोधक लिहावेत, ते वाचायला आणि खरोखर ज्ञानवर्धक असेल तर त्याचे मनमोकळेपणाने कौतुक करायला नक्कीच आवडेल!
[गेल्या वर्षी 'निवडणूक/राजकारण' ही (एक) थीम होती, पण इथे बाकी वर्षभर राजकारणावर आपले (असलेले - नसलेले) ज्ञान पाजळणाऱ्या सगळ्या महापुरुषांनी सपशेल पळ काढला होता, सगळे अगदी 'रणछोड दास' म्हणतात तसे झाले होते ते सगळे महाभाग]
असो, धाग्याच्या शीर्षकातून जे अभिप्रेत होतंय त्या विषयावर (तुमची ईच्छा असल्यास) तुमच्याशी चर्चा करायला मला खरंच आवडेल!
तो तर वाटलाच आहे आणि त्याबद्दल राग किंवा चिंता वाटली काय आणि नाही वाटली काय who cares
😀
24 Sep 2025 - 8:16 pm | युयुत्सु
पण त्यात तुम्ही शेअर बाजार घुसवलात ही गोष्ट माझ्या दृष्टीने हकरतीस पात्र आहे!
इतकंच ना? कुणाचं काय तर कुणाचं काय?
25 Sep 2025 - 1:03 am | टर्मीनेटर
'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकाचा आणि शेअर बाजाराचा काय संबंध आहे? I mean ह्यात नक्की कुठली उत्पादकता तुम्हाला अभिप्रेत आहे?
Lol
25 Sep 2025 - 7:27 am | युयुत्सु
ही चर्चा व्यवस्थित पुढे नेण्यासाठी काही मूलभूत बाबींवर एकमत होणं अपेक्षित आहे. तसेच फक्त तुम्ही प्रश्न विचारणार आणि मग दुगाण्या झाडणार असाल तर ते पण मला मान्य नाही. त्याला मी चर्चा म्हणत नाही.
तसेच मला तुमच्या बोद्धिक आणि वैचारिक खोलीचा अंदाज आला तर तुमच्याबद्दलचा डिफॉल्ट/बेसिक आदर टिकायला मदत होईल. ही माझ्यादृष्टीने एक आवश्यक अट (नेसेसरी कंडीशन) आहे.
तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची उत्पादकतेची व्याख्या सांगावी. ती व्याख्या घेऊन शेअर बाजाराचे उदा०कसे चुकीचे आहे, याचे निरूपण करावे.
मला तुमचा मुद्दा पटला तर मी पटला असं जाहिर करेन. नाही पटला तर तुमच्या युक्तीवादातले दोष शक्य तेव्हढ्या सभ्य भाषेत मांडायचा प्रयत्न करेन. ही सभ्यता तुमच्या मध्ये दिसली नाही तर माझ्याकडून चर्चा बंद केल्याचे जाहिर करेन.
एकतर्फी तुम्ही प्रश्न विचारायचे आणि मी उत्तरे देणं इतकंच अपेक्षित असेल तर आपण इथेच थांबू... तसेच ही चौकट मान्य असेल तर पुढे जाउ या.
25 Sep 2025 - 8:34 am | युयुत्सु
आणखी एक...
ही चर्चा चालू झाल्यास प्रथम श्री० टर्मीनेटर यांच्याशी चर्चा करण्यात माझी प्राथमिकता असेल. मध्येच कुणी तोंड खुपसून चर्चा/मुद्दा/युक्तीवाद भरकटवायचा प्रयत्न केल्यास माझ्याकडून सदर व्यक्तींची दखल घेतली जाणार नाही.
26 Sep 2025 - 6:39 pm | टर्मीनेटर
उत्पादकतेची व्याख्या मी काय करणार? पण जी सर्वमान्य व्याख्या प्रचलित आहे ती खाली इंग्रजी आणि मराठीत देतो (जी मला मान्य आहे त्यात तुम्हाला काही भर घालायची असेल तर अवश्य घालावीत)
आता ह्या व्याख्येतुन प्रतीत होणाऱ्या अर्थाने तुम्हाला 'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकात 'उत्पादकता' अभिप्रेत आहे की 'कार्यक्षमता' ह्या अर्थाने अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करावेत म्हणजे पुढील चर्चेची दिशा ठरवता येईल!
27 Sep 2025 - 7:25 am | युयुत्सु
श्री० टर्मिनेटर
’उत्पादकता’ (प्रॉडक्टीव्हीटी) आणि ’कार्यक्षमता’ (एफिशिअन्सी) या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या न समजल्याने त्यांचा चुकीचा वापर होऊन गोंधळ निर्माण होतो. त्यात ’उत्पादकतेच्या प्रकारांमध्ये ’वैयक्तीक उत्पादकता’ हा महत्त्वाचा भेद आहे. इथे तुम्हाला या दोन संकल्पनांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायचे नसेल तर आपल्याला पुढे जाता येणार नाही.
एखादी कृती (टास्क) मी पूर्वी करू शकत नव्हतो आणि ती आता करू शकत असेन तर माझी उत्पादकता वाढली असे म्हणता येते. हीच कृती मी पूर्वी करू शकत होतो पण आता जास्त चांगली/परिणामकारक करू शकत असेन, तर माझी कार्यक्षमता वाढली असे म्हणता येते.
आता माझ्या लेखातील उदा० विषयी -
पूर्वी मी पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) करू शकत नव्हतो. मला त्याचा माझ्या गुंतवणूक विषयक निर्णय प्रक्रियेत वापर करता येत नव्हता. आता मला ए०आय० मुळे ते करता येते. त्यामुळे माझी त्यात ’वैयक्तीक उत्पादकता’ वाढली आहे.
मी पूर्वी करत होतो त्यापेक्षा चांगले पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) आता करू असेन तर माझी कार्यक्षमता वाढली आहे, असे म्हणता येते.
पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) या जागी खालील कृती वापरून हेच निकष तुम्ही लावू शकता. उदा०-
लेखन
युक्तीवाद
बुद्धीवादळ (ब्रेन्स्टॉर्मिंग)
माहिती मिळवणे
माहितीचे पृथ:करण करणे
इ० इ०
मी पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) करण्याच्या निमित्ताने ए०आय० चा वापर करताना एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि त्याचा बनविलेला ठोकताळा असा-
एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक आहे, पण कंपनीची कामगिरी चांगली नाही (महसूल, विक्री, नफा कमी होणे इ०) तर काही तरी मोठी गडबड आहे.
एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक आहे, पण कंपनीची कामगिरी आहे (महसूल, विक्री, नफा वाढणे किंवा गेला बाजार स्थिर इ०) तर कंपनी विचार करण्याजोगी आहे.
एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक नाही, पण कंपनीची कामगिरी चांगली/बरी आहे (विशेषत: लाभांशाचे वाटप) तर डोळे मिटून पैसे गुंतवावेत.
आता ए०आय० वातावरण पोषक आहे की नाही आणि कंपनीची कामगिरी या प्रश्नांची उत्तरे विश्वासार्ह देऊ शकतो, असे माझे मत बनले आहे.
माझ्या उत्तराशी तुम्ही किंवा इतर कुणी सहमत नसतील तर "वुई कॅन अग्री टु डिस-अग्री" या संकेतानुसार इथेच थांबू या...
टीप- सुबोध खरे या व्यक्तीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे मिळणार नाहीत.
27 Sep 2025 - 9:24 am | सुबोध खरे
सुबोध खरे या व्यक्तीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे मिळणार नाहीत.
आपल्या कडून कोणतीही सुसंबद्ध उत्तरे मिळतील अशी माझी मुळात अपेक्षाच नाही.
मी आपल्या अनेक लेखातील विसंवाद किंवा दर्पोक्ती दाखवून देतो याबद्दल आपली जळजळ होते याला काही उपाय नाही.
मीच बरोबर आणि मलाच सगळ्या विषयातील सगळं कळतं अशा व्यक्ती कडून कोणत्या उत्तराची अपेक्षा असेल ?
25 Sep 2025 - 7:32 am | युयुत्सु
खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच ते घालणे, मध्येच जुन्या धाग्यांचे संदर्भ घेऊन ओच्यात घेईन नाही तर पदरात घेईन स्टाईलमध्ये भांडत बसायचे असेल तर त्याला मी विकृत मानसिकता समजतो. आपण याची काळजी घ्याल अशी आशा करतो.
25 Sep 2025 - 7:59 am | युयुत्सु
खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच ते घालणे,
हे वाक्य
खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच नाही ते घालणे,
असे वाचावे
26 Sep 2025 - 3:46 pm | युयुत्सु
Research from NYU has found that frontier models from OpenAI, Google, and Anthropic can now pass all three levels of the CFA (chartered financial analyst) exam, including difficult Level III essay questions that eluded them two years ago.
Models completed the exam in minutes versus the 1,000 hours humans typically spend studying across multiple years for all three levels.
OpenAI's o4-mini scored highest at 79.1% on the challenging essay portion, with Gemini 2.5 Pro and Claude 4 Opus reaching 75.9% and 74.9%.
https://www.prnewswire.com/news-releases/goodfin-and-nyu-stern-professor...