नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती.
2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता.
नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्तिणीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही.
नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्तिणीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे.
आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्तिणीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच
https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0
या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन
https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s
https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s
नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA
प्रतिक्रिया
31 Jul 2025 - 1:12 am | प्रसाद गोडबोले
तरी त्यांना सुचवले होते की तुम्ही "हा हत्ती हत्तीईदला कुरबानी द्यायला पाळला आहे" असे म्हणा.
कुर्बानी विरुद्ध बोलण्याच्या ना PETA मध्ये दम आहे, ना दाभोळकरमध्ये, ना अंबानी मध्ये, ना हायकोर्ट मध्ये, ना सर्वोच्च कोर्ट मध्ये.
इतकी सोपी तकिया करून ते लोकं स्वतःचा हत्ती स्वतःकडे ठेऊ शकले असते !
=))))
31 Jul 2025 - 2:55 am | अभ्या..
त्यापेक्षा हत्तीला नाम घ्यायला लावायला पाहिजे.
किंवा सर्व गावकऱ्यांनी एकेक लाख नामाची कॉन्ट्री काढली असती तरी गेलाबाजार काही अब्जात नाम कलेक्ट होऊन हत्तीला पाहिजे तिथं राहता आलं असत.
कुठली कुर्बाणी आणि कुठला अंबानी . बिटकॉइनच्या तोंडांत मारल असलं चलन आहे नाम.
31 Jul 2025 - 4:35 am | स्वधर्म
तुम्ही सुचवलेला उपाय एकदम 'नामी, आहे. पण नांदणीच्या गावकर्यांना प्रिपेड पर्याय आता नाही. पोस्टपेड चालेल का?
31 Jul 2025 - 10:42 am | प्रसाद गोडबोले
नाही.
नामाचा सरकारी कामात इत्यादी उपयोग होत नाही.
आमच्या देवस्थानात मोर पाळलेले होते. तेही फॉरेस्ट डिपार्टमेंट ने नेले होते.
नामाचा उपयोग ते मोर नेल्यानंतर " ही देखील रामाचीच इच्छा" हे कळण्यासाठी होतो.
तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर.
सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ?
31 Jul 2025 - 3:07 pm | अभ्या..
तुम्हाला नाम कळतच नाहीये अजून . अभ्यास वाढवला पाहिजे वेळ आहे त्यावर.
ओके,
तुम्हाला कळला ना रामाच्या इच्छेने? आणि कळला असेल तर तुमची स्थिती पाहता न कळालेला बरा.
सारखा सारखा बाष्कळपणा काय कामाचा ?
सुरुवात कुणी केली?
31 Jul 2025 - 3:58 pm | प्रसाद गोडबोले
ही बरं झालं.
स्पष्ट बोलण्याचा फार फायदा होतो बघा असा !
बाकी रामाची इच्छा !
31 Jul 2025 - 4:32 am | स्वधर्म
पंत,
एरव्ही अध्यात्म, नाम, अभंग इ. विषय असेल तर लोकांचा बुध्दीभ्रम तुंम्हाला सहज जमतो. त्याबाबत वादच नाही. पण इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए. ताबडतोब दाखवून दिले जाईल.
हां, आता प्रत्यक्ष महानेते ज्यांच्यासाठी खपतात, त्यांचेच नांव यात आले त्यामुळे तुमची घालमेल समजू शकतो, पण त्याबद्दल 'एबीपी माझा'ला मोठ्या मनाने माफ करून टाका.
31 Jul 2025 - 10:46 am | प्रसाद गोडबोले
मग बघूया आता किती बकऱ्यांसाठी PETA याचिका करते आणि सुप्रीम कोठा किती बकऱ्यांचा जीव वाचवतो ते !
31 Jul 2025 - 3:40 pm | स्वधर्म
इथे तुमचा मुसलमान किंवा मुस्लीमद्वेष कितीही आडमार्गाने आणलात तरी वडाची साल पिंपळाला चिकटणार नाहीए.
एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो.
31 Jul 2025 - 3:56 pm | प्रसाद गोडबोले
अहो काय बरळताय ?
कसला आलाय द्वेष अन् काय !
आम्ही स्वतः अगदी चवीने बोकड , बोल्हाई मटण खातो. तेही आमच्या मुस्लिम मित्रांच्या सोबत जाऊन !
PETA किंवा तुमच्या सारखे दुतोंडी लोकं इन जनरल जो मांसाहार चालतो त्या बाबत कधीही काहीही बोलल्याचे पुरावे नाहीत.
तुमच्यात स्पष्ट बोलण्याची धमक नाही , किमान हमीद मियां तरी सुस्पष्ट बोलले आहेत हे पहा
5 Aug 2025 - 5:26 pm | विवेकपटाईत
हिंदू कधीही दुसर्या धर्माच्या लोकांचा द्वेष करत नाही. त्यामुळे देशात दुसर्या धर्माच्या लोकांची संख्या वाढली. द्वेष असता तर पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदू कमी झाले तसे आपल्या देशात झाले असते. बाकी जे त्यांच्या परमेश्वराला मानत नाही त्यांच्या विरोधात सतत जेहाद केले पाहिजे. यावर ते 100 टक्के ठाम असतात.
7 Aug 2025 - 8:10 am | स्वरुपसुमित
दाभोळकर गेले
31 Jul 2025 - 5:38 am | कंजूस
खाजगी मालकीचा प्राणी आहे. तो दुसऱ्याने विकत घेतला आहे. इकडे तो मठालाही सांभाळायचा खर्च वाढत असेल. गावकऱ्यांचा विरोध झाल्यावर दुसऱ्या मालकाने इतर उपाय कामाला लावले.
कोल्हापुरातले दुसरे असे एक उदाहरण म्हणजे मंगेशकर (लता) यांच्या मालकीचा स्टुडिओ विकून तिथे काही मॉल वगैरे येणार होता. कोल्हापुरातल्या लोकांनी अडसर घातला. तो हेरिटेज/ वारसा आहे इत्यादी.
दोन्ही बाबतीत वस्तू तीनशे वर्षांपूर्वींच्या नाहीत.
मुद्दा असा आहे की मालक आपल्या मालमत्तेचे काहीही करू शकतो कायद्याने, त्यात इतरांनी भावनावश होऊन अडथळा आणणे बरोबर आहे का?
31 Jul 2025 - 5:48 am | कंजूस
इथे दुसरा मालक अंबानी कुटुंबीय आहे. त्यांचे आणि केंद्रातील वरीष्ठांचे सख्य आहे. त्यामुळे त्यांची बाजू घेतली की आपण भक्त ठरू शकतो याची कल्पना आहे. अंबानींच्या टेलीकंपनी जियोचे कार्ड सर्विस वापरणारे किंवा न वापरणारे भक्त/ विरोधक ठरतील का?
31 Jul 2025 - 6:37 am | कंजूस
आपला फोन नंबर एका सर्विस प्रवाइडरकडून दुसऱ्याकडे नेणे म्हणजे 'नंबर पोर्ट'.
आपण बरेच जण ' pre paid' plan घेतो. Post paid/ बिलींग प्लान घेत नाही. यात धोका असतो. आपण फोन कॉल्स करतो, डेटा इंटरनेट वापरत राहतो आणि नंतर मोठ्या रकमेचे बिल येऊ शकते. Pre paid प्रकारात तसे होत नाही. अमर्याद इंटरनेट वापरले जात नाही. डेटा लिमीट संपल्यावर बंद पडते.
हे इथे सांगण्याचा उद्देश असा की वोडाफोन किंवा बीएसएनेल चा नंबर जियोकडे बदलल्यास pre paid नंबर मिळतो. तसं एरटेलचं नाही. एरटेलला पोर्टिंग करायचं झाल्यास चार ते सहा महिने post paid प्लान घ्यावा लागतो. तो महागडा आहे. शिवाय सहा महिन्यांनी pre paid करायला गेल्यास ते त्रास देतात.
31 Jul 2025 - 9:29 am | माईसाहेब कुरसूंदीकर
कोर्टाने काय म्हंटले आहे? फक्त अंबानी अंबानी म्हणून रागाने नाचण्यात अर्थ नाही.
But the high court cited a June 2024 report about the elephant's health, diet and nutrition, social environment, hygiene and cleanliness of shelter, veterinary care and work schedule, and said they "appear to be absolutely dismal".
citing an elephant's right to quality life must take precedence over humans' right to use it for religious purposes.
https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/elephant-relocated-to-...
31 Jul 2025 - 11:18 am | कपिलमुनी
या देशात कशावरही विश्वास नाही, कोर्ट कमिटि नेमते आणि त्या अहवालावर निर्णय देते .
ती कमिटी मॅनेज झाली कि जमले
31 Jul 2025 - 3:38 pm | स्वधर्म
माई, तुमचा मुद्दा अगदीच बरोबर आहे. कोर्टाने म्हटल्याप्रमाणे मानवाच्या धार्मिक अधिकार व इच्छांपेक्षा प्राण्याचा सुरक्षित जीवनाचा अधिकार अधिक महत्वाचा आहेच. केवळ धार्मिक आहेत, किंवा गावकर्यांना हत्तीण हवीशी वाटते, त्यांना तिचा लळा आहे, म्हणून तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे चुकीचे आहे. तरीही अंबानीच्या वनतारातच हत्तीणीचे चांगले संवर्धन होईल असे मानणे, म्हणजे जरा जास्तच होतंय.
तुमच्या दुव्यात म्हटले आहे:
The relocation took place after the Supreme Court dismissed a petition filed by the mutt, challenging the Bombay High Court order upholding the decision of a High Powered Committee to relocate the animal to the Gujarat facility.
या हाय पॉवर कमिटीत कोण कोण होते? त्यांच्याविषयी कुठेच माहिती मला तरी मिळाली नाही. त्यांचे काही हितसंबंध होते का? बरं एकदा राज्याच्या पशुसंवर्धन खात्याने, डॉक्टरांनी तिच्या आरोग्याबाबत प्रमाणपत्र दिलेले होते. या हाय पॉवर कमिटीने वनतारा अधिकार्यांची भेट, मठाने ऑफर नाकारणे वगैरे झाल्यावर नवीन अहवाल दिलाय. हे सगळं तितकं निष्पाप सरळ दिसतंय का तुंम्हाला?
राजू शेट्टी यांनी जामनगरलाच का? हा मुद्दा मांडला आहे. एक तर केरळ मध्ये हत्तींचे उत्तम संगोपन करण्याची परंपरा व क्षमता आहे. तसेच जामनगरला तापमान ४५ अंशापर्यंत जाते. हे असे असताना, 'गुजरात महाराष्ट्राला जवळ असल्याने' तिला जामनगरला हलवायचा आदेश दिला. हा न्यायालयाचा तर्क तुंम्हाला कसा वाटतो?
31 Jul 2025 - 10:53 am | Bhakti
अंबानीने अशाप्रकारे एकल असणाऱ्या सर्व हत्तींना वनतारात घेऊन जावं.हत्तींचा कळप बनवावे.इतक्या पैशांचा कधी उपयोग होणार,तो वापर करावा.गावकऱ्यांना आनंद व्हायला पाहिजे.हत्तीला निसर्गात राहण्याची संधी आता यापुढे मिळणार,बास झाली की गावची सेवा.
31 Jul 2025 - 11:19 am | कपिलमुनी
अंबानीला एवढा पुळका असेल तर त्यांनी भटकी कुत्री वनतारामध्ये नेउन पाळावीत
31 Jul 2025 - 12:00 pm | प्रसाद गोडबोले
फक्त अंबानी नाही,
अंबानी + PETA + हाय कोर्ट + सुप्रीम कोर्ट
हे सगळेच समान दोषी आहेत. नीच लोकं.
जो समाज जाहीरपणे मुक्या जनावरांची हिंसा करतो त्याला पाठीशी घालतात, अन् जो टोकाचा अहिंसक समाज मुक्या जनावराला देवासारखे प्रेमाने वागवत आहे त्याच्याकडून तो प्राणी हिसकावून घेतात. असला हा नीच समाज. ही ह्या नीच लोकांची धर्मनिरपेक्षता आणि ही ह्याचे सेक्युलॅरिझम.
जे लोकं एकट्या अंबानीचे नाव घेऊन टार्गेट करत आहेत ते स्वतःचे पूर्वग्रह बायस दाखवून देत आहेत बस.
31 Jul 2025 - 2:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी माझा पाळीव घोडा किवा गाय किवा तत्सम प्राणी विकायचे नाही किवा उलट ठरवले तर पेटा हरकत घेउ शकते? किवा गेलाबाजार एखाद्या शेजार्याने आकसाने पेटाकडे तक्रार केली की मी माझ्या कुत्र्याचा छळ करतो तर पेटा कारवाई करु शकते?
31 Jul 2025 - 3:43 pm | अमर विश्वास
भरपूर हसलो लेख वाचून ...
वनतारा मध्ये २०० हत्ती आहेत ... तरी अंबानी आपले सर्व उद्योग सोडून जयसिंगपूर मधल्या हत्तीच्या मागे लागला ...
भारी लॉजिक आहे
31 Jul 2025 - 3:49 pm | स्वधर्म
त्यांच्याकडे पॉलिमर, फोन नेटवर्क, पेट्रोकेमिकल, देशातील बहुसंख्य माध्यमे, आणि काय काय एवढे उद्योग आहेत. तरी पण किराणा दुकानं काढली... खूपच हसण्यासारखे आहे हे.
31 Jul 2025 - 3:54 pm | अमर विश्वास
अजून भारी लॉजिक ...
किराणा दुकान ... रिटेल हा उत्तम व्यवसाय आहे ... पण जाऊदे ...
असेच मस्त विनोदी लेख लिहीत राहा
31 Jul 2025 - 7:50 pm | कपिलमुनी
असेच जमवले आहेत..
1-1 करून..
31 Jul 2025 - 5:04 pm | कर्नलतपस्वी
एका वाक्यात सारे काही आले.
1 Aug 2025 - 4:00 pm | स्वधर्म
तुमचा काय आकस आहे, कल्पना नाही. पण हे सगळे खोटे वाटत असेल, तर हे घ्या दुसऱ्या माध्यमांतील दुवे
सकाळने या घटनेचे सखोल वृत्तांकन केले आहे:
https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/mahadevi-elephant-fu...
टी व्ही ९ मराठी
https://www.tv9marathi.com/trending/will-mahadevi-the-elephant-return-to...
1 Aug 2025 - 5:58 pm | कर्नलतपस्वी
नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत.
अमेरीकेत एक प्राणीसंग्रहालया बघीतले. सरकारने बरेच खुले,मोकळे ढाकळे नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलायं पण खाणे पिणे आणी सतत माणसांचा संपर्क टाळता आला नाही. त्यामुळे प्राण्यांचे नैसर्गिक स्वभाव बदलले असल्यास नवल नाही. जनुकीय बदल घडतो का यावरही कदाचित संशोधन झाले असावे.
माणसाला जर जंगलात डांबून ठेवले तर कसे वाटेल?
माझे मत कुणालाच पटणार नाही.
जाऊ द्यात.
मराठी माध्यमांतून निष्पक्ष पत्रकारिता होत नाही असे माझे मत आहे आणी लोकशाहीत मतस्वातंत्र्य आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच कलमानुसार मी मत व्यक्त करत आहे. नाही पटलं तर सोडून द्या.
1 Aug 2025 - 9:58 pm | स्वधर्म
>> नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावेत.
हत्तींसाठी निसर्गातील रहिवासच सर्वोत्तम, हे मत मला पटते. हत्तीणीची मठात काळजी घेतली जात असेल पण तरीही ते हत्तीसाठी नैसर्गिक नाहीच. जामनगरला तापमान ४० च्या वर जाते.
धागा काढण्याचे कारण हे की सगळी चक्रे हलून, जुने रिपोर्ट असताना हाय पॉवर कमिटी नेमून, ना ना प्रकार करून नेमके तिला कुणाकडे पाठवण्यात आले, ते तितके सरळ दिसले नाही.
1 Aug 2025 - 10:54 pm | प्रचेतस
आयुष्यभर मानवी सहवासात राहिलेले प्राणी नैसर्गिक सहवासात जगू शकत नाही. त्यांची स्वतःचे अन्न स्वतः मिळवण्याची क्षमता संपलेली असते.
31 Jul 2025 - 7:26 pm | कंजूस
नक्की राग कुणावर आहे लोकांचा?
31 Jul 2025 - 8:32 pm | रात्रीचे चांदणे
दुसरी बाजू कळायला मार्ग नाही. म्हणजे खरंच पेटा वाल्याना हत्तीणीची दया आली म्हणून हे सर्व झालं हे माहिती नाही. पण अशी कोर्टाच्या निगराणीत हाय पॉवर कमिटी नेमून तपासणी केली तर पाळीव प्राणीच कांय खुद्द माणसांना पण असंच कुठं तरी सोडावं लागेल.
धाग्यात लिहिल्या प्रमाणे वनतारा चे अधिकारी आधी पाहणी करून गेले नंतर त्यांनी मठाला ऑफरही दिली. ऑफर नाकारल्यावर परत पेटा वाले येऊन कोर्टात गेल्यावर हत्तीण वनतारातच जात असेल तर नक्कीच काळबोर आहे असं वाटतंय.
आणि हत्तीण जर वनतारात जात असेल तर राज्य सरकार कडून मदतीची अपेक्षा ठेवणाही चुकीचं होत.
31 Jul 2025 - 9:37 pm | विवेकपटाईत
एका शेतकर्याने 10 किलो वजनी लाल भोपळा राजाला अर्पण केला. त्याच वेळी एका श्रेष्ठी ने एक हत्ती राजाला नजराणा म्हणून दिला. राजाने हत्तीच्या बदल्यात भोपळा श्रेष्ठीला दिला. राजा शेतकर्याला श्रेष्ठी ने दिलेला हत्ती देऊ लागला. तर शेतकरी म्हणाला, मला हत्ती नको. मला माझा भोपळाच परत द्या.
हत्ती पाळण्याचा खर्च शेतकरी उचलू शकत नव्हता. अंबानीला हत्ती पाळण्याचा खर्च उचलू द्या. बाकी पेटा ही हिंदू विरोधी संस्था आहे, हे ही तेवढेच सत्य आहे.
1 Aug 2025 - 9:47 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ह्या हत्तीणीला अझीम प्रेमजी किंवा आनंद महिंद्र ह्यांनी आपल्या घरी नेले असते तर हा धागाच निघाला नसता असा ह्यांचे मत.
1 Aug 2025 - 10:54 am | प्रसाद गोडबोले
वेगळंच दुखणे
"त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात.
2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही.
कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते !
"ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत.
2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.
1 Aug 2025 - 10:54 am | प्रसाद गोडबोले
वेगळंच दुखणे
"त्याचं" दुखणं वेगळंच आहे, सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही असं. म्हणून कुठून कुठून कुरबुरी काढून रडत राहतात.
2020 मध्ये केरळ मध्ये एका गरोदर हत्तिणी अननस मध्ये लावलेल्या बॉम्ब मुळे जखमी झाली अन् मेली. तेव्हा ह्यांनी एक शब्दाने अवाक्षर उच्चारल्याच्या पुरावा नाही.
कारण सगळ्यांना माहिती आहे ते कृत्य कोणाचे होते ते !
"ही " असली एककल्ली लोकं सिक्युलरिझम चां आव आणून रडतच राहणार आहेत 2029 पर्यंत.
2029 मध्ये काहीतरी करून सुधारणा होईल ह्या आशेवर जगत आहेत बिचारे.
1 Aug 2025 - 3:51 pm | स्वधर्म
या विशिष्ट प्रकरणात मालकांच्या मालकांवरून रोख हटवण्यासाठी विशिष्ट धर्माच्या द्वेषाची मात्रा चालत नसल्याने आता दुसर्यांना सेक्युलर म्हणून जुन्या घटना काढल्यावर तरी चालतंय का, याची चाचपणी सुरू आहे का? एवढ्यावर थांबू नका, नेहरू + हत्ती असं काही मिळतंय का बघा.
बाकी सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केला होता त्यात सेक्युलर व धर्मांध असा भेद करणे तुंम्हालाच जमते.
1 Aug 2025 - 4:10 pm | प्रसाद गोडबोले
कसला रोख हटवणे अन् कसलं काय !
आम्ही तुमच्या एकांगी सिक्युलारिझम आणि भूतदया वगैरे चा बुरखा फाडत आहोत बस.
ह्या प्रकरणात अंबानी चे नाव नसते तर तुम्ही चकार शब्द काढला नसता .
तुम्हाला हत्तीशी अन् जैन धर्मियांच्या भावनांशी काहीही घेणे देणे नाहीये. पर्युषण पर्वात हिंसा करू नका असे जैन धर्मीय म्हणतात तेव्हा त्याला विरोध करायला तुमच्या सारखी च माणसे आघाडीवर असतात.
आणि नेहरू + हत्ती काय शोधायचं ! नेहरू अन् त्यांच्या बाष्कळ धोरणांमुळे 1965 च्या युद्धात चारीमुंड्या चित हार अन् झालेली मनुष्यहानी सर्वांना माहीत आहे .
आणि तरीही अजून एका - नेहरूने 1949 मध्ये इंदिरा नावाची हत्तीण जपान मधील एका zoo ला गिफ्ट केली होती !
तेव्हा "आले नेहरूंच्या मना" असा लेख लिहा आता.
=))))
1 Aug 2025 - 4:20 pm | प्रसाद गोडबोले
हे घ्या
तुमच्या लाडक्या NDTV ची लिंक आहे !
https://www.ndtv.com/offbeat/jawaharlal-nehru-death-anniversary-when-pan...
आता खरेच जर तुम्ही " आले नेहरूंच्या मना" असा नेहरूंवर टीका करणारा लेख लिहिलात तर मानलं की तुमचं सिक्युलरिझम खरं !
=))))
1 Aug 2025 - 4:41 pm | स्वधर्म
अहो, नेहरूंनी हत्ती 'दिलाय'
**** यांच्यासारखा 'काढून' घेतला नाहीये.
कशाला वाढवताय?
1 Aug 2025 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले
दिलाय म्हणजे काय ?
नेहरूंनी जन्माला घातला होता का हत्ती ?
कोठून तरी काढूनच दिला ना !
1 Aug 2025 - 6:22 pm | प्रसाद गोडबोले
ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मला बघायचं आहे की तुमच्या लेखणीतून एक तरी खऱ्या अर्थाने सेक्युलर वाक्य लिहिले जाते काय ते !
उदाहरणार्थ, माझं उपहासमुक्त, सरळ स्पष्ट मत मांडून मी थांबतो :
PETA चे लोकं हरामखोर आहे. जैन सारख्या अत्यंत अहिंसक धर्माच्या लोकांकडून श्रद्धेने पूजिला जाणारा हत्ती काढून घेण्याचे कारस्थान पाताळयंत्री आहे. त्याला बळ देणारे अंबानी अन् त्यांची कमिटी की काय हेही त्या पापात तितकेच भागीदार आहेत . मुळात धर्माच्या प्रश्नात सरकार ने ढवळाढवळ करणे अक्षम्य चूक आहे. इथे हाय कोर्ट चुकले अन् सुप्रीम कोर्ट ही चुकले. तेही ह्या पापाचे भागीदार आहेत. आणि सर्वात शेवटी एन सर्वात महत्वाचे म्हणजे देशाचे लोकोत्तर बहुमताने निवडून आलेले नेते म्हणून आदरणीय मोदी आणि सन्माननीय महामहीम राष्ट्रपती ह्यांच्या डोळ्यादेखत हा अन्याय झाला असल्याने तेही ह्या पापात भागीदार ठरतात.
आता जैन धर्मात ढवळाढवळ करून दाखवली तितकीच अन्य धर्मात ढवळाढवळ करून त्यांनी मुक्या जनावरांचा जीव वाचवून दाखवावा .
आमचे लोकमान्य टिळक म्हणाले होते तसे म्हणून मी माझे 4 शब्द संपवतो - ह्या न्यायासनाच्या वर एक उच्च न्यायासन आहे, तिथे ईश्वर साक्ष आहे . तिथे नक्की न्याय होईल,
सदर पापातील सर्वांभागीदारांना एकुणएक हिशेब चुकता करायला लागेल ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे !
इत्यलम
राम
5 Aug 2025 - 3:46 pm | स्वधर्म
तुंम्ही म्हणता त्याप्रमाणे सगळेच या प्रकरणात चुकले आहेत हेच मत, 'हे सगळं सरळपणे घडलं नाहीये' या स्वरुपात या धाग्यात मांडले होते.
माझा तुमच्या या आणि आधीच्या प्रतिसादांबद्दल हाच मुद्दा आहे की तुंम्ही या प्रकरणाला इतर असंबध्द विषय चिकटवत आहात. या धाग्यात सेक्युलर वाक्य लिहीले का नाही याचा मूळ मुद्द्याशी कसलाही संबंध नाही.
सेक्युलरिझम हा विषय तुमच्यासाठी महत्वाचा असेल तर वेगळा धागा काढावा, ही विनंती.
1 Aug 2025 - 3:26 pm | स्वधर्म
प्रेमजी, महिंद्रा सोडा, हत्तीण तुंम्ही घरी नेली असती तरी धागा निघाला नसता. फक्त ज्या पध्दतीने घटना घडत किंवा घडवून आणल्या गेल्या, त्यामुळे कोणालाही यात सगळं कसं साधं सरळ घडत गेलं असं वाटणार नाही.
1 Aug 2025 - 11:56 am | कंजूस
मठाच्या हत्ती हा आमचा हत्ती कसा?
1 Aug 2025 - 12:23 pm | कपिलमुनी
इस्कॉन चे हत्ती अशाच प्रकारे आणले
पेटा , कोर्ट , समिति --- ट्रन्स्फर
1 Aug 2025 - 2:41 pm | प्रसाद गोडबोले
अरे वाह !
तुम्ही pattern detection करायला लागला आहात हे पाहून आनंद झाला. :)
इतरही जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जानारे pattern लवकरच तुमच्या लक्षात येतील अशी आशा आहे.
1 Aug 2025 - 3:29 pm | स्वधर्म
एखादी कमिटी नेमून तिच्या कडून फक्त हवा तसा अहवाल आणला की झाले. यात आपले राज्य आणि केंद्र सरकार एकदम निष्णात आहे.
1 Aug 2025 - 5:55 pm | रामचंद्र
बंधयुक्त मालकी हक्कातून नैसर्गिक अधिवासातल्या मालकी हक्काकडील हे बळजबरीचे हस्तांतरण आहे, गडचिरोलीचे हत्ती गुजराथला नेले तसे. मग त्यातल्या त्यात पैसा घालून अंबानींनी किमान केरळमध्ये आपले केंद्र उघडावे म्हणजे किमान हत्तीला तरी बरे वाटेल. नाही तरी वनतारात प्राणी आनंदाने रहावेत अशीच अंबानींची इच्छा असणार. तर त्या त्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ठेवावे हे योग्य. म्हणजे हत्ती केरळात, पेंग्विन अंटार्क्टिकावर आणि सिंह गीरमध्ये याप्रमाणे. प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य असा बदल व्हायला हवा. आणि पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवणे, पक्षीविक्रीची दुकाने हे प्रकार पूर्णपणे आणि स्वयंस्फूर्तीने बंद व्हायला हवेत.
1 Aug 2025 - 6:33 pm | अभ्या..
प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य
इथे दोन्हिमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश असतो.
वनतारा जरी झू म्हणून लिहित असले तरी ते रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अॅनिमल्स आहे. तिथे सध्यातरी सर्वसामान्यांना प्रवेश नाहीये.
1 Aug 2025 - 8:13 pm | रामचंद्र
मग तर चांगलंच आहे की. किमान प्राणीदर्शनातून पैसे काढण्याचा प्रकार तरी नाही म्हणायचा.
2 Aug 2025 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१ सहमत...!
-दिलीप बिरुटे
1 Aug 2025 - 11:45 pm | प्रसाद गोडबोले
आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार सदर मठ त्या हत्तिणीला मोहरम मधील उरूस साठी भाड्याने देत असे .
बेकार हसतोय =)))))
सेक्युलॅरिझम च्या मृतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट मौन पालुयात=))))
अर्थस्य पुरुषो दास:
5 Aug 2025 - 3:52 pm | स्वधर्म
मुळात पाळीव नसलेले जंगली प्राणी पाळणे हेच प्राण्यांवर अन्यायकारक आहे. मग ते नांदणी मठ असो वा इस्कॉन वा वनतारा. प्राणी भाड्याने देणारे व घेणारे दोघेही दोषीच आहेत.
एकदा प्राणी पाळला, की त्याला नियंत्रणात ठेवणं आलं, मग माहूत आला व अंकुशही आलाच. त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)
5 Aug 2025 - 4:13 pm | अभ्या..
त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)
त्यापेक्षा मोट्ठी तपःश्चर्या १५ हत्ती वेळा भाड्याने दिल्याने नोंदी आहेत, त्यातल्या १४ मिरवणुका आणि गणेशोत्सव वगैरे सोडून एकच मिरवणूक मोहरमची तीही शेवटची (कारण इथे तेलंगणा पोलिसांनी हत्ती आणि त्याला वाहून नेणारे वाहन जप्त केले. त्या जप्तीच्या पंचनाम्यात हत्तीची हेल्दी अशी कंडीशन मेंशन केली आहे बरं का) इथे विषय डायव्हर्ट करण्यासाठी पहिजे.
5 Aug 2025 - 5:43 pm | स्वधर्म
अभ्या,
तुंम्ही अत्यंत रोचक माहिती बाहेर काढली आहे. दुवा द्याल तर फारच सोईचे होईल. मिरवणुकीत हत्ती भाड्याने देणे यात बराच पैशाचा व्यवहारही आहेच.
विषय डायव्हर्ट करणे हे अफलातून कौशल्य असले आणि बहुतांश लोकांच्या लक्षात येत नसले, तरी त्याचा न्याय व नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही.
5 Aug 2025 - 5:50 pm | अभ्या..
पेटाच्याच साईटवर आहे. माधुरी स्टोरी केलीय त्यांनी. अगदी स्क्रीन शॉट्स आहेत.
एकाखाली एक अशा दोन इमेजेस आहेत.
वरची इमेज गणेशोत्सवांच्या भाड्यांची लिस्ट, खालची एक इमेज मोहरम मिरवणुकीची.
अगदी धर्मच काढायचा तर मठ जैन आहे, गिर्हाईके हिंदू बहुसंख्य आहेत, एक मुस्लीम आहे. सेक्युलॅरिझम अजून काय वेगळा असतो.
सिलेक्टेड हवी तीच इमेज टाकण्यातला हेतू नीच असतो.
माहीती आहे तर सगळीच द्यावी.
.
पहा... सगळेच कळेल.
7 Aug 2025 - 8:53 am | स्वरुपसुमित
तेलंगणा
सांगलीचा हती एव्ढ्या लांब मिरवणुकीला ?
इकडे हत्ति नाहीत?
5 Aug 2025 - 6:59 pm | प्रसाद गोडबोले
माझ्या वरील प्रतिसादात माहुताच्या धर्माचा काडीमात्र उल्लेख नाही.
आणि तुम्हाला कळत नसलं तरी माझ्यालेखी हत्तीची देव स्वरूपात पूजा करणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमाला हत्ती पाठवणे आणि मुक्या जनावराला देवाच्यानावाने बळी देणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमात पाठवणे ह्यात जमीन आसमान च फरक आहे.
आणि तसाच फरक नांदणी मठ , इस्कॉन आणि वनातारा ह्यातही आहे. तुम्हाला फक्त त्या वणतारा त अंबानी अन् पर्यायाने मोदी दिसत असल्याने हत्तीचे स्थलांतर सहन झाले नाहीये इतकेच सत्य आहे !
आणि बरं झालं की तुम्हीच अंकुशाचा उल्लेख केलात. त्यावरून हेच सिद्ध होते की हत्तीला त्रास दिला जात होता आणि म्हणूनच हत्तीचे स्थलांतर करणे हाच निर्णय योग्य होता , आहे !
तुम्हाला वनतारा आवडत नसेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र टूतारा वन्यजीव रेस्सुक्यू सेंटर सुरू करा आणि आणि घेऊन जा हत्तीला.
फडणवीसांनी असे वन्यजीव रेस्सुक्यू अभियान सुरू केले तर त्यातही तुम्ही खोटंच काढणार आहात
!!
5 Aug 2025 - 8:26 pm | स्वधर्म
ते अभ्या यांनी बाकीच्या १४ वेळा ज्या धर्मांच्या मिरवणूकीत पाठवल्याची माहिती दिली आहे. तर जाता जाता तुमचं त्याबाबतही मत देऊनच टाका. का एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे?
बाकी ते मोहरमचा उल्लेख करणं, नेमका माहूताचा व अंकुशाचा फोटो त्यासोबत डकवणं परंतु यात विशिष्ट धर्माचा 'काडीमात्र' उल्लेख नाही आणि त्यावर रोख नाही असं म्हणणं यामुळे मला ताकाला जाऊन भांडे लपवणे ही म्हण आठवली. पण ते असो.
5 Aug 2025 - 9:43 pm | प्रसाद गोडबोले
होय. मी तर स्पष्टच लिहिले आहे की माझ्या प्रतीसादात .
माहूत एक व्यक्ती म्हणून त्याच्याशी काहीही विरोध नाही.
पण हेच लोकं देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात ही त्रिकालाबाधित सत्य आहे.
अशा लोकांना अहिंसा परमो धर्म: मानणाऱ्या जैन धर्मियांनी हत्ती भाड्याने देणे हेच पाप मानले गेले पाहिजे.
बाकी मलाही "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नाहाने" ही म्हण आठवली. :))))
5 Aug 2025 - 10:28 pm | स्वधर्म
तुमचा आक्षेप 'मुक्या जनावरांचा जीव घेतात ' याला असेल तर हा शाकाहार विरूध्द मांसाहार मुद्दा होईल, जो या धाग्यात पूर्णतः गैरलागू आहे. तो वाद वेगळा धागा काढून घाला.
तुमचा आक्षेप 'देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात' याला असेल, तर अशी प्रथा आजही हिंदू धर्मातही आहे. (मांढरदेवी, कालीमाता, बिरोबाची जत्रा' इ.
मग एकाच विशिष्ट धर्मावर रोख का?
बाकी तुमच्याबरोबर भेंड्या खेळायला मजा येत आहे तोपर्यंत खेळाव्यात असा विचार आहे.
5 Aug 2025 - 11:28 pm | प्रसाद गोडबोले
हो मग !
आहेच की. त्या हत्तीचा माहूत कोणी कालिमाता बिरोबा येथे बळी देणारा असता तरीही मी हेच म्हणेन. ( मांढरदेवीला बळी देण्याची प्रथा माझ्या माहिती नुसार बंद झाली आहे.)
आणि शाकाहार विरुद्ध मांसाहार हा मुद्दा कसा नसू शकतो ! हत्ती जैनांचा आहे . जैन धर्माचा पायाच अहिंसा आणि शाकाहार हा आहे.
अहो जे जैन संत चुकून देखील नजरेला न दिसणाऱ्या मुक्या जीवांची हिंसा होऊ नये म्हणून काळजी घेतात ते जैन लोकं पराकोटीच्या हिंसक लोकांना स्वतःचा देवस्थान च हत्ती कोणत्या भरोशावर पाठवतात !
हे असं ते न कळत पणे करत असतील तर मूर्खपणा आहे आहे कळून देखील करत असतील तर दांभिकपणा आहे. दोन्हीही परिस्थितीत बिचाऱ्या मुक्या हत्तीचे आयुष्य क्लेशकारक होत आहे.
ह्या असल्या क्रूर व्यवस्थेपेक्षा वनतारा हजारपतीने उत्तम !
2 Aug 2025 - 10:53 am | कपिलमुनी
वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे.
तिथलं वातावरण, तापमान , खाद्य हत्तीना अनुकूल नाहीये..
कर्नाटक केरळ असता तर ठीक.. तिथे हत्तींचा वावर आहे..
केवळ पैसे आहेत म्हणून माज..त्यात चौकीदार ही चोर है
2 Aug 2025 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे.
+१
-दिलीप बिरुटे
2 Aug 2025 - 10:57 am | कपिलमुनी
दुवा
हाडांचे आजार असल्याने गौरी नावाची हत्तीण "रेस्क्यू" करण्यात आले होती.. तिला ३ दिवस लग्नाच्या दारात शोभेसाठी उभे केले होते..
आता ३ दिवस असे उभे करणे यावर सरकार न्यायालय आणि. पेटा आवाज काढणार नाहीत
2 Aug 2025 - 11:17 am | प्रसाद गोडबोले
सुखद बदल !
ह्या हत्तीच्या निमित्ताने अंबानी आणि त्या आडून मोदींना शिव्या घालायचा जो एकांगी प्रकार चालला आहे त्यात सहभागी न होता तुम्ही PETA, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट , आणि एकूणच सरकार ह्या सर्वांवर समान तीव्रतेने टीका करत आहात हा बदल अत्यंत सुखावह आहे !
2 Aug 2025 - 4:16 pm | Bhakti
हत्ती. एक लघु निबंध
हत्ती हा largest land mamal आहे. त्याच्या African अणि Asian ह्या दोन प्रजाती आहेत. हत्ती हा एक pack animal आहे. पण natural setting मध्ये तो त्याच्या species मध्ये रहाणे पसंद करतो. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. पण अहिंसा परम धर्म वगैरे मानत नाही. Male elephants aggressive असतात. विशेषत: मदमस्त असताना. Females त्या मानाने docile असतात.
हत्ती हा प्रचंड intelligent अणि emotional प्राणी आहे. पण त्याच्या भावना अणि बुद्धी primarily survival instincts अणि primordial behavior वर चालते. हत्ती महाकाय असून relatively weak eyesight, sharp hearing and sense of smell plus ability to sense vibrations are their physical traits.
माणसाने हत्तीला godlike status दिले असले तरी हस्तिदंत करता शिकार करणे. युद्धात वापरणे. ओझी वाहाणे, Circus मध्ये खेळवणे. Zoo मध्ये ठेवणे. मिरवणुकीत फिरकणे असे abusive प्रकार हत्तीवर लादले जातात. हत्तीला विचाराल तर ह्यातील एकही गोष्ट तो स्वतःहून करणार नाही. त्याला ईतर हत्ती बरोबर चरत उंडारत फिरायला आवडत. त्याकरता तो आपल्या शेतात बागेत येतो.
पण हत्ती हा pet नाही. पाळीव प्राणी नाही. Domesticated नाही. तो trained and conditioned आहे बस्स. ही so called माणसाबरोबर Co exist होण्याची प्रक्रिया खूप क्रूर असते. विशेषत एव्हड्या अवाढव्य प्राण्याला हाताळायला अंकुश वापरावा लागतो. आणि आयुष्याचा बराच काळ captivity मध्ये घालवावा लागतो. साखळदंड सकट. नाहीतर पिंजरा किवा enclosure मध्ये. त्यांचे प्रजनन वगैरेही ईतर पाळीव प्राण्यांप्रमाणे माणसाना परवडत नाही. हत्ती पोसणे अफाट काम आहे हे खरंय.
Circus वाईट आहे. आता तिथे प्राणी वापरत नाहीत. Zoo पण बंद व्हायला पाहिजेत. Peting zoo आणि resorts वर पण नियंत्रण हवे. एव्हडच काय forest reserve वर पण बंदी यावी. हत्ती असो किवा वाघ तुमच्याबरोबर selfie काढायला आतुर नसतो. पण माणूस प्राण्याच्या हौसेला मोल नाही. ताब्याती एक हौस म्हणजे गणपती उत्सव. पण त्याने हत्तीला थेट त्रास होत नाही किवा कामाला लावल जात नाही.
पण temple elephant किवा मठाची हत्तीण हे एक occupation आहे. Petting zoo मधला हत्ती हेही एक occupation च आहे. Quality of life and conditions may differ. Bonded labour. Loosely put.
हत्तीला काय समजत नाही? आणि काय समजत? कोल्हापूर की जामनगर ही नावे समजत नाहीत. Habitat समजते. हत्तीला अम्बानी समजत नाही ना जिओ एयरटेल मधला फरक. हत्तीला नाव समजत नाही. Positive negative reinforcement , association, conditioning and response behavior समजतो. हत्ती court ची पायरी चढत नाही. त्याला पेटा माहिती नाही. पण वन तारा मधला हिरवे पण जाणवेल ईतर हत्ती दिसतील. मिळणारे जेवण उमजेल. हत्तीला attachment असते. पण ती Co dependency नसते. हत्ती माहूत मानतो आणि primary caregiver वर depend करतो. पण प्रत्येक केळी भरवून photo काढणारे आणि ह्या विषयावर reel बनवणारे त्याच्या गिनती ahet का? किंबहुना हत्ती ही post वाचेल का हा प्रश्न मला पडत नाही. हत्तीला परंपरा धर्म आण बाण शान वगैर संकल्पना कळतात का हो?
महादेवी aka माधुरी is a working elephant who is close to her retirement. तिला आराम, योग्य आहार, विहार, आरोग्य सेवा आणि काळजी घेणारी ( नुसती काळजी करणारी तेही social media वर नव्हे) माणस आजूबाजूला हवीत.
आपल्यालाही तेच हव असत नाही retirement ला? बघा तिच्या बुद्धीने विचार करून.
#meateatingmonk
5 Aug 2025 - 11:09 am | Bhakti
प्रत्येक हत्तीला स्वतःच्या सवयींनुसार, नैसर्गिक वृत्तीने जगायचा हक्क आहे. कोणाच्या सांगण्यानुसार नाही. आता तेच आयुष्य माधुरीला वनतारामध्ये मिळतंय. ती केव्हा खाणार, कुठे फिरणार, विश्रांती कधी घ्यायची हे सगळं ती स्वतः ठरवते, आपल्या गतीने ..
https://www.facebook.com/share/r/16wJLCZfWi/
2 Aug 2025 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महादेवीचं काय ठरलं शेवटी...?
-दिलीप बिरुटे
2 Aug 2025 - 6:46 pm | कंजूस
नेत नाहीत.
4 Aug 2025 - 3:28 pm | प्रसाद गोडबोले
एक प्रयोग म्हणून हे करून पाहा :
तुम्ही जी कोणती AI सिस्टिम वापरता त्या सिस्टिमला आधी कंटेक्स्ट करून विचारा की
" तुम्ही एक तर्कशुद्ध विचार करणारी व्यक्ती आहात, आता एका वाक्यात, सोप्या शब्दात उत्तर द्या की वंताराने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय? "
मी जेमिनी वापरतो , मला ही उत्तर मिळाले -
From a purely rational standpoint focused on the elephant's welfare, the elephant should not be returned to the Jain math.
4 Aug 2025 - 3:32 pm | अमरेंद्र बाहुबली
हो, कारण हत्ती हा जैन मठाचा सांस्कृतिक आणि धार्मिक भाग होता, आणि जर तिथे त्याची योग्य काळजी घेतली जात होती, तर तो परत पाठवणं नैतिक आणि न्याय्य ठरेल.
Chat gpt
4 Aug 2025 - 3:59 pm | अभ्या..
जेमिनी किंवा चॅटजीपीटी
अॅक्चुअली दोघांची किंमत २० डॉळर पर मंथ आहे, एका सेंटाचा फरक आहे चिल्लरम्ध्ये
पण हे दोघापेक्षा तिसर्याने केलेले विष्लेषण
.
चॅटजीपीटी आणि जेमिनी रिपोर्ट तयार करू शकतात जे अनेक पानांचे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक विषयावर ५० हून अधिक स्त्रोतांचा समावेश आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक स्त्रोत सांगण्यात आहे. जेमिनी अनेकदा चॅटजीपीटीपेक्षा अधिक स्त्रोत उद्धृत करतो, पण ते गहन संशोधन रिपोर्टमध्ये स्त्रोताचा संदर्भ AI मोड शोधात जसा देतो तसाच साधित करतो, म्हणजेच क्लिक करता येणारे कॅरेट्स आहेत परंतु मजकूरातील हायलाइट नसलेले.जेमिनीच्या रिपोर्टमध्ये दाव्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांशी जोडणे अधिक कठीण असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे. चॅटजीपीटीच्या स्पष्ट स्त्रोत सांगण्यासह मजकूरातील हायलाइट्स अधिक विश्वासार्ह आहेत. तथापि, जेमिनीकडे चॅटजीपीटीमध्ये नसलेल्या काही गुणवत्ता-वाढीच्या वैशिष्ट्यांची कमतरता आहे, जसे की एका क्लिकवर योग्य फॉरमॅटमध्ये रिपोर्ट Google Docs वर निर्यात करणे. त्यांचा तास देखील वेगळा आहे. चॅटजीपीटीचे रिपोर्ट विस्तृत फोरम पोस्टसारखे वाचन करतात, तर जेमिनीचे रिपोर्ट शैक्षणिक पेपरसारखे वाचन करतात.
.
बघा बाबा.
सीजेआय च्या जागी कुणाला बसवता आता?
4 Aug 2025 - 4:19 pm | Bhakti
वंताराने कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना लक्षात घेऊन जैन मठाचा हत्ती परत पाठवावा, जर मठ आणि गावकरी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत असतील.
4 Aug 2025 - 4:46 pm | प्रसाद गोडबोले
मराठीत प्रश्न विचारल्यास काही वेगळे उत्तर मिळते का हे तपासून पाहण्यासाठी मी मराठीत चर्चा केली जेमिनी सोबत :
पूर्णपणे तर्कशुद्ध विचारकरून आणि उपलब्ध माहिती पुराव्यांच्या विचार करून सोप्या शब्दात उत्तर द्या की वनतारा ने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय ?
>>>
माहिती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्तीण महादेवीचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य दिले गेले असल्यामुळे तिला जैन मठात परत पाठवू नये.
4 Aug 2025 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत ते हत्तीची काय काळजी घेणार?
5 Aug 2025 - 4:22 pm | रामचंद्र
अंबानींविषयी रोष असला तरी हे विधान योग्य नाही.
6 Aug 2025 - 8:44 am | प्रसाद गोडबोले
मुळातच व्यक्तीद्वेष हा त्यांच्या आणि त्यांच्या विचारांच्या लोकांच्या चर्चेतील मूळ मुद्दा असल्याने त्यांनी हे लिहिणे स्वाभाविक आहे.
वनतारा ही अंबानी ऐवजी रॉबर्ट वाड्रा चालवत असते तर एक चकार शब्द उच्चारला नसता त्यांनी.
मुळात हत्तीचे हित हे त्या रेस्क्यू सेंटर मध्ये जाण्यातच आहे हे कोणीही सुज्ञ मनुष्य समजू शकतो. आणि तसाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता त्यात काही खुसपट काढता येईना म्हणून अंबानी वर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे हे हत्यार त्यांनी उपसले आहे बस.
6 Aug 2025 - 6:54 pm | सुबोध खरे
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत
हा प्रतिसाद अत्यंत हीन दर्जाचा आणि एखाद्या आजारी व्यक्तीवर अन्याय करणारा आहे ज्या आजाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. .
6 Aug 2025 - 6:59 pm | अमरेंद्र बाहुबली
किती ते प्रेम पण? कोणता आजार आहे असा? तुम्ही त्यांचे पर्सनल डॉक्टर आहात की त्यांचे डॉक्टर रोज तुमच्या सोबत बसून तुम्हाला माहिती देतात? आणी मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे?
6 Aug 2025 - 7:20 pm | सुबोध खरे
मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे?
मी ही प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही.
कोणाच्याही शारीरिक व्यंगावर सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं.
5 Aug 2025 - 5:08 pm | चंद्रसूर्यकुमार
नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/cm-devendra-fadna...
5 Aug 2025 - 5:16 pm | अमरेंद्र बाहुबली
असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!
5 Aug 2025 - 5:21 pm | चंद्रसूर्यकुमार
हत्ती नाही रे.. हत्तीण.
5 Aug 2025 - 5:32 pm | अभ्या..
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मग सीएम पण गंडवताहेत की काय?
ते हत्ती म्हणताहेत.
5 Aug 2025 - 5:33 pm | अमरेंद्र बाहुबली
सुधारीत
झाले म्हणजे हत्तीण परत येणार नाहीये तर!
5 Aug 2025 - 5:34 pm | अमरेंद्र बाहुबली
सुधारीत
झाले म्हणजे हत्तीण परत येणार नाहीये तर!
5 Aug 2025 - 5:36 pm | चंद्रसूर्यकुमार
हे दोनदा लिहिल्यास ती परत येईल असे वाटून दोनदा लिहिले आहे का? ते काय असते ना- दोन निगेटिव्हचा गुणाकार एक पॉझिटिव्ह असतो की काहीतरी. :)
6 Aug 2025 - 11:31 am | चंद्रसूर्यकुमार
तासगावच्या गणपती देवस्थानच्या गौरी हत्तीणीसाठी अंबानींच्या वनताराकडून २ कोटींची ऑफर आली आहे. ती ऑफर आपण स्विकारणार नाही असे देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी म्हटले आहे. जर गौरी या हत्तीणीची योग्य ती काळजी घेतली जात असेल तर खरं तर तिला तिथून हलवायचे काहीही कारण नाही. त्यामुळे देवस्थान जर अंबानींची ऑफर नाकारत असेल तर चांगलेच आहे. पैशांसाठी त्यांनी गौरीला तिथे पाठवायलाही नको. https://marathi.indiatimes.com/maharashtra/sangli/tasgaon-gauri-elephant...
मी सांगलीत पाच वर्षे राहिलो आहे. सांगलीचे गणपती देवस्थान सांगलीचे पूर्वीचे संस्थानिक पटवर्धन यांचे कुटुंब बघतात. मेने प्यार किया वाली भाग्यश्री पटवर्धन त्याच कुटुंबातील. या पटवर्धनांचा तासगावच्या पटवर्धनांशी काही संबंध आहे की नाही माहित नाही. तर सांगायचा मुद्दा हा की सांगलीच्या गणपती देवस्थानात मी होतो तेव्हा बबलू नावाचा एक हत्ती होता. तो हत्ती सांगलीची शान मानला जायचा. वयोमानानुसार त्याचे निधन झाल्यानंतर सांगलीच्या गणपती मंदिराजवळच्या भागात दुखवटा म्हणून कडकडित बंद पाळण्यात आला होता. तासगावच्या त्या हत्तीणीविषयीही स्थानिक लोकांची तशीच आत्मियता असली तरी आश्चर्य वाटू नये.
केरळमध्ये पूर्वी गुरूवायूरच्या मंदिरात मोठे लोक हत्ती दान द्यायचे. जयललितांनीही तिथे हत्ती दान केला होता. नंतरच्या काळात तिथे इतके हत्ती झाले की देवस्थानला सांभाळणे कठीण झाले. त्यानंतर यापुढे दान म्हणून हत्ती स्विकारले जाणार नाहीत असे देवस्थानने जाहीर केले. आज तिथे कित्ती हत्ती आहेत याची कल्पना नाही. पण ते हत्ती पण असेच वनतारामध्ये नेणार का?
अशा देवस्थानात कुठेही हत्ती असले तर त्यांची योग्य ती देखभाल केली पाहिजे आणि त्यांची कुठेही आबाळ व्हायला नकोच. पण त्याचबरोबर असे हत्ती कुठेही हलवायच्या आधी स्थानिक लोकांच्या भावनांचाही विचार करायला हवा.
6 Aug 2025 - 11:46 am | प्रसाद गोडबोले
हत्ती हा पाळीव प्राणी नाही.
हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो.
किमान हिंदू , बौद्ध, जैन आणि शीख इत्यादी अहिंसा शांतताप्रिय भारतीय धर्माच्या लोकांनी हत्ती पाळण्याचा अट्टाहास करू नये. अगदीच हौस असल्यास गाय पाळावी.
- एक सनातनी हिंदू म्हणून तासगावच्या देवस्थानचा आणि विशेषत: ब्राह्मण म्हणून पटवर्धनांचा मी जाहीरपणे निषेध करतो.
6 Aug 2025 - 12:01 pm | चंद्रसूर्यकुमार
याविषयी कल्पना नाही. मात्र आपल्याकडे राजेरजवाडे आणि श्रीमंत लोकांकडे हत्ती ठेवायची परंपरा होतीच. अगदी चंद्रगुप्त मौर्याकडे हत्ती होते- सेल्युकस निकेटरने त्याला ५०० हत्ती दिले होते असे उल्लेख आहेत असे वाचले आहे. शिवाजी महाराजांकडेही हत्ती होते. आनंदाच्या प्रसंगी हत्तीवरून साखर वाटणे हे पण अगदी कॉमन होते. सगळीकडे अशी क्रूर वागणूक हत्तींना दिली जायची का?
काहीही असले तरी एक प्राणीप्रेमी म्हणून कोणत्याही प्राण्याला कधीही कुठेही वाईट वागणूक दिली जाऊ नये हे नक्कीच.
(शाकाहारी) चंसूकु
6 Aug 2025 - 5:14 pm | स्वधर्म
हा धागा काढताना, हे जे हत्ती अगदी पार सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन वनतारालाच पाठवायचा प्रकार चालू होता तो तसा का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होता. बर्याच मिपाकरांनी अतिशय उत्तम माहिती व दुवे दिलेले आहेत. हत्तीसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास हाच सर्वात हिताचा या मताशी मी सहमत आहे. परंतु काही सदस्य ती वनतारात गेली ते तिच्यासाठी जास्त चांगलं (हजारपटीने) असे म्हणत आहेत. इथे आणि इथे. तिथले हवामान निश्चितच केरळ किंवा काझीरंगा, आसाम यांच्याइतके हत्तींसाठी नैसर्गिक नाही.
कपिलमुनी म्हणत आहेत तसे, ईशान्य भारतातील अनेक ठिकाणांहून हत्ती वनताराला पाठवण्यात आले आहेत. त्याचा एक पॅटर्न दिसून येतो.
हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी - प्रशांत कदम यांचा रिपोर्ट
https://youtu.be/gE6GqvWwGUo?si=CgSnd9Bg8O7rlaT_
शिवाय साम दाम दंड भेद याचा वापर कसा केला जातो ते आपण माधुरीच्या बाबत पाहिलेच. ईथे तासगांवच्या हत्तीबाबत कसा डाव रचण्यात आला होता ते विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहे. सुदैवाने त्यांना माहुताच्या किंवा वैरण पुरवणार्याच्या धर्माविषयी आकस नाही जसा इथल्या तथाकथित अध्यात्म पूर्ण समजलेल्या सनातनींना आहे.
तासगावच्या हत्तीवर वनताराचा डोळा? ३ कोटीची ऑफर? ।। वज्रधारी न्यूज ।।
मला कोणत्याही धर्मासाठी, परंपरेसाठी अशा प्रकारे हत्तीला वेठीला धरलं जावं हे योग्य वाटत नाही. परंतु सगळं कसं वनतारातच पाठवण्यासाठीच घडून येतं, ते तितकं साधं सोपं सरळ वाटत नाही. पैसा ही शक्ती आहे, पण ज्यावर नजर पडेल, ते माझं असं असेल, तर अवघड आहे. उद्या पुणे महापालिकेला पाणी नीट स्वच्छ ठेवता येत नाही म्हणून कोणीतरी कोर्टातून खडकवासला धरणसाखळी मालकांकडेच द्या असं म्हणून कोर्टात जातील आणि त्याना हवा तसा निकालही लागेल. नागरिक कधी जागे होणार?
6 Aug 2025 - 5:28 pm | अभ्या..
सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात नॉर्मल्च म्हणा, न्यू नोर्मल असावी) वाटणारी गोष्ट म्हणजे, राजू शेट्टींच्या म्ह्णण्यानुसार नांदणी मठाला हत्तीणीच्या बदल्यात दोन कोटी देणगी /किवा मठाचे बांधकाम ही ऑफर दिली आहे ती पेटाच्या खूशबू गुप्ता ह्यांनी. आणि पेटा स्वतः सांभाळ करणार नाहीचेत. मग कुणाचे दोन कोटी? कशासाठी अशी सुपारी?
प्लान्ड सिस्टिमॅटिकली लीगल एनकाउंटर झाले हे लिटरली.
.
6 Aug 2025 - 5:33 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
6 Aug 2025 - 6:37 pm | स्वधर्म
खरोखरच परिस्थिती चिंताजनक आहे. भक्तांना स्टॉकहोम सिंड्रोम झालाय का?
Stockholm syndrome is a psychological response where hostages or abuse victims develop positive feelings and an emotional bond with their captors or abusers. It's a coping mechanism where victims align with their captors to reduce the perceived threat and increase their chances of survival. The term originated from a 1973 bank robbery in Stockholm, Sweden, where hostages formed an emotional bond with their captors.
6 Aug 2025 - 6:59 pm | प्रसाद गोडबोले
?
2029 च्या निवडणुकांच्या नंतर. कारण तो पर्यंत तुम्हाला असले धागे काढायला काहीना काही खुसपट कारणं मिळतच राहतील !
बाकी मुख्यमंत्री श्री. फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हत्ती परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणे. शिवाय सरकार हत्तीला सुविधा पुरवणार म्हणे .
#लाडकी हत्तीण योजना
मुंबईत देखील सरकारी खर्चाने कबुतरांना खायला देणार आहेत म्हणे =)))) त्यावर एक लेख पाडा की आता.
फुल मजा आहे पुढील काही वर्षे =))))
6 Aug 2025 - 10:49 pm | रामचंद्र
या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे कृती करावी असे कोणीच म्हणत नाही. मुख्यमंत्रीसुद्धा जनभावना जपण्यासाठी सरकार मठाच्या बाजूने आहे, असेच म्हणत आहेत. लोकांचा विरोध एक धनदांडगा सरकारला आणि एका संस्थेला हाताशी धरून बळजबरीने हत्तीचे अपहरण करत आहे, या गोष्टीला आहे. त्या मठाच्या निमित्ताने लोक हत्तीमागे तरी उभे राहिले. गडचिरोली जिल्ह्यातल्या इंद्रावती नदीकाठचे हत्ती गुजराथला कधीच पोहोचले पण त्यांच्यासाठी कुणी लढा दिला नाही. मुळात मठात हत्तीला बरे वाटते की नाही, हे समजत नाही. पण गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. मग त्यांना उचलून गुजराथमध्ये नेणे, हे तर नक्कीच चुकीचे म्हणता येईल. खरे तर या बाबतीत मेनका गांधींनी आवाज उठवणे अपेक्षित आहे. पण पक्षश्रेष्ठींपुढे काही चालत नसावे, किंवा मुलाच्या वाटचालीत अडथळा नको म्हणून गप्प बसावे लागत असावे.
आणि केरळमधल्या त्या aty
7 Aug 2025 - 5:38 am | कर्नलतपस्वी
गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते.
सहमत,असतीलही परंतू संख्या जास्त झाली,किंवा इतर अनेक कारणे असू शकतात.
हत्ती पोसणे किती खर्चिक आसते हे वेगळे सांगावयास नको. मठाकडे भरपूर पैसा असणार. मठ,साधू,संन्यासी निसंग,निर्मोही असायला पाहिजेत पण ते तर संस्थानिका पेक्षाही मोठे.
अफ्रिकेतून बिबटे आणले व मध्यप्रदेश मधे सोडले तेव्हांही कुणी आवाज उठवला नाही.
एवढी आरडाओरड फक्त राजकिय दृष्टीकोनातून आहे.
बाकी व्यक्ती परत्वे वेगळा दृष्टिकोन असणार पण व्यक्तीद्वेश मात्र असू नये.
7 Aug 2025 - 11:15 am | श्वेता व्यास
अंबानी, मठ आणि सरकार सगळे एक झाले, आपण बसू भांडत :D
7 Aug 2025 - 12:38 pm | Bhakti
:(
खरोखर भारतात सूज्ञ सामान्यांच्या मताला काहीच किंमत नाही.सगळेच स्वार्थी भासत आहेत.
7 Aug 2025 - 11:25 am | अमरेंद्र बाहुबली
हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? आपण सर्व मिपाकर मिळून एक छोटा हत्ती पाळुयात, तो मोठा झाल्यावर अंबानीला विकून पैसा कमावू, मिपावर तसेही अनेक रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक आहेत ते हत्तीची निगराणी करतील, हत्तीला मूवी काकांच्या शेतात ठेवू, डॉक खरे हत्तीची तब्येत पाहतील, चंद्रसूर्यकुमार अर्थतज्ज्ञ आहेत जमा खर्चाचा हिशेब ठेवतील.
7 Aug 2025 - 12:10 pm | आग्या१९९०
नक्की हत्तीच ना? देखभाल करणाऱ्यांची नावे बघून जास्तीत जास्त कागदी वाघ बनू शकेल.
7 Aug 2025 - 12:38 pm | Bhakti
तुम्ही पुरूष लोक कशातही बिजनेस दिसतो राव तुम्हाला...हा हा!
7 Aug 2025 - 1:41 pm | स्वधर्म
.
7 Aug 2025 - 3:46 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा
भारी कल्पना बाहुबली !
ह्या बाबतीत आम्हीही तुमच्या सोबत आहोत :))))
7 Aug 2025 - 1:28 pm | कंजूस
कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत घेतला तर आपल्या पोटात का दुखावे?
रानटी हत्ती पाळीव करण्यासाठी क्रूरपणा करतात हे मान्य . पण अशा पाळीव प्राण्यांना/ हत्तींना पिल्ले होतात ती अगोदरपासूनच पाळीव असतात. दक्षिणेत बऱ्याच देवळांत असे हत्ती आहेत आणि त्या देवस्थानाला दिलेल्या देणग्यांतून हत्तींचा खर्च भागतो. पिढ्यानपिढ्या माहूत असतात आणि त्यांचे हत्तींशी संबंध फारच कौटुंबिक असतात. या देवळातल्या हत्तींकडून काही लाकडाचे ओंडके ओढणे वगैरे काम नसतं. देवळांत आठ ते बारा आणि पाच ते सात उभे राहून भाविकांना आशिर्वाद देणे हेच काम. आता प्राणी कोणताही म्हटला की त्याला आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू आलेच.
महाराष्ट्र सरकारने ती हत्तीण अंबानीकडून परत आणली तरी जैन मठवाले घेणार नाहीत. मग सांभाळणार कोण? मठवाल्यांना हा हत्ती नव्हे तर एकूण हत्तीच ठेवायचा नसेलही. म्हणून तो निर्णय घेतला असेल.
7 Aug 2025 - 1:48 pm | स्वधर्म
लोकसत्ताची बातमी:
https://www.loksatta.com/kolhapur/kolhapur-public-representatives-welcom...
'जनभावना लक्षात घेऊन' असे सर्व लोक, वनताराचे मु. का. आ. इ. म्हणत आहेत. १० हजाराहून जास्त जिओ सिम परत करणे, रिलायन्सच्या पंपावर पेट्रोल न भरणे याही गोष्टी 'वर' पर्यंत गेल्या असतीलच.
7 Aug 2025 - 3:38 pm | अमरेंद्र बाहुबली
गाव करील ते राव काय करील? पैसा, सत्ता, अंबानी, पेटा नी माजलेले सत्ताधीश नी त्यांचे मीपावरील समर्थक ह्यांच्या नाकावर टिच्चून लढा देऊन हत्तीण परत आणाऱ्या कोल्हापूर करांचे अभिनंदन! :)
हत्ती पळवणारी टोळी तरीही सुधारेल असे वाटत नाही.
7 Aug 2025 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले
करणार शंभर टक्के अभिनंदन करणार !
फक्त हत्ती परत यायची वाट पहात आहे. एकदा का हत्ती परत आला की मिपावर लेख लिहिणार !
अहो लोकोत्तर असा हा क्षण आहे, असेल. धर्मसत्तेने राजसत्तेवर मिळवलेला विजय असेल हा . आजवर सरकारने शाहाबानो साठी सुप्रीम कोर्टाला तोंडावर पाडल्याचे पाहिले होते, आता पहिल्यांदाच "जनभावनेचा" रेट्याने "महादेवी" साठी देखील सुप्रीम कोर्ट आणि सर्व व्यवस्था चारीमुंड्या चीत करता येऊ शकते हे सिद्ध होईल.
आता हत्ती परत येण्याची वाट पाहूयात फक्त !
7 Aug 2025 - 1:57 pm | कपिलमुनी
उद्या एखादे गरीब आईवडील मुलांची काळजी घेउ शकत नसतिल तर सरकारने मुलांची पण सोय करावी ..
ती पोरे पण काढून घेऊन कोणाला तरी संभाळायला द्यावीत ( परदेशात अशी सोय आहे म्हणे )
7 Aug 2025 - 10:30 pm | रामचंद्र
मठाची हत्तीण यावरून आठवलं, पूर्णचंद्र तेजस्वींची उमा कुलकर्णी अनुवादित 'कृष्णेगौडाची हत्तीण' कुणी वाचली आहे का? अस्सल भारतीय परिस्थितीचं वास्तव हसतखेळत उभं केलं आहे. अंदाजे वीसएक वर्षांपूर्वी एका साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.
8 Aug 2025 - 11:27 am | Bhakti
.
-माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या?
-नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का?
-मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे.
- हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.
8 Aug 2025 - 12:39 pm | अमरेंद्र बाहुबली
वनताराच का?
8 Aug 2025 - 1:19 pm | Bhakti
बरं मग,या वनतारा आधी अशा हत्तींना ज्या ठिकाणी उपचारांसाठी पाठवले जायचे तिथे माधुरीला या आधी का पाठवले नाही?
वनतराला हत्ती बळकावयाचे असतील तर ,तिथल्या सगळ्याच हत्तींना बरं झालं की तिथून जंगलात पाठवा यासाठी आंदोलन का नाही करावं मग?
एकाच हत्तीसाठी काळेबेरे वाटत नाही का?
8 Aug 2025 - 1:23 pm | अभ्या..
खरंच ताई. फार भाबड्या आणि निर्मळ मनाच्या आहात तुम्ही.
.
जपून राहा, दुर्मिळ प्रजाती होतेय ही.
8 Aug 2025 - 12:56 pm | अभ्या..
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे.
चला.... हुडका जरा मोक्याची तीनचारशे एकर जागा निसर्गरम्य कोल्हापूरजवळ..
अरे ते राधानगरी आहेच की. बघा त्याला कपांऊंड टाकून वनतारा झाले आता टूतारा ची कोनशिला ठेवता येते का सीएम साहेबांच्या हस्ते.
8 Aug 2025 - 4:07 pm | Bhakti
अच्छा वनतारा पार्ट -२ का? घ्या आता, महाराष्ट्राने स्वतःच्या पायावर धोंडा मारला आहे का मग?
8 Aug 2025 - 1:13 pm | अभ्या..
माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या?
-नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का?
-मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे.
- हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.
अगदी कुठल्या जंगलात, अभयारण्यात, प्राणीसंग्रहालयात किंवा शासनाच्या प्राणी उपचार फॅसिलिटीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध असतात?
बरं ठिक आहे, सध्या हत्ती आजारी आहे त्याच्यावर उपचाराची गरज आहे तेम्व्हा हे उपचार करुन तो ठिक झाला तर डिसचार्ज ची सोय असणार आहे का? म्हणजे एकवेळ तुम्ही मठात त्रास होतोय हत्तीला असे कन्सीडर करुन तेथून हलवले तर दुसरे कोणते नैसर्गिक ठिकाण (लाईक केरळ, कर्नाटक, तमिळनाडू वगैरे) बघून तेथे सोडून देणार आहात का?
का तेही सगळ्यात बेस्ट वनतारा?
8 Aug 2025 - 1:27 pm | Bhakti
हत्तीण म्हातारी झाली आहे ओ,जंगलात डायरेक्ट कसं पाठवणार.आणि पाठवलं तरी काही अडचणी येऊ शकतील.तज्ञांचे मत हा तर प्रकारचं गावकरी,मठावाले पाहत नाहीयेत.
8 Aug 2025 - 3:05 pm | स्वधर्म
मठाने ३३ वर्षांपूर्वी हत्तीचे पिल्लू आणले होते. हत्तीचे आयुष्यमान ७०+ वर्षे असते. म्हणजे माधुरी चाळीसच्याही आत आहे.
मी वर दिलेलाच व्हिडिओ पुन्हा पहा
Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता?
यात ३ मिनिटानंतर सांगितल्याप्रमाणे वनताराने पद्मावती हत्तीण ही आसाममधून हजारो किमीचा प्रवास करून जेंव्हा वनताराला नेली, तेंव्हा ती ५५ वर्षांची असून गरोदर होती. तिचा हा सगळा प्रवास गरोदर अवस्थेत केला गेला.
त्यामुळे माधुरी हत्तीण म्हातारीआहे असे म्हणता येणार नाही.
पण तुंम्ही वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा:
जानेवारी २०२५ मधील बातमीनुसार वनताराने अरूणाचल प्रदेशमधून एका वेळेस २० हत्ती नेले आहेत. त्यात एक बछडाही होता. आता हे सगळे हत्ती अर्थातच म्हातारे नाहीत.
२०२१ पासून वनताराने ३९ हत्ती फक्त अरूणाचल प्रदेश मधून नेले आहेत.
आजमितीला सदर याचिकेच्या बाबत वनताराने स्वतःच कोर्टात त्यांच्याकडे असलेल्या हत्तींची संख्या २३८ सांगितली आहे.
तरी पण तुंम्ही या प्रकाराकडे इतकं सरळ बघत असाल तर, अभ्या यांनी म्हटल्याप्रमाणे खूप भाबडा किंवा पक्षपाती दृष्टीकोन आहे.
बाकी मठातील लोक काळजी घेतात का? घेऊ शकतात का, हे तज्ञच ठरवू शकतील. पण दोन बाजू मठाच्या बाजूच्या आहेत.
१. माधुरी तिथे गेली ३३ वर्षे जगली आहे.
२. गावकृयांचे तिच्यावर खरोखर प्रेम आहे हे स्पष्ट दिसते आहे. नाहीतर कोण पूर्ण वर्षाचा रिचार्ज भरला असताना जिओचा फोन परत करेल?
टीपः असे असले तरी हत्ती हा कळपात रहाणारा व जंगली प्राणी असून त्याला एकट्याला माणसांनी व मानवी वस्तीत पाळणे, मग त्याच्यावर कितीही प्रेम असले तरी अन्यायकारक आहे.
बाय द वे: भारत सरकार ला एक वनखातं असतं, त्याला एक मंत्री असतो. त्यात अनेक आय एफ एस अधिकारी बंगला गाडी व नोकर दिमतीला असे रहातात असे ऐकून आहे. त्यांचा याच्याशी काही संबंध नाही का?
8 Aug 2025 - 3:48 pm | Bhakti
बरं ती म्हातारी नाही ?
३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,जे वयानुसार नाही नसेल पण अकाली म्हातारपणासारखेच आहे.
पण आजारीही नाही का?
का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत?
मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.पण वनतारा हे मुद्दामहून हत्ती बळकावत आहेत तर सर्वच हत्तींची वनिताला मधून थेट जंगलात मुक्तता करावी यासाठी आता माणूसकी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी मोहिम उघडावी.
तिला कोल्हापूरला आणून काय हाशील होणार काय माहिती?
परत तेच म्हणते
"झेपत नाही तर हत्ती पाळू नये" आणि वनताराला सांगेन की "कशाला पैशे वाया घालवता,ज्याचा हत्ती ते पाळतील नाहीतर भाड्याने देतील , तुम्हाला काय करायचं?कशाला हत्तींना ५ तारांकित सुविधा देता,जाऊ द्या की उडत"
8 Aug 2025 - 4:14 pm | अभ्या..
मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.
म्हणूनच म्हणले आहे. भाबडेपणा सोडा.
नुसती चार भिंती व छप्पर म्हणजे घर अशी व्याख्या केली तरी त्यात झोपडी, बंगला, शाळा, हॉटेल, बस स्टॅन्ड, दवाखाना, वेड्यांचा दवाखाना, तुरुंग, स्मशान असे सगळे येते. प्रत्येक ठिकाणच्या मालक्या, तिथे जायचे/राहायचे/ आणि मुख्य म्हण्णजे परत यायचे नियम असतात. तिथे कुणाचा हुकूम चालतो हे ही महत्त्वाचे असते.
.
तसेच मोकळी जागा, सार्वजनिक जागा, खाजगी जागा, प्राणीसंगहालय, प्राण्यांचा दवाखाना, अभयारण्य, वनक्षेत्र आणि खरे जंगल ह्या सर्वातला (त्यातही सर्व खाजगी आणि सरकारी) फरक समजून घ्या.
.
साधारणपणे लक्षात आला फरक की सांगा. इल्लीगल वाईल्ड अॅनिमल ट्रेडिंग मधले अगदी लेटेस्ट रिपोर्ट च्या लिंका देईन तुम्हाला.
सोबतच रिपोर्ट बनवणार्यांना कशा लगेच अनंत लीगल नोटीसा आल्या त्याचीही लिंक देईन.
.
काय म्हणता?
8 Aug 2025 - 4:26 pm | स्वधर्म
>> का वनविभागातील डॉक्टरही गावकऱ्यांना,अंबानीला फसवत आहेत?
या व्हिडिओत स्पष्ट सांगितलेले आहे, की वनविभागाच्या डॉक्टरांचा महादेवी निरोगी असल्याचा रिपोर्ट बाजूला ठेवण्यात आला व हाय पेटाच्या याचिकेनंतर पॉवर कमिटी नेमण्यात आली होती, त्यांनी वेगळा रिपोर्ट दिला.
Nandni Elephant Kolhapur: जैन मठातील हत्ती अंबानींच्या वनतारात, नांदणीच्या महादेवीचं काय होणार?
बाकी
>> ३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते
या बाबत मी आधीच सहमती नोंदवली आहे.
पण 'तुंम्ही अजूनही अंबानी बिचारे किती प्रेमाने हत्तीला सुविधा द्यायला गेले होते, किती उदात्त विचार होता' यातून बाहेर येणार की नाही? अख्या भारतातून हत्ती कसे वनताराला नेले जात आहेत, याचे वर दिलेले संदर्भ तरी बघा.
Madhuri Elephant Kolhapur: मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघणार? माधुरी परतण्याची किती शक्यता?
8 Aug 2025 - 4:43 pm | Bhakti
घटनाक्रम असा आकलनात येतोय.
म्हणजे माधुरी ठणठणीत होती,तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके.
पुढे गावकऱ्यांनी आंदोलन केले ,ओके
आता हत्ती परत गावात येणार ,ओके
पण २०० एकर जागा महाराष्ट्राची बळकवणार(जे आता सांगितले जात आहे),नॉट ओके
आता मठाने सरळ कोर्टात जाऊन हत्ती बरा झाला की सरकारी/मोकळ्या जंगलात सोडावा अशी केस करावी.तर खरंच सर्व हत्तींना न्याय मिळेल.
अहो,आजारी माणसाला थेट जंगलात सोडता येते का?(तुमच्या म्हणण्याप्रमाणे आजारी असल्याचा रिपोर्ट खोटा पण आरोग्याविषयी कोणतीच रिस्क आजारी असणाऱ्यांच्या जवळची व्यक्ती घेत नाही,या दृष्टिकोनातून मी तिला मानसिक आजारी (एकटी) तर नक्कीच समजते)
नाही मग वनतारात जायची वेळ यायच्या आधी आम्हाला ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा हा मोठेपणा सर्वांनी ज्यांनी हत्ती पाळला त्यांनी घ्यावा ,हीच आता कळकळीची विनंती आहे.
थांबते आता,माधुरी देव तुला खूप आरोग्यदायी आयुष्य देवो! _/\_
8 Aug 2025 - 4:53 pm | स्वधर्म
>> ती मुक्त पाहिजे तिला जंगलात सोडा
याबाबत मी आधीच सहमत आहे. गावकर्यांचे कितीही प्रेम असले तरी जंगलातील राहणे तिच्यासाठी मठापेक्षा चांगलेच आहे असे मी अनेकदा म्हटलेच आहे.
>> तिला अंबानीनेने विकत घेतलेल्या यंत्रणेमुळे वनाताऱ्यात हलवले,ओके.
याला तुंम्ही ओके म्हणत आहात, माझेही तेच म्हणणे होते.
8 Aug 2025 - 5:01 pm | अभ्या..
३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,
मला तर हे वाक्य वाचल्यापासूनच आमच्या राहुल्यासह तमाम ब्रह्मचार्यांची काळजी वाटू लागली.
पण नंतर विचार केला प्राणी आणि माणूस ह्यात काही फरक आहे की नाही. मग जाणवले धागा त्या फरकावरच तर आहे.
8 Aug 2025 - 5:09 pm | आग्या१९९०
रावल्या बँकॉकला जातो असे कोणीतरी म्हणेल इथे.
9 Aug 2025 - 6:53 pm | कॉमी
गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे हत्तीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जातीये असे असेलच असे नाही. कितीही प्रेम असले तरी शेवटी हत्तीची काळजी घेण्याचे कसब, रिसोर्सेस त्यांच्याकडे असतीलच असे नाही.
एकूण हया चर्चेत मला असे वाटले -
अंबानीचे नाव आल्यावर जे कोणी "मठात हत्तीची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही" असे मत देणाऱ्या सगळ्या संस्था, व्यक्ती ऑटोमॅटिकली बायस्ड आहेत असा सूर जाणवला. हे फारसे पटले नाही. समाजमाध्यमांत दिसणाऱ्या फोटो आणि व्हिडीओज वरून मठात हत्ती टूणटूणीत आहे असा निष्कर्ष घाईघाईचा वाटतो.
9 Aug 2025 - 9:37 pm | स्वधर्म
बरोबर! प्रेम असणे वेगळे, काळजी घ्यायची क्षमता असणे वेगळे व हत्तीसाठी माणसांत रहावे लागते हे ही वेगळे!
हा लेख लिहिताना मलाही फक्त मठ व नांदणीचे गावकरी यांच्यावर अन्याय झालाय असे वाटत होते. पण जसजशी चर्चा पुढे गेली तसतसे काही सदस्यांच्या प्रतिसादामुळे हत्तीवरही कसा अन्याय होत होता हे लक्षात आले. मिपाचे हेच तर वैशिष्ट्य आहे. अर्थात आपले म्हणणे अधिक माहिती मिळाली तर बदलण्याची लवचिकता हवी.
हे सगळे केवळ माणसाच्या हट्टासाठी, भावनेसाठी व हौसेसाठी असते असे लोकसत्ताचा आजचा अग्रलेख म्हणतो. माधुरी हत्ती व मुंबईतली कबुतरे या दोन वादांच्या संदर्भात.
भूतदयेचे भूत
8 Aug 2025 - 2:37 pm | कपिलमुनी
पुष्पक विमानातून फिरत असताना राधिका नामे भार्येने अनंतास पृच्छा केली ,
ही खाली गर्द हिरवी वनराई दिसते ती कोणती बरे ?
अनंत वदला , करवीर नगरीहून काही कोस दूर असलेले हे राधानगरी नावाचे निबिड अरण्य आहे , इथे वेगवेगळे पशु पक्षी रहतात,
त्या अरण्यावर मोहीत होउन ती स्त्री म्हणाली, नाथ ..मजला या अरण्यात निवास करायचा आहे .
अनंत करवदला, "करवीर नगरीची माणसे लई वांड ! हित पैसा नाय माणुस्की बघत्यात"..
नाथाचे हे बोलणे ऐकून राधिका रुष्ट झाली .. भार्येचा म्लान मुखकमल पाहून अनंतास गमेना..
सर्व पिझ्झा , बर्गर त्यास तॄणासमान भासू लागले..
अरण्य तर हवे पण कोल्हापूरकर तर लैच हार्ड अशी त्याची द्विधा मनस्थिति झाली..
तेव्ढ्यात त्याला नारदमुनींची आठवण झाली.. फोन फिरवताच मुनी हजर झाले , मनीची व्यथा ओळखली .. म्हणाले, राजन , अशी स्कीम करा की कोल्हापूरकरांनी २००-३०० एकर स्व:ताहून तुम्हाला द्यायला हवी..
नारदाने अनंताशी कानगोष्ट केली आणि गालातल्या गालात हसत अंबानी पुत्राने पेटास्त्र बाहेर काढले ..
---------------------------------------------------------------
बाकी तुम्ही सूज्ञ आहातच .. आता वनतारा पार्ट २ सूरू झाला की भेटू
8 Aug 2025 - 3:00 pm | Bhakti
तुमच्या जंगलात नेऊ नका, आमच्याकडे मोकळी जागा मागू नका.साखळदंडात राहू द्या हत्ती ,एकटा रडत डोलत.
ह्यांना म्हणे माणूसकी,आणि म्हणे अंबानीच तेवढा व्यापारी!!
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??
8 Aug 2025 - 3:12 pm | स्वधर्म
आपल्या प्रतिसादाची चुकामूक झाली. पण हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासाशिवाय व एकटे ठेऊ नये याबाबत सहमत आहे. प्राण्याच्या लैंगिक सुखावर माणसाच्या हौशीसाठी घाला घालणे कमालीचे क्रूर आहे.
पण... वनताराच का? केरळ, काझीरंगा, अरूणाचल, आसाम, त्रिपुरा ही भारतीय वनखात्याच्या अखत्यारितील ठिकाणे का नकोत?
9 Aug 2025 - 6:57 pm | कॉमी
पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला तर जगणार नाही.
वनतारा मध्ये बऱ्यापैकी नैसर्गिक अधिवास आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल.
9 Aug 2025 - 8:17 pm | अभ्या..
ओह्ह्ह्हो,
जरा उशीर केला मालक तुम्ही.
हत्ती तर परत येणारेच आहे, सोबत नांदणीला सरकारमान्य अंबानींच्या वनताराची सॅटेलाईट सेंटरची ग्रँड ऑफर घेऊन आलाय.
नुसती लक्ष्मी न्हाई, गजान्तलक्ष्मी हाय गजान्तलक्ष्मी..
9 Aug 2025 - 8:27 pm | अमरेंद्र बाहुबली
हत्तीच्या तब्येतीची काळजी वनताऱ्याला पळवून नेल्यावरच कशी झाली? आणी खरोखर काळजी असेल तर वनताराच का? स्थानिक डॉक्टरनी हत्तीची तब्येत चांगली आहे असा रिपोर्ट दिला, तरीही तो रिपोर्ट झिडकारून सत्तेचा गैरवापर करून हत्ती पळवणे समर्थनीय का?
9 Aug 2025 - 9:45 pm | स्वधर्म
मलाही एका वन्यजीवांचा अभ्यास असलेल्या व्यक्तीने सांगितले की जंगली हत्तींना सगळी झाडे, पाणी, खायला कुठे मिळेल व त्याच्या वाटा माहित असतात. ऋतूमानानुसार हे सगळे त्यांना माहित असते. त्यामुळे एका हत्तीला सोडले तर तगेल की नाही हा प्रश्नच आहे.
एकट्या नंतर सोडलेल्या हत्तीला इतर हत्ती कळपात सामावून घेतील का हाही प्रश्नच आहे.
8 Aug 2025 - 3:51 pm | अमरेंद्र बाहुबली
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??
तरी पण मग झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??
8 Aug 2025 - 4:49 pm | अमरेंद्र बाहुबली
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??
तरी पण वनताराच का?
9 Aug 2025 - 10:38 pm | रीडर
या मठ, गावकरी वगैरे लोकांचा कांगावा बंद करून हत्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जिथे नीट काळजी घेतली जाईल तिथेच तिला राहू द्यायला हवं.
या लोकांनी तिची काळजी काय घेतली ते दिसतयंच. वनतारा मध्ये या मठापेक्षा नक्कीच चांगलं आयुष्य मिळेल तिला. स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांना त्रास देणं बंद करायला हवं.