✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आले अंबानीच्या मना

स
स्वधर्म यांनी
Wed, 07/30/2025 - 19:38  ·  लेख
लेख
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती. 2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता. नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्ति‍णीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही. नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्ति‍णीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे. आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्ति‍णीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे. नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0 या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23420 वाचन

💬 प्रतिसाद (141)

प्रतिक्रिया

अंहं

अभ्या..
Fri, 08/01/2025 - 18:33 नवीन
प्राणिसंग्रहालय हा प्रकार हळूहळू बंद करून अभयारण्य इथे दोन्हिमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश असतो. वनतारा जरी झू म्हणून लिहित असले तरी ते रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर अ‍ॅनिमल्स आहे. तिथे सध्यातरी सर्वसामान्यांना प्रवेश नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

मग तर चांगलंच आहे की. किमान

रामचंद्र
Fri, 08/01/2025 - 20:13 नवीन
मग तर चांगलंच आहे की. किमान प्राणीदर्शनातून पैसे काढण्याचा प्रकार तरी नाही म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/02/2025 - 16:37 नवीन
+१ सहमत...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

आत्ताच हाती आलेल्या माहिती

प्रसाद गोडबोले
Fri, 08/01/2025 - 23:45 नवीन
आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार सदर मठ त्या हत्तिणीला मोहरम मधील उरूस साठी भाड्याने देत असे . बेकार हसतोय =))))) Image removed. सेक्युलॅरिझम च्या मृतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट मौन पालुयात=)))) अर्थस्य पुरुषो दास:
  • Log in or register to post comments

मुळातच अन्याय

स्वधर्म
Tue, 08/05/2025 - 15:52 नवीन
मुळात पाळीव नसलेले जंगली प्राणी पाळणे हेच प्राण्यांवर अन्यायकारक आहे. मग ते नांदणी मठ असो वा इस्कॉन वा वनतारा. प्राणी भाड्याने देणारे व घेणारे दोघेही दोषीच आहेत. एकदा प्राणी पाळला, की त्याला नियंत्रणात ठेवणं आलं, मग माहूत आला व अंकुशही आलाच. त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तसे कसे....

अभ्या..
Tue, 08/05/2025 - 16:13 नवीन
त्यात माहूताचा धर्म पाहून सगळा रोख धर्मावर डायव्हर्ट करायला खूप मोठी तपश्चर्या पाहिजे :-) त्यापेक्षा मोट्ठी तपःश्चर्या १५ हत्ती वेळा भाड्याने दिल्याने नोंदी आहेत, त्यातल्या १४ मिरवणुका आणि गणेशोत्सव वगैरे सोडून एकच मिरवणूक मोहरमची तीही शेवटची (कारण इथे तेलंगणा पोलिसांनी हत्ती आणि त्याला वाहून नेणारे वाहन जप्त केले. त्या जप्तीच्या पंचनाम्यात हत्तीची हेल्दी अशी कंडीशन मेंशन केली आहे बरं का) इथे विषय डायव्हर्ट करण्यासाठी पहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

रोचक माहिती

स्वधर्म
Tue, 08/05/2025 - 17:43 नवीन
अभ्या, तुंम्ही अत्यंत रोचक माहिती बाहेर काढली आहे. दुवा द्याल तर फारच सोईचे होईल. मिरवणुकीत हत्ती भाड्याने देणे यात बराच पैशाचा व्यवहारही आहेच. विषय डायव्हर्ट करणे हे अफलातून कौशल्य असले आणि बहुतांश लोकांच्या लक्षात येत नसले, तरी त्याचा न्याय व नैतिकतेशी काडीचाही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पेटाचा पेटारा

अभ्या..
Tue, 08/05/2025 - 17:50 नवीन
पेटाच्याच साईटवर आहे. माधुरी स्टोरी केलीय त्यांनी. अगदी स्क्रीन शॉट्स आहेत. एकाखाली एक अशा दोन इमेजेस आहेत. वरची इमेज गणेशोत्सवांच्या भाड्यांची लिस्ट, खालची एक इमेज मोहरम मिरवणुकीची. अगदी धर्मच काढायचा तर मठ जैन आहे, गिर्‍हाईके हिंदू बहुसंख्य आहेत, एक मुस्लीम आहे. सेक्युलॅरिझम अजून काय वेगळा असतो. सिलेक्टेड हवी तीच इमेज टाकण्यातला हेतू नीच असतो. माहीती आहे तर सगळीच द्यावी. . पहा... सगळेच कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तेलंगणा

स्वरुपसुमित
गुरुवार, 08/07/2025 - 08:53 नवीन
तेलंगणा सांगलीचा हती एव्ढ्या लांब मिरवणुकीला ? इकडे हत्ति नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माझ्या वरील प्रतिसादात

प्रसाद गोडबोले
Tue, 08/05/2025 - 18:59 नवीन
माझ्या वरील प्रतिसादात माहुताच्या धर्माचा काडीमात्र उल्लेख नाही. आणि तुम्हाला कळत नसलं तरी माझ्यालेखी हत्तीची देव स्वरूपात पूजा करणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमाला हत्ती पाठवणे आणि मुक्या जनावराला देवाच्यानावाने बळी देणाऱ्या धर्माच्या कार्यक्रमात पाठवणे ह्यात जमीन आसमान च फरक आहे. आणि तसाच फरक नांदणी मठ , इस्कॉन आणि वनातारा ह्यातही आहे. तुम्हाला फक्त त्या वणतारा त अंबानी अन् पर्यायाने मोदी दिसत असल्याने हत्तीचे स्थलांतर सहन झाले नाहीये इतकेच सत्य आहे ! आणि बरं झालं की तुम्हीच अंकुशाचा उल्लेख केलात. त्यावरून हेच सिद्ध होते की हत्तीला त्रास दिला जात होता आणि म्हणूनच हत्तीचे स्थलांतर करणे हाच निर्णय योग्य होता , आहे ! तुम्हाला वनतारा आवडत नसेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र टूतारा वन्यजीव रेस्सुक्यू सेंटर सुरू करा आणि आणि घेऊन जा हत्तीला. फडणवीसांनी असे वन्यजीव रेस्सुक्यू अभियान सुरू केले तर त्यातही तुम्ही खोटंच काढणार आहात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

बरं बरं

स्वधर्म
Tue, 08/05/2025 - 20:26 नवीन
ते अभ्या यांनी बाकीच्या १४ वेळा ज्या धर्मांच्या मिरवणूकीत पाठवल्याची माहिती दिली आहे. तर जाता जाता तुमचं त्याबाबतही मत देऊनच टाका. का एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे? बाकी ते मोहरमचा उल्लेख करणं, नेमका माहूताचा व अंकुशाचा फोटो त्यासोबत डकवणं परंतु यात विशिष्ट धर्माचा 'काडीमात्र' उल्लेख नाही आणि त्यावर रोख नाही असं म्हणणं यामुळे मला ताकाला जाऊन भांडे लपवणे ही म्हण आठवली. पण ते असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

एकाच धर्माच्या एकाच

प्रसाद गोडबोले
Tue, 08/05/2025 - 21:43 नवीन
एकाच धर्माच्या एकाच मिरवणूकीबाबत तुंम्हाला आक्षेप आहे?
होय. मी तर स्पष्टच लिहिले आहे की माझ्या प्रतीसादात . माहूत एक व्यक्ती म्हणून त्याच्याशी काहीही विरोध नाही. पण हेच लोकं देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात ही त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा लोकांना अहिंसा परमो धर्म: मानणाऱ्या जैन धर्मियांनी हत्ती भाड्याने देणे हेच पाप मानले गेले पाहिजे. बाकी मलाही "सौ चुहे खाकी बिल्ली चली गंगा नाहाने" ही म्हण आठवली. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

कमाल आहे

स्वधर्म
Tue, 08/05/2025 - 22:28 नवीन
तुमचा आक्षेप 'मुक्या जनावरांचा जीव घेतात ' याला असेल तर हा शाकाहार विरूध्द मांसाहार मुद्दा होईल, जो या धाग्यात पूर्णतः गैरलागू आहे. तो वाद वेगळा धागा काढून घाला. तुमचा आक्षेप 'देवाचे नाव घेऊन मुक्या जनावरांचा जीव घेतात' याला असेल, तर अशी प्रथा आजही हिंदू धर्मातही आहे. (मांढरदेवी, कालीमाता, बिरोबाची जत्रा' इ. मग एकाच विशिष्ट धर्मावर रोख का? बाकी तुमच्याबरोबर भेंड्या खेळायला मजा येत आहे तोपर्यंत खेळाव्यात असा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हो मग !

प्रसाद गोडबोले
Tue, 08/05/2025 - 23:28 नवीन
हो मग ! आहेच की. त्या हत्तीचा माहूत कोणी कालिमाता बिरोबा येथे बळी देणारा असता तरीही मी हेच म्हणेन. ( मांढरदेवीला बळी देण्याची प्रथा माझ्या माहिती नुसार बंद झाली आहे.) आणि शाकाहार विरुद्ध मांसाहार हा मुद्दा कसा नसू शकतो ! हत्ती जैनांचा आहे . जैन धर्माचा पायाच अहिंसा आणि शाकाहार हा आहे. अहो जे जैन संत चुकून देखील नजरेला न दिसणाऱ्या मुक्या जीवांची हिंसा होऊ नये म्हणून काळजी घेतात ते जैन लोकं पराकोटीच्या हिंसक लोकांना स्वतःचा देवस्थान च हत्ती कोणत्या भरोशावर पाठवतात ! हे असं ते न कळत पणे करत असतील तर मूर्खपणा आहे आहे कळून देखील करत असतील तर दांभिकपणा आहे. दोन्हीही परिस्थितीत बिचाऱ्या मुक्या हत्तीचे आयुष्य क्लेशकारक होत आहे. ह्या असल्या क्रूर व्यवस्थेपेक्षा वनतारा हजारपतीने उत्तम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

वनतारा

कपिलमुनी
Sat, 08/02/2025 - 10:53 नवीन
वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे. तिथलं वातावरण, तापमान , खाद्य हत्तीना अनुकूल नाहीये.. कर्नाटक केरळ असता तर ठीक.. तिथे हत्तींचा वावर आहे.. केवळ पैसे आहेत म्हणून माज..त्यात चौकीदार ही चोर है
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/02/2025 - 16:34 नवीन
वनतारा मध्ये हत्तीचा नैसर्गिक अधिवास आहे हाच विनोदी प्रकार आहे. +१ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बेगडी हत्ती प्रेम

कपिलमुनी
Sat, 08/02/2025 - 10:57 नवीन
दुवा हाडांचे आजार असल्याने गौरी नावाची हत्तीण "रेस्क्यू" करण्यात आले होती.. तिला ३ दिवस लग्नाच्या दारात शोभेसाठी उभे केले होते.. आता ३ दिवस असे उभे करणे यावर सरकार न्यायालय आणि. पेटा आवाज काढणार नाहीत
  • Log in or register to post comments

सुखद बदल !

प्रसाद गोडबोले
Sat, 08/02/2025 - 11:17 नवीन
सुखद बदल ! ह्या हत्तीच्या निमित्ताने अंबानी आणि त्या आडून मोदींना शिव्या घालायचा जो एकांगी प्रकार चालला आहे त्यात सहभागी न होता तुम्ही PETA, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट , आणि एकूणच सरकार ह्या सर्वांवर समान तीव्रतेने टीका करत आहात हा बदल अत्यंत सुखावह आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हत्ती. एक लघु निबंध

Bhakti
Sat, 08/02/2025 - 16:16 नवीन
हत्ती. एक लघु निबंध हत्ती हा largest land mamal आहे. त्याच्या African अणि Asian ह्या दोन प्रजाती आहेत. हत्ती हा एक pack animal आहे. पण natural setting मध्ये तो त्याच्या species मध्ये रहाणे पसंद करतो. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. पण अहिंसा परम धर्म वगैरे मानत नाही. Male elephants aggressive असतात. विशेषत: मदमस्त असताना. Females त्या मानाने docile असतात. हत्ती हा प्रचंड intelligent अणि emotional प्राणी आहे. पण त्याच्या भावना अणि बुद्धी primarily survival instincts अणि primordial behavior वर चालते. हत्ती महाकाय असून relatively weak eyesight, sharp hearing and sense of smell plus ability to sense vibrations are their physical traits. माणसाने हत्तीला godlike status दिले असले तरी हस्तिदंत करता शिकार करणे. युद्धात वापरणे. ओझी वाहाणे, Circus मध्ये खेळवणे. Zoo मध्ये ठेवणे. मिरवणुकीत फिरकणे असे abusive प्रकार हत्तीवर लादले जातात. हत्तीला विचाराल तर ह्यातील एकही गोष्ट तो स्वतःहून करणार नाही. त्याला ईतर हत्ती बरोबर चरत उंडारत फिरायला आवडत. त्याकरता तो आपल्या शेतात बागेत येतो. पण हत्ती हा pet नाही. पाळीव प्राणी नाही. Domesticated नाही. तो trained and conditioned आहे बस्स. ही so called माणसाबरोबर Co exist होण्याची प्रक्रिया खूप क्रूर असते. विशेषत एव्हड्या अवाढव्य प्राण्याला हाताळायला अंकुश वापरावा लागतो. आणि आयुष्याचा बराच काळ captivity मध्ये घालवावा लागतो. साखळदंड सकट. नाहीतर पिंजरा किवा enclosure मध्ये. त्यांचे प्रजनन वगैरेही ईतर पाळीव प्राण्यांप्रमाणे माणसाना परवडत नाही. हत्ती पोसणे अफाट काम आहे हे खरंय. Circus वाईट आहे. आता तिथे प्राणी वापरत नाहीत. Zoo पण बंद व्हायला पाहिजेत. Peting zoo आणि resorts वर पण नियंत्रण हवे. एव्हडच काय forest reserve वर पण बंदी यावी. हत्ती असो किवा वाघ तुमच्याबरोबर selfie काढायला आतुर नसतो. पण माणूस प्राण्याच्या हौसेला मोल नाही. ताब्याती एक हौस म्हणजे गणपती उत्सव. पण त्याने हत्तीला थेट त्रास होत नाही किवा कामाला लावल जात नाही. पण temple elephant किवा मठाची हत्तीण हे एक occupation आहे. Petting zoo मधला हत्ती हेही एक occupation च आहे. Quality of life and conditions may differ. Bonded labour. Loosely put. हत्तीला काय समजत नाही? आणि काय समजत? कोल्हापूर की जामनगर ही नावे समजत नाहीत. Habitat समजते. हत्तीला अम्बानी समजत नाही ना जिओ एयरटेल मधला फरक. हत्तीला नाव समजत नाही. Positive negative reinforcement , association, conditioning and response behavior समजतो. हत्ती court ची पायरी चढत नाही. त्याला पेटा माहिती नाही. पण वन तारा मधला हिरवे पण जाणवेल ईतर हत्ती दिसतील. मिळणारे जेवण उमजेल. हत्तीला attachment असते. पण ती Co dependency नसते. हत्ती माहूत मानतो आणि primary caregiver वर depend करतो. पण प्रत्येक केळी भरवून photo काढणारे आणि ह्या विषयावर reel बनवणारे त्याच्या गिनती ahet का? किंबहुना हत्ती ही post वाचेल का हा प्रश्न मला पडत नाही. हत्तीला परंपरा धर्म आण बाण शान वगैर संकल्पना कळतात का हो? महादेवी aka माधुरी is a working elephant who is close to her retirement. तिला आराम, योग्य आहार, विहार, आरोग्य सेवा आणि काळजी घेणारी ( नुसती काळजी करणारी तेही social media वर नव्हे) माणस आजूबाजूला हवीत. आपल्यालाही तेच हव असत नाही retirement ला? बघा तिच्या बुद्धीने विचार करून. #meateatingmonk
  • Log in or register to post comments

प्रत्येक हत्तीला स्वतःच्या

Bhakti
Tue, 08/05/2025 - 11:09 नवीन
प्रत्येक हत्तीला स्वतःच्या सवयींनुसार, नैसर्गिक वृत्तीने जगायचा हक्क आहे. कोणाच्या सांगण्यानुसार नाही. आता तेच आयुष्य माधुरीला वनतारामध्ये मिळतंय. ती केव्हा खाणार, कुठे फिरणार, विश्रांती कधी घ्यायची हे सगळं ती स्वतः ठरवते, आपल्या गतीने .. https://www.facebook.com/share/r/16wJLCZfWi/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

काय ठरलं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/02/2025 - 16:29 नवीन
महादेवीचं काय ठरलं शेवटी...? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नेत नाहीत.

कंजूस
Sat, 08/02/2025 - 18:46 नवीन
नेत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मजेशीर प्रयोग

प्रसाद गोडबोले
Mon, 08/04/2025 - 15:28 नवीन
एक प्रयोग म्हणून हे करून पाहा : तुम्ही जी कोणती AI सिस्टिम वापरता त्या सिस्टिमला आधी कंटेक्स्ट करून विचारा की " तुम्ही एक तर्कशुद्ध विचार करणारी व्यक्ती आहात, आता एका वाक्यात, सोप्या शब्दात उत्तर द्या की वंताराने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय? " मी जेमिनी वापरतो , मला ही उत्तर मिळाले - From a purely rational standpoint focused on the elephant's welfare, the elephant should not be returned to the Jain math.
  • Log in or register to post comments

हो, कारण हत्ती हा जैन मठाचा

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/04/2025 - 15:32 नवीन
हो, कारण हत्ती हा जैन मठाचा सांस्कृतिक आणि धार्मिक भाग होता, आणि जर तिथे त्याची योग्य काळजी घेतली जात होती, तर तो परत पाठवणं नैतिक आणि न्याय्य ठरेल. Chat gpt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

चैला

अभ्या..
Mon, 08/04/2025 - 15:59 नवीन
जेमिनी किंवा चॅटजीपीटी अ‍ॅक्चुअली दोघांची किंमत २० डॉळर पर मंथ आहे, एका सेंटाचा फरक आहे चिल्लरम्ध्ये पण हे दोघापेक्षा तिसर्‍याने केलेले विष्लेषण . चॅटजीपीटी आणि जेमिनी रिपोर्ट तयार करू शकतात जे अनेक पानांचे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक विषयावर ५० हून अधिक स्त्रोतांचा समावेश आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक स्त्रोत सांगण्यात आहे. जेमिनी अनेकदा चॅटजीपीटीपेक्षा अधिक स्त्रोत उद्धृत करतो, पण ते गहन संशोधन रिपोर्टमध्ये स्त्रोताचा संदर्भ AI मोड शोधात जसा देतो तसाच साधित करतो, म्हणजेच क्लिक करता येणारे कॅरेट्स आहेत परंतु मजकूरातील हायलाइट नसलेले.जेमिनीच्या रिपोर्टमध्ये दाव्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांशी जोडणे अधिक कठीण असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे. चॅटजीपीटीच्या स्पष्ट स्त्रोत सांगण्यासह मजकूरातील हायलाइट्स अधिक विश्वासार्ह आहेत. तथापि, जेमिनीकडे चॅटजीपीटीमध्ये नसलेल्या काही गुणवत्ता-वाढीच्या वैशिष्ट्यांची कमतरता आहे, जसे की एका क्लिकवर योग्य फॉरमॅटमध्ये रिपोर्ट Google Docs वर निर्यात करणे. त्यांचा तास देखील वेगळा आहे. चॅटजीपीटीचे रिपोर्ट विस्तृत फोरम पोस्टसारखे वाचन करतात, तर जेमिनीचे रिपोर्ट शैक्षणिक पेपरसारखे वाचन करतात. . बघा बाबा. सीजेआय च्या जागी कुणाला बसवता आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इति ग्रोक आणि मेटाAI

Bhakti
Mon, 08/04/2025 - 16:19 नवीन
वंताराने कायदेशीर प्रक्रिया आणि जनभावना लक्षात घेऊन जैन मठाचा हत्ती परत पाठवावा, जर मठ आणि गावकरी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मराठीत प्रश्न विचारल्यास काही

प्रसाद गोडबोले
Mon, 08/04/2025 - 16:46 नवीन
मराठीत प्रश्न विचारल्यास काही वेगळे उत्तर मिळते का हे तपासून पाहण्यासाठी मी मराठीत चर्चा केली जेमिनी सोबत : पूर्णपणे तर्कशुद्ध विचारकरून आणि उपलब्ध माहिती पुराव्यांच्या विचार करून सोप्या शब्दात उत्तर द्या की वनतारा ने जैन मठाचा हत्ती परत पाठवावा काय ? >>> माहिती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्तीण महादेवीचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य दिले गेले असल्यामुळे तिला जैन मठात परत पाठवू नये.
  • Log in or register to post comments

एवढा पैसा असून जे लोक

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/04/2025 - 19:37 नवीन
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत ते हत्तीची काय काळजी घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अंबानींविषयी रोष असला तरी हे

रामचंद्र
Tue, 08/05/2025 - 16:22 नवीन
अंबानींविषयी रोष असला तरी हे विधान योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मुळातच व्यक्तीद्वेष हा

प्रसाद गोडबोले
Wed, 08/06/2025 - 08:44 नवीन
मुळातच व्यक्तीद्वेष हा त्यांच्या आणि त्यांच्या विचारांच्या लोकांच्या चर्चेतील मूळ मुद्दा असल्याने त्यांनी हे लिहिणे स्वाभाविक आहे. वनतारा ही अंबानी ऐवजी रॉबर्ट वाड्रा चालवत असते तर एक चकार शब्द उच्चारला नसता त्यांनी. मुळात हत्तीचे हित हे त्या रेस्क्यू सेंटर मध्ये जाण्यातच आहे हे कोणीही सुज्ञ मनुष्य समजू शकतो. आणि तसाच निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता त्यात काही खुसपट काढता येईना म्हणून अंबानी वर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे हे हत्यार त्यांनी उपसले आहे बस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

एवढा पैसा असून जे लोक

सुबोध खरे
Wed, 08/06/2025 - 18:54 नवीन
एवढा पैसा असून जे लोक जाड्याची तब्येत नी गळणारे केस रोखू शकले नाहीत हा प्रतिसाद अत्यंत हीन दर्जाचा आणि एखाद्या आजारी व्यक्तीवर अन्याय करणारा आहे ज्या आजाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

किती ते प्रेम पण? कोणता आजार

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 18:59 नवीन
किती ते प्रेम पण? कोणता आजार आहे असा? तुम्ही त्यांचे पर्सनल डॉक्टर आहात की त्यांचे डॉक्टर रोज तुमच्या सोबत बसून तुम्हाला माहिती देतात? आणी मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी प्रतिसादात कुणाचे नाव

सुबोध खरे
Wed, 08/06/2025 - 19:20 नवीन
मी प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? मी ही प्रतिसादात कुणाचे नाव घेतलेल नाही. कोणाच्याही शारीरिक व्यंगावर सार्वजनिक न्यासावर खालच्या पातळीवर टीका करणं हे अत्यन्त हीन मनोवृत्ती दाखवतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पुनर्विचार याचिका

चंद्रसूर्यकुमार
Tue, 08/05/2025 - 17:08 नवीन
नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. https://marathi.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/cm-devendra-fadnavis-on-mahadevi-elephant-of-nandani-math-to-file-petition-in-supreme-court/articleshow/123115303.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines
  • Log in or register to post comments

असे सांगून याप्रकरणी राज्य

अमरेंद्र बाहुबली
Tue, 08/05/2025 - 17:16 नवीन
असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हत्ती नाही हत्तीण

चंद्रसूर्यकुमार
Tue, 08/05/2025 - 17:21 नवीन
झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!
हत्ती नाही रे.. हत्तीण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हायला

अभ्या..
Tue, 08/05/2025 - 17:32 नवीन
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात

हत्ती

परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मग सीएम पण गंडवताहेत की काय? ते हत्ती म्हणताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सुधारीत

अमरेंद्र बाहुबली
Tue, 08/05/2025 - 17:33 नवीन
सुधारीत झाले म्हणजे हत्तीण परत येणार नाहीये तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सुधारीत

अमरेंद्र बाहुबली
Tue, 08/05/2025 - 17:34 नवीन
सुधारीत झाले म्हणजे हत्तीण परत येणार नाहीये तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

दोनदा?

चंद्रसूर्यकुमार
Tue, 08/05/2025 - 17:36 नवीन
हे दोनदा लिहिल्यास ती परत येईल असे वाटून दोनदा लिहिले आहे का? ते काय असते ना- दोन निगेटिव्हचा गुणाकार एक पॉझिटिव्ह असतो की काहीतरी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तासगावची गौरी हत्तीण

चंद्रसूर्यकुमार
Wed, 08/06/2025 - 11:31 नवीन
तासगावच्या गणपती देवस्थानच्या गौरी हत्तीणीसाठी अंबानींच्या वनताराकडून २ कोटींची ऑफर आली आहे. ती ऑफर आपण स्विकारणार नाही असे देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी म्हटले आहे. जर गौरी या हत्तीणीची योग्य ती काळजी घेतली जात असेल तर खरं तर तिला तिथून हलवायचे काहीही कारण नाही. त्यामुळे देवस्थान जर अंबानींची ऑफर नाकारत असेल तर चांगलेच आहे. पैशांसाठी त्यांनी गौरीला तिथे पाठवायलाही नको. https://marathi.indiatimes.com/maharashtra/sangli/tasgaon-gauri-elephant-gets-2-crore-offer-from-vantara-anant-ambani-sangli-ganapati-panchayatan-trustee-rajendra-patwardhan-claims/articleshow/123132791.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines मी सांगलीत पाच वर्षे राहिलो आहे. सांगलीचे गणपती देवस्थान सांगलीचे पूर्वीचे संस्थानिक पटवर्धन यांचे कुटुंब बघतात. मेने प्यार किया वाली भाग्यश्री पटवर्धन त्याच कुटुंबातील. या पटवर्धनांचा तासगावच्या पटवर्धनांशी काही संबंध आहे की नाही माहित नाही. तर सांगायचा मुद्दा हा की सांगलीच्या गणपती देवस्थानात मी होतो तेव्हा बबलू नावाचा एक हत्ती होता. तो हत्ती सांगलीची शान मानला जायचा. वयोमानानुसार त्याचे निधन झाल्यानंतर सांगलीच्या गणपती मंदिराजवळच्या भागात दुखवटा म्हणून कडकडित बंद पाळण्यात आला होता. तासगावच्या त्या हत्तीणीविषयीही स्थानिक लोकांची तशीच आत्मियता असली तरी आश्चर्य वाटू नये. केरळमध्ये पूर्वी गुरूवायूरच्या मंदिरात मोठे लोक हत्ती दान द्यायचे. जयललितांनीही तिथे हत्ती दान केला होता. नंतरच्या काळात तिथे इतके हत्ती झाले की देवस्थानला सांभाळणे कठीण झाले. त्यानंतर यापुढे दान म्हणून हत्ती स्विकारले जाणार नाहीत असे देवस्थानने जाहीर केले. आज तिथे कित्ती हत्ती आहेत याची कल्पना नाही. पण ते हत्ती पण असेच वनतारामध्ये नेणार का? अशा देवस्थानात कुठेही हत्ती असले तर त्यांची योग्य ती देखभाल केली पाहिजे आणि त्यांची कुठेही आबाळ व्हायला नकोच. पण त्याचबरोबर असे हत्ती कुठेही हलवायच्या आधी स्थानिक लोकांच्या भावनांचाही विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments

हत्ती हा पाळीव प्राणी नाही.

प्रसाद गोडबोले
Wed, 08/06/2025 - 11:46 नवीन
हत्ती हा पाळीव प्राणी नाही. हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. किमान हिंदू , बौद्ध, जैन आणि शीख इत्यादी अहिंसा शांतताप्रिय भारतीय धर्माच्या लोकांनी हत्ती पाळण्याचा अट्टाहास करू नये. अगदीच हौस असल्यास गाय पाळावी. - एक सनातनी हिंदू म्हणून तासगावच्या देवस्थानचा आणि विशेषत: ब्राह्मण म्हणून पटवर्धनांचा मी जाहीरपणे निषेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हत्ती

चंद्रसूर्यकुमार
Wed, 08/06/2025 - 12:01 नवीन
हत्तीला माणसाळवण्यात जे जे काही म्हणून क्रूर उपाय केले जातात ते पाहून अंगावर काटा उभा राहतो.
याविषयी कल्पना नाही. मात्र आपल्याकडे राजेरजवाडे आणि श्रीमंत लोकांकडे हत्ती ठेवायची परंपरा होतीच. अगदी चंद्रगुप्त मौर्याकडे हत्ती होते- सेल्युकस निकेटरने त्याला ५०० हत्ती दिले होते असे उल्लेख आहेत असे वाचले आहे. शिवाजी महाराजांकडेही हत्ती होते. आनंदाच्या प्रसंगी हत्तीवरून साखर वाटणे हे पण अगदी कॉमन होते. सगळीकडे अशी क्रूर वागणूक हत्तींना दिली जायची का? काहीही असले तरी एक प्राणीप्रेमी म्हणून कोणत्याही प्राण्याला कधीही कुठेही वाईट वागणूक दिली जाऊ नये हे नक्कीच. (शाकाहारी) चंसूकु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी

स्वधर्म
Wed, 08/06/2025 - 17:14 नवीन
हा धागा काढताना, हे जे हत्ती अगदी पार सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन वनतारालाच पाठवायचा प्रकार चालू होता तो तसा का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होता. बर्‍याच मिपाकरांनी अतिशय उत्तम माहिती व दुवे दिलेले आहेत. हत्तीसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास हाच सर्वात हिताचा या मताशी मी सहमत आहे. परंतु काही सदस्य ती वनतारात गेली ते तिच्यासाठी जास्त चांगलं (हजारपटीने) असे म्हणत आहेत. इथे आणि इथे. तिथले हवामान निश्चितच केरळ किंवा काझीरंगा, आसाम यांच्याइतके हत्तींसाठी नैसर्गिक नाही. कपिलमुनी म्हणत आहेत तसे, ईशान्य भारतातील अनेक ठिकाणांहून हत्ती वनताराला पाठवण्यात आले आहेत. त्याचा एक पॅटर्न दिसून येतो. हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी - प्रशांत कदम यांचा रिपोर्ट https://youtu.be/gE6GqvWwGUo?si=CgSnd9Bg8O7rlaT_ शिवाय साम दाम दंड भेद याचा वापर कसा केला जातो ते आपण माधुरीच्या बाबत पाहिलेच. ईथे तासगांवच्या हत्तीबाबत कसा डाव रचण्यात आला होता ते विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहे. सुदैवाने त्यांना माहुताच्या किंवा वैरण पुरवणार्‍याच्या धर्माविषयी आकस नाही जसा इथल्या तथाकथित अध्यात्म पूर्ण समजलेल्या सनातनींना आहे. तासगावच्या हत्तीवर वनताराचा डोळा? ३ कोटीची ऑफर? ।। वज्रधारी न्यूज ।। मला कोणत्याही धर्मासाठी, परंपरेसाठी अशा प्रकारे हत्तीला वेठीला धरलं जावं हे योग्य वाटत नाही. परंतु सगळं कसं वनतारातच पाठवण्यासाठीच घडून येतं, ते तितकं साधं सोपं सरळ वाटत नाही. पैसा ही शक्ती आहे, पण ज्यावर नजर पडेल, ते माझं असं असेल, तर अवघड आहे. उद्या पुणे महापालिकेला पाणी नीट स्वच्छ ठेवता येत नाही म्हणून कोणीतरी कोर्टातून खडकवासला धरणसाखळी मालकांकडेच द्या असं म्हणून कोर्टात जातील आणि त्याना हवा तसा निकालही लागेल. नागरिक कधी जागे होणार?
  • Log in or register to post comments

सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात

अभ्या..
Wed, 08/06/2025 - 17:28 नवीन
सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात नॉर्मल्च म्हणा, न्यू नोर्मल असावी) वाटणारी गोष्ट म्हणजे, राजू शेट्टींच्या म्ह्णण्यानुसार नांदणी मठाला हत्तीणीच्या बदल्यात दोन कोटी देणगी /किवा मठाचे बांधकाम ही ऑफर दिली आहे ती पेटाच्या खूशबू गुप्ता ह्यांनी. आणि पेटा स्वतः सांभाळ करणार नाहीचेत. मग कुणाचे दोन कोटी? कशासाठी अशी सुपारी? प्लान्ड सिस्टिमॅटिकली लीगल एनकाउंटर झाले हे लिटरली. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 08/06/2025 - 17:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

असं असेल तर...

स्वधर्म
Wed, 08/06/2025 - 18:37 नवीन
खरोखरच परिस्थिती चिंताजनक आहे. भक्तांना स्टॉकहोम सिंड्रोम झालाय का? Stockholm syndrome is a psychological response where hostages or abuse victims develop positive feelings and an emotional bond with their captors or abusers. It's a coping mechanism where victims align with their captors to reduce the perceived threat and increase their chances of survival. The term originated from a 1973 bank robbery in Stockholm, Sweden, where hostages formed an emotional bond with their captors.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नागरिक कधी जागे होणार

प्रसाद गोडबोले
Wed, 08/06/2025 - 18:59 नवीन
नागरिक कधी जागे होणार
? 2029 च्या निवडणुकांच्या नंतर. कारण तो पर्यंत तुम्हाला असले धागे काढायला काहीना काही खुसपट कारणं मिळतच राहतील ! बाकी मुख्यमंत्री श्री. फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हत्ती परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणे. शिवाय सरकार हत्तीला सुविधा पुरवणार म्हणे . #लाडकी हत्तीण योजना मुंबईत देखील सरकारी खर्चाने कबुतरांना खायला देणार आहेत म्हणे =)))) त्यावर एक लेख पाडा की आता. फुल मजा आहे पुढील काही वर्षे =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक

रामचंद्र
Wed, 08/06/2025 - 22:49 नवीन
या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे कृती करावी असे कोणीच म्हणत नाही. मुख्यमंत्रीसुद्धा जनभावना जपण्यासाठी सरकार मठाच्या बाजूने आहे, असेच म्हणत आहेत. लोकांचा विरोध एक धनदांडगा सरकारला आणि एका संस्थेला हाताशी धरून बळजबरीने हत्तीचे अपहरण करत आहे, या गोष्टीला आहे. त्या मठाच्या निमित्ताने लोक हत्तीमागे तरी उभे राहिले. गडचिरोली जिल्ह्यातल्या इंद्रावती नदीकाठचे हत्ती गुजराथला कधीच पोहोचले पण त्यांच्यासाठी कुणी लढा दिला नाही. मुळात मठात हत्तीला बरे वाटते की नाही, हे समजत नाही. पण गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. मग त्यांना उचलून गुजराथमध्ये नेणे, हे तर नक्कीच चुकीचे म्हणता येईल. खरे तर या बाबतीत मेनका गांधींनी आवाज उठवणे अपेक्षित आहे. पण पक्षश्रेष्ठींपुढे काही चालत नसावे, किंवा मुलाच्या वाटचालीत अडथळा नको म्हणून गप्प बसावे लागत असावे. आणि केरळमधल्या त्या aty
  • Log in or register to post comments

गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये,

कर्नलतपस्वी
गुरुवार, 08/07/2025 - 05:38 नवीन
गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये, मानवी हस्तक्षेपाशिवाय असावेत असे वाटते. सहमत,असतीलही परंतू संख्या जास्त झाली,किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. हत्ती पोसणे किती खर्चिक आसते हे वेगळे सांगावयास नको. मठाकडे भरपूर पैसा असणार. मठ,साधू,संन्यासी निसंग,निर्मोही असायला पाहिजेत पण ते तर संस्थानिका पेक्षाही मोठे. अफ्रिकेतून बिबटे आणले व मध्यप्रदेश मधे सोडले तेव्हांही कुणी आवाज उठवला नाही. एवढी आरडाओरड फक्त राजकिय दृष्टीकोनातून आहे. बाकी व्यक्ती परत्वे वेगळा दृष्टिकोन असणार पण व्यक्तीद्वेश मात्र असू नये.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा