ओपेरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.
माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले. असे म्हंटताना त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी उत्तर दिले, भारताचे युद्धक विमाने पडली आणि तुला आनंद होत आहे. बाकी तात्या खरे बोलले, पाकिस्तान ने आपल्या आक्रमण करणार्या युद्धक विमानांना पाडले. वैमानिकांनी पेराशूट उघडले. ते पाकिस्तानच्या जमिनीवर उतरले. तिथून त्यांनी ओला-उबेर पकडली आणि ते भारतात परतले. तो म्हणाला, पटाईत काहीतरी बरगळू नको. मी म्हणालो, गाढवा मग काय म्हणू. विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. किमान एवढी तरी अक्कल तुला असायला पाहिजे. तू काही राजनेता नाही ज्याला असत्य प्रचार करून लोकांची मते घ्यायची आहे. काहींची इच्छा तर भारत पराजित झाला पाहिजे अशी होती. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. या शिवाय भारतात शहीद होणार्या प्रत्येक सैनिकाला मानाची वंदना दिली जाते, एवढे माहीत आहे ना, तुला. आता त्याचे सूर बदलले. तो म्हणाला, मग तात्या खोटे का बोल्ले. मी उत्तर दिले, तात्या कोमात गेले आहे. किराणा हिल्स वर बहुतेक तात्यांचे आण्विक अस्त्रांचा साठा असू शकतो. भारताने किराणा हिल्स वर मिसाईल हल्ला केला नाही, असेच विधान केले असले तरी तिथल्या स्फोटांचे उपग्रह फोटो मीडियावर आहे. नंतर त्याच भागात जमिनीच्या आत अनेक भूकंप ही आले. नूरखान बेस वर ही जमिनी खाली असलेले शस्त्र भंडार ही नष्ट झाले. बहुतेक भारताने दाखविले पाकिस्तानचे अस्त्र भंडार सुरक्षित नाही. पण इथे ठेवलेले अस्त्र- शस्त्र भंडार तात्यांचे असेल तर तात्या कोमात जाणारच.
पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ एका प्रेस कोन्फ्रेंस मध्ये म्हणाले होते, ते भल्या पहाटे भारतावर हवाई हल्ला करणार होते, त्या आधीच अडीच वाजता भारताने ब्रम्होस मिसाईलने आमच्या विमानतळांवर हल्ले केले. आम्हाला प्रतिकार करण्यासाठी 30 सेकंड ही नव्हते. भारताच्या हल्ल्यात तिथल्या हवाई पट्ट्या आणि तिथे उभी असलेली अनेक विमाने नष्ट झाली. त्यांची विमाने आक्रमण करण्यासाठी तैयारी करत असल्याने त्यांची विमाने असुरक्षित होती. किमान 30-40 विमानांना निश्चित नुकसान झाले असेल, खरी संख्या काही वर्षांनी पाकिस्तान उघडी करेलच. भारता जवळ शत्रूवर पिन पॉइंट आक्रमण करण्याची क्षमता पाहून तात्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते.
नुकतेच झालेल्या इजराईल आणि इराण युद्धात हजारून जास्त किमी दूरून येणार्या मिसाईल आणि द्रोण अमेरिकेचे आधुनिक डिफेंस सिस्टम थांबवू शकले नाही. दुसरी कडे 25-50 किमी दुरून येणारे द्रोण आणि मिसाईल भारताने रोखले. ह्याचा आघात ही त्यांना जबरदस्त बसला असेल.
बाकी तात्यांप्रमाणे भारतात ही अनेकांना दारुण धक्का बसला आणि त्यांचे ही मानसिक संतुलन बिघडले. भारताने 9 आतंकी तळ उध्वस्त केले. तिथे इतके आतंकी मेले की एक आतंकी म्होरक्या म्हणाला, "आम्ही प्रेत मोजता मोजता थकून गेलो. आमचे दुख कुणाला ही कळू शकत नाही". 11 विमान तळे उध्वस्त झाल्याने पुढील वर्षभर तरी पाकिस्तान पुन्हा गडबड करू शकत नाही. इराण ने भारताला धन्यवाद याच कारणाने दिला असेल. एवढे नुकसान झाल्यावर पाकिस्तान ने बदला न घेता युद्धविराम स्वीकार केला अर्थात सरेंडर केले/ तरीही आपले काही नेता "भारताने सरेंडर असा शब्द प्रयोग करतात". बहुतेक पाकिस्तानच्या दारुण पराजयाचे पाकिस्तानपेक्षा त्यांनाच जास्त दु:ख झाले असावे आणि ते ही तात्या प्रमाणे बरगळू लागले.
बाकी आता भारतासोबत सर्व व्यापारीक सौदे बरोबरीच्या नात्याने करण्याची मानसिक तैयारी ही तात्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी तात्यांना कोमातून बाहेर पडावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या भारताला आता कुणीही हलके घेऊ शकत नाही.
प्रतिक्रिया
21 Jul 2025 - 10:45 am | कपिलमुनी
तात्या घाबरले ..
तिकडे पुतीन पण घबरले होते .. मग पापाने वॉर रुकवा दी आणि लोकांना बाहेर काढले ..
तिकडे जिन्पिंग ला हगवण लागली .. त्याने डोक्लाम , लडाख मधून माघार घेतली..
शेठनी कामच असल्या जबर्या केला आहे..
21 Jul 2025 - 11:27 am | प्रसाद गोडबोले
उत्तम.
पराकोटीच्या व्यक्ती द्वेषाचे अजून एक उत्तम उदाहरण ! मोदींचा
इतका द्वेष करायचा की ते करताना ऑपरेशन सिन्दुर करणाऱ्या सैन्यच्या कारवाई वर देखील प्रश्न चिन्ह उभे राहील !
नवरा मेला तरी चालेल , पण सवत रंडकी व्हायला पाहिजेल =))))
मिसळपाव प्रशासन हे असले प्रतिसाद खपवून घेते ह्यातूनच त्यांचा एकांगीपणा उघड होतो !
:)
21 Jul 2025 - 2:09 pm | कपिलमुनी
आर्मी च्या मोठ्या ऑफिसर ने सांगितले आहे की आपण काही जेट्स गमावले .
यात ट्रंपचा काय संबंध ?
बाकी लडाख विषयी भाजप खासदारनेच सांगितला आहे.
पापाने वॉर रुकवा दी क्या ? असा प्रश्न जयशंकर ला विचारला तेव्हाचे उत्तर ऐका ..
उगा फुकाच्या बाता मारू नका
बाकी सैन्याचा अभिमान हवा तेवढाच आहे .
21 Jul 2025 - 2:46 pm | प्रसाद गोडबोले
दूत्त दूत्त.
अशा कोतालद्या मोदी शलकाल ला आपन 2029 मदे शतेथून काली केच्चु अन् त्याचं घल उन्हात बांधू.
तो पल्यांत ललत लाहु काय ना काय कालन कादून !
:))))
21 Jul 2025 - 2:54 pm | कपिलमुनी
मुद्दा नसला कि असेच होते !
माकडउड्याची सवय आहे .
21 Jul 2025 - 3:04 pm | प्रसाद गोडबोले
2029
उगी उगी.
21 Jul 2025 - 4:30 pm | कपिलमुनी
असू दे रे ..
भारताने एवढ्या मोठ्या सत्ता बघितल्या आहेत .. शेट पहिलच नाहीये ..
21 Jul 2025 - 7:26 pm | प्रसाद गोडबोले
ते की.
2029 पर्यंत रुदाली कशाला उगाच चालू ठेवा,
पण काहीकाही लोकांना वाटतं की दिसेल तिथं मोदी भाजप ल शिव्या घालून काहीतरी क्रांती होणार आहे म्हणून आम्ही मजा घेतो ह्या रडक्या लोकांची. =))))
मागे पुलवामाच्या वेळेस सुरू झालेली रुदाली कुठे हवेत विरून गेली देव जाणे .
21 Jul 2025 - 2:11 pm | आग्या१९९०
विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची हवाई हद्द ओलांडल्याचे अधिकृतपणे जाहीर न केल्याने, पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय वैमानिक पकडले जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते.
भारतीय मिडिया ' एक पाऊल पुढे ' असल्याने त्यांनी भारतीय हल्ल्याने कराची, लाहोर आणि इस्लामाबाद बेचिराख झाल्याच्या बातम्या दिल्या, खोटे व्हिडिओ दाखवले होते. अख्खी भारतीय मिडिया पाकिस्तानात घुसल्याने भारतीय हद्दीचे वृत्तांकन करायला कोणाला वेळ होता?
उगाच बेडकाला फुगवायचा बालिशपणा बंद करा.
21 Jul 2025 - 2:03 pm | विवेकपटाईत
असे आहे, पुतीन ज्या भागातून भारतीय विद्यार्थ्यांना काढायचे होते तिथे युद्ध विराम ठेवले होते. हे जागतिक सत्य आहे. डोकलाम लद्दाख कुठे ही भारताने माघारी घेतली नाही उलट क्षेत्र वाढविले आहे. चीनला चांगला धडा शिकविला आहे. भारताची द्रोण आणि मिसाईल सुरक्षा प्रणाली इजराईल अमेरिका पेक्षा उत्तम ठरली आहे. याचा प्रत्यय जगाला आला. भारतीय शस्त्रांची विक्री अनेकपट वाढणार. बाकी मोदी विरोधात मानसिक रोगांची लक्षणे अनेकांत दिसून येऊ लागली आहे.
21 Jul 2025 - 2:14 pm | कपिलमुनी
रावणाकडे विमान होते
ब्रम्हास्त्र म्हणजे अणुबॉम्ब होता..
22 Jul 2025 - 10:05 am | प्रसाद गोडबोले
झालं मोदी द्वेषाची , भाजप द्वेषाची गाडी हिंदू द्वेषाकडे वळाली, आता फायनल स्थानक ब्राह्मण द्वेष यायला किती वेळ लागतो ते पाहू :))))
21 Jul 2025 - 2:16 pm | चंद्रसूर्यकुमार
साधी गोष्ट आहे. समजा आपली विमाने पडली असती तर ती एक तर आपल्या हद्दीत पडली असती नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत पडली असती. पाकिस्तानच्या हद्दीत आपले विमान पडले असते तर त्यांनी त्या विमानाचे अवशेष सगळ्या जगाला दाखविले असते आणि बघा आम्ही भारताचे कसे नुकसान केले हे मोठ्या अभिमानाने सांगितले असते. तसे झाले नाही. त्यामुळे आपले एकही विमान तिकडे पडले नाही असे म्हणायला जागा आहे. समजा भारतात आपले विमान पडले असते तर ते कुठे पडले असते? पंजाबात दाट लोकवस्ती आहे त्यामुळे कुठेही विमान पडले असते तरी ते लपवून ठेवता येणे अशक्य. गावातील/शहरातील लोकांनी विमान पडल्याविषयी त्यावेळेस नाही तरी आता तरी एक अवाक्षर उच्चारले नाही हे कसे शक्य आहे? समजा काश्मीरमध्ये विमान पडले आणि ते कोणीही राहात नाही अशा ठिकाणी कोणत्या तरी दरीत पडले तरी त्यात मारल्या गेलेल्या वैमानिकांच्या कुटुंबियांपैकी त्यांच्या परत न येण्याविषयी कोणीही काहीही बोलले नाही? समजा कुटुंबिय जाहीरपणे बोलले नसले असे गृहित धरले तरी शेजारी-पाजारी, मित्र वगैरे पण कोणी काही बोलले नाही? गेला बाजार आपल्या अती उत्साही मिडियातील कोणीतरी कॅमेरे घेऊन त्यांच्या घरी पोचलेच असते. ते पण झालेले नाही? बाकी पूंछ किंवा अन्य ठिकाणी एल.ओ.सी वर गोळीबारात मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांची नावे आली होती. मग याच वैमानिकांची नावे आपले सैन्यदल जाहीर करणार नाही यावर कसा विश्वास ठेवायचा?
याचाच अर्थ आपले एकही विमान पडले नाही हे म्हणायला जागा आहे. बाप दाखव नाहीतर श्राध्द कर या धर्तीवर वर लिहिलेल्या मुद्द्यांपैकी एका तरी मुद्द्यावर आपले एक किंवा अनेक विमाने पडली होती हे सिध्द करावे नाहीतर आपले एकही विमान पडले नाही हे मान्य करायचे आव्हान डापु गँगला देत आहे.
दुसरे म्हणजे केरळमध्ये मागच्या महिन्यात उतरलेले एफ-३५ विमान कोणतेही रडार पकडू शकत नाही असा बराच गाजावाजा झाला होता पण ते आपल्या रडार यंत्रणेने पकडले. त्यामुळे त्या अदृश्यतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने तात्या ती विमाने जगभर तितक्या सहजपणे विकू शकणार नाहीत हे पण तात्या पिसाळायचे एक कारण असू शकेल.
बाकी ट्रम्पतात्या जी बडबड करत असतात ती नक्की कोण गांभीर्याने घेते हे पण बघायलाच हवे. तेव्हा तात्यांना फाट्यावर मारावे आणि त्यांच्या तालावर डोलणार्या भारतातील विरोधी पक्षांनाही.
21 Jul 2025 - 2:25 pm | कपिलमुनी
व्हाटस अॅप मधून कधी बाहेर येणार देव जाणे !
एफ-३५ आपल्या रडार यंत्रणेने पकडले--- एक चांगला संदर्भ दाखवा .
बाकी ट्रंप सोडा .. भारतीय आर्मी ऑफिसर १ २ बाबत काय म्हणणे आहे ?
21 Jul 2025 - 2:49 pm | स्वधर्म
चंसूकु अजूनही भारताचे *एकही* विमान पडले नाही असा आपला समज आहे की ते तसे असावे अशी आपली इच्छा आहे? आपल्या इच्छेचा अर्थात वस्तुस्थितीशी काही संबंध नाही.
प्रत्यक्ष तीन्ही दलाच्या प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर कबुली देऊनही आपला समज जर आपण कायम ठेवत असाल, तर भाजप समर्थकांच्या डोक्यात नक्की कोणता केमीकल लोच्या झाला असावा याची प्रचंड उत्सुकता आहे.
21 Jul 2025 - 7:48 pm | रात्रीचे चांदणे
मुळात, विमान पाडल्याबाबत जो काही संभ्रम निर्माण झाला आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत.
११ मे रोजीच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये DGAO एअर मार्शल भारती यांनी, विमान पाडल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले:
> "Losses are part of any operation."
ही एक प्रकारची अप्रत्यक्ष कबुलीच आहे.
त्यानंतर CDS अनिल चौहान यांनी Shangri-La Dialogue मध्ये स्पष्टपणे कबूल केले की,
> "Indian Air Force had suffered aircraft losses in the early phase of Operation Sindoor."
तसेच त्यांनी सांगितले की, पहिल्या दिवशी काही टॅक्टिकल चुका झाल्या, पण तिसऱ्या दिवशी त्या दुरुस्त करून हल्ला पुन्हा सुरू करण्यात आला.
इंडोनेशियामध्येही आपण तेच मान्य केलं. संरक्षणदूत कॅप्टन शिवकुमार यांनी सांगितले की, राजकीय निर्बंधांमुळे सुरुवातीला फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची परवानगी होती, त्यामुळे काही नुकसान झालं.
बरं समजा की ऑपरेशन सुरू असताना शत्रूला माहिती जाऊ नये म्हणून सांगितलं नाही, तर आता अडीच महिने महिने उलटले आहेत.आज तरी सत्य सांगायला हवं.
आणि जर लपवायचंच असेल, तर ते तरी नको का स्पष्ट सांगायला?
> “ की आमची विमान पडलीच नाहीत म्हणून. किंवा पाडले ते इस्राएली 'डेकॉय' होते आणि ते राफेल विमानाची सिग्नेचर emits करत होते"
आपण सत्य लपवल्या मुळे किंवा स्पष्ट उत्तर न दिल्याचा फायदा पाकिस्तान आणि चीन पद्धतशीर पणे घेत आहेत.
एवढा मोठा हल्ला होऊनही जिंकल्याच्या थाटात पाकिस्तान आहे आणि त्यांना आपणच ही संधी दिलेली आहे.
22 Jul 2025 - 10:21 am | कपिलमुनी
परफेक्ट !
हे न समजून घेता द्वेषाची घाउक दुकाने उघडली आहेत.
22 Jul 2025 - 10:44 am | चंद्रसूर्यकुमार
अगदी सपाटून मार खाल्ला तरी पाकडे आपणच जिंकलो असाच दावा करणार. तो त्यांचा स्वभाव आहे. ते सगळे सोडा
पण...
जर आपले विमान/विमाने पडले/पडली असतील तर त्याचे अवशेष मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया वगैरे कुठेच कसे दिसत नाहीत? गेलाबाजार फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर एखादे रील, एखादा मनुष्य म्हणत आहे की मी विमान पडताना बघितले किंवा त्याचे अवशेष बघितले असे काहीही अजून पर्यंत आले कसे नाही? समजा आपले विमान/विमाने पडले/पडली तर त्यात एकही वैमानिक जखमी झाला नाही/मारला गेला नाही? तसे झाले असते तर कुठेतरी आतापर्यंत नक्कीच आले असते. जर बरखा दत्त १९९९ मध्ये कारगीलला जाऊन तिकडे काय चालले आहे हे बातम्यांमधून कव्हर करत असेल तर २०२५ मध्ये असलेच कोणीतरी पंजाब/काश्मीरात पडलेल्या तथाकथित विमानाच्या अवशेषापर्यंत पोचू शकले नाही आणि देशात कुठेतरी राहायला असलेल्या त्या वैमानिकाच्या घरी पोचले नाहीत हे शक्य वाटते का?
आपल्या सेनाधिकार्यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते. परत एकदा- अनेक कोटी लोक राहात असलेल्या प्रदेशात आपले विमान समजा पडले ते कोणालाच कळले नाही हे कोडे कसे सोडवायचे?
म्हणूनच बाप दाखव नाहीतर श्राध्द कर असे म्हटले आहे. विमान कुठे पडले, त्याचे अवशेष कुठे आहेत, त्या अवशेषांचे काय झाले, ते सगळे कोणीच कसे बघितले नाही, त्या वैमानिकांचे काय झाले, त्यांची नावे कुठेच कशी आली नाहीत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपली विमाने पडली आहेत हे मान्य करायला काहीच हरकत नाही. तो बाप दाखवा नाहीतर श्राध्द करा. पण आतापर्यंत तो बाप अस्तित्वात आहे या दिशेने अगदी कणभरही पुरावा मिळालेला नाही त्यामुळे मी तर श्राध्द करायला तयारच आहे.
22 Jul 2025 - 8:29 pm | स्वधर्म
>> आपल्या सेनाधिकार्यांनी- हो आम्ही विमाने गमावली अशी वक्तव्ये केली आहेत हे गृहित धरले तरी त्यामागे आपल्याला न कळणारे काही कूटनितीक कारण असेल असे मला पामराला तरी वाटते.
तुंम्ही आपल्या सेनाधिकार्यांनी केलेल्या विधानांवर सरळ अविश्वास दाखवत आहात व तुमच्या मनात 'असे काहीसे असावे' असा जो समज आहे त्याला 'बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल' असे सोयीस्कर विज्ञानवादी वाटावं असं नांव देत आहात. खरे तर हे आपल्या सेनाधिकार्यांच्या कथनावर अविश्वास दाखवणे आहे. एवढा प्रमाद जर कोणी तुमच्या विरूध्द मते असलेल्या कोणी केला असता तर तुंम्ही त्यावर एक दोन पानांचा तरी शाब्दीक हल्ला केला असता :-)
22 Jul 2025 - 8:01 am | कंजूस
वाचतोय.
22 Jul 2025 - 11:48 am | सुक्या
साधारणपणे एखादा देशातील माणुस, माझा देश आहे त्याच्या ईभ्रतीला तडा जाईल असे मी करणार नाही किंवा माझ्या देशाच्या लष्कराच्या कारवाईवर शंका घेणार नाही वगेरे वगेरे करतो. ईथे मात्र भारतावर / भारतीय सेनेवर / भारतिय नेत्यांवर शिंतोडे उडवण्याची कोण शर्यत लागली आहे. आणी त्यातुन काय सिध्द करणार आहेत? गावात एखादा ड्रोन कुणाच्या डोक्यावर पडला तर त्याची ब्रेकिंग न्युज होते. १० / १५ व्हिडीयो बाजारात येतात. ईथे आख्खे विमान पडल्याची बात आहे .. त्यतही एक नाही ३ ते ५ लढाऊ विमान पडले / पाडले अशी बात आहे. फक्त बाता आहेत. कुठे पडले / कुणी पाडले ? वैमाणिकाचे काय झाले ? कुणालाही एकही बात दिसली नाही? पाकड्यांनाही नाही. मग उगा आपले राहुल गांधी सारखे शेंडा ना बुडखा बाता करण्यात काय हशील?
राहीली बात पाकड्यांची. ईतका मार खाउनही त्यांनी किती लोक मेले किती दहशत्वादी मेले किती सैनिक मेले. किती विमाने जमीनीवर खराब झाली ? दिली का माहीती ? ईतके होउनही मीच जिंकलो म्हणुन बाता मारत आहेत. मग त्यांचे खरे मानता का?
उगाच आपला फालतु अजेंडा चालवायला काळ / वेळ / स्थळ याचे भान असायला हवे.
अजुन एक. आपण भारताचे नागरीक आहोत , टॅक्स देतो तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्याच पाहिजे असे नाही. काही बाबी फक्त आणी फक्त ठराविक लोकांनाच माहीती असतात. आपल्याला त्या माहीती मिळाव्यात असा आपला हेका असेल तर ज्यांना ती माहीती मिळते त्या लोकांच्या समकक्ष हुद्या वर जावे. सगळी माहीती मिळेल. नगरपालीकेत पाणीपुरवठा विभागात काम करत असाल तर ती माहीती मिळवण्यात आपण पात्र नाही हे समजुन गप्प बसावे.
22 Jul 2025 - 11:52 am | कपिलमुनी
अहो काका , आर्मीचे मोठे मोठे उछ्पदस्थ अधिकारी ह्या बाता मारत आहेत .
सामान्य नागरीकांनी नक्की काय खरे अहे हे विचारले तर काय चुकले ? प्रत्येक वेळी प्रश्न विचारणार्याला अजेंडा , डावे , देशद्रोही ठरवून गप्प्प करायचे हा भाजपी अजेंडा आहे..
हा सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव म्हणायचा का ?
22 Jul 2025 - 11:59 am | सुक्या
मी तेच म्हणालो. सगळ्या गोष्टी सामान्य नागरीकाला मिळाल्याच हव्या हा हेका बरा नाही. आपल्याला ती माहीती हवी असेल तर त्या हुद्यावर पोहोचा ... हाय काय अन नाय काय.
बाकी अजेंडा वगेरे चालु द्या. मला शष्प फरक पडत नाही. मी लॉजीकल बाता करतो. सरकार आणि आर्मी यातील समन्वयचा अभाव आहे असे तुम्हाला वाटते. तो तुमचा विचार आहे. खरा असेलच असे नाही. पुन्हा तेच सांगतो. जर उच्च व गुप्त माहीती हवी असेल तर त्या प्रकारचे अधिकारी व्हा. ते होता येत नसेल तर कांगावा करु नका.
22 Jul 2025 - 1:37 pm | कपिलमुनी
तुम्हाला लोकशाही कळली नाही .
23 Jul 2025 - 9:19 pm | विवेकपटाईत
जनतेला सर्व माहिती आर्मीने प्रेस कॉन्फेस करून सर्व डिटेल देशातील जनतेला दिलेली आहे.आपली आर्मी खोटं बोलते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? जे राजनेता मुंबई हल्ला पाकिस्तानने नाही आरएसएसने केला असा प्रचार करणारे होते त्यांना आतंकी मरण्याचे निश्चित दुःख झाले असेल. अशा नेत्यांच्या बोलण्यावर फक्त अशिक्षित माणूस विश्वास ठेवू शकतो शिक्षित नाही. पाकिस्तानला झालेली नुकसान विपक्षीदलांना आवडलेले नाही. मसूद अजहरचा वीडियो आहे हम लाशे लाशे उठाते उठाते थक गए . हैं.https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...
23 Jul 2025 - 12:57 am | प्रसाद गोडबोले
लोकशाही म्हणजे काय तर
- कारगिल युद्धाच्या वेळेला बरखा दत्त भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल पाकिस्तानला न्यूज चॅनेल मार्फत लाईव्ह अपडेट देत होती ती खरी लोकशाही
- 2611 च्या वेळेस जसे बरखा मुंबईतील पोलिसांचे चालू प्रक्षेपण करून टेररिस्ट ना बित्तंबातमी पोहचवत होती ती खरी लोकशाही
ह्या शेटजी भटजी सरकारने गळा घोटाळा लोकशाहीचा. त्यांनी कसं विमानावर gps अन् कॅमेरे लाऊन ह्यांना लाईव्ह अपडेट द्यायला हवे होते.
कारण भारतीय सैन्याची विमाने पडल्याचा आनंद पाकिस्तान पेक्षा इंडियात जास्त झालाय . इकडे जास्त TRP मिळाला असता.
=))))
23 Jul 2025 - 9:17 am | रात्रीचे चांदणे
पाकिस्तानकडून आपलं विमान पाडल्याचा दावा झाल्यानंतर आपल्या जनरल्सनी दिलेल्या विधानांकडे पाहिलं, तर त्यातून प्रत्यक्षात आपलं विमान पडल्याचं स्पष्ट होतं. मग तुम्ही भारतप्रेमी असाल वा भारतविरोधी, ह्यांन काहीच फरक पडत नाही. यात आनंद मानण्यासारखंही काही नाही.पण इतक्या जबाबदारीच्या पदावरचे अधिकारी जर असं वक्तव्य करत असेतील, तर त्यावर विश्वास ठेवायला हवाच.
त्यात पुन्हा अजित डोवाल आणि CDS जनरल चौहान यांच्यातही वक्तव्यांमध्ये विसंगती दिसून आली आहे, म्हणजे यामध्ये एकसंघपणा नाही. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांवर दोष ठेवण्यात काही अर्थ नाही.
वरती चंद्रसूर्याकुमार यांनी म्हटल्याप्रमाणे, जर यामागे काही मोठं मुत्सद्देगिरीचं कारण असेल, जसं की राफेलचे स्रोतकोड मिळवण्यासाठी डसॉल्टवर दबाव टाकणं, तर ती वेगळी बाब आहे. पण यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, हे देखील तितकंच खरं. विमान पडले असेल, तर ते जंगलात असो वा अन्यत्र – ते पूर्णपणे लपवणं शक्य वाटत नाही. अर्थात, हा फक्त एक अंदाज आहे.
कारगिल किंवा मुंबई हल्ल्याच्या वेळी माध्यमांनी कशी भूमिका घेतली हे माहिती नाही, पण यावेळी मात्र आपली मीडिया अत्यंत बेजबाबदारपणे वागली, हे नक्की. आठवा, ८ मेची रात्र – त्या वेळी जणू पाकिस्तान जिंकून इराणसुद्धा घेतोय की काय, असं वातावरण निर्माण केलं गेलं होतं. अशा गैरजबाबदार चॅनेल्स वर कोणतीही कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. जगभरात आपलं हसू होत असणार.
यादरम्यान, बरखा दत्त मात्र यावेळी आपली बाजू समजूतदारपणे मांडताना दिसली, हे लक्षात घ्यायला हवं.
23 Jul 2025 - 10:00 am | प्रसाद गोडबोले
आणि
ह्या दोन विधानातूनच कळायचं ते कळलं.
असो.
23 Jul 2025 - 1:15 pm | सुक्या
बरखा दत्त आणी समजुतदार??
खिक्क ! ! !
23 Jul 2025 - 11:05 am | सुबोध खरे
एकंदर दोन्ही बाजूंचे आक्षेप किंवा दावे यात न पडता माझ्या लष्करी मित्रांच्या एकंदर चर्चेतून मला जे आकलन झाले ते असे आहे.
यातील सत्य आणि असत्य काही काळाने दृगोच्चर होईलच.
सुरवातीला सरकारने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार न करता भारतीय वायुदलाला भारतीय हद्दीतच राहूनच (STAND OFF) दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरून दहशतवादी तळावर हल्ले करायला सांगितले.
सहसा वायुदल हल्ला करते तेंव्हा SEAD / DEAD करून मग हल्ल्याला सुरुवात करतात.
SEAD, or Suppression of Enemy Air Defenses, involves disrupting or neutralizing enemy air defense systems,
while DEAD, or Destruction of Enemy Air Defenses, refers to the physical elimination of these threats.
सरकारने नियंत्रण रेषा पार करू नका आणि पाकिस्तानी लष्करी/ वायुदलाच्या लक्ष्यावर थेट हल्ला करू नका असा हुकूम दिला होता. यामुळे भारतीय हद्दीतच राहून आपण त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले केले परंतु SEAD / DEAD ना केल्याने पाकिस्तानी वायुदलाने आपल्या विमानांवर पाकिस्तानी हवाई हद्दीत राहून दूर पल्ल्याच्या PL १५ या क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातील बहुसंख्य क्षेपणास्त्रे आपण पाडली यामुळे त्यांचे अवशेष भारतात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
माझा असा कयास आहे कि काही विमानांचे या क्षेपणास्त्रांमुळे नुकसान झाले असावे पण एकही विमान पडले नाही किंवा एखाद दोन विमाने पडली असली तरी सर्व वैमानिक त्यातून इजेकट झाल्यामुळे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत. वायू दलाच्या हवाई हल्ल्याच्या महानिदेशकांच्या विधानाचा अर्थ मी तरी असा काढलेला आहे.
पाकिस्तानी पत्रकार काय म्हणतात त्यात काहीही अर्थ नाही कारण १९४७, १९६५ आणि कारगिल या युद्धात पाकिस्तानला जबरदस्त विजय मिळाला असेच तेथील इतिहासात शिकवले जाते. १९७१ मध्ये मात्र प्रत्यक्ष ९३ हजार युद्धकैदी पकडून पाकिस्तानी सैन्याला शरणागती यायला लागले हे त्यांना नाकारता येत नाहीये.
असो
या विमानांच्या नुकसानीनंतर वायुदलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली वर हल्ला करण्याची परवानगी मागितली आणि ती मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवसापासून पाकिस्तानवर भारताने जबरदस्त हल्ला चढवून त्यांच्या वायुदलाचे निदान ३०-३५ % नुकसान केले. S -४०० प्रणालीच्या क्षेपणास्त्राने भारताने पाकिस्तानचे AWACS विमान पाकिस्तानच्या हद्दीत साधारण ३५० किमी आतमध्ये उडवून दिल्यामुळे पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरली आहे. कारण आता पाकिस्तानमध्ये कोणतीच जागा सुरक्षित नाही. पाकिस्तानची STRATEGIC DEPTH बद्दल असलेली सुरक्षेची भावना आता नष्ट झाली आहे.
याशिवाय पाकिस्तानकडे असलेली चिनी HQ ९ हि क्षेपणास्त्र प्रणाली कुचकामी ठरवली आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेली अमेरिकी रडार आपण उडवून दिली आहेत. Indian forces targeted and destroyed multiple Pakistani air defense radar systems, including some recently acquired American AN/TPS-77 radars, during a series of strikes. The destruction of these radars significantly weakens Pakistan's air defense network, potentially impacting its ability to detect and respond to aerial threats.
ब्रम्होस क्षेपणास्त्राने केलेला प्रचंड विध्वंस पाहून पाकिस्तानने ताबडतोब शस्त्रसंधी साठी विनवण्या केल्या. मग ते तात्यांनी सांगितल्यामुळे झाले कि नाही हा प्रश्न भारताच्या दृष्टीने गौण आहे. नोबेल पारितोषिकासाठी हपापलयामुळे तात्या बरीच बेताल बडबड करत आहेत असे दिसते.
एका अंदाजाप्रमाणे पाकिस्तानचे निदान २० हजार कोटी (भारतीय) रुपयांची युद्धसामग्री नष्ट झाली आहे. हे नुकसान त्यांना भरून काढणे आवश्यकच आहे कारण भारताने त्यांची हवाई संरक्षण प्रणालीच उध्वस्त केली आहे( ज्यात रडार क्षेपणास्त्रे आणि त्यांची नियंत्रण प्रणाली येते)
(पाकिस्तान ला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून १००० कोटी रुपयांचे कर्ज ( एकंदर ७००० कोटी पैकी) यावर्षी मिळाले आहे.
भारतीय विमानांचे झालेले नुकसान (हि सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे) सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे वायुदलाला दोष देणे शक्य नाही.
जर एक राफाल आणि एक मिराज २००० पडले असतील तर ती विमाने का पडली आणि त्यांच्या संरक्षण प्रणालीत काय त्रुटी आहे हे आपले वायू द्लच नव्हे तर फ्रान्सचे सरकारसुद्धा जाणून घेण्यास उत्सुक असेल. कारण हि सुरक्षाप्रणालीतील हि भेग ताबडतोब बुजवणे आवश्यक असेल.
यामुळेच याबद्दलची बातमी उघड करणे म्हणजे शत्रूला (पाकिस्तान आणि चीन) तुमच्या गुप्त गोष्टी उघड करण्यासारखे आहे.
बाकी उंदीर मारण्याच्या विभागात कामाला असलेल्या लुंग्या सुंग्याला विमाने पडली आहेत किंवा किती विमाने पाडली गेली आहेत हे सांगण्याची मुळी सुद्धा आवश्यकता नाही. आपण केवळ एक मत देतो म्हणून आपल्याला सर्वच जाणून घ्यायचा हक्क आहे असे दावे करणाऱ्या भंपक लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.
23 Jul 2025 - 1:06 pm | शाम भागवत
फ्रान्सच्या राफेलला बदनाम करता आलं तरच अमेरिकेची एफ16 ची इज्जत शिल्लक राहील. त्यामुळे भारताची विमाने पडली हा मुद्दा सतत ऐरणीवर आणणे अमेरिकन सरकारला अत्यावश्यक आहे. त्यासाठी ते सर्वप्रकारे प्रयत्न करताहेत. मात्र त्यासाठी कोणताही ठोस पुरावा अमेरिकेकडे नाही. चीन भारताच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असूनही चीनकडेही त्याचा पुरावा नाही. अन्यथा अमेरिका व चीनने त्याचा पुरेपुर वापर केला असता. याबाबतीत चीन व अमेरिका यांचे हेतू सारखेच आहेत. सिंदूरमुळे या दोघांच्या शस्त्रविक्रीवर परिणाम होणार आहे. तर भारत एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होतो आहे. ते दोघांनाही नको असणार. यासाठी भारतातील विरोधी पक्षांचा कळत नकळत उपयोग होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच संसद अधिवेशना अगोदर तात्यांनी व्यक्तव्य केलेले दिसते आहे. थोडक्यात राफेल विषयी शंका निर्माण करण्यासाठी लागणारा टीआरपीचा योग्य काळ अमेरिकेने शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ६१००० कोटींचे फ्रान्सबरोबर डिल होण्याची शक्यता असताना अमेरिकेने एवढे तरी करायलाच पाहिजे होते, असे वाटते.
एखादं विमान कोसळले तर त्याचा ठावठिकाणा नकाशावरून ताबडतोब नाहीसा होतो. त्यामुळे विमान पडल्याचे लागलीच कळते. कसे पडले हे कळत नसले तरी अंदाजे लोकेशन काढता येऊ शकते व त्यानुसार उपग्रहातर्फे आणखी खोदकाम करता येऊ शकते.
पण विमानाचे नुकसान होऊनही ते कसेबसे विमानतळावर उतरले तर मात्र विमान शेवटपर्यंत नकाशात दिसत राहिल्याने ते पडल्याचे पुरावे राहात नाहीत. आपल्या विमानांचे थोडे बहुत नुकसान होऊनही ती कोणत्यातरी विमानतळावर उतरली असावीत असा कयास आहे.
23 Jul 2025 - 9:27 pm | विवेकपटाईत
भारतात सर्वांत जवळ मोबाईल आहे जर एखादे विमान नष्ट झाले आणि पायलट इजेक्ट करून भारतात उतरला तरी तो व्हिडिओ लोकांनी काढला असता आणि जिथे पायलट उतरले असते तिथे लोक पोचले असते. व्हिडीओ काढले असते. बाकी मोदी सरकारने सैन्याला पूर्णपणे सूट होती त्यामुळे नियंत्रण रेखा पार केली /नाही केली हा प्रश्न येतच नाही.
बाकी पूर्वीच्या सरकारने कधीही आता की हल्ल्याचा बदला घेतला नाही. आतंकींना वाचविण्याचे कामच केले आहे. २००६ च्या हल्ल्यात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी लोकांची ग्वाही उशिरा घेतली या कारणांनी उच्च न्यायालयाने ग्वाही केल्या नाही. पोलिसांनी तपास नियमानुसार केला नाही. यावरून ही स्पष्ट होते.
24 Jul 2025 - 11:41 am | सुबोध खरे
मुळात पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्यासाठी दहशतवाद हा युद्धापेक्षा बराच स्वस्त पर्याय शोधला होता. पण आता भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला कि गेल्या कितीतरी वर्षात झाले नाही एवढे नुकसान झाले आहे.
पण यामुळे पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सहजासहजी सोडेल हि अपेक्षा करणे बालिशपणा होईल. भारताशी कायम युद्धमान परिस्थिती ठेवणे हे तेथील लष्कराला सवतासुभा कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
याशिवाय पाकिस्तानचे चार तुकडे एकत्र ठेवण्यासाठी भारतद्वेष हा एक मोठा दुवा आहे.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर धार्मिक अस्मिता देश एकसंध ठेवण्यासाठी पुरा पडत नाही हे स्पष्ट झाले आहे.
पंजाबी वर्चस्व आणि त्यातून होणारी गळचेपी यामुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे प्रांत पाकिस्तानपासून फुटून निघण्यास उत्सुक आहेत.
एकदा युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण केली कि राष्ट्रवादाचा उन्माद निर्माण करता येतो आणि मग भाषिक वांशिक आणि पंथिक अस्मिता आपोआप मागे पडते. यामुळे पाकिस्तान दहशतवाद, काश्मीर प्रश्न, भारत द्वेष कधीही सोडणार नाही हे सत्य आहे.
ऑपरेशन सिंदूर मुळे भारत पाकिस्तानात किती खोलवर हल्ला करू शकतो आणि किती विध्वंस करू शकतो याची झलक पाकिस्तानला मिळाली आहे आणि त्यापासून चीनची तथाकथीत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाही हे हि कळून चुकले आहे त्यामुळे पाकिस्तान निदान कारगिल सारखे दु:साहस करणार नाही असे वाटते
24 Jul 2025 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्रंप आत्तापर्यंत चोवीस वेळा ( संदर्भ लोकसभा चर्चा ) माझ्या मध्यमस्थीमुळे अणुयुद्धाची टळली असे म्हणाले. आणि काल पंचवीसाव्या वेळी अणूयुद्धाची शक्यता मध्यस्थीमुळे टळली असे म्हणाले.
'' त्यांनी पाच विमाने पाडली. तरी दोघे माघार घेण्यास तयार नव्हते. मी त्यांना फोन केला आणि तुम्ही असेच करत राहिलात तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. आता तुमच्याशी व्यापार होणार नाही. ते दोन्ही शक्तिशाली अण्वस्त्रधारी देश आहेत आणि याचा परिणाम काय झाला असता, कोणास ठाऊक ? पण, मी ते थांबवले'' -महाराष्ट्र टाईम्स
आमचा भारत देश कोणत्याही परिणामाला भित नाही. हमारी बहुमत वाली सरकार है, आम्ही कोणाकडेही लक्ष देत नाही. आम्ही जगभर फिरलो भले आम्हाला किरकोळ युद्धात कोणी साथ दिली नसेल, दिली नाही. आमचं परराष्ट्र धोरण गंडले असेल पण आम्ही सर्व जगाला पुरुन उरु. विषय संपला.
-दिलीप बिरुटे
24 Jul 2025 - 9:21 am | सुबोध खरे
ट्रम्प तात्या वरच विश्वास ठेवायचा म्हटल्यावर विषयच संपला.
"नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे" या मनोवृत्तीला उतारा नाही.
चालू द्या
24 Jul 2025 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या अ-विचारांचा जो 'परिमळु दरवळत' असतो तोही हवाहवासा वाटतो.
आता वयपरत्वे माणूस म्हटला की, एवढे तेवढे काही गुण-दोष असायचेच.
माऊलींचा अभंग ऐकतोय. अविचिता परिमळु झुळकला अळुमाळु.
-दिलीप बिरुटे
24 Jul 2025 - 11:28 am | सुबोध खरे
ऐका ऐका
माउलींच्या कृपेने द्वेषाची जळमटे आणि अंधार दूर होवोत आणि सद्विचारांचा प्रकाश पडो.
24 Jul 2025 - 8:03 pm | रात्रीचे चांदणे
तात्या वर विश्वास ठेवायचा तर काश्मीर प्रश्न हजार वर्ष जुना समजावा लागेल. मुळात आपलं उद्धीष्ट पूर्ण झाल्यावर चाकमकी बंद करण्याचा निर्णय योग्य वाटतोय.