काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी. त्या मध्यम वर्गीय हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये सर्वच पालक मुलांशी आंग्ल भाषेत बोलत होते किंवा बोलण्याचा सराव करत होते. ही स्थिति पुण्याची मुंबईची नव्हे तर थेट मागासलेल्या चंद्रपुर सारख्या शहराची ही आहे. पालकांना वाटते त्यांच्या मुलांना आंग्ल भाषेत महारथ प्राप्त झाली की त्यांना तात्यांच्या गावी स्थायिक होण्यासाठी जाता येईल. त्यासाठी पालक मुलांच्या शिक्षणासाठी कान्वेंट शाळा, तिथे नाही मिळाली तर इतर सीबीएससी शाळा निवडतात. सरकारी शाळांमध्ये तर मराठी शासनाच्या जबरदस्ती मुळे शिकावी लागते. बाकी मराठी असो की हिन्दी दोन्ही विषयांत कमी मार्क्स मिळाले तरी पालकांना काहीही फरक पडत नाही. पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते.
दिल्लीत पूर्वी एक कहावत प्रसिद्ध होती " हाथ कंगन को आरसी क्या? पढे लिखे को फारसी क्या?" फारसी मुगलांच्या आणि नंतर ब्रिटिश काळात रोजगार देणारी भाषा होती. सरकारी दफ्तरात फारसी चालायची. मराठी जर रोजगार देणारी भाषा बनली तर मराठी माणूस सोडा इतर ही भाषिक लोक ही मराठी शिकतील हे अत्यंत सौपे गणित आहे. त्यासाठी मराठी भाषेत उच्च दर्जाचे टेक्निकल शिक्षण देणे गरजेचे. ज्यांना मराठीच्या अस्मितेची चिंता आहे, हिन्दी विरोधाचा ड्रामा सोडून, मराठी भाषेत उच्च शिक्षण देण्यास सरकारला बाध्य करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ही उच्च शिक्षण क्षेत्रात, मग चिकित्सा असो की विज्ञानाच्या शाखा उदा. इंजीनियर ते वास्तुविद, किमान 50 टक्के जागा, फक्त मराठी माध्यमात शिक्षण देण्यासाठी आरक्षित केल्या पाहिजे. मराठीत उच्च शिक्षण घेणार्यांना महाराष्ट्रांत सरकारी खात्यांत, हॉस्पिटल इत्यादीत किमान 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे. मग पहा पालक स्वतहून त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांत घालू लागतील. बाकी ज्यांच्या मनात तात्यांच्या गावी जाण्याचे स्वप्न आहे ते निश्चित याला विरोध करतील.
देशाला भाषा आणि प्रांत आधारावर तोडण्याचे प्रयत्न गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात ही राजनेता निवडणूक जिंकण्यासाठी भाषाई अस्मितेचा उपयोग करतात. आजकाल महाराष्ट्रात जे हिन्दी विरोधी आंदोलन सुरू आहे, ते फक्त राजनीतिक आहे. या घटकेला मुंबईत 22 टक्के एक गठ्ठा मते आहेत. मराठी लोकांच्या भावना भडकावून एम+एम गाठजोड करून मुंबईत निवडणूक जिंकता येईल यासाठी हे सर्व सुरू आहे. या शिवाय उर्दूला दुसर्या भाषेचा दर्जा देण्याचा इरादा ही आहे. महाराष्ट्र शासनाने हिन्दीला लवकरच महाराष्ट्रची दुसरी राजभाषा घोषित केली पाहिजे नाहीतर भविष्यात हिन्दी एवजी उर्दू दुसरी भाषा घोषित केली जाईल. बाकी हिन्दी भारतात सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे. हिन्दी भाषेचा रोजगारसाठी निश्चित लाभ होतो. तिसरी भाषा म्हणून हिन्दी अवश्य शिकली पाहिजे. हिंदीची लिपि ही देवनागरी आहे. याशिवाय मराठी मुलांसाठी हिन्दी जड नाही कारण 90 टक्के शब्द एकसारखे आहेत. केंद्र सरकारच्या नौकरीतला अनुभव सांगतो मराठीतील 90 टक्के पत्र अनुवादसाठी जात नाही कारण अधिकान्श बाबूंना पत्रातील समस्या/ विषय कळतो.
प्रतिक्रिया
7 Jul 2025 - 10:36 am | कंजूस
हा राजकीय जुमला आहे. नेत्यांची मुलं मात्र स्काटिश शाळेत इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच भाषा घेऊन शिकली आहेत. दणका मराठी प्रजेला आणि त्यांच्याकडून अमराठी लोकांची दुकाने फोडण्याचा आहे.
बाकी मुंबईत मराठी न बोलताही कामकाज करून आयुष्य काढणारे ८५% लोक आहेत.
7 Jul 2025 - 3:11 pm | कर्नलतपस्वी
हे सर्वानाच माहीत आहे तरीही मिपावर आणी अन्यत्र.....
चढा ओढीनं पतंग चढवत होते ...... सदृश्य परिस्थिती आहे.
मागे ब्याण्णव मधे हिन्दी बंदी आली होती. कामटी इथे कार्यरत होतो. तीन वर्षानंतर पुन्हा उत्तर भारतात बदली झाली. प्रवेश परिक्षेत हिन्दी मधे मुली नापास झाल्यावर. कसेबसे हेडमास्तर ला पटवले व दाखला मिळवला.
ज्याना जे शिकायचे ते शिकू द्या, पालक व शिक्षण संस्थेवर सोडून द्या,राजकारण करू नका. सरकारी व वैयक्तिक संपत्तीचे नुकसान करू नका.
8 Jul 2025 - 5:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे अनेक मराठी पत्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
"पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते."
पण ह्याला जबाबदार आपली व्यवस्थाच ना?सरकारी हिंदी/मराठी शाळेत शिकला आणि भारतिय विदेश सेवेत लागला(आय एफ एस) अशी किती उदाहरणे आहेत? ह्यातले बहुतांशी आपण सेंट स्टीफन्स/श्रीराम कॉलेज/मेयोचे विद्यार्थी आहोत असे अभिमानाने सांगत असतात.
8 Jul 2025 - 6:11 pm | कंजूस
शाळेत विज्ञान आणि गणित मराठीत शिकलेल्यांचे पुढे बारावीला हाल होतात. इंग्रजीवाले पुढे जातात, स्पर्धा परीक्षा चांगली उत्तीर्ण होतात आणि चांगले अभ्यासक्रम उच्च श्रेणी मिळवून चांगल्या नोकऱ्या पकडतात. तर उच्च शिक्षण मराठीत कोण घेणार????
8 Jul 2025 - 6:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी बरोब्बर. एवढा सोपा मुद्दा आहे. मराठीच नाही तर सर्वच भारतिय भाषांची ही अवस्था झाली आहे.मातृभाषा ही शिकण्यासाठी पदवीपर्यंत पर्याय हवी. भारतिय भाषा/मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे असली वाक्ये टाळ्या मिळवायला सोपी आहेत.
मराठी प्रकाशकांना सवलती द्याव्यात..सरकारने मराठीत लेखन करण्यासाठी प्रोत्साहन कार्यक्रम करावेत.
8 Jul 2025 - 6:43 pm | सौन्दर्य
मला वाटते की हा वाद हिंदी 'पहिलीपासून सक्तीची करावी' ह्या संकल्पनेतून आला आहे. पहिलीतल्या मुलांना जेव्हा त्यांच्या मातृभाषेशी प्रथमच लिखित स्वरूपात तोंडओळख होत असताना हिंदी सक्तीची करावी हे चुकीचेच आहे .
माझा जन्म व वास्तव्य मुंबईत झाले, आम्हाला पाचवीपासून इंग्रजी व हिंदी ह्या नवीन दोन भाषा शिकाव्या लागल्या व त्यात त्रास वगैरे फारसा झाला नाही. मुंबईत कित्येक वर्षे आपापसात बोलण्याची भाषा हिंदीच होती, त्यामुळे हिंदी कानावर सतत पडायची. इंग्रजी शिकणे थोडेसे कठीण होते कारण इंग्रजी वृत्तपत्रे सोडल्यास इंग्रजी सर्रास ऐकू यायची नाही, अगदीच नाही म्हणायला रेडियोवरच्या बातम्या हिंदी , इंग्रजीत असायच्या तसेच क्रिकेटची कॉमेंट्री इंग्रजीतच असायची.
इंग्रजीत प्राविण्य न मिळविता आल्यामुळे पुढे कॉलेजमध्ये हालच झाले, नोकरीसाठी इंग्रजी बोलता येणे हे अनिवार्यच होते त्यामुळे तेथे देखील त्रास झाला. खरा त्रास कॉलेजमधल्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड कन्यांशी इंग्रजीत न बोलता आल्यामुळे कितीतरी हातच्या निसटल्या ते दुःख जालीम आहे. (हलकेच घ्या)
थोडक्यात आपण जितक्या जास्त भाषा शिकू तितके आपण जीवन संघर्षात टिकून राहू शकतो.
8 Jul 2025 - 7:06 pm | चंद्रसूर्यकुमार
त्यावेळेस ते अगदी जालीम दु:ख वाटले असले तरी त्यावेळी एकदम फ्लुएन्ट इंग्लिश बोलता येत नव्हते याबद्दल आता भगवंताचे आभार मानत असाल :)