घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो

उपेक्षित's picture
उपेक्षित in जनातलं, मनातलं
20 Jun 2025 - 11:42 am

कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो

तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही
मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील.
पण हे क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात, अस वाटत की त्या अमरत्वाचा शाप मिळालेल्या अश्वत्थाम्या प्रमाणे आपल्याला पण हा युगानु युगे वाट पाहण्याचा शाप मिळालेला आहे का ?
एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासतो आहे.
या अंधाराचे छातीवर असह्य दडपण आलं आहे ज्यामुळे श्वास घेणं देखील दुर्धर झालंय.

हळू हळू जाग येत आहे, दुरून कुठूनतरी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे, बेफामपणे कोसळणाऱ्या एखाद्या जलप्रपाताचा आवाज देखील त्यात मिसळलेला आहे.
पण अजूनही डोळ्यासमोर दाटून आलेला हा अंधार .... घनदाट, घनगर्भ

उपेक्षित...

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

20 Jun 2025 - 5:32 pm | कर्नलतपस्वी

अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले

दाराशी मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसे धरणीला
श्वासानी धरते उचलुन

विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणु ह्रिदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती

नाहीच कुणी अपुले रे
प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी
हृदयाला स्पंदविणारे

-कविवर्य ग्रेस

क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात

अगदी खरं.

ग्रेसांचा पंखा.

उपेक्षित's picture

30 Jun 2025 - 6:58 pm | उपेक्षित

क्या बात है सरजी,
या आधी वाचली नव्हतं, धन्यवाद ओळख करून दिलीत आपण.
गेल्या महिन्यात हास्पिटलात ऍडमिट होतो त्या वेळी मनात आलेलं.

कर्नलतपस्वी's picture

20 Jun 2025 - 5:33 pm | कर्नलतपस्वी

आई गेल्यावर लिहीली असावी. असा अंधार तेव्हांच दाटून येतो.