पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय !
बराच चिखल मग बरेच उन्ह
मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून
निसरडा कधी , गच्च ओला
क्षणात रस्ता भिजवतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥
गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा ,
तरिही अंगावर आणवून काटा
मोठ्या भावासारखा घाबरतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥
पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर
त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर
स्वतःची शक्ती पाऊस दाखवून
"मीच परमेश्वर" , म्हणतोय
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . ॥३॥
कधी दणाणून भरवतो पागोळी ,
गरिबांना घडवतो एकदाच्या अंघोळी
कुठली घाण - कुठे काढून ?,
खरच विसर्जन करतोय . .
पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ ४ ॥
पाऊस कधी खिडकी मधून , घरामध्ये येतो . .
इच्छा नसलेले दोन थेंब हतावरती देतो ?
मग भिजवून मनामध्ये मला
साला हसायला लावतोय . .
पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ ५ ॥
पाऊस मला ओळखायला लावतो तोंडाभोवती आरसा धरतो . . मान फिरवून वाकडी तिकडी, दर्शन माझं मलाच घडवतो .
हा पाऊस साला शेवटी मला, स्वतःलाच ओळखायला लावतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . . ॥ ६ ॥
पाऊस आहे आणि पावसाळी काव्य नाही . असे खरंच चालायचे नाही .
तुम्ही म्हणाल "काही होत नाही" , पण मन माझे माझ्याशी बोलायचे नाही.
पाऊस हळूच त्याचे अंतरंग ,माझ्या मुखी बोलवतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय ॥ ७ ॥
अरे नको पडू , बास्स कर !
जरा तुझा थोडा ऑफ तास कर !
असे म्हणूनही न ऐकता
साला धुव्वाधार कोसळतोय . .
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय ॥ ८ ॥
=================
अतृप्त . . .
प्रतिक्रिया
20 Jun 2025 - 3:05 pm | कंजूस
हा पाऊस साला शेवटी मला, स्वतःलाच ओळखायला लावतोय !
पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . .
आला लाइनीवर.
सरसर आली कविता अचानक भिजवून गेली.
लिहा लिहा लिहा दुत्त दुत्त रुसलेल्या प्रतिभेला पुन्हा लपंडाव खेळायला लावा.
21 Jun 2025 - 9:12 pm | अत्रुप्त आत्मा
Thanks
20 Jun 2025 - 5:37 pm | कर्नलतपस्वी
पाऊस,
रस्तोरस्ती.
रस्त्याच्या पलीकडचा
पाऊस.
रस्त्यात
सर्व काळोखात
वस्त्यात
-कविवर्य ग्रेस
महावितरण फेल.