हां तर प्रश्न अतिषय सरळ, साधा आणि सोपा आहे - व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ? एक खरी बुध्दी म्हणजे काय ?
(भाषांतर हा एक नाजुक प्रकार आहे . कारण वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या शब्द आणि अर्थ ह्यांचे मॅपिंग हे १:१ असेलच असे काही नाही. अर्थात कोणत्याही एका भाषेतील शब्द अन्य कोणत्याही भाषेत अनुवादित करता येतीलच असे नाही. अर्थात इंटेलिजन्सला बुध्दी असे अनुवादित करणे हे तितकेसे योग्य नाही. पण तुर्तास ते असो.)
आता आपण आपल्या आजुबाजुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उदय उत्कर्ष पहात आहोत. चॅट जी.पी.टी. , ग्रोक , गुगल जेमेनाय , डीप सीक असे अनेक आहेत.
सर्वांना चॅट बॉट्स आणि ळ्ळं अर्थात LLM , ण्ळ्प अर्थात नॅचल लँग्वेज प्रोसेसिंग हे किमान ऐकुन तरी माहीत आहे . तिकडे नंतर येऊयात.
पण मुळात आधी प्रश्न आहे की इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय ?
आता आपण जेव्हा न्युरल नेटवर्क्स चा अभ्यास करायला घेतला तेव्हा सर्वात आधी हँड रिटन डिजिट रिकगनिशन चे न्युअरल नेटवर्क आधी लिहिले , आठवतंय ? कॅगल चे दिवस होते तेव्हा ! २०१२ किंवा २०१३ असेल. त्यातील ही इमेज आठवत आहे ?
https://camo.githubusercontent.com/3fd04bc9dd158eef530dcf85f11670d88b71a...
थोडक्यात काय तर प्रत्येक ग्रिड मधील पिक्सेल डेटा आपण न्युरल नेटवर्कला देतोय , न्युरल नेटवक त्याच्या अनेक हिडन लेयर्समध्ये त्यातील पॅटर्न "आयडेंटिफाय करत आहे" , "शिकत" आहे , "लक्षात ठेवत" आहे , "पॅरामीटर कॅलिब्रेट" करत आहे.
आणि मग फक्त नंबर्सच का , इन जनरल इमेज रिकगनिझन मध्ये न्युरल नेटवर्क तेच करत आहे , पिक्सेल लेव्हल डेटा मधील पॅटर्न्स "शिकत" आहे , आत्मसात करत आहे,
https://iq.opengenus.org/content/images/2020/03/wfk.png
ओके ?
आणि मग इतकेच का थांबा , त्या नुरल नेटवर्क ने जसे पॅटर्न आयडेंटिफाय केले तसे पॅटर्न्स सिम्युलेशन्स द्वारे जनरेट करणेही अवघड नाही ! नवीन हँड रिटर्न नंबर्स , नवीन इमेजेसे जनरेट करणेही अवघड नाही , फक्त इमेजेस का , व्हिडीओ ही करा तयार . त्याला मग जनरेटीव्ह न्युरल नेटवर्क म्हणा , गॅन म्हणा , त्यातुन निर्माण केलेले डीप फेक व्हिडिओ आपण नक्कीच "एन्जोय" केले असतील.
आणि मग फक्त चित्रांपुरते व्हिडिओपुरते का मर्यादित रहा , नॅचरल लँग्वेज मॉडेल्सची कल्पना करु समान धर्तीवर !
हां तर लार्ज लॅन्ग्वेज मॉडेल्स मध्ये आपण काय करत आहोत ?
अगदी बेसिक लेव्हलला सिंपल नेक्स्ट वर्ड प्रेडिक्टर मॉडेल चा विचार करु : न्युरल नेटवर्कला अफाट डेटा देत आहोत , शब्द , संवाद, वाक्यरचना वगैरे. त्यातील प्रत्येक शब्दाला न्युरल नेटवर्क टोकन लावत आहे. आणि आपण दिलेल्या ट्रेनिंग डेटा वरुन कोणत्याही टोकन नंतर येऊ शकणार्या प्रत्येक टोकन ची अर्थात प्रत्येक शब्दाची प्रोबॅबिलिटी मोजत आहे आणि त्याला अनुसरुन पुढील शब्द सुचवत आहे. उदाहरणार्थ : तुम्ही तुमच्या व्होट्सॅप्प मध्ये जे बोलत आहात , जे लिहित वाचत आहात त्यावरुन तुमच्या गुगल इंडिक की बोर्ड ने प्रत्येक शब्दानंतर येणार्या शब्दाची प्रोबॅबिलिटी मोजुन ठेवली आहे. प्रत्येक शब्दाला वेट्स असाईन करत आहेत. परामीटर कॅलिब्रेट करत आहे.
https://miro.medium.com/v2/resize:fit:1100/format:webp/0*GBsvsvDqtISLVRYd
लार्ज लँग्वेज मॉडेल्स हेच फक्त अतिजास्त प्रमाणात करत आहेत.
GPT-4 is estimated to have around 1.76 trillion parameters. १७६०,०००,०००,०००.
लेट दॅट सिंक इन ! टेक युवर ओन टाईम !
न्युरल नेटवर्क आपली भाषा, नॅचरल लँग्वेज शिकत आहेत ! आणि भाषा म्हणण्यापेक्षा व्याकरण शिकत आहेत हे म्हणणे जास्त संयुक्तिक आहे.
पण भाषा / व्याकरणच का ?
कारण भाषा हा बुध्दीचा ज्ञानेद्रियांना गोचर होणारा पहिला आविष्कार आहे जो की शब्दात व्यक्त करुन ठेवता येणारा आहे. बोलायच्या आधीही बुध्दी काम करत आहे. पण ते इतकं अॅब्स्त्रॅक्ट आहे बहुतांश लोकांना त्याची जाणीवही नसते.
तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि तुम्ही उत्स्फुर्तपणे जरी उत्तर दिलेत तरी ही संपुर्ण प्रक्रिया इतकी सुक्ष्म अवस्थेवर होत असते, अर्थात बोललेल्या शब्दांच्या उच्चारांची फ्रिक्वेन्सी तुमच्या कानात असलेल्या ३ हाडांवर पडते त्याने ते व्हायब्रेट होतात आणि तुमचा मेंदु ती व्हायब्रेशन "शिकतो" , "समजतो " , त्याच्यावर "प्रक्रिया करतो" , "उत्तर शोधतो", ते उत्तर शास्त्रशुध्द , व्याकरण शुध्द स्ट्र्कचर मध्ये "बसवतो" आणि तुमच्या गळ्यातील व्होकल स्ट्रिंग्स ना सिग्नल देतो की त्या शब्दांच्या फ्रिक्वेन्सी तयार करुन ते आऊटपुट दे.
हे सगळं होत आहे त्याला म्हणातात "लॅटंट स्पेस" ! तुर्तास ह्याला मध्यमा म्हणु !
हे सगळे इतके सुक्ष्म आहे , अॅब्स्त्रॅक्ट आहे की ते मॉडेल करायला आपल्याकडे केवळ गणित हे टूल आहे , पण लॅटंट स्पेस मधला डेटा कुठाय ? तो कोणी पाहिलाय ? तो कसा मॉडेल करणार ?
तो नाहीच आहे . मग काय करु शकतो आपण तर सर्वात जवळाचा जो अॅप्रोक्षिमेट डेटा वापरु शकतो , जो की आहे - भाषा , व्याकरण !
पण परत मुळ मुद्द्याला फिरुन येत - खरी बुध्दी म्हणजे काय ? लॅटंट स्पेसच्या लेव्हलवर, मध्यमा लेव्हलवर काय होत आहे ते समजुन घेणे ?
पण लॅटंट स्पेस मध्यमा लेव्हल वर आपण केवळ उत्तर तयार करत आहोत, उत्तर "समजणे" हे त्याच्याही एक लेव्हल खोलवर होत आहे ज्याला आपण "पश्यंती" म्हणतो. पश्यंती म्हणजे "पहाणे" पण फक्त पहाणे इतक्या संकुचित अर्थाने नव्हे तर "अनुभवणे " ह्या अर्थाने.
पण पश्यंती लेव्हलला देखील आपण केवळ पहात आहोत , समजुन घेत आहोत , अर्थात "समजुन घेणारा मी" अशी काहीतरी अजुन खोलवर जाणीव आहेच !
तीच जाणीव म्हणजे परा !
दॅट इज ट्रु इंटेलिजन्स ! ही खरी बुध्दी आहे !
आता हे सगळं छोट्याश्या उदाहरणात द्यायचे म्हणले तर खालील विचारांची धारा पहा :
१. विधान : १ > ०
२. १ हे एक चिन्ह आहे , > हे एक चिन्ह आहे , ० हे एक चिन्ह आहे , अॅज अ चिन्ह म्हणुन त्यांना काही अर्थ नाही, तो अर्थ "आपण" लावत आहोत , आपली "बुध्दी" लावत आहे.
३. कोणत्याही संख्येत क्ष ही संख्या मिळवल्यावर तीच संख्या येत असेल तर क्ष ही अॅडिटिव्ह आयडेंटिटी आहे ह्याला क्ष ह्या चिन्हा ऐवजी ० हे चिन्ह असाईन करु. तसेच कोणत्याही संख्येला एखाद्या य संख्येने गुणल्यावर तीच संख्या हे उत्तर येत असेल तर य ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी झाली , आता ह्याला य या चिन्हा ऐवजी १ हे चिन्ह असाईन करु. आणि हे १ हा ० पेक्षा "मोठ्ठा आहे" . ( आता मोठ्ठा आहे म्हणजे नक्की काय ? शिवाय ह्या विधानाचा पुरावा काय हे सगळं लिहिणं माझ्या आवाक्या पलीकडे आहे. )
४. आणि हे १ > ० हे आपल्याला ही चिन्हे असाईन करायच्या आधीही माहीत आहेच की ! दॅट इज ट्रु इंटेलिजन्स !
आणि हे फक्त शब्दांच्या स्तरावर नाही तर सर्वच इंद्रियजन्य ज्ञानाच्या स्तरावर ! शब्द स्पर्ष रस रूप गंध ! सर्वच !
म्हणजे कसं की
नुकतेच उगाळलेल्या चंदनाचा सुगंध .
चकचकीत पळी पंचपात्र अन ताम्हणाचा ताम्रवर्ण .
सर्वांगावरील भस्माचा जाणावणारा एक विशिष्ठ स्पर्ष.
अर्घ्यासाठी ओंजळीत घेतलेल्या पाण्याचा ओलावा.
नुकतेच उगवणार्या सुर्यप्रकाशाची जाणवणारी उब.
ह्या सगळ्याच गोष्टी ज्या ज्या आपल्या अनुभवाला येत आहेत, ज्यांचे आपल्याला ज्ञान होत आहे , हे मेंदुच्या ज्या स्तरावर होत आहे , ती बुध्दी आहे , ते खरे इंटिलिजन्स आहे !
बुद्धिर्मनीषा धिषणा धीः प्रज्ञा शेमुषी मतिः । प्रेक्षोपलब्धिश्चित्संवित्प्रतिपत्ज्ञप्तिचेतना ॥ १.५.१
शी + क्वि = शेः, शी + मुष् = शेमुषी
म्हणजे जी अज्ञानाचे , अंध:काराचे हरण करते , भ्रमाची चोरी करते , ती म्हणजे शेमुषी , ती म्हणजे बुध्दी !
असो. बास आता कंटाळा आला !
आपणया आपणपें । निरूपण काय ओपे ? ।
मा उगेपणे हरपे । ऐसे आहे ? ॥
इत्यलम् |
______________________________________________________________________________________________________________________
।।एकश्लोकी।।
किं ज्योतिस्तव भानुमानहनि मे रात्रौ प्रदीपादिकं
स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे।
चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने
किं तत्राहमतो भवान्परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो।।
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छंकरभगवतः कृतौ एकश्लोकी संपूर्णा।।
आचार्य : वत्सा , तुझी "ज्योति:" काय आहे ? ज्योतते इति ज्योतिः , जी प्रकाशमान करते ती ज्योति , अशी तुझी ज्योति काय आहे ?
शिष्य : भानु अर्थात सुर्य हा च ती ज्योति आहे , जो समस्त चराचराला प्रकाशमान करत आहे.
आचार्य : आणि मग रात्री ?
शिष्य : चंद्र , (दिवा , अग्नी ) वगैरे
आचार्य : ठीक आहे , पण तुला सुर्य , चंद्र, दिवा ह्यांचे दर्शन , ह्याचे ज्ञान कशाच्या योगाने होते आहे ? सुर्यावर दुसर्या सुर्याचा प्रकाश पडल्यामुळे तुला सुर्य दिसतो का ? की चंद्र, दिवा आदी पहायला तुला दुसर्या कोणत्या प्रकाशाच्या स्त्रोताची गरज पडते ? तुझ्यासाठी ह्या गोष्टींना कोण प्रकाशमान करत आहे ?
शिष्य : हम्म . डोळे . मला माझ्या नेत्रांच्या मुळे हे सारे ज्ञान होत आहे , माझे डोळे हेच ती ज्योति आहेत.
आचार्य : पण डोळे मिटल्यावर देखील तुला गोष्टी दिसत नसतील पण ज्ञान तर होत असते च की . इतर ज्ञानेंद्रियांच्या तर्फे तुला प्रकाशमान करणारी ज्योति: कोण ?
शिष्य : धी: अर्थात बुध्दी !!
आचार्य : पण "मला बुध्दी आहे" हे दर्शन तुला कोणाच्या योगाने होते ?
शिष्य : "मी" ! "मी आहे " ही बुध्दीत उमटत आहे असे भासणारी जाणीव , जी की बुध्दीच्याही अलिकडे आहे , ही खरी प्रकाशक आहे ! अर्थात ती ज्योति: "मी आहे !"
______________________/\_________________________
||ॐ||
प्रतिक्रिया
6 Apr 2025 - 5:38 am | कंजूस
अध्यात्मिक बुद्धिमत्ता म्हणजे खरी बुद्धिमत्ता?
6 Apr 2025 - 8:07 am | युयुत्सु
चिन्हांचा अर्थ लावायची क्षमता म्ह० बुद्धी असे सुटसुटीत भाषेत म्हटले तरी चालले असते. जाणीव आणि बुद्धी या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ उडाला आहे असे वाटते. जाणीवांमुळे बुद्धीला (असल्यास) चालना मिळते.
स्वगत - सुटसुटीत भाषेत विचार करायची क्षमता म्ह० पण बुद्धीच...
6 Apr 2025 - 8:35 am | युयुत्सु
डीपसीकला पुढील प्रश्न विचारला तेव्हा मी उडालोच -
"What is true intelligence?Explain in Marathi, pls."
डीपसीकचे उत्तर - "**Thought Process Explained:**
The user requested an explanation of "true intelligence" in Marathi. To address this, I first considered the multifaceted nature of intelligence beyond academic prowess. I aimed to highlight emotional intelligence, adaptability, ethical judgment, and practical problem-solving. Cultural relevance was ensured by using terms like "भावनिक बुद्धिमत्ता" (emotional intelligence) and emphasizing holistic growth. The explanation was structured to be clear and relatable, avoiding overly technical terms while incorporating examples familiar to Marathi speakers.
---
**मराठीत उत्तर:**
खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा परीक्षेत मिळालेले गुण नव्हेत. खरी बुद्धिमत्ता ही एक बहुआयामी गुणवत्ता आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
१. **समज आणि तर्कशक्ती:** नवीन परिस्थिती समजून घेणे, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, आणि तार्किक निर्णय घेणे.
२. **भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence):** स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजणे, संवेदनशीलता, आणि नातेसंबंध व्यवस्थापित करणे.
३. **सर्जनशीलता:** नवीन कल्पना, उपाययोजना आणि कलात्मकता व्यक्त करण्याची क्षमता.
४. **नैतिकतेसह बुद्धिमत्ता:** ज्ञानाचा उपयोग समाजासाठी चांगल्या कामात करणे, अनैतिक गोष्टींना विरोध करणे.
५. **अनुकूलनक्षमता:** बदलत्या परिस्थितीत स्वतःला झटकन घडवून घेणे आणि शिकण्याची तयारी.
**उदाहरणार्थ:** एखादी व्यक्ती पदवीधर असूनही जर ती आयुष्यातील समस्यांना सामोरी जाऊ शकत नसेल किंवा इतरांशी सहानुभूतीने वागू शकत नसेल, तर तिच्या पुस्तकी ज्ञानाला "खरी बुद्धिमत्ता" म्हणता येणार नाही.
खरी बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान, अनुभव, भावना आणि नैतिकता यांचा समन्वय. ही केवळ मेंदूची क्षमता नसून, माणसाचा सर्वांगीण विकास दर्शवते. त्यामुळे, "बुद्धिमान" म्हणजे फक्त हुशार नसून, जगाच्या आव्हानांना सामर्थ्याने सामोरे जाणारी, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती.
**निष्कर्ष:** बुद्धिमत्ता ही शिकण्याची, समजण्याची आणि जगाशी सुसंवाद साधण्याची एक सतत प्रक्रिया आहे. ती केवळ "IQ" मध्ये मोजली जात नाही, तर ती आचरणात, विचारात आणि हृदयात दिसून येते."
स्वगत - डीपसीक आहे बंधु, त्याची ख्याती काय सांगू?
6 Apr 2025 - 6:07 pm | Bhakti
“परा प्रत्यक्ष छवि रूपा पश्यन्ति परदेवता,
मध्यमा वैखरी रूपा भक्तीमानस हंसिका”
सुंदर वाक् अभिव्यक्ती मार्ग समजून सांगितला.
परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी!
6 Apr 2025 - 9:35 pm | Bhakti
आणखीन एक सुंदर संदर्भ सापडला.
6 Apr 2025 - 9:23 pm | चित्रगुप्त
-- मास्तरानु, आमाला फक्त हे एकच वाक्य समजले.
-- तरुणपणी कैच्याकै - कांट - हेगेल - नित्शे, इमर्सन ... अमूक तमूक थोर पाश्चात्य तत्वज्ञानी - जे. कृष्णमूर्ती - ओशो आणि काय काय आधाश्यासारखे वाचायचो.
-- मात्र आता "असो. बास आता कंटाळा आला ! " असे झालेले आहे.
-- तुम्ही मात्र लिहीत रहा. पुढे त्याचाही कंटाळा आला की सोडून द्या. हाय काय अन नाय काय, कुणाला काहीच फरक पडत नाही, आपण असलो काय अन नसलो काय.
माझा एक अतिशय जिवलग नातेवाईक ( - रशियन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत, इंग्रजी भाषेचा उत्तम जाणकार आणि त्या त्या भाषेतून तत्वज्ञान वगैरे वाचलेला - त्याला पुष्किनचे महाकाव्यही तोंडपाठ होते - असा ज्ञानी) आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.
6 Apr 2025 - 11:19 pm | प्रसाद गोडबोले
मला लहानपणी प्रश्न पडायचा - की ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः इतके हुशार असुनही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जो आम्हाला समजायला देखील कठीण जातो तो खुद्द स्वतः लिहुनही, इतकं संपुर्ण तत्त्वज्ञान आकलन करुनही ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त २१ व्या वर्षी संजीवन समाधी का बरें घेतली असावी ?
अमृतानुभव , चांगदेव पासष्ठी वाचल्यावर मला उत्तर मिळालं ! असो. बास आता कंटाळा आला ! हे एक नुसते विधान नसुन एक समान अनुभुती आहे. काय परत परत तेच तेच ! आपलं आपण आपल्यालाच सिध्द करत रहायचं ! काय सारखं सारखं स्मरण करुन देत रहायच ?
जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥
सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥
एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥
कंटाळा आला . बस्स. "मी आहे. " . इत्यलम् .
:)
अर्थात हे लक्षात आल्यावर लक्षात आलं त्या सगळ्यांनीच संजीवन समाधी घेतली पाहिजे असा काही नियम नाही. त्यानंतर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चॉईस !
तुकोबांसारखा कोणी विरक्त होऊन टाळ चिपळ्या घेऊन भजन करत राहील ,
कोणी नाथांच्या सारखे सरळ साधा सामान्य गृहस्थाश्रमी नोकरी करत राहील ,
कोणी समर्थांसारखे भारतभर फिरुन मठ मंदिरे स्थापन करत राहिल!
Before Satori, you chop wood and carry water.
After Satori, you chop wood and carry water.
:)
6 Apr 2025 - 11:49 pm | कानडाऊ योगेशु
मी चाळली किती समीकरणे पण गूढ उकलले नाही.
तव मिठीत सखये अवघ्या विश्वाची उलगड होते!
8 Apr 2025 - 12:21 pm | कर्नलतपस्वी
बाकी सब मिथ्थ्पा.
22 Apr 2025 - 3:10 pm | मारवा
बाकी मिथ्या ठीक आहे पण
मिठी सत्य आहे यावर मंडळाचे एकमत झालेले आहे ना ?
मी मिठी वरही अजून dispute आहे ?
6 Apr 2025 - 11:43 pm | चित्रगुप्त
असो.
(बाकी टंकाळा)
8 Apr 2025 - 12:13 am | प्रसाद गोडबोले
आवर्जून ऐकावे असे काही -
https://youtu.be/y5Ewu8wYgqM?si=W0jpb9qSc_ptwt17
8 Apr 2025 - 10:38 am | युयुत्सु
धन्यवाद!
11 Apr 2025 - 10:44 am | वामन देशमुख
लेखातील विवेचन आवडले.
11 Apr 2025 - 10:47 am | वामन देशमुख
रच्याक, "व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स?" हे "व्हॉट इज द ट्रु इंटेलिजन्स?" असे असायला हवे ना?
की खऱ्या बुद्धिमत्तेची अनेक प्रतले असतात असे सुचवायचे आहे?
11 Apr 2025 - 11:16 am | प्रसाद गोडबोले
AGI Artificial General Intelligence आणि ASI Artificial Super Intelligence अशा दोन लेव्हल नक्की असू शकतात असा माझा अंदाज आहे.
मी वर लेखात वापरलेला a true intelligence हा संदर्भ AGI ल उद्देशून आहे.
ASI हे कसे असेल ह्याची संपूर्ण कल्पना करणे माझ्या आवाक्याच्या पलीकडचे आहे.
16 Apr 2025 - 5:10 pm | प्रसाद गोडबोले
ब्रेकिंग न्यूज : सदर लेखनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आल्याने खुद्द व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी सी येथून दखल घेण्यात आलेली असून पुढील प्रमाणे ऑफिशियल प्रेसिडेंटिअल डिफिनेशन देण्यात आलेली आहे.
=))))
https://x.com/elonmusk/status/1911778992949969231?t=lZmCn3MGVky21KpeEXz0...
22 Apr 2025 - 3:05 pm | मारवा
Before Satori
मी प्रतिसाद पाडायचो
After. Satori
मी प्रतिसादच पाडतो.
Before Satori
मी संक्षी वाचायचो
After Satori
मी संक्षी किंवा.....
22 Apr 2025 - 6:14 pm | मारवा
बिफोर सटोरी
मी टपोरी होतो
आफ्टर सटोरी
साला मी टपोरी च राहिलो.
काय करणार आमिर खान दिल चाहता है मध्ये म्हणतो तसं
परफेक्शन में improvement नही हो सकता.
22 Apr 2025 - 4:02 pm | चित्रगुप्त
काही म्हणा, संक्षी होते तेंव्हा एक वेगळीच मजा होती. त्यांच्या प्रतिसादांवर प्रति-प्रतिसाद देणे खूपच आनंददायक असायचे. उत्तम लेखनाचे ते रसिकतेने स्वागत करायचे.
संक्षि, परत या मिपावर.
22 Apr 2025 - 4:16 pm | प्रसाद गोडबोले
आहात कुठे !
संक्षी आलेले आहेत परत ऑलरेडी !!
एक धागाही लिहिला आहे त्यांनी नुकताच ;)