तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता.
आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची.
जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत. तिला दोन दणकट भाऊ असते, तर मी तिची छेड काढली असती का?
हलकी वडांग (शेताचे काटेरी कुंपण) पाहूनच जनावरे आत शिरतात. मीसुद्धा ती कमजोर होती म्हणून तिची छेड काढली. ती एक लहान बहीण आणि बेवडा बाप असलेली गरीब मुलगी, माझं करून करून जाय वाकडं करणार होती? सुरुवातीला दोन वेळा तिने दुर्लक्ष केलं, पण तिसऱ्यांदा तिने आपल्या बापाला सांगितलं. तिचा भाबडा विश्वास होता की तिचा बाप माझा बंदोबस्त करेल. पण तिच्या बेवड्या बापाला हाच चान्स वाटला. त्याने तिचं कॉलेज बंद केलं आणि शहरातल्याच एका मुलाशी २ महिन्यात लग्न लावून दिलं.
आता तिचा नवरा गॅरेजमध्ये १२ तास काम करून पिऊन तर्र होऊन येतो. तिला मारण्यासाठी त्याने लोखंडी पाइप घरी आणून ठेवलाय. आई-बाबांना आणि लहान बहिणीला भेटायला तिला बंदी आहे. पत्र्याच्या अतिक्रमणात असलेल्या त्या झोपडीत ती आणि तिची गोंडस लहान मुलगी दारात बसलेले असतात.
तो माझा रोजचा वापरायचा आहे. आमची नजरानजर होते. माझी दागिने मिरवनारी बायको ती पाहते. तिची ती संतापलेली नजर मला सतत विचारत राहते, “माझी काय चूक होती? माझी काय चूक होती?…..”
प्रतिक्रिया
20 Jan 2025 - 5:36 am | कर्नलतपस्वी
शेवटच्या वाक्यात कथेचे सार आले आहे.
वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते.....
कथानक छान रंगवले आहे. लघुकथा आवडली हे वेगळे सांगणे नको.
मिरवनारी नाही.... मिरवणारी....
20 Jan 2025 - 9:05 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
21 Jan 2025 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद कर्नलसाहेब.
वडांग मजबूत केले असते तर कदाचित कथा नायका सह नायिकेच्या आयुष्यात अच्छे दिन आते.....
शक्यता कमी होती. कारण छोट्या शहरात नी त्या काळात मुलगा मुलगी बोलताना दिसले तरी घरापर्यंत बातमी जायची. नायिकेचा बाप तसाही टपूनच होता, हे निमित्त त्याला मिळाल असते. नायिकेला शिक्षण महत्वाचे होते. त्यामुळे नायकाशी जुळवून घेण्याचा प्रश्न नव्हता.20 Jan 2025 - 11:29 am | विजुभाऊ
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्या नवर्याला कधीतरी बदडून काढायला हवे.
स्वतःच स्वतःचे संरक्षण करायचे असते. हा जगाचा न्याय आहे.
न च व्याघ्रंच न च सिहं च.अजापुत्रो बलीं दद्यात.
21 Jan 2025 - 10:13 pm | अमरेंद्र बाहुबली
अशा बाबतीत मुलीनी कणखर व्हायला हवे. बदडणार्या नवर्याला कधीतरी बदडून काढायला हवे.
एवढे सोपे नसते ते. नायकाने घराबाहेर काढले तर राहणार कुठे. बाप तसही थारा देणार नहाई नायिकेला. गरिबी फार वाईट असते.22 Jan 2025 - 2:02 pm | विजुभाऊ
गरिबी वाईट असते. पण्य त्यावर मात करण्यासाठी ती वाइट असते हे फक्त बोलून चालत नाही. त्यासाठी कृतीची आवश्यकता असते.
कृती आनि परिणाम या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक हातात घेतली की दुसरीही आपसूक हातात येतेच. त्यापासुन कोणीच दूर जाउ शकत नाही.
पण परिणामांची भिती बाळगून आपण निर्णय घेतले तर आपण जेथे आहोत तेथेच रहातो.
जे परिणाम माहीत असतात आपण ते सहन करायला तयार होतो. मात्र जे माहीत नसतात त्याबद्दल भीती वाटत असते.
उदा : घरात रहायला मिळते म्हणून नवर्याचा मार सहन करत रहायचे या पेक्षा काही समाजसेवी संस्थांची / पोलीसांची मदत घेतली तर हा प्रॉब्लेम सुटू शकतो. ही बाइ आपल्याला घाबरत नाही या गोष्टीची नवर्याला भीती वाटू शकते पोलीस , सामाजीक कार्यकर्ते त्या नवर्याला सुधरवू शकतात हे चांगले परिणाम ही असू शकतात.
20 Jan 2025 - 6:26 pm | Vichar Manus
जबरदस्त लिहिली आहे, अप्रतिम
21 Jan 2025 - 10:14 pm | अमरेंद्र बाहुबली
खुप खुप आभार.
21 Jan 2025 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्य असं सरळ नसतंच.
ते असंख्य अनपेक्षित घटनांनी भरलेलं आहे.
अशा असंख्य कथानायिका आपल्या आजुबाजूला दिसतील.
कथा आवडली असे तरी कसे म्हणावे. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
21 Jan 2025 - 10:15 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत. अनेक बिचार्या आधार नसल्याने मुकाट सहन करत असतात.
21 Jan 2025 - 1:06 pm | विवेकपटाईत
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही. त्याने तिचे आयुष्य उध्वस्त केले. त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे.
21 Jan 2025 - 10:20 pm | अमरेंद्र बाहुबली
छेड काढणारे कधीच प्रेम करत नाही.
सहमत आहे. नायकाने छेड काढ़ल्याची स्पष्ट कबूली दिली आहे, प्रेम असल्याचे त्याने कुठेही संगीतलेले नाही. त्याचा हेतु चंगला नव्हताच. पण शिक्षा द्यायला चुक त्याच्या एकट्याची नाहीच. नायिकेचा बापही तितकाच जबाबदार आहे.21 Jan 2025 - 8:07 pm | चौथा कोनाडा
चुक ती चुकच !
एकट्याने केली काय अन अनेकांनी केली काय ?
त्याचे भोग मात्र दुर्दैवी जीवाच्या वाट्याला येतात ... बसतात दुर्दैव उपसत अन भोग भोगत.
21 Jan 2025 - 10:20 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे.
22 Jan 2025 - 2:10 pm | विजुभाऊ
माझ्या ओळखीतल्या एक गायीका आहेत. त्यांचे लग्न वयाच्या १४व्या वर्षी झाले.
नवरा त्याम्च्यापेक्षा १० वर्षानी मोठा . दारू पिऊन मारहाण करायचा.
त्या बाईंच्या आईने " जिथे नांदायला गेलीस तेच तुझे जग अशी भूमीका घेतली.
मारहाणीचाअतिरेक झाल्यानंतर त्या बाईनी पोलीसात तक्रार केली.
नवर्याला पोलीसांनी दम दिला.
बायको पोलीसात जाऊ शकते हे पाहून नवर्याने पळ काढला.