महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-)
सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही.
सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही.
काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे.
- सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे.
- त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे.
- मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल.
महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय.
बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय.
मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत.
त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल.
यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही.
त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर!
अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल.
इत्यलम्
प्रतिक्रिया
21 Aug 2024 - 4:15 pm | कंजूस
लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? सातत्य कुणाकडेच नाही.
21 Aug 2024 - 4:35 pm | राघव
खरंय. अन् केवळ सातत्यच नाही, प्रामाणिकपणाचा संपूर्ण अभाव आहे.
त्यामुळे आहे त्यातनंच चांगल्यात चांगलं बघायचं असंच काहीसं सगळ्यांचं झालंय.
म्हणूनच तर म्हणतो. चांगल्या पर्यायासाठी लोकं तयार आहेत. तसं करू शकणारा पुढे येण्याची गरज आहे.
21 Aug 2024 - 5:09 pm | कंजूस
विरोधी पक्षांतील विसंवाद हा असा आहे -( बोलभिडू विडिओ)
https://youtu.be/zmvyAwVOAtQ?si=NzciIJShVvSlZNfN
21 Aug 2024 - 6:04 pm | आंद्रे वडापाव
मग दिल्ली दरबारी सुलतान-शहांना , नजराणा कसा काय दिला असता ..
काहीही .. म्हणे विरोधात बसा आणि कोरडी भाकरी खा ...
21 Aug 2024 - 8:09 pm | स्वधर्म
बाकी काहीही म्हणा तुंम्ही या पक्षांना, पण राज ठाकरे? या व्यक्तीसाठी शेवटच्या काही ओळी तुंम्ही खर्ची घातल्यात, त्यांनी केंव्हा काय केलं आहे लोकांसाठी? दरवेळी भूमिका बदलत असल्याने व्यक्तीगत लाभासाठी कोणत्याही थराला जातात हे स्पष्ट आहे. हा, फार तर लोकांना काही तास हसवण्याचे पुण्य नक्कीच आहे त्यांच्या नावावर. शिवसेना हा घराणेशाहीवाला पक्ष होता आणि आहे, आणि यांनाही त्या कुटुंबात असल्यानेच बातम्यात जागा मिळते.
बाकी सगळे पक्ष संधीसाधू आहेत, याबाबत सहमत.
21 Aug 2024 - 10:48 pm | अमरेंद्र बाहुबली
शिवसेना हा घराणेशाहीवाला पक्ष होता आणि आहे शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे ना? मग घराणेशाहीवाला पक्ष कसा झाला ब्वा?? उद्धव ठाकरेंनी स्थापलेली शिवसेना हा त्यांचा स्वतःचा पक्ष आहे.
22 Aug 2024 - 3:57 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
23 Aug 2024 - 5:14 am | चौकस२१२
मूळ शिवसेना बाळासाहेब निवृत्त झाल्यावर घराणेशाही पक्ष झालं त्या बद्दल चाललंय,,,,
सुरवातीला बाळा साहेबांबवबर चांगले सहकारी होते, मग घराणे आले
जर अंतर्गत लोकशाही असति तर शिंदेंना बाहेर पडावे लागलेच नसते
जर किँग्रेस मध्ये अंतर्गत लोकशाही असती तर शशी थरूरांन कदाचित अध्यक्ष होता आले असते ( लुटुपुटी ची अध्यक्षीय निवडणूक, किती तरी वर्षे नक्की कोण अध्यक्ष हेच माहित नाही, )
पवार = राष्ट्रवादी
काँग्रेस = नेहरू- गांधी
हे स्फटीका सारखे स्पष्ट दिसतंय तरीही .. तळी उचलूच धरा अंधगुलाम
भारताची लोकशाही सर्वात मोठी आहे याचे कौतुकच आहे पण तीला घराणेशाही ने वेढलेले आहे , हे नाकारता येणार नाही
24 Aug 2024 - 9:59 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत. भाजप मध्ये घरानेशाही नसती तर विनोद तावडे किंवा एकनाथ खडसेंकडे महाराष्ट्राचे नेतृत्व असते.
22 Aug 2024 - 5:36 pm | राघव
तुमचं म्हणणं मान्य आहे. मी देखील हेच लिहिलं आहे की त्यांचा महारष्ट्रभर अजून जम नाही. पण सद्यपरिस्थितीत राजकीयदृष्ट्या त्यांना उत्तम संधी आहे, जर नीट उपयोग केला तर!
बाकी घराणेशाही हे पिल्लू भाजपनं पुढे केलंय काँग्रेसला घेरण्यासाठी.
मला व्यक्तिगतदृष्ट्या तसा फरक पडत नाही त्यानं. घराणेशाही असली पण काम करणारा माणूस असला, तर हरकत असण्याचं काही कारण नाही खरंतर.
23 Aug 2024 - 6:41 am | चौकस२१२
दरवेळी भूमिका बदलत असल्याने
अगदी अगदी.. एकीकडे त्यांचे जुने विडिओ आहेत ज्यात त्यांचा बाबासाहेब पुरंदरेंबद्दल आदर दिसून येतो आणि नंतर बारामतीच्या काकांकडे गाडी वळवल्यावरचे विडिओ ... माणूस हुशार आहे पण "काय होतास तु काय झालास तू , अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू असे काहीसे झालाय "
21 Aug 2024 - 9:13 pm | कंजूस
घराणेशाहीवाला पक्ष -?
कॉन्ग्रेसची घराणेशाही, बेळगाव आणि पाकडे हे तीन मुद्दे दसऱ्याच्या सभेत कायम असायचे. ते कायमचे पुरून टाकले आहेत.
21 Aug 2024 - 10:51 pm | अमरेंद्र बाहुबली
औरंगजेब कायम आहे .:)
22 Aug 2024 - 3:58 pm | मुक्त विहारि
कोण हो?
24 Aug 2024 - 11:35 am | Bhakti
औरंगजेबाला पण रिटायर्ड करावे की,इतर मुद्द्यांवर म्हणजे पुढे जाता येईल.
21 Aug 2024 - 10:50 pm | अमरेंद्र बाहुबली
बाकी भाजपने नेतृत्वबदल केलं असतं तर मविआ ला पुढील निवडणूक नक्की जड गेली असती. आता पुढील मामू बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे की जयंत पाटील हे पहावे लागेल. विरोधी पक्षनेता कोण हे सांगायला हवे का? :)
22 Aug 2024 - 3:58 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
23 Aug 2024 - 5:31 am | चौकस२१२
ओह म्हणजे नेतृवा नकोय हो का आडनाव बोचतंय कि काय तुम्हाला? बाकी पक्ष चालेल ?
असो खिचडी सरकार येणार तर परत? त्यापेक्षा सरळ कोइंग्रेस ला १७० मिळोत किंवा भाजप ला
24 Aug 2024 - 10:01 am | अमरेंद्र बाहुबली
अच्छा म्हणजे आडनाव पाहून तुम्ही समर्थन करतात तर. व्वा.
26 Aug 2024 - 6:48 am | चौकस२१२
मोदी ओबीसी , राजनाथ ? योगी? हे ब्राह्मण नाहीत तरी तुम्ही बॉम्ब मरणार कि भाजप एक जात चालवते ?
कधी नव्हे तर एक "बामन" महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ते सुध्धा त्याच्या कामामुळे ,,, तर सतत त्याची जात काढणाऱ्यांनी दुसऱ्यानं बोलू नये
पंढरपूरला पूजा करणायचाच मान हा मुख्यमंत्री पदाचा असतो तरी केवळ " फडणवीस" म्हणून त्यांना विरोध,, पूर्रो गामी महाराष्ट्राला हे चांगलं दिसत वाटत ?
आणि हे सगळे कोण ओकतं तर "हंम भी जनेउधारी " असे सोयीचे असेल तेव्हा म्हणारे काश्मिरी हिंदू पंडित ! रॉउल बाबा !
26 Aug 2024 - 11:37 pm | मुक्त विहारि
परमपूज्य व्यक्तीमत्व आहे.....
पण एक मात्र आहे...
ह्यांच्या बाबतीत तुम्ही सध्या तरी सत्य विचार मांडू शकता. ते सध्या तरी हल्ला करत नाहीत.
26 Aug 2024 - 1:55 pm | चौकस२१२
बाळासाहेबांचे भाषण
https://www.youtube.com/shorts/WMMRvb1sJ4g
शरद पवारांवर सरळ निशाणा " शरद पवारांनी वसंतदादांन्च्या पाठीत खंजीर खुपसला तो वसंतदादा काय बामन होता काय ? "
26 Aug 2024 - 2:16 pm | अमरेंद्र बाहुबली
ऑस्ट्रेलिया मध्येही अस जात पाहून मतदान करतात काहो?
26 Aug 2024 - 2:45 pm | चौकस२१२
प्रोफेश्वरचे शिष्य शोभता ,, कशी सुचला नाही कि तिथे काय नि हिथे काय हि फालतुगिरी सुरु
असो तुमच्या राज्यात काय चाललंय ते बघा,, जातीवाद नष्ट करा म्हणणारेच "जातीवर "आधारित " आरक्षण वाढवता येतंय का बघताहेत ! ( ते सुद्धा ९६% कुळी म्हणवणारे छत्रपती राजवंश वाले क्षत्रिय "
असो ऑस्ट्रेल्यात ना ना जात ना धर्म सर्वधर्म समभाव .. कॉमन सिव्हिल कोड
हा पण लिब्रँडू पणाचा रोग येथेही चालू आहेच "ऑल आइजऑन राफा " वाला
खलिस्तानी समर्थक हिंदू मंदिरांवर हल्ला करता ,, पण तुम्हाला म्हणा काय त्यःचे ... तुम्हाला भारताचे बालकानायझेशन कधी याची घाई झाली असणारं
26 Aug 2024 - 11:26 pm | मुक्त विहारि
वैचारीक मुद्दे संपले की व्यक्तिगत पातळीवर काही व्यक्ती प्रतिसाद देतात...
गधा तो गधे के साथ ही रहेगा और शेर शेर के साथ.... मैने तो किसीका नाम नहीं लिया....
25 Aug 2024 - 4:07 pm | मुक्त विहारि
शक्यता तीच आहे...
22 Aug 2024 - 7:06 am | कंजूस
महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा वचक आहे. पण महाआघाडीच्या चकलीत तीन शत्रू तात्पुरते एकत्र आहेत. लोकसभा निकालानंतर कॉन्ग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे. स्वतंत्र जाण्याकडे कल वाढला आहे.
22 Aug 2024 - 12:01 pm | अमरेंद्र बाहुबली
महायुतीच्या कडबोळ्यात भाजपचा वचक आहे. भाजपचा की इडीचा?
22 Aug 2024 - 3:59 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
22 Aug 2024 - 5:38 pm | राघव
बरोबर. त्यामुळेच मतविभाजनाचा मुद्दा मांडला होता. कोणाला सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो हा बुद्धीबळाचा मामला आहे. :-)
22 Aug 2024 - 3:23 pm | मूकवाचक
१९४७ पासून (किंवा त्या आधीदेखील) राजकारण नेहेमी किचकट, विचित्र आणि गलिच्छच राहिलेले आहे.
सुरूवातीला राजकीय दृष्ट्या साधनशुचिता वगैरे पाळत बसल्याने सतत पराभूत होत राहिलेले, किंवा राजकीय दृष्ट्या वाळीत टाकले गेलेले पक्ष/ संघटना देखील आता गलिच्छ राजकारणात हिरीरीने सहभागी झाल्याने ज्यांची एकाधिकारशाही समाप्त झाली, ते लोक फार काही आक्रीत घडले आहे असा कांगावा करत आहेत.
22 Aug 2024 - 5:46 pm | राघव
मी सरसकट राजकारणाबद्दल बोलत नाहीये. राजकारण नको ही आपली सगळ्यांची मानसिकताच राहिलेली आहे आणि त्याला कारणही नेतेच आहेत.
पण यावेळचं राजकारण म्हणजे अगदी सडलेल्या कचऱ्याच्या राशीसारखं झालंय.. नाक धरून दूर जावंसं वाटतं!
राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि निवडणुकीनंतरच्या तडजोडी हे आधीही होते. पण जो निलाजरेपणा आजकाल माजलेला दिसतोय, तेवढा आधी एवढा जाणवला नाही.
23 Aug 2024 - 5:07 am | चौकस२१२
१२२ अनि १०५
23 Aug 2024 - 5:20 am | चौकस२१२
जर उद्धव ठाकरेंनी स्वततःसाठी जनतेचा कौल नाकारलं नसता १०५+५६ तर पुढे या सगळ्या कोलांट्या उड्या कोणालाच माराव्या लागल्या नसत्या
आता स्वतःची लाचार परिस्थिती करून घेतली आहे
मूळ शिवसेना प्रेमी ( ज्यानं राज ठाकरे वेगळे झाले, शिंदे वेगळे झाले याचे दुःख वाटले ती लोक) सहानुभूती म्हणून उदाहव ठाकरेंना मत देतील हि
पण त्यांची परिस्थिती आता बघवत नाही ....
असो
प्रादेशिक पक्ष+ घराणेशाही कमी व्हावी
राज्य आणि देश पातळीवर भाजप आणि काँग्रेस (नेहरू गांधीविना ) असे दोन पक्ष मजबूत व्हावेत अशी अल्लाह चरणी प्रार्थना
24 Aug 2024 - 10:03 am | अमरेंद्र बाहुबली
भाजपने २.५ वर्षे मुख्यमंत्रिपद द्यायला हव होतं शिवसेनेला. नाहीतर असा दारुण पराभव झालं नसता लोकसभेला महाराष्ट्रात. ठाकरेंमुळे आपले २३ खासदार निवडून आले होते हे विसरले भाजपेयी.
26 Aug 2024 - 6:52 am | चौकस२१२
माझ्य खिशातील ५० रु
तुझ्य खिस्तातील १०० रु
मिळून आणू लाडू ३
पण मी मात्र खाणार त्यातले २!
वा रे वा
काय डोक्यालिटी
तीच डोक्यालिटी चालवयाला दिल्ली ला गेले होते .. सुपडा साफ करून पाठवला "मम्मी" नि
23 Aug 2024 - 5:29 am | चौकस२१२
महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय.
या बाबत सहमत आणि अस्वस्थच वाटेत ( राणे आणि चव्हाण भाजपात ( संगाची चड्डी घालून) हे दृश्य डोळ्यासमोर आले आणि उलटी झाली- कारण त्यांची मूळ विचारसरणी संघ परिवराशी विसंगत आहे म्हणून जातीचा काही संबंध नाही , चंद्रकांत पाटील उदाहरण आधी पासून भाजपशी निगडित आहे )
पण भाजप ला हे सगळं का करावे लागेल याची हि करणे समजून गयायाल पाहिजेत
१) सत्ता नाही तर कार्यक्रम राबवता येत नाही
२) महाराष्ट्र्रात संघ निर्माण होऊन सुद्धा महाराष्टार्त भाजपाला कधी जनतेचा आधार मिळल नाही आता मिळाल्या लागलाय तर तो टिकवलला पाहिजे असे कुठे तरी वाटणे साहजिक आहे
३) १०५+५६ असे आल्यावर साहजिक सत्ता मिळेल असे वाटेल होते, ज्याचे जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री हे हि साहजिक आहे पण याला उद्धवने काडी लावली
४) पहाटेचा शपथविधी हि खरीच "चड्डी उतरवणाररी " गोष्ट घडली खरे , शरद पवारांनी भाजपला "त्याचू " बनवला आणि अजित पवारांना पण
जी लोक भाजपने सेनना आणि राष्ठ्रवादी फोडली असा शिमगा करीत आहेत त्यानना नम्रपणे आठवण करून द्यवीशी वाटते कि स्वतः इंदिरा गांधींनी कांग्रेस फोडली होती आणि पवारांनी वसंतदादा पाटील यांना धोका दिला होता
23 Aug 2024 - 5:29 am | कंजूस
"चार भिंतींच्या आतमध्ये तरी मुख्यमंत्री ठरवा" अशी कळकळीची विनंती झाली आहे.
म्हणजे उद्धवना घाई झाली आहे मी होणार का नाही कळण्याची. पवार काकांचं पारडं जड झालं तर सुप्रिया हे निश्चित. कॉन्ग्रेसचा उमेदवार हा फक्त दिल्लीचं कान देऊन ऐकणारा कुणीही असेल. त्याचं काम निरोप्याचं असेल. पुढे काय होणार? तर दिल्ली जनपथ/मुंबई सिल्वर ओक/मातोश्री येथे सतत बैठका.
टेलिफोन क्रांती झाली तरी जाऊन भेटूनच बोलतात. फोनवर conference वर कामं होत नाहीत.
24 Aug 2024 - 10:06 am | अमरेंद्र बाहुबली
शिवसेनेचा झाला तर उद्धव फिक्स, राष्ट्रवादीचा जयंत पाटील होईल बहुतेक. काँग्रेसचा बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज चव्हाण. उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडले ते अतियोग्य केले हे काळ ठरवतानाक दिसतोय. नाहीतर शिवसेना संपवली असती भाजपने.
24 Aug 2024 - 1:57 pm | कंजूस
पण हुकूमत नसणार. बाहुलं होणार नवा मुख्यमंत्री. तीन ठिकाणी धावल्याशिवाय काही करू शकणार नाही. मग योजनांचं काय? त्याचा पैसा कसा कुठून आणणार? अगोदरच्या सुरू ठेवायच्या तर नवीनसाठी पैसे ?
25 Aug 2024 - 3:21 pm | मुक्त विहारि
अगदी अगदी...
23 Aug 2024 - 5:33 am | चौकस२१२
कोणत्या तरी एका पक्षाला १७० द्या आणि मोकळे व्हा रे ... कंटाळा आलाय खिचडी खाऊन
24 Aug 2024 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली
चिंता नको. मविआ व्यवस्थित संभाळेल राज्य. एकत्र येऊन. सगळ्या कपट कारस्थानाना पुरून उरेल.
25 Aug 2024 - 3:16 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
23 Aug 2024 - 5:48 am | चौकस२१२
महाराष्टरातील राजकारणात ज्यांना भाजपवर टिक्का करायची असते त्यांचा एक ठरलेलला मुद्दा सतत वाचनात येतो तो म्हणजे "भाजप महाराष्ट्र त गुजराती कीड पसरवत आहे त्याचा काय" काय मूर्ख मुद्दा आहे हा , अनाठायी मुद्दा
अर्थात रोख असतो मोदी आणि शहा हे दोन्ही गुजराथी आहेत याचे, पण या टीकाकारानं हे समजत नाही कि भाजप हा काही गुजराथी पक्ष असे नाहीये त्याचा इतिहास बघितला तर ४तले पोर हि सांगेल काय आहे ते
केवळ योगायोगाने ते दोघे एकाच प्रदेशातील आहेत
आणि तसे बघायला गेले तर भाजपचं मागील संघात मराठी लोकांचे वर्षंस्व / प्रभाव सतत राहिलेलला आहे
या आधी
वाजपेयी + अडवाणी होते म्हणजे तो कोणता पक्ष ? उत्तरप्रदेशी + सिंधी
या पुढे समजा गडकरी + फडणवीस असे दोन पुढे नेतृत्वात आले तर काय शिमगा करणार? मराठी पक्ष झाला की काय लगेच तो ?
24 Aug 2024 - 10:07 am | अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रातून गुजरातला किती प्रकल्प पळवले गेले ह्याचा काही अभ्यास??
25 Aug 2024 - 3:15 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
23 Aug 2024 - 6:52 am | चौकस२१२
महाराष्ट्रात खिचडी / भेळ, जे काय गेली काही वर्षे चालू आहे याला जनता पण जबाबदार आहे
असे म्हणण्याची काही कारणे
१) केवळ व्यक्तीपुजे मुले मतदान क रणे , पक्ष काय आहे , त्याची भूमिका काय या कडे दुर्लक्ष "जिथे दादा / ताई, भाऊ तिथे आम्ही" हि वृत्ती मग उद्या एखादा संघ परिवारातील कम्युनिस्ट झाला तरी त्याला मत देतील ..किंवा एकदा सांजवाडी भाजपात अल्ला तरी त्याला ( एक भाजप समर्थक म्हणून मोदी व्यक्तिपूजेची पण माझ्यसारख्याला शिसारी येते आणि त्यापेक्षा भीती हि वाटत्ते कि केवळ मोदी म्हणून जे लोक भाजपला मत देतात ते उद्या मोदी निवृत्त झाल्यावर काय? करतील किंवा त्याना मोदींचाच आक्रमक पणा आवडत असला तरी पक्षाची धोरणे पटली आहेत का समजली आहेत का ? नसतील तर आंधळेपणाने मत देणे धोक्याचे ,, सुधृढ लोकशाहीत* असे होऊ नये
२) भाषिक प्रांत रचणे चा एक थोडा गैरफायदा म्हणजे देशापेक्षा राज्य जास्त महत्वाची ह्या भावनेची झालेली पेरणी
* खुलासा : भारतीय लोकशाही हि सर्वात मोठी आहे हे पूर्ण मान्य परंतु त्यातील काही कमतरता असेल तर हि असे वाटते , ( येथे इतर वेस्टमिनिसस्टर पद्धतील लोकशाहीतील उदाहरण देण्याचा मोह होतोय पण टाळावा लागेल कारण मग "तिकडे कस काय पाणी आहे का? कि कसे धुता असेल फालतू प्रश्न विचारले जातील )
23 Aug 2024 - 7:29 am | मुक्त विहारि
हे माझे वैयक्तिक मत आहे. (विशेषत: बांगलादेश मध्ये सध्या जे काही चालले आहे ते पाहता...)
अडवाणी आणि बाजपेई यांनी पाया रचला. सध्या मोदी परराष्ट्रीय धोरण अतिशय उत्तम राबवीत आहेत.
ह्याचाच फायदा, योगीचे सरकार घेणार.
योगी, हेमंत बिस्वा. सध्या तरी, हेमंत बीस्वा आसाम सोडायला तयार नाहीत.अर्थात, अशा वेळी, अन्नामलाई हा दुसरा पर्याय देखील भाजपा कडे आहे.
वैयक्तिक पातळीवर, मला तरी, अन्नामलाई हे जास्त उत्तम वाटतात.
इतर पक्षांकडे ना पंतप्रधान पदासाठी चेहरा आहे ना ही देशाच्या प्रगतीसाठी धोरण...इतर पदांसाठी तर, कुठलाच चेहरा नाही.
वरील प्रतिसाद, हा फक्त आणि फक्त, चौकस २१२ , ह्यांच्या साठीच आहे.
(वादे वादे जायते संवाद:, असे होत असेल तर आणि तरच, वादविवाद करण्यात अर्थ आहे.)
24 Aug 2024 - 8:32 am | चौकस२१२
मुक्त विहारि तुम्ही देशाबद्दल बोलताय , मला वाटते हा धागा महाराष्ट्र राज्य बद्दल चालू आहे ?