महाराष्ट्रातलं राजकारण!

राघव's picture
राघव in राजकारण
21 Aug 2024 - 3:24 pm

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-)

सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही.
सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही.
काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे.

- सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे.
- त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे.
- मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल.

महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय.

बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय.

मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत.
त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल.
यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही.
त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर!

अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल.

इत्यलम्

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2024 - 10:08 am | अमरेंद्र बाहुबली

मनोरंजक प्रतिसाद.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2024 - 3:14 pm | मुक्त विहारि

ह्या विषयावर केलेली टिप्पणी आहे...

सध्या तरी केवळ महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून चर्चेकडे पहावे म्हणतो.

राज्याचा विकास म्हणजे मुंबई - पुण्याचा विकास इतपतच पुर्वी धोरण असायचं. ते किंचित जरा बदलल्यासारखं वाटतंय. पण अजूनही पुरेसं नाही.
मुंबईचं स्वतःचं उत्पन्न वेगळं धरलं तर उर्वरित महाराष्ट्राचं उत्पन्न देशभरात कोणत्या क्रमांकावर असेल हे विचारात घेण्यासारखं आहे.

मोदी-मोदी करत महाराष्ट्र भाजप मतं मागत फिरतो, पण मोदींचा आदर्श स्वतः वागवत नाही. उदा:
- मोदी मुख्यमंत्री असतांना गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रीय पातळीवरील किती नेत्यांच्या सभा झालेल्या आठवतात?
- मोदी स्वतः विकासाच्या मुद्द्यांना पुढे ठेवत गुजरात निवडणुका लढवत होतेत. त्यावेळी केंद्र पातळीवरील योजनांचा कितपत आधार त्यांना होता?
- कोणताही अंतर्गत विरोधक मोदींनी गुजरातेत शिल्लक ठेवला नाही आणि विरोधी पक्षाला एका विशिष्ट परीघाबाहेर जाऊ दिले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील परिस्थितीवर काय बोलणार?
- पर्यटनासाठी म्हणून कितीतरी आकर्षक योजना मोदींनी गुजरात साठी म्हणून पुढे आणल्यात. तिथे उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते. इथे असलेले जायची वेळ आलेली आहे.
- सोलार रिन्युवेबल एनर्जी साठी एवढा मोठा सेटअप तयार करणे, गुजरातला एनर्जी सरप्लसच्या कॅटेगरीत नेवून बसवणे हे विजन असल्याशिवाय होत नाही.
-
-
-
अनेक उदाहरणे देता येतील आणिक.
म्हणण्याचे तात्पर्य काय तर मोदींच्या नावावर मते मागण्याचा फार्स आता बंद व्हायला हवा. यांना स्वतःची काही राज्याच्या विकासाची विजन आहे का नाही? असेल तर मांडा म्हणावे पुढे. सध्यातरी केवळ संधीसाधू राजकारण, कुरघोड्या आणि भांडणे यातच यांचे दिवस चाललेत.

हेच इतर सर्व पक्षांनाही लागू पडते. कामाच्या विजनवर, ते प्राप्त करण्याच्या कुवतीवर आणि करून दाखवण्याच्या क्रेडिबिलिटीवर मतं मागून दाखवावे.

क्रेडिबिलिटी म्हटले तर राज ठाकरेंबद्दल बोलण्याची तशी सोय नाही. तरीही राज ठाकरेंना संधी आहे असे मी म्हणतो याचे कारण त्यांची पाटी इतरांच्या मानानं अजून कोरी आहे. जर नीट वापर केला तर बरेच काही करू शकतील.

मोदींना शिव्या घालणे सोपे आहे. पण पुढच्या १०/२०/३० वर्षांची विजन मांडणे, त्यासाठी योजना आखणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी धडपड करणे.. हे सर्व आणि तेही विरोधकांसमवेत राजकारण खेळत-खेळत करणे.. ते येरागबाळ्याचे काम नोहे.
दुर्दैवाने सद्यस्थितीत असे करू शकणारा कोणताही नेता/पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही.

दुर्दैवाने सद्यस्थितीत असे करू शकणारा कोणताही नेता/पक्ष महाराष्ट्रात दिसत नाही.

अगदी!

शाम भागवत's picture

24 Aug 2024 - 11:42 am | शाम भागवत

गुजराथमधे भाजपकडे बहुमत असताना मोदी मुख्यमंत्री झाले व त्यांना काम करायला १२ वर्षे मिळाली.
जर भाजपाकडे बहुमत असताना फडणवीस मुख्यमंत्री असते आणि त्यांना सलग १२ वर्षे मिळाली असती तरीही महाराष्ट्रात काही वेगळे घडले नसते असे तुम्हाला वाटते काय?

नाही नसतं घडलं,मंत्री म्हणून २०१४-२०२४(मधली २ वर्षे वगळता) मोठा काळ आहे.अजून किती वेळ द्यायचा?

शाम भागवत's picture

24 Aug 2024 - 12:28 pm | शाम भागवत

२०१४-२०२४(मधली २ वर्षे वगळता) भाजपाकडे स्वत:चे बहुमत होतं हे मला माहीत नव्हतं.
:)

कर्नलतपस्वी's picture

23 Aug 2024 - 5:40 pm | कर्नलतपस्वी

महाराष्ट्र सध्या खाऊ गल्ली झालाय व पोटभर्याचीं मांदियाळी आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात हेच कळत नाही. भाषा शिवराळ, माध्यमे , कर्मचारी पण वाहत्या गंगेत हात धुवून घेताना दिसतात. सामान्य जनता आणी संविधानाची पायमल्ली,आरक्षण नावाची पुंगी वाजवत सामान्य जन्तेवर गारूड करण्याचा प्रयत्न व आम्हींच कसे खरे प्रजेचे कैवारी हे दाखवण्याची होड लागली आहे.

माझ्या दृष्टीकोनातून तर निराशाजनक वातावरण आहे. मर्द?मराठा मावळ्यांची वंग बंधू सारखी परिस्थीती होणार यात मला तरी शंका वाटत नाही.

मनसे कडून मला तरी जास्त आपेक्षा नाही.

पन्नासेक वर्षापुर्वी उ प्र देशात गेलो होतो तेव्हां माझ्याकडे पुण्यावरून आलो म्हणल्यावर ऐलिस इन वडंरलॅण्ड मधून आल्या सारखे इतर लोक बघत असे. संतोष याचा आहे की माझेतर पाच दहाच राहिलेत पण येणाऱ्या पिढी करता वाईट वाटते.

तरी आज कोर्टाने प्रस्तावित बंदला परवानगी नाकारली .

बदलापूर च्या आड आपली रा. रो. शिकण्याचा प्रयत्न तर नाही....
दोन वाजेपर्यंत बंद करून गुन्हेगारांना उपरती होणार होती का ?
बहुसंख्य जनता रोजंदारीवर त्यांचे काय?

उद्या माझ्या मामे बहिणीचा दशक्रिया विधी आहे. ब्कद असल्यास सा जाणार मी पुण्याहून श्री क्षेत्र माहूली येथे? असे अनेक ऐरणीवर प्रश्न.......

नेतृत्व उद्घोषणा करते ,भक्त चिपळ्या घेत नाचू गाऊ लागतात पण खरी परवड सामान्य जनतेची होते.

Ssssssssssssss,ह्म्म .

माझा कुठलाही पक्ष नाही
मी पक्षाचा नाही...

ग्रामदैवते जास्त त्रासदायक ठरत आहेत.

जाऊ द्या.

शाम भागवत's picture

24 Aug 2024 - 10:56 am | शाम भागवत

४-५ वर्षांचा विचार केला तर खूप गोंधळाची स्थिती आहे हे मान्य करावे लागते आहे.

मात्र १९७८ च्या पुलोदच्या प्रयत्नापासून कॉंग्रेस विरोधकांची संख्या कमीकमी होत जाताना दिसते आहे. तसेच हिंदूंहितैषी समजला जाणारा पूर्वीचा जनसंघ किंवा आत्ताचा भाजप मोठा होत जाताना व मतदान टक्केवारी वाढवत जाताना दिसत आहे.

या प्रत्येक वेळी कॉंग्रेसविरोधकांपैकी कोणितरी कॉंग्रेस किंवा शरद पवार यांना मदत होईल अशी भूमिका घेतो व स्वत:चे आत्मसमर्पण करून घेत आला आहे.

२०१४ नंतर राज ठाकरेंनी असंच काहीतरी करून स्वत:चे महत्व कमी करून घेतले आहे. आता ते चूक दुरूस्त करायचा प्रयत्न करत असले तरी आता फार उशीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हाती देण्याइतपत, ते फारसे विश्वासार्ह समजले जात असतील असे वाटत नाही. मात्र शिंदे + राज ठाकरे यांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला तर मात्र नव्या स्वरूपात भाजप शिवसेना युती अस्तित्वात येऊ शकेल.

यावेळेस उध्दव ठाकरे यांनी आपली अनेक दशकांची हिंदूहितैषी भूमिका सोडून कॉंग्रेसला मदत होईल अशी भूमिका घेऊन आपला आत्मसमर्पणासाठी नंबर लावला आहे.

मागच्या ५ वर्षात बाकी सगळ्या पक्षात पडझड होत असताना भाजप चांगलाच एकसंध राहिला आहे व मतदान टक्केवारी टिकवून ठेऊ शकला आहे. तसेच फडणवीस यांच्या नेतृत्वाला मागे सारू शकेल असं एखादं नेतृत्व कोणी साकारू शकलेलं नाही. अजूनही त्याना भ्रष्टाचारी म्हटलं जात नाही किंवा त्यांच्यापेक्षा स्वच्छ माणूस मतदारांसमोर उभा करता येत नाही आहे.

त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम म्हणून भाजप व कॉंग्रेस आणखी बळकट होतील. किंवा ध्रृविकरण आणखी वाढलेलं दिसून येईल असे वाटते. पण यात भाजपाचा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. कारण मुस्लिम एकगठ्ठा मतांची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंचे मतदान यावेळेस वाढू शकते व त्यामुळे भाजपाची मतदान टक्केवारी वाढू शकते. हिंदू नेहमीच उशिरा जागा होतो व प्रतिक्रिया नोंदवतो.

१९७७ नंतर गेल्या अनेक विधानसभा निवडणुकातील मतदान टक्केवारीचा कल पाहता कॉंग्रेस+ राष्ट्रवादी यांची टक्केवारी घसरत आहे व भाजपाची वाढत आहे. तोच कल चालू राहील असे वाटते. (याला अपवाद १९९९ च्या निवडणूकांचा आहे.)

पण ४-५ वर्षांपुरता विचार केल्यास या अगोदर आलेल्या सर्वांच्या प्रतिक्रिया यथायोग्य वाटतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2024 - 12:41 pm | अमरेंद्र बाहुबली

मागील १० वर्षात महाराष्ट्र भाजपच्या गलीच्छ राजकारणाला महाराष्ट्राची जनता वैतागली आहे. ईडी सोडून पक्षात भरती करणे नंतर सेटलमेंट करुन चौकश्या बंद करणे हे पाहून भाजप भ्रष्टाचार विरोधी आहे हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे.
हिंदूंच्या मतांवर निवडून येऊन हिंदूंसाठी भाजपने काहीही सकारात्मक केले नाही. वक्फ बोर्डाला भरघोस मदत, मुस्लिमांसाठी प्रचंड योजना ह्यामुळे हिंदू समाज भाजपवर नाराज आहे, ह्याची परिणीती आपण लोकसभा निवडणुकीत पाहिली.
गुजरातला महाराष्ट्रातले पळवले जाणारे प्रकल्प पाहून भाजप महाराष्ट्रद्रोही आहे हे जनमानसाला समजले आहे.
मराठी लोकांचा पक्ष शिवसेना संपवन्याचा प्रयत्न करने, उद्धव ठाकरेंसोबत केलेली दगाबाजी जनता विसरलेली नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना लोकसभा निवकडनुकीत प्रचंड प्रमाणत यश मिळाले. उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचाही फायदा झाला जसा २०१४ नी १९ च्या निवडणुकीत भाजपचा झाला होता.
उद्धव ठाकरे शरद पवार अश्या हेवीवेट नेत्यांसमोर टिकू शकेल असा एकही नेता महाराष्ट्र भाजपकडे नाही हे ओळखूनच लोकसभेला राज ठाकरे ह्यांचे भाजपने लांगूलचालन सुरू केले होते, पण ह्याचा काही विशेष फायदा झालेला दिसत नाही.
भाजपचा महाराष्ट्रात ऱ्हास सुरू झालेला आहे. आता मोदी, योगी, शहा कुणीही भाजपला वाचवू शकत नाहीत. येत्या विधानसभेला भाजपचा दारुण पराभव होणार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी नेत्याना ईडी च्या त्रासापासून वाचण्यासाठी तसेच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले जाऊन मराठी मुलांच्या नोकर्या हिरावल्या न जाण्यासाठी भाजपचा पराभव होणे गरजेचे आहे आणी तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2024 - 3:14 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद...

मतदार बडगा दाखवणार आणि नवे राज्य येणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2024 - 8:07 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ भाजप जाणार.

मुक्त विहारि's picture

26 Aug 2024 - 11:08 pm | मुक्त विहारि

पृथ्वीराज चौहान ते विजयनगर साम्राज्य....

हा इतिहास बघता, भाजपची सत्ता गेली तरी आश्चर्य वाटणार नाही....

कॉमी's picture

27 Aug 2024 - 8:30 am | कॉमी

मनोरंजक प्रतिसाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Aug 2024 - 9:48 am | अमरेंद्र बाहुबली

+१ मनोरंजक प्रतिसाद.
रच्याकने एक
दीड महिन्याआधी माझ्या प्रतिसादांवर टीका करणारे सुबोध खरे नी इतर महानुभाव मुविकाकांच्या प्रत्येक प्रतिसादाखालील “मनोरंजक प्रतिसाद” वेळी बरोबर गायब होतात.

चौकस२१२'s picture

26 Aug 2024 - 6:07 am | चौकस२१२

उद्धव ठाकरे शरद पवार अश्या हेवीवेट नेत्यांसमोर टिकू शकेल असा एकही नेता महाराष्ट्र भाजपकडे नाही हे
कोणीच नाही??? लाईट वेट F20 ने दोन्ही पक्षातील लोक बाहेर पडण्यात यशस्वी रिटाय काम केलं ना! म्हणजे तसा आरोप तुम्ही लोकांच करता म्हणून म्हणलं

गुजरातला महाराष्ट्रातले पळवले जाणारे प्रकल्प

प्रत्येक राज्य आपलै परीने खाजगी उद्योगांना निमंत्रण देते ,, मागे मला आठवतंय एक जर्मन कंपनी मुंबईतील मोक्याच्या जागेतुन कारखाना हलवून मुंबईचं बाहेर सहज पणे पुण्याच्या आसपास नेऊ शकली असतो पण त्यांनी गोव्याला नेली ... कारण? गोवा सरकारने खास काही जास्त फायदे दिले होते

बंगाल मध्ये उद्योगाना प्रोतसहन मिळत नाही म्हणून महाराष्ट्रात येतात तेव्हा बंगली लोक असेच ओरडतात पण कोण लक्ष देणार ...

भाजप म्हणजे गुजराथी हा बेअक्कल प्रचार आहे
मग द्या गडकरी आणि फडणवीस ना पाठवून तिकडे मग येतील महाराष्ट्रात सगळे प्रकल्प .. खुश मग

किंवा समजा उद्या काँग्रेस आली सत्तेवर महाराष्ट्रात आणि दिल्लीत पण ( स्व बळावर) मग ती महाराष्ट्रवादी होईल? हाय कमांड दिल्लीलाच ना

हा केंद्र / राजय ओरडा करीत बसण्यापेक्षा मग शिंदे -प्रमुख असलेलया शिवसेनेला निवडून द्या !

महिला म्हणून मला ५०% प्रवास सवलत, मुलींना उच्च शिक्षण १००% मोफत, लाडकी बहिण योजना आवश्यक, उपयोगी वाटल्या.बघूया पुढे येणारे सरकार या योजना कायमस्वरूपी करताय का?

धर्मराजमुटके's picture

25 Aug 2024 - 7:56 pm | धर्मराजमुटके

मी शक्यतो महापालिका निवडणूकीत नगरसेवक निवडताना नोटा चा पर्याय वापरतो असतात कारण तिथे एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा असे एकसे एक नग असतात मात्र विधानसभेला देखील तोही पर्याय वापरावा लागेल असे दिसते. त्यापेक्षा टेंडर काढून ५ वर्ष एखाद्या कंपनीला शहरांचा कारभार चालवायला द्यावा.

राज ठाकरेंची भाषणे सेन्सीबल असतात पण त्यांना मते पडत नाही हे एक दु:खच आहे. कदाचित कथनी आणि करणी वेगळी असावी.

फडणवीस तांत्रिकदुष्ट्या तर्कसंगत बोलतात मात्र भाजपाने कचर्‍यातून मोती शोधायचे काम चालवले आहे त्यातून सध्या फक्त हात घाण होताना दिसतात.

अजित पवार पोलीटीकली करेक्ट नसतील मात्र मला वैयक्तीक रित्या ते आवडतात. कामात धडाडी आहे. संख्याबळ पाठीशी नाही नाहीतर आतापर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यापेक्षा तडफेने काम करु शकतील याबद्द्ल शंका नाही.

शरद पवार साहेबांबद्दल सुरुवातीच्या काळात खूप आदर होता मात्र आता फक्त पुस्तकी आदर राहिला(म्हणजे मोठ्या माणसांना आदर द्यावा अशी आपली पद्धत आहे त्याप्रमाणे.)
उद्धव ठाकरे शांत म्हणून सुरुवातीला कौतूक होते आता टोमणे ऐकायचा कंटाळा आला. काँग्रेस बद्द्ल न बोललेले बरे.

आंबेडकरी पक्ष १७६० मात्र फायदा शुन्य !
एकंदरीतच बहुजन पक्षांचा कार्यक्रम मनुस्मृती जाळणे आणि ब्राह्नंणांना शिव्या घालणे इतपत मर्यादित आहे.

आपले एक मत आपले भविष्य बदलू शकते यासारखी भंपक घोषणा आख्या जगात नसेल.

त्यापेक्षा सरळ पैसे घेऊन मतदान करणे किंवा नोटा ला मत देणे हा उत्तम पर्याय आहे.

पैसे घेऊन किंवा दारुच्या बाटलीवर मत देणार्‍यांना आपल्यापेक्षा जास्त अक्कल असते (निदान एक दिवस खरोखरचे राजे तरी होतात) या निष्कर्षापर्यंत आता येऊन पोहोचलो आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2024 - 8:08 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
पुण्यातील माझ्या ओळखीचे अनेक भाजप समर्थक मतदान करणार नाही केलेच तर नोटा दाबणार असे बोलत आहेत.

कंजूस's picture

25 Aug 2024 - 8:25 pm | कंजूस

महाविकास आघाडी येऊ द्या एकदाची. पाच वर्षे टोमणे तरी बंद होतील. आणि सर्व नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येतील परत धडाधड.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2024 - 12:36 am | अमरेंद्र बाहुबली

आणि सर्व नवीन प्रकल्प महाराष्ट्रात येतील परत धडाधड. नाही आले नवीन तरी चालेल, पण जे गुजरातला पळवले जाताहेत ते पळवणे तरी बंद होईल. महाराष्ट्रद्रोही सरकार नसेल, महाराष्ट्र प्रेमी सरकार असेल.

मुक्त विहारि's picture

26 Aug 2024 - 11:04 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

चौकस२१२'s picture

26 Aug 2024 - 6:08 am | चौकस२१२

शरद पवार साहेबांबद्दल सुरुवातीच्या काळात खूप आदर होता सहमत

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Aug 2024 - 9:56 am | अमरेंद्र बाहुबली

राज्यात गुन्हेगारी आणी भ्रष्टाचाराने हाहाकार माजवलाय.
बदलापूर घटनेतील पीडितेच्या आईवडिलाना १२ तास पोलिसांनी बसवून ठेवले, आंदोलन करणाऱ्या लोकांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत. १५ दिवसांचे शाळेचे सिसिटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेत. एकंदरीत गुन्हेगाराला वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याचे दिसतेय. न्यायालयाने देखील ह्या युती सर्कसरचे तोंड फोडलेय.
मोदीनी उद्घाटन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडून तुकडे तुकडे झालेत, निवडणुकीच्या तोंडावर जसे अर्धे अपुरे राममंदिराचे घाईघाईत उद्घाटन करन्यात आले होते तसेच पुतळ्याचे ही क्रेडिट खाव योजने अंतर्गत घाई गडबडीत काम करुन उद्घाटन करण्यात आले. पुतळ्याला ५ कोटीच्या आसपास खर्च झाल्याचं सांगण्यात येतंय, पान भरपूर पैसे खाऊन अतिशय निकृष्ट दर्ज्याचं काम करण्यात आल्याचं दिसतंय, भाजपच्या भ्रष्टाचारा पासून महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजही वाचू शकलेले नाहीत.
भाजपच्या राज्यातील उरलेल्या दोन महिन्यात आणखी काय काय पहायला मिळणार देव जाणे.

गेल्या काही दिवसांत मिपा बंद होते बहुतेक.. आत्ता बघितले प्रतिसाद.

अजूनही योजनाबद्ध विकासावर कुणी मतं मागण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करेल असं वाटत नाही. फालतू राजकीय विषयांवरची भांडणं अन् शिवराळ भाषेच्या जोरावर दिशाभूल करण्याचेच प्रयत्न चाललेत. वरील काही प्रतिसादच या अनुषंआनं पुरेसे बोलके आहेत.

पुर्वीही अनेक वेळा, सरकार पटलं नाही तरीही लोकं त्याच सरकारला मतं देऊन मोकळी होतांना दिसत. कारण बाकीचे जे नुसते बोलतात त्यांना मत देऊन ते वाया गेल्यासारखे वाटत असे. अत्रे, कॉ. डांगे यांच्या सभांना प्रचंड गर्दी लोटत असे पण मतपेटीत ते उतरत नसे.

राज ठाकरेंचेही असेच काहीसे होतांना दिसतं. कारण सरळ आहे -
लोकांमधे अजून खोलवर शिरकाव झाला नाही. संघटना मजबूत नाही अन् लोकांची कामं धसास लावण्याची धडाडी दिसत नाही. चार शिव्या घालून, गल्लीछाप राजकारण खेळून हशा आणि टाळ्या मिळू शकतील, पण लोकांना ते फक्त मनोरंजन वाटत असेल तर मतं कशी मिळणार?
म्हणूनच पुन्हा म्हणतो, आत्ताची परिस्थिती एखाद्या सुदृढ पर्यायासाठी अत्यंत अनुकूल आहे. पण ती पर्यायाची जागा मिळवावी लागेल आणि त्यासाठी कमरतोड मेहनत आली. ते मनसेला जमेल की नाही यावर त्यांचे भविष्य असेल. नाही तर चंगो म्हणतात तसे - "डाव तुझ्या हाती दिला तरी जिंकता तुला येत नाही" अशी वेळ येणे आहे.

पर्याय म्हणतोय तेही महाराष्ट्र भाजप आघाडी आणि मविआ, दोघांच्याही संधीसाधू आणि खालच्या पातळीवरच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे म्हणून. कुणातरी पर्यायानं "एकला चलो रे" केले पाहिजे आणि मतांचं ध्रुवीकरण घडवले पाहिजे.

सिद्धार्थ ४'s picture

30 Aug 2024 - 6:27 pm | सिद्धार्थ ४

मनोज जरांगे सुद्धा त्यांची टीम उभी करणार आहे म्हणतात . तसे झाले तर काय परिस्थिती होईल?

विकास आघाडीसाठी आणखी एक सत्ता केंद्र डोकेदुखी ठरेल.
इकडे मनसेही २८२ जागा लढवण्यावर ठाम आहे. प्रकाश आंबेडकरही उमेदवार उभे करतील. बीएसआरचं माहीत नाही.

सुबोध खरे's picture

31 Aug 2024 - 9:30 am | सुबोध खरे

जरांगे हे बुजगावणे आहे. त्यांना कोणताही शेंडा बुडखा नाही.

चार हिरवट टाळक्याची तरुण पोरं त्यांच्या आंदोलनाचं पाठी गेल्यामुळे केवळ काही मते विभाजित होतील.

पण मुळात मराठा आरक्षण हा मुद्दा राज्य चालवण्यासाठी किती उपयुक्त आहे?

हे सर्व केवळ फडणवीस हे शस्त्र बोथट करण्यासाठी शरद पवार यांनी चालवलेलं प्यादं आहे.

उद्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण मान्य केलं तर यांची उपयुक्तता संपेल. मग त्यांना खड्यासारखा बाजूला टाकलं जाईल.

आणि अगदी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अमान्य केलं आणि त्यासाठी कोणतयाही आंदोलनाला बंदी घातली( जशी मागच्या शनिवारी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद ला घातली तशी) तरी जरांगे याना कोण विचारेल?

ते केवळ एक प्यादं आहे हे बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही हेच आश्चर्य आहे.

सुबोध खरे's picture

31 Aug 2024 - 9:35 am | सुबोध खरे

मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष "असून अडचण आणि नसून खोळंबा" असे आहेत.

केवळ चालत्या गाड्याला खीळ घालणे सोडून ते दुसरे काहीही करू शकत नाहीत.

ना त्यांच्याकडे धड पक्ष संघटना आहे ना काही ठोस कार्यक्रम.

मंत्री म्हणून काम करू शकतील इतकी दोन आकड्यातही माणसे त्यांच्याकडे नाहीत.

अशा लोकांना दोन पाच जागा सोडल्या तर जास्त काही हाती लागणार नाहीये.

पण भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांची काठावरची मते फिरवून त्यांना अपशकुन मात्र करू शकतील असे आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2024 - 10:00 am | अमरेंद्र बाहुबली

मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष "असून अडचण आणि नसून खोळंबा" असे आहेत. सहमत.
पण आता परिस्थिती बदलली आहे. वंचित सोबत mim पक्ष होता तेव्हा वंचितची ताकद निश्चितच जास्त होती. २०१९ लोकसभेला त्याचा मोठा फायदा भाजप आणी ठाकरेंना झाला. पण ह्या लोकसभेला वंचितचा काहीही प्रभाव नव्हता. कारण mim सोबत नव्हता, आणी मुस्लिम एकगठ्ठा मते मविआ कडे वळली. ह्या पेक्षा वंचितने एमवीआ सोबत जायला हवे होते, आंबेडकर अकोल्यातून खासदार असते.
मनसे पक्ष कधीही कुठेही मते फिरवू शकला नाही. ह्या लोकसभेला राज ठाकरेंच्या सभा होऊनही भाजपला काडीचा फायदा झाला नाही. अनेक जागा भाजप स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर जिंकले. मोदी आणी राज दोन्हीही ह्या लोकसभेला राज्यात सपशेल अपयशी ठरले.

मागे वंचितने कॉन्ग्रेसची मतं खाल्ली होती. मनसे ठाकरे पक्षाची मते खाणार. म्हणजे ही सत्ताकेंद्रे कुणाच्या मुळावर आहेत ते समजेल. फडणवीसांना शह देण्यासाठी याचा काही उपयोग नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2024 - 1:00 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणविसाना शह?? खो खो. ह ह पू वा.
महाराष्ट्रात भाजपचे दुकान मोदी नावाने चालू होते तेही ठाकरे पवार द्वयीने लोकसभेला उध्वस्त केले.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2024 - 9:37 am | अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात मविआ ने बंद पुकारला तर तो अवैध असतो. पण
भाजप्यांनी बंगालात बंद पुकारला तर तो वैध असतो. :)
आयरनीच्या देवा.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Aug 2024 - 10:28 am | अमरेंद्र बाहुबली

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महराजांचा पुतळा पडला त्यावरून शिंदे आणी अजित पवार ह्यांच्यानंतर पंतप्रधान मोदी ह्यानी देखील महाराष्ट्राची माफी मागितली आहे. पण महाराष्ट्र माफ करेल का करेल? हा प्रश्न आहे.
विमानतळा पासून रस्ते, रेल्वे सगळीकडेच भाजपची सरकारे निकृष्ट बांधकाम करून मोठ्या प्रमाणात पैसे खात आहेत.
त्यांच्या ह्या पैसे खाऊ मोहिमेत त्यांनी महराजानाही सोडलेले दिसत नाही. आणी आता नौदलाकडे बोट दाखवत आहेत, मुळात नौदलाला काय गरज असेल पुतळा लोकसभा निवडणुकीसाठी घाईघाईत उभा करायची? हे सगळं भाजप नी स्पेशली मोदींसाठी करण्यात आलं हे न ओळखण्या एवढी जनता भाजपेयीना दुधखुळी वाटते का?? आता तर भाजपेयी भारतीय नौदलालाच भ्रष्टाचारी ठरवत आहेत. नंतर त्यानी वाऱ्यांमुळे पुतळा पडला हे कारण दिले, समुद्रकिनारी वारे वाहतात हे माहित नसावे का? म्हणजे भ्रष्टाचार लपवण्यासाठी काहीही थातूरमातूर कारणे सांगितली जात आहेत. पुतळ्यापेक्षा उद्घाटनाला नेत्यांची बडदास्त ठेवण्यात जास्त खर्च आला असे कळाले. पुतळा उभारणीनंतर दोन की तीनच महिन्यात फरश्या निघुन वर आल्या होत्या. भ्रष्ट भाजपेयींनी शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. महाराष्ट्र हे विसरेल आणी माफ करेल असे वाटत नाही.

कंजूस's picture

31 Aug 2024 - 12:12 pm | कंजूस

( बोलभिडू चानेलचा विडिओ)
आता मी पुतळाच म्हणतो. तो पायाच्या चौथऱ्यातून उखडला गेलेला दिसत नाही. पुतळ्याचे पाय मोडून पडला आहे. म्हणजे पुतळा घडवणाऱ्या भट्टीने धातू चांगला वापरलेलला नाही. त्याचे तुकडे झाले आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2024 - 1:41 pm | अमरेंद्र बाहुबली

वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नव्हतात ना? संजय राऊतांचे फडणवीसांना टोले
https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/16096

@अबा, तुम्हाला प्रतिक्रिया देऊन उपयोग नसतो त्यामुळे तसे काही करणार नव्हतो.
पण स्कोर सेटलिंग साठी या धाग्याचा उपयोग करू नये अशी मनःपूर्वक विनंती.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Sep 2024 - 7:03 pm | अमरेंद्र बाहुबली

सर हा धागा निवडणूक चर्चेसाठी आहे ना? त्या संदर्भातच बातमी आली तर स्कोर सेटलिंग? कोणाचा स्कोर? कुठे सेटल करतोय??
बाकी तुम्हीही भाजप समर्थक त्यातही फडणवीस समर्थक असाल नी त्यांच्या विरुद्धच्या बातम्या नको असतील तर तस स्पष्ट सांगा.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Sep 2024 - 9:40 pm | अमरेंद्र बाहुबली

माझा २०१९ चा भाजपला जास्तीतजास्त ११० जग मिळतील हा अंदाज जवळपास बरोबर आला होता. २०२४ लाही भाजपला लोकसभेला २३४ जागा मिळतील हा जग थोडक्यात बरोबर आला.
आता मी माझ्या अभ्यासानुसार विधानसभेचे आकडे देतोय.
काँग्रेस ७१
शिवसेना ६५
राष्ट्रवादी काँग्रेस ५५
भाजप + अजित पवार गट + शिंदे सेना = ७५-७८ जागा.
इतर १० ते १२.

सिद्धार्थ ४'s picture

5 Sep 2024 - 10:23 pm | सिद्धार्थ ४

निदान मराठा आरक्षण लढा थंड होईल. कुठलेही संप/बंद होणार नाहीत.

पण हे जे काही सरकार बनेल ते पाच वर्ष टिकू शकेल का?

चौकस२१२'s picture

6 Sep 2024 - 10:06 am | चौकस२१२

मराठा आरक्षण
खालील प्रतिसाद उडवलं जाईलच पण तरीही लिहतो
१)ज्या समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आणि मंत्री
२) ज्या समाजाकडे भरपूर जमीन
३) शिक्षणात आणि उद्योगात पुढे ( कोलहापौर सातारा भाग बघा )
४) शिक्षण उद्योग आणि सहकार हाती
५) स्वतः छत्रपती ज्यांचे पूर्वज ९६%

तो समाज "मागासलेला " कस काय बुवा

आणि समजा असलाच अरी मग या १० पैकी ७ मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या बारामतीच्या " जाणत्या राजाने" एवढी दशके का नाही "बहाल" केले आरक्षण ?

हि केवळ झुंड शाही आहे

तळागाळातील लोकांना मदत करायाची तर ती आर्थिक मागासलेपणावर असावी आणि ती सुध्दा फी सवलत, वसतिगृह , पुस्तके , जास्तीचे वर्ग , कपड्या साठी , जेवणासाठी कुपन वैगरे , रोख पैसे पण नाही ...

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2024 - 10:24 am | अमरेंद्र बाहुबली

तळागाळातील लोकांना मदत करायाची तर ती आर्थिक मागासलेपणावर असावी हे स्पष्ट सांगायची हिंमत आहे का भाजप नेत्यांची?

एकूण चौकस२१२ यांचे मुद्दे तुम्हाला पटलेले दिसतात. तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकी आधी तुमच्या आवडत्या पक्षांनी हे सत्य ठणकावून जनतेला सांगीतले पाहिजे की गेली ७०-७५ वर्ष जनतेत फूट पाडून, समाजात विष कालवून स्व आर्थिक आणि सत्ता प्रगती साधली तशीच आत्ताही केले पाहिजे?

चौकस२१२'s picture

6 Sep 2024 - 12:28 pm | चौकस२१२

भाजप गेला खड्यात,, आधी एवढी वर्षे कोंकग्रेस्स जे जात पाट मनात नाही ना त्यांनी काय केला?

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2024 - 3:11 pm | अमरेंद्र बाहुबली

काँग्रेस पुरोगामी संघटन आहे. तिथे भाजपात भरणा ओस्लव्ह
मनुवादी नाहीत.

टीपीके's picture

6 Sep 2024 - 6:54 pm | टीपीके

हे कोणी ठरवलं? अहो हे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे, अत्यंत जातीयवादी पक्ष आहेत हे आणि तूम्ही त्यांची भालमण करता? तुम्ही पण त्याच कॅटेगरी मधले का?

आणि हो, बिजेपी ला शिव्या घातल्याने आणि त्यांच्या खऱ्या खोट्या चुका दाखवल्याने इतर लोक (उबाठा, शप, रागा, अके, अया इत्यादी) सज्जन नाही होत. अर्थात तुम्हाला हे कळले तरी तुम्ही मान्य नाही करणार, तुमचे पोट चालते ना यावर.

अणि हो, हे सतत मनुवाद मनुवाद बोलणारेचं सगळ्यात जातीयवादी, हलकट असतात असं आता माझे ठाम मत झाले आहे, त्यांना स्वतः सोडून कोणाचेही कल्याण होण्यात इंटरेस्ट नसतो, हे फक्त इतरांच्या नावाने शिमगा करून स्वतच्या तुंबड्या भरतात. अत्यंत हीन माणसे. नक्षलवादी.

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

खांद्याखाली बळकट असणारी माणसं कधी तर्कशुद्ध युक्तिवाद करतात का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Sep 2024 - 10:09 pm | अमरेंद्र बाहुबली

हे कोणी ठरवलं? अहो हे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे, अत्यंत जातीयवादी पक्ष आहेत तसा एकमेव पक्ष भाजप आहे.

आणि हो, बिजेपी ला शिव्या घातल्याने आणि त्यांच्या खऱ्या खोट्या चुका दाखवल्याने इतर लोक (उबाठा, शप, रागा, अके, अया इत्यादी) सज्जन नाही होत. त्याचप्रमाणे काँग्रेसला, शिवसेनेला शिव्या घातल्याने आणि त्यांच्या खऱ्या खोट्या चुका दाखवल्याने इतर लोक (नमो, अशा, देफ, अबी,चंपा,गिमा,मोभा इत्यादी) सज्जन नाही होत.