महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वर्षी होऊ घातल्यात. या अनुषंगानं काही बाबी चर्चाव्याशा वाटल्या! :-)
सद्य परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण इतकं किचकट, विचित्र आणि गलिच्छ झालेलं आहे की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात जातो ते सांगता येत नाही.
सततची नवनवीन भांडणं, राजकीय हाणामाऱ्या, मोर्चे.. जणू केवळ राजकारण करण्यासाठीच यांना आपण निवडून देत असतो. कामं वगैरे आपापल्या गतीनं होतात, त्यात यांचा काही हातभार आहे असे वाटतच नाही.
काही आठवड्यांपासून सजगपणे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकत/बघत्/वाचत होतो. सरळ दिसतं की सर्वसामान्य जनता या सगळ्याला आता जाम कंटाळली आहे. उत्तम अन् समर्थ पर्याय पुढे आला तर नक्कीच त्याला चांगली संधी आहे.
- सध्या ७ प्रमुख पक्ष महाराष्ट्रात झालेत. काँग्रेस, २ रा. काँग्रेस, २ शिवसेना, भाजप आणि मनसे.
- त्यात वंचित आघाडी आणि ओवेसी यांची मतं घेण्याची ताकद किती हे वेगळे.
- मतविभाजनाचा फायदा घेण्यास सगळेच पक्ष उत्सुक असतात, पण यावेळच्या परिस्थितीत कोणाला मुळात खरोखर फायदा होऊ शकेल हा मुद्दा लक्षवेधी असू शकेल.
महाराष्ट्र भाजपनं अतिशय घाणपणे मागच्या काही वर्षात राजकारण केलंय. एकतर आयारामांनी भाजप भरलंय. पार्टी विथ डिफरन्स वगैरे सगळं नावाला उरलंय. भाजपला स्वत:वर विश्वासच उरला नाहीये असं वाटायला लागलंय. मला अजूनही वाटतं की भाजपनं तो पहाटेचा शपथविधी न करता विरोधात बसणं स्विकारलं असतं तर पुढची निवडणूक त्यांना एकट्याला लढवता आली असती आणि जिंकताही आली असती. संधिसाधू राजकारणाचा फास स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेण्याचा त्रास आज सगळ्यात जास्त त्यांनाच होतोय आणि आपण आलिया भोगासी करतोय.
बाकी दोन्ही शिवसेना, दोन्ही रा.काँ आणि काँग्रेस मला स्वतःला पसंत पडत नाहीत कारण त्यांच्याकडे विकासाचा कोणताही आराखडा नाही. केवळ संधिसाधूपणाच हे सर्व पक्ष करताना दिसतात ज्याचा आता अक्षरशः उबग आलाय. दुर्दैवानं भाजपही त्याच रांगेत जाऊन बसू पाहतोय.
मला तरी वाटतं की राज ठाकरेंना या निवडणूकीत उत्तम संधी आहे. ते कोणत्याही आघाडीत अजून नाहीत.
त्यामुळे जर महाराष्ट्र पिंजून काढला, मुख्य विरोधकाची जागा घेतली, इतर सर्व पक्षांच्या विरुद्ध आघाडी उघडली आणि लोकांना विश्वास दिला तर; मतांचं पोलरायजेशन मनसेच्या बाजूनं घडू शकेल.
यात मुख्य अडचण अशी वाटते की मनसेचा पाया महाराष्ट्रभर अजूनही नाही. पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडला तरी त्यांचा पुरेसा जम बसलेला आढळत नाही.
त्यामुळे या संधीचा फायदा मनसे जागांच्या बाबतीत कितपत उचलू शकेल याबद्दल शंका आहे. अर्थात् पक्ष महाराष्ट्रभर पोचवायला का होईना याचा उपयोग होऊ शकतो, जर तसं केलं तर!
अर्थात् हे सगळं नुसतंच विचारमंथन झालं. यासाठीचा अभ्यासपूर्ण विदा माझ्याकडे नाही. तरीही आपल्या सर्वांचं यावर मत जाणून घ्यायला आवडेल.
इत्यलम्
प्रतिक्रिया
7 Sep 2024 - 12:38 am | टीपीके
फिर्यादी पण तुम्हीच आणि न्यायाधीश पण तुम्हीच. गंमतच आहे. मग बाकीच्यांनी बोलायलाच नको. पूर्णपणे निर्लज्ज नक्षलवादी मोडस ऑफ ओपरांडी.
7 Sep 2024 - 3:07 pm | चौकस२१२
काँग्रेस पूर्रोगामी आहे ना , मग जात पात नष्ट करण्यासाठी प्रयतन नको का करायला त्यांनी ?आर्थिक मागासलेयांना मदत द्या असे का नाही म्हणत , सध्या तर काँग्रेस चे नेते जातीवर लोकसंखय मोजणी पाहिजे म्हणतात, हे कसे काय बुवा?
पगडी पागोटे राजकारण कोण करत?
तरी बरं मोदी ओबीसी आहेत !
असो जातीचे राजकारण कोण करताय , ते सगळ्यानं दिसतंय ... चालुद्या
येटाय का इकडे , नळाला भरपूर पाणी आणि जातीवर आधारित आरक्षण नाहीये त्यामुळे पचणार नाही तुमच्या सारखया विचारसरणीला !
एक देश एक सर्वधर्मभावी कायदा हाय . येताय ?
7 Sep 2024 - 6:50 pm | कॉमी
जातं पात नष्ट करण्याचा आरक्षणाशी काय संबंध आहे? तुम्हाला काय भारतात जातीव्यवस्था आरक्षण लागू झाल्यावर मग आली असे वाटते काय?
6 Sep 2024 - 12:30 pm | चौकस२१२
हे आधी तुम्हाला पटतंय का ते सांगा ना मी भाजप चा प्रवक्ता ना तुम्ही काँग्रेस चे मग व्यक्ती म्हणून बोला
नसेल तर स्पष्ट सांग कि पुढारलेल्या मराठा समाजाला सुद्धा आरक्षण पाहिजेच
6 Sep 2024 - 8:09 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्याखाली बळकट असणारी माणसं कधी तर्कशुद्ध युक्तिवाद करतात का ?
6 Sep 2024 - 10:10 pm | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही खांद्याखाली आणि कमरेवर बळकट असल्याने तुमची ५६ इंची ढेरी वाल्याच्या समर्थनार्थ असतात...
6 Sep 2024 - 1:21 am | रामचंद्र
असेच अंदाज व्यक्त होऊ लागले तर सरकार राज्यातली निवडणूकच शक्य तितकी पुढे ढकलेल त्याचं काय?
6 Sep 2024 - 10:24 am | अमरेंद्र बाहुबली
आजचं मरण उदयावर ढकलले तर टळते का?
6 Sep 2024 - 11:22 am | कंजूस
दोन्ही आघाडींना प्रत्येकी १३० जागा मिळतील, इतर छोटेमोठे पक्ष २२ जागा मिळतील.
मग बघा काया रस्सीखेच होते. ती पाच वर्ष टिकेल. रोज भोंगे वाजतील आणि चानेल्सना( टीवी आणि यूट्यूबचे) भरपूर कमाई होईल
6 Sep 2024 - 12:34 pm | चौकस२१२
१३० चे विभाजन कसे होते त्यावर आहे पण तसे होऊ नयेच परत साली खिचडी,, सरळ काँग्रेस किंवा भाजप ला १७० द्या रे आणि व्हा मोकळे जा मग ५ वर्षे चहा प्यायला...
आपण जनता त्याचूच आहे की नाही समजत सरळ सरळ दोन विचारसरणीत विभाग आणि व्हा मोकळे
6 Sep 2024 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली
आजीबात नको, देशात आणी राज्यात खिचडीच सडकर हवे. एकहाती सत्ता दिल्याने सरकारी संस्थांचा कसा गैरवापर होतो हे आपण मागच्या दहा वर्षात पाहिलेय.
7 Sep 2024 - 2:57 pm | चौकस२१२
आजीबात नको, देशात आणी राज्यात खिचडीच सडकर हवे.
१) एक क्षण भर असे धरुयात कि राजीव गांधींना जेव्हा इंदिरा गांधीं हत्येची सहानुभूती म्हणून ४०० पार जागा मिळाया होत्या तेव्हा तुम्ही प्रौढ होता मग तेव्हा हेच असते का तुमचे मत?
२) जगभर जिथे चांगली प्रस्थापित लोकशाही आहे तिथे अशी खिचडी कमी असते .. आणि देशाला फायदा होतो ... ज्याला कौल मिळतो तो नेहमी राक्षसी बहुमत नसते पण तुम्हाला काय त्याचे म्हणा ! खिचडी असली कि विचका व्हायला संधी चांगली असते ना !
6 Sep 2024 - 3:07 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप ६० जागाही पार करणार नाही. शिंदे जास्तीत जास्त २० दादा १०.
6 Sep 2024 - 12:43 pm | चौथा कोनाडा
पुतळा पडला .. खरा शिवभक्त मनोमन दुखावला ..... पंप्रंनी माफी मागितली !
मलिदाखाऊगिरी.. अयोग्य कलाकार / कलासंस्थेची निवड, घिसडघाई या सगळ्या गोष्टी चव्हाट्यावर आल्यात ..
नेहमी प्रमाणे वरवर वाटणारे दोषी फरार होते.. आताच सापडलेत .... संबंधित संस्था तपासाचे नाटक करताहेत (नेहमी प्रमाणे)
महाराष्ट्राची इज्जत जगाच्या वेशीवर टांगली गेलीय ...
पंप्रनी या प्रकरणाच्या खर्या दोषींना शिक्षा केली नाही तर शिवभक्त त्यांना माफ करणार नाहीत !
न खांउंगा न खाने दुंगा यांच्या छत्रछायेखाली उघडउघड भ्रष्टाचार सुरु आहे .. अनेक प्रकरणे रोज उघडकीस येत आहेत ..
ज्यांना वर्षानुवर्षे विरोध केला, त्यांना आणी त्यांच्या बगलबच्चांना आश्रय देऊन वाचवले आणि पुढील चराऊ कुरणाची सोय केली.
देवेंद्र फडणवीस यांचा युनिकनेस संपला, भाजपा टीम यांच्या बद्द्ल भ्रमनिरास झाला. लोस पेक्षा विस मध्ये अधिक पडझड होणार हे नक्की !
बाकी राज ठाकरेंना भरघोस मतदान करायला सामन्य मतदारांना काहीच ठोस कारण सापडत नाही त्यामुळं त्यांची गाडी उ त र णीला लागलेली स्प्ष्ट दि स ते य !
(त्यांचा युनिकनेस पहिल्या विस नंतरच संपुष्टात आला ... ते राजकिय नेते नाहीत तर वेगळ्या प्रकारच्या नेते आहेत हे कळून चुकलेय ! अर्थात त्यांचा उपद्रव मुल्य असणारा वेगळा दबावगट राहील .. आणि अर्थातच ते अ त्यंत गरजेचे आहे !)
दिवस आणखी वाईट येताहेत !
6 Sep 2024 - 10:15 pm | अमरेंद्र बाहुबली
लोस पेक्षा विस मध्ये अधिक पडझड होणार हे नक्की ! +१
लोकसभेला अनेकांनी मोदींकडे पाहून भाजपला मत दिलेतरी. विधानसभेला भाजपला मत द्यावे ह्यासाठी एकही ठोस कारण नाही. मोदी नी त्यांच्या फलटणीने महाराष्ट्रातला गावन गाव पिंजून काढला तरीही आता काहीही फरक पडणार नाहीये.
7 Sep 2024 - 3:51 am | रामचंद्र
खरंच तटस्थपणे विचार केला तर यातला एकही मुद्दा खोडता येण्यासारखा नाही.
7 Sep 2024 - 4:55 pm | नठ्यारा
रामचंद,
हा तटस्थपणाच घातक आहे. यावरून गिरीश खरे म्हणायचे ते आठवलं. ते म्हणायचे की हिंदू मतदारांची एक मनोवृत्ती कळंत नाही. ती म्हणजे भ्रष्ट राजकारण्यांनी ७०+ वर्षं घाण केली. ती मोदींनी पाचदहा वर्षांत साफ केली पाहिजे, नाहीतर आम्ही मतदार मोदींना हटवून घाण करणाऱ्या लोकांनाच परत सत्तेत बसवणार. हे अजब तर्कट आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तो तटस्थपणाच घातक आहे. हिंदूंनी सरळ मोदींची बाजू घ्यायला हवी.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
9 Sep 2024 - 4:52 am | राघव
मोदींची बाजू घ्यायला काहीही अडचण नाही.
पण मी फक्त महाराष्ट्र भाजप बद्दल बोलतोय. यांनी विस मधे सुद्धा मोदींच्याच नावावर मतं मागायची हे पटत नाही. आणि मत दिल्यानंतर त्याची घाण करायची. हे सहन होत नाही. आपण जे कॉ/राकॉ नको म्हणतोय त्यातलेच सगळे आयाराम यांनी घ्यायचे असतील तर भाजप उरलं कुठे? यांना स्वतःची काही व्हिजन का नाही? राजकारण करूनही काम करण्याचा मोदींचाच आदर्श हे का घेत नाहीत? खिचडी सरकार आलं की सगळ्यांना सांभाळावं लागतं तर करा ना एकला चालो रे.. कोण नाही म्हणतं? कॉ/दोन्ही राकॉ/दोन्ही शिस कुणालाही सोबत घेऊ नये. स्वतः यांच्यासारखंच गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा त्याच गलिच्छ राजकारणाच्या विरोधात भाजप का उभं राहत नाही? कशाची भिती आहे यांना?
9 Sep 2024 - 8:47 pm | रामचंद्र
आपण आजवर ज्यांना नावं ठेवली त्यांनाच केवळ बरोबरच नव्हे तर उरावर घेऊन जावं लागणं ही राजकारणात यशस्वी होण्यासाठीची अपरिहार्यता आहे, डावपेचांचाच एक भाग आहे, असं भाजपसमर्थकांचं म्हणणं आहे...
9 Sep 2024 - 9:01 pm | अमरेंद्र बाहुबली
उद्या दाऊदने भाजप जॉइन केली तर भाजप समर्थक दाऊद राष्ट्रभक्त आहे हे देखील सिद्ध करतील. नितेश राणेंनी सावरकरांचा ट्विट करून अपमान केला होता, कधी सावरकरांची माफीही मागितली नाही तरीही त्याना भाजप प्रवेश देऊन आमदार केले. कारण भाजपला सावरकरांपेक्षा सत्ता प्रिय आहे. आणी मोदी सावरकरांवर भाषणं देत फिरतात, तसेच भाजप समर्थक राहुल गांधींच्या नावाने गळे काढत असतात पण नितेश राणेंवर चुप बसतात. भाजप नी भाजप समर्थक अश्या प्रकार दुटप्पी असतात त्यामुळे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत.
14 Sep 2024 - 6:13 pm | चौकस२१२
त्याच गलिच्छ राजकारणाच्या विरोधात भाजप का उभं राहत नाही? कशाची भिती आहे यांना?
अनेक भाजप समर्थकांना हि हे गेली काही वर्षे वाटते आहे कि "महाराष्ट्रात एकट्याने त्यांनी लधावे " पण महाराष्ट्र भाजप ला हि भेटी वाटत असावी
१) एवढी वर्षे लागली महाराष्ट्रात १००+ जागा मिळायायला
२) जातीचं राजकारणामुळे महारष्ट्र भाजप ला लक्ष केलं जाते १९४८ पासून एक प्रकारचा डाग घेऊन ( असा डाग त्यानं देणें हे कितीही अन्यायकारी असले तरीही )
जगतो आहे महाराष्ट्र्र भाजप ,,, तो एकदाचा पुसून जावा असे वाटते पण जनता तसे धड करीत हि नाही
सगळळाच गुंता
सत्ता , धरलं तर लावताय सोडलं तर पळतंय .. असं काहीसे
9 Sep 2024 - 10:52 am | अमरेंद्र बाहुबली
हिंदूंनी सरळ मोदींची बाजू घ्यायला हवी. का?? मोदीनी असे काय केले हिंदूंसाठी की हिंदुनी मोदींची बाजू घ्यायला हवी? ईडी चा गैरवापर, स्वतःचा फोटो जिकडे तिकडे छापून लावून जनतेचा टॅक्सचा पैसा उधळणे, भ्रष्टाचारी लोकांनी भाजपात प्रवेश करावा म्हणून ईडी सीबीआय सोडणे नी त्यांनी भाजपात प्रवेश केला की चौकशा बंद करणे, मध्यमवर्गावर भरमसाठ टॅक्सचा बॉक वाढवणे, प्रत्येक पुतळा, मूर्ती, विमानतळ, रस्ते, रेल्वे सगळ्या ठिकाणी जमेल तिथे भ्रष्टाचार, कारवाई कुणावरही नाही, सोयीने निवडणूक आयोगाचा वापर करणे, शिवसेनेला धोका देणे, ज्यांनी पक्ष स्थापला त्य शरद पवारांकडून पक्ष काढून घेणे, ज्यांनी पक्ष स्थापला त्यांच्या मुलाकडून पक्ष काढून घेणे ह्यातले नेमके कायनहिंदू हिताचे आहे??
10 Sep 2024 - 7:05 pm | चौकस२१२
हिंदू मतदारांची एक मनोवृत्ती कळंत नाही. ती म्हणजे भ्रष्ट राजकारण्यांनी ७०+ वर्षं घाण केली. ती मोदींनी पाचदहा वर्षांत साफ केली पाहिजे, नाहीतर आम्ही मतदार मोदींना हटवून घाण करणाऱ्या लोकांनाच परत सत्तेत बसवणार. हे अजब तर्कट आहे.
10 Sep 2024 - 7:10 pm | आग्या१९९०
ही पळवाट आहे.
6 Sep 2024 - 5:12 pm | कंजूस
कोणे एके काळी विरोधी नेत्यांना मातुश्रीवर जावे लागायचे कान धरून...
आता काय परिस्थिती आली पाहा. खरेतर तिघे पक्ष शत्रुच आहेत.
6 Sep 2024 - 10:16 pm | अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्र भाजप नी गुजरातवाद्यांच्या तावडीतून वाचवण्यासाथी वाघ स्वतः गुफेतून बाहेर आलाय.
9 Sep 2024 - 1:06 pm | सुबोध खरे
वाघ स्वतः गुफेतून बाहेर आलाय.
हा हा हा हा
हि हि हि हि
9 Sep 2024 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली
लोकसभेला केलेली शिकार विसरलात? :)
10 Sep 2024 - 10:33 am | सुबोध खरे
सरकार कुणाचं आहे?
पंतप्रधान कोण आहेत ?
काही लोक असे म्हणतात कि मी दरोडेखोरांची खाशी जिरवली.
ते माझे डोके उडवायला आले होते पण मी केवळ नाकच कापू दिलं.
कशी जिरवली त्यांची?
जाऊ द्या
तुमचं आत्मकुंथन चालू द्या
9 Sep 2024 - 8:55 pm | रामचंद्र
आजचा भाजप या प्राणिसंग्रहालयाच्या परिभाषेत न अडकून पडता कुठल्याही भल्याबुऱ्या मार्गाने उद्दिष्टपूर्ती करतोय, हेच त्याच्या अलिकडच्या यशाचे गमक आहे आणि शंभर वर्षे आपलं ईप्सित साध्य करण्यासाठी विनाप्रसिद्धी झटणारी संघटना आपलं बळ कुठल्याही अपेक्षेविना मागं उभं करत आहे हे विरोधक जितकं लवकर लक्षात घेतील तेवढं बरं.
9 Sep 2024 - 9:09 pm | अमरेंद्र बाहुबली
अजितदादांच्या राष्ट्रवादीने लाडकी बहीण योजनेचा वेगळा प्रचार सुरू केलाय, त्यातून फडणवीस, मोदी, शिंदे ह्यांचे फोटो वगळण्यात आलेत. विधानसभेला फडणवीस, मोदी शिंदे ह्यांचे फोटो वापरले तर आपल्यालाही फटका बसून लोक ममते देणार नाहीत हे दादांच्या लक्षात आले असावे.
अमित शहा मुंबईत “बॉम्बेच” मुंबई करण्यात मी देखील
होतो असे बोलले. हा मराठी मतदाराना चुचकरण्याचा प्रयत्न असू शकतो. मराठी मतदार शिवसेना सोडून त्यांच्याकडे वळेल अस त्याना वाटतय. पण मराठी मतदारात महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला हलवल्याचा तसेच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रचंड राग आहे.
11 Sep 2024 - 11:37 am | अमरेंद्र बाहुबली
भाजप प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्यांच्या चिरंजीवांच्या नावावर असलेल्या “audi” गाडीने नागपुरात ३ गाड्यांना धडक
दिली. त्यावेळी गाडीत संकेत बावनकुळे देखील होते. गाडीतील इतर दोघांची अल्कोहोल टेस्ट करण्यात आली पण बावनकुलेंच्या चिरंजीवाला वगळण्यात आले, fir मध्येही गाडीचा नंबर नोंदवलेला नाहीये. अपघाताची गाडी गॅरेजमध्ये पाठवून रिपियर का करण्यात आली? तसेच गाडी पोलीस स्टेशनला पार्क असताना गाडीच्या नंबर प्लेटही काढून का ठेवण्यात आल्या असे अनेक प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ह्यानी पोलिसाना विचारलेत.
गाडी मध्ये बीफ कटलेट तसेच दारूचं बिल देखील आढळून आलंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. बीफ कटलेट ऑर्डर करणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? असा प्रश्न राऊतांनी विचारलाय.
ज्या प्रकारे प्रकरण हाताळले जातेय त्यावरून पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव दिसतोय. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली दिसतेय. भाजप नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणी सामान्य जनतेला वेगळा न्याय का?? आता जनतेनेच भाजपविरुद्ध उतरून भाजपला धडा शिकवायला हवा.
11 Sep 2024 - 2:26 pm | वामन देशमुख
मग "तो आरोप खरा आहे का?" असा प्रश्न सुद्धा विचारण्याची गरज आहे का?
;-)
11 Sep 2024 - 2:36 pm | अमरेंद्र बाहुबली
गुन्हेगार भाजप संबंधित असेल तर आरोप खोटेच असतात नाही? ;-)
11 Sep 2024 - 2:42 pm | अमरेंद्र बाहुबली
आणी आरोप खोटे आहेत अस पोलीस, गृहमंत्री, भाजप , बावनकुळे कुणीही संगितले नाहीये.:) मणिपूर वर मोदीजी जसे मूग गिळून गप्प असतात तसेच गप्प बसलेत सगळे. ;-)
11 Sep 2024 - 2:53 pm | गवि
महाराष्ट्रात लपून छपून चोरून बेकायदेशीर बीफ शिजवणारे लोक असतील देखील. पण रीतसर बिलावर बीफ कटलेट, अमुक रुपये, असे छापून देणारे हॉटेल महाराष्ट्रात मोठ्या शहरात आहे आणि तेही उच्चभ्रू लोक जातात असे हॉटेल.. हे वाचून द्वाले पाणावले.
11 Sep 2024 - 4:43 pm | अमरेंद्र बाहुबली
धर्म ही गरिबांना मूर्ख बनवण्यासाठी स्थापलेली योजना आहे. बिचारे गरीब, बेरोजगार अंधभक्त रस्त्यांवर हाणामाऱ्या करून गायी वाचवतात. नी त्यांच्याच नेत्यांची मुले हाटेलात मस्त बीफ कटलेट हाणतात.
आता काही अंधभक्त म्हणतील की बीफ म्हणजे फक्त गायच नसते. पण बीफ मध्ये गायपण असते. हे विसरतात.
27 Sep 2024 - 7:54 pm | प्रदीप
माफ करा, हे माझे भारतांतील ह्यासंबंधीच्या कायद्याबद्दल अज्ञान असेल. पण माझ्या आकलनानुसार, येथे 'बीफ'वर सरसकट बंदी नाही. बीफमध्ये गायी, त्यांची वासरे, व तसेच बैलाचे मांसही येते.
तर बंदी ह्यांमधील पहिल्या दोघांच्या मांसावर आहे, बैलाच्या मांसावर नाही. (अर्थात, बैलाचे मांस चिवट लागते, तो भाग वेगळा).
11 Sep 2024 - 5:34 pm | कॉमी
बीफ असो वा नसो. दारूचे बिल मात्र १२००० वर झाले होते असे पोलिसांनी कन्फर्म केले आहे. पण बेधुंद गाडी चालवणारा मात्र ड्रायव्हरच बरका.
11 Sep 2024 - 5:54 pm | अमरेंद्र बाहुबली
चांगलेच पैसेवाले दिसताहेत बावनकुळे. काय बरं व्यवसाय आहेत ह्यांचे?? बिल मित्राने भरले असेल समजू शकतो. पण “आवडी” गाडी तर बावनकुळेंचीच आहे. :)
बाकी बावनकुळेंच्या मुलाची अल्कोहोल चाचणीच नाही केली. तो म्हणे ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सिटवर बसला होता. गाडी ३ वेळा ठोकल्या गेली. मग जेव्हा पहिल्याच वेळी गाडी ठोकल्या गेली तेव्हाच संकेत बावनकुळे ह्यानी गाडी चालवणाऱ्याला रोखले का नाही?
पुणे पोलिसांनी काहीतरी आदर्श घ्यायला हवा नागपूर पोलिसांकडून. :)
बावनकुळेंच्या मागे काय शुक्लकाष्ट लागलंय? कळेना. २०१९ ला एकनाथ खडसे, विनोद तावडे ह्यांच्यासोबत “पंख छाटा” मोहीमे अंतर्गत बावनकुळे ह्यांचे देखील विधानसभेचे तिकीट कापण्यात आले होते. पण ह्याचा आजीबाबत राग न मानून घेत ते पक्षकार्य करत राहिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बिचारे अडकलेत.
किरीट सोमय्या ह्यांच्या नंतर मला सर्वात वाईट वाटत असेल तर बावनकुळेंबद्दल. :)
11 Sep 2024 - 6:22 pm | अमरेंद्र बाहुबली
किरीट सोमय्या ह्यानी पक्षाने दिलेली जबाबदारी धुडकावून लावलीय. आणी पुन्हा असा अपमान करू नका अशी दानवे नी बावनकुळेना तंबी दिलीय. :)
पराभवाची जबाबदारी गळ्यात पडू नये म्हणून नेते अंग काढून घेताहेत. ह्याला पराभवाची चाहूल म्हणावे का?
11 Sep 2024 - 7:01 pm | आंद्रे वडापाव
थुमी काद बोलदा थ्या मुलं माझी पकतासाठीची दीवसात्र घात्लाली मेहनत वाय जाऊं देना र्नाही
11 Sep 2024 - 7:12 pm | अमरेंद्र बाहुबली
हाहाहा. :)
11 Sep 2024 - 7:33 pm | आग्या१९९०
लाडकी बहीण ऑनलाइन प्रोफाइलसाठी गृहिणी हा पर्याय येत नाही,अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे. उरलेले पर्याय निवडले तर खोटी पात्रता घोषीत केल्याने अर्ज फेटाळले जाणार.
11 Sep 2024 - 7:55 pm | रात्रीचे चांदणे
महाराष्ट्र भाजपचे सध्या वाईट दिवस चालू आहेत. ED ची भीतीही संपली आहे. काहीच चांगल होत नाही. २०१४ च्या आघाडी सरकार सारखी परिस्तिथी होत आहे. विरोधकांनी फायदा उठवला तर येतील सत्तेत.
11 Sep 2024 - 8:00 pm | अमरेंद्र बाहुबली
ED ची भीतीही संपली आहे. ईडी चा योग्य प्रकारे गैरवापर केला तर अजूनही स्कोप आहे. :)
11 Sep 2024 - 9:38 pm | वामन देशमुख
11 Sep 2024 - 10:26 pm | आंद्रे वडापाव
मग एवढं ऑफेंड होत जाऊ नका वामंजी...
12 Sep 2024 - 12:48 am | अमरेंद्र बाहुबली
सिक्सर :)
13 Sep 2024 - 7:03 pm | नठ्यारा
You silenced me ! ;-)
- Badass Nathya