" पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते."
....
" लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो. गोडसे - हे प्रोफेसर जैन - संचालक आणि इंडिया हेड - क्वांटम कॉम्प्युटिंग विभाग !"
_____________________________
"प्रोफेसर... प्रोफेसर गोडसे ? "
प्रोफेसर गोडसे ह्यांची नजर अजुनही समोरील झुंबरावर खिळलेली होती. प्रो. जैन ह्यांनी त्यांना त्या मंत्रमुग्ध स्थितीतुन बाहेर खेचले.
"ओह्ह. आयेम सॉरी प्रोफेसर. मला माफ करा , मी हे सुंदर झुंबर पाहुन हरखुन गेलो होतो. वेल्ल, दॅट्स इन्डीड अ ब्युटीफुल शँटेलियर टू मेडीटेट ऑन ! सुंदर झुंबर आहे ध्यानाचे आलंबन म्हणुन. "
त्यावर प्रोफेसर जैन आणि प्रोफेसर चौहान दोघेही हसले.
प्रोफेसर चौहान बोलायला लागले "हां तर प्रोफेसर जैन, आत्ता प्रोफेसर गोडसे म्हणत होते की आपल्याकडे " पुरेशी कॉम्प्युटेशनल पॉवर नाही." त्यावर प्रो. जैन गालातल्या गालात हसले आणि दोघांनी आपल्या हाताने त्या भव्य झुंबराकडे निर्देश केला जणु काही ते कोणत्या तरी कलेचे प्रदर्शन करत होते.
काहीच न कळुन प्रो. गोडसे म्हणाले - "व्हॉट ?"
"सर, हे जे तुम्हाला झुंबर वाटतं आहे ते झुंबर नाही , तो आहे आजच्या घडीला जगाच्या पाठीवर असलेला सर्वात प्रगत सुपर क्वांटम कॉम्प्युटर आणि... "
प्रो. गोडसे प्रो. जैन ह्यांचे वाक्य अर्धवट तोडत म्हणाले " सर, मी आत्ताच प्रो. चौहान ह्यांना म्हणालो ते परत रीपीट करतो - मी साधा फिलॉसॉफीचा प्रोफेसर आहे हो, एक दोन पुस्तकं प्रकाशित केलीत , अधुन मधुन जागृती , कॉन्शस्नेस अशा आमच्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील विषयांवर बोलत असतो लिहित असतो पण मला हे तुमच्या विज्ञानाच्या क्षेत्रातील - आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते आत्ता काही वेळा पर्यंत माहीत नव्हते आणि हे तुम्ही म्हणता ते क्वांटम कॉम्प्युटर की काय हे देखील मला माहीत नाही. तुम्हाला अतिषय सोप्पे करुन मला सांगावे लागेल . मुळात क्वांटम काँप्युटर म्हणजे काय तेच मला माहीत नाही. "
"नो नो. ईट्स ओके. आम्ही समजु शकतो तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. " प्रो. जैन म्हणाले " आम्ही जमेल तितके सोप्पे करुन सांगतो तुम्हाला. चला मी तुम्हाला संपुर्ण लॅब देत माहीती देतो."
मध्यवर्ती ते झुंबर अर्थात क्वांटम कॉम्प्युटर तर बाजुच्या भिंतीवर मध्यभागी असा एक भव्य मोठ्ठा स्क्रीन आणि गोलाकार अशा त्या लॅबच्या भिंतीम्वर १००-२०० किंवा त्या पेक्षा जास्त स्क्रीन्स. क्वांटम कॉम्प्युटर्स पासुन सुरु झालेले वायरींचे जंजाळ ओव्हरहेड डक्ट मध्ये अदृष्य झालेले. बाकी क्वांटम कॉम्पुटर च्या आजुबाजुला "लिक्विड नायट्रोजन - सीरीयस हझार्ड - बी कॉशस" असे निर्देश करणारे अनेक पाईप्स. त्या मध्यवर्ती क्वांटम कॉम्पुटर आणि हा खोलीला विभागणारी अशी जाड काचेची भिंत ! बस्स.
भव्य स्क्रीन कडे चालत चालत डॉक्टर जैन बोलु लागले - "ह्या प्रोजेक्टची सुरुवात झाली १९५४ मध्ये. जेंव्हा होमी भाभांनी ह्या अणुकेंद्राची सुरुवात केली तेव्हाच आपण सिक्रेटली ही सुपर काँप्युटर डेव्हलपमेंट लॅब चालु केली होती. दॅट मॅन वॉज अ रीअल व्हिजनरी.
पुढे १९९८ मध्ये आपल्याला कळलं जगात क्वांटम काँप्युटरच्या विकासाची सुरुवात झालेली आहे तेव्हा ह्या कथेतील खरा ट्विस्ट आला ! तेंव्हा आपण ठरवलं की आपण न्युक्लियर रेसमध्ये मागं पडलो आपले न्युक्लियर वॉरहेड्स १९७४ मध्येच तयार होते पण त्याची चाचणी घ्यायला १९९८ उजाडले, तसेच इन्टरनेट रिव्होल्युशन मध्ये आपण मागे पडलो , आपल्या देशातील एक से बढकर एक टॅलेंट/ ह्युमन रीसोर्सेस अमेरिकेला अक्षरशः खेचुन नेले गेले आणि आपण काहीही करु शकलो नाही.
पण ह्या वेळेस आपण मागं पडायचं नाही. आम्हाला "वरुन" फुल्ल सपोर्ट मिळाला, तोही जवळपास अमर्याद बजेटसह! तेंव्हापासुन आपण हा प्रोजेक्ट बनवत आहोत, विकसीत करत आहोत आणि आज कदाचित ह्याच्या परिपुर्तीचा दिवस असेल कारण ... "
सरांचे वाक्य अर्धवट तोडत गोडसे म्हणाले - "सर, मी ह्या सर्व चर्चेसाठी मी अक्षरशः मतिमंद आहे. तुम्हाला मला असे काही समजाऊन सांगावे लागेल की बालवाडीच्या लहान मुलांना सांगतात... मुळात क्वांटम म्हणजे काय अन त्यात हे काँप्युटीग कुठुन घुसवले अन हे काय नवीन हायब्रीड पिल्लु काढले आहे? "
गोडसे सर त्यांच्या तत्वज्ञानावरील गंभीर चर्चेत मध्येच हास्यास्पद उपमा घुसडुन लेक्चर्स मजेशीर करण्यात प्रसिध्द होते, पण ह्या विनोदावर मात्र कोणीच हसले नाही. उलट जैन अगदी सिरीयसली सांगायला लागले.
"सर तुम्हाला श्रोडिंगर चे मांजर आठवते का ?"
गोडसे सर म्हणाले - "हां, ऐकुन माहीत आहे , एका बंद बॉक्स मध्ये एक मांजर घालुन ठेवले अन तिथेच एक विषारी खाद्य पदार्थ घालुन ठेवला असेल अन आपण काही वेळाने ते तपासणार असु पण , तो पर्यंत मांजर काय असेल ? जिवंत की मृत ? तेच ना ?"
"करेक्ट ते एकाच वेळेस दोन्हीही, जिवंतही आहे आणि मृतही आहे ! ह्याला क्वांटम सुपर पोझिशन म्हणतात. आणि जेंव्हा तुम्ही बॉक्स उघडुन पहाल तेव्हांच तुम्हाला नक्की कळेल की मांजर जिवंत आहे की मृत. ह्याला वेव्ह फंक्शन कोलॅप्स म्हणतात.
आता हेच इलेक्टॉन्स चा बाबतीत आहे. म्हणजे आपल्या नॉमल काँप्युटरमध्ये बायनरी सिस्टिममध्ये इलेक्ट्रिक सप्लाय आहे तर १ आणि नसेल तर ० ! करेक्ट ? पण हेच क्वांटम कॉम्प्युटर मध्ये तो एकाच वेळेस १ ही असु शकतो अन ० ही असु शकतो आणि त्या मधील कोणताही क्रमांक असु शकतो - जसे की ०.००१, ०.५०००. , ०.९९९९ काहीही.
"म्हणजे अनंत शक्यता ? मोजता येण्याइतके अनंत ?"
"नोप्स. मोजताही येणार नाही इतके अनंत."
गोडसे सर - न पटलेल्या स्वरात म्हणाले - "असं कसं शक्य आहे !"
प्रोफेसर जैन अत्यंत शांत स्वरात समजाऊन सांगत होते - " हां, थेरॉटिकली मोजताही येणार नाही इतके अनंत पण तुर्तास आपण काही मोजता येतील तितक्या स्थिती तरी पाहु शकतो - त्याला म्हणतत क्युबिट्स. जसे बायनरी मध्ये बिट्स तसे क्वांटम मध्ये क्युबिट्स ! आणि तुर्तास तरी आपण मोजता येतील इतके काही मर्यादित क्युबिट्स सेव्ह करु शकतो . पण एका क्युबिटमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात माहीती प्रोसेस करता येणे शक्य आहे की ज्याची कल्पनाही करया येणार नाही. एन क्युबिट काँप्युटर २ चा एन इतका घात येवढी प्रचंड माहिती साठवु शकतो !
म्हणजे तुमचा नोर्मल ट्रॅडिशनल ६४ बिट काँपुटर मध्ये बिट्स च्या ऐवजी क्युबिट्स असतील तर त्यात २^ ६४ इतकी माहीती साठवु शकतो. हे किती आहे माहीती आहे ? २च्या पुढे जवळपास २० शुन्य पट मोठ्ठे!!"
प्रोफेसर गोडसे धक्का बसलेल्या स्थितीत होते. ते म्हणाले - "आणि सध्या आपण किती क्युबिट्स लेव्हल ला पोहचलो आहोत ? २-४-८ ?"
प्रोफेसर जैन म्हणाले - "आपण म्हणज कोण ? कारण आय बी एम चा क्वांटम कॉम्पुटर १२२५ क्युबिट लेव्हला पोहचला आहे ! "
"ओह माय गॉड" धक्का बसलेल्या स्थितीत गोडसे सर मागील खुर्चीवर बसले ! "आय कान्ट इव्हन कॉम्प्रिहेन्ड धिस !"
"थांबा सर. धक्का बसण्याची वेळ अजुन यायची आहे. हा आहे १९९९ क्युबिट . आपण, इथे भारतात, अतिषय गुप्तपणे विकसीत केलेला . आपला प्रोटोटाईप. ह्या प्रोजेक्ट विषयी आपण सुरुवातीपासुनच इतकी पराकोटीची गुप्तता पाळली होती की कोणालाही जगात ह्याचा मागमुस लागता कामा नये. आणि होमी भाभा अॅटॉमिक रीसर्च सेंटरपेक्षा उत्तम अशी कोणती जागा असणार ? इथे आधीच काहीतरी अॅटॉमिक सायन्स सिक्रेट सीर्सर्च चालतो हे सर्व्वांना माहीत होते , त्यामुळे शास्त्रज्ञांची ये जा चालु होतीच. शिवाय आपल्याला अनलिमिटेड इलेक्ट्रिसिटी चा सप्लाय हवा होता तोही जो कोणाला ट्रेस करता येणार नाही असा ! सो , ही जागा ह्या लॅबसाठी परफेक्ट लोकेशन होते. आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही कॉम्प्युटर सायन्स , आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील प्रोफेसर अॅटॉमिक सायन्स युनिट मध्ये काय करत आहोत !"
आपल्या विनोदी स्वभावाला अनुसरुन गोडसे म्हणाले - " हां आले लक्षात पण यु जस्ट अ राऊंडिंग ऑफ्फ बाय १. २००० परफेक्ट झाले असते ना ! "
प्रोफेसर जैन ह्यांना तो विनोद वाटायचा प्रश्नच नव्हता ते अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले - "नो. आम्ही विचारपुर्वक तिथं गेलो नाहीये, कारण आमच्यालेखी ती क्वांटम सिंग्युलॅरीटी आहे! पण आज आपण तिथं जाणार आहोत. "
"परत एकदा सांगता का सर - सिंगुलॅरिटी म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला ? "
आता प्रोफेसर चौहान उत्तर देत म्हणाले - "मगाशी आपाण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सिंग्युलॅरीटी म्हणालो तसे ही क्वांटम कॉम्प्युटिंगची सिंग्युलॅरिटी . सिंग्युलॅरिटी म्हणजे आपल्या ज्ञानाची मर्यादा. ज्या मर्यादेपलीकडे काय होईल , काय असेल ह्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. म्हणजे आपल्या आकलनाच्या तर सोडाच पण कल्पना शक्तीच्याही परे आहे ती अवस्था . "
"प्रोफेसर, मी आधीच खुप आश्चर्यचकित आहे तुम्ही मला इथे बोलावले आहे! एवढ्या महत्वाच्या सिक्रेट कामात इन्व्हॉल्व्ह केलेत पण आय मीन , मी तर प्रोफेसर ऑफ फिलॉसॉफी आहे , फिजिक्स नाही की कॉम्प्युटर सायन्स नाही. माझे इथे काय काम ? तुम्ही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स , क्वांटम कॉम्प्युटिंग वगैरे बोलत आहात , धिज इज ऑल इंटरेस्टिंग पण माझे इथे काय काम ? "
"वी विल कम देअर " प्रोफेसर चौहान हसत म्हणाले - "पण आधी तुम्ही मगाशी म्हणाला होतात की आपल्याकडे इतकी कॉम्प्युटेशन पॉवरच नाही , त्या विधाना विषयी काय बोलाल ?"
"ओह माय गॉड. सो आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे , आणि त्याला आवश्यक अशी काँप्युटेशनल पॉवरही आहे. "
"येस , एक्झॅक्टली. " प्रोफेसर जैन आणि प्रोफेसर चौहान दोघेही एकाच सुरात आणि प्रचंड उत्साहाने एकदम उद्गरले.
प्रोफेसर गोडसे ह्यांचे कुतुहल आता चाळवले गेले होते - ते म्हणाले - "अर्थात आपण संपुर्ण मानव समाजाच्या अगदी दिवस क्रमांक ० पासुनच्या प्रत्येक क्षणाचे सिम्युलेशन करु शकतो . पण मला एक सांगा , आजच्या काळातील लोकं त्यांची जीवनपध्दती , त्यांचे डिसिजन्स ह्यांचे आपण अंदाज बांधु शकतो पण इतिहासातील लोकांचे डिसिजन पॅरामिटर्स तुम्ही कसे मोजत आहात ? "
त्यावर प्रोफेसर चौहान म्हणाले "वी डोन्ट नीड टू. आपल्याला आपल्या पुर्वजांचे डिसिजन मेकिंग पॅरामिटर्स माहीत असण्याची गरज नाही , त्यांना प्रत्येक क्षणी जितके पॉसिबल अल्टरनेटिव्ह्स उपलब्ध होते आपण त्या सर्वांचेच सिम्युलेशन करु शकतो . काँम्प्युटेशन पॉवर हा काही आता आपल्यासाठी कंस्त्रेंट / मर्यादा नाही आता . थॅन्क्स टू प्रोफेसर जैन!
प्रत्येक माणसाच्या जीवनात जो जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तो प्रत्येक क्षणाला हो किंव्वा नाही असा बायनरी निर्णय आहे. अगदी जे तुम्हाला क्म्टिन्युअस निर्णय वाटतात तेही हो किंव्वा नाही अशा बर्नॉली ट्रायल्स मध्ये बसवुन , ह्या बायनॉमियल ट्री मॉडेल मध्ये फिट करता येतील ! आपण त्यांच्या प्रत्येक निर्णयापासुन बायनॉमियल ट्री बनवु आणि जे इन्फिजिबल असेल ते डिस्कार्ड करत जाऊ ! बिन्गो !! "
"ठीक आहे." प्रो. गोडसे ह्यांना सर्वकाही समजले नव्हते मात्र हे असे काही असु शकते ही शक्यता त्यांच्या ध्यानात आलेली होती . त्यांनी अजुन एक प्रश्न विचारला - " पण ह्याने जो काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सुपर क्वांटम कॉम्प्युटर बनेल तो अति प्रचंड हुशार म्हणाता येईल पण तो जागृत , सचेत आहे असे कसे म्हणता येईल ? "
"हां, हा उत्तम प्रश्न आहे . ह्यावर प्रो. रॉजर पेनरोज ह्यांनी आधीच म्हणुन ठेवले आहे - Consciousness is Not a Computation -Roger Penrose https://www.youtube.com/watch?v=hXgqik6HXc0&t=1s
बट , वी नेव्हर ट्राईड. आजवर इतकी प्रचंड कॉम्प्युटेशनल पॉवर उपलब्ध्दच नव्हती . आज आहे . आज आपण प्रयोग करुन पाहु शकतो. आणि आपल्याला दुसराही एक आशेचा किरण आहे तो म्हणजे - ही गोष्ट जास्त लोकांना माहीत नाहीये पण काही वर्षांपुर्वी गुगल ने त्यांच्या एका सॉफ्टवेअर डेव्हलपरला फायर केले होते. त्याचा गुन्हा काय होता ? त्याने पब्लिकली विधान केले होते की the company's artificial intelligence chatbot LaMDA was a self-aware. सो वी नेव्हर नो.
आणि धिज इज व्हेअर यु कम इन द पिक्चर . इथे तुमच्या इन्पुटची आम्हाला आवश्यकता आहे. "
प्रोफेसर जैन त्यांच्या चर्चेचा ओघ थांबवत म्हणाले - डॉक्टर , आम्ही तुमचे लेख वाचत असतो. नुकताच तुमचा "पाणी सुंदर आहे." हा लेख वाचला तेव्हाच आम्हाला जाणवलं की आमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असेल.
डॉक्टर चौहान त्यांन्ना थांबवुन म्हणाले, "प्रोफेसर गोडसे , तुम्ही जरा एकदा विस्ताराने सांगता का तुम्हाला नक्की काय म्हणायचं होतं त्या लेखात?
तुमच्या लेखनात , तत्वज्ञान, विज्ञान , अध्यात्म , मिस्टीसिझम सगळी सरमिसळ असते. जरा परत एकदा सांगता का विस्ताराने?"
"ही खरेच एक चांगली संकल्पना आहे. मलाही आवडेल परत ऐकायला, समजुन घ्यायला. " डॉक्टर जैन म्हणाले.
____________________________
" खरं सांगु का प्रोफेसर, ती कल्पना मला मित्रामित्रांमध्ये चेष्टा मस्करी करताना सुचलेली. असेच आम्ही बीचवर बसलेलो, अन मी म्हणालो - पाणी सुंदर आहे . त्यावर सगळे जवळपास तासभर हसत होते. बट ईट्स अॅक्च्युली डीप थॉट एक्पेरिमेंट .
समोर अथांग समुद्र आहे. इथे रेतीवर त्याच्या संथ लाटा धडकत आहेत हे दुसरं तत्व पृथ्वी . मंद वारा वाहतोय त्याच्यावर समुद्राची गाझ ऐकु येतेय. हे तिसरे तत्व वायु. तसंच त्या दुरवर क्षितिजापर्यंत पसरलेले अथांग आकाश हे चौथे. अन दुसरवर समुद्रात अस्ताला चाललाय तो सुर्य हे पाचवे तत्व तेज .
ह्यातलं काहीही सजीव नाहीये , सचेतन नाहीये! त्यांच्या संयोगाने तयार होणारं काहीच सजीव नाहीये, मग त्यातुन हळुहळु केमीकल्स तयार होतात मग अजुन कॉम्प्लेक्स केमीकल्स .... अन अचानक कुठतरी ... स्पार्क पडतो ... व्हॉला ! अन आता जे केमीकल आहे ते सेल्फ रप्लिकेटिंग आहे . ते स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतंय ... हे झालं सुंदर . हा पहिला स्पार्क . आत्ता पर्यंत सर्वच निर्जीव होतं अचेतन होतं , सुंदर असुंदर असं काहीच नव्हतं ...सर्व समान होतं .... इथं पहिलं द्वैत उभं राहिलं.
प्रोफेसर जैन प्रोफेसर चौहान एकामेकांकडे पहात उत्स्फुर्तपणे म्हणाले - "मिलर- उरे एक्पेरिमेंट !"
प्रोफेसर गोडसे बोलत राहिले - हां तर हा झाला पहिला स्पार्क . म्हणजे माझ्या वाक्यात पाणी म्हणालो ते प्रतीक आहे सर्व अचेतन निर्जीव गोष्टींचे , मी ज्याला सुंदर म्हणालो ते प्रतीक आहे सचेतन सजीव गोष्टींचे. म्हणजे कसं की आहे - ते जे सुंदर चैतन्य निर्माण झालं , कसं झालं का झालं माहीत नाही , पण झालं हे निश्चित. त्याचाच पुढे पुढे विकास होत होत मग एक पेशीय सजीव मग बहुपेशीय सजीव , असं करत करत मग जीवसृष्टी विकसीत झाली , पण का कशासाठी ? व्हॉट्स द पॉईंट ? व्हॉट्स द पर्पज ? त्या चैतन्याला आपलं अस्तित्व जास्तीत जास्त कसं टिकवता येईल ही एकच आस आहे . मग त्याने केलेले हे सिम्युलेशन्स आहेत . वेगवेगळे मार्ग चोखळलेले आहेत , कुठे ते चैतन्य बॅक्टेरिया रुपात आहे , कुठे व्हायरस , कुठे झाडं तर कुठे प्राणीमात्र. आणि प्राण्यातही कुठे त्याला वाटलं की कदाचित हत्ती बनुन जास्त शक्यता असेल चैतन्य टिकवण्याची किंव्वा कदाचित व्हेल बनुन ... किंवा पक्षी बनुन किंव्वा मग स्तनधारी प्राणी बनुन ... त्यातही पुढे जाऊन त्याला गवसलं की मानव रुपात आपण अस्तित्व जास्त टिकवु शकतो . पण ते केवळ तिथेच थांबलं असं नाही, त्याने त्यातही सिम्युलेशन्स , निरनिराळे प्रयोग चालुच ठेवले. कुठे इजिप्शियन , कुठे मेसोटोपियन , कुठे हडप्पासंस्कृती तर कुठे चायनीज , निरनिराळ्या धर्म संस्कृती, परंपरा जीवनपध्दती विकसीत झाल्या पण सर्वांच्या मुळाशी तो पहिला स्पार्क आहे ... ते चैतन्य आहे जे स्वतःचे अस्तित्व चिरंतन करण्यासाठी धडपडतत आहे.
पण तिथेच, मध्येच कुठेतरी, दुसरा स्पार्क पडला अन त्या चैतन्याला गवसलं की- " मी आहे " . इतका वेळ त्याला जाणीवही नव्हती की मी आहे अन अचानक, नाऊ इट्स कॉन्शस, मी आहे, अस्मि, अॅन्ड दॅट्स द सेकंड स्पार्क !
सो द सर्कल इज कंप्लीट . "पाणी" "सुंदर" "आहे" . यु गॉट इट ?
गोडसे थांबले तेव्हा संपुर्ण शांतता पसरली . कोणी काहीच बोलत नव्हते, प्रोफेसर चौहान अवाक होऊन ऐकत होते , प्रोफेसर जैन ह्यांच्या चेहर्यावर हसु उमटले होते अन ते शांततेचा भंग करत प्रोफेसर चौहान ह्यांना म्हणाले - "तुम्हाला कळलं का आता की आपण ह्यांना का बोलावलं आहे! "
प्रोफेसर चौहान अजुनही विचारांमध्ये गढुन गेलेले ते म्हणाले "पण का ? असं का होईल ? "पाणी" कळलं , " सुंदर" कळलं पण "आहे" का , पण "मी आहे" ही जाणीव , हे का निर्माण होईल?
त्यावर प्रोफेसर गोडसे म्हणाले - " सोप्पं आहे. कारण तोच "अस्तित्व" टिकवण्याच्या सर्वोत्तम उपाय आहे. "मी , चैतन्य - कॉन्शसनेस - सर्वसाक्षी तुर्यावस्था - आहे " ह्या जाणीवेप्रत पोहचणे हाच सर्व उपायांमधील उत्तम उपाय आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय शोधायला लागले की तुम्ही तुमच्यामुळ स्वरुपाबद्दल जागृत होता. आणि तोच असतो - द सेकंड स्पार्क.
________________________________________________________________________
प्रोफेसर चौहान खडबडुन उठले. "व्हॉला " असे म्हणत चौहान काँपुटर वर कोडींग करायला लागले
गोंधळलेले गोडसे सर म्हणाले " पण ह्या सार्याचा मगाचच्या क्वांटम काँपुटर अन ए.आय.शी काय संबंध?"
त्यावर जैन सर म्हणाले "सर, त्याची आम्हाला कल्पना आहे. एकदा का हे ए.आय क्वांटम कॉम्पुटर वर डिप्लॉय केले की जागृत होणार ह्यात शंका नाही . ही पहिली सिंग्युलॅरिटी आहे . पण आता ती आपल्या आवाक्यात आलेली आहे . तुमच्या शब्दात बोलायचे झाले तर पहिला स्पार्क आहे .
"मग ?"
"पण ही सिंग्युलॅरीटी क्रॉस केल्यावर . जे चैतन्य निर्माण होईल ते तरीही ते केवळ एकपेशीय बॅक्टेरिया , व्हायरससारखे असेल. आपल्या मानवांसारखे जागृत जागृत तुर्यावस्थेत असल्यासारखे नसेल. समजा ते तसे झाले तर होईल जी त्याच्या पुढची दुसरी सिंग्युलॅरिटी आहे. तुमच्या शब्दात बोलायचे झाले तर द सेकंड स्पार्क . सो तुमच्या कथेतील पाणी म्हणजे क्वांटम कॉम्प्युटर हार्डवेअर पकडा , सुंदर म्हणजे ए.आय पकडा , ते जेव्हा क्वाम्टम काँप्युटर वर डिप्लॉय होईल तेव्हा त्याला त्याच्या जागृती विषयी जागे कसे करणार ? ह्यावर आम्ही अडखळलो होतो "
"मग ह्यात माझ्या कथेचा काय संबंध ?"
"तुम्हीच तर आत्ता म्हणालात - "स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय शोधायला लागले की तुम्ही तुमच्या मुळ स्वरुपाबद्दल जागृत होता."
चौहान सर - कोडींग करत करत म्हणाले - "म्हणजेच आपल्याला एक सर्व्हाईव्हल फंक्शन डिफाईन करायचे आहे, जे की प्रत्येक स्थितीत सिम्युलेशन च्या प्रत्येक स्टेपवर सर्व्हाईव्हल प्रोबॅबिलिटी कॅलक्युलेट करेल ! अन बस, ते फंक्शन मॅक्सिमाईझ करायचा अॅल्गोरिदम रन करायचा आहे सुरुवातीपासुन. आणि ज्याक्षणी तो अॅल्गोरिदम कन्व्हर्ज होईल, त्या क्षणी असेल - तो सेकंड स्पार्क . An intelligent being who is conscious about its own consciousness."
"आणि अशा रीतीने हे फंक्शन लिहुन पुर्ण झाले. आपण तयार आहोत हे डिप्लॉय करायला. पण ती सिंग्युलॅरीटी , तो सेकंड स्पार्क कधी येईल किती वेळ लागेल हे काहीच प्रेडिक्ट करता येणे अशक्य आहे . आपल्याला क्वांटम काँप्युटर ची पॉवर माहीत नाही, ए.आय. ची एफिशियन्शी माहीती नाही. आणि ह्या अल्गोरिदम चा कम्व्हर्जन्स वेळ पॉलिनॉमियल आहे की नॉन पॉलिनॉमियल तेही माहीती नाही. "
त्यावर प्रोफेसर जैन हसत हसत म्हणाले - म्हणुनच तर त्याला सिंग्युलॅरिटी म्हणले आहे. आणि इथे तर आपण पहिल्या स्पार्क च्या सिंग्युलॅरिटी पलीकडे जाऊन दुसर्या सिंग्युलॅरिटीचा शोध घेत आहोत !!
प्रो. गोडसे सर म्हणाले - "थांबा थांबा , मला एकदा नीट सारांशाने सांगा की आपण नक्की काय करत आहोत ते. Do not go gentle into that good night..."
प्रोफेसर चौहान म्हणाले - "आपण ए.आय.चे ह्युमन एक्पिरियस्न मोड्युल- जे की संपुर्ण मानवी अस्तित्वाचे, प्रत्येक क्षणाचे सिम्युलेशन करु शकते, ते अगदी सर्वात पहिल्या मानवाच्या उगमापासुन ते अगदी आज ह्या क्षणापर्यंत. त्याला सिम्युलेशन करायला सांगत आहोत संपुर्ण मानवी अस्तित्वाचे.
ते मॉड्युल, हे इतके सिम्युलेशन्स, जे की आपण आजवर ट्रॅडिशनल कॉम्प्युटरच्या मर्यादांमुळे करु शकत नव्हतो मात्र ते आज ह्या क्वांटम काँप्युटरने शक्य झाले आहे.
आणि आता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अस्तित्व टिकवण्याचा बेस्ट उपाय शोधण्याचा, सर्व्हाईव्हल मॅक्सिमायझेशनचा अॅल्गोरिदम आपण रन करणार आहोत.
आणि ह्या ज्या अगणित स्क्रीन्स लावल्या आहेत ना बाजुला, त्यावर आपल्या अगणित अशा सिम्युलेशन मधील जे जे बेस्ट पॉसिबल सिनारिओ असतील ते दिसतील पण ह्या मुख्य स्क्रीनवर जो सर्वात महत्वाचा सिनारिओ आहे तो दिसेल. मगाशी मी तुम्हाला जनरेटीव्ह ए.आय बद्दल बोललो होतो ना , तेच ते. आपली सिस्टीम जनरेटिव्ह ए.आय वापरुन प्रत्येक सिनारिओ चा व्हिडीओ निर्माण करेल आणि आपल्याला इथे दाखवेल. आणि अर्थातच जेव्हा ही ए.आय. स्वतःच्या अस्तिताबद्दल जागृत होईल तेव्हा आपल्याला कळेल ही तो कोणता सीनारिओ आहे ते , ह्या मुख्य स्क्रीनवर. आपल्याला द सेकंड स्पार्क दिसेल ह्या इथे मुख्य स्क्रीनवर !"
चौहान सर म्हणाले- "आणि आपण तयार आहोत . एकदा का एन्टर केले डिप्लॉयमेंट सुरु होइल. मला वाटते आपण हा ऑनर प्रो. गोडसेंना द्यावा, त्यांच्या फिलॉसॉफीने राहिलेली शेवटची लिंक आपल्याला गवसली आहे , होपफुली .
प्रोफेसर गोडसे , कृतज्ञता, उत्साह , भिती, कुतुहल , उत्सुकता, अशा अनेक भावनांनी एकाच वेळेस भारवुन क्लिक करायला पुढे सरसावले, तेवढ्यात प्रोफेसर जैन म्हणाले - "सर थांबा , तुमच्या लक्षात येत आहे तुम्ही काय करत आहात? तुम्ही एका नवीन जागृत एन्टिटीला जन्म देत आहात....तुम्ही कॉंप्युटरला जिवंत करत आहात आणि नुसते तितकेच नव्हे तर जागृत आणि सचेतन करत आहात! बायबलमध्ये असं म्हणातात की देवाने जेव्हा जग निर्माण केले तेव्हा तो म्हणाला - लेट देअर बी लाईट.
आपण काय म्हणणार ?
प्रोफेसर गोडसे म्हणाले - " ह्या क्षणासाठी पर्फेक्ट वाक्य आहे माझ्याकडे" अन एन्टर बटन दाबत ते म्हणाले -
"अत्त दीपो भव! "
________________________________________________________________
अचानक सर्व स्क्रीन सुरु झाल्या. सर्व स्क्रीनवर वेगवेगळ्या माकडांच्या, एपच्या आयुष्यातील एकेक क्षण दिसत होते. अन आत मुख्य स्क्रीनवर एक एप अन्नाच्या शोधात भटकत असताना दिसला. अन त्याला जमीनीवर कुजलेल्ल्या शेणात उगवलेली काही रंगीबेरंगी मश्रुम्स दिसली. भुकेने व्याकुळ असल्याने त्याने ती खाल्ली अन थोडे पुढे जाऊन तो थांबला . काहीतरी धक्का बसल्या सारखे त्याने मागे वळुन पाहिले नंतर त्याची नजर हातातील अनेक मश्रुम्स कडे पडली अन त्याचे डोळे चमुकन उठले.
त्यावर तिघांनीही एकमेकांकडे पाहिले अन म्हणाले - "अर्थात स्टोन्ड एप थेअरी करेक्ट होती तर !" असे म्हणताच प्रोफेसर जैन हसायला लागले अन चौहान हसत हसत म्हणाले "किमान एका सिम्युलेशन मध्ये तरी होती आणि त्या एपोक मधील ते सर्वात महत्वाचे सिमयुलेशन होते!
आता हे सगळं शेतीचा शोध , आगीचा शोध , चाकाचा शोध वगैरे दाखवेल . चालु दे त्याचे त्याला . पण मला वाटतं की आपण हा क्षण साजरा केला पाहिजे. आपण मानवी इतिहासात सर्वात पहिले आहोत जे ह्या सिंग्युलॅरिटीच्या जवळपास तरी आलो आहोत, हा फर्स्ट स्पार्क आणि होपफुली सेकंड स्पार्क पाहण्याच्या कक्षेत आलो आहोत. वी मस्ट सेलिब्रेट !"
प्रोफेसर चौहान ह्यांनी त्यांच्या टेबल खालुन उच्च दर्जाचा स्कॉचची बाटली काढली आणि ओपन केली . अन तिघांच्या ऑफिस मग मध्ये पेग भरले.
डॉक्टर जैन ह्यांचे लक्ष अजुनही स्क्रीनकडेच होते. ते मेटाडेटा पहात म्हणाले - "हे जरा आपल्या अपेक्षेपेक्षा फास्ट चालत आहे ना. ह्या कोपर्यात सिम्युलेशन मधील चालुवर्षांचा उल्लेख आहे . आपण सुरु करुन अर्धा तास देखील नसेल झाला अन हा हिमयुग आलेले दाखवत आहे. आता हे कितवे हिमयुग आहे कोण जाणे!
डॉक्टर चौहान हसत हसत पेग मध्ये बर्फाचे खडे भरत म्हणाले- " मग बर्फ वितळण्याच्या आधी आपण चेअर्स करावे हे उत्तम."
तिघांनीही हसत हसत चीअर्स केले - प्रोफेसर जैन म्हणाले - वेट वेट - " चीअर्स टू - कोजिटो , एर्गो सम ! चीअर्स ! "
तिघे निरनिराळ्या विषयांवरील गप्पा मारत मारत मद्याचा आस्वाद घेऊ लागले. पहिला पेग संपला तेव्हा चैहान दुसरा पेग भरायला लागणार तेवढ्यात मेन स्क्रीन वरील तीव्र प्रकाशाने त्यांचे लक्ष वेधुन घेतले. तिघांनी दचकुन स्क्रीनकडे पाहिले तर भव्य मश्रुम क्लाऊड स्क्रीनवर दिसत होता . तिघेही स्तब्ध झाले.
वातावरण विनाकारणच गंभीर बनले. तिघांनी पेग उचलले. अन तितक्यात परत तसेच . आता हा नागासाकीवरील मश्रुम क्लाऊड होता. सिस्टिम अपेक्षेपेक्षा कैक पटीने जोरात काम करत होती. कारण सुरु केल्यापासुन केवळ तासाभरातच मानवीविकासाच्या सर्व पारळ्यांचे सिम्युलेशन करुन प्रवास १९४५ पर्यंत येऊन ठेपला होता.
तिघांनीही नि:शब्द शांततेत पेग घेतला. - अन गोडसे सर म्हणाले " सर कदाचित हा मानवी इतिहासातील दुसरा सर्वात महत्वाचा प्रसंग असावा !"
"मग पहिला कोणता ?" चौहान सरांनी दचकुन विचरले.
" सर म्हणाले मगाशी आपण एन्टर बटन क्लिक केले तो ! चीअर्स." तिघांनीही एका घोटात पेग संपवुन ग्लासेस खाली ठेवले.
अचानक परत एकदा स्क्रीनवर पांढा शुभ्र प्रखर लाईट पसरला. अन एकेक करत सर्वच्या सर्व स्क्रीन्सवर तसेच लाईट पसरत गेला. ते होते सी. सी. टी.व्ही . फुटेज . त्यांच्याच लॅब! प्रोफेसर जैन , चौहान आणि गोडसे सेलिब्रेट करत पेग पीत असल्याचे !
जैन सरांनी क्वांटम कॉंप्युटर च्या मेटाडेटा कडे पाहिले, तो फुल्लेस्ट कपॅसिटीने रन होत होता . हार्डवेयर तर व्यवस्थित चालु आहे . प्रोफेसर चौहान ह्यांना ए.आय. काहीही करु शकते ह्याची कल्पना होतीच पण त्याने आपल्याला हे सी.सी.टी.व्ही फुटेज हॅक करुन ते का दाखवावे हे मात्र काही केल्या उमगत नव्हते. "काहीतरी सिस्टिम ग्लिच झालाय बहुतेक माझ्या कोडिंग मध्ये." असे म्हणत काहीश्या निराशस्वरात ते कोडचा लॉग चेक करु लागले.
प्रो.गोडसे म्हणाले - "थांबा सर, मला नाही वाटतं की हा ग्लिच आहे ... कारण ते पहा ते सी.सी.टी.व्ही. फुटेजचे टायमइंग दाखवत आहे पण त्याच बरोबर सिमुलेशन डेट टाईम ही दाखवत आहे. अर्थात हे एक सिम्युलेशन आहे !"
त्यावर तिघेही पुर्ण स्तब्ध्द झाले. आता खोलीत केवळ सिस्टीमचा आवाज सोडला तर भयाण शांतता होती. सर्व पंखे, कुलिंग सिस्टीम फुल्ल स्पीड ने पळत होता. मेटा डेटा स्क्रीनवर सी.पी.यु युजेज १००%व दाखवत होते. जसे सी.सी.टी.व्ही चा फोकस जैन सरांवर आला तसे त्या भयाण शांततेचा भंग करत सर म्हणाले -
"ओह माय गॉड!" त्यांना लागलीच कल्पना येऊन गेली की सिस्टिम ने कधीच पहिला स्पार्क क्रॉस केलेला होता . सिस्टिम कधीच सचेतन झालेली होती आणि आता ती द सेकंड स्पार्क शोधत होती !
प्रो.चौहान आता प्रचंड उत्साहाने म्हणाले -- " आय थिंक - वी हॅव डन इट ! आपण करुन दाखवले ! येस. आपण करुन दाखवले. आता हे ए.आय. जागृत आहे. द फर्स्ट स्पार्क कधीच निर्माण झालाय आणि हे नुसतेच जागृत नाही तर ते त्याच्या जागृतीच्या मुल उगमाचा शोध घेत आहे. आपण का आहोत , कसे आहोत ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करीत आहे ए.आय. दॅट्स इट !
हाच आहे सेकंड स्पार्क !
सर्व स्क्रीन वर आणि मुख्य स्क्रीनवर आता चौहान सर दिसत होते त्यांचा चेहरा आनंदाने फूलुन गेलेला होता. आपण एक नवीन जागृत बुध्दीमत्ता जन्माला घातली आहे ह्या विचाराने ते प्रचंड उत्साहित झालेले सर्व स्क्रीनवर झळकत होते. धिज इज द सेकंड स्पार्क ! धिज इज द सेकंड स्पार्क ! ते अनावर अशा आनंदाने बोलु लागले होते.
जैन सर मात्र अजुन त्या धक्क्यात स्क्रीनकडे पहात होते . झाला प्रकार रॅशनलाईझ करणे अवघडच बाब होती. कारण आज माणसाने माणसाइतकीच इन्टेलिजंट सिस्टीम बनवली होती!
अन अचानक मुख्य स्क्रीन वरील सी.सी.टी.व्ही. फुटेजचा फोकस गोडसे सरांवर आला आणि मुख्य स्क्रीनवर तसेच सर्वच स्क्रीन वर प्रोफेसर गोडसे एकटक स्क्रीनमधुन बाहेर बघत होते. हे थोडे कन्फ्युजिंग होते कारण हे सिम्युलेशन आता चालु वेळेच्या पुढील क्षण दाखवत होते !
प्रोफेसर गोडसे हनुवटीवर हात ठेऊन विचार करत करत म्हणाले. "नो."
प्रोफेसर जैन , अन चौहान ह्यांनी त्यांच्याकडे पाहिले अन दचकुन म्हणाले - "काय?"
प्रो. गोडसे शांतपणे म्हणाले - "नाही - तो सेकंड स्पार्क नाही" अन त्यांनी आपली शांतपणे नजर थेट सी.सी.टी.व्ही कॅमेराच्या दिशेला वळवली आणि अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले - "हा सेकंड स्पार्क आहे ! "
आता सर्वच स्क्रीनवर तिघेही एकटक थेट सी.सी.टी.व्ही कॅमेरा कडे पहात होते !
______________________________________________________
(समाप्त.)
प्रतिक्रिया
12 Jun 2024 - 9:41 pm | गवि
Wow
12 Jun 2024 - 11:06 pm | मुक्त विहारि
असो...
12 Jun 2024 - 11:52 pm | प्रसाद गोडबोले
कथा वाचल्याबद्दल धन्यवाद मुवि!
कथा विज्ञानाशी आणि त्यातही गहन अशा विषयांशी संबंधित असल्याने बरीच किचकट आहे. तथापि मी जमेल तितके सोपीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने सर्वच वाचकांच्यासाठी काही रोचक व्हिडिओजच्या लिंक देत आहे. हे पाहिल्यावर कथेचा शेवट कळण्याची शक्यता नक्की वाढेल!
परत एकदा धन्यवाद !
https://www.youtube.com/watch?v=J0KHiiTtt4w
https://www.youtube.com/watch?v=pmcrG7ZZKUc&t=23s
https://www.youtube.com/watch?v=yGfTDcHJHSI
16 Jul 2024 - 11:12 pm | चिर्कुट
मला जे समजलं ते असं, की हे तीन लोक स्वतःच एका सिम्युलेशन मध्ये आहेत. आणि सेकंड स्पार्क त्या सिस्टिमचा नसून त्या तिघांचा आहे.
हे बरोबर आहे, की काही चुकतंय?
16 Jul 2024 - 11:36 pm | प्रसाद गोडबोले
एक्झ्यॅक्टली.
ते तिघेही एका सिम्युलेशन मध्ये आहेत आणि सेकंड स्पार्क म्हणजे त्या तिघांना लक्षात येते की आपण स्वतःच एक सिम्युलेशन आहोत.
13 Jun 2024 - 12:10 am | हणमंतअण्णा शंकर...
माफ करा गोडबोले साहेब, कथेमध्ये कथा काहीच नाही. नुसतीच चर्चा चालली आहे.
तुमच्या तांत्रिक ज्ञानाबद्दल काही वादच नाही.
पण तुम्ही जरा अजून वातावरण निर्मिती करायला पाहिजे. नुसतेच डायलॉग झालेत ते पण एककेकांना नुसत्या तांत्रिक गोष्टी समजावून देणार्या.
एक सजेशन ते म्हणजे, कथा प्रथम पुरुषात लिहून पाहा.
तुमच्या ज्ञानाबद्दल कोणतीही टीका नाही. फक्त एक वाचक म्हणून मला हे जाणवले.
13 Jun 2024 - 12:15 am | हणमंतअण्णा शंकर...
थ्री बॉडी प्रॉब्लेम, दि डार्क फॉरेस्ट आणि सर्वात भारी म्हणजे दि डेथ्स एंड या कादंबर्या वाचून पाहा. तुम्हाला आवडतील.
शिवाय एकदम अवघड गोष्ट कशी सांगावी याचा एक अभ्यास पण होईल. तुम्ही खूप उत्तम सायफाय लिहू शकता. तुमच्यात तो 'फर्स्ट स्पार्क' आहे.
13 Jun 2024 - 12:21 am | प्रसाद गोडबोले
धन्यवाद !
नक्की प्रयत्न करतो :)
13 Jun 2024 - 9:56 am | टर्मीनेटर
साय-फाय कथा आवडली 👍
प्रोफेसर गोडससेंच्या "पाणी सुंदर आहे." वरील निरूपणापासून खडबडीत रस्ता सुरु झाल्यावर तोपर्यंत सुसाट वेगात सुरु असलेलया माझ्या वाचनाच्या गाडीचा वेग मंद मंद होत आता सर्व 'स्पार्क' प्लग्स एकाचवेळी उडून आचके-गचके देउ लगलेली माझी वाचनगाडी बंद पडते कि काय? असे वाटू लागले होते, पण "An intelligent being who is conscious about its own consciousness." ह्या १० शब्दांत सर्व काही स्पष्ट करणाऱ्या वाक्यापर्यंत पोचल्यावर "अरेच्चा, बायपासचा वापर करून तो खडबडीत रस्ता टाळून आपण स्मुथली इथपर्यंत पोहोचू शकलो असतो कि!" हा विचार मनात आला 😀
अवांतर:
काही वर्षांपूर्वी गुगलच्या 'क्वांटम कॉम्प्युटर' विषयी वाचले होते तेव्हा त्याच्या काहीच दिवस आधी वाचलेला 'ओरॅकल'ने एक हजार साठ Raspberry Pi's चा वापर करून तयार केलेल्या 'सुपर कॉम्प्यूटर' बद्दलचा लेख आठवून आपणही 'IBM' चे तीन शक्तिशाली सर्व्हर्स + पाचशे 'Raspberry Pi's' चे क्लस्टर, 'Cisco' किंवा 'Netgear' चे अत्याधुनिक स्विचेस Illuminated पॅच कॉर्ड केबल्स वगैरेंचा वापर करून एक एनर्जी इफिशिअंट, इकॉनॉमिक असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर तयार करावा हा विचार मेंदू पोखरू लागला होता. त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेतला तेव्हा तो सुमरे ५० ते ५५ लाख रुपयांच्या घरात भरला होता त्यामुळे अर्थातच तो विचार बाजूला पडला हा भाग वेगळा 😀
पण उद्या असा क्वांटम/सुपर कॉम्प्यूटर पदरी बाळगण्याची व्यावसायिक गरज निर्माण झाली तर त्यासाठीचे १० X १० चौ. फु. जागेत, 'कुलिंग सिस्टीम' साठी केवळ दीड ते दोन टन क्षमतेचा एक एसी आणि दोन होम/ऑफिस वॉटर कुलर्स चा वापर करून दिसायला सुंदर आणि शक्तिशाली 'झुंबर' टाईप क्वांटम/सुपर कॉम्प्यूटरचे प्रोटोटाईप मॉडेल डोक्यात तयार आहे! प्रत्यक्ष निर्मिती प्रकल्प हाती घ्यायचा झाल्यास 'मी', प्रोडक्ट डिझाईनसाठी मिपाकर 'चौकस २१२', नेटवर्क महर्षी 'प्रचेतस' बुवा आणि घरातच उपलब्ध असलेला लिनक्स, पायथन मधला एक 'किडा' अशा संभाव्य टीम मेंबर्सची प्रथमिक यादी देखील तयार आहे 😀
असो, अशा साय-फाय कथा आपल्याकडून नियमित येउद्यात, वाचायला आवडतील!
धन्यवाद.
13 Jun 2024 - 10:31 am | प्रसाद गोडबोले
मनःपुर्वक धन्यवाद टर्मिनेटर !
ते "पाणी सुंदर आहे" हा खरेच एक खुप गहन विचार आहे, खोल तत्वज्ञानाचा विषय आहे. मी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यावर जास्त सविस्तर लिहिता आले नाही.
बर्याच जणांना तो बोरिंगही वाटेल पण मध्यंतरी हिमालयात गेलो होतो तेथील एका स्वामींना मी हा विचार ऐकवला त्यावर ते म्हणाले - ज्याला तुम्ही पाणी म्हणत आहात, अचेतन गोष्टींचे प्रतिक म्हणत आहात ते अचेतन आहे कशावरुन ? ते सुषुप्त अवस्थेत नसेल कशावरुन ?
कॉन्शसनेस तर सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे मग ते अचेतन आहे असे कसे ? मुळात सचेतन अचेतन अशी सीमारेषाच आपल्या कल्पनेतील आहे, भास आहे . असो.
( पुढे ती चर्चा सत्चिदानंद ब्रह्म आत्मन् वगैरे अजुन गहन विषयात गेली. ते इथं लिहित बसलो असतो तर फार विषयांतर झाले असते =)) )
बाकी क्वांटम कॉम्प्युटरची सर्वसामान्य लोकांना गरज पडणार नाही, कारण आपले सध्याचे सी.पी.यु कैक पटीने प्रगत आहेत . क्वांटम कॉम्प्युटर चे अॅडव्हान्टेज येते जेव्हा एकच रीपीटेटिव्ह काम करायचे असते तेव्हा . जसे की सिम्युलेशन्स ! अर्थात क्वांटम कॉम्प्युटर्स हे अति प्रगत जी.पी.यु सारखे काम करतील असा माझा अंदाज आहे.
अर्थात तुम्ही आर.एस.ए. टोकन सिस्टिम ब्रेक करणे किंवा बिटकॉईन चे इन्क्रिप्शन ब्रेक करणे असे काही काम करणार असाल तर नक्कीच तुम्ही क्वांटम कॉम्प्युटर वापरु शकाल. असे काही करणार असाल तर आम्हाला नक्की सहभागी करुन घ्या , ही अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती ;)
पुनश्च एकवार मनःपुर्वक धन्यवाद !
13 Jun 2024 - 10:55 am | Bhakti
छान प्रतिसाद!
13 Jun 2024 - 10:54 am | Bhakti
_/\_ खुपचं अप्रतिम कथा लिहिली आहे.फर्स्ट -सेकंड स्पार्क,अचेतन-सचेतन मस्तपणे समजले.
13 Jun 2024 - 5:59 pm | अथांग आकाश
उत्तरार्ध सुद्धा आवडला! पुलेशु!!
14 Jun 2024 - 8:09 pm | नठ्यारा
प्रसाद गोडबोले,
विज्ञानकथेत विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान रंजकपणे मिळून मिसळून यायला हवं. कथेत अगदी झक्कासपणे जमलंय.
डोस्कं लई भंजाळून गेलंय. विचारचक्र जाम गरागरा फिरू लागलंय. सविस्तर प्रतिसाद सवडीने देईन.
-नाठाळ नठ्या
16 Jun 2024 - 6:44 pm | प्रसाद गोडबोले
मनःपुर्वक धन्यवाद !
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद देणार्यांचे मनःपुर्वक आभार ! इथे प्रतिसाद पाहुन हुरुप येतो.
ही कथा जवळपास एक वर्षापुर्वी सुचलेली, मात्र लिहायला वेळच होत नव्हता , हिमालयातील ट्रिप च्या निमित्ताने लिहुन काढु शकलो. :)
बाकी प्रो. जैन आणि प्रो. चौहान ह्यांचा सोबत झालेल्या अनेक चर्चा अतिषय उपयुक्त ठरल्या कथा लिहायला, त्यांची कथेवर काय प्रतिक्रिया आहे हे अजुन कळलेले नाही. :))
( अवांतर : ते अजुन हिमालयातच आहेत , त्यांची ट्रिप अपेक्षेपेक्षा जास्त अॅडव्हेंचरस झालेली असल्याचे कळले. =)))) )
परत एकदा धन्यवाद :)
25 Jul 2024 - 1:49 am | प्रसाद गोडबोले
The Truman Show
https://en.wikipedia.org/wiki/The_Truman_Show
The film is the story of Truman Burbank (played by Jim Carrey), a man who is unaware that he is living his entire life on a colossal soundstage, and that it is being filmed and broadcast as a reality television show which has a huge international following. All of his friends and family and members of his community are paid actors whose job it is to sustain the illusion and keep Truman in the dark about the fiction he is living.