*बलराम कृष्ण हरी शिक्षण
बालपण आणि किशोर अवस्था ही नंदाघरी गोकुळात गेले. या काळातले कृष्ण बलरामांचे आणि शास्त्रोक्त व धार्मिक संस्कार झाले नव्हते ते आता कुलगुरू गर्गाचार्यांनी केले.धर्माशस्त्रानुसार मौंजीबंधनाची वयमर्यादा २२ असल्याने मुंजी उरकून रामकृष्णांना सांदिपनी यांच्या अवंतीनगराजवळील आश्रमात वेदाध्ययनार्थ पाठविले.तिथे फक्त ६४ दिवसांमध्ये दिवसांमध्ये सारी विद्या हस्तगत करून मथुरेला परतले हे पुराणात लिहिले आहे.या व्यतिरिक्त राम कृष्णाच्या शिक्षणसंबंधी इतरत्र उल्लेख आढळत नाही. बंकिमचंद्र लिहितात, कदाचित शिक्षणाचे वय होण्याआधीच ते मथुरेत राहायला आले असावेत कारण महाभारतात सभापर्वात शिशुपालकृत कृष्ण निंदेमध्ये तो कृष्णाला "कंसाच्या अन्नावर वाढलेला असा त्याचा उल्लेख करतो" पुराणांतरीच्या गोपी स्त्रियांबरोबरच्या लीला काल्पनिकच आहेत याचा हा भक्कम पुरावा आहे.
तसेच कृष्णाच्या गुरु सांदिपनींच्या घरच्या शिक्षणाशिवाय कृष्ण वेदज्ञ आणि चांगला शिक्षित होतात याचा उल्लेख सभा बरोबर भीष्माने ३८ व्या अध्यायात केला आहे ,"वेद वेतांग विज्ञानं बलं चाप्यधिकं तथा..".
तसेच महाभारतकालात जेव्हा कृष्ण अश्वत्थामाला म्हणतो "गुरुपुत्रा तुझ्या नृशन सकरणीने उत्तरेच्या गर्भातील बालक खालील मृत झाले असले तरी मी त्याला माझ्या तपबल्याने जिवंत करीन" महाभारत काळात तप या शब्दाचा अर्थ ध्यान धरणा असे नसून शिक्षण असा आहे. कृष्णाने हिमालयात जाऊन दहा वर्ष तपश्चर्या केली असा महाभारतात उल्लेख आहे. तसेच पांडव बारा वर्षे वनवासात असताना कृष्णाने त्या बारा वर्षात विविध वेदविद्या ऋषींना द्वारकेत निमंत्रित करून त्यांच्याकडून वेद उपनिषदे यांचे शिक्षण घेतले त्याचा उल्लेख कृष्ण चरित्रात सापडतो.
*जरासंधाचे मथुरेवर हल्ले
कंसवधानंतर कंस विधवा अस्ती आणि प्राप्ती यांनी साधारण वर्षभरानंतर आपल्या वडिलांकडे परत जाण्याची परवानगी मागितली. त्यांच्याकडूनच जरासंधाला मथुरेची इत्थंभूत माहिती समजली. यादवांतील कुलसंघामध्ये भेद निर्माण करून तेही राज्य आपल्या साम्राज्यांना जोडण्याचे स्वप्न कृष्णाने पार धुळीला मिळवले होते. मुलींच्या तोंडून मथुरेमध्ये उग्रसेनापेक्षा रामकृष्णाचे प्रस्ताव अधिक वाढल्याचे कळून मोठ्या सेनेसह हल्ला करण्याचा निर्णय जरासंधाने घेतला. जरासंधाने एकापाठोपाठ एक अशा सतरा स्वाऱ्या केल्याचे हरिवंशकार आणि इतर पुराणांनी म्हटले आहे. महाभारतात २७ आक्रमणांचा उल्लेख नाही परंतु एका हल्ल्यामध्ये त्याचा संघाने जवळपास २७ दिवस मथुरेवर वेढा केला होता.
हरिवंश याप्रमाणे सतराव्या हल्ल्याच्या वेळी बलरामाचे डिंभक नावाच्या जरासंधाच्या सेनापतीशी युद्ध जुंपले. त्यात तो बेशुद्ध झाला परंतु डिंभक मारला गेला अशी सैन्यामध्ये अफवा उडाली. तर दुसऱ्या आघाडीवर डिंभकाचा मित्र हंस हा होता. डिंभक लढाईत मृत्यूमुखी पडल्याचे ऐकून विव्हल झालेला हंसाने शेजारून वाहणाऱ्या यमुनेमध्ये उडी मारली. थोड्यावेळाने डिंभक शुद्धीवर आला तेव्हा हंसाच्या आत्महत्याचे वृत्त समजतात त्यांनी देखील यामुळे जलसमाधी घेतली. महाभारतात यादव जरासंध संघर्षाचा उल्लेख येतो, तोही एवढाच किती वर्षे जरी यादव जरासंधाशी लढत राहिले असते, तरीही त्याच्या अफाट सैन्याचा संहार करू शकले नसते. हंस डिंभक यांच्या विचित्र मृत्यूची बातमी ऐकून जरासंध विमनस्क झाला व तेथून वेढा उठवून तो परत मगधला परतला.
परंतु जरासंधाच्या वेढ्यामुळे मथुरावासी त्रस्त झाले.तेव्हा एका सभेत आपले विचार मांडताना विकद्रू नामक एक वयोवृद्ध मत्सक्ती म्हणाला मागच्या लढाईत खूप माणसे मारली गेल्याने त्यांची जिद्द ही हरवले आहे अशा स्थितीत मथुरा जरा समजा मथुरा जरासंध्याला तोड द्यायला समर्थ आहे रामकृष्णांच्या पराक्रमाबद्दल आमच्या मनात अजिबात संशय नाही पण खरे तर जरा सुंदर राम कृष्ण वर संतापला आहे तेव्हा मला असे वाटते त्या दोघांनी काही दिवस मथुरा सोडून गेले तर मथुरेवर जरासंधाची धाड पडणार नाही. त्यांनी दक्षिणेत जावे.दक्षिणेत यादवांची चार राज्य आहे त्यांनी कुठेही राहावे आणि जरासंध जरा थंडावला की परत यावे.
कृष्णाने हे मान्य करून दक्षिणेला प्रवास सुरू केला दक्षिणेच्या प्रवासात सह्याद्रीमध्ये वेण्णा नदीच्या परिसरात त्यांना भगवान परशुराम भेटला. त्यांनी आणखी दक्षिणेला जाऊन राम कृष्णांनी गोमांतक पर्वतात आश्रय घ्यावा हे सांगितले. गोमंतक म्हणजे हल्लीच्या काठेवाडातील गिरनार पर्वत असे म्हटलेले आहे. आपण सैन्यासह जरासंध मथुरेला हल्ला करण्यासाठी आला होता. परंतु राम कृष्ण हे मथुरा सोडून दक्षिणेकडे गेल्याची, गोमंतक पर्वताच्या झाडीत आश्रय घेतल्याचे समजल्यावर जरासंधाने आपल्या अफाट सैन्याची गोमांतककडे चाल केली. पण जरासंधसोबत असलेल्या चेदिराज दमणघोषाने या संदर्भात सल्ला दिला की कृष्ण परत बाहेर येण्याची वेढा घालून एक दिवस वाट बघत बसण्याऐवजी आपण चारी बाजूने पर्वत पेटवून द्यावे. म्हणजे एकदा झाडे जळाली की आत लपून बसले असतील तर जळून जातील किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास अलगत आपल्या हाती पडतील. अशा रीतीने पर्वताला आग लावली समुद्रावर येणाऱ्या वार्यामुळे ती आग चांगलीच भडकली.
झाडे जळाली, खनिजे वितळली त्यांचे लोण उतारावरून वाहू लागले. आसमंत धुराने भरून गेला .या आगीचा दाह सैन्यालाही सहन होईना. म्हणून जरासंधा सैन्यासह अर्धा कोसमागे हटले. परंतु तरीही रामकृष्ण तेथून निसटले.मथुरेला परतले.
मथुरेकडे परत येत असताना वाटेत कृष्ण राम- यांना करवीर पूर्णावाची नगरी लागली. कंसासारखा शृगाल नावाचा एक बलदंड यादव तेथे राज्य करत होता. कृष्णाला त्याने द्वंद्वाचे आव्हान दिले. व कृष्णाने सुदर्शन चक्र वापरून त्याला मारले. कृष्णाचे सुदर्शन चक्र म्हणजे धारदार पाती बसविल्याने आणि तुंब्यामध्ये दोरी अडकून देखील मारल्यानंतर परत येणारे बूमरंग सारखे एखादे शस्त्र असावे असे डॉ. शं.के पेंडसे यांनी आपल्या महाभारतातील व्यक्तिदर्शन या ग्रंथातील कृष्ण लेखांमध्ये लिहिले आहे. तर कै.घैसास म्हणण्यानुसार सुदर्शन म्हणजे सैनिकांच्या एक पथक ज्यात २०० बलदंड असलेले सशस्त्र कमांडोज यांचा पोशाख श्रीकृष्णासारखाच असे. तर ते श्रीकृष्णापाठी व सातत्याने राहत असणारे संरक्षक पथक असावी. करवीर गादीवर त्याचा पुत्र शक्रदेव याला बसवण्याची आज्ञा शृगालची विधवा राणी पद्मावतीला हिला देऊन वाटेत चेदिराज दमणघोष याच्या राजधानीत आपल्या आत्याकडे एक दिवस राहून कृष्ण बलराम मथुरेला परतले.
दक्षिणेच्या खडतर स्वारी मुळे जरासंध देखील हैराण झाला होता. त्यामुळे तो आणखीन तीन चार वर्षे मथुरेकडे येणार नाही हे निश्चित होते. याच काळात कृष्णाने पश्चिम किनाऱ्यावरील रवैतक पर्वताजवळ असणाऱ्या आनर्त राजाची मैत्री केली, राजाने मैत्री शिरोधार्य तर मानलीच पण बलरामाला रेवती नामक आपली एक कन्या देऊन यादवांशी आपले नातेसंबंध प्रस्थापित केले .
श्रीकृष्णाने याच पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टीने अत्यंत सुंदर भागात अशा कुशस्थली नावांचा ठिकाणी बारा योजने लांब आणि बारा योजने रुंद अशी एक नगरी बांधून काढण्याचे ठरवले आणि याच नगरीला द्वारावती किंवा द्वारका असे नाव ठेवायचे ठरवले.
*रुक्मिणी स्वयंवर
विदर्भ राज भीष्मक याची सुंदर कन्या रुक्मिणी हिचे एक कुंडीनपुरी स्वयंवर नियोजित झाल्याचे आणि त्यासाठी भारतातील विविध भागातील राजे निमंत्रण केल्याची बातमी कृष्णाला समजली.पण मथुरेला या स्वयंवराचे निमंत्रण नव्हते त्यामुळे तो संतापला. कुंडीनपुरापासून काही अंतरावर सैन्याची छावणी टाकून कृष्णाने स्वतःचा मित्र क्रथ आणि कैशिक नामक राजांच्या छावणीत आपला मुक्काम ठेवला. सम्राट जरासंधाने या सभेत कृष्ण आला म्हणजे संघर्ष आढळ ही गोष्ट स्पष्ट केली व निमंत्रण नसतांनाही तो येथे आला म्हणजे तो विदर्भ राजकन्येच्या मोहाने आला आहे निश्चित म्हणून आपण युद्धाला सज्ज होणे आवश्यक आहे असे तो म्हणाला. युवराज रुक्मी यानेच या स्वयंवराचा घाट घातला होता.कृष्णविरोधी मंडळाचे दोन तांत्रिक मुद्दे होते एक म्हणजे कृष्ण हा अनाहूतपणे येथे आला आणि दुसरा म्हणजे तो 'राजा' नव्हता. त्यामुळे क्रथ आणि कैशिकांनी त्याच सभेत आपले राज्य आपणहून कृष्णाला देत असून त्याचा राज्याभिषेक उद्या सकाळी स्वयंवरापूर्वी आपल्या छावणीत होईल हे जाहीर केले. त्सर्वांना कृष्णाच्या राज्याभिषेकाचा निमंत्रण दिले तरी जरासंध, शिशुपाल, रुक्मी आणि शाल्व यांच्याशिवाय सर्व राजे दुसऱ्या दिवशी कृष्णाच्या राज्याभिषेकाला हजर होते. राज्याभिषेकानंतर भीष्मकाने त्याला स्वयंवराचे निमंत्रण न पाठवल्याबद्दल त्याची माफी मागितली. रुक्मीने मला न विचारताच बहिणीचा स्वयंवर ठरवून ही निमंत्रण पाठवली. त्यामुळे कृष्ण म्हणाला मी येथे यावे असे तुला वाटत नव्हते म्हणूनच काल येथे आलो तेव्हा माझे स्वागत करायला तू आला नाही. मी स्वयंवराचा समारंभ पाहण्यासाठी मी आलो होतो. तुझी मुलगी सुंदर आहे हे ऐकले होते पण त्यासाठी मी स्वयंवर मंडपात शिरलो नसतो कारण तिथे आगंतूक म्हणून माझा अपमान झाला असता. यावर भीष्मकने स्वयंवर पद्धतीने मुलीचा विवाह करण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले व राजांची माफी मागितली.त्यावर कृष्णाने व इतर राज्याने लगेच तातडीने आपापल्या राज्यात प्रयाण केले.स्वयंवर मोडले. या साऱ्या घटना एकूण राजकन्या रुक्मिणी वैतागली.कृष्णाने वडिलांना आपली इच्छा असल्यास आपल्या विवाहाबद्दल इच्छा व्यक्त केली आहे ही बातमी तिला मिळाली होती त्यामुळे कृष्णालाच वर करण्याचे मनात ठरवले होते.जरासंध पाईक असलेल्या मोठ्या भावाला रुक्मीला ते आवडले नाही तो संतापला. जरसंधाच्या आज्ञाप्रमाणे वाकडी वाट करून तो शाल्व व कालयवनाच्या भेटीला निघाला.
*राजधानी बदलली
राजधानीसाठी आनर्तच्या दक्षिणेला एखादे स्थळ निवडण्याची आज्ञा गरुड नामक एका पाहणीकार तज्ञाला केली.रैवतक पर्वतानजीक असलेल्या कुशस्थली नामकरण एका स्थळाची गरुडाने निवड ही केली. मथुरेच्या पश्चिम भागात शाल्व व कालयवन आणि दुसऱ्या बाजूने जरासंध आणि त्याचे मित्र राजे स्वारी संघटित करत होते. ही बातमी कृष्णाला कळाली आणि नवी राजधानी बांधण्याचे काम झपाट्याने पूर्ण करून यादवांची राजधानी मथुरेतून नव्या द्वारावती किंवा द्वारका नामक नगरीत हालवण्यासाठी यादव गण प्रमुखांची संमतीही कृष्णाने मिळवली. कृष्णाच्या द्वारका नगरीच्या प्रकाराच्या भिंती आणि नौकांच्या नांगराचे अवशेष पाहता द्वारका ही त्या प्राचीन काळातील बंदर असावे .आणि तिथून भारताचा परदेशांशी व्यापार चालत असावा असा अंदाज व्यक्त केला गेला आहे .त्या काळात भारताचे प्रवेशद्वार म्हणून या शहराला द्वारका असे नाव पडलेले असावे. द्वारकेत सापडलेल्या एका अत्तराच्या कूपिचे रासायनिक परीक्षण केल्यावर त्या काळातील लोकांना मातीच्या भांड्यावर चमकदार मुलामा देण्याची कला अवगत होती असे दिसते. तेथे सापडलेल्या धातूंच्या तुकड्यांचे परीक्षण केले असता. यांना धातू मिश्रणाचे तंत्र चांगले अवगत होते असा दिसते. यावरून पुराणात व महाभारतात वर्णन केलेली शस्त्र हे खरोखरच अस्तित्वात असावी व ती बनवणारे आणि वापरणारे तज्ञ तंत्रज्ञान काळात होऊन गेले असावेत हे अनुमान काढता येते.
आता समुद्रवलयांकित द्वारकेला वेगळी सुरक्षा लाभली. रस्ते, बागा, पोहण्याचे तलाव, इंद्र सभेच्या धरतीचे सुधर्म नावाचे गणप्रमुख जमण्याचे सभागृह, विविध कुलप्रमुखांचे राहण्याचे महाल, राण्यांचे महाल बाजारपेठा वगैरे वास्तू उभ्या केल्या. द्वारावती जणू इंद्रपुरी सारखी सजली. द्वारकेचे कृष्णकालीन नाव शंखद्वार होते. येथेच पंचजन असूराला मारून कृष्णाने सांदीपनी याच्या मुलाला सोडविले आणि आपला पांचजन्य नावाचा सुविख्यात शंख मिळवला.
*कालयवन वध
दोन भिन्न दिशांनी कालयवनाच्या आणि जरासंधाच्या अफाट सेना मथुरे कडे प्रयाण करत असल्याची बातमी कृष्णाच्या कानावर येत होती. त्यामुळे मथुरावासियांना द्वारकेमध्ये सुस्थितीत करून थोड्या सैनिकांसह कृष्ण मथुरे कडे परतला. मूठभर सैनेशी मुकाबला करणे शक्य नव्हते म्हणून कृष्णाने मंत्र युद्धाचा (गनिमी कावा) आश्रय घेण्याचे ठरवले .कालमवनाच्या मदतीला शक,तुखर,दरद,तंगन,पारद अशा अनेक डोंगरी व आदिवासी आनार्य जमातींच्या टोळ्या आल्या होत्या. कालयवनाच्या दृष्टीस पडेल अशा तऱ्हेने कृष्ण पळू लागला. आपले अफाट सैन्य आणि दरारा यांना घाबरून हा प्रख्यात गवळी योद्धा घाबरलेला दिसतो आहे असे कालयवनाला वाटले. कृष्णाने त्याला चकवीत हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये नेले आणि सुविख्यात सम्राट मांधात्याचा पुत्र मुचकुंद तेथे शांतपणे झोपला होता त्या गुहेत आणले. कृष्ण झोपेचे सोंग करून पडला आहे असे वाटून कालयवनाने झोपलेल्या मुचकुंद ऋषींना लाथ मारली.त्याने रागाने डोळे उघडून पाहिले कालयवन त्याच्या दृष्टीस पडला त्याची जळून राख झाली. कालयवन मारला गेल्याची बातमी सैन्यात वनव्यासारखी पसरली आणि ते घाबरून सैरावैरा पळू लागले.मोहीम सोडून जरासंध पळाला ही बातमी समजली आणि कृष्ण मनापासून हसला, सुखावला आणि द्वारकेला परतला.
*रुक्मिणी हरण
जरासंध्याच्या सल्ल्याने युवराज रुक्मीने आपल्या बहिणीचे जरासंधाचा सेनापती चेदीराज शिशुपालाशी विवाह ठरवला दिन ही ठरवला. देशोदेशी लग्नाची निमंत्रणे पाठवली. रुक्मिणी कृष्णा मध्ये पूर्ण गुंतल्याची कल्पना आल्यामुळे कृष्णाची नव्याने कुरापत काढण्याचा हा प्रकार होता. शिशुपाल हा कृष्णाचा आते भाऊ असल्याकारणाने लग्नाचे निमंत्रण द्वारकेलाही श्रीकृष्णाला मिळाले होते. लग्नाच्या दिवशी विदर्भ राजघराण्याच्या प्रथेप्रमाणे नगरवेशीवरील इंद्र आणि इंद्राणीच्या मंदिरामध्ये जाऊन राजवधुने आपल्या वैवाहिक जीवनासाठी इंद्राणीचे आशीर्वाद घ्यायचे होते. त्यासाठी त्या सकाळी राजकन्या रुक्मिणी आपल्या शरीर रक्षकांसह गावाबाहेरील मंदिरात पोहोचली. राजकन्येच्या दर्शनात निमंत्रिकतांपैकी काही राजही त्या स्थळी उपस्थित होते.इंद्राणीची पूजा बांधून रुक्मिणी मंदिराबाहेर पडते तोच कृष्णाने आपल्या रथात तिला उचलून वेगाने घेऊन मथुरेच्या दिशेने प्रयाण केले.कृष्णाला शरीरक्षकांनी अडवण्याचे प्रयत्न फोल झाले. जवळच असलेल्या बलराम आणि यादव सैन्याने त्यांचा केव्हाच फडशा पाडला.रुक्मीला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो संतापला आणि कृष्णाला ठार मारल्याशिवाय आपण कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करून मित्रांसह कृष्णाचा पाठलाग करत निघाला.
कृष्णाला त्याने लवकरच गाठले. रुक्मी हा अतिशय घमंडी होता आपल्या शौर्याचा त्याला मोठा अभिमान होता. त्यामुळे त्यांनी कृष्णाला द्वंद्वाचे आव्हान दिले कृष्णाने क्षणात त्याचा पराभव केला आणि त्याला बेशुद्ध केले. रुक्मिणीच्या विनंतीनुसार त्याच्या ज्येष्ठ बंधूंना न मारता त्याला बेशुद्ध अवस्थेत तिथेच टाकून रुक्मिणी सह कृष्ण द्वारकेस निघून गेला.
आणि बलराम ही लवकरच द्वारकेला परतल्यावर द्वारकेत कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह मोठ्या धुमधडाक्याने साजरा झाला. रुक्मिला त्याच्या मित्रांनी कुंडीनपुराला परत नेले पण राजधानीत न येण्याची त्याची प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केली व भोजकट नावाची एक वेगळी नगरी बसून तेथे तो जन्मभर राहिला .
महाभारतातील रुक्मिणी हरणाची कथा नाही सभापर्वत पण उद्योगपर्वात रुक्मिणी हरणाचा उल्लेख नसला तरी युद्धाचा संदर्भ येतो. बकीम चंद्रांच्या मते रुक्मिणी हरण झालेच नसावे.आपल्या वडिलांच्या संमतीने रुक्मिणीने आपल्या प्रियकृष्णाशी विवाह केला असावा. रुक्मी शिशुपाल आणि जरासंध यांच्यामुळे त्यांनी या प्रसंगाचे भांडण उभे करून युद्धाचा प्रसंग आणला असावा.
*कृष्णाचे वैवाहिक जीवन
कृष्णाच्या इतर नायिकांची नावे अशी सत्यभामा, सत्या, सुदत्ता किंवा भद्रा ,लक्ष्मणा जांबवती ,मित्रविंदा आणि कालिंदी यापैकी सर्वजणी कृष्णाच्या पराक्रमावर व देखणेपणावर भाळून त्याच्या प्रेमात पडल्या होत्या .
एक दोघींना तर त्यांच्या स्वयंवरातील पण जिंकून कृष्णाने मिळवले होते तर सत्यभामा आणि जांबवती विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या आई-वडिलांनी कृष्णाला अर्पण केल्या होत्या.
सत्या ही कोसल राज नग्नजीत याची कन्या कोसल राजाने नग्नजीताचे स्वयंवर मांडले पण विचित्र पण लावला होता. जो एकाच वेळी सात मस्त बैलांना नामोहरम करण्याचा पराक्रम करेल त्यालाच आपण जिंकता येईल. बालपण गौळ वाड्यात गेल्याने कृष्णाने सहज हा पराक्रम करून दाखवून सत्या मिळवली.
भद्रा अथवा सुदत्ता ही तर कृष्णाची आते बहीण काय काय राजाशिबी आत्या श्रुतकीर्ती यांची मुलगी तिचे लहानपणापासून कृष्णावर प्रेम होते. लक्ष्मणा ही भद्र देशाची राजधानी राजकन्या तिच्या स्वयंवरात फिरत्या दारू यंत्राचे छतावरील आरशात पडलेले प्रतिबिंब खाली ठेवलेल्या पाण्यात पाहून दारू यंत्राचा बाणाने वेध घ्यायचा होता. कृष्णाने हा कठीण पण देखील सहज जिंकला.
मित्रविंदा ही कृष्णाची आते बहीण अवंती राजाची आणि आत्या राजाधिदेवीची मुलगी!तिच्या स्वयंवराच्या वेळी विंद आणि अनुविंद या तिच्या भावांनी एक युद्ध पुकारले ते दुर्योधनाचे मित्र होते. या युद्धात त्यांचा पराभव करून कृष्णाने मित्रविंदाला घरी आणले.
कालिंदी यमुनाकाठच्या आरण्यात आश्रम करून राहिलेल्या एका यतीची मुलगी! कृष्ण एकदा यमुना काठच्या जंगलात शिकारीला गेला असता कालिंदी त्याच्या दृष्टीस पडली व कृष्ण तिला पाहून मोहित झाला. कालिंदीही त्याला पाहून मोहित झाली.कृष्णाने यतीच्या विनंतीला मान देऊन तिच्याशी विवाह केला त्यामुळे जंगलातील अनेक आदिवासी जमाती कृष्णभक्त झाल्या.
संदर्भ -शोध कृष्णाचा प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक प्रा डॉ राम बिवलकर
प्रतिक्रिया
9 Jul 2024 - 10:58 am | प्रचेतस
हे चुकीचे आहे. गोमंतक पर्वत म्हणजे आजच्या गोव्याच्या सीमेवरील सह्याद्रीचे शिखर असावे वाटते. हरिवंशात दिलेला ह्याचा भूगोल स्वयंस्पष्ट आहे. ह्यात शूर्पारकाच्या दक्षिणेकडील भाग असे म्हणले आहे. भार्गवराम त्यांना करवीर नगरात वेण्णा नदीपाशी म्हणजे आजच्या कृष्णवेण्णा म्हणजेच पंचगंगा नदीपाशी भेटला. कृष्ण त्याचा गौरव करताना तू शूर्पारक नगर बसविले असे म्हणतो. हे शूर्पारक म्हणजे आजचे वसईच्या उत्तरेकडील नालासोपारा. परशुराम त्यांना करवीर नगरीतून (आजचे कोल्हापूर) तिथे दुष्ट शृगाल राजा राज्य करत असल्याने. खाली दक्षिणेकडे क्रौचपूर व तिथून खाली गोमंतक पर्वतावर जायला सांगतो. व नंतर रामकृष्णाकरवी जरासंधाचा पराभव होऊन शृगालाचा वध होतो. त्यानंतर मथुरेस परत आल्यावर ते द्वारकेची स्थापना करतात.
येथे परकीय टोळ्यांचा उल्लेख आलाय, त्यापैकी यवन हे सांस्कृतिक होते. यवन म्हणजे ग्रीक, तुशार म्हणजे हिंदुकूश पर्वतराजीत टोळ्या, पारद म्हणजे पर्शियन. महाभारतात आणि हरिवंशातही ह्या म्लेच्छांचा उल्लेख वारंवार येत असतो.
9 Jul 2024 - 3:27 pm | Bhakti
हो हा देखील उल्लेख पुस्तकात आहे.बाकी खूप छान माहिती दिली!
9 Jul 2024 - 2:25 pm | कर्नलतपस्वी
वाचतोय.
अशा अधुनिक विचारवंतांच्या पुस्तकांनी पारंपरिक कथा वास्तूला सुरूंग लावल्या सारखे वावाटते मग ते इरावती कर्वे,दुर्पगा भागवत पटनाईक ,अनिश भैरप्पा इत्यादी. काही प्रमाणात महाभारतातील व्यक्ती चित्रे, प्रसंग यांचा अधुनिक काळातील पटण्याजोगे विश्लेषण केले आहे तर काही जसेच्या तसे लिहीले आहे. उदाहरणार्थ...
. कृष्ण झोपेचे सोंग करून पडला आहे असे वाटून कालयवनाने झोपलेल्या मुचकुंद ऋषींना लाथ मारली.त्याने रागाने डोळे उघडून पाहिले कालयवन त्याच्या दृष्टीस पडला त्याची जळून राख झाली.
हा प्रसंग जसाच्या तसा घेतला आहे.
प्रचेतस चे खुलासे वाचनाचा आनंद द्विगुणित करत आहेत. हे वे सां न.
पु भा प्र.
9 Jul 2024 - 2:35 pm | कर्नलतपस्वी
दुर्गा भागवत.
मी आठवी मधे असताना प्र् के अत्रे यांनी लिहीलेल्या गुरूदक्षीणा या नाटकात,शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ,काम केले होते. अर्थात आमची भुमिका दोन मिनीटाची डायलाॅग नसलेल्या राक्षसाची होती. पण तालमीला मात्र हिरो असल्या प्रमाणे तासभर आगोदरच हजर असायचो. आमच्या बरोबर अशीच भुमिका केलेला मित्र फर्ग्युसन काॅलेजचा फिजिक्स चा एच ओ डी म्हणून निवृत्त झालायं.
9 Jul 2024 - 3:19 pm | Bhakti
हा हा!
काय भुललासी वरलीया रंगा !
9 Jul 2024 - 3:22 pm | Bhakti
मुचकुंद म्हणजे काय?
ते एक फुलझाडही आहे.