मला आवडतात गोष्टी वाचायला.आणि त्याजर मुळापर्यंत नेणाऱ्या असतील तर मनोरंजक वाटतात.
संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी लेखक प्रा. डॉ.राम बिवलकर यांच्या पुस्तकातील जेवढा उमगेल तो गोषवारा देते.
फोटो -कृष्णा @मथुरा
कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा. तो पराक्रमी , ईश्वर पूजक होता. त्याने ८६ राजांना आपल्या पराक्रमाने जिंकून त्यांची राज्य आपल्या राज्याला जोडून आणि त्यांना कैद केले होते. आता ८६ मध्ये आणखीन १४ राज्यांना जिंकून त्याची संख्या १०० झाल्यावर तो 'शतराज शीर्षमेध' असा एक नरसंहार बेत शंकराला संतुष्ट करण्यासाठी करणार होता.विशेष म्हणजे यातील बरीच मंडळी जरासंध एवढीच दुष्ट होती. त्यामुळे दुष्ट राजांचा एक मोठा संघच देशात निर्माण झाला होता. ८६ मध्ये हस्तीनापुरातील राजा धृतराष्ट्र चे राज्य जरासंधाने जिंकलेले नव्हते अथवा त्यांचे मांडलिकत्व नव्हते. याचे कारण अर्थातच त्यांचा रक्षक म्हणजे भीष्म! भगवान परशुरामाशी युद्ध करणाऱ्या अशा भीष्माचा प्रताप सर्वत्र जाहीर होता. त्यामुळे जरासंधला हस्तिनापूरकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
कृष्णाचे कूळ
आर्यावर्तात म्हणजेच आजच्या उत्तर भारतात शूरसेन राज्य होते. या देशाचे राजधानीचे नाव होते मथुरा ती मूळची मधुपुरी म्हणून ओळखली जायची. ती आधी सूर्यवंशीय राजांची राजधानी होती परंतु कालंतराने ती चंद्रवंशीय यादवांची विविध कुलाची झाली. यादवांची विविध कुलांची छोटी छोटी गणराज्य या भागात प्रस्थापित होती. आपापल्या विविध सात गणराज्यात यांचे भाग होते. पण ते सर्व मथुरेचे मांडलिक होते. बहूम,कुकुर ,अंधक,दाशार्ह ,यादव,वृष्णी आणि भोज ही या संघांची नावे .
कृष्ण हा यादवांच्या कुळातील यदूपासून ४२ वा पुरुष होता. यदू हा ययाती आणि देवयानी यांचा पुत्र होता. कृष्णाच्या आधी अंधकापैकी उग्रसेन हा मथुरेचा गणाध्यक्ष होता ,आपला मोठा भाऊ देवक याच्याशी कपटाने ते बळकावले होते. देवकाचे वृष्णी आणि शूरसेन हे दोन मित्र होते. मथुरेमध्ये अंधक आणि भोज यांची असलेली मोठेपणा शूरसेनाला मान्य नव्हता. त्याच दरम्यान उग्रसेनेने वृष्णी प्रमुख अक्रुराचा विवाह त्याच्या आत्याची आहूकीशी लावला.
देवक मथुरा सोडून शूरसेनकडे काही कामानिमित्त गेला होता. तेव्हा त्याला हद्दपार केल्याची अफवा पसरवण्यात आली. त्याच दरम्यान आहुक मरण पावला आणि त्यामुळे भोज आणि अंधक, आक्रुर सारख्या दृष्टीकुळातील प्रतिष्ठांच्या मदतीने उग्रसेनला मथुरेचा नवा राजा बनवलं आणि त्याचा बलदंड पुत्र कंस याला राजकुमार बनवलं.
देवकाला चार मुली आणि सात मुले होते. सर्वात लहान देवकी. देवकाचा मित्र शूरसेनला वसुदेवासह दहा पुत्र होते आणि पाच मुली होत्या. त्यामुळे वसुदेव जावयाला आणखीन दोन मुली देवकाने दिल्या.
मथुरेसाठी यादवांच्या या दोन कुलांमध्ये रस्सीखेच चालू होते. यात वसुदेवाचे पारडे जड होते त्याच्या पाच बहिणी परिसरातील पाच राज्यांना दिलेल्या होत्या यातील मोठी प्रथा म्हणजेच कुंती हस्तीनापुरच्या राजाला पांडूला, दुसरी सुतदेवा ही करुश याला, तिसरी श्रुतकीर्ती ही कैकेय राज्याला,चौथी श्रुतश्रवा ही चेदी राजाला आणि पाचवी राजाधिदेवी ही अवंती राजाला दिली होती.
अशा परिस्थितीत देवक शूरसेन , वसुदेव मथुरा येथील भोजांचे व अंधकांचे वर्चस्व नष्ट करणार आहेत असे उग्रसेनाला वाटले आणि त्यामुळेच मगधराज जरासंधाने सुद्धा मथुरेत फुट पाडण्यासाठी अस्ति आणि प्राप्ती या आपल्या दोन मुली कंसाला दिल्या.
संदर्भ -शोध कृष्णाचा,पूर्णत्वाचा प्रवासी
सदर पुस्तक copyrighted आहे की नाही याबद्दल काहीच माहिती नाही.तेव्हा इतर काही बाबत धागा अप्रकाशित करावा.
प्रतिक्रिया
23 Jun 2024 - 7:32 am | प्रचेतस
चांगली सुरुवात.
महाभारत इतके विस्तृत आहे की प्रत्येक टीकाकाराने आपल्या आपल्या परीने त्याचा अर्थ लावलेला दिसून येतो. कृष्णाच्या बालपणीच्या कथा महाभारतात न येता हरिवंशात किंवा भागवत पुराणात विस्ताराने दिसून येतात.
23 Jun 2024 - 10:10 am | Bhakti
हो!
हो,हे पुस्तक वाचताना सहज आकलन घडत आहे.म्हणून गोषवारा देण्याचा मोह आवरता येत नाहीये :)
23 Jun 2024 - 10:58 am | चित्रगुप्त
श्रीकृष्णाचे अवघे जीवन हे गेल्या हजारो वर्षातील अगणित लेखक, कवी, गायक, चित्रकार, मूर्तीकार, कीर्तनकार, अभिनेते, दिग्दर्शक इत्यादींसाठी आपापल्या कलेचा अविष्कार करण्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे. कितीही वेळा आस्वाद घेतला तरिही त्यातली गोडी ओसरत नाही.
-- इथे अगदी सुरुवातीपासून कृष्णकथा सांगत आहात हे खूप छान वाटले. कुणाचा मुलगा/नातू/ बाप/आजोबा/मामा/ मावशी/आई .. वगैरे कोण होता, हे लक्षात ठेवणे महाकठीण वाटते. यावर उपाय म्हणजे अशी माहिती काही आकृती/चार्ट्/वंशावळ अशा दृष्य स्वरूपात देत रहावे म्हणजे आणखी पुढील भाग वाचताना ते खूप उपयोगी होईल.कदाचित जालावर हे उपलब्धही असेल, तरी या सूचनेचा जरूर विचार करावा. तसेच या विषयावरील कांगडा, गुलेर, कोटा, बूंदी, किशनगढ वगैरे शैलीतली सुंदर चित्रे जालावर उपलब्ध असतात, त्यातली विषयानुरूप शोधून दिल्याने लेखमाला प्रेक्षणीय सुद्धा होईल.
23 Jun 2024 - 11:00 am | उग्रसेन
कृष्ण आणि कथा भारतीय मनांनी व्यापलेला आहे. दोन्ही भाग वाचले. लेखनात सुधारणा आवश्यक आहेत. लेखन घाईत केले असल्यामुळे तुटक वाक्यरचना हा महत्वाचा दोष जाणवतो. दुस-या भागातही काही शब्द चुकीचे लिहिले आहेत. कालनेमीच्या जागी काल नेहमी असं लिहिलंय, यशोदा प्रसूत झालीच्या ऐवजी यशोदा प्रसिद्ध झाली असे लिहिलंय.
उग्रसेन
(मथुरेचा गणाध्यक्ष)
23 Jun 2024 - 11:52 am | Bhakti
ओह,व्हाईस टायपिंग केलं,प्रुफ रीडिंग चुकलं.यापुढे कमीत कमी चुका करते.
25 Jun 2024 - 12:26 pm | टर्मीनेटर
अच्छा तों ये बात है! मग अशी गडबड होणे अगदी साहजिक आहे 😀
ह्या निमित्ताने चारेक वर्षांपूर्वी 'स्पीच टू टेक्स्ट' ह्या विषयावर कुमार१ सरांचा "लेखनक्रिया : लिहून की बोलून ?" हा धागा आला होता त्यावर मी दिलेल्या खालील प्रतिसादाची आठवण आली,
आता आपला ताजा अनुभव बघितल्यावर गेल्या चार वर्षांत त्या सुविधेत फार काही सुधारणा झाली आहे असे वाटत नाही 😂
25 Jun 2024 - 12:54 pm | Bhakti
हा हा! आणि वर तुमचा धाक ;) लेखकाचा रेप्युटशन हा शब्द असा जिव्हारी लागलाय की तिसरा भाग प्रकाशित करण्याआधी चार पाच वेळा वाचलाय ;)
-टर्मिनेटर मास्तरांना घाबरलेली शिष्या :)
पण खरय-छडी लागे छम छम विद्या येई घमघम!
26 Jun 2024 - 7:49 pm | राघव
पण खास करून नावंच्या बाबतीत फार काळजी घेणं गरजेचं आहे.
उदा: कुंतीचं नावः पृथा आहे, प्रथा नाही. :-)
25 Jun 2024 - 1:30 pm | चित्रगुप्त
मी देखिल लॅपटॉपवर टंकताना डाव्या (शिफ्ट, कंट्रोल इ. साठी आणि उजव्या हाताच्या (टंकनासाठी) फक्त मध्यमेचाच उपयोग करतो.
-- याविषयी जरूर लिहावे. मी AI, नेट बँकिंग, यूट्यूब, मिपा, गूगल मॅप, हे सगळे गूगल क्रोमवर करतो. मोबाईलवर यातले काही करत नाही. हे मी सगळे मॅकबुक वर करतो, त्यातले 'सफारी' जास्त सुरक्षित आहे का ? असल्यास त्यावर करत जाईन. kRupayaa khulaasaa karaavaa.
-- दर वेळी सफारी उघडल्यावर "अमूक इतके Trackers prevented from profiling you" असे लिहून येते, त्यात अॅमेझॉन, google, यूट्यूब, मिपा, फेसबुक वगैरेंची नावे आणि number of Trackers चा आकडा लिहीलेला असतो.
23 Jun 2024 - 12:10 pm | टर्मीनेटर
+१
हा प्रकार भक्तींच्या लेखनात मला जवळजवळ प्रत्येकवेळी जाणवतो आणि त्या आपल्या लेखानाकडे गंभीरपणे नं बघता खूप घाईघाईने ते प्रकाशित करतात असे वाटते.
त्यांना सल्ला देण्याचा व्यक्तिगत पातळीवर मला काही अधिकार नाही, पण त्यांच्या लेखानाचा एक वाचक म्हणुन असे सुचवावेसे वाटते की, इथे मिपावर शुद्धलेखनाचा हट्ट कोणी धरत नाही पण (फेसबुक/व्हॉट्सऍप वर काय वाट्टेल ते चालून जाते, पण मिपावर हार्ड कोअर वाचक आहेत त्यामुळे) १ तासात लिहिलेल्या मजकूराच्या तपासणीसाठी १ दिवस लागला तरी हरकत नाही, पण त्यातली वाक्यरचना सदोष आहे की नाही ह्याची खात्री आधी करावी.
आपल्या डोक्यात ४ विषय असतील तर त्यातले २ शॉर्टलिस्ट करावे, त्या दोनपैकी एकावर लिहावे, पण जे लिहू ते गंभीरपणे लिहावे. काय आहे लेखक / लेखिकाच आपल्या लेखानाकडे गंभीरपणे बघत नसतील तर वाचक तरी कशाला बघेल? आणि त्यांचे असे रेप्यूटेशन तयार झाल्यास कित्येक चांगल्या विषयावरील लेखनही दुर्लक्षित करण्याकडे वाचकांचा कल वाढतो.
अर्थात ही टीका नाही, पण एक वाचक म्हणुन आपण मांडलेल्या मुद्द्यावर जे वाटते ते एका वाचकाच्या भूमिकेतून लिहिले!
23 Jun 2024 - 11:10 am | चित्रगुप्त
--- कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा. तो पराक्रमी , ईश्वर पूजक होता.
--- या पहिल्याच वाक्यातले 'साम्राज्यवादी' आणि 'ईश्वरपूजक' हे शब्द वाचून हसू आले. या विशेषणांचे इथे काय प्रयोजन आहे, ते समजले नाही. या शब्दांवरून पुस्तकाचा लेखक 'डावा' असावा, असे वाटले. पुढे कळेलच ते.
माझाकडे रामायणावर एका 'डाव्या' ने लिहीलेले जुने इंग्रजी पुस्तक आहे. ते इतके स्फोटक आहे की हल्लीच्या 'असहिष्णु' काळात त्यातले लेख प्रकाशित करणे सुद्धा धोक्याचे होऊ शकते. असो.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
23 Jun 2024 - 10:19 pm | अनामिक सदस्य
रामायणावर 'डाव्या' ने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव सान्गावे अशी विनन्ती.
23 Jun 2024 - 11:47 pm | चित्रगुप्त
ते पुस्तक बरेच वर्षांपूर्वी एका मित्राने मला देले होते. अगदी जुने होते. बरीच वर्षे माझ्याकडे होते. माझ्या आम्ही जातो आमुच्या गावा या लेखात लिहील्याप्रमाणे दिल्लीहून इंदूरला स्थानांतरित झालो त्यावेळी ते आणले की नाही ते आता लक्षात नाही. आक्टोबरात परत तिथे गेल्यावर हुडकून सांगू शकतो. कृपया तेंव्हा मला पुन्हा आठवण करून द्यावी.
पुस्तकाचे आणि लेखकाचे पण नाव आता लक्षात नाही.
23 Jun 2024 - 11:31 am | टर्मीनेटर
छान सुरुवात! येउद्यात पुढचे भाग पटापट.
बाकी,
पुस्तकातला मजकूर जसाच्या तसा (कॉपी-पेस्ट केल्याप्रमाणे) नं देता पुस्तक वाचून आपल्याला झालेल्या आकलनाच्या आधारावर, स्वतःच्या भाषेत लिहिणार असाल तर copyright वगैरेची चिंता करण्याचे कारण नाही. तसेही आधुनिक काळात कुठलेही ऐतिहासिक / पौराणिक विषयांवर लेखन करणारे लेखक हे 'त्या' काळात अस्तित्वात असल्याची शक्यता शून्य आहे, त्यांनीही उपलब्ध असलेल्या प्राचीन साहित्याचा प्रचंड अभ्यास करून आणि अथक मेहनतीने माहितीचे संकलन करूनच अशी पुस्तके/ग्रंथ लिहिले आहेत, तेव्हा संदर्भ/श्रेयनामवालीत त्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचा सन्मान करून आपण जर वर म्हंटल्याप्रमाणे कॉपी-पेस्ट केल्याप्रमाणे नं लिहिता, आपल्या आकलनावर आधारित आणि स्वतःच्या भाषेत लेखन करत असाल तर त्यात गैर काहीच नाही!
23 Jun 2024 - 2:21 pm | बिपीन सुरेश सांगळे
मालिकेसाठी लेखन शुभेच्छा !
23 Jun 2024 - 3:28 pm | प्रसाद गोडबोले
लेख उत्तम मात्र ...
कृष्णाचे म्हणुन दिलेले चित्र काही आवडले नाही. कसलं बायल्या दिसतंय ते पात्र , नाही नाही रादर , बाईच वाटत आहे. मुळात पुरुषांचा जबडा (जॉ लाईन ) इतकी नाजुक नसतेच, शिवाय अॅडम्स अॅप्पल ( ह्यल मराठीत काय म्हणतात ते ठाऊक नाही) त्याचा लवलेश ही द्सत नाहीये. आणि दाढी मिशा तर अगदी नसल्यासारख्याच !
कृष्णाचे असे बायकी चित्रीकरण का केले जाते देव जाणे , अगदी टीव्ही सीरीयल मधील कृष्ण देखील बायल्या , चकचकीत गुळगुळीत दाढी केलेला, गोरा चिट्टा वगैरे असतो जे पाहुन हसुच येते !
ह्याला एकमेव अफवाद म्हणजे भारत एक खोज मध्ये दाखवलेला कृष्ण - सलीम घौसे !
23 Jun 2024 - 5:44 pm | कंजूस
भक्ती आणि अमरेंद्र यांचे लेखन उत्स्फूर्तपणे केलेले असते. ते मला आवडते.
______________
कृष्णाच्या चरित्रात बाल, कुमार,तरुण , कौरव पांडवांच्यात मध्यस्थी करणारा. द्वारकाधीश आणि कुरुक्षेत्रावरचा युद्धावरचा असे बरेच व्यक्ती विशेष आहेत. शेवटी वेरावळच्या यादवीनंतरचा वेगळा कृष्ण अवतार संपलेला आहे. कृष्णाचे कोणतेही एकच चित्र समर्थन करू शकणार नाही. गोपाळ कृष्ण घेतला तर गळ्यात वैजयंती माळ, हातात काठी, डोक्यावरच्या शेल्यात मोरपीस, कमरेला बासरी एवढेच येईल. सोन्याची माळ नसणार. विठ्ठल हा या रूपात आहे. कमरेवरचे हात काठी धरलेले आहेत ( भाविकांची रांग बघून तसे ठेवलेले नाहीत. डोक्यावरची कापडी गवळी कानटोपी आहे. त्यावर उगाचच मुकूट घालतात. अंगभर दागिने. भरजरी शेला.)
असो. आपल्याला आपल्या मनातल्या भावाप्रमाणे रूप पाहायचे.
23 Jun 2024 - 6:49 pm | कर्नलतपस्वी
पु भा प्र.
23 Jun 2024 - 10:17 pm | अनामिक सदस्य
रामायणावर 'डाव्या' ने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव सान्गावे अशी विनन्ती आहे.