दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
17 Jun 2024 - 8:26 am

आज बकरी ईद चा सण आहे. मुस्लिम धर्मियांचा एक महत्वाचा सण याला इद-अल-अधा असे ही म्हटले जाते.या सणामागील परंपरा साधारण अशी आहे.

विकीपेडीया मधुन्

अब्राहमच्या जीवनातील मुख्य परीक्षांपैकी एक म्हणजे त्याच्या प्रिय पुत्राचा वध करण्याची देवाची आज्ञा स्वीकारणे आणि त्याचे पालन करणे. कथेनुसार, अब्राहमला स्वप्न पडत होते की तो आपल्या मुलाचा बळी देत ​​आहे. अब्राहामला माहित होते की ही देवाची आज्ञा आहे आणि त्याने आपल्या मुलाला सांगितले, जसे कुराणमध्ये म्हटले आहे,"अरे बेटा, मी तुझा वध करतोय असे स्वप्न मला पडत आहे". त्याने उत्तर दिले, "बाबा, तुम्हाला जे करण्यास सांगितले आहे ते करा."
अब्राहामने देवाच्या इच्छेला अधीन राहण्यास आणि देवाच्या विश्वासाचे आणि आज्ञाधारकतेचे कृत्य म्हणून आपल्या मुलाचा वध करण्यास तयार केले. [२२] [२३] तयारी दरम्यान, इब्लिस (सैतान) ने अब्राहम आणि त्याच्या कुटुंबाला देवाची आज्ञा पाळण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि अब्राहमने इब्लिसवर खडे टाकून तेथून हाकलून दिले. इब्लिसला नकार दिल्याच्या स्मरणार्थ, हजच्या विधीच्या वेळी प्रतीकात्मक खांबांवर दगड फेकले जातात, ज्या ठिकाणी इब्लिसने अब्राहमला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. [२४]

अब्राहाम आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्यास तयार होता हे मान्य करून, देवाने अब्राहाम आणि त्याच्या पुत्राचा सन्मान केला. देवदूत गॅब्रिएल (जिब्रील) ने अब्राहमला हाक मारली, "ओ' इब्राहिम, तू प्रकटीकरण पूर्ण केले आहेस," आणि स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला. अनेक मुस्लिम अब्राहमची भक्ती आणि त्याचा मुलगा इश्माएल याच्या स्मरणार्थ ईद अल-अधा साजरी करतात. [२५] [२६] [२७]

ईदच्या प्रार्थनेनंतर, उधिया , किंवा गुरांचा विधी बलिदान केले जाऊ शकते. श्रीमंत मुस्लिम ज्यांना हे परवडते ते हलाल गुरे, सहसा उंट, बकरी, मेंढ्या किंवा मेंढ्याचा बळी देतात, हे अब्राहमच्या त्याच्या एकुलत्या एका मुलाचा बळी देण्याच्या इच्छेचे प्रतीक आहे. [३६] [३७] बलिदानासाठी प्राण्यांना विशिष्ट वय आणि गुणवत्ता मानके पूर्ण करणे आवश्यक आहे. [३८] एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला. [३९] [४०] बळी दिलेल्या प्राण्याचे मांस साधारणपणे तीन भागात विभागले जाते: उधिया करणाऱ्या कुटुंबाने तृतीयांश ठेवला आहे; उर्वरित मित्र आणि नातेवाईक आणि गरीबांमध्ये समान प्रमाणात विभागले गेले आहे. [३६]

तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.

Several vegan Muslim PETA India supporters celebrated Eid by having goats for dawat – not as the main course but as the guests of honour. They prepared a beautiful spread of fresh fruits and vegetables for the rescued animals while sharing the message that Islam, like all religions, teaches compassion and mercy and urging others to sacrifice cruel habits – not animals – by going vegan.

1

2

या स्तुत्य धाडसी संवेदनाशील उपक्रमासाठी पेटा संस्थेचे मनापासुन हार्दिक अभिनंदन.
अधिक माहीती इथे बघु शकतात
https://www.petaindia.com/features/vegan-muslim-peta-india-supporters-ce...

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

रामचंद्र's picture

17 Jun 2024 - 9:33 am | रामचंद्र

खरोखरच स्तुत्य उपक्रम. सर्वच धर्मांमधल्या पशुहत्या बंद व्हाव्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2024 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्तुत्य उपक्रम.

-दिलीप बिरुटे

आंद्रे वडापाव's picture

19 Jun 2024 - 11:42 am | आंद्रे वडापाव

विविध धर्मांत , अशी स्वकियांची हत्या करण्याचे, समर्थन कसं काय दिले जाते .. ?? न उलगडणारे कोडे आहे.

a

प्रसाद गोडबोले's picture

19 Jun 2024 - 10:57 pm | प्रसाद गोडबोले

समर्थन

कारण सर्वच माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी नसतात. मायथॉ़ईतील कथा अर्धवट उचलुन त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ लावणे हे काही मोजक्या लोकांचे टूलकिट आहे.

खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण कथा वाचतात , आणि त्यातील भावार्थ समजुन घेतात .

सगळ्यांना जमतेच असं नाही, जमलं पाहिजे असेही नाही.

आंद्रे वडापाव's picture

20 Jun 2024 - 8:23 am | आंद्रे वडापाव

सहमत

भारतातील आपल्यासारखे खरे जाणते आणि जिज्ञासु लोकं पुर्ण बकरी ईद ची कथा वाचून , आणि त्यातील भावार्थ समजुन घेवुनचं,
त्यांचे अर्धवट अन सोयिस्कर अन्वयार्थ न लावता ...सोशल मीडियावर वावरत, माणसा माणसात प्रेम वाढवण्याचे नागपुरी मंत्र तंत्र (टूलकिट) वापरताना रोज पाहतोच आहोत.

प्रसाद गोडबोले's picture

20 Jun 2024 - 10:31 am | प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2024 - 12:25 pm | चौथा कोनाडा


तर प्राणीप्रेमी संघटना PETAINDIA ने मोठी संवेदनशीलता दाखवत एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे त्यांना मारुन त्यांची दावत न देता त्या बकरृयांना खायला देणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. जे अतिशय ह्रद्य असे मला वाटले.त्यांच्या संस्थळावर या उपक्रमाचे वर्णन असे केलेले आहे.

अ ति श य स्तुत्य !

सर टोबी's picture

17 Jun 2024 - 12:28 pm | सर टोबी

हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.

स्त्युत्य उपक्रम? पेटा इंडियाचा प्रसिद्धीचा सोस?, कि नवीन 'टूलकिट'?
पेटा इंडियाने पेश केलेल्या 'दावत-ए-ईद' ह्या उपक्रमाच्या हेतू विषयी शंका घेण्यास वाव आहे.

गेल्या अडीच दशकात जगातलया अनेक विकसित/अविकसित देशांना अधून मधून आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही किंचित मंद वेगाने असली तरी सातत्याने शाश्वत वाढ नोंदवत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत खोडा घालण्यासाठी तसेच भारताच्या पायाभूत विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेली विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय संघटना, एनजीओ'ज चा समावेश असलेली इको-सिस्टीम सतत कुठली ना कुठली आंदोलने/अभियाने/उपक्रम राबवून देशात अराजकता माजवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कधी ते धरण किंवा पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांना विरोध, कधी बोगस शेतकऱ्यांचे आंदोलन, कधी सीएएचा विरोध तर कधी पर्यावरण /प्रदूषणाच्या नावाखाली 'दिवाळीत फटाके फोडू नका' सारखा कानांना सुखावेल असा प्रचार. सदर 'दावत-ए-ईद' हा उपक्रम देखील ह्याच पठडीतला वाटतोय.

भूतदया, नितिमत्ता वगैरेचा मुलामा चढवून 'प्राणिहत्या' करू नका वगैरे संदेश ऐकायला छान वाटतो. त्याला शाकाहारी, वेगन (आणि कट्टर मुस्लिम विरोधी विचारसरणीच्या) लोकांचा पाठिंबाही भरपूर मिळेल, आणि असले विचार प्रत्यक्षात आल्यास शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या गरीब शेकऱ्यांचे संभाव्य नुकसान आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती विपरीत परिणाम होईल ह्याविषयी अनभिद्न्य असलेले भोळेभाबडे लोक नकळतपणे त्याचा उस्फूर्तपणे फुकट प्रचारही करतील!

भारत सरकार आणि राज्य सरकारांच्या संयुक्त विद्यमातून चालवल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय पशुधन अभियान' (National Livestock Mission - NLM) अंतर्गत कमाल ५० लाखांपर्यंतचे अनुदान, एक कोटी पर्यंतचे कर्ज अशा योजनांचा लाभ घेऊन देशभरातल्या असंख्य लहानमोठ्या शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी/मेंढी पालनास सुरुवात केली आहे. आपल्या पशुधनाची देखभाल करताना चारा व्यवस्थापन, रोगराई-आजार, बँकेच्या कर्जाचे हप्ते अशा अनेक आव्हानांचा सामना करत, खास ईदच्या कुरबानीसाठी विक्री करून चांगला मोबदला मिळून नफ्यातोट्याचे गणित जमून येईल ह्या आशेवर वर्ष-दोन वर्ष भर मेहनतीने पोसून तयार केलेल्या बोकडांची मागणी घटली तर त्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? 'पेटा इंडिया' त्यांच्या आणि पर्यायाने बॅंकेच्या होणाऱ्या काही हजार कोटींच्या नुकसानीची भरपाई करेल का? कि नुकसानीत गेलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपला नेहमीचा आत्महत्येचा पर्याय स्वीकारायचा?

आपण लेखात म्हंटले आहे,

एकट्या पाकिस्तानमध्ये, अंदाजे ७.५ दशलक्ष प्राण्यांची, ज्याची किंमत अंदाजे $३ अब्ज (२०२३ मध्ये $४.१६ अब्ज समतुल्य) होती, २०११ मध्ये बळी दिला गेला.

मग भारतात हा आकडा किती असेल? निदान पाकिस्तानातल्या '४.१६ अब्ज डॉलर्स' ह्या आकड्यापेक्षा नक्कीच जास्त असेल! अर्थात उत्सवप्रेमी भारतीय असल्या प्रचाराला भीक न घालता दणक्यात आपापले धर्मिक सण-उत्सव साजरे करतात हि गोष्ट आपल्या प्रवाही अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक असल्याने फार काही काळजी करायचे कारण नाही, पण अर्थकारणाला अपायकारक अशा प्रचाराचा आपण एक भाग होऊ नये अशी सदिच्छा!

शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेल्या आमच्या बिरुटे सरांची 'अतिशय चांगला. स्तुत्य उपक्रम.' अशी प्रतिक्रिया वाचून खरंतर धक्का बसला होता, पण त्यांनीच दिलेला 'आपण प्रबोधनाचे काम करत राहायचे' ह्या मंत्राचे स्मरण झाल्याने हा प्रतिसाद प्रपंच.
इति लेखनसीमा.

हेच तर्कशास्त्र वापरून…
माणसाला हानिकारक तंबाखू किंवा दारू उद्योग बंद करणं कुणालाही शक्य झालं नाही. सगळ्यांना माहिती आहे, की मानवजातीला पडणारी एकूण किंमत ही त्या उद्योगात कार्यरत असलेल्या घटकांच्या आर्थिक लाभापेक्षा कैक पट जास्त असेल. या कारणासाठी सगळीकडे धूम्रपान, मद्यपान कमी व्हावे यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्था प्रयत्न करतात. त्यालाही टूलकीट म्हणावे काय? इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का?

पण मग हे मानवाला अपायकारक म्हणून सिध्द झालेले उद्योग चालूच ठेवले तर, दवाखानेही उत्तम चालतात, त्यांचे उत्पन्न वाढते, परिणामी अर्थव्यवस्थेला सतत वाढ मिळत राहते. अर्थस्य पुरुषो दास: असे महाभारतात भीष्म का कुणीतरी म्हटले आहेच.

सबब सर्व मानवजात सुखाने जगावी यासाठी अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का? हा कळीचा प्रश्न आहे.

रामचंद्र's picture

17 Jun 2024 - 6:27 pm | रामचंद्र

आपला मुद्दा तर रास्त आणि बिनतोड वाटतो.

"अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का? आणि तिला सतत वाढतच रहावे लागेल का?"
ह्या दोन प्रश्नांची 'अ' आणि 'ब' अशा दोन प्रकारे उत्तरे देता येतील त्यातले जे पटेल ते घ्यावे, चॉईस इज युअर्स... 😀

अ) पूर्णपणे शुद्धीत, वास्तवाचे भान असलेल्या आणि आधुनिक जीवनशैलीशी एकरूप झालेल्या व्यक्तीसाठी 'अर्थशास्त्रा'चा हवाला देऊन उत्तरे द्यायची झाल्यास :
१) अफाट लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशातली 'आहे रे' आणि 'नाही रे' ह्या दोन वर्गांतली सामाजिक दरी बुजवण्यासाठी, गेला बाजार ती कमी करून १००% जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा भागवून सर्व सामाजिक घटकांना एक समाधानकारक जीवनशैली मिळावी ह्यासाठी "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे!"
आणि,
२) "मानवी इच्छा अमर्याद आहेत आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली संसाधने मर्यादित आहेत." हा अर्थशास्त्रीय नियम लक्षात घेऊन, देशातल्या सर्व जनतेच्या 'अन्न', वस्त्र' आणि 'निवारा' ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर, अन्य इच्छा आणि आकांक्षा ज्या अर्थशास्त्रात 'मानवी इच्छा' (Human wants) म्हणून ओळखल्या जातात, त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती/उपलब्धता वाढवण्यासाठी संसाधनांच्या उपलब्धतेत वाढ करून त्यांच्या मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन साधत गेल्या कित्येक दशकांपासून भारताला चिकटलेला 'विकसनशील' हा स्टेटस बदलून तो 'विकसित' असा होऊन जनतेचे जीवनमान अधिक उंचावण्यासाठी "अर्थव्यवस्थेला सतत वाढतच रहावे लागेल!"

ब) 'कार्ल मार्क्स' छाप नशेची गोळी घेऊन बधिर झालेला मेंदू आणि मिटल्या डोळ्यांनी कल्पनेतल्या जगात वावरण्यातून वास्तवाचे भान सुटलेल्या व्यक्तीसाठी उत्तरे द्यायची झाल्यास :
१) "अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे का?" ह्या प्रश्नाचे एका शब्दातले, साधे सोपे उत्तर "नाही" असे आहे.
आणि,
२) मुळात संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्था वाढवण्याची नसती उठाठेव करण्याची गरजच नसल्याने, "तिला सतत वाढतच रहावे लागेल का?" ह्या प्रश्नाचे दोन शब्दांतले उत्तर "अजिबात नाही" असे आहे.

(वरील दोन्ही प्रकारची उत्तरे हि माझी अल्पमती आणि अर्थशास्त्राचे जुजबी ज्ञान ह्यावर आधारित असल्याने पटली तर घ्या, नाहीतर केराच्या टोपलीत टाका. हाय काय अन नाय काय 😀)

बाकी आपल्या प्रतिसादातील तंबाखू आणि दारूचा मुद्दा रास्त आहे, त्याबद्दल दुमत नसले तरी ते 'शौक, मौज, व्यसन' प्रकारात मोडत असल्याने त्याला आणि जगातल्या बहुसंख्य लोकांचा आहार, म्हणजे पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या अन्नाला एकच मोजपट्टी लावणे किंवा एकच तर्कशास्त्र वापरणे काही योग्य वाटत नाही!

असो, आमच्या बिरुटे सरांच्या शब्दांत सांगायचे तर "सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच." त्याला काही इलाज नाही, आणि आमचे ह.भ.प. , पपू , श्री श्री श्री मुक्तविहारी महाराज डोंबिवलीकर त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात कि, "मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत"! ह्या दोन्ही सिद्धपुरुषांच्या सिद्धवचनांवर दृढ विश्वास असल्याने अधून-मधून अशी मत-मतांतरे व्यक्त करण्यास मनोबल मिळत असते. चालायचेच, मिपा, मिपाकर आणि बिरुटे सर आपलेच आहेत!

(समाजातल्या तळागाळातील लोकांशी नाळ न तुटलेला आणि 'टूलकिट' गॅंगविषयी सावध असलेला, संवेदनशील हौशी शेतकरी)
- टर्मीनेटर.

सर,
आपण सर्वप्रथम माणसांचे वर्गीकरण केले आहे, आणि मग त्या त्या गटाच्या दृष्टिकोनातून प्रश्नाचा विचार केला आहे. असं का, ते समजलेलं नाही. अर्थशास्त्रातलं मलाही फार कळतं असं नाही, पण ज्या अर्थी त्याला शास्त्र समजलं जातं, त्याअर्थी कोण प्रश्न विचारतो, याला महत्व नाही. शास्त्र हे विचारणार्याच्या निरपेक्षच उत्तर देणार. असो.
तर जर आपण भारताचा विचार केला तर, आपली अधिक महत्वाची समस्या वाढीची आहे का वितरणाची याचा विचार करावा लागेल. आपल्याकडे दिवसाला ३००- ५०० रु मजूरी, तीही रोज नाही, मिळवणारे मनरेगाचे मजूर आहेत आणि दिवसाला ५ लाख कमावणारे सर्वोच्च न्यायालयातले वकीलही आहेत आणि ज्यांचा पैसाच त्यांच्यासाठी अहोरात्र काम करून दिवसाला करोडो रूपयांची भर घालतो असे महा-उद्योजकही आहेत. त्यांची भूक अधिक मोठ्या प्रकल्पांची, जीडीपीच्या वाढीची आहे आणि त्यांचे धोरणांवर वर्चस्व आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. तर वाढ ही त्यांना पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अर्ध्यापासून आज ३ ट्रिलीयन वगैरे झाली तरी मनरेगाचे मजूर प्रचंड प्रमाणात आहेतच. त्यांच्यापर्यंत समृध्दी या वाढीच्या प्रमाणात पोहोचलेली नाहीच. आज जे देश विकसित आहेत, तिथे समाजात एवढी टोकाची विषमता नाही, हे तर सहजच दिसते. लोकांना आता समजत आहे की मोठ्या चमकदार घोषणा व मेगा प्रकल्प करून आपल्याला काही मिळत नाही, रोजचा संघर्ष काही कमी होत नाही.

त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.

कांदा लिंबू's picture

18 Jun 2024 - 4:27 am | कांदा लिंबू

त्यामुळे देशाने उगीच प्रचंड वाढ (खरं तर सूज) करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी संपत्तीचे वितरण चांगले होण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे मला वाटते. मला तरी आपल्यासारखे वर्गीकरण करून या प्रश्नाकडे बघण्याची गरज वाटली नाही.

म्हणजे सोप्या भाषेत मध्यमवर्गीयांकडून, त्यांची पांढरी संपत्ती - घरे, वाहने, सोनेनाणे, एफडी वगैरे काढून घेऊन ती तथाकथित दारिद्र्यरेषेखालील लोकांना देऊन टाकणे!

"संपत्तीचे वितरण" याचा याहून वेगळा काही अर्थ असेल तर तो आम्हा मिपामरांना समजेल असा स्पष्ट करून सांगावा.

जो झोपला आहे त्याला जागे करता येतं पण ज्याने झोपेचे सोंग घेतले आहे त्याला कसे जागे करणार?
हा जोक आधीच येऊन गेला आहे.
तुम्ही पण "यमे यंटायर यिकनामिक्ष" केलेले दिसतंय.

स्वधर्म's picture

18 Jun 2024 - 2:38 pm | स्वधर्म

मध्यमवर्गियांची संपत्ती काढून वगैरे मी कुठेही लिहिले नाही. महाउद्योजक असे म्हटले होते. त्यांना बॅंकांनी हेअरकटच्या नावाखाली प्रचंड कर्जमाफी दिलेली आहे. विकासाचे नांव घेऊन प्रकल्पाच्या जमिनी नगण्य भावाने आंदण दिल्या आहेत.
मी लिहिलेले महाउद्योजक वगैरे अत्यंत सोईस्कररित्या दुर्लक्षित करून मध्यमवर्गीय असा शब्द घुसडण्याला काय म्हणणार? खरंच झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही.

चौकस२१२'s picture

18 Jun 2024 - 7:24 pm | चौकस२१२

प्रत्येक महाउद्योजक वाईटच असतो असे आहे का?
का मुळातच खाजगी काहीच नसावे?

स्वधर्म's picture

18 Jun 2024 - 10:24 pm | स्वधर्म

त्यावर काय बोलणार? आपल्याला न पटणारा मुद्दा आला, की तो एकदम ताणून चुकीचा दाखवता येतो. ही एक सामान्य युक्ती आहे.
पण गोरगरीब जनतेच्या तुलनेत महाउद्योजक हे सरकारवर आपल्याला हवे तसे धोरण बनवण्यासाठी अधिक प्रभाव टाकू शकतात, हे तर सहज दिसून येते. ही वस्तुस्थिती आपण नाकारता आहात का? हे सांगा.
अगदी साधी उदाहरणं आहेत हो, फक्त पहायला पाहिजे. मागे त्या विश्वास पाटील या लेखक अधिकार्याने निवृत्तीच्या शेवटच्या महिन्यात ३५ एक प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आयुष्यभराच्या कार्यक्षमतेपेक्षा ५० पट कार्यक्षमता दाखवली होती त्याने. अंगणवाडी सेविका मात्र १००० - ५०० रूपयांची वाढ मागण्यासाठी वर्षभर आंदोलने करत आहेत. जाईल तिकडे सामान्य माणूस नाडला जातो, आणि बड्या धेंडांची काम चुटकीसरशी होतात, याचा अनुभव आला नाही का तुंम्हाला कधीच?

स्वधर्म's picture

18 Jun 2024 - 3:22 pm | स्वधर्म

ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांनी नंदा खरे यांचा २०१७ मधला हा लेख जरूर वाचावा.
https://www.loksatta.com/lokrang/lekha/violence-after-conviction-of-baba...

जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.

जगाची इमानदार आणि काफिर अशी विभागणी करणारा आणि काफिरांना अस्तित्वहक्क नाकारणारा "मुसलमान हा धर्म मूळचा समतावादी" असे म्हणणारा लेख मिपावर लिंक देण्याच्या लायकीचा आहे का?

स्वधर्म's picture

18 Jun 2024 - 10:32 pm | स्वधर्म

मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात? लेखाचा मूळ विषय काय? संदर्भ काय?
बाकी ज्यांना खुल्या मनाने शास्त्रीय दृष्ट्या विषमतेकडे पहायचे आहे, त्यांच्यासाठीच तो लेख दिला होता. त्यामुळे, तुंम्ही द्या सोडून विषय सर. आपल्याला कसं अगदी सगळं सकारात्मकच हवं. सत्याचा त्याच्याशी संबंध नसला तरी चालेल.

कांदा लिंबू's picture

19 Jun 2024 - 5:04 am | कांदा लिंबू

मूळ मुद्दा अडचणीचा ठरतोय म्हटल्यावर हिंदू-मुसलमान करण्यावर उतरलात?

हे तुम्ही तो लेख लिहिणाऱ्यांना म्हणताय ना? बरोबर आहे, ते त्यांना लागू आहे.

यावरूनच कळून येते लेखात काय कन्टेन्ट असणार आहे.

जातिव्यवस्था ही आपली खासियत आहे. मुळात समतावादी असणारे ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मही भारतात जातींमध्ये वाटले जाताना दिसतात.>>>
कारण हे सगळे मुळचे हिंदूच आहेत.

इथे केवळ हानी मानवाची न होता प्राण्यांची होते आहे म्हणून टूलकीट म्हणावे का?
येथे खान्यासाठी प्राण्यांची हत्या होते आहे , हे तर नेहमीच होते मग ते सणा मुळे असो किंवा इतर दिवशी ,, फरक काय?

आग्या१९९०'s picture

17 Jun 2024 - 6:02 pm | आग्या१९९०

गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याचेही आकडे येऊ द्या. उगाच भाकड गाई सांभाळण्यावर शेतकऱ्यांचा खर्च होतो.

टर्मीनेटर's picture

17 Jun 2024 - 9:59 pm | टर्मीनेटर

गोवंश हत्याबंदिमुळे आपल्या शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याविषयीची निश्चित आकडेवारी मलातरी कुठे दिसली नाही, पण ह्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गायी आणि निरुपयोगी बैल मोकाट सोडून दिल्याने ही मोकाट गुरेढोरे गायपट्ट्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून त्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्याच्या अनेक बातम्या काहीवर्षांपूर्वी वाचल्या होत्या. २०२२ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने ह्या मुद्द्याचे भांडवल करून आपल्या प्रचारात त्यावरून प्रचंड काहुरही माजवले होते. पण तरी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांचे सरकार बहुमताने निवडून आल्याने हा मुद्दा निष्प्रभ ठरला होता असे म्हणता येईल.

बाकी भाकड गायींमुळे शेतकऱ्यांचे किती आर्थिक नुकसान झाले ह्याची कल्पना नसली तरी अशा गायी, बैलांचा आनंदाने स्वीकार करून कित्येक गोशाळांनी त्यांचा सांभाळ करतानाच त्यांच्या मलमूत्रापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु करून स्वतःच्या आणि आसपासच्या अनेक गरीब कुटुंबांची स्वयंपाकासाठीच्या इंधनाची गरज भागवल्याचे, ONGC शी केलेल्या सहकार्य करारातून CNG निर्मिती सुरु केल्याचे तसेच वीजनिर्मिती प्रकल्प, बायोगॅस स्लरी, गायीच्या शेणापासून कंपोस्ट, गांडूळ खत अशी सैंद्रीय खते आणि धूप, उदबत्ती व रंग अशा अनेक गोष्टींचे उत्पादन आणि विक्री असा फायदेशीर व्यवसाय आणि त्याद्वारे रोजगार निर्माण केल्याच्या यशोगाथा वाचल्या आहेत, असे कित्येक प्रेरणादायी व्हिडीओज युट्युबवरही पाहायला मिळतात. समस्येत संधी शोधून सेवाभावी कार्यातूनही आर्थिक लाभ मिळू शकतो हे दाखवणाऱ्या अशा गोशाळांच्या सर्जनशीलतेस सलाम!
आणि धागाविषय भरकटवणे हा उद्देश नसला तरी माझ्या दोन प्रतिसादांतून थोडे अवांतर झाले असल्याने धागा लेखकाची मनापासून क्षमा मागतो 🙏

चौकस२१२'s picture

18 Jun 2024 - 4:36 pm | चौकस२१२

लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ?
मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य )
हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर
असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर )

भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ...

लै शेतकऱ्यांची काळजी तुहे ?
मी, अनेक प्राण्याबरोबर गोमास खालेल्ला हिंदू असल्यामुळे जिथे गोमांसावर बंदी नाही तिथे खायला माझि काहीच हरकत नसते... ( उदहारण गोआ राज्य )
हरकत ह्याला आहे कि हिंदूनां मुद्डमून डिवचण्या साठी "गोमास खाल्ले तर काय बिघडते" अशी टूलकिट बाजी करणाऱ्यवर
असले प्रश्न डुकराच्या मसबद्दल शांतताप्रिय लोकांना विचारावे ( हिंमत असेल तर )

भूतदया दाखवयाची तर हलाल ना खाता झटका तरी खा .. अरे पण हलाल बंद केले तर हलाल इकॉनॉमी ची वाट लागेल आणि काही दयाळू /शांतताप्रिय लोकांच्या पोटावर पाय येईल ना..... अर्रे नको ते पाप ,,, अब्दुल आन रे ताजे हलाल चाप ...

एकूण खालेलं प्राणी
मगर, ससा, शहामृग, हरीण , बैल / गाय
कबुतर , तितर ( क्वेल ) टर्की ,बेडूक
शन्ख , ईल , साप ( बहुतेक सापच आठवत नाही ४ पेग झाले होते चीन मध्ये तेवहा )
ऑकटोपस, तिसऱ्या , लॉंगस्टीन , कच्चे मासे , कॅट फिश , कलामारी इत्यादी याशिवाय मेंढा / बकरी . बोकड / शेळी / डुक्कर हे आहेच

सुक्या's picture

18 Jun 2024 - 9:55 pm | सुक्या

एकूण खालेलं प्राणी>>
आमचा दंडवत स्वीकारावा. मला अजुन किती पल्ला गाठायचा आहे याची कल्पना आली :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2024 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद वाचायला सुरुवात केली आणि पुढे ते टुलकिट वगैरे वाचलं आणि पुढे काही वाचू नये असं ठरवलं. पण, प्रतिसाद चाळता चाळता तळटीपेकडे येतांना आमची आठवण झाल्यामुळे दोन शब्द लिहावे वाटले. बाकी, सार्वजनिक चर्चेची संस्थळे असल्यामुळे मतमतांतरे असायचीच. स्वागत.

कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, कोणाला मजुरांची आंदोलन बोगस वाटतात, कोणाला विद्यार्थ्यांची आंदोलने बोगस वाटतात, कोणाला अंगणवाडी स्त्रियांची आंदोलने बोगस वाटतात, धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, गरिब, शोषित पिडित, हक्कासाठी लढणा-या लोकांची आंदोलने काहींना बोगस वाटू शकतात. अगदी शांततापूर्ण आणि जगाच्या प्रगतीच्या वाटेत देश अगदी विकासाच्या अग्रक्रमात भारत देश अगदी टॉपवर असतांना अशी ही सगळी आंदोलनजीवी जनता देशाच्या प्रगतीत खोडा घालणारी, अराजकता माजवणारी आहे असेही वाटू शकतं. टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं.

आपल्याबद्दल लिहित नाही. पण, अशा विचार करणा-या लोकांचं हल्ली अजिबात आश्चर्य वाटत नाही. अशा, संवेदनहीन जनतेचं, किंवा अशा संवेदना गमावलेल्या लोकांचा समुहाचा, वृत्तीचा, विचारांचा खरंच तळागाळातील लोकांशी काही थेट संबंध येत असेल याची अजिबात शक्यता वाटत नाही. आणि असा कोणताही संबंध येत नसल्यामुळे अशा समुहातील लोकांना हे सगळं खोटं नाटं वाटू शकतं.

दिवाळीत फटाके फोडणा-यांमुळे बिचा-या कंपनीचं किती नुकसान होत असेल. फटाक्यामधील दारु-गोळा भरणा-या किती तरी मजूरांवर उपासमारीची वेळ येत असेल. सालं ते फटाक्याचा आवाजात हा विचार आलाच नाही. देशी-विषारी दारु बनविणा-या आणि त्यामुळे मरण पावणा-या लोकांपेक्षा त्या हातभट्टीचं किती आर्थिक नुकसान होतं हा विचार मनात आलाच नाही. तद्वतच, देशभरातील हजारो लाखो शेतकरी 'कुरबानीच्या' निमित्ताने बोकडांचे उत्पन्न घेतात आणि त्यामुळे होणा-या करोडो अब्जोंनी नुकसान होणा-या शेतक-यांचा विचार आमच्यासारख्या शेतक-यांविषयी कळवळा असणा-याच्यां मनात येऊ नये, हे फार दु:खदायक आहे.

आम्ही सालं, ते विदा नसल्यामुळे शेळीपालन म्हणजे फ़क्त जोडधंडा, रोजगार, मांस, दूध, खत, वगैरे इतकंच समजत होतो. पण, 'कुरबानीमुळे' होणारं देशाचं आणि शेतक-यांचं आर्थिक नुकसान लक्षात आलंच नाही, लक्षात आणून दिल्याबद्दल किती आभार मानू....! ;)

' कुरबानी कुरबानी'

-दिलीप बिरुटे

भागो's picture

17 Jun 2024 - 8:30 pm | भागो

सर, हा घ्या माझा +१

प्रसाद गोडबोले's picture

18 Jun 2024 - 9:57 am | प्रसाद गोडबोले

संवेदना ई.व्ही.एम. मशीन वर मोजतात का हो सर ?
कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. =))))

दुत्त दुत्त, ह्या उजव्या विचारसरणीच्या लोकांन्ना हार्टच नसतं मुळी =))))

चौकस२१२'s picture

18 Jun 2024 - 7:06 pm | चौकस२१२

कारण तुमच्या प्रतिसादातुन केवळ आमच्या संवेदना खर्‍या अन इतरांच्या खोट्या असा काहीसा सुर दिसुन येत आहे. ,,,,, ++++

कोणाला शेतक-यांचे आंदोलन बोगस वाटतं, प्रामाणिक असते तर शीख धर्माचे ध्वज नसते आणि सर्व राज्यात तेवढेच जोर लावून असते पंजाब आणि हरयाणात का?
धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांची आंदोलने बोगस वाटतात, आंदोलनाच मूळ हेतू केवळ विरोधात विरोध दिस ला म्हणून , भारताचं ऊर्जा गरजेवर काही उत्तर नाही ,, ( अरुंधती रॉय सारखया महान विचारवंतांना एकदा भर सभेत हा प्रश्न विचारला मी कि तुमचे आंदोलन विस्थापितांची नुकसान भरपाई व्हावी रस्ताही आह की उद्योग वाढूच नयेत या साठी आहे ?
टूलकिटचा वगैरेचा भाग वाटू शकतं. हो कधी कधी वाटते ... का वाटू नये ,

अर्थात या प्रतिसादवार प्रोफेसर " ऑस्ट्रेल्यात आंदोलने होतात का हो असले फालतू प्रश्न विचारतील यात शंका नाहीच
संवेदना गमावलेल्या ओह ओके तर प्रश्न विचारला कि संवेदना गमावलेला का
बाकी कुर्बानी कुर्बानी म्हणाल तर आमचच्या डोक्यात एकाच ती म्हणजे झीनत बेगम ची

कांदा लिंबू's picture

17 Jun 2024 - 4:31 pm | कांदा लिंबू

१.

तुम्ही दिलेले विकी पान म्हणते -

... स्वर्गातून एक मेंढा देवदूत गॅब्रिएलने संदेष्टा अब्राहमला त्याच्या मुलाऐवजी कत्तल करण्यासाठी देऊ केला.

तुम्ही दिलेले पेटा चे पान म्हणते -

इस्लाम प्राण्यांबद्धल दयाळूपणा शिकवतो.
Islam Teaches Kindness to Animals

दोन्ही विधाने १८० अंशात परस्परविरोधी आहेत. काहीतरी एक निश्चित करा मग पुढे बोलता येईल.

२.

भारतीय प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेने नागरिकांना प्रार्थना स्वातंत्र्य दिलेले आहे. इस्लाममध्ये जर मेंढा / बोकड आदी प्राण्यांची कत्तल करण्याची आज्ञा दिलेली असेल तर त्याचे पालन करण्यात बेकायदेशीर काय आहे?

मारवा's picture

17 Jun 2024 - 6:59 pm | मारवा

1-सर्वप्रथम तुम्ही जी विसंगती दाखवलेली आहे ती पूर्णपणे मान्य आहे
2-प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही.
3-मुळात सर्व धर्म हे माणसांनी स्वतःसाठी बनवलेली साधने आहेत त्याचप्रमाणे सर्व तत्त्वज्ञाने सर्व विचार सरणी या मानवनिर्मित आणि मानवाच्या जगण्यास सुसह्य करण्यासाठी विकसित करण्यासाठी आहे
4-कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे
5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे.
6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ?
7-हिंदू धर्मातही चाळणी लावण्यासाठी .कलीवर्ज्य सारखी अधिकृत व्यवस्था होती.
8-कुठला भाग कालबाह्य कुठला काल सुसंगत यात मतभेद अर्थातच राहणार राहतील पण प्रक्रियेला चालू ठेवण्यात अडचण काय ,?
9-मतभेद तर उलट स्वागतारहच आहेत. त्यानेच पुढची दिशा स्पष्ट होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2024 - 12:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

20 Jun 2024 - 7:45 pm | सुबोध खरे

प्रत्येक धर्मात अशा विसंगती मुबलक प्रमाणात आहे इस्लाम त्त्याला अपवाद नाही.

हे विधान भयानक पाखंडी आहे आणि असे विधान केल्यास इस्लामी देशात आपल्याला केवळ मृत्युदंड एवढीच शिक्षा आहे.

Islam means “submission to the will of God”

इस्लाम चा अर्थच असा आहे कि अल्लाच्या इच्छेपुढे समर्पण.

आता अल्ला ची इच्छा काय आहे याचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त कर्मठ आणि मागासलेल्या मुल्ला मौलवींच्या हातात असल्यामुळे त्या धर्मात कोणतीही सुधारणा संभवतच नाही. यामुळे त्या धर्मात गेल्या १४०० वर्षात फारशा सुधारणा झालेल्या नाहीत आणि होण्याची शक्यता पण नगण्य आहे.

कारण कुराण हे सार्वकालिक सत्य च आहे आणि त्यात एक अक्षराचाही बदल संभवत नाही अशीच इस्लामिक जगताची भावना आहे.

आम्ही म्हणू तोच आणि तेवढाच धर्म असे असल्यामुळे इस्लामच्या इतर शाखांबरोबर सुद्धा त्यांचा सलोखा नाहीच. सुन्नी लोक तर अहमदिया किंवा बहाई अथवा बोहरी या लोकांना मुसलमान मानतच नाहीत आणि त्यांची सर्रास कत्तल करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

शिया आणि सुन्नी यातील संघर्ष कायम चालूच असतो

आणि यामुळेच जगभर सर्वच धर्माबरोबर त्यांचे कायमच संघर्ष होत आलेले आहेत.

४८ इस्लामिक देशांपैकी कोणत्याही इस्लामी देशात इतर धर्माला थारा नाहीच.

आणि इस्लामला लोकशाही मान्यच नाही.

त्यामुळे आपण लिहिलेले खालील मुद्दे बादच होतात

४) कालानुरूप जेव्हा एखादा जुना धर्म किंवा जुनी विचारसरणी जेव्हा अनुपयुक्त होऊ लागते तेव्हा त्या त्या धर्मातील जो जो त्याज्य असा भाग आहे तो तो वगळून जो जो चांगला भाग आहे त्याला पूज्य मानत पुढे जात राहणे हे माणसांसाठी उपयुक्तच नव्हे तर श्रेयसकरही आहे.

कुराण मध्ये काहीही त्याज्य नाही त्यामुळे कालबाह्य भाग टाकून देणे हे सर्वथा अशक्य आहे

5-म्हणून जेव्हा दोन तत्वे परस्पर विरोधी एकाच धर्मात आहेत तेव्हा त्यातील पूज्य निवडून कालबाह्य भाग टाकून देणे योग्य आहे.

6-आता कोणी त्यातील काल सुसंगत असा भाग वेगळा करून त्याचे प्रमोशन करून कालबाह्य भाग सोडत आहे तर त्याचे स्वागत करायला हवे यात अडचण काय आहे ?

कुराण मध्ये विसंगती नाहीच कारण ती अल्ला चीच इच्छा आहे आणि त्यात कोणताही बदल संभवतच नाही.

कांदा लिंबू's picture

17 Jun 2024 - 4:39 pm | कांदा लिंबू

खरोखरच स्तुत्य उपक्रम. सर्वच धर्मांमधल्या पशुहत्या बंद व्हाव्यात.

हा उपक्रम येथेच न थांबता जेथे जेथे प्राण्यांचा बळी दिला जातो त्या ठिकाणी आणि त्या प्रसंगी राबवला जावा. एकट्या पुणे शहरात गटारी अमावस्या आणि अजून इतर तीन दिवसांना प्रचंड प्राणी हत्या केली जाते आणि वर त्याच्या अतिशय निर्लज्ज बातम्या दिल्या जातात जसं की अमुक इतके टन मटण, चिकन, आणि मासळी खवय्या पुणेकरांकडून फस्त.

Islam Teaches Kindness to Animals

पिटाचे आवाहन इस्लामचे पालन करणाऱ्यांना आहे हे तिथे स्पष्ट लिहिले आहे; त्यात काफिरांच्या प्रार्थनापद्धतींना ओढण्याचे कारण नाही.

पान वाचून पहा, "इस्लाम सांगतो म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश आहे; "माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा" असा संदेश नाही. म्हणून हे सारे पिटाचे (खरेखोटे जे काही असेल ते) प्रकरण काफिरांना लागू नाही.

त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे.
जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही.
जे करत आहे त्यांची मूळ प्रेरणाच हे करण्यामागची धर्म आहे तर अशा व्यक्तींना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच त्यांच्याच धर्मातील विरोधी तत्वे दाखवून देणे हे एकदम समर्पक आणि सुयोग्य असे आहे

कांदा लिंबू's picture

18 Jun 2024 - 4:33 am | कांदा लिंबू

त्यांनी माणुसकी म्हणून प्राणी हत्या थांबवा या ऐवजी इस्लामचा दाखला देऊन आव्हान केले आहे याचे कारण ते आव्हानच मुळात जे इस्लाम मानतात त्यांनाच केलेले आहे.

म्हणजे जे इस्लाम मानतात ते, "माणुसकी म्हणून अमुक करा" या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत की काय? काय म्हणताय?

जे मुळातच नास्तिक आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही.

"जे मुळातच काफिर आहेत ते बकरी ईदला असे करणार नाही." असे म्हणायचं आहे का तुम्हाला? नास्तिक ही हिंदू धर्म विचारातील एक विशिष्ट कल्पना आहे. सदर संदर्भात तिचा काही संबंध नाही.

मारवा's picture

17 Jun 2024 - 4:42 pm | मारवा

इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो

कांदा लिंबू's picture

17 Jun 2024 - 4:59 pm | कांदा लिंबू

इथे कायद्या चा कोणीच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुमचा क्रमांक दोनचा मुद्दा अप्रस्तुत ठरतो

१.

मान्य आहे. मागे घेतो.

पण इतर कुणाला फारश्या त्रासदायक न ठरणाऱ्या अश्या एखाद्याच्या प्रार्थना पद्धतीत बदल करण्याचे आवाहन नैतिकदृष्ट्या ठीक आहे का?

---

कोणते आवाहन ऐकून कुणी मांसाहार करणे थांबवत नाही.

पिटाने, त्यांना खरंच भूतदया असेल तर हलाल पद्धतीने प्राणी मारण्याऐवजी झटका पद्धतीने प्राणी मारले जावेत याचा पुरस्कार करावा, ते जास्त व्यावहारिक + नैतिक होईल.

२.

पहिल्या मुद्यावरही वाट पाहतो.

रात्रीचे चांदणे's picture

17 Jun 2024 - 8:07 pm | रात्रीचे चांदणे

एक सुंदर उपक्रम सुरु केलेला आहे ज्याचे नाव आहे दावत-ए-ईद यात त्यांनी सुटका केलेल्या बकऱ्या आणुन त्यांना दावतसाठी आमंत्रण दिलेले आहे
हे पेटा वाले बक्र्यांची कुठून सुटका करणार आहेत?

कांदा लिंबू's picture

18 Jun 2024 - 4:35 am | कांदा लिंबू

हे पेटा वाले बक्र्यांची कुठून सुटका करणार आहेत?

प्रश्न आवडला हं!

प्रसाद गोडबोले's picture

18 Jun 2024 - 9:53 am | प्रसाद गोडबोले

बकरी ईद ला कुर्बानी व्हायलाच पाहिजे. खुद्द हमीदभाई ह्यांन्नी सांगुन ठेवलंय !

https://www.misalpav.com/node/37392

a

नठ्यारा's picture

18 Jun 2024 - 1:25 pm | नठ्यारा

लोकहो,

इस्लामिक कट्टरपणास पर्याय उपलब्ध करवून दिल्याबद्दल पेटावाल्यांचं अभिनंदन. अब्राहमने मेंढा मारला म्हणून प्रत्येक मुसलमानाने मारलाच पाहिजे, हा कुठला न्याय? हा अरबस्थानात वगैरे ठीके. भारतात कशाला पाहिजे?

त्यातूनही बकऱ्यांची संख्या अमाप वाढली तर इतर उपाय काढता येतील.

या बाबतीत जननीच्या उत्सवाचं उदाहरण चपखल आहे. जननीचा डोंगर हा कोकण रेलवेवरील कोलाडच्या जवळ आहे. ही देवी स्थानिकांचे स्थानदैवत व मुंबईतील काही कुटुंबांचे कुळदैवत आहे. दर वर्षी माघपौर्णिमेस गडावर उत्सव भरतो. तीनेक दिवस चालतो. हे खाजगी देवस्थान असल्याने त्याचा फारसा बोलबाला होत नाही. दरवर्षी एखाद दोन बोकड बळी दिले जातात. हे साधारणत: कोण्या भक्ताने प्रायोजित केलेले असतात. एके वर्षी बरेच प्रायोजक उत्सवास आल्याने प्रत्येकाने बोकड अर्पण केला. त्यामुळे माणसे कमी आणि बोकड फार अशी परिस्थिती उद्भवली. तीनचारच्या जागी बारातेरा बोकड कापले गेले. गावकरी तरी किती खाऊन खाऊन किती खाणार. बोकडाचं मटण हा देवीचा प्रसाद असल्याने फेकून देता येत नव्हता. मग शेवटी परतणाऱ्या भक्तांना डब्यांत भरून दिला. गडावर जेवायची सोय नसल्याने प्रत्येक भक्तकुटुंबे खाणं वा शिधा डब्यातून आणतात. त्यामुळे डब्यांची वानवा नव्हती. तर असा हा प्रकार झाला. तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं.

मोठ्या प्रमाणावर हिंसा टाळलेली बरी. त्यानुसार ईदेस मौलवीने एक बोकड बळी चढवावा. सगळ्या मुस्लिमांनी बळी द्यायची गरज नाही.

-नाठाळ नठ्या

तेव्हापासून माणसं बघून तितकेच बोकड कापायचं ठरलं.
एवढा सुजाणपणा असले तर ना... बदल होऊच कसा शकतो "पाक" ग्रंथात लिहिलंय ना मग बदलायाच नाही .. चालुद्या
मुस्लिम सत्यशोधक समाजाचं दलवाईंना केवडः त्रास सोसावा लागला...

नठ्यारा's picture

18 Jun 2024 - 10:40 pm | नठ्यारा

चौकस२१२,

माझ्या माहितीप्रमाणे बोकड बळी द्यायची प्रथा कुराणातली नाही. पण याबाबत चूकभूल देणेघेणे. पण अर्थात तुमचा कट्टरपणाचा मुद्दा वैध आहेच. एरव्ही हा.पा.ला फतवे काढणारे मुल्लामौलवी कधी अनावश्यक हत्येविरोधात फतवे काढतात का? आज गोहत्येच्या विरोधात फतवा काढला तर हिंदूमुस्लीम तेढ कितीतरी कमी होईल. पण लक्षांत कोण घेतो.

-नाठाळ नठ्या

बकरी ईदनिमित्त मुस्लिम समुदायात बकऱ्यांची कत्तल केली जाते. परंतु, जैन धर्मातील एका तरुणाने तब्बल १२४ बकऱ्यांचा जीव वाचवला आहे. यासाठी त्याने मुस्लिम बांधवांचा पेहराव केला होता. एवढे नव्हे तर १२४ बकरे खरेदी करण्याकरता त्यांनी १५ लाखांचा निधीही गोळा केला. जामा मशिदीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या चांदणी चौकातील मंदिराच्या प्रांगणात या बकऱ्यांना ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भातील सविस्तर वृत्त दि प्रिंटने दिलं आहे.
ही बातमी

टर्मीनेटर's picture

19 Jun 2024 - 8:43 pm | टर्मीनेटर

मुटके साहेब बातमी वाचली,
आपल्या लेख/प्रतिसादावर प्रतिसाद/उपप्रतिसाद द्यायला गेलो तर तो इतका मेगाबायटी होतो कि स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित करण्याची पाळी येते. मागे 'युट्युब'च्या बाबतीत असा अनुभव पहिल्यांदा आला होता, आणि ह्या धाग्यावरच्या आपल्या प्रतिसादातील बातमीच्या निमित्ताने आज दुसऱ्यांदा तसा अनुभव आला आहे 😀

असो, सदर बातमी वाचताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि 'व्यावहारिक चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला तर तो बराच लांबल्याने "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" ह्या शीर्षकाने स्वत्रंत लेख म्हणून प्रकाशित केला आहे.

लेखनाला विषय पुरवल्या बद्दल आपले आभार, आणि ध्यानीमनी नसताना अचानक एक लेख पाडायला लावलात त्यासाठी आपला तीव्र णिषेध 😂

धर्मराजमुटके's picture

20 Jun 2024 - 6:58 pm | धर्मराजमुटके

बहुलेखप्रसवा भव !
लेख वाचून तिकडे प्रतिसाद देतो :)

रात्रीचे चांदणे's picture

19 Jun 2024 - 6:45 am | रात्रीचे चांदणे

मुस्लिम व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले असले तरीही धर्मात ढवळा ढवळ केली म्हणून त्या जैन मुलाचा गळा चिरला नाही म्हणजे बर होईल.

भागो's picture

20 Jun 2024 - 8:56 am | भागो

About 900,000 cows are slaughtered every day. If every cow was 2 meters long, and they all walked right behind each other, this line of cows would stretch for 1800 kilometers.1 This represents the number of cows slaughtered every day.
For chickens, the daily count is extremely large – 202 million chickens every day. To comprehend the scale, it is better to bring it down to the average minute: 140,000 chickens are slaughtered every minute.
certainly, hundreds of millions of fish are killed every day.
बकरे, डुकरे , बदके ह्यांची पण संख्या प्रचंड आहे.
तेव्हा उगाचच ईदच्या बळी बकर्यांच्या नावाने नक्राश्रू ढाळू नका.

सुबोध खरे's picture

20 Jun 2024 - 10:43 am | सुबोध खरे

मूळ मुद्दा बकर- ईद बद्दल नसून फुरोगाम्यांच्या दांभिकपणा बद्दल आहे जे केवळ हिंदू सणांबद्दल गरळ ओकताना दिसतात. उदा कोरडी होळी खेळा, फटाकेमुक्त दिवाळी असावी.

पण मुसलमान लोकांच्या सणाबाबत काही बोलण्याची हिम्मत दाखवत नाहीत.

यांचा दांभिकपणा म्हणजे लिटरला पाच किमी जाणाऱ्या गाडीतून ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मोर्चाला जातात तसा आहे.

कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती.

The Bombay High Court on Thursday said that it would not permit unregulated or unmonitored slaughter of animals anywhere in Maharashtra and that hygiene and sanitation were important.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/bombay-hc-slaughter-anim...

हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.

बाकी कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.

मतांसाठी मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.

येथे मला लष्करातील शिस्तीची आठवण येते. तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2024 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुर्बानी द्यायला हरकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी घाण, रक्त, मांस यांचा चिखल होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.

सहमत.

.हीच गोष्ट देवस्थानांबाबत आहे जेथे प्राणी बळी दिले जातात त्यावर पण बंदी आणलीच पाहिजे.

सहमत.

कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपल्या मुळे सार्वजनिक ठिकाणी सामान्य माणसाला त्रास होऊ नये इतकी मूलभूत काळजी घेतली गेलीच पाहिजे.

सहमत.

मतांसाठी ( हिंदू असो की ) मुस्लिम लांगुलचालन होऊ नये हे जितके सत्य आहे तितकेच ते हिंदू सणामध्ये गैरप्रकार होऊ नये हि काळजी घेतली पाहीजे. मग तो गणेशोत्सवात डी जे लावणे असो कि मशिदींवरून बांग देणे असो.

सहमत.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

20 Jun 2024 - 12:05 pm | गवि

डोळे पाणावले.

टर्मीनेटर's picture

20 Jun 2024 - 12:25 pm | टर्मीनेटर

माझे सुद्धा 😂
एकदा बाहेर डोकाउन आलो सुर्य आज कुठल्या दिशेला उगवलाय ते पहायला, पण ढगाळ वतावरणामुळे तो दिसलाच नाही 😀

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2024 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डोळे पाणावले.

अरे सुधरा रे.... देशाची अर्थव्यवस्था जर सुधारायची असेल तर, कोंबड्या, मासे, खेकडे, कोळंबी, आणि इतर जीव खाण्यास शास्त्रात ''जीवो जीवस्य जीवनम्'' चा संदर्भ घेऊन काही आड़काठी नसली तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.

-दिलीप बिरुटे

समजा गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2024 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपाच्या हातची कोळंबी किंवा पापलेट फ्राय असेल तरी ते सोडावे का?

हे राम. गणपाच्या हातच्या कोलंबी आणि पापलेट असतील तर, अगोदर पानात हे सर्व वाढून घ्यायचे. मांडी घालून बसायचे. दोन्ही हात जोडायचे. डोळे मिटायचे. ‘‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’. असे म्हणून जेवणास सुरुवात करायची. जेवण हे यज्ञासारखेच पवित्र आणि अग्नी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे आहे असे समजून खाल्ले की चालते.

-दिलीप बिरुटे

तरी केवळ प्रोटीन्स मिळतात म्हणून खान-पान मर्यादित असले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे.

ह्यातल्या 'खान' बद्दल १०००% सहमत आहे पण 'पान?'... No way 😂

टर्मीनेटर's picture

20 Jun 2024 - 11:49 am | टर्मीनेटर

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे!

"मुंबई उच्च न्यायालयाने मागे कत्तलखाने सोडून इतर ठिकाणी प्राण्यांची कत्तल करण्यास बंदी घातली होती."

हा निर्णय खूप आधीच यायला हवा होता, पण ठीक आहे... 'देर आये, दुरुस्त आये' म्हणायचे, अजून काय!
पूर्वी मुलुंडच्या 'वोक्हार्ट' (आताचे - फोर्टिस) हॉस्पिटलच्या गच्चीवर त्याचे संस्थापक,मालक, चेअरमन असलेल्या 'हबील खोराकीवाला' ह्यांनी जाहीररीत्या बोकडाची कुरबानी दिली होती आणि हा तमाशा बघायला बरीच गर्दी गोळा झाली होती. (असे कृत्य त्यांनी अनेकदा केले होते म्हणतात) असला प्रकार कोणीही केला असता तरी तो निंदनीयच आहे, पण हबील खोराकीवालांसारख्या उच्च विद्याविभूषित, अब्जाधीश, नामांकित व्यावसायिक व्यक्तीने केलेले हे कृत्य केवळ निंदनीयच नाही तर त्यांच्या प्रतिमेला अशोभनीयही होते!

रामचंद्र's picture

20 Jun 2024 - 12:58 pm | रामचंद्र

<तेथे मंदिरात लावलेली भजने ५० मीटरच्या पुढे ऐकू येऊ नयेत हा निर्बंध काटेकोरपणे पल्ला जातो तसेच मशिदीवरून भोंगे लावून बांग दिली जात नाही. मिरवणूक मर्यादित कालावधीत "डी जे" शिवायच होतात. मग ती मोहरम ची असो कि गणेशोत्सव वा अय्यप्पाची असो.>

यात जर कुणाच्याही भावना न दुखावता लोकमान्य पद्धतीने धार्मिक परंपरांचे पालन होत असेल तर इतरत्रही याचे पालन व्हायला काय अडचण आहे? सर्वांच्याच मनासारखं पण त्रास (फारसा) कुणालाच नाही!

यात जर कुणाच्याही भावना न दुखावता>>>मग त्यात काय मजा राहिलि? अहो भावना दुखावण्यासाठी तर सारा खटाटोप.

रामचंद्र's picture

20 Jun 2024 - 4:23 pm | रामचंद्र

मग सुसंस्कृत राष्ट्र आणि सुजाण समाज निर्माण होण्याची अपेक्षाही करू नये.

श्री रामचन्द्र कृपालु भजुमन
हरण भवभय दारुणं ।
सर, माझ्या प्रतिसादाचा आशय लक्षात आला असावा असे मी समजतो.

रामचंद्र's picture

20 Jun 2024 - 6:00 pm | रामचंद्र

अहो, दोन्ही पक्ष आपल्याकडून त्रास न होण्याची भूमिका घ्यायला तयार नसतात म्हणून मी तसं म्हटलं... पण अशा आडमुठ्या भूमिकेमुळे पीडित लोक दोन्ही गोटांतले आहेत, शिवाय याचा अनिष्ट परिणाम होणारे मुके प्राणी-पक्षी, पर्यावरण हेही आहेतच.

रामचंद्र's picture

20 Jun 2024 - 6:04 pm | रामचंद्र

शिवाय 'ते कसं वागतात' असं म्हणत चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा किमान आपण शहाणपणाची भूमिका घेतली तर काही प्रमाणात तरी चुकीच्या गोष्टी कमी होतील असा विवेक दोन्ही बाजूचे लोक दाखवत नाहीत.

भागो's picture

20 Jun 2024 - 7:29 pm | भागो

पूर्ण सहमत.