द सेकंड स्पार्क - भाग १

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
12 Jun 2024 - 12:21 am

"इफ युनिव्हर्स इज द आन्सर, देन व्हॉट इज द क्वश्चन ?"

भव्य कॉरीडॉर . इन्कॅण्डेसंट पण पांढरा लख्ख प्रकाश. संपुर्ण एकांत . आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही. अन आपल्याला आपल्याच श्वासाव्यतिरिक्त कशाचाही आवाज येणार नाही इतकी शांतता. समोर कोरी पांढरी शुभ्र भिंत अन अशा त्या भिंतीवर लिहिलेले ते सुप्रसिध्द वाक्य . समोर बस बसायला एक साधीशी खुर्ची. बाकी कोणीच नाही.
प्रोफेसर गोडसे त्या वाक्यासमोर आले अन क्षणभर थबले . त्यांच्या चेहर्‍यावर मंद असे हास्य पसरले... "हं, लेट मी थिंक " इतकेच म्हणुन ते समोरील खुर्चीवर जाऊन विचार करत बसले.
कितीतरीवेळ निघुन गेला असेल देव जाणे. अन अचानक त्या शांततेचा भंग करणारा बुटांचा आवाज ऐकु आला. प्रो. गोडसे मात्र त्यांच्या विचारांच्या तंद्रीत गुंग झालेले असल्याने त्यांच्या लक्षातही आले नाही.
"प्रोफेसर..... प्रोफेसर गोडसे."
त्या हाकेने सरांची तंद्रा भंग पावली . त्यांनी बाजुला वळुन पाहिले.
"प्रोफेसर गोडसे , ईट्स सच अ‍ॅन ऑनर टू मीट यु ! तुम्हाला भेटुन प्रचंड आनंद झाला. मी डॉ. चौहान . "
"ओह माय गॉड. हा काही प्रॅंक वगैरे आहे का ? " प्रो. गोडसे खडबडुन उभे राहिले . "तुम्हाला कोण ओळखत नाही प्रो. चौहान ! भारतातील सर्वात अ‍ॅडव्हान्सड ए.आय . रीसर्च लॅब चे संचालक ! द ऑनर इज टोटली माईन" ! प्रो. गोडसें एकदम आदराने वाकुन विनम्रपणे हस्तांदोलन करत म्हणाले.

" तुम्ही एका इन्विटेशन वर लगेच आलात, आम्ही खुप आभारी आहोत. आपण चालत चालत बोलुयात का ? प्रोफेसर जैन तुमची वाट पहात आहेत. "

त्यांनी त्या जणुकाही अनंत वाटेल अशा भव्य आणि पांढर्‍या शुभ्र लाईट्स ने उजळुन निघालेल्या कॉरीडॉर मधुन चालत चालत बोलायला सुरुवात केली."

प्रो. चौहान , मी खुप आश्चर्यचकित आहे तुम्ही मला इथे बोलावले ! आय मीन , मी तर प्रोफेसर ऑफ फिलॉसॉफी आहे , फिजिक्स नाही की कॉम्प्युटर सायन्स नाही. माझे इथे काय काम ? आणि मुख्य म्हणजे इथे भाभा अ‍ॅटॉमिक रीसर्च सेंटर मध्ये काहीतरी फिजिक्स चे वगैरे संशोधन होत असावे असा माझा अंदाज होता, तुम्ही इथे काय करत आहात ? आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचे , माफ करा, पण पर्यायाने तुमचेही इथे काय काम ?

प्रो.चौहान फक्त गालातल्या गालात हसले - प्रो. जैन भेटले की बोलुच सविस्तर.

प्रो. गोडसे म्हणाले - बरं , मग मी काही बेसिक विचारतो . फार बालीश वाटले माझे प्रश्न तरी तुम्ही हसायला रिकामे आहात. मुळात आर्टीफिशियल इन्टेलिजन्स म्हणजे काय आहे हो ?
आमचं आपलं ऐकीव ज्ञान आहे. मुळापासुन काही माहीत नाही. त्याचा इतिहास, उद्देश, उपयोग, धोके वगैरे काहीच माहीत नाही आमच्यासारख्या लिबरल आर्ट्सवाल्यांना.

प्रोफेसर चौहान आता मात्र एकदम गांभीर्याने बोलु लागले.

ह्याची सुरुवात झाली अ‍ॅलन ट्युरिंग पासुन . दुसर्‍या महायुध्दात. कारण होते इनिग्मा :
1
हे एनिग्मा म्हणजे जर्मन लोकांचे क्रिप्टोग्राफी अर्थात मिलटरी मधील संदेश गुप्त राखण्यासाठी बनवलेले मधीन होते. त्यात कोणताही सरळ साधा मेसेज टाकला की ते मशीन त्याचे रुपांतर अतिषय अस्ताव्यस्त आणि असंबध्द मेसेज मधे करायचे. मग तो मेसेज वायरलेस वर पाठवला जायचा. आता समजा एखाद्याने तो मेसेज मध्ये पकडला तरी त्याचे मुळ मेसेज मध्ये रुपांतर करायला, अर्थात डिक्रिप्ट करयाला एन्गिमा शिवाय पर्याय नसायचा . पण समजा तुमच्या कडे एनिग्मा मशीन असले तरी त्यातील डीक्रिप्शन की नसेल तर तुम्हाला काहीच करता यायचे नाही. आता तुम्ही म्हणाल मग त्यात काय अवघड आहे - पण अवघड हे होते की अशी कॉम्बिनेशन होती तब्बल 158,962,555,217,826,360,000 ! जवळपास १५९ मिलियन मिलियन मिलियन ! अर्थात असा एक मेसेज डीकोड करायला , संपुर्ण मानव समाजाला कैक शेकडो हजारो वर्षे लागली असती केवळ एक मेसेज चा अर्थ शोधायला.

प्रो. गोडसे अवाक होऊन ऐकत होते. भव्य कॉरीडॉर मध्ये घुमणारा त्यांच्या बुटांच्या संथ लयीचा आवाज वगळता बाकी सर्व गहन शांतता होती.

आणि इथे पहिल्यांदा अ‍ॅलन ट्युरिंगने मशीन चे प्रॉब्लेम मशीनच सोल्व्ह करु शकेल हा विचार करुन जनरल पर्पज टुरिंग मशीन ची कल्पना मांडली. विचार करा काय जीनीयस माणूस असेल तो ! १९४० च्या आसपास माणुस मशीन लर्निंगचा , आर्तीफिशियल इन्टेलिजन्स्चा विचार करत होता जेव्हा अजुन सेमीकंडक्टर्स , कॉम्पुटर्स देखील विकसीत झाले नव्हते !! माझ्या मते ही सुरुवात आहे ए.आय ची. ए.आय म्हणजे सोप्प्य शब्दात सांगायचं झालं तर जी कामे आपण करतो , करु शकतो किंवा करुही शकत नाही ती कामे मशीन ला शिकवायचे.

पुढे मग आपण काँप्युटर्स मधील तुफान वेगाने झालेली प्रगती पाहिली. सेमी कंडक्टर्सने सगळ्याच मानवजातीची दिशाच बदलुन टाकली. डिजिटल कॅमेरे बनवले जे आपण पाहतो तसे पाहु शकतात. ऑडियो सेन्सर बनवले जे आपण ऐकतो तसे ऐकु शकतात , टेंपरेचर सेंसर्स , लोकेशन सेंसर्स, जीपीएस सेटेलाईट्स. आज कॉम्प्युटर्स ना आपला कळतं त्या पेक्षा जास्त कळतं असं म्हणायला हरकत नाही!

"थांबा सर , ज्ञान होणे वेगळे आणि कळणं वेगळं आणि अनुभवणं तर त्याहुन वेगळं " प्रो. गोडसे त्यांना मध्येच अडवत म्हणाले.

प्रोफेसर चौहान म्हणाले - "करेक्ट मला वाटलंच होतं तुम्ही असे मुलभुत प्रश्न विचारणार !"
माहीती घेणे वेगळे , ज्ञान होणे वेगळे , कळणे वेगळे आणि अनुभवणे त्याहुन वेगळे . आता हेच उदाहरणार्थ सांगतो .

म्हणजे कसे की आपण जे पहातो ते कोंप्युटर वेगवेगळे कॅमेरा मधुन पाहील. नुसते पाहणारच नाही तर जसे आपण पाहता क्षणी वस्तुंची विभागणी करु शकतो तसे करु शकेल. रंग ओळखु शकेल ,काँपुटरला काय , एक पिक्सेल म्हणजे एका माहीती आहे जी ०/१ मध्ये , बिट्समध्ये सेव्ह करता येईल. काँप्युटर काहीही पाहु शकेल. पण पाहणे वेगळे अन दृष्याचे ज्ञान होणे वेगळे. ती पिक्सेल मधील माहीती कलेक्ट करणे, प्रोसेस करणे, सेव्ह करणे म्हणजे पाहणे असेल तर अन त्यातुन वेगवेगळे निष्कर्ष काढ्ता येणे म्हणजे ज्ञान. अ‍ॅन्ड गेस व्हॉट , आपण ही लेव्हल खुप पुर्वीच पार केलेली आहे. आता कॉम्पुटर नुसते पहात नाही तर काय पाहिली त्याची रीतसर विभागणी करु शकतो, काँप्युटर कुत्रे आंणि मांजर मधील फरक सांगु शकतो ,
2
रस्त्यावरील गाड्या ओळखु शकतो .
3

हे सगळं फार पुर्वीच झालेलें आहे . अर्थात कॉम्पुटर माहीती घेऊ शकतो, ती अ‍ॅनालाईझ करु शकतो, आणि त्यातुन ज्ञान प्राप्त करु शकतो हे सगळेच झाले आर्टिफिशियल इन्टेलिजन्स . बट नाऊ , ब्रेस फॉर इम्पॅक्ट ! गेल्या काही वर्षात आर्टिफिशियल इन्टेलिजन्सने जनरेटिव्ह ए.आय अर्थात नवनिर्माण करणारी प्रणालीही विकसीत केलेली आहे जे की कळालेल्या माहीतीवरुन नवीन माहीती बनवु शकते. तुम्ही गेल्या काही वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने बनवलेले चित्रे पाहिली असतील.
4
आणि हे नुसते चित्रांपुरतेच मर्यादित नसुन पुढे व्हिडीओज देखील बनवले गेलेले आहेत, तुम्ही डीफ फेक विषयी ऐकले आहे ना ! नुसता व्हिडीओ नव्हे तर त्याला व्यवस्थित आवाज , हावभाव , सर्वकाही काँप्युटर्स जनरेट करु शकतो.

It’s Getting Harder to Spot a Deep Fake Video
https://www.youtube.com/watch?v=gLoI9hAX9dw

प्रो. गोडसे अवाक होऊन ऐकत होते. ह्या सार्‍याचे किती भयंकर परिणाम असतील असा काहीसा विचार राहुन त्यांच्या मनामध्ये घिरट्या घालत होता. ते प्रो. चौहान ह्यांना म्हणाले - हं , ठिक आहे पण तरीही अनुभवणे ही वेगळीच बाब आहे , ते काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जमणार नाही , राईट ?

प्रो. चौहान हसत म्हणाले - सर आपण कॉम्प्युटरला आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या सहाय्याने बघायला ऐकायला बोलायला दाखवायला शिकवले , मग केवळ तिथेच का थांबा , कॉम्पुटर संपुर्ण अखंड व्हिडीओ बनवायला शिकला. त्यात आपल्या अन्य सेंसेस ने जे ज्ञान होते जसे की त्वचेतुन स्पर्षात होणारे ज्ञान , नाकातुन येणारे सुंगंध , जीभेतुन कळणार्‍या चवी, सगळेच फील्स. सगळे मानवी अनुभव का नाही मिसळता येणार ? ! तुम्हाला कल्पना आहे सर - ह्या ए.आय ने जनरेट केलेल्ल्या विडीओ चा साईझ मधील केवळ १% कदाचित त्याहीही पेक्षा कमी भाग आपण आजवर डीकोड करु शकलो आहोत, म्हणजे आपल्या जे अनुभव जाणवतात ती माहीती केवळ १% आहे. ए.आय त्याच्या पलीकडे अजुन काहीतरी ९९% अधिक अनुभवत आहे , जे आपल्याला कळतही नाहीये. न्युरल नेटवर्क्स त्याच्या हिडन लेयर्स मध्ये काय मॉडेल ट्रेन करत आहेत आपल्याला माहीतही नाही.

गोडसे सर अडखळत म्हणाले - खरं सांगु का सर. मी फिलॉसॉफीचा प्रोफेसर आहे . हे सगळं , मी आज पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स , काँप्युटर वगैरे समजुन घेतोय , समजलेल्या माहीतीतुन आर्टीफिशियली काही तरी जनरेट करतोय इथं पर्यंत मला कळलं , पण हे त्यानंतर जे १% - ९९% हे काही मला कळलं नाही.

"थांबा सर तुम्हाला एक भन्नाट अशी उपमा देतो." प्रो. चौहान हसत हसत म्हणाले. " तुम्हाला तुमचा लास्ट ऑर्ग्यॅझम आठवतो? "
"काय्य्य्य्य्य्य ? " प्रो. गोडसे दचकुन म्हणाले !
"चीडु नका सर. ट्रस्ट मी , तुम्हाला हा थॉट एक्स्परिमेंट आवडेल तुम्हाला. सविस्तर नाहीत बोलला तरी हरकत नाही पण सविस्तर कल्पना करा. आठवा तो क्षण. "
"चिडायचं काय त्यात ? हा हा. ....विक्रांतानी रतानि च !"
"अविस्मरणीय अनुभव होता तो ."
"तुम्हाला त्यातील काय काय आठवते ? "
"ओफ कोर्स. मला "तो" क्षण आठवतो"
"अजुन?"
"तिने ट्र्कॉईज रंगाचीची अंतर्वस्त्रे घातलेली . निळ्याशार अन हिरव्या गर्द अशा मिक्स समुद्राच्या रंगाची. आणि तिचे निळसर डोळे आणि पाठीमागील निळाशार समुद्र पर्फेक्ट मॅच होत होते. "
"अजुन?"
"आम्ही बालकनीमध्ये होतो समोरील अथांग समुद्र पहात. अजुन काय माझे हात तिच्या केसात फिरताना , ती माझ्याकडे वर पाहताना. जणु काही हा जगातील एकमेव क्षण आहे इतके तल्लीन होऊन तो क्षण अनुभवताना असताना ."
"अजुन?"
"????"
बस्स? इतकेच ?? प्रो. चौहान हसत हसत म्हणाले !
" तुम्हाला आठवते का नक्की वेळ काय होती, वारे किती वेगाने वहात होते, विन्डचिल किती होता ? तिच्या शरीराचे तापमान किती होते ? तुमच्या शरीराचे किती होते ? तिच्या श्वासांना कसला सुंगंध होता ? तुच्या ओठांना कसली चव होती ? तुमच्या किंवा तिच्या अंगावर रोमांच उमटलेले का ?, तिचा पर्फ्युम कोणता होता ? तुमचा कोणता होता ? तिच्या आयुष्यातील हा कितवा अनुभव होता ? तुमच्या आयुष्यातील हा कितवा अनुभव होता ? ह्या आधीच्या अनुभवात आणि ह्या अनुभवात वेळेचे किती अंतर होते ? ???
हे सर्व , ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या अनुभवाचे अंग आहेत नाही का !!, हे जे की तुमच्या लक्षातही येत नाहीयेत, पण त्यांच्याशिवाय तो क्षण अपुर्ण आहे.
अन् आता कल्पना करा काँप्युटर हे सारे सेव्ह करत आहे ! तुम्हाला तुमच्या स्मरणात राहिला तो त्या अनुभवचा केवळ १% आहे , पण कॉम्प्युटर उर्वरीत ९९% गोष्टी देखील माहीती करुन घेत आहे, कळुन घेत आहे , समजुन घेत आहे, अ‍ॅनालाईझ करत आहे !
कळलं तुम्हाला १% - ९९% ?
तुम्हाला जर ए.आय. ला कनेक्ट केले, तुमच्या मेंदु आणि कॉम्प्युटरमध्ये एक इन्टर्फेस बिल्ड केला आणि सगळा डेटा सेव्ह केला तर तुमचा ऑर्ग्यॅझम काँपुटरला तुमच्यापेक्षा जास्त चांगला "कळेल", "लक्षात राहील", "अनुभवता येईल" आणि इतकेच नव्हे तर जनरेटीव्ह ए.आय वापरुन पुन्हा नव्याने जनरेटही करता येइल.

"ओह माय गॉड" आता मात्र प्रोफेसर गोडसे ह्यांना सुन्न करणारा धक्का बसला होता !

प्रोफेसर चौहान पुढे बोलत राहिले - आणि सर तुम्ही ह्या जगातील केवळ एक व्यक्ती आहात. असे ९-१० बिलियन लोकांचे अनुभव, प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासाच्या प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा अनुभवाचे. सविसस्तर ज्ञान. त्या लोकांनाही नाही इतके सखोल ज्ञान.
आणि हे फक्त १ दिवसाचे नाही तर त्यांच्या संपुर्ण जन्माचे ! म्हणजे टोटल किती अनुभव असतील तुम्हीच विचार करा !
१०,०००,०००,००० लोकं *१०० वर्षे * ३६५ दिवस *२४तास *६० मिनिट *६० सेकंद *१०० मायक्रोसेकंद !

आणि हे फक्त एका जनरेशन साठी नव्हे तर माणुन माकडापासुन माणुस झाला त्या क्षणापासुन सर्व पिढ्यांच्या जीवनाचे! म्हणजे अजुन काहीतरी मल्टिपल ने गुणा !

एवढे जर आपण कॉम्प्युटर्सला फीड करु शकलो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रोसेस करायला देऊ शकलो , तर काँपुटर्स मानवी प्रजातीला मानवांपेक्षा चांगळे ओळखु शकतील, नुसते ओळखुच शकतील असे नव्हे तर सिम्युलेटही करु शकतील. अर्थात काल्पनिक विश्वात तयारही करु शकतील आणि असे जर होऊ शकले तर ही - ज्याला तुम्ही फिलॉसॉफर जागृतीची अवस्था असे म्हणता ते असेल. कॉन्शशनेस ! आणि ती असेल खरी सिंग्युलॅरिटी !!
प्रो. चौहान बोलता बोलता थांबले. आता तिथे फक्त गहन शांतता भरुन राहिली होती.

आता चालत चालत दोघेही प्रोफेसर एका मोठ्ठ्या गोलाकार हॉल मध्ये आलेले होते. दुरवर कोणीतरी त्या गोलाकार हॉल मधील मध्यवर्ती अशा प्रयोगशाळेतील वस्तुंवर जणु काही ध्यान लाऊन बसावे अशा एकाग्रतेने पहात बसलेले. बाकी ह्या इथे भिंतींवर अगणित असे स्क्रीन्स लावलेले मात्र तुर्तास ते सारेच बंद होते. बाकी इथेही तशीच गहन शांतता. संपुर्ण एकांत . प्रयोगशाळेकडे एकाग्र धान लाऊन बसलेली ती एक व्यक्ती आणि हे दोघे वगळता अन्य कोणीच नव्हते .
प्रोफेसर गोडसे आणि प्रोफेसर चौहान , दोघेही त्यांच्या दिशेने चालत राहिले.

प्रो. गोडसे मगाचच्या सिंग्युलॅरिटीच्या विचाराच्या धक्क्यातुन सावरत म्हणाले - " येस सर पण इतकी काँपुटिंग पॉवर किंव्वा स्पेसच नाहीये ह्या जगात ! मला नाही वाटतं की जगातील सर्वच्या सर्व कॉम्प्युटर्स एकत्र केले तरी इतकी माहीती प्रोसेस करता येईल ! राईट ? मग ज्या गावाला जायचे नाहीच , त्याची चौकशी का करा ? नाहीच आहे येवढी कॉम्प्युटेशनल पॉवर तर मग हे सगळे कल्पनेचे घोडे नाचवण्यासारखे च नाही का ? आपल्याला कधी कळाणारच नाही की तुम्ही ज्याला ए.आयची सिंग्युलॅरिटी कशी असेल ते."

ह्यावेळी प्रोफेसर चौहान काहीही बोलले नाहीत, केवळ हसले. त्यांनी आपल्या प्रश्नाला उत्तर दिले नाही हे पाहुन प्रो. गोडसे बुचकळ्यात पडले.
दोघेही चालत चालत त्या तिसर्‍या व्यक्ती जवळ पोहचले तेव्हा प्रोफेसर चौहान म्हणाले -
" लेट मी इंट्रोडुस - ओळख करुन देतो - प्रो. गोडसे - हे प्रोफेसर जैन संचालक आणि इंडिया हेड - क्वांटम कॉम्प्युटिंग विभाग !"

दोघांनी हस्तांदोलन केले, मात्र आता प्रोफेसर गोडसे ह्यांची नजर प्रयोगशाळेत मध्यवर्ती अशा भव्य झुंबरावर खिळुन बसलेली होती.

Q
__________________________
क्रमशः

कथाविज्ञानप्रतिभा

प्रतिक्रिया

भागो's picture

12 Jun 2024 - 4:42 am | भागो

छान! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

कंजूस's picture

12 Jun 2024 - 5:04 am | कंजूस

जबरदस्त!

वाह. भारी आहे. लवकर पुढचे येऊ दे.

कर्नलतपस्वी's picture

12 Jun 2024 - 7:28 am | कर्नलतपस्वी

कृबु बद्दल कुतूहल तर आहेच. अगदी एलिस इन वंडरलॅण्ड सारखं.
पु.भा.प्र.

टर्मीनेटर's picture

12 Jun 2024 - 8:52 am | टर्मीनेटर

झकास सुरुवात 👍
विषय तर आवडीचा आहेच आणि तुम्ही लिहीतायही छान.
गुगलचा 'क्वांटम कॉम्प्युटर' झुंबर म्हणून बघायला मजा वाटली 😀
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे...

Bhakti's picture

12 Jun 2024 - 11:19 am | Bhakti

छान सुरुवात !

सन्गणक मानवी मेन्दूत राहणार नाही इतकी माहिती साठवून ठेवील पण म्हणून त्याला तो अनुभव समजला किन्वा जाग्रुतावस्था आली असे म्हणता येईल का?

'तो' क्षण अनुभवताना, स्त्री आणि पुरुशान्ना एकमेकान्चे अनुभव पण समजू शकत नाहीत. आजुबाजुची खूप माहिती आहे म्हणून सन्गणकाला तो समजेल?

अंगावर रोमांच उमटले होते हे महीत असणे वेगळे आणि प्रत्यक्श रोमांच उमटणे वेगळे.

आणि हे फक्त एका जनरेशन साठी नव्हे तर माणुन माकडापासुन माणुस झाला त्या क्षणापासुन सर्व पिढ्यांच्या जीवनाचे! म्हणजे अजुन काहीतरी मल्टिपल ने गुणा !

हे आतापासून पुढे करणे शक्य आहे. या आधीच्या पिढ्यांचे अनुभव किंवा जीवनातील प्रसंगांचे पॅरामिटर्स आता फीड करणे शक्य वाटत नाही.

अथांग आकाश's picture

12 Jun 2024 - 12:35 pm | अथांग आकाश

एआय ची माहिती कथारुपात देण्याची कल्पना आवडली! पुभाप्र!!

अगदी ओघवत्या भाषेत आणि 'रंजक' उदाहरणावरुन समजावून सांगितले आहे.
पुभाप्र

मुक्त विहारि's picture

12 Jun 2024 - 8:21 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे

शेखर काळे's picture

13 Jun 2024 - 6:48 am | शेखर काळे

या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
संगणकाने काय विदा संकलन करावा हे आपणच त्याला सांगितलेले असते. त्या विदाचे काय करायचे ते नियमही आखून दिलेले असतात. त्या नियमानुसारच त्याचे काम असते.
पण त्याचा अर्थ असा नव्हे की संगणकाला हा सगळा विदा असल्यामुळे काही विचार - स्वजनित विचार करता येऊ शकेल. भावना या मानवप्रणितच आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2024 - 9:54 am | प्रसाद गोडबोले

बरं.

आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद :)