काही स्त्रिया बंडख़ोर असतात.जाचक नियमांचे ओझं त्या अलगद दूर करतात आणि नाविन्याचा शोधत घेत झगडतात नकळत त्याचा आवाज घुमत राहतो.त्या इतक्या असामान्य होत्या म्हणून आजच्या युगातल्या स्त्रियांना बळ मिळते.
मेरी क्युरी...नावच खुप आहे ना..या थोर स्त्री वैज्ञानिकीची जितकी थोरवी सांगावी तितकी कमीच आहे.
रेडिओअक्टिव्ह' हा सिनेमा कणखर मेरीचे असेच माहित असलेले आणि नसलेले पैलू प्रभावीपणे दाखवतो.
व्यक्तिशः मला पहिली नोबेल विजेता स्त्री,दोन वेगवेगळ्या क्षेत्रात (केमिस्ट्री आणि फिजिक्स)यात नोबेल मिळविणारी एकमेव व्यक्ती इतकीच ओळख होती.पण वडिल गणितज्ञ , लहानपणीच आईचे छत्र हरवलेली मारिया स्क्लोदोव्स्का' उर्फ मेरी क्युरी .शिक्षण मिळवण्यासाठी अत्यंत झगडा देत पोलंड स्वदेश सोडून फ्रान्स गाठते.एक वैज्ञानिक होते.तिथेच पेरी क्युरी यांची विज्ञानाच्या प्रेमापोटी भेट होते आणि दोघांतही प्रेम फुलते.या दोघांतले नाते इतके सुंदर दाखवले आहे की सिनेमात नोबेल घ्यायला पेरी एकटाच जातो (कारण मेरी नुकतीच आई झालेली असते) तेव्हा मेरी चिडून त्याला एक थप्पड मारते पण म्हणते तुझा राग आलाय पण तुझ्यावर तितकेच प्रेम करते.
पोलोनियम आणि रेडियमच्या शोधासाठी यांना नोबेल मिळते.रेडिओअक्टिव्ह ही संकल्पना ,हा शब्द मेरीने जगाला पहिल्यांदा दिला.ती म्हणतच असते मला जग बदलायचे आहे.पेरीच्या अचानक अपघाती मृत्यूनंतर दोन मुलींचे संगोपन असूनही विज्ञानाचा ध्यास ती अजिबात सोडत नाही.त्याकाळातही एका सहकार्याबरोबर असलेले इंटीमसीचे नातं नाकारत नाही,दुसरे नोबेल पारितोषिक घेण्यासाठी सध्याच्या अफेअरमुळे येऊ नका असे पत्र मिळाल्यावर 'नोबेल मला ट्यालेंटसाठी मिळाले आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा याच्याशी संबंध नाही 'हे ती ठणकावून सांगत सोहळ्याला जाते.
मेरीच्या शिक्षणासाठी तिच्या बहिणीनेही तिला खुप साथ दिली होती.पहिल्यांदा बहिणीच्या शिक्षणासाठी मेरीने शिकवणी,शिक्षकीची नोकरी करत आर्थिक साहाय्य केले.नंतर बहिणीने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मेरीला शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले.
पुढे मुलीही तेवढ्याच कणखर पहिल्या महायुद्धात आई मेरी क्युरी बरोबर त्यांनी परिचारिका म्हणून काम केले होते .व सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्यांच्या जागा नक्की करण्यासाठी रेडीओलोजिक मोटारकार याचा शोध लावला .
कृत्रिम किरणोत्सर्गी(कण वा किरण बाहेर टाकणारी ) मुलदव्ये तयार करण्यात इरी क्युरीने (मेरी क्युरी यांची मोठी मुलगी)पतीबरोबर कार्य केले .या साठी दोघांना १९३५ साली रसायनशास्त्रचे नोबेल पुरस्कार मिळाले .
सिनेमात रेडिओ अक्टिव्ह शोधाने जगात जे मोठे बदल झाल्या अशा घटनांचे मध्येमध्ये चित्रणही दाखवलेले आहे -1956 मध्ये क्लीव्हलँड येथील रुग्णालयात बाह्य बीम रेडिओथेरपी , हिरोशिमा आणि नागासाकी ,1961 मध्ये नेवाडा येथे अणुबॉम्ब चाचणी आणि चेर्नोबिल आपत्ती यासह तिच्या शोधांचा भविष्यातील परिणाम दर्शविणाऱ्या दृश्यांसह मेरीच्या आयुष्यातील दृश्ये गुंतलेली आहेत(सौ.विकी)
आई जेव्हा वारली तेव्हापासुन तिने अध्यात्माचही त्याग केला, कदाचित तेव्हापासुन ती केवळ फैक्टवर विश्वास ठेवू लागली.विज्ञानाची सम्राज्ञी मेरी क्युरीच्या आयुष्याचा हा 'रेडिओ अक्टिव्ह' सिनेमा नक्कीच पहा..
-भक्ती
OTT - Amazon Prime
प्रतिक्रिया
19 Apr 2024 - 1:19 pm | अहिरावण
>आई जेव्हा वारली तेव्हापासुन तिने अध्यात्माचही त्याग केला, कदाचित तेव्हापासुन ती केवळ फैक्टवर विश्वास ठेवू लागली
म्हणजे नक्की काय केले? आधी काय करत होती? नंतर काय केले? दोन्हीमधे काय फरक होता?
19 Apr 2024 - 1:45 pm | Bhakti
सिनेमात एक दृश्य आहे .पेरी क्युरी स्पिरुच्युअल असतो,एक बाई रेडिओ अक्टिव्ह'पदार्थ वापरून जादू करतं असते दोघांनाही ढोंगीपणा कळतो.पेरी म्हणतो फक्त बघ जाऊ दे.मेरीला राग येतो.बहिणीला ती हे सांगते.ती म्हणते " सायन्स मध्ये आफ्टर लाईफचा कोणताच इव्हिडेन्स नाही."
बहिण विचारते आपली आई कुठेतरी आहे यावर तरी तुझा विश्वास आहे का?ती म्हणते " हो ,जमिनीत, पोलंडच्या...."
आई गेल्यानंतर ती आधी सहज विश्वास ठेवणारी पण नंतर फैक्ट असेल तर मान्य करणारी अधिक झाली.
19 Apr 2024 - 1:51 pm | अहिरावण
खुलाशाबद्दल धन्यवाद.
19 Apr 2024 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले
खरेच !
काय अफलातुन बाई असेल ही , सॉरी सॉरी - मादाम असतील ह्या .
ज्या़ काळात बायका अक्षरशः रांधा वाढा उष्टी काढा करत होत्या तेव्हा मादाम क्युरी रेडीयम पोलोनियम वगैरे मुलद्रव्यांवर काम करत होत्या ! म्हणजे हे किती अफाट काम आहे ह्याच्या कल्पना करुन पहा की आपल्यातील किती जणांनी रेडीयम किंव्वा पोलोनियम पाहिले तरी आहे का आपल्या आयुष्यात किंव्वा भविष्यात तरी पाहता येईल अशी काही शक्यता तरी आहे का !
हा तत्कालीन फिजिसिस्ट लोकांच्या एका कॉन्फ्सरन्स मधील फोटो पहा . ह्यात किती महिला दिसतात तुम्हाला !!
पण दुर्दैवाने आजच्या काळातील एकही फेमिनिस्ट तुम्हाला मेरी क्युरींचे नाव घेताना दिसत नाही. किम कार्डेशियन आणि निकि मिनाज ह्या आजच्या रोल मॉडेल्स आहेत फेमिनिश्टांच्या.
माय बॉडी माय चॉईस . =))))
I am not complaining, I am actually happy . You understand ? ;)
19 Apr 2024 - 5:01 pm | Bhakti
येस , absolutely right!
नारी..
घुसमटलेल्या देहावरची दूर लोट काजळ
पसरू दे त्यावरी लखलखणारे स्वातंत्र्याचे चांदणं!
19 Apr 2024 - 5:05 pm | कुमार१
परिचय आवडला.
19 Apr 2024 - 5:47 pm | कॉमी
चांगला परिचय.
अच्युत गोडबोलेंच्या "किमयागार" मध्ये ह्यांच्याबद्दल प्रथम वाचले होते. सगळ्या ढुढ्ढाचार्यांच्या नाकावर टिच्चून दुसरे नोबेल पारितोषिक स्वीकारणाऱ्या मदाम क्युरी तेव्हा पण एकदम प्रेरणादायी वाटलेल्या.
26 Apr 2024 - 4:34 pm | नगरी
आवडले
26 Apr 2024 - 4:39 pm | नगरी
Radio Active चा नक्की अर्थ काय? Radition येत आहे ठीक.पण रेडिओ काय?
28 Apr 2024 - 8:32 pm | सुधीर कांदळकर
परिचय/रसास्वाद आवडला. मला माझ्याच मारीवरील लेखाची आठवण झाली. लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
स्त्रीशक्ती १: मारी क्यूरी: https://www.misalpav.com/node/46193
इथे आहे. पिअरे क्यूरीवरील लेख पण संगणकावरील अडगळीत पडला होता. तो आत्ता मिपावर प्रसिद्ध केला आहे.
28 Apr 2024 - 9:53 pm | Bhakti
वाह!किती विस्तृत लिहिले आहे.खुपच आवडलं.
खुप खुप धन्यवाद!