शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती

जानु's picture
जानु in राजकारण
9 Dec 2020 - 10:43 pm

सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्‍यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्‍याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्‍याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्‍यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्‍यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्‍या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.

प्रतिक्रिया

https://www.bhaskar.com/local/mp/indore/news/the-entire-goods-belong-to-...

-------

विशेष काही नाही .....

शेतकरी, अडत्यांची मदत न घेता, स्वतः माल विकू शकला असता आणि लोकांना पण फायदा झाला असता....

पण,

ते कायदे काही अस्तित्वात आलेच नाहीत ....

-------

कपिलमुनी's picture

18 Jul 2023 - 2:38 am | कपिलमुनी

सध्या महाराष्ट्रात शेतकरी डायरेक्ट माल विकू शकत नाही असे तुम्हाला वाटते का?

मुक्त विहारि's picture

15 Feb 2024 - 7:31 pm | मुक्त विहारि

शेतकरी आंदोलन परत एकदा सुरू झाले...

चित्रगुप्त's picture

15 Feb 2024 - 8:31 pm | चित्रगुप्त

काल बघितलेल्या विडीयो प्रमाणे यात सरदार बहुसंख्येने असून ते सगळे पंजाबातून आलेले आहेत असे सांगितले. इतर प्रांतात शेतकरी नाहीतच की काय असा प्रश्न पडला. 'आप' ने बुलाया इसलिये ??

मुक्त विहारि's picture

15 Feb 2024 - 8:53 pm | मुक्त विहारि

इंदी अलायंस पण ह्या पाठीमागे आहेच..

तिकडे, न्याय यात्रा, इकडे शेतकरी आंदोलन आणि महाराष्ट्र राज्यात, आरक्षण आंदोलन...

येन केन प्रकारेण, मोदी हटाव...

कारण, मोदी आला की, CAA, NRC आणि UCC हमखास...

आग्या१९९०'s picture

15 Feb 2024 - 8:43 pm | आग्या१९९०

पुन्हा रस्त्यावर अडथळे, खिळे ठोकणे असले मागास उपाय सरकारने केले. अश्रूधुर नळकांड्या,ड्रोन मधून अश्रूधुर जमावावर टाकणे असले प्रकार करून झाले. आंदोलक शेतकरी हुशार निघाले, त्यांनी मोठे पंखे लावून धूर लोटून दिला, पाण्याचे फवारे मारून अश्रूधुराचा प्रभाव कमी केला, पतंगी उडवून ड्रोन निकामी केले. हमीभाव देऊन मोकळे का होत नाही सरकार?

चित्रगुप्त's picture

15 Feb 2024 - 10:04 pm | चित्रगुप्त

(तथाकथित-) शेतकरी नेमक्या किती आणि कोणत्या मागण्या करत आहेत ?

आग्या१९९०'s picture

15 Feb 2024 - 10:29 pm | आग्या१९९०

मागण्या त्याच आहेत, सरकारने त्या मान्य करू असे आश्वासन दिल्याने मागील आंदोलन मागे घेतले होते, अद्याप सरकारने त्यावर निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले.

मुक्त विहारि's picture

15 Feb 2024 - 11:27 pm | मुक्त विहारि

कोणत्या मागण्या?

सध्या चालु असलेली 'नौटंकी' पाहुन 'बंटी और बबली' ह्या सुमारे १९ वर्षांपुर्वीच्या चित्रपटातला हा प्रसंग आठवला 😂
हमारी मांगे पुरी करो...
मांगे क्या हैं?
इन्कलाब झिंदाबाद...
हां हां वोह तो ठीक हैं, पर मांगे क्या हैं?
तानाशाही नही चलेगी...
किसकी?
किसीकी...

😂 😂 😂

चित्रगुप्त's picture

16 Feb 2024 - 6:31 pm | चित्रगुप्त
मुक्त विहारि's picture

16 Feb 2024 - 9:14 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद...

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 8:50 am | अमरेंद्र बाहुबली

ईतके ऊपाय चीन बोर्डर वर केले असते तर चीनने भारताची भूमी गिळली नसती.

आग्या१९९०'s picture

15 Feb 2024 - 9:31 pm | आग्या१९९०

फ्रान्स, जर्मनी, बेल्जीयम, ग्रीस, इटली, रोमानिया येथील शेतकरीही त्यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहेत. तिथेही ट्रॅक्टर मोर्चा काढून रस्ते अडवून ठेवले गेले. सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या जवळजवळ सारख्याच आहेत, सरकारी धोरणांमुळे शेती परवडत नाही.

भाव भर्पूर आहे जमीनीला तेव्हा शेती विकून टाका आणि शहरात येऊन सांजच्याला बार मधे गंंमत करा

कशाला बसता कसत?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 8:50 am | अमरेंद्र बाहुबली

तिथल्या शेतकर्यांनाही खलिस्तानी ठरवनार का??

तो तिथल्या सरकारचा प्रश्न आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 8:48 am | अमरेंद्र बाहुबली

ज्यांचा शेतकरी आंदोलनाला विरोध आहे त्यांनी शेतर्यांनी पिकवलेले अन्न खाऊ नये. :)

अहिरावण's picture

18 Feb 2024 - 3:06 pm | अहिरावण

सहमत आहे. ज्यांचा भारत सरकारला विरोध आहे त्यांनी सरकारी पाठबळाच्या नोटा वापरु नये

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Feb 2024 - 4:59 pm | अमरेंद्र बाहुबली

सरकारी पाठबळाच्या नोटा?? हा काय प्रकार असतो?? नी तसॅही सहा महीणे झाले कुठलीही नोट मला शिवली नाहीये. सारं काही ओनलाईन :)

अहिरावण's picture

19 Feb 2024 - 10:27 am | अहिरावण

तुमच्या अगाध ज्ञानापुढे नतमस्तक आहोत
आपल्यासारख्या प्रकांड अर्थशास्त्री आम्ही ओळखू शकलो नाही याचा खेद आहे.

अथांग आकाश's picture

19 Feb 2024 - 12:29 pm | अथांग आकाश

मिपावर महान अर्थशास्त्रींची मंदियाळी आहे! पुर्वी ११८ का १८८ अर्थग्रंथ कोळुन प्यालेले एक अर्थशास्त्री होते आजकाल ते दिसत नाहीत!!

मुक्त विहारि's picture

19 Feb 2024 - 12:53 pm | मुक्त विहारि

त्यांना पंख फुटले...

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2024 - 12:48 pm | अमरेंद्र बाहुबली

पळ काढण्याचा हा प्रकार थोडा कॅज्यूअल आहे. :)

अहिरावण's picture

19 Feb 2024 - 1:39 pm | अहिरावण

असे का मग घ्या काढा !

प्रत्येक देशातील चलन/नोटा या सरकारच्या पाठबळावर असतात. मग व्यवहार नोटांच्या स्वरुपात होवो की ऑनलाईन पद्धतीने. सरकारवरचा विश्वास संपला की नोटांचा कागद होतो. आठ्वा - झिम्बाब्वे !!

खुष?

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Feb 2024 - 8:44 pm | अमरेंद्र बाहुबली

सरकार म्हणजे पक्ष नाही हो. सरकारात परिक्षा देऊन गेलेले असतात लोक, दंगली घडवनारे न्हणजे सरकार नव्हे.

अहिरावण's picture

22 Feb 2024 - 8:05 am | अहिरावण

>>>सरकारात परिक्षा देऊन गेलेले असतात लोक,

ते प्रशासन

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 10:33 am | अमरेंद्र बाहुबली

नोटा प्रशासनाच्याच असतात, सरकारच्या नसतात, नाहीतर सरकार बदलल्या बरोबरच महात्मा गांधींच्या जागी अनके आलतू फालतू लोक नोटेवर आले असते.

आणि प्रशासनावर तुमचा राग नाही. सरकारवर आहे. मग नोटा वापरणार नाही असले तर्कट का लावले... ? ऑऑऑऑ

घ्या तुमच्याच तंगडया तुमच्या गळ्ञात.. बसा ओढत स्वतःचेच पाय

अमरेंद्र बाहुबली's picture

22 Feb 2024 - 1:19 pm | अमरेंद्र बाहुबली

मी कुठे बोललो? सरकारच्या नोटा वापरू नका असं तुम्हीच लिहीलंय. वाचा वर प्रतिसाद तुमचा.

सुबोध खरे's picture

21 Feb 2024 - 8:06 pm | सुबोध खरे

ज्यांचा भाजप ला विरोध आहे त्यांनी भाजप शासित राज्यात राहू नये

काय म्हणताय?

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Feb 2024 - 8:45 pm | अमरेंद्र बाहुबली

मविआ काळात तुम्ही युपीत होतात हे माहीत नव्हते.

सुबोध खरे's picture

22 Feb 2024 - 10:21 am | सुबोध खरे

भुजबळ बुवा

ज्यांचा शेतकरी आंदोलनाला विरोध आहे त्यांनी शेतर्यांनी पिकवलेले अन्न खाऊ नये. :)

शेतकरी आंदोलन फक्त पंजाब आणि काही भाग पश्चिम उत्तर प्रदेशाचा आहे.

तेंव्हा आपला मुद्दा मुळातच गैरलागू आहे.

तुमच्या वरच्या विधानाला उत्तर म्हणून

मी ज्यांचा भाजप ला विरोध आहे त्यांनी भाजप शासित राज्यात राहू नये

असे लिहिलेले आहे.

हे तुमच्या उरफाट्या विचारसरणीचा परिपाक येतो आहे.

जर समजत असेल तर समजून घ्या नाही तर आहेच वाचाळता तुमच्या मतिमंद नेत्यासारखी

मविआ काळात तुम्ही युपीत होतात हे माहीत नव्हते.

याचा कुठे संबंध येतो

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 11:04 am | अमरेंद्र बाहुबली

व्वा. ठकास महाछक बनूनच ऊत्तर द्यावे लागते.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 11:05 am | अमरेंद्र बाहुबली

व्वा. ठकास महाठक बनूनच ऊत्तर द्यावे लागते.

चित्रगुप्त's picture

17 Feb 2024 - 5:08 pm | चित्रगुप्त

मस्त व्हिडिओ आहे, विक्रम सिंह रॉक्स...
ह्या तथाकथीत (इंजीनीअर / गडगंज खलिस्तानी) शेतकऱ्यांमुळे देशातल्या खरोखरच्या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांबद्दलची सहानुभुती नष्ट व्हायला नको एवढीच अपेक्षा!
(स्वगत : विक्रम सिंहांनी सुचवलेले उपाय पोलीस प्रशासनाने अंमलात आणावेत.)

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 6:40 pm | अमरेंद्र बाहुबली

तो विक्रमसिंह शेतकरीद्वेष्टा असावा.

आग्या१९९०'s picture

17 Feb 2024 - 7:12 pm | आग्या१९९०

स्वामिनाथनची मुलगी MSP चे समर्थन करते.स्वामिनाथन आयोगाचीही तीच मागणी आहे. भारतरत्न देऊन ह्या मागणीला सरकार बगल देत आहे हे विक्रमसिंग सारख्या लोकांच्या लक्षात येत नाही. भारत सोडा, युरोपचे शेतकरी तेथील सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून (ट्रॅक्टर घेऊन )आंदोलन का करत आहे ह्याचा अभ्यास करावा विक्रमसिंग सारख्या लोकांनी.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2024 - 6:41 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा. शेतकरीद्वेष्ट्यांचे असेच नूकसान होत रहावे.

चित्रगुप्त's picture

19 Feb 2024 - 10:59 am | चित्रगुप्त

दिल्लीत घुसून लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा चढवू पाहणारे गुंड शेतकरीद्वेष्टेच आहेत. त्यांचे नुकसान व्हावे ही इच्छा अगदी रास्त आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2024 - 12:49 pm | अमरेंद्र बाहुबली

खलिस्तानी झेंडा?? नक्की कुठला झेंडा फडकावला होता ते पहा अशी विनंती करतो.

आग्या१९९०'s picture

18 Feb 2024 - 9:43 am | आग्या१९९०

टोमॅटोच्या कंटेनरमधून आखाती देशात कांद्याची निर्यात करण्याचा प्रकार उघडकीस आला. सरकारने कांद्यावर लादलेल्या निर्यातबंदीचा गैरफायदा लबाड निर्णयतदारांनी घेतला. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सरकारी धोरणाविरुद्ध आवाज उठवणे विसरून गेले आहेत. अफूच्या गोळ्या घेतल्यावर दुसरे काय होणार?

अहिरावण's picture

19 Feb 2024 - 10:28 am | अहिरावण

कांडा निर्यात उठवली

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Feb 2024 - 12:51 pm | अमरेंद्र बाहुबली

शेतकर्यांपुढे शेतकरीद्वेष्टे झूकले, सर्व शेतकर्यांचे अभिनंदन.

आग्या१९९०'s picture

19 Feb 2024 - 1:36 pm | आग्या१९९०

उन्हाळ कांद्याची आवक पुढील महिन्यात सुरु होऊन मुबलक कांदा उपलब्ध होईल, निर्यातबंदिमुळे दर अजून कोसळून निवडणुकीत फटका बसेल ह्या धाकाने कांदा निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Feb 2024 - 8:46 pm | अमरेंद्र बाहुबली

निवडणूकांना चांगले चांगले गर्विष्ठ लोक घाबरतात भलेही मित्र अडदाणी का असेना :)