माझी ट्रेन माझी प्रेयसी (३)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
15 Aug 2023 - 7:13 am

भाग २ इथे
..
नमस्कार
सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !
अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे.

नव्या वाचकांसाठी :
सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे. इतिहास, तंत्रज्ञानातील प्रगती, सुरक्षितता आणि अपघात, प्रवाशांच्या सोयी-गैरसोयी, प्रस्तावित नवे रेल्वेमार्ग, आर्थिक पैलू, परदेशी आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे असे काहीही इथे लिहता येईल- गद्य, पद्य किंवा प्रकाशचित्र अशा कोणत्याही स्वरूपात.

रूळगाडीतील सर्व सहप्रवाशांचे नव्या डब्यात स्वागत !

भारतीय रेल्वे
ok

इथपासून….
......
ते
ok

इथपर्यंत.

*****************************************************

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

15 Aug 2023 - 7:19 am | कुमार१

कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला गती
कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा मार्ग ..

विजुभाऊ's picture

15 Aug 2023 - 7:51 am | विजुभाऊ

भारतीय रेल्वे मधे खूपच फरक पडला आहे.
मुख्य म्हणजे रिझर्वेशन प्रणालीमुळे खूपच सोय झाली आहे. रेल्वेला ही त्यामुळे मधल्या स्टेशनवर रीकाम्या झालेल्या जागा विकण्याची सोय झाली.
रेल्वे रिझर्वेशन प्रणाली ही त्याच्या इफिशियन्सी मुळे जगात भारी आहे असे म्ह्णावे लागेल.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे चे स्टेटस पटकन समजणे यामुळे प्रवास सुखकर झालेला आहे. अर्थात या सगळ्या त माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा महत्वाचा सहभाग आहे.
पण रेल्वे ने त्याचा अंगीकार केला हे महत्वाचे.

शशिकांत ओक's picture

20 Oct 2023 - 11:41 am | शशिकांत ओक

एसी २ , स्लीपर ८ डबा नेमका कुठे येईल हे कळायला बुकस्टॉल, ठेलेवाले किंवा काळ्या कोटातील कोणी मिळालाच तर कधी कधी सांगत असे. हे सर्व आता संपले आहे. वर लटकलेल्या इंजिकेटर वरून हव्या त्या डब्यापाशी आधीच उभे राहायची सोय फार उपयोगी आहे.

कुमार१'s picture

20 Oct 2023 - 12:04 pm | कुमार१

बरोबर आहे. परंतु हे पहा :
इंडिकेटरवर दाखवलेल्या डब्यांच्या जागी प्रत्यक्षात डबे उभे न राहण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत अशी तक्रार रेल्वे प्रवासी संघाने केलेली आहे. नुकतेच सिंहगड एक्सप्रेस थांबण्याच्या दरम्यान असे होऊन प्रवाशांची चेंगराचेंगरी होऊन ते जखमी झाले.

शशिकांत ओक's picture

20 Oct 2023 - 9:48 pm | शशिकांत ओक

जी सोय आहे ती महत्त्वाची. सिंहगड एक्स. ला किंवा इतर गाड्यांची बोगी संख्या पुढे मागे झाली असेलही. असो.
गाडीत प्रवासात सफाई कर्मचारी काम करून जातात. पूर्वी असे काम आपणहून करणारे विकलांग सफाई करून प्रवाशांकडून पैसे घेऊन जात....

आता माझा देश बदलतोय आणि त्यासाठी माझा नेता अठरा अठरा तास काम करतोय.

सुबोध खरे's picture

23 Oct 2023 - 11:02 am | सुबोध खरे

आणि
पाच वर्षात केवळ एक मत दिलं म्हणून आम्ही स्वतः काहीही ना करता कोणावरही काहीही टीका करायला मोकळे.

रेल्वे सुटण्याअगोदर चार तास "chart prepared " येते. तेव्हा आपले तिकिट "confirmed" असले तरीही PNR NUMBER तपासावे. (indianrail dot gov dot in). दोन फायदे होतात
१) अपग्रेड झाले असल्यास अगोदरच कळते आणि त्या नवीन डब्यात नवीन सीट नंबरवर बसता येते.
२) coach position कळू शकते. पण नेहमीच ती देत नाहीत हे खात्रीने सांगतो. आतापर्यंत चारापैकी एकदाच दिसली.
मुळातच रेल्वे वेबसाईटने coach positionदिली नाही तर त्यावर अवलंबून असणारे खाजगी apps तरी कशी देणार? ती चुकीची म्हणजे जुनी पूर्वीचीच देतात.
३) इले. इंडिकेटरवर सात आठ गाड्यांची पोझिशन सरकत आळीपाळीने दाखवत असतात त्यात तोटा आहे. थांबून आपली गाडी पाहावी लागते . जिथे फळ्यावर खडूने लिहितात(उदाहरणार्थ कल्याण) त्याचा मी फोटो काढून ठेवतो. तो फार उपयोगी पडतो. तीच गाडी परतताना असेल तर उलट क्रमाने डबे असतात. अनारक्षित डबे किती,कुठे हेसुद्धा उपयोगी पडते.
(Locate my train,railyatri apps दाखवतात पण खात्री नसते. )

_________________________
शिवाय जाण्याच्या दिवशी किंवा अगदी सकाळची गाडी असली तर आदल्या दिवशी NTES APP मधून SPOT YOUR TRAIN तपासावे. काही कारणाने ऐनवेळी गाडीची वेळ बदलली असेल किंवा रद्द झाली तर त्याप्रमाणे जाणे/उशिरा जाणे /न जाणे करता येते. (रेझर्वेशन फॉर्ममध्ये मोबाईल नंबर लिहिला असेल तर मेसेज येतातच.)

मध्ये एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे आता किती दिवस हे चांगलं राहणार आहे असा विचार सतत पिच्छा पुरवतो. उद्वाहनं आणि सरकते जिने वीजबिल परवडत नसल्यामुळे बंद ठेवणे, भित्तिचित्रांची देखभाल नसल्यामुळे ती केविलवाणी दिसणं, सुरुवातीला सढळपणे वापरली जाणारी प्रकाश यंत्रणा नंतर जेमतेम पातळीपर्यंत येणं. आणि हे सर्व प्रकार सर्वव्यापी आहेत. म्हणजे बस स्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळ, भुयारी आणि आकाश मार्ग, स्वच्छता गृह या सर्वांना हे “पहिले पाढे पंचावन्न” हा शापच आहे.

सर्व मिपाकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
गेल्यावर्षी ३ एप्रिल २०२२ रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान श्री. शेर बहादूर देऊबा ह्या दोघांनी नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊस मधून हिरवा झेंडा दाखवून पहीलया भारत-नेपाळ ब्रॉड गेज प्रवासी रेल्वे सेवेचे प्रतीकात्मक उद्घाटन केले. प्रस्तावित ६८.७ किमीच्या जयनगर ते बिजलपूर रेल्वे मार्गापैकी बिहार मधील 'जयनगर' ते 'नेपाळ' मधील कुर्था दरम्यान सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ३५ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर 'जनकपूर' (सीतामाईचे पिता जनक राजा ह्यांची राजधानी) हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे.
.
map
.
गेल्या कित्येक वर्षांत मी रेल्वेने कुठलाही लांबचा प्रवास केला नाहीये पण त्याची कसर ह्या महिना अखेरीस भरून निघणार आहे. २९ ऑगस्टला मुंबईहून सुरु होणारा सुमारे ४६-४७ तासांचा हा रेल्वे प्रवास ३१ ऑगस्टला नेपाळ मधील जनकपूर येथे पोचल्यावर संपणार आहे!
घरच्यांनी वेड्यात काढले असले तरी ह्या क्रॉस बॉर्डर रेल्वेप्रवासाचा अनुभव आणि फोटोज यथावकाश शेअर करतो 😀

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

उत्सुकता वाढली आहे. स्वस्तात परदेश वारी होईल पहिली या दृष्टीने वाचणार आहे.
१) नेपाळातील प्रसिद्ध ठिकाणे पाहणार का? त्यातले एक जरी 'भेटले' तरी चालेल.
२) दोन देशांची रेल्वे आहे, आइआरसिटिसी साइटवरून आरक्षण होईल का?
३) तिकडे नाडी ग्रंथ शोधणार का?
४)रूट ट्रेस करून द्या तिकडे फिराल त्यांचे.

टर्मीनेटर's picture

31 Aug 2023 - 1:23 pm | टर्मीनेटर

१) नेपाळातील प्रसिद्ध ठिकाणे पाहणार का?

हो तर... जनकपूर, काठमांडू आणि पोखरा पाहणार! काठमांडू, आणि पोखरा आधी पण झाले आहे, तरी नाईट लाईफ एन्जॉय करायला तिथे पुन्हा जाणार. चितवन आधी पाहून झालेले आहे पण आता जंगल सफारी आणि अभयारण्ये पाहण्यातला रस संपला असल्याने ह्यावेळी ते ड्रॉप करून आधी न पाहिलेले जनकपूर यादीत ऍडवले आहे.

दोन देशांची रेल्वे आहे, आइआरसिटिसी साइटवरून आरक्षण होईल का?

भारत-नेपाळ सीमेवरील जयनगर, बिहार पर्यंतचे आरक्षण आय आर सी टी सी वरून करता येते, पुढचा जयनगर ते जनकपूर प्रवास नेपाळ रेल्वेच्या अख्त्यारीत येत असल्याने त्याचे बुकिंग जयनगर येथे पोचल्यावर करावे लागते, अवघ्या तास -सव्वा तासाचा प्रवास आहे तो.

तिकडे नाडी ग्रंथ शोधणार का?

तिकडे नाडी 'सोडणार' का असा प्रश्न विचारला असतात तर उत्तर देणे कदाचित सोपे पडले असते, पण सदर विषय (नाडी ग्रंथ) आमच्या वाकूबा बाहेरचा असल्याने पास 😂

रूट ट्रेस करून द्या तिकडे फिराल त्यांचे.

हो, देतो यथावकाश....

स्वस्तात परदेश वारी होईल पहिली या दृष्टीने वाचणार आहे.

माझ्या पॅटर्न प्रमाणे केल्यास ही परदेशवारी स्वस्तात होईल असे विधान करणे थोडे अवघड आहे, पण तुमच्या पॅटर्न प्रमाणे प्रवास केल्यास तो नक्कीच किफायतशीरपणे करता येईल हे खात्रीने सांगू शकतो. (डिटेल्स व्हॉट्सअप करतो तुम्हाला परतल्यावर)

तिकडे विमान प्रवास मात्र पूर्ण टाळा.

टर्मीनेटर's picture

4 Sep 2023 - 2:04 pm | टर्मीनेटर

अय्यो रामा… एक पहिला जनकपूर धाम पर्यंतचा रेल्वे प्रवास सोडला तर परती पर्यंतचे पुढचे चार विमानप्रवास आहेत, त्यातला जनकपूर ते काठमांडू हा एक परवा सुखरूप पार पडला असुन अजुन तीन बाकी आहेत! कुप्रसीद्ध ‘येती एअरलाईन्स’ने प्रवास करणे टाळले असून ‘बुद्धा एअर‘ आणि ‘इंडिगो’ ह्यांनाच प्राधान्य दिले आहे…

अवांतर:
आपल्याकडच्या डॅाक्टरी पेशाबद्दल मत केव्हाच वाईट झाले आहे, पण आज नेपाळ मधेही असाच लुटारू अनुभव आला.
श्रावणी सोमवारी पशुपतीनाथाचे दर्शन घ्यायचे ठरवले होते त्याप्रमाणे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास दर्शन घेउन बाहेर पडलो तेव्हा वडिलांना थोडा अशक्तपणा जाणवु लागल्याने पशुपतीनाथ मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या ‘नेपाळ-भारत मैत्री हॅास्पीटल’ मध्ये त्यांना प्राथमीक तपासणी करण्यासाठी आणले.

1

पंधरा ते वीस मिनीटांत सहा चाचण्या आणि एक सलाईनचे मिळुन ७७३० रूपयांचे बिल हातात पडले. आता कधी डिसचार्ज देतात आणि फायनल बिलात कीतीचे चंदन लावतात ह्याची प्रतिक्षा करत बसलो आहे…

2

आता डॅाक्टरी पेशा पेक्षा खाटीकांच्या पेशाविषयी जास्त आदर वाटु लागला आहे 😂

कुप्रसीद्ध ‘येती एअरलाईन्स’ने प्रवास करणे टाळले असून ‘बुद्धा एअर‘ आणि ‘इंडिगो’ ह्यांनाच प्राधान्य दिले आहे…

बरे केलेत..

कुमार१'s picture

15 Aug 2023 - 10:45 am | कुमार१

१.

रिझर्वेशन प्रणालीमुळे खूपच सोय

+१. संकेतस्थळाचा अनुभव छान. App चा नाही.
..
२.

“पहिले पाढे पंचावन्न” हा शापच

+१. सुरवात धडाक्यात पण पुढे निराशा ..
..
३.

४६-४७ तासांचा हा रेल्वे प्रवास ३१ ऑगस्टला नेपाळ मधील जनकपूर येथे पोचल्यावर संपणार आहे!

वा वा ! हार्दिक शुभेच्छा ! येउद्यात सुरेल वर्णन..

scalp या शब्दाचा डोक्यावरील त्वचा हा अर्थ परिचित आहे.
परंतु हा शब्द जेव्हा अमेरिकी इंग्लिशचा अनौपचारिक शब्द बनतो तेव्हा त्याचा अर्थ भन्नाट आहे.
scalp (v.) = एखाद्या प्रकारची तिकिटे अनधिकृतपणे जादा दराने विकणे.

पाहूया त्यामागचा इतिहास :
सन 1869 मध्ये हा शब्द चित्रपटगृहाची तिकिटे विकण्यासंदर्भात होता. परंतु पुढे तो रेल्वे तिकिटांच्या संदर्भात वापरला जाऊ लागला.

समजा, एखादी ट्रेन 1000 किलोमीटर असा लांबचा प्रवास करणार आहे. पण त्या ट्रेनने एखाद्या व्यक्तीला फक्त दोनशे किलोमीटरचाच प्रवास करायचा आहे. अशा वेळेस तिकीट दराचे एक सूत्र असते - तिकीट जेवढे लांबच्या अंतराचे तेवढे ते ग्राहकाला (एखाद्या टप्प्यासाठी) स्वस्त पडते.

मग प्रवासी अशी युक्ती करायचे. संपूर्ण 1000 किलोमीटर प्रवासाचे तिकीट काढायचे व 200 किलोमीटरवर आपले इच्छित स्थानक आल्यावर उतरायचे. आता या तिकिटाचा 800 किलोमीटरचा टप्पा न वापरलेला आहे. मग तो एजंटला विकायचा.
पुढे एजंट योग्य ते गिऱ्हाईक गाठून त्याला तो उरलेला टप्पा विकतो. परंतु तरीसुद्धा नव्या प्रवाशाला ते तिकीट अधिकृत दरापेक्षा काहीशा कमी किमतीत दिले जाते. असा उद्योग करणाऱ्या एजंटला scalper हे नाव पडले.

(त्या काळी अशा प्रकारे तिकिटाचा उरलेला टप्पा विकण्याची पद्धत तिकडे असावी असे दिसते ).

कुमार१'s picture

31 Aug 2023 - 7:35 am | कुमार१

या मार्गावर एक्सप्रेस ट्रेनला आता कमाल 130 किलोमीटर प्रति तास वेगाची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे हे अंतर आता एक तासात पार करणे अपेक्षित आहे.
(पूर्वीचा वेग 110).

कुमार१'s picture

1 Sep 2023 - 10:53 am | कुमार१

आजचा प्रत्यक्ष अनुभव
सुपरफास्ट ट्रेनने एक तास 20 मिनिटे घेतली.
मध्येच थांबवणे व हळू करणे बरेच वेळा झाले.

पंचवीस वर्षांपूर्वी संध्याकाळी ५.४० ला निघणारी झेलम एक्सप्रेस ६.४० ला दौंडला एका तासात पोहोचत असे. केवळ १७७ डाऊन झेलम ही स्पेशल नव्हती, तर ११ डाऊन दादर-मद्रास आणि ८१ डाऊन जयंती जनता याही दौंडला एका तासातच पोहोचत. कुतुहुल म्हणून GIPR चे १९३५ चे टाईमटेबल पाहिले तर वाफेच्या त्या काळात मद्रास एक्स्प्रेस एक तास दहा मिनीटात पुणे दौंड अंतर पार करत असे! गाड्यांची संख्या आणि रहदारी अनेकपट वाढली आहे, ही खरी समस्या आहे.

इकडे १९३५ ते ८०-९० पर्यंतची जुनी टाईमटेबल आहेत
https://timetableworld.com/timetables.php

कुमार१'s picture

1 Oct 2023 - 1:19 pm | कुमार१

गाड्यांची संख्या आणि रहदारी अनेकपट वाढली आहे, ही खरी समस्या आहे.

अगदी खरं आहे. एक अनुभव तर मला अनेक वेळा आलाय.
गाडी स्थानकावरून सुटते (उशीर झालेलाच असतो ) आणि सुटल्या सुटल्या पुढे जेमतेम पाचशे मीटर जात नाही तर पुन्हा १०-१५ थांबवून ठेवतात. त्या पुढे जाण्याने फलाट सुद्धा गाडीने रिकामा केलेला नसतो.

हा काय प्रकार आहे समजत नाही......

कंजूस's picture

31 Aug 2023 - 8:20 am | कंजूस

गाडीचे लांबलचक नाव

announcement
Train no 22159 down
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai to
Puratchi Thalaivar Dr. Maruthur Gopalan Ramachandran Chennai Central Railway Station is arriving on platform no 4

हे थोड्या दिवसांनी कुणा गायिकेच्या आवाजात गाऊन सांगतील.

कुमार१'s picture

31 Aug 2023 - 8:44 am | कुमार१

भारतातल्या अशा सर्व लांबलचक नावांबद्दलची चर्चा भाग 1 मध्ये सविस्तर झाली होती.
सध्याचे सर्वात लांब कुठले ते आता एकदा पुन्हा बघावे लागेल 🙂

मुद्दा असा आहे की हे प्रकरण वाढत चालले - संपूर्ण नाव सांगणे तर गोंधळ वाढेल. सोलापूर आणि शोरानूर किंवा इतर अशीच स्टेशनस आहेत की जिथे दोन गाड्या एक वर जाणारी दुसरी खाली जाणारी एकाच वेळी येतात समोरासमोर. नाव ऐकता ऐकता चुकीच्या गाडीत पटकन चढण्याची शक्यता वाढेल. बारा किंवा आठ किंवा दहा शब्द आणि शेवटी अप/डाऊन /प्लाटफार्म समजेपर्यंत गाडी सुटेल. म्हणजे अधिक‌त घोषणेकडे लक्ष न ठेवता प्रवासी गाडीतील बसलेल्यांना विचारतील.
लांबलचक नाव ठेवणे यात राज्याची, नेत्यांची अस्मिता आणू नये ही इच्छा.

कुमार१'s picture

31 Aug 2023 - 10:16 am | कुमार१

गोंधळ वाढेल.

>>> होय. सहमत.

टर्मीनेटर's picture

31 Aug 2023 - 12:54 pm | टर्मीनेटर

https://www.misalpav.com/comment/1168282#comment-1168282
२९ ऑगस्टला दुपारी सुरु झालेला सुमारे २००० किमी अंतराचा ४६ तासांचा प्रवास मजेत पूर्ण करून आज सकाळी ९:३० वाजता जनकपूर धाम, नेपाळ येथे पोचलो 😀

ट्रेन

बोर्ड

कुमार१'s picture

31 Aug 2023 - 2:00 pm | कुमार१

सुन्दर!
मजा करा व कळवत रहा
सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा !!

कंजूस's picture

31 Aug 2023 - 1:53 pm | कंजूस

अपडेट्स!!!
धन्यवाद.
फोटो आवडले.
चकाचक.

ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यातील मोकळी जागा झाकणारी पायरी : दहावीतल्या विद्यार्थ्यांने केले नवे संशोधन.

ही वापरल्यास गाडीत चढताना किंवा उतरताना पाय मधल्या सापटीत सापडणार नाही.

कुमार१'s picture

4 Sep 2023 - 11:20 am | कुमार१

मुंबई ते गदग (१११३९) ही गाडी आता पुढे होस्पेटपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

गाडीचा फोटो छान आहे ,पण इतक्या मोठ्या प्रवासात स्वचछता राहिली होती का toilets ची विशेष करून? व इतरही केर कचरा. ई०. मला मात्र एकदा आश्र्चर्याचा छान ,चांगला धक्का बसला. होता व शेवटपर्यंत टिकला.. कारण आम्ही सेकंड a. c. ने कलकत्ता भुवनेश्वर, पुरी, कोणार्क अशी थोडी मोठीच सहल आयोजित केली होती , 12 दिवसांची तिघेच ,परंतु सेकंड ए.सीला सीट्स. सकट सर्व स्वच्छ व रेल्वे कामगार थोड्या रोज वेळाने गाडीचा पॅसेज, सीट्स खाली झाडून ब्रश ने पुसून डबा स्वच्छ ठेवत होते. व सगळेच आपल्या सारखे विचार करणारे नसतात म्हणून त्या कामगारां. बद्दल वाईटही वाटत होते. आपण घाण करणे‌ व. त्या स्वच्छता कामगाराने माणसाने‌ माणसाची घाण काढायची तसेच रेल्वे तील. इतकी स्वच्छता पहिल्यांदा बघितली‌.भारतीय पद्धतीची. भांडी नसून स्वच्छता ग्रूहात पाश्र्चात्य पद्धतीचे. कमोडस किंवा वेस्टर्न स्वच्छता ग्रूहे व शेवटपर्यंत स्वच्छता ठेवलेली होती , तसेच तिकिटाचया पैशात सकाळपासूनचा बेड टी मग नास्ता ,दूध/चहा कॉफी चहा नंतर11 वा सूप मग जेवण शाकाहारी /मांसाहारी लिहून घेऊन मग प्रत्येकाला एक फळ, डेझर्ट मग दुपारपर्यंत ची सरबराई संपली मग दु .3.वाजता. चहा त्याबरोबर हलका फराळ किंवा पाकिटातील कोरडे खाणे ‌मग संध्याकाळी 6. पासुन परत सूप मग 7 वाजता जेवण नंतर आईस्क्रीम दूध. फक्त जेवण व चहा बेचव चहा पांचट अशी चव वाटली व निघणय पूर्वी हजारोंदा vt.. रेल्वेवर तिकिट खिडकीवर विचारुन ही कोणी नक्की सांगितले नाही जेवण चहा तिकिटाच्या पैशात आहे मग मी माझ्या आजीच्या संस्कारांनी सारं कधीही प्रवासाला जाताना अन्न बरोबर ठेवावे प्रमाणे मेथी पराठे भरपूर ठेवलेच होते व कोरडा खाऊही घेतलाच होता ‌गाडी खूप लेट झाली तर काहीतरी दोन‌ घास खाऊन‌ पाणी प्यावे वेळेवर पोटाला आधार होतो म्हणून कोरडा खाऊ अगदी. भरपूर फिरताना व पाणीही जवळ असतेच.तसे मेथी पराठे भरपूर व खाऊची पाकिटे पाणी हे जवळ होतेच‌. पुढे आश्र्चर्य म्हणजे कलकत्त्याला हाॅटेलात पोहोचेपर्यंत पराठे छान राहिले होते ही ए.सी ची कॄपा व हाॅटेलात माझे‌ नावडते जेवायला पोळीचे पराठे सोडून काही नव्हतेच .कारण ते‌. मुस्लीम भागातले मुस्लीम हाॅटेल घेतले गेले‌ होते‌व. सिझन‌. नसलयामुळे आम्ही व्हरायटी ठेवत नाही ( कारण सप्टेंबर महिना व प्रवासी हंगामाची सुरुवात झालेली नव्हती असे उत्तर व्हरायटी का ठेवत नाही म्हणून मिळाले‌.शेवटी फक्त चहा मिळाला व जवळचे पराठे,लोणचे वर. दही खाऊन‌. झोपलो. पैशाच्या मानाने अतिशय लहान खोली व जेवायला नाषतयाला. सतत बेचव फक्त वेगवेगळ्या पद्धतीने छान घड्या करून पदर खूप असणारे पराठे रोज जेवत. रहावे लागले जे मला अजिबात आवडत नाही प्रवासात हिंडणे फिरणे करताना जसे पैशाकडे बघत. नाही तसेच खाताना ही तिथले स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ खाऊन बघणे व मस्त आनंद घेणे अर्थात प्रकॄती संभाळून हे मला खूप आवडते नविन ठिकाणे बघणे, ऐतिहासिक प्रेक्षणीय. स्थळे. बघणे तुफान फिरणे व. थोडी खरेदी कारण मुंबईत सर्व काही बारा महिने ऊलट जास्त दर्जेदार मिळते स्वानुभव म्हणून. खरेदी थोडी असे फिरणे मला. फार फार प्रिय.

कुमार१'s picture

5 Sep 2023 - 6:27 am | कुमार१

तिथले स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ खाऊन बघणे व मस्त आनंद घेणे अर्थात प्रकॄती संभाळून हे मला खूप आवडते

छान
पर्यटनामधील हा वेगळा अनुभव देखील घेणे महत्त्वाचे.

केरळ सहलीत आम्ही फक्त इडल्या डोसे व. मेदूवडे. अगदी आवडीने
खाऊन त्यावरच राहीलो कारण आधीच्या बेंगलोर म्हैसूर उटीतलया. बाॅंबे मिल्स नावाखाली मिळालेले भयंकर तिखटजाळ खाणे ,यामुळे केरळ सहलीत इकडे तिकडे स्थानिक पदार्थ न बघता दक्षिणी जेवण फक्त तिखटजाळ. असते या समजुतीने भरपूर इडल्या डोसे मेदूवडे न कंटाळता इतके खाल्ले की घरी आल्यावर पोळ्या खायचा कंटाळा आला .इतकी इडली. डोशांची. सवय झाली व आम्हाला ते आवडतातही. तसेच गोव्याला पणजीचे एक हाॅटेल सोडून काहीही न आवडणारे‌ जेवण बघून‌ मला तर काही च पोटभर मिळाले नाही कारण आम्ही भयंकर शाकाहारी. व हे चालत नाही व ते चालत नाही तेव्हा तर मला जराही इकडचे तिकडचे खाण्याची सवय नव्हती. फक्त शाकाहारी व. तेही शक्यतो बिन कांद्या लसणाचे खाणे हीच सवय ,आता तरी मी बर्या पैकी कांदा लसणाचे खाण्याची सवय केली आहे.

कंजूस's picture

5 Sep 2023 - 10:05 am | कंजूस

रेल्वेतील स्वच्छता

(१)गाडीचे शेड्यूल /टाइमटेबल पाहतो. (रेलयात्री app यात चांगले आहे. कारण न थांबणारी स्टेशन्स आणि राज्य कोणते हे वेगळ्या रंगात दिसते. रात्री आपण नक्की कुठे आहोत हे कळते. मी ती कागदावर लिहून घेतो त्यामुळे वारंवार मोबाईल उघडावा लागत नाही. शिवाय कुणी प्रवासी आपल्याला विचारतात की गाडी अमुक ठिकाणी थांबेल का त्याचेही उत्तर ठामपणे देता येते. मी कित्येक लोकांना चकीत केले आहे. ) (२) सांगायचा मुद्दा म्हणजे गाडी किती मिनिटे/वेळ थांबेल यावरून अंदाज येतो की इथे काही विशेष आहे. वीस पंचवीस मिनिटे आठ बारा तासांनी म्हणजे तिथे टॉइलेट सफाई,पाणी भरणे कार्यक्रम असतो. अहमदाबाद,झाशी,सोलापूर वगैरे.

(३)रेल्वेच्याच NTES APPमधून टाइमटेबल पाहिल्यास
एखाद्या ठिकाणी reversal 1 किंवा 2 असले तर तिथे गाडीचे पुढचं एंजिने काढून मागे लावून दुसऱ्या मार्गावर जाते . उदाहरणार्थ उज्जैन, विजयवाडा,संबळपूर वगैरे.

कुमार१'s picture

5 Sep 2023 - 11:00 am | कुमार१

मी ती कागदावर लिहून घेतो त्यामुळे वारंवार मोबाईल उघडावा लागत नाही.

चांगली सवय.
मी पण प्रत्येक प्रवासात तिकिटाचा पीएनआर क्रमांक छोट्या वहीत पेनाने नोंदवून ठेवतो. चुकून कधी मोबाईल काम करेनासा झाला तर तो कामी येतो असा अनुभव आहे.

कुमार१'s picture

5 Sep 2023 - 7:02 pm | कुमार१

सोलापूर ते म्हैसूर जाणारी गोलघुमट एक्सप्रेस (१६५३६) आजपासून पंढरपूर ते म्हैसूर अशी झालेली आहे.

कंजूस's picture

6 Sep 2023 - 1:52 pm | कंजूस

कोल्हापूर ते तिरुपती एक्स्प्रेस ही 'हरिप्रिया' आहे.
पंढरपूर ते मैसुरू ही 'चामुंडाप्रिया' होणार?

कुमार१'s picture

8 Sep 2023 - 9:11 pm | कुमार१

व्यापारसमृद्धीसाठी आखाती देश एकमेकांशी रेल्वेने जोडून पुढे बंदरामार्गे भारताशी जोडण्याची योजना आहे या दृष्टीने G-20 मध्ये बोलणी होतील.

कुमार१'s picture

13 Sep 2023 - 7:42 am | कुमार१

सध्याच्या उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी चिलखती ट्रेनमधून रशियाला प्रवास केल्याने ही ट्रेन सध्या चर्चेत आहे.

ok
( चित्र सौजन्य : cna)

राष्ट्राध्यक्षांनी ट्रेनने प्रवास करण्याची उत्तर कोरियात परंपरा आहे.

कुमार१'s picture

15 Sep 2023 - 8:58 am | कुमार१

एका प्रवाशाने ३- एसीचे पक्के तिकीट काढलेले होते. परंतु प्रत्यक्ष प्रवास सुरू होण्यापूर्वी त्याला रेल्वेकडून संदेश आला की तुमच्या तिकिटाची अवनती करण्यात आलेली असून आता तुम्हाला 3Economy या खालच्या वर्गात बसायचे आहे.

बरं, हा प्रकार केला तो केला. आता दोन तिकीट वर्गांच्या दरांमधील फरकाची रक्कम रेल्वेने ग्राहकाला थेट बँक खात्यावर सुलभपणे परत करणे अपेक्षित आहे. परंतु इथेही उफराटा प्रकार आहे !

त्या प्रवाशाला प्रवासादरम्यान TTE अवनतीचे प्रमाणपत्र देणार आणि मग या प्रवाशानेच ते अमुक्तमुक साइटवर चढवा आणि अन्य हमाली करायची आहे. तिथला अनुभव अत्यंत टुकार आहे.
हे बिलकूल न पटणारे आहे.

नेहमी प्रवास करणारे प्रवासी समजून घेतील म्हणून तसं करत असतील.

केदार पाटणकर's picture

15 Sep 2023 - 1:12 pm | केदार पाटणकर

प्रतिसाद छान. माहिती छान.

कुमार१'s picture

17 Sep 2023 - 10:59 am | कुमार१

शकुंतला नावाची नॅरोगेज रेल्वे एकेकाळी आर्वी ते पुलगाव अशी 35 किलोमीटरच्या टप्प्यात धावत असे. कापूस व तेल यांच्या व्यापारासाठी ती उपयुक्त होती.
पंचवीस वर्षांपूर्वी ही गाडी बंद झाली.
ok

या जुन्या ब्रिटिशकालीन अरुंद मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून शकुंतला पुन्हा सुरू करावी यासाठी संबंधित विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. अधूनमधून आंदोलनेही होत असतात.

निनाद's picture

18 Sep 2023 - 7:13 am | निनाद

जुन्या ब्रिटिशकालीन अरुंद मार्गाचे रूपांतर न करता जुनीच शकुंतला पुन्हा सुरू करावी. यासाठी खास राज्यातील यवतमाळ येथे टुरिझम प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत.

  1. येथे जुन्याच काळातील रेल्वेतील वापराच्या वस्तूंचे रेल्वे संग्रहालय ठेवता येईल.
  2. जेथे जेथे ही रेल्वे थांबेल तेथे त्या गावातील खास गोष्टी/खाद्य पदार्थ यांचे स्टॉल्स लावता येतील.
  3. अचलपूर इत्यादी भागात डे ट्रिप्स, घेऊन या रेल्वे जायचे आणि डेस्टिनेशन गावात भरपूर मनोरंजनाच्या सोयी, फन पार्क इत्यादी बनवायचे आणि संपूर्ण पॅकेजचे पैसे घेता येतील
  4. याभागात कापूस पिकतो, त्यावर आधारीत वस्त्रे विकता येतील. त्यावर आधारीत भारतीय फॅशन शो एक्सप्रेस असा एक आठवडा घोषीत करता येईल
  5. नवरात्रीसाठी यवतमाळ प्रसिद्ध झाले आहे. नवरात्र काळात रात्री फेर्‍या हे खास आकर्षण होऊ शकेल.

असे काही झाले तर ही लहानशी रेल्वे खूप लोकांचे आकर्षण बनेल यात शंका नाही. या प्रकल्पाने विदर्भाच्या या दुर्लक्षित भागाचे रूप पालटेल हे पण नक्की.

वानगी दाखल असाच एक पफिंग बिली नावाचा प्रकल्प लोक सहभागातून सुरू झाला होता. आणि आज तो या भागाचे प्रमुख आकर्षण बनला आहे.
या गाडीची तिकिटे कायम आधी बुक करावी लागतात.

कुमार१'s picture

18 Sep 2023 - 9:11 am | कुमार१

पफिंग बिली प्रकल्प

चांगली माहिती.

कुमार१'s picture

18 Sep 2023 - 9:12 am | कुमार१

काल सकाळी अकरा वाजता 45 वर्षीय निलेश केमाले कुर्ला रेल्वे स्थानकात उतरले आणि उतरताच हृदयविकाराच्या झटक्याने बेशुद्ध होऊन फलाटावर कोसळले.
त्याप्रसंगी तत्परता दाखवून रेल्वे सुरक्षा दलाचे शिपाई मुकेशकुमार यादव यांनी ‘सीपीआर’ पद्धतीचा वापर करून केमाले यांना जीवदान दिले आहे.

यादव यांचे अभिनंदन !
(बातमी : छापील मटा 18/9/2023)

निनाद's picture

21 Sep 2023 - 9:14 am | निनाद

रूची असल्यास भारतीय रेल्वे विषयक पुस्तके येथे वाचायला मिळू शकतात.
https://indianrailways.gov.in/Ebook.html दुवा चालतो आहे एक पुस्तक उघडून पाहिले आहे.

कंजूस's picture

1 Oct 2023 - 11:04 am | कंजूस

रेल्वे विषयक पुस्तके

काही कामांची "पुस्तके" नाहीत.
जुन्या टाइमटेबलांतून पाच दहा पाने निवडून त्यांची भेळ पीडीएफ करण्याचा खटाटोप आहे.

फारएन्ड's picture

5 Nov 2023 - 12:54 am | फारएन्ड

या पुस्तकांत बरीच इंटरेस्टिंग माहिती आहे. काही जुने फोटोही मस्त आहेत. प्रत्येक पुस्तकात सुरूवातीला आहे तो बहुतेक जुन्या डेक्कन क्वीनचा फोटो आहे. काळे इंजिन वाला. आपल्यापैकी बहुतेकांनी ती इंजिने वापरात पाहिली नसावीत.

पण तपशीलात काही चुका वाटल्या. उदा: "लोकोमोटिव्ज अ‍ॅण्ड ईएमयू" या पुस्तकात पान १० वर जुन्या "डब्ल्यूसीएम" इंजिनाचा फोटो आहे. डीसी ट्रॅक्शन वाल्या. पुणे-मुंबई रूट वर पूर्वी ही इंजिने असत. तेथे तपशील इंग्लिश इलेक्ट्रिक/व्हल्कन फाउन्ड्री मधून बनवलेल्या इंजिनाची माहिती आहे. पण फोटो आहे तो "डब्ल्यूसीएम-५" या इंजिनाचा - जे भारतीय बनावटीचे होते. इंग्लिश इलेक्ट्रिक मधली बहुधा डब्ल्यूसीएम १ व २ वाली होती. ती दिसायला थोडी वेगळी आहेत.

ही अशी दिसतात
डब्ल्यूसीएम - ५ यांचे पुढचे बॉनेट लांबीला कमी पण उंचीला जास्त होते. ही भारतीय बनावटीची आहेत.
डब्ल्यूसीएम - १ यांचे बॉनेट मोटारीसारखे थोडे लांब आणि गोलाकार पुढे असते. ही इंग्लिश बनावटीची ही आयात केलेली आहेत.

"डेक्कन क्वीन" म्हंटल्यावर जी इंजिने डोळ्यासमोर येतात ती या फॅमिलीमधली. ही इंजिने व "लिव्हरीड" असलेली - इंजिन व डबे एकाच रंगात रंगवलेली- डेक्कन क्वीन खूप देखणी दिसत असे.

तसेच "रेल इलेक्ट्रिफिकेशन" या पुस्तकाच्या पान ३ वर "लोकमान्य" या भारतात बनलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची माहिती आहे. पण त्यावरचा फोटो हा वेगळ्याच इंजिनाचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे लोकमान्य हे डब्ल्यूसीएम-५ मॉडेल मधले इंजिन होते आणि ते डेक्कन क्वीन करता वापरले गेले. हे फोटोमधले इंजिन पुणे-मुंबई रूटवर गाड्या ओढताना दिसत नसे. बहुतांश कर्जतचे बँकर्स म्हणून दिसत.

भारतीय रेल्वेच्या लोकांना ही माहिती अचूकपणे नसेल ही शक्यताच नाही. पण इ-बुक्स बनवणार्‍यांना नसावी आणि ती पुस्तके बनवताना गडबड केली असावी.

कुमार१'s picture

30 Sep 2023 - 4:32 pm | कुमार१

सांगली स्थानक महाराष्ट्रात स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर

ok
अभिनंदन !

कुमार१'s picture

30 Sep 2023 - 4:33 pm | कुमार१
धर्मराजमुटके's picture

4 Oct 2023 - 3:21 pm | धर्मराजमुटके

वंदे भारत बद्द्ल एक सुंदर संवाद इथे पहा.

कुमार१'s picture

4 Oct 2023 - 4:18 pm | कुमार१

सुरवात पाहिली. एक तासाची मुलाखत आहे
सवडीने पहावी लागेल

पुणेरी मेट्रोमध्ये अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’

बातमीचा दुवा

बोका's picture

7 Oct 2023 - 10:05 pm | बोका

लोकसत्ताला यात विशेष काय वाटले कोणास ठाउक.
अशी 'अत्याधुनिक' सिस्टिम कोलकाता , कोची, बंगळूरात वापरात आहे.

कुमार१'s picture

18 Oct 2023 - 9:14 am | कुमार१

निलगिरी पर्वतातील मीटर गेज रेल्वेची 116 वर्षे पूर्ण !
ती या श्रेणीमधली आशियातील सर्वात लांब पल्ल्याची आणि सर्वात जास्त चढाचा मार्ग असलेली आहे.

हवाईदलात असताना रेल्वे प्रवासाचे रंजक किस्से सादर केले गेले होते. त्याची लिंक देत आहे.

गवि's picture

30 Oct 2023 - 6:52 am | गवि

https://www.loksatta.com/desh-videsh/massive-accident-in-andhra-pradesh-...

पुन्हा एकदा दोन ट्रेन्सची समोरा समोर धडक. अशा घटना वाढल्या आहेत का? पूर्वी रेल्वे प्रवास सर्वात सुरक्षित वाटत असे. समोरासमोर दोन ट्रेन्स येणे आणि आदळणे ही तर कल्पनाही मनात येत नसे प्रवास करताना. आताशा मात्र किमान तीन चार घटना घडल्याचे आठवते.

कुमार१'s picture

30 Oct 2023 - 9:29 am | कुमार१

काळजी वाटते

कुमार१'s picture

31 Oct 2023 - 9:54 am | कुमार१

आंध्र प्रदेशातील अपघात लोको पायलटच्या चुकीमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष

पूर्णपणे रुळावर आधारित व्यवस्थेत लोको पायलटच का, कोणत्याही एका व्यक्तीचे काहीतरी चुकण्यावर अथवा न चुकण्यावर अपघात होण्या न होण्याची शक्यता का शिल्लक ठेवली गेली आहे हे अभ्यासून बघावे लागेल.

कुमार१'s picture

3 Nov 2023 - 9:36 am | कुमार१
मदनबाण's picture

5 Nov 2023 - 11:39 am | मदनबाण

एक झकास व्हू :- New Vande Bharat Express | Kesari/Saffron/Orange Coloured | Crossing Aroor Bridge 4K

मिपा तंत्रज्ञ यांना विनंती... ते जरा embedded कोड एनेबल करण्याची कृपा करावी, व्हिडियो देताना बरं वाटतं !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Thaai Kelavi - Official Video Song | Thiruchitrambalam | Dhanush | Anirudh | Sun Pictures

कोरोनाकाळात बंद झालेली कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस आता कोल्हापूर पुणे अशी सुरु झाली आहे.
बातमीचा दुवा

रेल्वे संबंधित चांगली पुस्तके आहेत पण ती खाजगी आहेत. खूप महागही आहेत.

कुमार१'s picture

8 Nov 2023 - 8:45 pm | कुमार१

भारतीय रेल्वेची विद्युतीकरणामधील प्रगती चांगली आहे.

अलीकडे युरोपमध्ये tribrid ट्रेन्स ही नवी प्रगती म्हणावी लागेल.
तीन प्रकारच्या उर्जेवर त्या चालू शकतात : निव्वळ बॅटरी, विद्युत प्रवाह आणि डिझेल.
ok

कुमार१'s picture

13 Nov 2023 - 3:35 pm | कुमार१

एसी डब्याचं तिकिट घेऊनही गर्दीमुळे ट्रेन चुकलेल्या युवकाचा संताप

पूर्ण परतावा मिळावा म्हणून त्याचे रेल्वेमंत्र्यांना इ-निवेदन .

कुमार१'s picture

23 Nov 2023 - 12:41 pm | कुमार१

वंदे भारत गाडीमध्ये प्रत्येक सीटच्या मागे खाण्याचे पदार्थ ठेवण्यासाठीचे trays दिलेले आहेत. त्या ट्रेवर फक्त खाद्यपदार्थ ठेवणे अपेक्षित असून तेवढेच वजन त्यांना पेलणार आहे. तरीसुद्धा काही पालक आपल्या लहान मुलांना खुशाल त्या ट्रेवर बसवत आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत जाहीर नापसंती व्यक्त केलेली आहे .

कंजूस's picture

23 Nov 2023 - 2:11 pm | कंजूस

बालहट्ट

कुमार१'s picture

29 Nov 2023 - 8:36 am | कुमार१

सुरत जवळ सचिन नावाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु त्याचा क्रिकेटपटूशी काही संबंध नाही.

कंजूस's picture

13 Dec 2023 - 6:49 pm | कंजूस

IRCTC website चालत नव्हती पंधरा दिवस. महिना,दिवस यासाठी कॅलेंडरवर क्लिक केले की बंद होत असे. पण आता ओके. तारीख आपणच बदलायची आहे.(dd/mm/yyyy) .शिवाय ट्रेन टाइमटेबलमध्ये किमी डिस्टन्स आकडे येत नव्हते ते आले. (पण NTES APPमध्ये एंजिन रिवर्सल देतात ते मात्र नाही)

-------------
Unreserved डब्यात टू टिअर बाकडी आहेत. वरच्या बाकावर कुशन आहे पण वरती चढून बसायला शिडी नाही. कुशन लावलेले बाक सामानासाठी?

कुमार१'s picture

14 Dec 2023 - 9:13 am | कुमार१

धावत्या ट्रेनची वेळ आणि स्थान यांची परिस्थिती दाखवण्यासाठी जी 'रेलयात्री' सुविधा आहे तिचा अत्यंत टुकार अनुभव आला. प्रत्यक्ष गाडी दोन तास उशिरा धावत असूनही त्या ॲपमध्ये ती वेळेवर दाखवल्याचे दिसले.

एकाने प्रवासात सुचवले, की त्यापेक्षा 'व्हेअर इज माय ट्रेन' हे ॲप बघत चला.
आता अनुभव घेईन.

रेलयात्री app रेल्वेचं नाही. Locate my train ही बरं आहे. सर्वोत्तम म्हणजे Osmand map app मधून महाराष्ट्र/कर्नाटक वगैरे map download (फक्त १६०/१७० एमबीचा असतो.) करून ठेवावा. इंटरनेट बंद ठेवूनही गाडी प्रमाणे map वर बाण सरकताना दिसतो. इतर वेळीही रस्त्याने जाताना ही युक्ती उपयोगी पडते. रूट ट्रेसिंगही करून कुणाला नकाशा देता येते.

कुमार१'s picture

14 Dec 2023 - 5:27 pm | कुमार१

माहितीसाठी धन्यवाद.

कंजूस's picture

15 Dec 2023 - 3:18 am | कंजूस

Railway चं NTES app सुद्धा धावत्या ट्रेनची वेळ आणि स्थान यांची परिस्थिती दाखवण्यासाठी वापरता येते. जीपीएस'ची गरज नसते. इंटरनेट मात्र लागते. धावत्या ट्रेनच्या आतमध्ये असलात तर काही स्टेशनांदरम्यान इंटरनेट बंद पडते ही एक अडचण.

कुमार१'s picture

15 Dec 2023 - 6:10 pm | कुमार१

एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !
पुढील पंधरा वर्षात रेल्वे मंत्रालयाने सुमारे आठ हजार नव्या गाड्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
तिकिटांची 'प्रतीक्षा यादी' ही स्थिती संपुष्टात यावी असा हेतू आहे.

प्रतीक्षा यादी' ही स्थिती संपुष्टात येणे अशक्य. पुरवठा अधिक आणि मागणी कमी अशी परिस्थिती दिसली की रेल्वेने या अगोदर गाड्या कमी केल्या /अंतरे कापली आहेत. तेच होणार. किंवा मुख्य शहरांत धावणाऱ्या एक्सप्रेस होणार. अधिकाधिक लोक गावे सोडून शहरातील खुराड्यात येणार. एसटीने कोकणात जाणारे चाकरमानी तेव्हा किती खेपा करत होते आणि आता पाहा. जोडून सुट्टी आली की जाऊन येतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Dec 2023 - 2:00 pm | अमरेंद्र बाहुबली

पहिल्यांदाच बुकींग करून रेल्वेने प्रवास केला. सेकंड किलास एसी, जळगाव ते भोपाळ. रेल्वे प्लॅटफोर्मवर येईपर्यंत धाकधूक होती. रेल्वे ने चादर नी ऊशी दिली. मस्त झोपून प्रवास झाला. वेटींग तीकीट कन्फर्म झालं. एका रेस्टोरंट मधून भूसावळ ला २०० रूपयाची महाराजा थाळी मागवली पण फोटोतले नी थाळीतले पदार्थ मॅच झाले नाहीत. रेल्वे ला तक्रार केला पण काही झाले नाही. पावलापावलावर फसवणूक :(

कंजूस's picture

28 Dec 2023 - 11:18 am | कंजूस

Order food बकवास आहे. निघतानाच काही समोसे,कचोरी पॅक करून घेणे उत्तम. केळीसुद्धा घ्यावीत.

कुमार१'s picture

28 Dec 2023 - 11:11 am | कुमार१

भारताच्या 15 राज्यात दाट धुके पसरले असल्याने चालकांना गाडी चालवताना बऱ्यापैकी कष्ट होत आहेत.
त्यांच्या मदतीसाठी FogPass हे उपकरण उपयोगी येत आहे

कंजूस's picture

28 Dec 2023 - 11:20 am | कंजूस

पण रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या माणसांना आणि जनावरांना गाडी दिसत नाही. त्यांच्यासाठी गाडी सावकाशच न्यावी लागेल.

कुमार१'s picture

29 Dec 2023 - 10:52 am | कुमार१

भारतीय रेल्वेची दोन स्थानके चक्क निनावी आहेत. त्यापैकी एक पश्चिम बंगाल तर दुसरे झारखंडमध्ये आहे.

ok

त्या स्थानकांच्या आजूबाजूच्या दोन गावांमधल्या ग्रामस्थांमध्ये आपापले नाव देण्यावरून वाद आहे..

कुमार१'s picture

4 Jan 2024 - 12:20 pm | कुमार१

एकदम धमाल नावे असलेली भारतीय रेल्वे स्थानके :
ok

नठ्यारा's picture

8 Jan 2024 - 11:41 pm | नठ्यारा

याबाबत माझी पसंती भदभदाघाट : https://indiarailinfo.com/departures/5222

-नान

प्रेयसीचे होणारे नातेवाईक.
चालायचंच.म्हणजे चालवून घ्यायचं