भाग २ इथे
..
नमस्कार
सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !
अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे.
नव्या वाचकांसाठी :
सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे. इतिहास, तंत्रज्ञानातील प्रगती, सुरक्षितता आणि अपघात, प्रवाशांच्या सोयी-गैरसोयी, प्रस्तावित नवे रेल्वेमार्ग, आर्थिक पैलू, परदेशी आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे असे काहीही इथे लिहता येईल- गद्य, पद्य किंवा प्रकाशचित्र अशा कोणत्याही स्वरूपात.
रूळगाडीतील सर्व सहप्रवाशांचे नव्या डब्यात स्वागत !
भारतीय रेल्वे
इथपासून….
......
ते
इथपर्यंत.
*****************************************************
प्रतिक्रिया
8 Jan 2024 - 5:27 pm | कुमार१
ट्रेनच्या दाराजवळील खिडक्यांना बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड असतात.
सहज चोरी रोखण्यासाठी ..
आता हे बारकाईने बघून घेण्याचे कुतूहल आहे. :)
19 Jan 2024 - 5:43 pm | कुमार१
भारतीय रेल्वे दोन यंत्रणासाठी स्वित्झर्लंडचे तंत्रज्ञान घेणार
१. hub-and-spoke model
२. बोगद्यांचे काम
7 Feb 2024 - 4:41 pm | कुमार१
पहिल्या चालकविरहित ट्रेनचे चीनहून समुद्रमार्गे चेन्नईच्या बंदरात आगमन !
तिची यथावकाश चाचणी घेतली जाईल.
16 Feb 2024 - 8:17 pm | कुमार१
बऱ्याच दिवसांपासून रुळावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग लागली होती .
अशी आग का लागते ते समजले नाही.
1 Mar 2024 - 1:05 pm | कुमार१
जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास १ मे २०२४ पासून सर्व रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा.
1 Mar 2024 - 6:34 pm | कंजूस
अमेरिकेत संरक्षण खात्यातल्या लोकांनाही पेन्शन योजना नाही असे ऐकून आहे.
4 Mar 2024 - 8:57 am | कुमार१
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आंध्र प्रदेश मधील ट्रेन अपघाताचे कारण रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित ट्रेनचे चालक व सहचालक दोघेही चालत्या गाडीत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहण्यात दंग असल्यामुळे त्यांनी सिग्नल तोडला.
13 Mar 2024 - 8:51 am | कुमार१
रेल्वे स्थानकांचे घाऊक नामांतर; मंत्रिमंडळात आज चर्चा
13 Mar 2024 - 12:26 pm | कंजूस
लांबलचक नावाची घोषणा करणे आणि ती घाईत असलेल्या प्रवाशाला कळणे कठीण होतं आहे.
15 Mar 2024 - 10:36 am | कुमार१
सांगली-बंगळूर राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही सांगलीतून सुटणारी पहिली एक्सप्रेस गाडी ठरली आहे
17 Mar 2024 - 11:03 am | मदनबाण
मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत वाढणार, मुंबई-कोल्हापूर, पुणे-वडोदरा वंदे भारत धावणार.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope
17 Mar 2024 - 4:39 pm | कंजूस
वंदे भारत गाड्या
जिथे एकेरी रूळ आहेत तिथे या गाड्यांना पुढे काढतात आणि इतर गाड्यांचे वेळापत्रक बिघडतात.
17 Mar 2024 - 7:50 pm | कुमार१
खरगपूर भद्रक पॅसेंजरने
खरगपूर-भद्रक या अंतरासाठी ४० रुपये तिकीट आणि त्याच ट्रेनने
भद्रक- खरगपूर या तेवढ्याच पण उलट अंतरासाठी ७५ रुपये तिकीट !
प्रवाशांनी तक्रारी केलेल्या आहेतच. अजून निर्णय झालेला नाही
20 Mar 2024 - 4:57 pm | कुमार१
ट्रेनच्या डब्यातील उशी व पांघरुणे चोरणारा इंजिनियर !
बातमीच्या खरेपणाबाबत कल्पना नाही
29 Mar 2024 - 10:57 am | कुमार१
ट्रेनच्या आरक्षित डब्यांमध्ये स्लीपर असो अथवा 3AC, परिस्थिती भयानक दयनीय होत चाललेली आहे आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांकडून जवळपास दररोज X या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना थेट लिहिले जात आहे.
१.
२.
30 Mar 2024 - 10:10 am | कंजूस
आरक्षित डब्यांत confirmed ticket नसताना शिरून प्रवास करणे हे काही भागांत ( railway zones) सामान्य झाले आहे. हे लोक तिकीट खिडकीवर waitlisted तिकीट मिळवतात आणि प्रवास करतात. (Irctcसाईटवरचे waitlisted ticket seat confirm न झाल्यास रद्दच होते ) उत्तर भागांत गर्दीचा रेटाच एवढा भयानक असतो की तिकीट तपासनीस काही करू शकत नाहीत. दक्षिणेकडे तर त्याचे काय करतात हे सरळ सरळ सिनेमांतच दृष्य घेतले आहे. - चेन्नई एक्सप्रेस.
30 Mar 2024 - 10:21 am | कंजूस
कोकण रेल्वे कार्पोरेशन स्थापन झाली.
रेल्वेसाठीची जमीन चार राज्यांनी देण्याचं आश्वासन देऊन संपादन करून दिलीसुद्धा. एकेरी रूळ यासाठी बहुतेक घेतली आहे. गाड्या कमी होत्या आणि वेळेत नेणे शक्य होत होते. पण आता तीस वर्षांत गाड्या खूप वाढल्या तरीही रूळ मार्ग एकेरीच राहिलेत. परिणाम म्हणजे दोन तास उशिरा धावणे हे सामान्य झाले आहे. आता दुहेरी रुळासाठी जमीन मिळवणे अशक्य झाले असावे. जमीन मिळाली तर रूळ टाकायला वेळ लागत नाही.
नेहमीच्या गाड्या ११० किमी वेगाने धावतात पण सिग्नल न मिळाल्याने दहा पंधरा मिनीटे स्टेशनांवर उभ्या राहतात. मागच्या आठवड्यात पंधरा ठिकाणी गाडी थांबण्याचा अनुभव घेतला.
4 Apr 2024 - 8:21 am | कुमार१
रेल्वे गाडीच्या टपावर झोपून 400 किलोमीटर प्रवास !
हा दंडनीय अपराध असल्यामुळे त्या तरुणाला न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली आहे.
10 Apr 2024 - 12:04 pm | कुमार१
एसी लोकलमधील साठ हजार फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी रुपयांचा दंड वसूल.
आता एक्सप्रेस गाड्यांमध्येही अशी कारवाई वाढत्या प्रमाणात व्हायला हवी.
10 Apr 2024 - 12:04 pm | कुमार१
https://www.lokmat.com/mumbai/60000-free-walk-from-ac-two-crores-fine-br...