माझी ट्रेन माझी प्रेयसी (३)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
15 Aug 2023 - 7:13 am

भाग २ इथे
..
नमस्कार
सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा !
अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे.

नव्या वाचकांसाठी :
सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे. इतिहास, तंत्रज्ञानातील प्रगती, सुरक्षितता आणि अपघात, प्रवाशांच्या सोयी-गैरसोयी, प्रस्तावित नवे रेल्वेमार्ग, आर्थिक पैलू, परदेशी आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे असे काहीही इथे लिहता येईल- गद्य, पद्य किंवा प्रकाशचित्र अशा कोणत्याही स्वरूपात.

रूळगाडीतील सर्व सहप्रवाशांचे नव्या डब्यात स्वागत !

भारतीय रेल्वे
ok

इथपासून….
......
ते
ok

इथपर्यंत.

*****************************************************

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

8 Jan 2024 - 5:27 pm | कुमार१

ट्रेनच्या दाराजवळील खिडक्यांना बाकीच्या खिडक्यांपेक्षा जास्त रॉड असतात.
सहज चोरी रोखण्यासाठी ..

आता हे बारकाईने बघून घेण्याचे कुतूहल आहे. :)

कुमार१'s picture

7 Feb 2024 - 4:41 pm | कुमार१

पहिल्या चालकविरहित ट्रेनचे चीनहून समुद्रमार्गे चेन्नईच्या बंदरात आगमन !
तिची यथावकाश चाचणी घेतली जाईल.

ok

कुमार१'s picture

16 Feb 2024 - 8:17 pm | कुमार१

बऱ्याच दिवसांपासून रुळावर उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याला आग लागली होती .
अशी आग का लागते ते समजले नाही.

कुमार१'s picture

1 Mar 2024 - 1:05 pm | कुमार१

जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास १ मे २०२४ पासून सर्व रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा.

अमेरिकेत संरक्षण खात्यातल्या लोकांनाही पेन्शन योजना नाही असे ऐकून आहे.

कुमार१'s picture

4 Mar 2024 - 8:57 am | कुमार१

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आंध्र प्रदेश मधील ट्रेन अपघाताचे कारण रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित ट्रेनचे चालक व सहचालक दोघेही चालत्या गाडीत मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहण्यात दंग असल्यामुळे त्यांनी सिग्नल तोडला.

लांबलचक नावाची घोषणा करणे आणि ती घाईत असलेल्या प्रवाशाला कळणे कठीण होतं आहे.

कुमार१'s picture

15 Mar 2024 - 10:36 am | कुमार१

सांगली-बंगळूर राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही सांगलीतून सुटणारी पहिली एक्सप्रेस गाडी ठरली आहे

ok

कंजूस's picture

17 Mar 2024 - 4:39 pm | कंजूस

वंदे भारत गाड्या

जिथे एकेरी रूळ आहेत तिथे या गाड्यांना पुढे काढतात आणि इतर गाड्यांचे वेळापत्रक बिघडतात.

कुमार१'s picture

17 Mar 2024 - 7:50 pm | कुमार१

खरगपूर भद्रक पॅसेंजरने
खरगपूर-भद्रक या अंतरासाठी ४० रुपये तिकीट आणि त्याच ट्रेनने
भद्रक- खरगपूर या तेवढ्याच पण उलट अंतरासाठी ७५ रुपये तिकीट !

प्रवाशांनी तक्रारी केलेल्या आहेतच. अजून निर्णय झालेला नाही

कुमार१'s picture

20 Mar 2024 - 4:57 pm | कुमार१
कुमार१'s picture

29 Mar 2024 - 10:57 am | कुमार१

ट्रेनच्या आरक्षित डब्यांमध्ये स्लीपर असो अथवा 3AC, परिस्थिती भयानक दयनीय होत चाललेली आहे आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांकडून जवळपास दररोज X या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना थेट लिहिले जात आहे.

१.

२.

कंजूस's picture

30 Mar 2024 - 10:10 am | कंजूस

आरक्षित डब्यांत confirmed ticket नसताना शिरून प्रवास करणे हे काही भागांत ( railway zones) सामान्य झाले आहे. हे लोक तिकीट खिडकीवर waitlisted तिकीट मिळवतात आणि प्रवास करतात. (Irctcसाईटवरचे waitlisted ticket seat confirm न झाल्यास रद्दच होते ) उत्तर भागांत गर्दीचा रेटाच एवढा भयानक असतो की तिकीट तपासनीस काही करू शकत नाहीत. दक्षिणेकडे तर त्याचे काय करतात हे सरळ सरळ सिनेमांतच दृष्य घेतले आहे. - चेन्नई एक्सप्रेस.

कोकण रेल्वे कार्पोरेशन स्थापन झाली.

रेल्वेसाठीची जमीन चार राज्यांनी देण्याचं आश्वासन देऊन संपादन करून दिलीसुद्धा. एकेरी रूळ यासाठी बहुतेक घेतली आहे. गाड्या कमी होत्या आणि वेळेत नेणे शक्य होत होते. पण आता तीस वर्षांत गाड्या खूप वाढल्या तरीही रूळ मार्ग एकेरीच राहिलेत. परिणाम म्हणजे दोन तास उशिरा धावणे हे सामान्य झाले आहे. आता दुहेरी रुळासाठी जमीन मिळवणे अशक्य झाले असावे. जमीन मिळाली तर रूळ टाकायला वेळ लागत नाही.
नेहमीच्या गाड्या ११० किमी वेगाने धावतात पण सिग्नल न मिळाल्याने दहा पंधरा मिनीटे स्टेशनांवर उभ्या राहतात. मागच्या आठवड्यात पंधरा ठिकाणी गाडी थांबण्याचा अनुभव घेतला.

कुमार१'s picture

4 Apr 2024 - 8:21 am | कुमार१

रेल्वे गाडीच्या टपावर झोपून 400 किलोमीटर प्रवास !
हा दंडनीय अपराध असल्यामुळे त्या तरुणाला न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली आहे.

कुमार१'s picture

10 Apr 2024 - 12:04 pm | कुमार१

एसी लोकलमधील साठ हजार फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी रुपयांचा दंड वसूल.
आता एक्सप्रेस गाड्यांमध्येही अशी कारवाई वाढत्या प्रमाणात व्हायला हवी.

कुमार१'s picture

13 Sep 2025 - 7:42 am | कुमार१

पुणे रेल्वे स्थानकावर सहा नवे फलाट नव्याने बांधण्यात येणार आहे नुकताच रेल्वेमंत्र्यांनी तसा आदेश काढला आहे. तसेच सध्याच्या फलाटांपैकी काहींची लांबी वाढवण्यात येणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे.

(बातमी छापील म टा 13/9)

हडपसर आणि घोरपुरी (घोरपडी?) येथे तीन तीन असतील. हडपसर ते जोधपूर गाडी सुरू झालीच आहे.

कंजूस's picture

18 Sep 2025 - 11:04 am | कंजूस

रेल्वेचे नवीन RailOne app ( २७ जून २०२५ पासून)

रेल्वेची तीन ॲपस अगोदरपासून होतीच.

१. टिकेट बुकिंगचे RAIL CONNECT IRCTC app त्यात पॅसेंजर ट्रेन्स अनारक्षित गाड्या वेळापत्रक नाही.
२. NTES App मध्ये सर्व गाड्यांचे वेळापत्रक मिळते, spot your train, exception table आहे पण बुकिंग होत नाही.

३. UTS app यात प्लॅटफॉर्म तिकिट, जर्नी टिकेट अशी अनारक्षित तिकिटे मिळतात.

या तिन्हींचे एकत्रीकरण करून RailOne app जून २०२५ मध्ये सुरू झाले आहे. RAIL CONNECT IRCTC चे लॉगिन पासवर्ड ,युझरनेम वापरता येतात. सहा आकडी यूजर पिन नवीन टाकावा लागेल. किंवा नवीनच नोंदणी करता येईल. शिवाय कोच पोझीशन, rail madad तक्रार आहे.
____________________________
गाडीचे वेळापत्रक आणि सर्व थांबे तसेच कोणत्या राज्यांतून जाते हे पाहण्यासाठी मात्र Railyatri app( रेल्वेचे नाही हे) पाहावे लागते.

कुमार१'s picture

18 Sep 2025 - 11:11 am | कुमार१

माहितीबद्दल धन्यवाद !

www.irctc.co.in या संकेतस्थळावरुन तिकीट काढायचे असल्यास आता आपल्या खात्यात जाऊन परवलीचा शब्द बदलून ठेवा; आता तो अकरा अक्षरांचा करायचा आहे. तसेच तत्काळ तिकीटासाठी पूर्वतयारी म्हणून आधार Authentication करून ठेवावे. ( ओटीपीद्वारा)

आधार verification व Authentication या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

कंजूस's picture

18 Sep 2025 - 1:14 pm | कंजूस

पाच सहा वर्षांपूर्वी IRCTC registration .....

करतानाच फोन नंबर, आधार आणि इमेल व्हेरिफिकेशन केले होते तसेच पोस्ट ऑफिस आणि पोस्टल पिन नंबरही अद्ययावत केलेले. आता ओनलाइन तिकिट काढण्यासाठी हे सर्व केले असले तरच तिकिट निघेल असा नियम आल्याचे यूट्यूबवर विडिओ टाकत आहेत लोक.

कुमार१'s picture

18 Sep 2025 - 1:53 pm | कुमार१

+ Authentication यावर्षी लागू झाले आहे.

कंजूस's picture

18 Sep 2025 - 5:10 pm | कंजूस

आधार Authentication नाही तर तिकिट नाही....

हे आता लागू झाले आहे हे मान्य पण ते मी फार पूर्वीच केले आहे अकाऊंट उघडताना. आधार कार्डाला जोडलेल्या फोनला ओटिपी घेऊन.
_______________________
बाकी काही विशेष तिकिटे ही तिकिट काउंटरवरच मिळवावी लागतात, ओनलाइन मिळत नाहीत.
त्यांचे विडिओ पाहा......
1. What is circular journey ticket?
https://youtu.be/bGNnNSJDN60?si=1emxkWWA8eEkNBib

2. What is break journey ticket?
https://youtu.be/2t99uIaaREg?si=97IZR4hs8NH6EMVT

3. What is onward journey ticket?
https://youtu.be/C6HqCMfLwdw?si=SpdmR0kgvSoMAGrO

4. Counter ticket x online ticket
https://youtu.be/X4gYCVUvS8w?si=0TVILDZhcX7_mjBV

रेल्वे गाडीची कोच पोझिशन .....

हे मात्र रेल्वेला सुसंगत करता आले नाही अजून हे माझ्या गेल्या सहा महिन्यांतल्या अनुभवावरून सांगतो.
गाडीचा चार्ट तयार झाल्यावर आणि येण्यासाठी दोन तास बाकी असताना तिकिटांच्या PNR चा अंतिम मेसेज येतो त्यात दाखवलेल्या क्रमांकाने डबे नसतात, उलट असतात. पण फलाटावर लावलेल्या सूचनेप्रमाणे असतात. हे मात्र मेसेजमध्ये बरोबर उलट सापडते. डेटा अपडेट होत नाही. रेल्वेलाच अचुकता राखता येत नाही तर इतर ॲपतरी असं बरोबर सांगणार? असो.

कुमार१'s picture

18 Sep 2025 - 2:17 pm | कुमार१

एरवीचे तिकीट काढताना रेलयात्री app वरून बऱ्यापैकी सोपे जाते; त्यांचे captcha सुद्धा डोळ्यांना सुखद असतात. परंतु तात्काळच्या दिवशी सकाळी दहा वाजता संकेतस्थळ बरोबर खुले होते मात्र रेलयात्रीला त्या कामासाठी साडेदहापर्यंत प्रवेश नसतो. म्हणजे रेलयात्री app हे खाजगी दलालासम धरले जाते की काय कोण जाणे ?

तत्काळच्या वेळेस संकेतस्थळावर जी काही ऑनलाईन ' चेंगराचेंगरी' होते त्याला तोड नाही. यावर्षीपासून तात्काळ तिकीट काढायला बसले की अंगावर काटाच येतो. शिल्लक जागा आपण क्लिक करतो व पैसे भरायला जाईपर्यंत ती संपुष्टात येते. एका ग्राहकाने या संबंधित केलेले टिप्पणी

कंजूस's picture

18 Sep 2025 - 4:12 pm | कंजूस

तत्काळचे तिकिट

जलद काढण्यासाठी
https://youtu.be/8NeskW0htgQ?si=NLKCkoMUswpMnkCa
या विडिओत सांगितले तसं करता का?

कुमार१'s picture

18 Sep 2025 - 4:39 pm | कुमार१

मी कुठलेही वॅलेट वापरत नाही. त्या व्हिडिओत दाखवलेल्या गोष्टी कितपत विश्वासार्ह आहेत त्याची शंका वाटते. तिथल्या खालच्या काही प्रतिक्रिया पण तशा वाटल्या.
बघू नीट अभ्यास करायला पाहिजे.
माहिती तील कोणाचा अनुभव असेल तर जास्त बरे होईल.
आभार !

रात्रीचे चांदणे's picture

18 Sep 2025 - 10:25 pm | रात्रीचे चांदणे

IRCTC ई-वॉलेट विश्वासार्ह आहे. विशेषतः तात्काळ तिकिटांसाठी उपयुक्त ठरत. OTP ची आवश्यकता नसल्यामुळे व्यवहार लवकर पूर्ण होऊन तात्काळ तिकिट मिळवणे सोपे होते.

कुमार१'s picture

19 Sep 2025 - 7:49 am | कुमार१

धन्यवाद ! पाहतो.

इतर यूट्यूबर लोकांनी हीच पद्धत दिली आहे.
.
.
१८ तारखेची खरड पाहिली का? विविध तिकिटांचे प्रकार दिले आहेत पण मी ते करून पाहिले नाहीत अजून. ब्रेक जर्नी, ओनवर्ड जर्नी, सरक्यूलर तिकिट इत्यादी. पूर्वी धार्मिक यात्रा करणारे गट सरक्यूलर तिकिटे काढायचे. अजुनही काढतात. सौराष्ट्रात जाणारे विशेषतः

कुमार१'s picture

19 Sep 2025 - 11:15 am | कुमार१

मी पण नाही पाहिलेले ते प्रकार अजून करून.
. . .
मध्यंतरी रात्रीचा प्रवास करताना दोन गाड्यांमध्ये पाच तासांचे अंतर होते तेव्हा प्रथमच रेल्वे स्थानकावरील समूह विश्रांतीगृह ऑनलाईन बुक करून पाहिले. मला साधी खिडक्या उघड्या असलेलीच खोली हवी होती परंतु ती उपलब्ध नसल्याने नाईलाजाने वातानुकूलित घेतली. याचे तासांवर पैसे असतात.

तिथे दोन बर्थ या पद्धतीने एकूण दहा माणसे होतो. माझ्या डोक्याकडचा आणि डोक्यावरचा हे दोघेही प्रचंड घोरणारे निघाल्यामुळे अजिबात झोप आली नाही 😂

एसी प्रीपेड रिटायरिंग हॉल आवडू लागले आहेत.

चेन्नई एगमोर आणि सेंट्रलला ३५/- तास . रेल्वेचे कर्मचारीच काम पाहात होते.
मदुरैला २०/- दर होता. वडोदरा २०/- तास. खाजगी स्टॉलवालाच काम पाहात होता.
त्रिची २०/- शेजारच्या खाद्यपदार्थ स्टॉलला एक छोटी खिडकी दिली होती आणि त्यातूनच पदार्थ घेता येत होते. पदार्थ फारच चांगले होते.

कुमार१'s picture

19 Sep 2025 - 4:17 pm | कुमार१

मध्य रेल्वेने चालू केली आहे.
लवकरच ती प्रणाली सर्व गाड्यांना मिळो.

काही ठिकाणी रेल्वे रुळांवर हत्ती/ नीलगायी येतात अचानक. त्यांना वाचवण्यासाठी काही प्रणाली शोधताना याचा शोध लागला म्हणे.

कुमार१'s picture

23 Sep 2025 - 9:40 am | कुमार१

Railone हे सरकारी ॲप तिकीट काढायला सुटसुटीत असल्याचे वाचले. त्यावर यूपीआय वापरता येईल. IRCTC सदस्याला तिकडचीच सदस्य माहिती इथे वापरता येते.
आता काही दिवसांनी अनुभव पाहू.

कंजूस's picture

23 Sep 2025 - 12:50 pm | कंजूस

मी जरा चाचपले RailOne...
मधल्या त्या तारखेला आरक्षण मिळत नसेल तर railconnect मध्ये तिथेच कॅलेंडरवर क्लिक करून तारीख बदलता येते ती सोय दिसली नाही. परत मागे जाऊन तारीख बदलावी लागते ही छोटीशी गोष्ट लक्षात आली.

कुमार१'s picture

23 Sep 2025 - 4:50 pm | कुमार१

त्या तारखेला आरक्षण मिळत नसेल तर
>>>
View nearby dates असे तिथेच खाली आहे.

कंजूस's picture

29 Oct 2025 - 10:08 pm | कंजूस

विशेष आराम गाड्यांच्या ( राजधानी, वन्दे भारत वगैरे) आरक्षणांतून जेवणाचे पर्याय यातून "नको" हा पर्याय काढला रेल्वेने ( आइआरसिटीसीने) अशी ओरड सुरू झाली दोन चार दिवसांत. यावर रेल्वे अधिकारी म्हणतात नाही काढला. तिथेच बाजूला कुठेतरी तो पर्याय आहे ( बातमी.) खरं खोटं खोटं माहीत नाही.