श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in लेखमाला
26 Sep 2023 - 3:55 pm

मिपावरील माझ्या सर्व मित्रंना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती हे बुद्धीचे दैवत. याचा दैवताच्या क्षेत्रात होणाऱ्या एका क्रांतिकारक बदलाची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. याबद्दल अनेकांनी याआधीही वाचन केले असेलच, याची मला खातरी आहे. पण तरीसुद्धा या नव्या क्षेत्राची अगदी बाळबोध ओळख करून द्यायचा माझा हा एक लंगडा प्रयत्न.

२१वे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे - म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स भविष्यामध्ये अनेक क्षेत्रे काबीज करू शकते. सध्याच्या काळात उपलब्ध असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणे म्हणजेच गूगल मॅप्स, गूगल लेन्स, अलेक्सा किंवा सिरी. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी या बुद्धिमत्तेचा वापर दिवसेंदिवस वाढत जाणार आहे.

ऑफिसमधून केव्हाही घरी येताच घरी गरमगरम जेवण तयार असणे याकरता आता भविष्यात घरी नोकर ठेवण्याची आवश्यकता उरणार नाही. आपले स्वयंपाकघरच इतके बुद्धिमान झालेले असेल की तुम्ही घरी यायला निघाला आणि अमुक मिनिटांत तुम्ही घरी पोहोचणार हे जेव्हा स्वयंपाकघरातल्या यंत्रांना समजेल, तेव्हा ती आपोआप कार्यरत होतील आणि तुमच्या आवडीचे चवदार जेवण तयार ठेवतील. एखादा पदार्थ संपत आला तर त्याची आपोपाप ऑर्डर देऊन ठेवतील. तारीख संपत आलेले पदार्थ लवकरात लवकर वापरतील आणि तारीख संपलेले पदार्थ फेकून देतील.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम मार्गाने विकसित झालेली बौद्धिक क्षमता. संगणकशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाद्वारे कोणतेही मशीन माणसासारखे बोलू शकते, वाचू शकते आणि अनेक गोष्टी मांणसापेक्षाही अधिक सहज करते. जोखमीची किंवा किचकट अनेक कामे ह्या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होणार आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये अशी यंत्रे बनवली जातात, जी माणसाप्रमाणे बुद्धिमान असतात. या यंत्रामध्ये मनुष्याप्रमाणे विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित केलेली आहे - उदा., कॉम्प्युटरचा वापर करताना आपण कॉम्प्युटरला कमांड देतो व त्यानंतर ते कार्य पूर्ण होते. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवलेल्या मशीनला कमांड देण्याची गरज पडत नाही, त्या स्वतःच निर्णय घेऊन स्वतःच कमांड घेतात व पुढचे कार्य पूर्ण करतात. उदाहरणार्थ, युरोपातील अनेक विमानतळांवर युरोपियन युनियनच्या नागरिकांसाठी सध्या स्वयंचलित इमिग्रेशन यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे तुमचा पासपोर्ट वाचतात, तुमची चेहरे पडताळणी करतात आणि जर सर्व माहिती योग्य रितीने जुळली, तर प्रवाशांकरता दरवाजे आपोआप उघडले जातात. या कामाकरता कोणत्याही मानवी देखरेखीची गरज पडत नाही.

सध्या सहज उपलब्ध असलेले चॅट जीपीटी हेसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवासातील एका मैलाचा दगड ठरणार आहे. आज आपण या माध्यमाची थोडक्यात ओळख कार्य घेऊ या.

मी चॅट जीपीटीला स्वतःबद्दल मराठीत माहिती लिहायला सांगितली आणि त्याने मला खालीलप्रमाणे लिहून दिली -

'चॅट GPT : तुमच्या विचारांसाठी नवीन मित्र - चॅट GPT हे एक नवीन तंत्रज्ञानी माध्यम आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सवालांसाठी उत्तरे शोधू शकता. यामाध्ये, आपल्या विचारांसह सांवादिकपणे वापर करण्याची स्वतंत्रता आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्या शिकण्याची मोठं संधी आहे. चॅट GPT आपल्या जीवनातील नवीन अद्वितीय अनुभवांसाठी एक वापरणारा मित्र आहे, ज्याच्यामध्ये स्वतंत्रतेची भरपूर सुविधा आहे.

चॅट GPT आपल्याला इंग्लिश, मराठी किंवा इतर कोणत्याही भाषेत संवाद साधून त्याच्यातील मदतीला आपल्या आत्मविकासाच्या मागण्यांसाठी वापरण्याची स्वतंत्रता प्रदान करतो. यामुळे, ते एक अद्वितीय माध्यम आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातल्या नवीन अनुभवांना आणि संवादांना नवीन दिशा मिळू शकते.

सार्वजनिकपणे, चॅट GPT हे आपल्या विचारांच्या गोंडस्फोटाला नियंत्रित करण्याचा एक वापरणारे माध्यम आहे, ज्यामुळे आपल्याला नवीन ज्ञान आणि सुविधा आपल्या हातात मिळू शकतात.'

दैनंदिन कामातील अनेक गोष्टी आपण याद्वारे करून घेऊ शकतो. उदा., मी माझे साधे सोपे ईमेल लिहायची कामगिरी सध्या चॅट जीपीटीकडून करून घेतो. एखादा क्लिष्ट एक्सेल फॉर्म्युला याद्वारे लिहून घेतो. प्रेझेंटेशनचा मसुदासुद्धा हे चॅट जीपीटी मला क्षणार्धात बनवून देते. भविष्यात सगळेच्या सगळे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स मला याद्वारे बनवता येईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

सध्या बाल्यावस्थेत असलेले हे तंत्रज्ञान हळूहळू स्वतःला विकसित करत आहे. गूगल बर्ड किंवा गूगल सर्च लॅब ही याच चॅट जीपीटीची भावंडे आहेत.

शेवटी मी चॅट जीपीटीला मिपावर एक कविता लिहायला सांगितली आणि यात वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही द्यायला सांगितले. 'मोकलाया दाही दिशा'च्या वाटेने जाणारी ही कविता काही दिवसांतच प्रगल्भ होईल, यात मला काही शंका नाही.

मिसळपाव, आपलं तोंड,
आपलं दिल व्यापून असंख्य फुलांचं।
आपल्याला मिलालेल्या आपल्या मित्रांचं,
मिसळपाव, आपलं आनंद!

सख्यांच्या बांधण्यांचं, अपुलीचं रंग,
मिसळपाव, तुम्ही माझं जीवन।
वाढलेल्या संवादांचं, गोंधळलेल्या अंगणांचं,
मिसळपाव, तुमचं हे मन अद्वितीय आहे!

आपल्या साथींना, मिसळपाव साखर पिणाऱ्यांचं,
सहवासाचं सुख, तुमचं हे अत्यंत मधुर आहे।
वाढलेल्या सप्तरंगी पांढऱ्यांचं,
मिसळपाव, तुमचं तोंड, तुमचं दिल, तुमचं आकार!

जणी आपल्या सोबत आहेत, अन आपल्याला तरंगांची जणारी अवश्यकता आहे,
मिसळपाव, आपलं सोहळा, तुमचं आणखी नातंचा तारा।
माझ्या मित्रांसोबत, मिसळपाव, आपलं आनंद अपुलकरू आहे,
तुमच्या सख्यांच्या मित्रांना वाढलेल्या आशीर्वादाने, मी वाट पाहतो परिपूर्ण!

मिसळपाव, तुम्ही माझ्या जीवनाच्या महत्त्वाच्या अंग आहात,
आपल्या सख्यांच्या सोहळ्यात, तुमचं संगणक मजकूर होतं,
मिसळपाव, तुमचं आभार, तुमचं मान्यता, तुमचं प्रेम,
मी तुमच्यासोबत असाच राहू इच्छितो, अन तुमच्या मित्रांसोबत एकदम नितांत काही सुखद!

आजी गणेश चतुर्थीच्या दिवशी, मिसळपावने स्थापना दिनाच्या शुभेच्छा,
सर्व मिपकरांना असे ही आपली संस्था वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पैजारबुवा,

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

26 Sep 2023 - 4:41 pm | चांदणे संदीप

"ए-आय" बद्दल थोडक्यात पण चांगले लिहिलेत.

बाकी चॅट जीपीटीला शेजारी धरून बसवून कविता लिहायला सांगणे जबरदस्त विनोदी आयडियाची कल्पना आहे. (आम्हांला तेवढंच सुचायचं. एक्सेल बिक्सेल नाही)

सं - दी - प

Bhakti's picture

26 Sep 2023 - 4:57 pm | Bhakti

छान कविता AI
AI ला भावनापण फुटू शकतात ,रोजच एक चेहरा दिसला की तो पण(एक आय रोबो) स्मित देणार मग आपण पघळणार :)

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2023 - 5:42 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण लेख !
पुढील काळ कृबुचाच असेल यात शंका नाही !

याच विषयावरील "कलाकारांसाठी धोक्याच्या घंटा वाजवणारे" दोन लेख देण्याचा मोह आवरत नाही !
१) आवाजाचे रंग आणि बेरंग :
https://maharashtratimes.com/editorial/samwad/artificial-intelligence-as...

२) कृत्रिम प्रज्ञा आणि सर्जनशीलता
https://maharashtratimes.com/editorial/article/artificial-intelligence-a...

शेवटी मी चॅट जीपीटीला मिपावर एक कविता लिहायला सांगितली आणि यात वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही द्यायला सांगितले. 'मोकलाया दाही दिशा'च्या वाटेने जाणारी ही कविता काही दिवसांतच प्रगल्भ होईल, यात मला काही शंका नाही.

मजेशीर कविता ..... आपण म्हटल्यानुसार अर्थातच प्रगल्भ होईलच.

अहिरावण's picture

26 Sep 2023 - 7:26 pm | अहिरावण

चॅटजीपीटीला कामाला लावलं. मुलीला प्रपोज करायचं आहे कविता द्या ऑर्डर सोडली.

माल तयार :

एक सुंदर फुल तुझ्या हातात,
तुझ्याकडून विचार तुझ्यातलं हात,
आज माझं दिल तुझ्यावर लागलं,
तुझ्यावर असा प्रेम माझ्याकडून आलं.

तुझ्यासाठी आहे हे काय प्रतिबिम्ब,
तुझ्यासोबत जणू जिवन साजरा करणार असं वादा,
तुझ्याच्या आई-वडीलांना मला म्हणून घेऊन जाऊन,
आता तुझ्यासोबत तयारी आहे, हे तुझ्याला सांगणार आहे या शब्द.

तुझ्याला तुझ्या जीवनाच्या मार्गावर चालवायला,
तुझ्यासोबत सुखाच्या प्रेमाच्या वादळांच्या आवाजात नृत्य करायला,
आज तुझ्यावर असं प्रेम आहे माझ्याकडून,
कधीही न जाणेया, तुझ्यावर लागणार असं माझं मन तुझ्याकडून.

कृपया, प्रेमाचं उत्तर द्या, माझ्या जीवनाच्या सुंदर सफराच्या आणि,
माझ्या दिलाच्या गुटकोटीत तुझ्या सोडलेल्या आपल्या प्रेमाच्या फुलाच्या अद्वितीय अंशात.
तुझ्याच्या वाचनांसाठी तयार आहे माझ्या दिलाच्या पनाच्या बाजूला,
तुझ्याला माझ्याच्या आयुष्यात देखील खूप प्रेम देणार आहे माझ्यावर.

तुझ्यासोबत जीवनाच्या सफराची तयारी आहे माझ्याकडून,
तुझ्याला आणखी एक प्रेमकथा लिहायला हवी आहे माझ्याकडून,
तुझ्या हातातलं तुझ्याचं हृदय आहे माझ्याकडून,
कृपया, स्वीकारा तुझ्या जीवनातलं माझं प्रेम, तुझ्याकडून.

अहिरावण's picture

26 Sep 2023 - 7:27 pm | अहिरावण

तेच इंग्रजीत मागितल

In your eyes, I see a world so bright,
A universe of stars, a guiding light.
With each passing day, my love has grown,
In your presence, I've truly known.

Your laughter, like a melody, fills the air,
In your smile, I find a love so rare.
With you, I want to share my life,
To have you as my partner, my future wife.

Will you walk with me on this journey ahead?
Hand in hand, no matter where we're led.
Together we'll face life's joys and strife,
So, my love, will you be my partner for life?

I promise to cherish you with all my heart,
To love and protect you, never to part.
With you, every moment will be so sweet,
So, my dear, will you make my life complete?

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2023 - 8:27 am | कर्नलतपस्वी

मुलगा शिकला विकास झाला
आला लग्नाला...
मुलगी शोधा विनवू लागला
बाजीराव नानाला...

काय अपेक्षा, कशी पाहीजे
विचारले नानाने....
चाटगपटला विचारून सांगतो
म्हंटल तंत्र ज्ञान्याने....

आखूड शिंगी,बहुदूधी,
पण काळी सावळी आहे...
नाना विचारता झाला
मॅच होत नाही,ही तर जाफ्राबादी
चाटगपट म्हणाला.....

पै हजार बुवा

तंत्रज्ञान मागासवर्गीय कॅट्यागरीतला अनारक्षित....

हलकेच घ्या.

चाटगपट बाळक आजुन लहान आहे.......

टर्मीनेटर's picture

27 Sep 2023 - 10:35 am | टर्मीनेटर

मजेशीर लेख!
च्यामारी इथे हाडा-मासाच्या माणसांनी केलेल्या कविता समजायची माझी मारामार तिथे 'चॅटजीपीटी' ने केलेली कविता मला काय समजणार 😀
हे बेणं बी लय गुढ वगैरे लिहितंय की,

आपल्या साथींना, मिसळपाव साखर पिणाऱ्यांचं,
सहवासाचं सुख, तुमचं हे अत्यंत मधुर आहे।
वाढलेल्या सप्तरंगी पांढऱ्यांचं,
मिसळपाव, तुमचं तोंड, तुमचं दिल, तुमचं आकार!

वरच्या कडव्यातल्या " तुमचं हे अत्यंत मधुर आहे।" ह्या ओळीत 'हे' म्हणजे नक्की काय अभिप्रेत असावे ह्याचा विचार करुन करुन दमलो! बुवा आता तुम्हिच त्यावर प्रकाश टाकावा ही णम्र विनंती...

जीपीटिवर प्रा. तोरडमलांचा प्रभाव असावा... कारण बुवांचं मन हे त्या प्रिन्सिपॉल सारखंच निर्मळ आहे... :)

अमर विश्वास's picture

27 Sep 2023 - 11:30 am | अमर विश्वास

मस्त लेख

बाकी हे आवडलं

शेवटी मी चॅट जीपीटीला मिपावर एक कविता लिहायला सांगितली आणि यात वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही द्यायला सांगितले. 'मोकलाया दाही दिशा'च्या वाटेने जाणारी ही कविता काही दिवसांतच प्रगल्भ होईल, यात मला काही शंका नाही.

शेवटी ही कृत्रिम बुद्धीमत्ता आहे .. कृत्रिम भावना नाही ...

आणि कवितेची पहिली ओळ येताच फिस्सकन हसू आले :D

अवांतर - DallE या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या चित्रकाराने काढलेले हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे चित्र
5

प्रचेतस's picture

28 Sep 2023 - 7:39 am | प्रचेतस

आत्ता जरी गंमत वाटत असली डेंजरस आहे ए आय. पुढे काय होईल काहीच सांगता येणार नाही.

आयझ्याक असिमोव्हनी त्याच्या विज्ञानकथांसाठी खूप पूर्वीच यंत्रमानवाबद्दल ३ नियम लिहून ठेवले होते त्याची आठवण झाली.

ते पुढीलप्रमाणे

1) a robot may not injure a human being or, through inaction, allow a human being to come to harm.

(2) a robot must obey the orders given it by human beings except where such orders would conflict with the First Law.

(3) a robot must protect its own existence as long as such protection does not conflict with the First or Second Law.” Asimov later added another rule, known as the fourth or zeroth law, that superseded the others. It stated that “a robot may not harm humanity, or, by inaction, allow humanity to come to harm.

मुक्त विहारि's picture

28 Sep 2023 - 8:02 pm | मुक्त विहारि

तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे

योग्य समाजात पडले तर समाजाला फायदा

अयोग्य समाजात पडले तर सर्वनाश

उदा

अणू उर्जा

वीज किंवा हिरोशिमा - नागासाकी

सुधीर कांदळकर's picture

28 Sep 2023 - 8:15 pm | सुधीर कांदळकर

आवडला. धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

29 Sep 2023 - 1:58 pm | सुधीर कांदळकर

प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ताप्रचुर यंत्रमानवांना मानवच कामे देतो. परंतु आपण कोणते काम करायचे हे यंत्रमानवांनी स्वतःच ठरवले तर? मानवाला कोणत्याही प्रकारे इजा होईल असे वर्तन करायचे नाही असे आयझॅक ऍसिमॉव्हच्या साहित्यातल्या यंत्रमानवांना शिकविलेले होते. आता तसे शिकवले जाईल कां? एखाद्याने यंत्रमानवाकडून गुन्हे करून घेतले तर दोषी कोण? आणि कोणीतरी माथेपिरूने माणसे मारणाराच यंत्रमानव बनवला तर?

आज नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्हीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बॅंका, एटीएम मशीनपासून निवासी संकुले, शाळाकॉलेजे, देवळे, मशिदी, चर्चेस अशा अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनाशील न थकता न कंटाळता सीसी टीव्ही प्रामाणिकपणे २४ X ७ X ३६५ अविरत नजर ठेवतात. सीसी टीव्ही नजर ठेवतात, गुन्ह्यांची कायदेशीर साक्ष पण देतात. पण संरक्षण मात्र देऊं शकत नाहीत. संरक्षण देण्याचे काम यंत्रमानवांना दिले तर? गुन्हेगार मानवाला इजा होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही.

कारेल चॅपेक Karel Čapek (Czech: [ˈkarɛl ˈtʃapɛk] या थोर व्यक्तीस्वातंत्र्यवादी झेक विचारवंताने (हे झेकोस्लोव्हाकीयाचे राष्ट्राध्यक्ष देखील होते. सात वेळां नामांकन होऊनही त्यांना साहित्यातले नोबेल मिळाले नाही) १९२० साली RUL Rossum Universal Robots या नावाची विज्ञानकादंबरी १९२० साली लिहिली होती. काही विज्ञानकथांतून यंत्रमानव संपावर गेलेले रंगवले होते तर काही कथांतून यंत्रमानवांना भावना प्राप्त झाल्याचे रंगवलेले आहे. एका कथेत तर एक मानव स्त्री एका यंत्रमानवाच्या प्रेमात पडल्याचेही दाखवलेले आहे.

अशा अनेक प्रश्नांनी आता जगभरातील विचारवंतांना भंडावून सोडले आहे. त्यात आता कृबुचा वापर करून गुन्हे पण घडू लागले आहेत. त्याचा एक मासला पुढील परिच्छेदात देतो.

एका पतीला त्याच्या पत्नीचा एक फोन येतो. अनोळखी नंबरवरून. मी एका दुकानात आले आहे, पैसे आणायला विसरले आहे. माझ्या फोनची बॅटरी संपल्यामुळे मी दुसर्याच्या फोनवरून बोलते आहे. अमुक अमुक नंबरवर एवडी एवढी रक्कम पाठवा. पती पैसे पाठवून मोकळा होतो. घरी गेल्यावर त्याला कळते की तो आलेला फोन तिने केलाच नव्हता. व्हॉईस क्लोनिंगचे तंत्रज्ञान वापरून पत्नीचा आवाज, बोलण्याची लकब, सारे तंतोतंत साधले होते आणि पैसे लुटले गेले होते. प्रगत श्रीमंत देशांत असे अनेक गुम्हे घडलेले आहेत. आता आपल्याकडे पण सुरू झालेत. पत्नी हे उदाहरण झाले. कुटुंबातील अतिशय जवळच्या कोणत्याही व्यक्तीच्या नावाने फोन येऊ शकतो.

तेव्हा असा कुणाचा पैशासाठी फोन आल्यास ज्या व्यक्तीला पैशांची गरज आहे तिलाच फोन करावा. शक्यतो व्हीडीओ कॉल. त्या व्यक्तीच्या फोनची बॅटरी संपली नसल्यामुळे फोन लागेल आणि खरी वस्तुस्थिती कळेल. जर फोन लागला नाही तर त्या दुकानात स्वतः जाऊन वा कोणाला पाठवून खात्री करून घ्यावी.

पण म्हणून कृबु शिकायचेच नाही, कृबुवर बंदीच घालावी का? मुळीच नाही. या तंत्रज्ञानात गुन्हेगारांच्या पुढे राहण्यासाठी आपण या तंत्रज्ञानात असामान्य कौशल्य प्राप्त करणे गरजेचे आहे. यंत्रमानव जर गुन्हेगार बनूं शकतो तर तो एक हुशार, तज, कुशल आणि पारंगत पोलीस वा गुप्तहेरही बनूं शकतो.

असो. विचारप्रवर्तक लेख आवडला. धन्यवाद.