....किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले....(प्रौढांसाठी :) )

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
14 Sep 2023 - 11:02 am

कामावरुन मधल्या सुट्टीत घरी जेवणासाठी येणार्या चावट रसिकांसाठी..
=============================================================
किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात.
केला होता दुष्ट सख्याने..भलता चावट बेत..
कशास फसवु..मी ही तेव्हा होते मोहरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात..
विसरुन गेलो कधी गुंफले हातामध्ये हात..
इतके स्मरते त्याच्यासंगे मी ही थरथरलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

पुढचे क्षण मग होऊन गेले..मंतरलेले सारे..
उधाण आले, लाटांमध्ये मुक्त बुडाले तारे..
अमृतलहरीत मजेत होते गलबत भरकटलेले...
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

इश्श..राहिली गालावरती त्याच्या माझी टिकली.
मीच लाजुनि नंतर हसुनि हळुच पापणी मिटली.
ध्यान गडबडीत तसेच ..अरे देवा.. कामावरती गेले..
पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले..

+कानडाऊ योगेशु

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

14 Sep 2023 - 11:16 am | चांदणे संदीप

घराच्या जवळ ऑफिस असणार्‍यांवर लोक्स जळतील आता. =))

(जाता जाता : कशी काय बॉ सुचली असेल ही कविता कवीला? असो, आपल्याला काय!)

सं - दी - प

कानडाऊ योगेशु's picture

14 Sep 2023 - 12:03 pm | कानडाऊ योगेशु

खयाली पुलाव आहेत हो अण्णा! :)
कामसूत्र लिहिणारा वात्स्यायन म्हणे ब्रह्मचारी होता. असो आपल्याला काय!

अहिरावण's picture

14 Sep 2023 - 2:33 pm | अहिरावण

ब्रह्मचारी नाही... अविवाहीत

क्या बात क्या बात क्या बात...

मीटर लय सर्व अचूक.

हाताखालील सर्व लोकांना ऑफिसातच डबा आणणे अनिवार्य करावे असे सर्व बॉसेसना वाटावे अशी कविता.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Sep 2023 - 11:29 am | राजेंद्र मेहेंदळे

अचूक शब्दात नेमक्या भावना पोचवल्या आहेत राव!! स्वानुभव की काय?

रच्याकने -घरापास्न ऑफिस लांब असणे बरे, तिकडचे इकडे कळत नाही. :)

कानडाऊ योगेशु's picture

14 Sep 2023 - 12:05 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद संदिपभौ, गविभौ आणि मेहेंदळे भौ!
प्रौढ आणि प्रगल्भ लोकांच्या प्रतिक्रिया वाचुन भरुन पावलो.

चौथा कोनाडा's picture

14 Sep 2023 - 12:06 pm | चौथा कोनाडा

वा... वा, क्या बात !

फर्मास ज्यम्या !

लै दिसांनी मिपावर शृंगार रस अनुभवला !

और आन देव !

Bhakti's picture

14 Sep 2023 - 12:14 pm | Bhakti

पोळा सणाला बरी सुचली ,मग काय पुरणपोळी करपली नाय पाहिजे पण!

चौथा कोनाडा's picture

14 Sep 2023 - 12:18 pm | चौथा कोनाडा

पुरणपोळी करपली नाय पाहिजे पण!

Lughrung756ythg

कानडाऊ योगेशु's picture

14 Sep 2023 - 12:22 pm | कानडाऊ योगेशु

इथे पुरणपोळीला प्रथम प्राधान्य...बाकीचे सोपस्कार नंतर.! :)
धन्यवाद तै!

कर्नलतपस्वी's picture

14 Sep 2023 - 12:29 pm | कर्नलतपस्वी

ही कवीता नाही अनुभव आहे.

असले दिवस म्हणजे आळवा वरचे पाणी

जुने दिवस आठवले.

"कुणी विचारलं तर सांग साहेब वर्कशॉप ला गेलेत "

गेले ते दिन गेले....

आणी आता,

दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात.
सोफ्यावरूनी हुकूम सुटला जरा लक्ष द्या आतं

चुलीवरती दुध उकळते अन तव्यावर पोळी
गॅस कमी करा,आणून द्या मज शुगरची गोळी

गिळून घ्या अन करा मोकळे लवंडू द्या मजला
कटकट सदा भाळी माझ्या का रिटायर झाला

कशास फसवु..माझा ही तेव्हा थरथराट झाला ...
ऊतु दूधही गेले, होते अन् भातही करपला होता

पुढचे क्षण मग होऊन गेले..तंतरलेले सारे..
उधाण आले,तोंड सुटले भर दुपारी चमकले तारे..

मस्तच भौ.

म्हणूनच म्हणतात,मित्र वणव्यातही गारव्या सारखा....

कानडाऊ योगेशु's picture

14 Sep 2023 - 12:42 pm | कानडाऊ योगेशु

भले बहाद्दर कर्नलसाहेब!
कवीचा अनुभव कविकल्पना असु शकेल पण तुमचा हा अनुभव अगदी अस्सल वाटतो.
एक फर्मास विडंबन (खरेतर विडंबन हि का म्हणावे) येऊ द्या!

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Sep 2023 - 12:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

_/\_

कंजूस's picture

14 Sep 2023 - 1:07 pm | कंजूस

श्रावण मास सरे हर्ष भरे
प्रौढांसाठी .
बरंबरं.

प्रसाद गोडबोले's picture

14 Sep 2023 - 1:14 pm | प्रसाद गोडबोले

वाह क्या बात है. एकदम संक्लिद्य कविता.

मोग्यांबो खूष हुवा !

थोडीशी शब्दांची फेरफार केल्यास -
सुर्य ऊगवला, प्रकाश पडला आडवा डोंगर ,
आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार .
ह्या प्रसिद्ध भारुडची चाल एकदम परफेक्ट बसेल.

लिहीत रहा.

अहिरावण's picture

14 Sep 2023 - 2:34 pm | अहिरावण

जबरा

वामन देशमुख's picture

14 Sep 2023 - 2:43 pm | वामन देशमुख

स्वयंपाक, पाककृती, काही खाद्यपदार्थ तयार करणे इ विषयावरची ही कविता आवडली.

---

कुठेतरी, कुणीतरी सांगितलेली या विषयावरची एक टीप आठवली -

कणिक चांगली तिंबली तर मग छान पदर सुटतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Sep 2023 - 11:45 am | राजेंद्र मेहेंदळे

:))

स्वधर्म's picture

14 Sep 2023 - 3:29 pm | स्वधर्म

खूप दिवसांनी ताज्या कवितेत शृंगाररसाचा आस्वाद घेता आला. योगेश, छान जमलीय कविता.

कुमार१'s picture

15 Sep 2023 - 8:47 am | कुमार१

लय भारीच !!

धर्मराजमुटके's picture

15 Sep 2023 - 10:25 am | धर्मराजमुटके

यावरुन असे दिसते की घरात तीन बर्नर असलेली शेगडी आहे. बाई मल्टीटास्कींग्मधे कमी पडल्या असे प्रथमदर्शनी निदर्शनास येते. ज्या बाई एकाच वेळी पोळी, भात आणि दुध तीन बर्नर च्या शेगडी वर मॅनेज करु शकतात त्यांना अजून एक बर्नर खरे तर मॅनेज करता यायला हवा होता. समोरील पक्षकाराने ऐनवेळी कार्यक्रमाचे स्थळ बदलल्यामुळे हा गोंधळ झाला असावा कदाचित. असो !
पुढील वेळेसाठी शुभेच्छा !

चौथा बर्नर काय, पक्षकार काय, कार्यक्रमाचे स्थळ काय..

अहो काय हो हे.. आवरा. कार्यालयीन कामे होणे अवघड. हसून हसून पुरेवाट.

:-)) :-))

कर्नलतपस्वी's picture

15 Sep 2023 - 1:39 pm | कर्नलतपस्वी

इब ना रूक्के ये गड्डी भाया....

मास भादव्याचा आला......

कानडाऊ योगेशु's picture

15 Sep 2023 - 1:24 pm | कानडाऊ योगेशु

तीन बर्नरचा नाही तर कमीत कमी तीन बर्नरचा गॅस असावा तो असे वाटते. बाकी चौथा बर्नर एरवी फारसा वापरात नसावा आणि अचानक चालु झाल्यामुळे नायिकेची तारांबळ उडाली असावी..
बाकी... मिपाकरांची रसिकता पाहुन...

मागुन येऊनि कणीक तिंबुनि,
ओठांमधली साखर लुटुनि.,
हातांमध्ये अलगद उचलुनि..रंगमहाली नेले..

असे प्रास्तविक जोडायला हवे होते असे वाटुन गेले.

पाषाणभेद's picture

25 Sep 2023 - 11:33 am | पाषाणभेद

@धमराज मुकटे! काय कल्पना केलीत.

रंगीला रतन's picture

15 Sep 2023 - 12:33 pm | रंगीला रतन

आवडली :=)

आंद्रे वडापाव's picture

15 Sep 2023 - 12:53 pm | आंद्रे वडापाव

गॅसवरील दुध, हे दुर्मिळ प्रकारातील दुध नसल्याने, ते उतु गेले तर .. जाऊ देत ..
असा व्यावहारिक विचार केवळ सांसारिक स्त्री करू शकते ...

अहिरावण's picture

15 Sep 2023 - 2:05 pm | अहिरावण
गड्डा झब्बू's picture

15 Sep 2023 - 2:21 pm | गड्डा झब्बू

कविता भारीए...

शृंगार-रसातली आधुनिक रचना प्रशंसनीय. खूप आवडली.
कर्नलसायेबांना 'सोफ्यावरून सुटलेला' हुकूमही लई भारी.

फारच आवडली कविता आणि नायिकेची संमतीही अत्यंत सूचक आहे..भाऊसाहेब पाटणकर यांची शायरी आठवली.