मंदिराशेजारी घर असण्याचे काही फायदे असतात काही तोटे . तोटे म्हणजे बोलायलाच नको. कधीमधी अधुनमधुन काही ना काही ढ्यँड ढ्यँड ढ्यँड चालु असतेच . शिवाय तक्रार करायची सोय नाही. पण कदाचित हाच फायदा आहे . ही ही भोळ्याभाबड्या लोकांची प्रदर्शनप्रचुर भक्ती कम डोंबार्याचा खेळ पाहुनही शांत रहाता येणं ही एक साधनाच आहे म्हणा ! पण कधी कधी काहीतरी चांगलं कानावर पडतं अन बरं वाटतं.
असेच नेहमीसारखीच दुपार. काहीबाही कोडींग करत बसलेलो. स्पीकरर्वर काही तरी चालु होतेच . पण आवाज कमी होता अन मंजुळही होता त्यामुळे त्याच्याकडे "लक्षपुर्वक दुर्लक्ष" करता येत होते. कोड रन झाला अन दोन क्षण निवांत मिळाले अन लक्षात आलं - हा तर जगजीत सिंगचा आवाज-
https://youtu.be/S6UiK9YD0mE?t=461
मध्येच एक श्लोक कानावर पडला ७:४० : कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतःक्लेषनाशाय गोविंदाय नमो नम: || अहाहा , क्या बात है !
अन डोक्यात स्पार्क पडला - How this experience would be ? - To have complete beyond doubt, unquestionable, unwavering faith? To have complete unconditional surrender and listen to this ? How it would be to have at least one thing on the table of faith! द्वैतभक्तीचा ह्या अनुभवाच्या नुसत्या विचाराने शहारुन गेलो , तर मग एक अद्वैत वेदान्ती व्यक्तीचा अभुव कसला असेल !
________________________________________________________________________________________________________
साधारण दुपारी ४- ५ ची वेळ असावी. हिमालयाच्या कुशीत कुठल्याश्या हॉटेलच्या टेरेसवर बसलो होतो. अर्थातच हवेत आल्हाददायक गारवा होता आणि मावळतीच्या सुर्याच्या किरणांचा उबदार स्पर्षही सुखावुन जात होता. कोणत्याही बाजुला पहा , हिमाच्छादित शिखरं , नाहीतर उंचच्याउंच डोंगर , त्यांच्या मधुन खळाळुन वाहणारी नदी, किंव्वा घनदाट जंगल... कोठेही बघुन फोटो काढा चांगला येणारच ! शेवटी वैतागलो फोटो घेऊन घेऊन. अन नुसता बसलो सारं काही डोळ्याच्या कॅमेराने उपभोगत!
काहीकाही अशा जागा असतात जिथं ध्यान करण्यासाठी डोळे मिटुन घ्यायची गरज पडत नाही. ध्यान लावावं लागत नाही ते आपोआपच लागतं . इथेतर अजुन दहा दिशांना दहा डोळे असते तरी कमी पडले असते हे सारे सामावुन घ्यायला असा नजारा समोर होता ... किती किती उपभोगशील ? देणार्याचे हात हजारो दुबळी आपुली झोळी ! नेहमीप्रमाणे डोक्यात शांत विचारांची गाडी चालु झाली होती -
हे उपभोग घेणं म्हणजे नक्की असतं तरी काय ?आणि जे काही असतं ते खरंच असतं की उगाचच आपल्याच मनाची कल्पना, निरर्थक स्वात्मरंजन असतं ? How do we know something for sure?
रेने देकार्त आठवला - टेबल ऑफ फेथ - कल्पना कर की टेबल आहे . आता ज्या ज्या गोष्टींवर तुझा विश्वास आहे त्या त्या सार्या काढुन ह्या टेबलवर ठेव . मग त्यात तुमचे अनुभव असतील, विचार असतील , वासना असतील , इच्छा आकांक्षा असतील , भौतिक सुखं असतील , देव असतील , भुतंही असतील कदाचित , तुझ्या नीतीमत्तेच्या व्याख्या असतील, वैज्ञानिक गोष्टी सिध्दांत असतील, नाती गोती असतील , जे जे काही विश्वास आहे म्हणुन तू ठाम आहेस ते ते सारें असेल. आता फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स म्हणुन ह्याला आपण टेबल ऑफ फेथ म्हणुया! आता एक काम कर, ह्या सर्वच्यासर्व गोष्टी झटकुन टाक, फेकुन दे . एकन एक . अगदी साफ रिकामे कर हे टेबल.
आणि आता टेबल वर फक्त त्याच गोष्टी ठेवायच्या ज्या तू खणखणीत पुराव्याने शाबित करु शकशील. जिथे काडीमात्र शंका घ्यायला जागा नसेल असे सिध्द करु शकशील तेवढेच फक्त ह्या टेबलवर ठेवायचे आहे . nothing more nothing less.
दोन क्षण भक्क शांतता.
वार्याच्या थंडगार झुळुकेने आपण परत विचारांच्या तंद्रीत येतो. बघ ना वारा असतो जाणवतो पण दिसत नाही . सुर्य अस्ताला चाललाय हे दिसतं पण टेक्निकली सुर्य आहे तिथेच आहे, पृथ्वी फिरतेय स्वतः भोवती. ते आपल्याला जाणवत नाही. हिमालयात भटकताना सन बर्न होतोय पण आपल्या त्वचेला तुर्तास तरी जाणवत नाहीये. थोडक्यात काय तर आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत येणारे ज्ञान परिपुर्ण नाहीये, आपले सेन्सेस आपल्याला गंडवत आहेत कधीकधी . मग जर ते कधी कधी गंडवत आहेत तर कायमच गंडवत नसतील कशावरुन? आपण हे सारं गाढ झोपेत स्वप्नात पहात नसु कशावरुन? स्वप्नात जे दिसत असस्तं ते अगदी शतप्रतिशत खरेच वाटत असते की . तरुणपणी तर आपण ह्याचा शृंगारिक अनुभवही घेतला आहे बर्याचदा ;) आपल्याला चांगलेच माहीत आहे की स्वप्नं किती खरी वाटतात ते!
पण मग हे स्वप्न आहे की जागृती हे ठरवणार कसे ? सत्य काय ? कारण ज्ञानेद्रियांमार्फत आलेलें सगळेच ज्ञान डाऊटफुल आहे, शंका घ्यायला स्कोप आहे.
डॅम्न . परत एकदा भक्क शांतता !
बट वेट , आहे एक आहे - मॅथेमॅटिक्स! गणितातील सिध्दांत हे आपल्या इंद्रियगम्य ज्ञानावर अवलंबुन नाहीत. तू स्वप्नात अस की जागे अस , जिवंत अस की मेलेले अस , तुला सिध्द करता येवो की न येवो , किंव्वा संपुर्ण मानवजाती तिच्या संपुर्ण ज्ञानासह नष्ट झाली असली तरीही गणितातील सारे सिध्दांत वैधच रहाणार आहेत . तुमच्या असण्यानसण्याने ऑयलरला काहीही फरक पडत नाही.
e^pi*i + 1 = 0
हे सत्यच रहाणार आहे . अन डिस्प्युटेबल ट्रुथ ! म्हणजे आपल्याला गणित ह्या टेबल ऑफ फेथ वर ठेवता येईल !
बट वेट , ग्यॉडेल काय म्हणाला - गणित किंव्वा कोणत्याही अॅक्झिओमॅटिक सिस्टीम मध्ये सर्वच सत्य विधाने सिध्द करता येतील असे नाही. अर्थात सत्य आहे पण सिध्द करता येणे शक्त नाही अशी विधाने असतीलच ! म्हणजे सत्य काय असत्य काय ह्याचा आपण निवाडाच करु शकत नाही! किंव्वा रादर , गणितातही अशा अनेक गोष्टी असतील की ज्या सत्य आहेत पण आपण कधीच सिध्द करु शकणार नाही !
अर्थात टेबल ऑफ फेथ रिकामेच आहे . त्यावर काहीच ठेवता नाही .
परत एकदा भक्क शांतता .
बट वेट अगेन !
cogito ergo sum ! voila ! मी विचार करतोय , म्हणजे मी आहे . मी म्हणजे विचार करु शकणारे असे काहीतरी आहे हे नक्की ... माझे अस्तित्व , माझं असणं ह्या टेबल वर ठेवता येईल नक्की !
पण आता हे - मी म्हणजे काय ? नक्की काय ?
सुर्य मावळतीच्या दिशेने कलायला लागला होता . सोनेरी किरणांनी आता पाण्ढरीशुभ्र हिमशिखरे एकदम उजळुन निघालेली होती . संध्याकाळचा वारा आता बोचायला लागला होता पण तरीही मजा येत होती ! आपल्याला कुठेही जायची गडबड नाही, सगळं पाहिजे ते नुसत्या एका ऑर्डरवर येत आहे. चहा पाहिजे घे चहा , घे कॉफी, भजी पाहिजेत, हे घे , भेळ पाहिजे , हे घे. खा तु , वढ ! #पैसे जाऊ दे पण खेळ झाला पाहिजे .
आपल्याला काहीही करायचे नाहीये , ऑफिसचे कॉल्स नाहीयेत , घरी जाताना ट्रॅफिकची किचकिच नाहीये , घरी जाऊन अजुन नवीन कामे नाहीयेत . बस्स आपण आहोत इथे. बस्स आपण आणि आपला हिमालय ! एकदम आजोळी आल्यासारखं वाटलं . आजोबांच्या मांडीवर बसुन रामरक्षा शिकावी अन तंद्री लागावी, आपली ऐकता ऐकता आणि आजोबांची गाता गाता ... असे काहीसे ....
तू कधी फोरीए सीरीज चा नीट विचार केला आहेस का ? What it is exactly trying to say ? कोणतेही पिरिऑडिक फंक्शन घ्या , कोणतेही , तुम्ही ते साईन आणि कॉस च्या वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीजच्या काँबीनेशन मध्ये मांडू शकता . कोणतेही फंक्शन . कॉस आणि साईन पुरेसे आहेत ते व्यक्त करायला !
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/2/2b/Fourier_series_and_t...
पण कॉस म्हणजे काय आहे तर साईन फंक्शनच आहे फक्त दुसर्या अँगलने पाहिले की कॉस नाहीतर साईन . तत्विक दृष्ट्या दोन्ही एकामेकात इतकी सरमिसळ आहे की फंडामेंटल कोणतं आणि डिराईव्ह्ड कोणतं सांगताच येणार नाही !
ह्या हिमालयाच्या दरी शिखरांचे तसेच काहीसे आहे नाही का ! इथं स्पष्टपणे शिखर पण दिसत आहेत अन त्यांच्या मधील दर्या दिसत आहेत , हिमालयातुन अजुन थोडं खाली आलो, शिखरं गेली अन टेकड्या आल्या तरी , तरी शिखरं आहेतच , अन दर्याही आहेत , फक्त फ्रिक्वेन्सी अर्थात त्यांची उंची खोली वेगळी आहे , पण ते दोघेच आहेत, अगदी सपाट मैदानी प्रदेशात आलो तरी अतीसुक्ष्म लेव्हलला दरी अन शिखरेच आहेत. तिसरं असं काही नाही. असुच शकत नाही . पण दोघं असं तरी का म्हणायचं ? शिखरं आहेत म्हणुन त्यांच्यामध्ये दरी दिसत आहे किंव्वा दरी आहे म्हणुन शिखरं शिखरं आहेत हे कळत आहे. दोघांचं अस्तित्व अगदी कालिदास म्हणाला तसं - वागर्थाविव संपृक्तौ असं आहे - अर्थात वाणी आणि तिचा अर्थ कसा असतो कि अर्थापासुन वाणी शब्द भिन्न करता येत नाहीत आहे शब्दांमधुन अर्थ काढुन टाकता येत नाही ! त्यांचं अस्तित्व एकामेकात इतकं गुफलेलें आहे की वेगळं करुन दाखवणेच शक्य नाही .
बट वेट .... कालिदास तर हे शिव शक्ती विषयी बोलला होता ना !
जे शिव आहे तीच शक्ती आहे अन जी शक्ती आहे तोच शिव आहे . अगदी अघळपघळ बोलायचं म्हणलं तर Act आणि Act of god असं वेगळं करुन दाखवताच येणार नाही !
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण येकलें नांदे । जग सकळ आधाधें । पणें जिहीं ॥ १-१७ ॥
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे । सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
शिव शक्ती ... प्रकृती आणि पुरुष अशा स्त्रीपुरुष नामभेदाने जे दिसत आहे आपल्याला कळत आहे ते खरेतर एकमेव अद्वितीय असे शिवतत्वच आहे , दोघांच्या अर्धेअर्धेपणाने सगळे जग नामरुपास येत आहे. आता शक्ती आहे असे म्हणले म्हणुन आपण आपल्या शिवरुप असण्याच्या आनंदाचा उपभोग घेऊ शकतोय कारण सर्वकाही भोक्तृत्व हे शक्तीमुळेच आहे , जर शक्तीच नसेल तर सर्वकाही शिवस्वरुपच आहे मग कोण कोणाचा अन काय भोग घेणार ! तिथे ही त्रिपुटी नाहीच.
मगाशी आपण जे म्हणालो कि cogito ergo sum ह्यातला विचार करणारा , हा विचार अन विचार करणे ही क्रिया हे भिन्न नाहीच ! त्यांचे भिन्नत्व हे आपले अज्ञान झाले . जसे की -
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनुभाव्य अन जो कोणी अनुभव घेणार तो अनुभाविक हे दोन्हीही अनुभवाचाच भाग आहेत , मग जर अनुभवच नसेल तर काय उरले !
"विचार करतोय म्हणजे मी नक्कीच आहे" असा विचार करणारा करणारा अन हा विचार हे दोन्हीही अज्ञान आहेत , मग जर विचार करणेच सरले तर मग कोण उरले !
बौध्द मग म्हणतील की सर्वं शुन्यं शुन्यं अर्थात शुन्य उरले. पण मुळात शुन्य उरले हे म्हणाणारा, हे अनुभवणारा कोणीतरी उरलाच आहे की , त्याचाही निशे:ष लय झाला तर मग काय उरले !
ऐसें ज्ञान अज्ञानीं आलें । अज्ञान ज्ञानें गेलें । ये दोहीं वांझौलें । दोन्ही जाली ॥ ८-१७ ॥
म्हणजे कसं की "विचार करतोय म्हणजे मी नक्कीच आहे" हे ज्ञान झाले असे वाटणे हेदेखील अज्ञानच अर्थात ज्ञानाचा अभावच आहे. आणि मी म्हणजे हाडामांसाचा सजीव सेल्फ कॉन्सश ऑटोमॅटोन आहे हे जे वरकरणी अज्ञान होते ते तर आधीच आपण टेबल ऑफ फेथ वरुन झटकुन टाकले आहे , त्यामुळे ज्ञानाने आधीच अज्ञानाचा नाश केलेला आहे ! म्हणुनच अज्ञानाचा नाश झाला , अज्ञान नाही हे ठामपणे ठरले तिथेच ज्ञानाचाही नाश झाला ना !
सुर्याला अंधार म्हणजे काय माहीत असुच शकत नाही , मग ज्याला अंधार म्हणजे काय माहीत नाही त्याला प्रकाश म्हणजे काय हे तरी कसे माहीत असेल ? , ज्याने कधी प्रकाशाचा अभाव पाहिलाच नाहीये , त्याच्यासाठी प्रकाश हीच नित्यस्थीती आहे त्यामुळे त्याला प्रकाश म्हणजे काय हे देखील माहीत नाही !
सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥
म्हणुन मग, अनुभाव्य नाही आणि अनुभाविकही नाही, अज्ञान नाही अन ज्ञानही नाही , रात्र नाही अन दिवसही नाही , "विचार करतो म्हणजे मी आहे" ही जाणीव नाही आणि नेणीवही नाही , अंधार नाही अन प्रकाशही नाही ... शक्ती नाही अन शिवही नाही.... बस्स फक्त मीच मी आहे ... अन हा अनुभवही नाही .
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥
https://ssubbanna.files.wordpress.com/2012/09/ardhanari33.jpg
अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें ।ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥
सुषुप्तौ निरस्तातिशून्यात्मकत्वात् तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोहम्॥ आता बस्स मीच मी आहे! :)
अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव ।फिटला संदेह अन्यतत्त्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीचि निवृत्ति अपणांसकट ।अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा ।शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥
क्षितीजाच्या पार कधीच सुर्यास्त झाला होता अन सारं कसं अंधारुन आलं होतं ... पण आता आपल्याला काय फरक पडतो ... आता आपल्यासाठी तर उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा असं झालं आहे सारं !
पांडुरंग पांडुरंग ;)
________________________________________________________________________________
जगजीतचा कर्ममधुर आवाज थांबला अन अचानक ढंढंढंढं असा काहीसा गोंगाट झाला . त्याने तंद्रीतुन बाहेर आलो . मन मात्र अजुनही हिमालयातच तरंगत होतं .
एवढं सगळं सव्यापसव्य करायची गरज होती का? देव जाणे . कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतःक्लेषनाशाय गोविंदाय नमो नम: एवढं ठाम संदेहरहित श्रध्देने म्हणलं असतें तरी पोहचलोच असतो की इथवर !
पण ठीक आहे. हरकत नाही . कदाचित हा आपला मार्ग होता , एकदा गंतव्याप्रत पोहचल्यावर रस्ता किती अवघड होता अन किती सोप्पा होता ह्याने काय फरक पडतो . पोहचलो हेच खुप आहे! नाहीं कां ! आता कसं सगळं सिध्द झालं , कुठे काही शंका घ्यायला जागाच नाही . हरितात्या म्हणातात तसं पुराव्याने शाबित. आता अजुन काही व्हॅलिडेशन ची गरज नाही .
जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥
निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥
हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥
साध्य होता साधनाचा।ठाव नाही॥
साध्य असे म्हणुन जे जे काही होते ते साधले , आता काय उरलं ? आता कसंही असो काय फरक पडतो .... आता योगरत रहा समाधीत किंव्वा भोगरत रहा भोगात ... काय फरक पडतो आपल्याला? आता माहीत आहे जे माहीत असायला हवं ! आता बस्स मीच मी आहे! दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ! अहाहा . माऊलीं माऊलीं
____________________/\______________________
अन कोणता कार्यक्रम चालु होता देव जाणे पण त्यांची एकदम हॅप्पी सर्प्राईझ दिलं अन आरती सुरु झाली !
सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता ।कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥
न कळे ब्रह्मांदिकां अंत अनंता ।तो तूं आम्हां सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥
जय देव जय देव जय करुणाकारा ।आरती ओंवाळूं सद्गुरुमाहेरा ॥ धृ. ॥
मायेविण माहेर विश्रांति ठाव । शब्दी अर्थी लाभ बोलणें वाव ।
सद्गुरुच्या प्रसादे सुलभ ऊपाव । रामीं रामदास फळाला सद्भाव ॥ जय. ॥ २ ॥
____________________/\______________________
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतःक्लेषनाशाय गोविंदाय नमो नम:॥
प्रतिक्रिया
12 Aug 2023 - 8:29 am | कंजूस
हुं.
.
कार्यकारण भावाला अकार्यकारण भाव जेवतो. शून्य.
e^pi*i + 1 = 0
12 Aug 2023 - 8:31 am | कंजूस
हुं.
.
कार्यकारण भावाला अकार्यकारण भाव छेदतो. शून्य.
e^pi*i + 1 = 0
12 Aug 2023 - 9:32 am | विवेकपटाईत
लेख आवडला. बाकी जीभ सनी पोट असल्याने शून्याचा अनुभव घेणे मला तरी त जमणार नाही.
12 Aug 2023 - 9:32 am | विवेकपटाईत
लेख आवडला. बाकी जीभ सनी पोट असल्याने शून्याचा अनुभव घेणे मला तरी त जमणार नाही.
12 Aug 2023 - 10:50 am | Bhakti
कॉस्मिक चैतन्य कण अनुभवताना असं डायमेन्शनलेस 'मी' होताना!
12 Aug 2023 - 12:20 pm | कर्नलतपस्वी
एक "मन", आशी गोष्ट की जी प्रकाश वेगा पेक्षा जास्त गतीमान आहे. "आंदोलन",आवडले. समर्पक संदर्भ आणी माऊली अल्टीमेट.
मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा
मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ????????.
माझ्या पुरते, मी आहे आणी मी म्हणजे कनव्हीक्शन. जोपर्यंत मन गतीमान आहे तोपर्यंत मी आहे नंतर शुन्य.
मन को मिरतक देखि के, मति माने विश्वास |
साधु तहाँ लौं भय करे, जौ लौं पिंजर साँस ||
-कबीर
12 Aug 2023 - 5:50 pm | धर्मराजमुटके
लेख आणी पटाईत साहेबांचा प्रतिसाद दोन्ही डोक्यावरुन गेले. या लेखाचे निमित्ताने आमचा आय. क्यू. शून्य आहे हे निदर्शनास आले हे ही नसे थोडके. असो ! लिहित रहा.
12 Aug 2023 - 6:06 pm | मुक्त विहारि
आमच्या टेबलावर, बियर आणि चिकन ....
14 Aug 2023 - 11:46 am | श्वेता व्यास
हा लेख मला समजला असेल तर 'न समजणे' म्हणजे काय हे मला माहितीच नाही, आणि नसेल समजला तर समजणे म्हणजे काय हे माहिती नाही. मग मला हा लेख समजला की नाही समजला.
असो, पण वाचून काहीतरी छान वाचल्यासारखं वाटलं हे नक्की.
14 Aug 2023 - 12:33 pm | चौकस२१२
लेख वाचून भंजाळायाला झालं ...
फक्त एवढेच म्हणू शकतो कि लेखक महाशय तुम्ही सुंदर अश्या निसर्गाच्या सानिध्यात काही काळ सुखद घालवलात आणि मनात बरच काहीतरी विचार येत गेले असे दिसतंय पण ते सर्वसामान्याला कळतील असे काही मांडता आले नाहीत आपल्याला .. असे परखड पणे म्हणावेसे वाटते
आणि आता टेबल वर फक्त त्याच गोष्टी ठेवायच्या ज्या तू खणखणीत पुराव्याने शाबित करु शकशील.
अनेक गोष्टी आहेत कि त्यात काय अवघड आणि भक्क होण्यासारख आहे
गुरुत्वाकर्षण आहे
भूक आणि तहान लागते
माणूस मरनार
हे जरी कोणी "जे आहे ते आहे असे वाटते , पन खरे आहे का" वैगरे अगम्य बोलणार असेल तर चक्रंम व्हायला होईल !
असो लिहीत राहा ,
15 Aug 2023 - 2:41 am | प्रसाद गोडबोले
धन्यवाद !
मी माझ्या अन्य लेखनात अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे हे लेखन आणि सारेच स्वान्त्:सुखाय आहे, कोणाला कळणे वगैरे अपेक्षित नाही , सर्वसामान्य वगैरेंना तर नाहीच नाही. मी हा लेख घरीही चर्चेस घेतला, सुदैवाने आमचे गृहमंत्रालय आमच्यासारखेच एम.एस्सी आहे तसेच धार्मिक वाचन असल्याने तिकडे बरेच प्रमाणात नक्की काय म्हणायचे आहे ते कळले. पण तिने एक अतिषय सोप्पा मुद्दा मांडला :
Thankfully , मला एकाने ऑलरेडी व्हॉट्सॅप्प वर मेसेज करुन कळवले आहे की You have captured it precisely ! त्यांमुळे आपल्याला लिहिता येते ह्याची पुरेशी खात्री पटली , समाधानी आहे ,
सुखी आहे असेही म्हणता येणार नाही म्हणा कारण...... तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें । आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥
असो. त्यामुळे कळो न कळो, वेळ देऊन वाचल्याबद्दल ध्यन्यवाद म्हणतो!
________________________________________________________________________
गुरुत्वाकर्षण
तुम्हाला आपण ११वी १२वी मध्ये केलेला पेन्ड्युलम चा प्रयोग आठवतो का ? तेव्हां कधी नीट लक्ष दिलं नाही , नुसते रेस होर्स सारखे मार्कांच्या मागे धावत होतो . आता निवांत वेळ आहे तेव्हां विचार करता येतोय .
पेन्डुलम सिम्पल हार्मोनिक मोशन तयार करतो अन त्यामुळे त्याची लांबी आणि आवर्त्नास लागणारा काळ ह्यावरुन आपण ग्रॅव्हिटेशन्ल कॉन्स्टंट मोजु शकतो असे :
T = 2 π √ (L/g) अर्थात g = 4π^2(L/T^2)
अर्थात आपण काळ हा गुर्त्वाकर्षणाचे फंक्शन आहे किंव्वा गुरुत्वाकर्षण हे काळाचे फंशन आहे असे म्हणतो आहोत. पृत्वीचे सुर्याभोवतीफिरणे म्हणजे १ वर्ष झालं किंव्वा स्वतःभोवती फिरणे म्हणजे एक दिवस झाला अन अम्ग त्याचे बारीक बारीक फ्रॅक्शन्स केले की तास मिनिटं सेकंद वगैरे होताहेत , पण सुर्य पृथ्वी वगैरे कॉस्मिक ऑब्जेच्ट्स च नसतील तर स्पेस टाईम फॅब्रिक मध्ये बेन्डच नसेल , तिथं फिरणे वगैरे काहीच नसेल मग तिथे कसला आलाय काळ ! अन जिथं काळच नाही तिथे स्पेस आहे असे म्हणणे म्हणजे तरी नक्की काय ?
हेच आईस्न्टाईन डॉक्त्युमेंटरी मध्ये फार उत्कृष्ट रित्या दाखवले आहे !
https://www.youtube.com/watch?v=xwKUuC0ZC-Y
सो , गुरुत्वाकर्षण म्हणजे तरी नेमके काय ? तुम्हाला कळल्यास आम्हालाही जरुर सांगा.
आम्हाला ह्याचं उत्तर , आमच्या मनाला समाधान देईल इतपत , हिमालयात नाही पण सह्याद्रीतील एका भटकंती मध्ये नुकतेच उमगले , पण तेही सर्वसामान्य , कळणे वगैरे च्या परे असल्याने त्यावर स्वतंत्र लेख लिहावा असा विचार आहे तेंव्हा तिथे भेटु मग !
धन्यवाद !
15 Aug 2023 - 4:41 am | चौकस२१२
स्वान्त्:सुखाय आहे
अशी जर धारणा असले तर मग बोलणंच खुंटलं
( पण मग मनात वाटते कि अरे हे जर "स्वान्त्:सुखाय" आहे तर सार्वजनिक ठिकाणी चिकटवण्यात / टाकण्याचा हेतू काय >
दोनच शक्यता आहेत
- एकतर जे काही लिहिलंय ते फार म्हणजे फार वरच्या पातळीवरचे तरी आहे किंवा (कारण लेखकाचे खरे यश यांच्यात असते ते अवघड विषय सुद्धा सोप्पं करून सांगता यायला पाहिजे पण हे सूत्र मान्य मान्य नसावे बहुतेक )
- शुद्ध फालतू गिरी
पण सुर्य पृथ्वी वगैरे कॉस्मिक ऑब्जेच्ट्स च नसतील तर स्पेस टाईम फॅब्रिक मध्ये बेन्डच नसेल , तिथं फिरणे वगैरे काहीच नसेल मग तिथे कसला आलाय काळ ! अन जिथं काळच नाही तिथे स्पेस आहे असे म्हणणे म्हणजे तरी नक्की काय ?
जे दिसतंय ते "आहेच का अस्तित्वात" असा सतत प्रश्न विचारणे म्हणजे जर दिव्य लिखाण असेल तर मी पण मग अमिताभ चा बाप आणि माझे वय १७८ वर्षे हाय काय आणि नाय काय ? आपली पण "स्वान्त्:सुखाय" खाज
असो चालुद्या गिरणी ( आमचे टेबल फुल्ल आहे ते रिकामे केले तरी भक्क वैगरे काही होत नाही )
15 Aug 2023 - 10:32 am | प्रसाद गोडबोले
गट क्रमांक २ कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद !
16 Aug 2023 - 2:39 pm | अहिरावण
वेलकम टु ग्रुप !
15 Aug 2023 - 6:14 am | Bhakti
गुरुत्वाकर्षण हे काळाचे फंशन आहे
हे बरोबर वाटतं...काळ तिथंच आहे,आपणच डायमेन्शन मध्ये फिरतोय..एकदा का 6th डायमेन्शन समजलं तर ...मोक्ष_/\_
रचक्याने...
११ डायमेन्शनस आहेत म्हणे ..कोणाकडे याबाबत व्हिडिओ, पुस्तक असेल तर कृपया शेअर करा...
17 Aug 2023 - 8:41 am | उग्रसेन
लेख वाचून भंजाळायाला झालं .
लय गीचमीड लेखन.
17 Aug 2023 - 9:15 am | प्रचेतस
गणिती संज्ञा सोडून द्या, पण मराठी अभंग, ओव्या अद्वैत वेदांत समजावून सांगतात हे स्वयंस्पष्ट आहे.
18 Aug 2023 - 1:33 am | प्रसाद गोडबोले
18 Aug 2023 - 1:33 am | प्रसाद गोडबोले
18 Aug 2023 - 12:46 pm | प्रसाद गोडबोले
आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
आजवर जे संत्साहित्य केवळ सुंदर काव्य किंव्वा आयुष्य सुखी करण्याचे तत्वज्ञान म्हणुन वाचत होतो , त्यातीक कितेक भाग वैज्ञानिक ज्ञानाच्या कसोटीवर सत्य आहे हे पडताळुन पहाता येतय ही एक अत्यंत समाधानाची बाब आहे माझ्यासाठी.
समर्थ परमार्थ स्तवनामध्ये म्हणाले तसे - नाना साधनांचे उधार| हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार |वेदशास्त्रीं जें सार| तें अनुभवास ये ||३||
जे एकदम प्रत्ययास येत आहे ! ह्याचाही थोडा अहंकार झाला होता पण त्याचेही निराकारण झाले जेव्हां एक मित्र म्हणाला कि - तुम्ही जे बोलताय ते आधीच सांगत आहेत सीनीयर लेव्हलचे सायंटिस्ट , नोबेल लॉरिएट फिजिसिस्ट !
क्वांटम कॉन्शस्नेस अँड ईट्स नेचर !
https://www.youtube.com/watch?v=Xx0SsffdMBw
Roger Penrose - Quantum Physics of Consciousness
https://www.youtube.com/watch?v=43vuOpJY46s
काय बोलणार ! आता हे कोणाला कसं काय समजाऊन सांगणार ! जाऊ दे! मला इथुन पुढे अजुन सोप्पे करुन लिहायला शब्दच सुचत नाहीत आता. माऊलींच्याच ओव्या आठायला लागतात!
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो ।तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥
ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ।तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥
तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता ।चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
राजाला "तू राजा आहेस" असे म्हणले तरी काय फरक पडतो, तो राजा आधीच राजा असतो . आणि समजा नाही म्हणलं की म्हणुन काय त्याच्या राजेपणाला उणेपणा येतो काय !
तसंच आत्मतत्वाचं आहे , आपण कितीही समजाऊन घेतलं काय की न घेतलं काय , त्याला काही लाभ हानी होत नाही , ते त्याच्या जागी आहे तसेच आहे.
-
इत्यलम
18 Aug 2023 - 4:13 pm | Bhakti
तरीच समजायला microtubules, cytoskeleton अवघड वाटायचं,हायला एपिजेनिटिक मेमरी_/\_
18 Aug 2023 - 10:26 pm | प्रचेतस
ह्यावरून शांतिपर्वातील सुरेख श्लोक आठवतात.
यथा हिमवतः पार्श्वं पृष्ठं चन्द्रमसो यथा ।
न दृष्टपूर्वं मनुजैर्न च तन्नास्ति तावता ॥
तद्वद् भूतेषु भूतात्मा सूक्ष्मो ज्ञानात्मवानसौ ।
अदृष्टपूर्वश्चक्षुर्भ्यां न चासौ नास्ति तावता ॥
ज्याप्रमाणे हिमालायचा पृष्ठभाग किंवा चंद्रावरील प्रदेश कुणीही मानवाने पाहिला नाही म्हणून त्यांचे अस्तित्व नष्ट होत नाही तद्वतच सर्व भूतांमध्ये सूक्ष्मरूपाने राहणारा असा ज्ञानस्वरूप आत्मा डोळ्यांनी दिसत नाही म्हणून नाहीच असे होत नाही.
पश्यन्नपि यथा लक्ष्म जगत् सोमे न विन्दति ।
एवमस्ति न चोत्पन्नं न च तन्न परायणम् ॥
जसे चंद्रावरील पृथ्वीचे हे कलंकरूप प्रतिबिंब दिसत असूनही तो कलंक म्हणजे पृथ्वीच आहे हे समजत नाही तसेच आत्म्याचे आहे
अशब्दस्पर्शरूपं तदरसागन्धमव्ययम् ।
अशरीरं शरीरेषु निरीक्षेत निरिन्द्रियम् ॥
हे आत्मत्त्व जरी शब्दहीन, स्पर्शहीन, रूपहीन, रसहीन, गंधहीन, अविकारी, अशरीरी आणि इंद्रियाविहिन असले तरीही त्याला जाणले पाहिजे.
19 Aug 2023 - 7:07 pm | उन्मेष दिक्षीत
>> आपण कितीही समजाऊन घेतलं काय की न घेतलं काय , त्याला काही लाभ हानी होत नाही , ते त्याच्या जागी आहे तसेच आहे.
ते आणि आपण वेगवेगळे नाही हे समजणं आहे. ईट कॅन नॉट बी डिवाइडेड, सो वी आर दॅट ! दॅट्स इट , इत्यलम.
2 Sep 2023 - 4:59 am | उन्मेष दिक्षीत
हिम्मत असेल इथे प्रतीसाद, प्रतीवाद करा ! का येत नाही , का, समजलं नाही अजून ?
14 Aug 2023 - 2:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
अधुन मधुन असे अगम्य लिखाण करुन आपल्या व्यासंगाचे प्रदर्शन करणे अणि वाचकांचे डोके भंजाळुन सोडणे हा लेखकाचा छंद आहे असे निरिक्षण नोंदवतो.
खालील लेख पहा
https://www.misalpav.com/node/51066
https://www.misalpav.com/node/48807
https://www.misalpav.com/node/47033
16 Aug 2023 - 6:00 pm | उन्मेष दिक्षीत
त्यांचेच डोके भंजाळलेले आहे
17 Aug 2023 - 1:55 pm | अहिरावण
तरीही अनेक जण बुचकळ्यात पडून घेण्यासाठी का होईना येतात आणि वाचतात हे लेखकाचे यश.
18 Aug 2023 - 3:23 am | उन्मेष दिक्षीत
फक्त बुचकळ्यात पडून घेण्यासाठी येतात
18 Aug 2023 - 12:48 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद संक्षी सर !
आपण ह्या लेखनावर प्रतिसाद द्यायच्या निमित्ताने का होईना,पण परत आलात हे पाहुन मला आनंद झाला !
18 Aug 2023 - 9:19 pm | उन्मेष दिक्षीत
तुम्हाला संक्षी आणि मी यातला फरक कळत नसेल ते ओळखण्याचा बेसीक इंटेलिजन्स नसेल तर मी काही करू शकत नाही
14 Aug 2023 - 4:57 pm | चलत मुसाफिर
लेख वाचून (मजसह) अनेक प्रतिसादकर्ते बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत.
अशां पामरांसाठी माझा एक जुना पण आधिभौतिक पातळीवरचा मुक्तछंदात्मक लेख सुचवतो. समजावयास जड जाऊ नये :-)
'पर्वतांतली मध्यरात्र'
https://www.misalpav.com/node/45210
14 Aug 2023 - 4:57 pm | चलत मुसाफिर
लेख वाचून (मजसह) अनेक प्रतिसादकर्ते बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत.
अशां पामरांसाठी माझा एक जुना पण आधिभौतिक पातळीवरचा मुक्तछंदात्मक लेख सुचवतो. समजावयास जड जाऊ नये :-)
'पर्वतांतली मध्यरात्र'
https://www.misalpav.com/node/45210
14 Aug 2023 - 7:06 pm | स्वधर्म
तुम्हीं तुमच्या अतिगूढ अनुभवाला शब्दांत बांधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण व्हॉट्स्अॅप व यूट्यूबवर प्रसिध्द कैलास येथे राहणार्या स्वामी नित्यानंद यांची आठवण आली.
https://www.youtube.com/watch?v=MC85TFltMKA
https://www.youtube.com/watch?v=Tem9GOWFIoo
14 Aug 2023 - 7:32 pm | अहिरावण
लेखन आवडले. अनुभवांचे तटस्थपणे पण विविध वैचारीक संप्रदायांशी सांगड घालत ते मांडणे हे सोपे नसते.
लिहित रहा... आम्ही अर्थ लावायचा प्रयत्न करु.
14 Aug 2023 - 7:45 pm | अहिरावण
वाचून मिपावरचा एक जुना लेख आठवला
15 Aug 2023 - 10:43 am | गवि
मा. श्री. मार्कस महाराज.
आपले लेखन विज्ञान, गणित, त्यातील क्लिष्ट पण महत्त्वाच्या संकल्पना, प्रमेये यांना जोडून पाहणारे असते. त्यात खूप मूलगामी विचार असतो. वरील अनेक प्रतिसाद पाहून ते नैसर्गिक वाटतात. किंबहुना लेखांमधील क्लिष्टता लक्षात घेता हे स्युडो सायन्स आहे अशीही टीका होऊ शकते.
आता यावर काही उपाय केलाच पाहिजे असे नाही. पण लोकांना अधिक include करून घेणे असेल तर एक बारीकसा बदल सुचवता येईल. ते म्हणजे एका वेळी एकच मुद्दा आणि एक दोन परिच्छेद इतकाच आकार ठेवल्यास बाईट साइज कमी होऊन खाणे सुलभ होईल. :-))
17 Aug 2023 - 8:03 am | चौकस२१२
बाईट साइज कमी होऊन खाणे सुलभ होईल.
आणि थोडे पचायला सहज जाईल असे बनवावे हि विनन्ती होती.... पण स्वान्तसुखाय हा अरेरावी पणा जर लेखक सतत दाखवत असेल तर त्यावर जी प्रतिक्रिया द्यवीशी वाटते ति प्रतिक्रिया हि सभ्य भाषेत देता येत नाही !
17 Aug 2023 - 1:57 pm | अहिरावण
स्वांतसुखाय हा अरेरावीपणा असला तरी भावतो. डाव्या, पुरोगामी, कर्मदरिद्री वांझोट्या दळभद्री बुद्धीच्या लोकांपेक्शा असले लेखक अधिक बरे.
18 Aug 2023 - 1:07 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा . स्वांन्तःसुखाय हा अरेरावीपणा असतो हे मला नव्यानेच कळाले !
मला इथं उन पावसाच्या खेळामुळे आकाशात इंद्रधनुष्य पडलेले दिसत आहेत. आणि मी माझ्याच मनाला म्हणतोय की कसलं भारीय राव हे ! आपला व्हिज्युअल स्पेक्ट्रम हा एवढाच आहे. रेड टू व्हायोलेट. आता आपल्याला सुर्यप्रकाश पांढरा जरी दिसत असला तरी तो फक्त आणि फक्त हाच्य सात रंगांनी बनलेला आहे. आणि त्याच प्रकाशाच्या तेजाने हे सारं जग उजळले आहे , जगातील यच्चयावत वस्तु प्रकाशित होत , आकलन होत आहेत त्याचेच हे सार आहे, आणि ह्या सात रंगाचे आकलन ही त्याचांच् प्रकाशाने होत आहे ! भागवतात जे म्हणले आहे ते यस्य भासा सर्वमिदं विभाति सचराचम् (श्रीमद्भा0 10। 13। 55)। त्याचा अर्थ हाच आहे ! व्हॉला !
आता कोणाला कळो न कळो, आहे हे असं आहे !
आता कोणाला ही अरेरावी वाटत असेल तर असो बापडे . त्याला काय करणार.
असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥
धन्यवाद !
15 Aug 2023 - 3:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडले...स्वांत सुखाय असले तरी आवडले.
जगजित काही वेळा फार खोलवर घाव घालून जातो खरा...
हा लेख वाचता वाचता (नुकतेच वाचले होते म्हणुन) हे आठवले
जडाचें मूळ तें चंचळ । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळासी नाहीं मूळ । बरें पाहा
पूर्वपक्ष म्हणिजे जालें । सिद्धांत म्हणिजे निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें
हें प्रचितीनें जाणावें । विचारें खुणेंसी बाणावें । विचारेंविण सिणावें । तेंचि मूर्खपणें
ज्ञानी भिडेने दडपला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करितो गल्बला । मायेंमधें
माया निशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें
निशेष मायेचें निर्शन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें
शब्दातीत अनुभव शब्दबध्द करण्याचा प्रयत्न आवडला...
पैजारबुवा,
16 Aug 2023 - 10:20 pm | अभिजीत
गॅरी झुकॉवचं ‘डान्सिंग वू ली मास्टर्स – अॅन ओव्हरव्हीव्यू ऑफ न्यू फिजिक्स’ किंवा फ्रित्जॉफ काप्राचं ‘ताओ ऑफ फिजिक्स’ किंवा रोजर पेनरोजची ‘शॅडोज ऑफ माइंड’ वा ‘एमपरर्स न्यू माइंड’ मध्ये जसा पौर्वात्य गूढवाद, आधुनिक भौतिकशास्त्र (पुंज भौतिकी, सापेक्षता वाद वगैरे), गणित (गोडेल, फुरीयर, स्टीफन हॉकिंग वगैरे गणिती) आणि संगणक शास्त्र यांचा संबंध लावणारी पुस्तकं असतात त्या प्रकारचं हे लिखाण आहे. आधुनिक शास्त्रे आणि हिंदू दर्शन शास्त्राची सांगड घालून समन्वय निर्माण करायचं कार्य अभिनिवेश टाळून करणं खूप कमी जणांना करता येतं. त्यात अनेक विद्या शाखा एकत्र आल्यामुळे अशा विषयात गम्य असणारे तर कमीच...
पण लिहिणाऱ्याने लिहीत जावे, कोणाला तरी स्फूर्ती मिळेलच.
18 Aug 2023 - 9:11 pm | चित्रगुप्त
लेख लई म्हणजे लईच भारी आहे. काही भाग मात्र डोक्यावरून गेला, आणि आता क्लिष्ट वाटणार्या गोष्टी प्रयत्नपूर्वक समजून घेण्याची शक्ती, चिकाटी उरलेली नाही. कधी काळी ते सॉक्रेटिस, लाओत्सु, कांट, हेगेल, देकार्त, रसेल, गीता वगैरे वाचून समजून घेण्याचे प्रयत्न केले; दासबोध, जे कृष्णमूर्ती, ओशो वगैरे वर्षानुवर्षे वाचले. पण आता जी काही पाच -दहा वर्षे उरली आहेत, त्यात असल्या गोष्टींची गरज उरलेली नाही. तब्येत जपावी, चित्रकला, संगीत, वाचन, नातवंडे यात रमावे - हेच पुष्कळ आहे. अगदी कधी वाटलेच, तर दासबोध उघडून काहीतरी वाचावे. तुम्हीच लेखात म्हटल्य्याप्रमाणे :
असो. जमल्यास ते हिमालयाच्या कुशीतले फोटो टाका आणि असेच उत्तमोत्तम लेखन करत रहा.
1 Sep 2023 - 12:35 pm | राघव
स्वान्त:सुखाय याचा अभिप्रेत अर्थ आहे आत्मानंदात असणे. मग परिस्थिती कोणतीही येवो, कशीही राहो. माणूस एखादं कार्य करत असो वा एका जागी स्वस्थ बसला असो, त्या आत्मानंदाच्या अनुभूतीत काहीही फरक पडत नाही. कोणतेही प्रश्न पडत नाहीत वा कोणतीही उत्तरे शोधण्याची गरज राहत नाही.
हीच स्थितप्रज्ञता. "ज्याला काहीच समजले नाही असे समजले, त्याला सर्व समजले" म्हणतात ते हेच. शब्दशः नाही तर भावार्थ बघायला हवा.
(हे म्हणजे प्रयत्न सोडणे नव्हे.. तर प्रयत्नानंतरच्या फळासाठीची आसक्ती सोडणे).
स्थितप्रज्ञता ही आत्मतत्वाची मूळ अवस्था आहे. त्यामुळे आत्मानंद मिळणे साधकाला कठीण नाही. तर तो टिकून राहणे कठीण आहे.
लक्षात घ्यायला हवं की कोणतेही भौतिक भोग हे आपण मनानं उपभोगतो. आजुबाजूच्या गोष्टींचे संस्कार आपण कळत/नकळत स्वीकार करतो आणि आपलं मन तिथं जडतं.
पण विचार करून बघीतलं तर दिसेल की आपल्यापैकी प्रत्येकाला असा ग्लिम्प्स कधी ना कधी आलेला आहे, ज्यावेळी आपण अकारण प्रसन्न असतो. त्यावेळी कुणी काहीही म्हटले तरी काहीही फरक पडत नाही. हा अनुभव, त्यातील आनंद मनातीत आहे.. आपण तो मनानं उपभोगत नाही. कारण मनाला त्या आनंदाच्या उगमाची माहितीच नाही. उलट मन त्या तरल अवस्थेत स्वतःच आनंदमय असतं, तद्रूप असतं.
ठाकूर म्हणतात "ब्रह्मतत्व अजून उष्टे झालेले नाही." हा आत्मानंद कसा असतो हे वर्णनातीत आहे, आपल्याला माहित असलेल्या कोणत्याही भाषेत त्याला शब्द नाहीत;
पण काही वेळानं तो अनुभव निघून जातो, कारण पुन्हा, आजुबाजूच्या गोष्टींचे संस्कार आपण कळत/नकळत स्वीकार करतो आणि आपलं मन तिथं जडतं.
याच मनाच्या जडण-घडणी नुसार, मनावर झालेल्या संस्कारानुसार आपलं चित्त बनतं. चित्तशुद्धीची गरज सांगितली आहे ती यासाठीच. की ज्यामुळे ही तद्रूपता टिकावी.
बाकी सर्व गोष्टींना सद्य ज्ञात वैज्ञानिक परिमाण लावलेच पाहिजे असे काही मला वाटत नाही. ज्याची त्याची इच्छा.
मार्कसभौ, आपण स्वान्तःसुखाय आहात हे खूप छान आहे. असा आनंद आपल्याला नेहमीच लाभू देत.
इत्यलम्
1 Sep 2023 - 2:32 pm | प्रसाद गोडबोले
धन्यवाद राघव !
मी काही ओढून ताणून वैज्ञानिक परिमाण लावायचा प्रयत्न करतोय असे नाही. गेल्या काही महिन्यात वेव फंक्शन , क्वांतम सुपरपोझिशन वगैरे वाचनात आले. आणि त्याची आपल्या अध्यात्मिक संकल्पनांना सोबत असलेले सार्धम्य पाहून चकित झालो, तेच मी माझ्या शब्दात लिहायचा प्रयत्न केला.
आपण सुप्रसिद्ध नोबेल लोरायट रॉजर पेनरोज ह्यांचा consciousness is not computational नावाचा एक व्हिडिओ आहे तो नक्की पहा. तसेच Stuart hammeroff चां Quantum physics of consciousness हा व्हिडिओ पहा. You will be astonished!
मी काय मला सगळं कळलं असे अहंकाराने म्हणणार नाही, पण जितकं कळलं तितके resonate झालं हे मात्र नक्की म्हणेन !
बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार.
आपला विनम्र
मार्कस ऑरेलियस
1 Sep 2023 - 5:24 pm | उन्मेष दिक्षीत
तुमचे मार्कस भाऊ, कोण स्तुती केली की नीट असतात, पण जरा कोण काय बोललं तर लगेच स्वान्तसुखाय वगैरे सगळं विसरुन लगेच त्यांना शत्रू असं लेबल देऊन टाकतात. त्यांचे स्वान्तसुखाय म्हणजे फक्त त्यांचे त्यांचे असते बर का ! त्यामुळे बरं झालं तुम्हे प्रो स्टँड घेतलात नाहीतर ते लगेच लहान मुलासारखे चिडले असते आणि तुम्हाला कुठला बालवाडीत करतात तसा गट क्रमांक वगैरे दिला असता स्वतःच.
मार कश,
मी जे तुमच्या आय डी वरून तुम्हाला थोडं चिडवलं तर बालवाडीत आहात का तुम्ही की सीनीयर केजी असं म्हणालात. मी केजीएफ आहे !
कोण भारी म्हटलं तर हरखणं, कोण चांगलं नाही म्हटलं तर लगेच प्रत्युत्तर, गट क्रमांक वगैरे बालीश प्रकार करणं, कुणी चिडवलं तर रडणं हे सगळे तुमचे प्रकार ज्युनीअर केजीतले आहेत ! लगे रहो, रडते रहो.
1 Sep 2023 - 6:47 pm | प्रसाद गोडबोले
२
1 Sep 2023 - 11:17 pm | उन्मेष दिक्षीत
माउली
यांचा एकही गुणधर्म नाही