आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस
कसं होत आठवीत गेल्यावर अ तुकडीला संस्कृत विषय मिळायचा.मधाळ वाणी,स्पष्ट उच्चार असणाऱ्या विद्यार्थिनांना अग राणी अस लाडिक बोलावणाऱ्या कर्वे बाईंच्या तासाला मी मंत्रमुग्ध होऊन जायचे.त्यामुळे संस्कृतची गोडी,आदर निर्माण झाली पण पाठांतर आणि माझा ३६ चा आकडा असल्याने मार्कात उजेड पडला नाही.पण कालिदास या संस्कृत भाषेतला एक महान कवी आहे हे बाईकडून समजले.तो इतका महान होता की त्याने चक्क ढगाला दूत करून दूर निरोप धाडले,वाह काय भारी वाटायचं.त्यामुळे सातवी की आठवीला चित्रकलेत ‘गणपती उत्सवातीईल आरास’ यासाठी ‘कालिदासाचे मेघदूत गायन ‘ असा देखावा असणारे चित्र काढले.हे चित्र पाहून वाटत ‘काय होती मी,आता नुसती ठोकळी झालीये’.
तर आषाढ जवळ येतोय तेव्हा मेघदूत वाचायचे इच्छा पूर्ण करावी असं ठरवलं.संस्कृत थोड थोड कळते ,तेव्हा मराठीच्या भाषांतर असलेले मेघदूत कोणते घ्यावे याची विचारपूस जाणकारांत केली-कुसुमाग्रज आणि शांता शेळके यांचे मराठीतलं मेघदूत प्रसिद्ध आहे हे कळाले.दोन्ही पुस्तक मागावली.मेघदूताची जवळपास २००पेक्षा जास्त भाषांतर उपलब्ध आहेत त्यात चिपळूणकर गुरुजी,बोरकर,सीडी देश्स्मुख ,बोरवणकर यांचेही मेघदूत टीका प्रसिद्ध आहेत.
कुसुमाग्रज १९५६ साली तर शांता शेळके यांनी १९९४ साली मेघदूत मराठीत अनुवादित केलं आहे.दोन्ही अनुवाद आपआपली विशेषता,भाषा घनता दाखवतात.शांता शेळके यांनी ‘पादाकुलका’ या छंदाच वापर केला तर कुसुमाग्रजांनी छंदोबद्ध भावानुवाद केला आहे.शांता बाईंच्या मेघदुतामध्ये शब्द सामर्थ्य खुलून दिसते ,कुसुमाग्रजांच्या मेघदुतामध्ये एका सरल रसाळता आहे.
माझे अनुभवलेले मेघदूत:
११६ (कुसुमाग्रज अनुवादित) १२०(शांता शेळके अनुवादित)श्लोक असलेले मेघदूत एक खंडकाव्य आहे.जे दोन भागात आहे –पूर्वमेघ आणि उत्तरमेघ !
पूर्वमेघ-
पहिल्याच श्लोकामध्ये सेवेत प्रमाद केल्यामुळे कुबेराकडून शाप मिळालेला यक्ष रामगिरी पर्वतावर मायभूमी अलकनगरीपासून दूर एकटाच कंठत आहे हे सांगितले आहे.
कश्चित् कान्ताविरहगुरुणा कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥ १
असा दूर शापित यक्ष विरह भावनेने कृश झाला आहे की त्याच्या हातामधून कंगणही गळून पडत आहे...या बारकाव्यातूनच पुढील काव्यात अशा अनेक रुपकाची लयलूट असणार हे लक्षात येते.अलकानगरी पासु आपल्या प्रिय पत्नी पासून दूर असणाऱ्या या यक्षाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी कृष्ण मेघ हा खेळकर गजाप्रमाणे डोंगराशी खेळणारा भासतो.आणि हाच आपला निरोप –विरह यातना आपल्या पत्नीकडे पोहचवू शकतो आणि ठरवतो या मेघालाच दूत करायचे-मेघदूत !
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रशथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं (प्रशम) वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥ २
तिसऱ्या आणि चतुर्थ श्लोकामध्ये या मेघाचे कौतुक करून ,यक्ष त्याचे स्वागत करतो.
तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोः अन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ ।
मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ॥ ३॥
प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी जीमूतेन स्वकुशलमयीं हारयिष्यन् प्रवृत्तिम्हारयिष्यन् प्रवृत्तिम् ।
प्रवृत्तिम् स प्रत्यग्रैः कुटजकुसुमैः कल्पितार्घाय तस्मै प्रीतः प्रीतिप्रमुखवचनं स्वागतं व्याजहार ॥ ४
पण असा मेघ नावाचा भौतिक घटक दूत कसा होणार?याचे उत्तर कवी देतोच ....विरहाने व्याकुळ प्रेमी ज्या प्रमाणे चंद्रमुख पाहून सजनीला आठवून गप्पा मारतो ,प्रेमिका फुलांशी प्रियकराच्या गप्पा मारते ,त्याचप्रमाणे अशा व्याकुळ यक्षाला चेतन अचेतन यांच्या सीमा राहत नाही...उरते केवळ उत्कट भावना!
धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः ।
इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तंइत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥ ५
यापुढे आठव्या श्लोकापर्यंत यक्षाने आपल्या विरह यातना मेघाला सांगितल्या आहेत.आता तू रामागीरीहून निघणार आणि अलका नगरीकडे आक्रमण करणार तेव्हा तो मार्ग कसा आहे याचे वर्णन केले आहे.कशा प्रकारचे शेत,विविध पक्षी ,फुलं ,जलाने भरलेले जलाशय ,पर्वतरांगा यांचे रसाळ वर्णन आहेच पण या मेघासह वाचकही या प्रवासाला निघतात.
विंध्य,विदिशा नगर,वेत्रवती सरिता,अवंती नगरी,सिंधू नदी,शिप्रा ,महाकाल नगरी ,देवगिरी,व्योमनदी,गंगा,,चंबल,ब्रम्ह्वार्ता,कुरुक्षेत्र ,सरस्वती नदी,क्रौंचगिरी,कैलास,मानस सरोवर आणि मग अलका नगरी
असा मार्ग १५-२० श्लोकामध्येसांगताना कालिदास भूगोलाचाही अभ्यासक होता हे समजते.या श्लोकांमध्ये निसर्ग सौंदर्य वर्णित केले आहे.मेघदूतमधला प्रमुख रस ‘शृंगार रस’!
नदीलादेखील एक सौदर्यवती ललना भासवली आहे(श्लोक २८)
चिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः
संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः ।
निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य
स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु ॥
मेघाला त्या नदीचा प्रियकर सांगितला आहे (श्लोक ३१,४०).
गम्भीरायाः पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम् ।
प्रवेशम् तस्मात् तस्याः तस्मात् कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धैर्यान् मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि ॥
शृंगारिक रतक्रीडेचे श्लोक केवळ शहारे देणारे आहेत (श्लोक ३७,३८,४१)
तस्याः किं चित् करधृतमिव चित् करधृतमिव प्राप्तवानीरशाखं नीत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितम्बम् ।
मुक्तरोधोनितम्बम् प्रस्थानं ते कथमपि सखे लम्बमानस्य भावि ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थः ॥ ४१
ह्याच बरोबर भक्ती रसाचे श्लोक आहेत.मेघाला महाकाल शंकाराची पूजा करण्यासाठी तुझ्या मेघ गर्जना डमरूसम त्या मंदिरात घुमू देत(श्लोक ३४,३६)पुढे हिमायात पोहचल्यावर शंभूची अर्चना करावी सांगितले(श्लोक ५६).
अप्यन्यस्मिञ् जलधर अप्यन्यस्मिञ् महाकालमासाद्य काले स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः ।
कुर्वन् संध्याबलिपटहतांकुर्वन् संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीयां आमन्द्राणां फलमविकलं लप्स्यसे गर्जितानाम् ॥गर्जितानाम्
कार्तिकेयाचे सेवा करण्यासाठी मेघ तुझे जल येथे उतरू दे(श्लोक ४३).
उत्तरमेघ –
उत्तरमेघाचा प्रमुख भाव विरह आहे.अलकानगरीत पोहचल्यावर मेघा तुला अवंती नगरी कशी दिसेल याचे सौंदर्यात्मक विवेचन आहे.(श्लोक २ ते १२)आणि तेराव्या श्लोकामध्ये यक्षाचे घर नेमके कसे ओळखायचे याचेवर्णन आहे,दारी इंद्रधनू तोरण...
तत्रागारं धनपतिगृहानुत्तरेणास्मदीयं दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्चारुणा तोरणेन ।
यस्योपान्ते कृतकतनयः कान्तय वर्धितो मे हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः ॥
तिथे विरहाने तळमळनाऱ्या पत्नीचा दिनक्रम कसा संथ निरस झाला असेल ,ती सतत अश्रू ढाळत असेल (श्लोक ४४ ).मुखावरील तेज ,केसांची रया,रात्रीची तिची घालमेल ,एकांत व्याकुळ रात्री कशा ती जगात असेल हे सांगितल्या आहेत.
अङ्गेनाङ्गं प्रतनु तनुना गाढतप्तेन तप्तं सास्रेणाश्रुद्रुतमविरतोत्कण्ठमुत्कण्ठितेन ।
उष्णोच्छ्वासं समधिकतरोच्छ्वासिना दूरवर्ती सङ्कल्पैस्तैर्विशति विधिना वैरिणा रुद्धमार्गः ॥
दोघांच्या प्रणयाच्या रात्री काही श्लोकात शृंगार रसात सांगितल्या आहेत.
अशा माझ्या प्रिय पत्नीला तू मेघा माझे कुशल सांग ,तिच्याविना मीही येथे तळमळतो आहे,आता केवळ चार मास धीर धर!असा निरोप सांग(श्लोक ५३)तिच्या कुशलतेचा निरोप घेऊन तू मेघा त्वरित माझाकडे निघून ये ही याचना यक्ष मेघदूताला करतो(श्लोक ५४)
कच्चित् सोम्यकच्चित् व्यवसितमिदं बन्धुकृत्यं त्वया मे प्रत्यादेशान्न खलु भवतो धीरतां कल्पयामि ।
निःशब्दोऽपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सितार्थक्रियैव ॥
-भक्ती
आषाढस्य प्रथमदिन.
प्रतिक्रिया
19 Jun 2023 - 3:21 pm | Bhakti
हे चित्र राहिले द्यायचं!

मैं बचपनसे ही आषढस्य प्रथमदिवसे निबंध लिखना चाहती थी :)
19 Jun 2023 - 4:35 pm | कर्नलतपस्वी
संस्कृत फक्त तोंडओळख नदी किंवा कवी शब्द चालवता येतो. एखादे दुसरे सुभाषित समोरच्याच्या तोंडावर मारून इम्प्रेशन जमवायचे एवढेच.
शांताबाईच्या गावातला ,त्यांचा भक्त म्हणून त्यांच्या इतर पुस्तका बरोबर मेघदूत ही घेतले. फारसे डोक्यात गेले नाही.
कामटी, नागपूर ला असताना रामटेक बघीतले. तीथेच मला वाटते हे महाकाव्य रचले असावे. नक्की माहीत नाही.
महाकवी कालिदास यांच्या समग्र साहित्याचा संक्षिप्त आढावा ,विषेशता नायीकांचा नागनिका यांनी घेतला आहे. इथे बघा.
https://www.misalpav.com/node/type/story
"कालिदास दिपशीखा"
लिंक कदाचित चुकली वाटतयं.
बाकी लेख सुंदर.
आषाढ्स्य प्रथमदिने या गोष्टीचा माझ्या पुरता संबंध म्हणजे, आई लहानपणी आषाढ तळायची आणी आम्ही त्यावर तुटून पडायचो.
आषाढाला आखाडअसेही म्हणतात.
या जन्मात नाही पुढील जन्मात जर संस्कृत शिकायला मिळाले तर कालिदास यांचे सर्व साहित्य वाचायला मिळो.
20 Jun 2023 - 2:02 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://www.misalpav.com/node/49178
19 Jun 2023 - 4:44 pm | Bhakti
शांताबाईच्या गावातला ,त्यांचा भक्त म्हणून त्यांच्या इतर पुस्तका बरोबर मेघदूत ही घेतले. फारसे डोक्यात गेले नाही.
हो शांताबाईंनी भाषांतर केले आहे ते जरा समजायला कठीणच आहे.कुसुमाग्रजांनी भाषांतर केलेलं मेघदूत सहज सुंदर आहे,ते वाचा.
19 Jun 2023 - 5:09 pm | कर्नलतपस्वी
पितृदिना निमित्त मुलींनी खुप सारी पुस्तके भेट दिली आहेत. संपली की आणतो. नक्कीच वाचेन.सध्या जिग्ना व्होरा ची आत्मकथी हातात आहे. मनो यांचे अज्ञात पानिपत प्रवासात आहे उद्या येईल.
कुसुमाग्रज ही अफलातून आहेत.
सेवानिवृत्तीनंतर या सर्व जुन्या मराठी साहित्याच्या वारकऱ्यांनी वेड लावले आहे.
धन्यवाद.
19 Jun 2023 - 8:24 pm | धर्मराजमुटके
समयोचित लेख ! खरे तर आज मला ह्याच विषयावर लिहायचे होते पण वेळ काढता आला नाही. असो.
आयुष्यात फार काही शिकायचे / करायचे राहून गेले. संस्कृत शिकणे ही त्यातलीच एक इच्छा. आयुष्याच्या उतारावर आता सुरुवात करावी म्हणतो.संस्कृत मृत भाषा झाली आहे, तिचा सध्याच्या जगात काही उपयोग नाही वगैरे बरेच ऐकले आयुष्यभर. असेही आयुष्यभरात अनावश्यक अशा अनेक गोष्टी केल्यात तर अजून एक करावी.
बघू या कसे जमते ते.
अवांतर :
बायकोने कान उपटल्यामुळे तुलसीदास आणि कालिदास मोठे झाले तशा पुरुषांनी बायकांच्या झिंज्या उपटल्यामुळे त्या मोठ्या झाल्या अशी काही उदाहरणे आहेत काय इतिहासात ?
20 Jun 2023 - 10:56 am | Bhakti
चांगला प्रश्न आहे.नक्की माहिती नाही पण जनाबाई, कान्होपात्रा,मुक्ताई ह्यांनी तत्कालीन समाजाला पुरुषी वर्चस्वात संत होऊन आदराचे स्थान निर्माण केले.
20 Jun 2023 - 1:55 pm | राजेंद्र मेहेंदळे
बायका ह्या मुळातच शहाण्या असल्याने झिंज्या उपटण्याची गरज पडत नसावी.
20 Jun 2023 - 2:56 pm | Bhakti
बायका ह्या मुळातच शहाण्या असल्याने
मी हेच लिहिणार होते :),पण स्वतःच स्वतःच कौतुक कसं करावं ;)
20 Jun 2023 - 6:29 pm | प्रचेतस
आहा...!
सुंदर लिहिलंय. कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी नगरीवरचं प्रेम मेघदूतात प्रकर्षाने व्यक्त होतं, वास्तविक मेघाच्या मार्गात अवंती येत नाही मात्र कालिदास यक्षाकरवी मेघाला आग्रह करतोय की अवंतीनगरी अवश्य पाहूनच ये.
20 Jun 2023 - 8:38 pm | Bhakti
कालिदासाचं त्याच्या उज्जयिनी नगरीवरचं प्रेम मेघदूतात प्रकर्षाने व्यक्त होतं
अगदी!निसर्ग वर्णनही अप्रतिम!दैवी प्रतिभा-कालिदास.
23 Jun 2023 - 12:28 pm | पुष्कर
मेघदूत - एक आवडता विषय आहे. आषाढस्य प्रथमदिवसे काय, नीचैर्गच्छ्त्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण - हा श्लोक काय, सगळेच लिजेंडरी आहेत.
कुसुमाग्रजांचं वाचलं होतं. मला शांताबाईंचं भाषांतर जास्त भावलं, जरी ते समवृत्ती नाही, तरीही. बोरकर आणि सी डी देश्मुखांनीही समश्लोकी-समवृती भाषांतर केलं आहे. सी डी देशमुख वाचताना आपण जवळपास संस्कृतच वाचत आहोत असं वाटतं. अतिसंस्कृतप्रचुर भाषांतर आहे त्यांचं. बोरकर माझे आवडते कवी. एरवी मी त्यांच्या बाजूला झुकलो असतो, पण शांताबाईंचे सहज-सोपे शब्द इतके आवडले की त्याला तोड नाही. अर्थात आवड आपली-आपली.
23 Jun 2023 - 2:12 pm | Bhakti
बाकीचे अनुवाद नक्कीच वाचेन.