खोकेबाज धोकेबाज ।
इतरा म्हणत गद्दार!
स्वत: दिला पदभार।
सोडोनिया ।।
ठाकरेंनी जरी घातले,
सर्वोच्च कोर्टा साकडे,
पाऊल पडले वाकडे,
भलतेची।।
अननूभवी कुणी बनला ।
निवडणूकीस न उभारता।
मालमत्ता अर्ज न भरता।
मुख्यमंत्री।।
शाह- नानाने मात दिली।
भाज्यपाल जरी चूकले।
महाविकासआघाडी झूकली।
यामुळेचि।।
आत्मविश्वास अभाव?
अल्पमताची चाहूल?
कि अल्पमतीची हूल।
राजीनामा!!
बंडखोरांची ती सहल।
हाॅटेल डोंगर ती हिरवळ।
16अपात्र म्हणे झिरवळ।
योग्य होते?!
हेटाळले तुम्ही ज्यांना।
अलीबाबा,चाळीस चोर।
ठरले काळीज शिरजोर।
शिंदेशाही।।
आपण लाचारपणे।
केला असंगासी संग।
व सोडला भगवा रंग।
खुर्चीसाठी।।
नाव गेले,चिन्ह गेले।
संपली राजकीय सदी?
हिंदूत्व,पक्ष,वारसा-गादी ।
हाराकीरी।।
कारकीर्द इकडे पणाला।
मारला मोक्यावरी चौका।
आता नाही काही धोका।
शिंदे यांना।।
प्रतिक्रिया
11 May 2023 - 10:02 pm | विवेकपटाईत
फ्लोअर टेस्ट वर निकाल १६४/९९ होता. सूर्य प्रकाशाऐवढे सत्य दिसत असूनही राज्यपाल जवळ टेस्टिंग आदेश देण्याचे ठोस कारण नव्हते ही टिप्पणी काही पचली नाही.
11 May 2023 - 10:34 pm | भीमराव
आज सरकार पडलं असतं तर हिच भाजपा राष्ट्रवादी सोबत परत सत्तेवर आली असती. आजची भाजपा संघाच्या नाही सत्तेच्या विचारसरणीची आहे.
12 May 2023 - 8:38 am | श्रीगणेशा
छान आहे कविता!
----
या विषयावरील मिपावरील चर्चेची सुरुवात कवितेतून होईल, असं वाटलं नव्हतं :-)
एक गोष्ट मात्र नोंद घेण्यासारखी आहे -- कोर्टाने राजीनाम्यानंतर घडलेल्या राजकीय प्रक्रियेवर मात्र भाष्य केलं नाही, आणि तसं अपेक्षितही होतं -- बहुमत येऊन नवीन सरकार येणं, ते एवढे दिवस टिकणं, एका गटाला निवडणूक आयोगाकडून नाव व चिन्ह मिळणं, या सर्व गोष्टी लोकशाहीमधे अपेक्षित आहेतच, असा मूक विचार त्यामागे असावा.
13 May 2023 - 10:44 am | कर्नलतपस्वी
मातोश्रींनी पेढे दिले.
वर्षानी पण पेढे दिले.
😀