एके दिवशी- दुसर्या प्रहरी- नेत्र उघडता तिसरा
मितीत चवथ्या- झालो दाखल -(खतरा होता जबरा)
पाचावरती धारण बसली - षट्चक्रे लडखडली
सप्तरंग मिसळले वर्णपटी- श्वेतप्रभा लखलखली
अष्टसिद्धी नवविधा भक्तिच्या चरणी शरण जव गेल्या
अनाहताच्या अनुनादाने - दाही दिशा दुमदुमल्या
प्रतिक्रिया
26 Mar 2023 - 2:15 am | कर्नलतपस्वी
कविता सुदंर आहे. आवडली.
26 Mar 2023 - 2:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली कविता,
पैजारबुवा,
29 Mar 2023 - 1:51 pm | राजेंद्र मेहेंदळे
स्टेजवर १-२-३-४-५-६-७-८-९-१०-११-१२-१३ म्हणत नाचणारी :)
29 Mar 2023 - 5:29 pm | चौथा कोनाडा
छान लयबद्ध कविता !
ही सुंदर कविता आवडली !
चाल लावून गाणं केलंत तर नक्की इथे डकवा !