माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
19 Aug 2022 - 11:26 am

भाग १ इथे.

नमस्कार रूळगाडी मित्रांनो !

आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार !

या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.

तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... !

ok

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

रात्रीचे चांदणे's picture

13 Mar 2023 - 10:23 am | रात्रीचे चांदणे

नक्की सुचवा कुमार. रेल्वे मंत्र्यांना आणि IRCTC ला सुचविणार. अशा वेळी रेल्वे कडून पोचपावती मिळते का?

ट्विटरवर रेल्वे मंत्रालयाची दोन तीन अकाउंट सापडतील. तिथे मेसेज टाकला की " तुमची तक्रार समजली,योग्य डिपार्टमेंटला कारवाईसाठी पाठवली आहे आणि आदेश दिले आहेत" हे उत्तर येते. कधीकधी नाही येत.

कुमार१'s picture

13 Mar 2023 - 2:49 pm | कुमार१

बघतो अनुभवून !

कुमार१'s picture

14 Mar 2023 - 3:50 pm | कुमार१

वरीलप्रमाणे सूचना केलेली ईमेल या पत्त्यावर पाठवली आहे :
cste@cr.railnet.gov.in

मी एक्सटेंशन वायरीच बनवल्या आहेत.(धागा काढला होता.) एका मिपाकराने सुचवले की ११०व्होल्ट डीसी करंट रेल्वेत एक्सटेंशन करू नका. मग मी पाच वोल्टस एक्सटेंशन वायरी (५ -६फुटी)बनवल्या. दोन्ही नेतो. कारण रेल्वेतही उपयोगी होतात शिवाय हॉटेल रुममध्येही कामाला येतात. तिथे दिलेल्या तुमचा बेडजवळचा इले पॉईंट चालत नसतो आणि टॉइलेटजवळचा चालू असतो तेव्हा उपयोगी पडतो.

कुमार१'s picture

13 Mar 2023 - 2:51 pm | कुमार१

**पाच वोल्टस एक्सटेंशन वायरी (५ -६फुटी)बनवल्या
>>> उत्तम ! आवडले.
तुम्ही दर्दी आहात .. 🙂 smile

कुमार१'s picture

13 Mar 2023 - 10:11 am | कुमार१

हुबळी येथे जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म तयार झाला आहे.
लांबी 1507 मीटर्स

कुमार१'s picture

13 Mar 2023 - 3:15 pm | कुमार१

भारतातील सर्वात अल्पाक्षरी नावे (२ अक्षरी) असलेली ही दोन रेल्वे स्थानके :
१.
ok

आणि ..

कुमार१'s picture

13 Mar 2023 - 3:16 pm | कुमार१

हे :

कुमार१'s picture

13 Mar 2023 - 3:18 pm | कुमार१

हे :
ok

सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी चालवली.

बातमीचा दुवा

कुमार१'s picture

14 Mar 2023 - 1:32 pm | कुमार१

हार्दिक अभिनंदन !

कुमार१'s picture

16 Mar 2023 - 8:53 pm | कुमार१

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपल्या ताज्या अहवालात सांगितले आहे की,
गेल्या तीन वर्षात रेल्वे रुळांवर 63,000 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे.

2017-18 आणि 2020-21 दरम्यान रेल्वे अपघातात चार आशियाई सिंह आणि 73 हत्तींनी आपला जीव गमावला आहे.

कुमार१'s picture

18 Mar 2023 - 10:21 am | कुमार१

ok

पूर्व रेल्वेच्या या स्थानकाचे एक वैशिष्ट्य आहे .
या स्थानकाचे नाव बेला बोस (नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुतणी) यांच्यावरून दिले गेले आहे.

एखाद्या रेल्वे स्थानकाला भारतीय नागरिक असलेल्या महिलेचे नाव देण्याची ही पहिली घटना होती.

कुमार१'s picture

21 Mar 2023 - 8:53 pm | कुमार१

वंदे भारत मधील प्रवास :
हेडफोन्सच्या चोऱ्या.. प्रवाशांचे असभ्यपणे बसणे आणि वागणे.. गाडीतील अस्वच्छता आणि.. गाडीवर दगडफेक ..

आपली लायकी नाही हेच खरे !

कंजूस's picture

22 Mar 2023 - 3:41 am | कंजूस

या निमित्ताने -
अशा गाड्या सुरू झाल्या की खाजगी बस वाहतुकदारांचे गिऱ्हाईक कमी होते.
माथेरान मिनी ट्रेन, एसटीची कर्जत -माथेरान बस यामुळे टॅक्सी चालकांचे गिऱ्हाईक कमी होते.

कुमार१'s picture

24 Mar 2023 - 9:19 pm | कुमार१

हिमसागर एक्सप्रेसचे एक वैशिष्ट्य आहे. ती 3789 km अंतर 68 तास व 20 मिनिटांत पार करते.

या संपूर्ण प्रवासात तिचे एकच इंजिन (ED P4) सलग काम करीत असते.

कुमार१'s picture

27 Mar 2023 - 10:48 am | कुमार१

भारत-बांगलादेश सीमेवरचे सिंहाबाद हे भारतातील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावरील सर्व यंत्रणा जशाच्या तशा ब्रिटिशकालीन आहेत.

कंजूस's picture

28 Mar 2023 - 8:17 pm | कंजूस

रेलयात्री app हे ठाणे - नाशिक रुटवर वंदे भारत गाडी 22223 दाखवताच नाही.
_______
Locate my train app
ही गाडी दाखवते पण fare दाखवत नाही.
__________
रेल्वेचेच app NTES FARE साठी नाही.
_________
रेल्वेचीच साइट indianrail.gov.in
वंदे भारत 22223 साठी chair car (cc) दाखवते पण executive chair car दाखवत नाही.
______
irctc.co.in site दोन्ही क्लास दाखवते पण fare break up समजत नाही.
(660,1190!)
जेवण /नाश्ता न घेण्याचे पर्याय अजून नाही.
यूट्यूबवर एका विडिओत जेवण वाईट आहे दाखवत आहे.

एकूण साईराम म्हणतात तसे श्रद्धा आणि सबुरी ठेवा.

कुमार१'s picture

29 Mar 2023 - 1:17 pm | कुमार१

सबुरी >>+११
…..
ट्रेनचे वातानुकूलित तिकीट काढलेले असल्यास ट्रेन येण्यापूर्वी स्थानकावर वातानुकूलित खोलीत बसण्याची निशुल्क सेवा आतापर्यंत असायची.

अलीकडे काही स्थानकांवर तशी बंद केली असून तासाला वीस रुपये या दराने तिथे बसता येते. तिथे सामान्य लोखंडी खुर्च्यांऐवजी आरामशीर सोफे ठेवलेले आहेत.

कुमार१'s picture

29 Mar 2023 - 1:20 pm | कुमार१

माणशी वीस रुपये असा आहे

सुबोध खरे's picture

29 Mar 2023 - 7:26 pm | सुबोध खरे

हि चांगली गोष्ट आहे.

दोन पैसे देऊन चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या तर ते लोकांच्या पचनी पडेल आणि हळू हळू सर्व सोयी सुविधा फुकटात किंवा नाममात्र दरात मिळाल्या पाहिजेत या दळभद्री मनोवृत्तीतुन भारतीय जनतेची मुक्तता होईल.

सवंग लोकप्रियतेसाठी स्वस्त दरात/ फुकट प्रवास अन मग पैसे नाहीत म्हणून सुविधा नाहीत आणि आधुनिकीकरण सुद्धा नाही या शृंगापत्तीतून रेल्वेची सुटका होणे अत्यावश्यक आहे.

सर्वच्या सर्व वंदे भारत गाड्या आणि व्हिस्टाडोमी कोचेस (ज्याचा दर सर्वात जास्त आहे) भरून जातात यावरून आपण धडा घेतला पाहिजे.

कारण वातानुकूलित प्रतिक्षालयात कोणत्याही वर्गातील लोक आपल्या बापाची जागा असल्यासारखे बस्तान टाकून बहुतांश पाहायला मिळतात. कित्येक लोक आपले सामान सुद्धा बसायच्या जागेवर ठेवून आरामात पहुडलेले दिसतात.

मागच्या वर्षी ऑक्टॉबर महिन्यात झाशी येथे असाच २० रुपये दर असलेले वातानुकूलित प्रतिक्षालय (दुर्दैवाने गाडी येण्याच्या वेळेस) पाहिले. तेथे असेच सोफे आणि वाय फाय ची उत्तम सुविधा होती याशिवाय तेथे चहा कॉफी खाद्यपेये यांचीही सशुल्क सोय होती.

आम्ही अगोदर बसलेल्या वातानुकूलित वर्गाच्या प्रतिक्षालयात भरपूर लोक बसलेले होते. काही वेळाने तेथे पोलीस आले. त्यांनी लोकांना आपली तिकिटे दाखवायला सांगितल्यावर अर्ध्याच्या वर लोक बाहेर गेले आणि वातानुकूल वर्गाचे तिकीट काढलेल्या लोकांना बसायला जागा झाली.

कुमार१'s picture

29 Mar 2023 - 8:50 pm | कुमार१

<कारण वातानुकूलित प्रतिक्षालयात कोणत्याही वर्गातील लोक आपल्या बापाची जागा असल्यासारखे बस्तान टाकून बहुतांश पाहायला मिळतात.>
अ - ग दी.

आज मी सोलापूर स्थानकावर त्या सशुल्क खोलीचा लाभ घेतला तेव्हा अगदी फरक जाणवला !
मोजकेच लोक आत आले होते. पूर्वी असे दिसायचे की रेल्वेचे कर्मचारी सुद्धा त्या विभागात ऊठसूठ जात येत असत. बाकी वशिलेवाले तर वेगळेच.

कंजूस's picture

29 Mar 2023 - 9:43 pm | कंजूस

Central Railway achieves a landmark in ticket checking performance. 46.32 lakh cases penalized and earned ₹ 300 crore in FY 2022-23
https://cr.indianrailways.gov.in/view_detail.jsp?lang=0&id=0,4,268&dcd=8...

कंजूस's picture

29 Mar 2023 - 9:49 pm | कंजूस

२०१९ ओक्टोबर - झाशी एसी वेटींग रूम दहा रू तास होती.

निरनिराळ्या वेटिंग रूममध्ये बसू देण्याबाबत साऊथ सेंट्रल आणि सदन रेल्वे काटेकोर पालन करते. तिकिटांचा पीएएनआर नंबर लिहिल्यावरच अटेंडड बसू देतो.

कंजूस's picture

29 Mar 2023 - 9:50 pm | कंजूस

दुरुस्ती.

कुमार१'s picture

30 Mar 2023 - 5:41 pm | कुमार१

डॉ. रावजी शिंदे यांनी तयार केलेले चुंबकीय रेल्वेचे प्रारूप इथे पाहता येईल. आता त्याची आयआयटीतर्फे पाहणी होणार आहे.

कुमार१'s picture

3 Apr 2023 - 11:50 am | कुमार१

ट्रेनच्या प्रवासात मोठ्या स्थानकाच्या आसपास

"उपरी उपस्कर कर्षण डिपो"

अशी पाटी अनेक वेळा पाहण्यात येते. उत्सुकता म्हणून या शब्दांचे अर्थ पाहिले.

उपस्कर म्हणजे उपकरण
उपरी उपस्कर = pantograph
ok

कुमार१'s picture

5 Apr 2023 - 7:35 am | कुमार१

जोशी रेल्वे संग्रहालयात ‘वंदे भारत’ची प्रतिकृती दाखल होणार

https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne23p05239-txt-p...

सुधीर कांदळकर's picture

6 Apr 2023 - 8:39 pm | सुधीर कांदळकर

वेडिंग रूम आवडली. धन्यवाद.

साधे डबे जोडतील का? लोकल ट्रेनच्या डब्यांना टॉइलेटस लावून?

कुमार१'s picture

7 May 2023 - 6:53 am | कुमार१

दुमजली ट्रेन जाऊ शकेल असा भारतातील पहिलावहिला बोगदा अरवली पर्वतराजींमध्ये करण्यात येईल:

ok

कानडाऊ योगेशु's picture

28 Jun 2023 - 6:32 pm | कानडाऊ योगेशु

दुमजली ट्रेन जाऊ शकेल असा भारतातील पहिलावहिला बोगदा अरवली पर्वतराजींमध्ये करण्यात येईल:

हे समजले नाही. समजा विद्युत शक्तीवर धावणारी रेल्वे असेल तर प्रत्येक डब्याची उंची ओवरहेड वायरपेक्षा जास्त नसणारच आहे आणि ही उंची ही माझ्यामते प्रमाणीकृत असावी. मग इथे बोगद्याच्या उंचीचा संबंध काय हे समजले नाही.

इपित्तर इतिहासकार's picture

28 Jun 2023 - 7:28 pm | इपित्तर इतिहासकार

Dedicated freight corridor बद्दल बोलत असावेत.

images-6

डबल स्टॅक फ्रेट ट्रेन, WDFC प्रकल्पाच्या अंतर्गत चालवली जाणार आहे, कदाचित ह्या ट्रेन्स पास होतील अश्या बोगद्याच्या बद्दल बोलले जात असावे.

images-7

WDFC चा नकाशा पाहता तो रूट पण अरवली पर्वतराजी मधून जातो त्यामुळे बहुतेक ह्यावरच बोलायचे असेल.

सर टोबी's picture

7 May 2023 - 11:23 am | सर टोबी

पुर्वी चेअर कार ३ * २ असावयाच्या बहुतेक आणि सर्व सीटस् एकाच दिशेने असायच्या. ती रचना आरामदायक आणि जास्त सुखकर होती असे वाटते. मला नेमकी मधल्या रांगेत, जिथे प्रवासी समोरा समोर बसतात तिथे मिळाली. सगळ्या डब्यात या दोन रांगेतील लोक आपल्या नशिबाला दोष देत असतिल.

आपण भारतीय सुटसुटीत प्रवास करण्याच्या बाबतीत अगदी उदासिन असतो. त्यामुळे अगोदरच अरूंद जागेत मोठ्या बॅगा कोंबण्याचा आणि ईतर प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळतो.

डब्यातील टिव्ही संचावर सतत मोदींची छबी झळकावणं हा अजून एक त्रास असतो. तसेच टॅायलेटच्या बाजूलाच पॅकबंद खाण्याचं सामान रचून ठेवलेलं असतं.

एकूण प्रवासाचा अनुभव फारसा चांगला नव्हता. त्यात पुणे स्थानकाची दशा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. एरवी फक्त रेल्वे अथवा पोलिस भरती अथवा गणेशोत्सवात फलाटावरच राहणार्या लोकांची गर्दी आता कायम स्वरूपी झाली आहे.

कुमार१'s picture

7 May 2023 - 11:33 am | कुमार१

आपण भारतीय सुटसुटीत प्रवास करण्याच्या बाबतीत अगदी उदासिन असतो. त्यामुळे अगोदरच अरूंद जागेत मोठ्या बॅगा कोंबण्याचा आणि ईतर प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार सर्रास पहायला मिळतो.

+११११११११११
..
अन्य काही मुद्दे स्वतंत्र लिहीतो.

कुमार१'s picture

7 May 2023 - 11:36 am | कुमार१

कुठल्याही एकाच निकषावरून संपूर्ण समाजावर शिक्का मारण्याचा अजिबात हेतू नाही.
तरीसुद्धा हे अस्वस्थ करतेच......

माझा भारतीय ट्रेनने बऱ्यापैकी प्रवास होतो. (सर्व स्तरातील) बहुसंख्य भारतीयांमध्ये नागरी जाणीव नसल्याची प्रवासातली ही काही दृश्य मी नेहमी पाहतो :
१. प्रवास करताना मोबाईलवर गाणी/ किंचाळी बातम्या मोठ्या आवाजात लावणे. किंबहुना इअरफोन्स जवळ बाळगायचे असतात याचा बहुसंख्यांना गंध सुद्धा नाही.

२ अ. ) चेअरकार पद्धतीच्या डब्यांमध्ये विमान प्रवासातल्या आकाराइतकी मोठी बॅग घेऊन चढणे आणि मग ती वरच्या कप्प्यामध्ये बसत नसल्यामुळे कडेच्या सीटला लागूनच ठेवणे. त्यामुळे दोन रांगांच्या मधली मार्गिका तीन चतुर्थांश बंद होते.

२. ब ) वातानुकूलित डब्यांमध्ये आपले खाणे पिणे झाल्यानंतर उठण्याचे अजिबात कष्ट नकोत म्हणून खरकटे कप आणि कागदी किंवा प्लास्टिकच्या ताटल्या पुढच्या सीटच्या मागे असलेल्या जाळीत खोचून ठेवणे.

३. शयनयान पद्धतीच्या डब्यांमध्ये जेव्हा आपण बसलेले असतो, तेव्हा समोरचे सीट थोडेसे रिकामे दिसताच मोठ्या माणसांनी त्यावर चप्पल बुटांसकट पाय टेकवून ताणणे. ही सवय लहानपणापासूनच लागू नये यासाठी स्वतःच्या मुलांना बजावण्याची फिकीर नसणे. काहीजण तर वरच्या बर्थवर चढताना देखील बुटांसकट चढतात.
असो.

कुमार१'s picture

15 May 2023 - 7:19 am | कुमार१

प्रवासात मोबाईलच्या आवाजाबाबत रेल्वे मंत्रालयाने नवीन नियम जाहीर केलेले आहेत
प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा.

कंजूस's picture

7 May 2023 - 2:54 pm | कंजूस

वंदे भारतचा अनुभव -
सर टोबी, आणि कुमार१
--
झकपक गाड्या माझ्यासाठी नसतात हे मला माहीत आहे.

ऑनलाईन पेपरलेस तिकिट मोबाईलवर काढण्याचे UTS APPआहे.
तिकिटाची रक्कम देण्यासाठी {फक्त} तीन पर्याय ठेवले आहेत. Paytm, mobiqwik , आणि freecharge .

मी freecharge wallet वापरून तिकिट काढले. (ट्रायल). पाच रु तिकिटाला 5.11 घेतले.

म्हणजे wallet पेमेंटला जीएसटी लागू झाला आहे. हा पैसे घेणाऱ्याने भरायचा असं सांगितलं होतं पण तो कर देणाऱ्यालाच लागू आहे हे दिसत आहे. wallet पेमेंटची एन्ट्री सेविंग अकाउंटला होत नसते. युपिआई पेमेंटची होत राहाते. हा एक फायदा होता.
(विविध wallet चे अधिकतम पैसे ठेवायची मर्यादा वेगवेगळी आहे. अमेझोन आणि पेटीएम दहा हजार रु, तर freecharge साठी पाच हजार.)
एकूण walletसुविधा गंडली आहे.

कुमार१'s picture

8 May 2023 - 9:30 am | कुमार१

आता रेल्वेने तिकीट तपासनिसांची सुरक्षा वाढवण्यासाठी टीसीच्या कपड्यावर बॉडी कॅमेरा लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासी आणि टीसी यांच्यात होणारे वाद रेकॉर्ड होणार आहेत

हे जोडपे खरेखुरे ट्रेनप्रेमी !
त्यांनी अकरा दिवस ट्रेनने सलग प्रवास केला आहे. (११,००० किमी). कुठलीही पर्यटन स्थळे पाहणे हा त्यांच्या सफरीचा उद्देश नाही

कंजूस's picture

14 May 2023 - 10:23 am | कंजूस

खिडकीतून दिसत राहणारी.

कुमार१'s picture

14 May 2023 - 9:07 am | कुमार१

एका ट्रेन प्रवासात आमची गाडी दोन स्थानकांनदरम्यान बराच वेळ थांबून ठेवली होती. त्यावेळी दारात उभे राहून समोर पाहिले असता एक छान चित्रमय इंजिन दिसले :

ok

अनिकेत वैद्य's picture

18 May 2023 - 10:45 am | अनिकेत वैद्य

हे डिझाईन हुबळी डिझेल लोको शेड ला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तयार केले असून त्या लोको शेड मधील सर्व इंजिनांना असे रंगवण्यात येणार आहे.

कुमार१'s picture

16 May 2023 - 1:56 pm | कुमार१

ट्रेनमधील स्टेअरिंग व्हीलचा खरा उपयोग

स्टेअरिंग व्हील हे आता प्रामुख्याने WAG, WAM आणि WAP सारख्या जुन्या लोकोमोटिव्ह इंजिनमध्येच दिसते.
ते ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरले जाते.

कुमार१'s picture

17 May 2023 - 11:38 am | कुमार१

छान बातमी.
नेहमीप्रमाणेच सुंदर चलतचित्र !
बरेच दिवस भेट न झालेले प्रवासी इथे चित्रासह भेटल्यामुळे आम्ही सर्व ट्रेनवासीय खूश झालेलो आहोत 🙂

१२०/तास वेग मी मोजला आहे. गाड्यांना स्टॉपच कमी दिले तर जाणारच लवकर शेवटच्या ठेसनाला.
आणि च.चि. आवडले. Gif?

१२०/तास वेग मी मोजला आहे. गाड्यांना स्टॉपवर कमी दिले तर जाणारच लवकर शेवटच्या ठेसनाला.
आणि आवडले. Gif?

सुबोध खरे's picture

17 May 2023 - 12:09 pm | सुबोध खरे

मडगाव जनशताब्दी सुरु झाली तेंव्हा पण ती साडे तासातच जात असे.

सकाळी साडे पाचला निघून एक वाजे पर्यंत मडगावला पोचत असे आणि दोनला निघून रात्री साडे नऊ पर्यंत दादरला पोचत असे. तेंव्हा या गाडीला केवळ द्वेष( मध्य रेल्वे कडून कोकण रेल्वेचा) म्हणून रोह्याच्या पुढे रडवत असत यामुळे परत येताना गाडीची हमखास उशीर करत असे.

जसजशी कोकण रेल्वे वर वाहतूक वाढत गेली तसा गाडयांना क्रॉसिंग चा वेळ वाढत गेला आणि आता तेजस एक्स्प्रेसच्या सुद्धा सरासरी वेग केवळ ६८ किमी आहे. विद्युतीकरण झाले असले तरी गाड्यांचा वेग फार वाढवता येणे अशक्य आहे

जोवर कोकण रेल्वेचे दुहेरीकरण होत नाही तोवर वाटेल ती गाडी आणि तिचा सरासरी वेग सत्तरच्या फार वर जाणार नाही हे सत्य आहे.

कुमार१'s picture

18 May 2023 - 7:01 am | कुमार१

रेल्वे रुळांना गेलेले तडे ओळखण्यासाठी आता रोबोचा वापर करण्यात येणार आहे.

या संदर्भात पुण्यातील कॉम्बॅट रोबोटिक्स या संस्थेने केलेल्या संशोधनाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलेली आहे.

आता या तंत्रज्ञानाची पहिली चाचणी पुण्यात घेतली जाईल. ती यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी होईल.

कुमार१'s picture

20 May 2023 - 7:14 am | कुमार१

तान्ह्या बाळाला घेऊन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी 13 रेल्वे स्थानकांमध्ये मोफत ममता कक्ष चालू केलेले आहेत.

कुमार१'s picture

21 May 2023 - 1:53 pm | कुमार१

स्थानकाच्या नावानंतर P. H. ही अक्षरे असलेली ड दर्जाची काही मोजकी स्थानके भारतात आहेत. या स्थानकांवर रेल्वेचे कोणतेही कर्मचारी कामास नसतात व सिग्नल यंत्रणा नसते. तेथे प्रवासी गाड्या आपण होऊन थांबतात. थांबल्यानंतर दोन मिनिटात चालक त्याच्या मनानेच गाडी पुढे नेतो.
ok

या स्थानकांवरील तिकीट विक्री संबंधित गावातील व्यक्तीला कंत्राटी पद्धतीने दिलेली असते. जर त्या स्थानकावरून प्रवासी फारच वाढले तर मग रेल्वे बोर्ड भविष्यात ते कायमस्वरूपी कार्यरत स्थानक करण्याचा विचार करते.

कुमार१'s picture

25 May 2023 - 11:45 am | कुमार१

ok

Silambu Express ही तामिळनाडूत धावणारी एक अतिवेगवान ट्रेन.
या नावाचा इतिहास रंजक आहे. एका तमिळ महाकाव्यामध्ये Kannagi या एका स्त्रीचे वर्णन आहे.
Silambu म्हणजे पायातील पैंजण. या स्त्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी तिचे पैंजण विकले होते अशी ती कथा आहे.

सुधीर कांदळकर's picture

2 Jun 2023 - 11:31 am | सुधीर कांदळकर

रोबो, पी एच आणि पैंजण - मनोरंजक माहिती. पैंजणाची कथा हृद्य.

तेजस सुरेख गाडी आहे. सकाळी ६ ला सुटलेल्या गाडीने मी आत्ताच्या फेब्रुवारीत आठ तासात कुडाळला पोहोचलो. गाडी मध्येच दीर्घकाळ थांबवली नाही तर कोणतीही गाडी सात तासात पोहोचेल.

लेख आवडला.

कुमार१'s picture

3 Jun 2023 - 9:25 pm | कुमार१

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तीन गाड्यांच्या या भीषण धडकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड कारण असल्याचं समोर आलं आहे.

सर्व मृतांना आदरांजली ..

इपित्तर इतिहासकार's picture

23 Jun 2023 - 8:05 am | इपित्तर इतिहासकार

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक.

त्यात एक मजेशीर माहिती आहे...

एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

कुमार१'s picture

29 Jun 2023 - 4:22 pm | कुमार१

माहिती मजेशीर !

Trump's picture

28 Jun 2023 - 2:46 pm | Trump

On the map of Vande Bharat

The first target is to connect every state. Our target is to do this by mid-June. We would have connected every state and then we would be taking routes which are very busy. The idea is this — up to 100 km of distance between two cities, that’s a commuting kind of distance. So, we are developing a train called Vande Metro. The technology for 100 km is different from the technology for beyond 100. From 100 to 500, we have designed a chair car. Beyond 500 km, it has to be a different technology — that will be a Vande Sleeper. So, Sleeper and Metro are in the design process at this point of time. Metro should be coming by January, Sleeper should be coming by March of next year.
https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-...

कंजूस's picture

29 Jun 2023 - 3:05 am | कंजूस

असा संदेश दिला होता.
पण सर्व चांगल्या सोयी शहरांत होतात. प्रवासी साधने,नोकऱ्या,वैद्यकीय सेवा,वाहते नळपाणी आणि अखंडीत (शक्यतो) वीज.
मग कसे राहणार लोक खेड्यांत?

मोठी शहरं जोडणाऱ्या अतीजलद वीजगाड्या. आणि जुन्या पॅसेंजर गाड्या दोन चार स्टेशनं गाळून एक्स्प्रेस करण्याचा धडाका रेल्वेने सुरू ठेवला आहे.

पुणे - दौंड मार्गावर लोकल ट्रेन चालवणे सुरू केलं ते बरं झालं. मागे एकदा गणपती उत्सवात दादर ते चिपळूण लोकल ट्रेन ठेवलेल्या. मी तर म्हणेन की सकाळी एक तशी लोकल कायम ठेवावी.
लोकल ट्रेनमधील बाकडी व्यवस्था समोरासमोर असली तरी सामान ठेवण्याच्या बाबतीत फार सोयीची आहे. सीटांच्या खाली खूप जागा असते. शिवाय डबे धुणे सोपं आहे कारण सीटा फायबरच्या आणि फरशी स्टे. स्टीलच्या पत्र्याची .अडीच तासांच्या प्रवासाला (साधारण शंभर किमी.) टॉइलेट्स नसले तरी चालते.
दूरच्या गाड्यांमध्ये अनारक्षित डबे हे पुर्वी टू.टिअर पद्धतीचे असतं. भरपूर लोक बसत.
भारताची लोकसंख्या दीडशे कोटी झाली आहे तर काही लोक रेल्वेत अमोरासमोर बसले तर काय बिघडलं?

विजय_आंग्रे's picture

29 Jun 2023 - 11:19 am | विजय_आंग्रे

मागे एकदा गणपती उत्सवात दादर ते चिपळूण लोकल ट्रेन ठेवलेल्या. मी तर म्हणेन की सकाळी एक तशी लोकल कायम ठेवावी.
---
निदान सणासुदीला तरी 'दिवा-सावंतवाडी' पॅसेंजर आधी, एक 'दिवा-चिपळून' पॅसेंजर सुरु केल्यास, दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला होणार्‍या प्रचंड गर्दी पासून आम्हा खेड, दापोलीवासीयांची सुटका होईल.

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 11:31 am | इपित्तर इतिहासकार

मुंबई - नागपूर, पुणे- नागपूर ह्या मार्गांवर सुरू केल्यास उदंड प्रतिसाद मिळेल.

मुंबईतून आमच्याकडे विदर्भात जायला अगोदर मुबलक ऑप्शन नसत, बहुतांशी ट्रेन ज्या उत्तर भारत/ बंगाल मध्ये जाणाऱ्या असत त्या भुसावळहून उत्तरेकडे वळत्या करून भुसावळ - इटारसी - अलाहाबाद रूट ने पुढं निघून जात

गीतांजली
हावडा मेल
शालिमार

ह्या लांब पल्ल्याच्या आणि

विदर्भ एक्सप्रेस
सेवाग्राम एक्सप्रेस

ह्या दोन मोजून गाड्या उरत लोकल जनतेला. Reservations साठी फुल मारामार, परत लांब पल्ल्याचा प्रवास असल्यामुळे अगदीच जनरल मधून जाणे पण शक्य होत नसे.

आता मात्र

विदर्भ, सेवाग्राम ह्यांच्या जोडीला, मुंबई अमरावती अंबा एक्सप्रेस झाली आहे आणि पुणे अमरावती एक्सप्रेस (ही बहुतेक साप्ताहिक असावी) सुरू झाली आहे.

एका स्लीपर मध्ये ७२ म्हणले अन् १८ डब्यांची गाडी म्हणली तरी ३६ प्रायव्हेट स्लीपर कोच बसेस (आमच्या विदर्भातून खूप सुटतात रोज पुणे मुंबई जायला) चे लोड कमी होते म्हणून का काय प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट लॉबीचा अमरावती पुणे एक्सप्रेसला कडाडून विरोध होता पण, मध्य रेल्वे प्रवासी वाहतूक संघ अकोला/ अमरावती वगैरेंनी जोर लावून प्रकरण धसास लावले होते.

अश्याच काही ट्रेन अजून तर सुरू केल्या गेल्या तर मुंबई, पुणे, नाशिक त्रिकोणात काम करणाऱ्या वैदर्भ जनतेला सणासुदीला घरी जाण्याची उत्तम सोय होईल असेही वाटते.

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले.

स्टेशन / लाईन स्थापना

१८५३ - बोरीबंदर ते ठाणे
१८५४ - कल्याण पर्यंत
१८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा)
१८६५ - भुसावळ
१८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन.

पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत

हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे...

पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ?

शक्यता दोन

१. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे

२. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील..

म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ?

रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

कुमार१'s picture

29 Jun 2023 - 4:26 pm | कुमार१

इतिहास चांगला लिहीत आहात.
मिपा रेल्वे प्रवासी संघात स्वागत ! 🙂

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 7:03 pm | इपित्तर इतिहासकार

प्रयत्न subaltren प्रकाशात आणण्याचा असेल कायम.

कंजूस's picture

29 Jun 2023 - 5:49 pm | कंजूस

लाईन गेली आणि अकोला जंक्शनची गंमत गेली. विविध एंजिने पाहायला मिळत. खांडवा ते ओंकारेश्वर असा मीटर गेज प्रवास केला आहे. नंतर बंद झाली मीटर गेज. चांगली वेगात पळवली होती गाडी. साठ किमी दीड तासांत गेलो होतो.

इपित्तर इतिहासकार's picture

29 Jun 2023 - 7:55 pm | इपित्तर इतिहासकार

एकेकाळी सिकंदराबाद - अजमेर - जयपूर मार्गे पूर्णा - मुदखेड - अकोला रूट मीटरगेज होता तेव्हा मीनाक्षी एक्सप्रेस शान होती त्या रूटची.

२०१२ साली प्रवास करण्याचा योग आला होता तेव्हा फर्स्ट क्लास नॉन एसी स्लीपर असणारी गाडी होती ती, २ x २ कुपे ते पण नॉन एसी असलेली झोपण्याची योजना वगैरे मजा होती.

त्याकाळी श्रावणात ओंकारेश्वरला दर्शनाला जाण्याचा भारी मार्ग होता तो, पूर्ण सातपुडा आसमंत एकदम हिरवा कंच, त्यात परत कलाईकुंड पातलपानी इत्यादी स्टेशने अन् जंगलातून बोगद्यातून जाणारी नागमोडी रुळांवर डुलत जाणारी रेल्वे.

कलाईकुंड स्टेशनवर पळसाच्या पानाच्या द्रोणात मिळणारा गायीच्या दुधाचा कलाकंद हा सर्वोत्कृष्ट असे, ती चव परत कधीच मिळाली नाही.

गायीच्या दुधाचा कलाकंद हा सर्वोत्कृष्ट असे, ती चव परत कधीच मिळाली नाही.
गेले ते दिवस . अस्सल पदार्थ खाण्याचे वेड कमी झाले.

मीनाक्षी एक्सप्रेसने अजमेर पर्यंत (आधी तिथपर्यंतच होती, पुढे जयपूर पर्यंत झाली) प्रवास करण्याचा योग आलाय. ब्रिटिशांनी उत्तर-दक्षिण जोडायला महायुद्धकाळात या पर्यायाची योजना + अंमलबजावणी योग्य केली. पातालपानी - कलाईकुंड दरम्यान तो प्रसिद्ध ४ च्या आकड्यासारखा ट्रॅक येतो.... मग कुंड ला कलाकंद. मग पुढे रतलाम ला 'मावाबाटी' / कुल्लडमधले गरम गुलाबजाम.... मग नासिराबादला तो भलामोठा सुप्पर तिखट 'कचोरा' ... मध्ये डॉ. आंबेडकरांमुळे प्रसिद्ध असलेले MHOW गाव, ते मिलिटरी हेडकार्टर ऑफ वॉर चे लघुरूप होते म्हणे .... आठवणीच आठवणी.

BTW काचीगुडा / सिकंदराबाद ते पूर्णा ब्रॉड गेज पूर्ण झाल्यावर ही ट्रेन तिथवर ब्रॉडगेज डब्यांसकट येई. मग सर्व प्रवासी उतरून पुढे मीटरगेज बोग्यांची तशीच दुसरी मीनाक्षी उभी असे त्यात जाऊन बसत आणि प्रवास पुढे चालू होई. तासभर हा सोहळा चालत असे :-) हे अनेक वर्ष चालले.

कर्नलतपस्वी's picture

29 Jun 2023 - 8:08 pm | कर्नलतपस्वी

प्रवास एकदम मस्तच. पुरानी दिल्ली जोधपूर, जोधपूर पोखरण,जयपूर अलवर दिल्ली,गोहाट्टी(असाम) ते धर्मनगर (त्रिपुरा) व्हाया लामडिंग बदरपुर हाफ लाँग. असे मोठे मोठे मिटरगेज रेल्वेने प्रवास अनुभवले. खाण्यापिण्याचे हाल होत असत पण तेव्हा घरून दोन दोन दिवसाचे खाण्याचे पदार्थ व भरपूर पिण्याचे पाणी बहुतेक प्रवासी बरोबर ठेवत.

कुमार१'s picture

7 Jul 2023 - 11:43 am | कुमार१

महाराष्ट्रात दोन महिन्यांत रेल्वेच्या चार दुर्घटना टळल्या.

संबंधित सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार.

कुमार१'s picture

12 Jul 2023 - 4:25 am | कुमार१

आता
"वंदे साधारण" गाड्यांची निर्मिती होणार

कंजूस's picture

13 Jul 2023 - 11:48 am | कंजूस

काल पाहण्याचा योग आला. फक्त मालगाड्यांसाठी बनवलेलं Alstom -Indian Railways (75+25) ने बनवलेलं १२००० एचपीचं एंजिन. अशी दोन एंजिने जोडून स्टील पत्र्याच्या वजनदार गुंडाळ्या घेऊन मालगाडी बोरघाट उतरून खाली कर्जतला आली होती. (येताना पाहायला नाही मिळाली. )
निळी एंजिने फारच सुंदर दिसतात.

इपित्तर इतिहासकार's picture

13 Jul 2023 - 5:52 pm | इपित्तर इतिहासकार

ह्याचा कारखाना बिहारमधील मधेपुरा येथे आहे.

अनिंद्य's picture

17 Jul 2023 - 7:51 pm | अनिंद्य

रेल्वे चर्चा छान.

त्या वंदे भारत ट्रेन्सचा मात्र धसका घेतलाय - म्हशींच्या धक्क्याने इंजिन ड्यामेज, पावसाचे पाणी गाडीच्या छतातून धो धो आत असे सगळे व्हिडियो / लाईव्ह स्ट्रीम बघितले. आजच एका वंदे भारतला लागलेली आग. हे 'वांदे भारत' जास्त दिसतंय :-) आता त्यात प्रवास करण्याची हिंमत होणार नाही !

कुमार१'s picture

17 Jul 2023 - 9:18 pm | कुमार१

झालंय खरे तसे ..

कुमार१'s picture

18 Jul 2023 - 8:41 pm | कुमार१

पार्सल डब्यातून मृतदेहाची वाहतूक

कुमार१'s picture

23 Jul 2023 - 3:52 pm | कुमार१

रेल्वे स्थानकांवर वीस रुपयात एका जेवणाची सोय.
प्रवासादरम्यान एका गरीब मजुराचा उपाशीपोटी मृत्यू झाल्यानंतर रेल्वेने घेतलेला हा निर्णय.

कुमार१'s picture

25 Jul 2023 - 8:10 pm | कुमार१

हावडा रेल्वे स्थानकाला हरित इमारतींसाठीचे सुवर्ण गुणांकन नुकतेच जाहीर झाले आहे.
169 वर्षे जुन्या असलेल्या या स्थानकात पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांसाठी हे देण्यात आलेले आहे.

गाडी वेगळ्या मार्गाने मनमाडला दीड तास लवकर पोहोचली आणि तिथून नियोजित वेळेप्रमाणे वेळेपर्यंत न थांबवता पुढे पळवली . मग काय झाले . . .
गोवा ते निजामुद्दीन गाडीचा मजेशीर किस्सा.

कुमार१'s picture

15 Aug 2023 - 7:16 am | कुमार१

वर्षभर चाललेल्या या भागात चांगली चर्चा झाली. त्यात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद !

या पुढील चर्चा भाग ३ मध्ये करावी.

सर्वांचे तिकडे स्वागत…