गलेमा संपली की मिपाच्या संपादक मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपाच्या दिवाळी अंकाचे.
या वर्षी गलेमाला मिळालेला उत्साहवर्धक प्रतिसाद पाहता दिवाळी अंकही धमाकेदार बनणार यात काही शंकाच नाही .
आपला सर्वांचा उत्साह वाढवणारी अजून एक गोष्ट यावेळी घडते आहे ती म्हणजे, या वेळी दिवाळी अंक आवाहन धागा प्रसिध्द होण्याआधीच आपल्याला दिवाळी अंकासाठी लेख मिळायला सुरुवात झाली आहे. तर काहीनी आपापले रुमाल टाकून जागा अडवून धरल्या आहेत.
तेव्हा मंडळी तुम्ही तरी का बरं मागे राहताय? सरसावा आपापल्या लेखण्या आणि होऊ द्या मिपावर बरसात तुमच्या कसदार आणि जोमदार लेखनाची.
या वर्षीही दिवाळी अंकाकरिता ठराविक अशी काही थीम नाही. लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, भाषांतर, शशक, अलक, किंवा आपल्याला जे आवडेल, रुचेल ते तुम्ही लिहू शकता.
लेखन देण्याची मुदत २० सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ अशी असेल. कोणत्याही प्रकारे पूर्वप्रकाशित लेखन कृपया पाठवू नये.
आपलं लेखन आपण साहित्य संपादक या व्यनिवर पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा.
किंवा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com या ईमेल वरसुद्धा तुम्ही लेखन पाठवू शकता.
जर तुम्ही ईमेलद्वारे लेखन पाठवलं, तर मेलमध्ये आपला मिपा आयडी लिहायला विसरू नका.
काही प्रश्न, अडचणी असतील तर मदतीसाठी साहित्य संपादक आहेतच.
आलेल्या लेखनातील अंकाला साजेसं लेखन निवडून ते प्रकाशित केलं जाईल. निवडीचा संपूर्ण निर्णय संपादक मंडळाचा असेल.
अजून एक महत्वाचे - अंकामधे काय असेल या बद्दल वाचकांची उत्सुकता कायम रहावी या करता आपण आपल्या लिखाणाबद्दल जाहीर तपशील प्रकट करु नये अशी विनंती.
मंडळी दिवस थोडेच उरले आहेत, तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता लिहायला घ्या बरं...
आपल्या लेखनाच्या प्रतीक्षेत
-टीम मिपा दिवाळी अंक
प्रतिक्रिया
15 Sep 2022 - 9:54 am | ज्ञानोबाचे पैजार
भारी,
दिवाळी अंक चांगला होईल यात काही शंका नाही,
अनेक शुभेच्छा,
पैजारबुवा,
15 Sep 2022 - 10:00 am | चांदणे संदीप
आता मिपा दिवाळी अंकाची प्रतिक्षा.
सर्व लेखकांना आगाऊ शुभेच्छा!
सं - दी - प
15 Sep 2022 - 10:07 am | कुमार१
शुभेच्छा !
15 Sep 2022 - 10:07 am | पाषाणभेद
मिपा दिवाळी अंक व आगावू लेखकांना शुभेच्छा !!
15 Sep 2022 - 10:29 am | सुरिया
लेखक बाय डिफॉल्ट आगावू असणार, तुम्हाला शुभेच्छा आगावू द्यायच्यात का?
15 Sep 2022 - 12:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
सरसकट सर्व लेखकांना आगावू ठरवण्या आधी तुम्ही आमच्या श्री श्री १०८ महागुरुंचे महान आत्मचरित्र वाचावे ही नम्र विनंती करतो. ते वाचल्यावर लेखक अगावू असतात हा आपला गैरसमज निवळण्यास मदत होईल.
पैजारबुवा,
15 Sep 2022 - 12:45 pm | धर्मराजमुटके
नेहमीप्रमाणे दिवाळी अंक पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देऊ नका ही मिपास खास विनवणी. मुख्य फळ्यावरचे धागे, दिवाळी अंकाचे धागे यांची सरमिसळ होऊ द्या. काय की पीडीएफ अंक उपलब्ध झाला की तो संग्रही ठेऊन कधीही वाचता येतो, इतरांना पाठवता येतो त्यामुळे मिपावरची ट्राफीक कमी होते.
15 Sep 2022 - 12:56 pm | वामन देशमुख
मिदिअंकाला शुभेच्छा!
- वाचनप्रेमी
15 Sep 2022 - 2:15 pm | तुषार काळभोर
यंदाच्या मिसळपाव दिवाळी अंकाला शुभेच्छा!!
आगाऊ लेखकांना आगाऊ शुभेच्छा!!
सर्व वाचकांना शुभेच्छा!!
सर्व शुभेच्छुकांना शुभेच्छा!!
15 Sep 2022 - 6:38 pm | चांदणे संदीप
कविवर्य पाडगावकारांच्या 'सलाम' कवितेसारखं होऊ शकतं. आणखी काही लोकांना शुभेच्छा लिहा हिंदकेसरी. :)
सं - दी - प
15 Sep 2022 - 4:57 pm | खेडूत
छानच फार!
आताच वाट पहायला सुरुवात केली आहे.
आगावू शुभेच्छा.
16 Sep 2022 - 11:00 am | मित्रहो
नक्की लिहणार. ५ ऑक्टोबर पर्यंत लेख पाठवितो.
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा
16 Sep 2022 - 1:42 pm | विजुभाऊ
नक्की लिहीतो
19 Sep 2022 - 8:37 pm | अनिंद्य
निर्धारित वेळेत लेख पाठवण्याचा प्रयत्न असेल.
लेखासाठी काही शब्दमर्यादा असल्यास कळवावे.
22 Sep 2022 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार
दिवाळी अंका करता कोणतीही शब्दमर्यादा नसते,
किंबहूना शशक सोडून कोणत्याही लेखनप्रकारासाठी मिपावर तरी शब्दमर्यादा नाही
पैजारबुवा,
20 Sep 2022 - 8:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिवाळी अंक टीमला शुभेच्छा. लिहायचा प्रयत्न आहेच.
-दिलीप बिरुटे
22 Sep 2022 - 10:58 am | अथांग आकाश
मिपा दिवाळी अंकाला शुभेच्छा!!!
13 Oct 2022 - 5:08 pm | तर्कवादी
मिपा अखंड व्यवस्थित चालावे यासाठी शुभेच्छा :)
13 Oct 2022 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं दुसरं काहीही मागणे नाही.
-दिलीप बिरुटे
17 Oct 2022 - 11:03 am | तर्कवादी
दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..
17 Oct 2022 - 11:03 am | तर्कवादी
दिवाळी अंक तर ठीक आहे.. पण त्या आधी मिपा यंदाची दिवाळी बघणार की नाही अशी परिस्थिती झालीये..
28 Sep 2022 - 10:42 pm | नीलकंठ देशमुख
नक्की पाठवतो.
मिसळपाव मुळेच , 'देशमुखी'हा विनोदी कथा व ललित लेख संग्रह प्रकाशित करायची प्रेरणा मिळाली असे मला वाटते.सुदैवाने त्याला वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे.
30 Sep 2022 - 8:30 am | अरुण मनोहर
खूप काळानंतर मिपावर आलो. दिवाळी अंकासाठी मिपाला आणि सर्व लेखकांना शुभेच्छा.
कथा पाठवली आहे.
1 Oct 2022 - 9:13 am | साहित्य संपादक
दिवाळी अंका करता साहित्य देण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत.
जरा ढिले सोडा आपल्या लेखण्यांचे लगाम आणि लिहुद्या त्यांना मुक्त पणे.
साहित्य संपादक,
3 Oct 2022 - 8:52 am | साहित्य संपादक
दिवाळी अंकाकरता आपले साहित्य देण्याची मुदत दोन दिवसांनी संपत आहे,
तेव्हा झरझर लेखण्या चालवा आणि भरभर व्यनि करा,
साहित्य संपादक,
4 Oct 2022 - 12:15 am | पॉल पॉट
मी देखील लिहीण्याचा प्रयत्न करतो. ह्या आधी कविता लिहील्या आहेत काही. मिपावरही एक दोन प्रसिध्द केल्या आहेत. २०११ साली मी एक्टीव होतो तेव्हा प्रसिध्द केल्या होत्या. आता तो आयडीही विसरलो नी पासवर्डही.
17 Oct 2022 - 10:48 pm | विजुभाऊ
मिपा पुन्हा सुरु झाले.
आज आनंदी आनंद झाला.....
दिवाळी अंकासाठी आता कसलीच बाधा येणार नाही.......
लै भारी
18 Oct 2022 - 10:20 am | सौंदाळा
हेच म्हणतो
पण दिवाळी अंक संपादक आणि बाकी टीमला या डाऊनटाईममुळे ओव्हरटाईम करायला लागतो की काय आता.
असो, आता मिपा चालू झालय आणि दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित होण्यासाठी सर्व संबंधितांना ऑल द बेस्ट
18 Oct 2022 - 11:22 am | सागर
हेच म्हणतो
मिपा कायम सुरु राहू देत !
18 Oct 2022 - 12:13 pm | राजेंद्र मेहेंदळे
आता मिपा सुरळीत चालु रहावे यासाठी शुभेच्छा आणि मेंटेनन्स क्रू चे आभार!!
18 Oct 2022 - 3:34 pm | कुमार१
मी प्रतिसाद दिल्यानंतर असा संदेश येतो:
The website encountered an unexpected error. Please try again later.
माझा प्रतिसाद प्रकाशित झालेला असतो परंतु मला दिसत नाही. आणि पुन्हा मुख्य पानावर त्याच धाग्यावर गेले असता माझ्या प्रतिसादाला न वाचल्याचे लाल वर्तुळ असते.
19 Oct 2022 - 10:44 am | शर्मिला र.
माझी अग्निकूंड ही कविता दिसत नाहीये आता.
19 Oct 2022 - 11:30 am | साहित्य संपादक
आपल्याला व्य.नि. पाठवला आहे.
19 Oct 2022 - 5:50 pm | स्वधर्म
याचा आनंद आहे. ऐन वेळी खूप काम करावे लागले असेल. दिवाळी अंकासाठी अनेक शुभेच्छा.
20 Oct 2022 - 6:48 pm | सुधीर कांदळकर
अनेक, अनेक शुभेच्छा. खमंग फराळाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.
धन्यवाद.
20 Oct 2022 - 6:48 pm | सुधीर कांदळकर
अनेक, अनेक शुभेच्छा. खमंग फराळाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.
धन्यवाद.
21 Oct 2022 - 9:08 pm | चौथा कोनाडा
आपणा सर्वांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
22 Oct 2022 - 7:10 pm | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
सस्नेह नमस्कार .
कथा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे .
हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे .
कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता .
मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा .
दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा .
धन्यवाद
22 Oct 2022 - 7:11 pm | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
सस्नेह नमस्कार .
कथा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे .
हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे .
कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता .
मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा .
दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा .
धन्यवाद
22 Oct 2022 - 7:11 pm | बिपीन सुरेश सांगळे
संपादक मंडळ ,
सस्नेह नमस्कार .
कथा sahityasampadak डॉट mipa अॅट gmail डॉट com या ईमेल वर अगोदरच पाठवली आहे .
हरकत नाही . आता पुन्हा पाठवतो आहे .
कथा जरूर वाचावी , थेट स्वीकारू शकता .
मिपाला काही समस्या होती . ती दूर झाली असेल न पुन्हा येऊ नये हीच सदिच्छा .
दीपावलीच्या सर्व मिपाकरांना खूप शुभेच्छा .
धन्यवाद
22 Oct 2022 - 7:15 pm | बिपीन सुरेश सांगळे
मंडळी क्षमा असावी .
संदेश जात नव्हता . एरर येत होती .
एक मेसेज तीन वेळा आला आहे .
24 Oct 2022 - 9:12 am | श्रीगुरुजी
अंक कधी प्रसिद्ध होणार?
24 Oct 2022 - 9:24 am | साहित्य संपादक
मध्यंतरी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे 'मिपा दिवाळी अंक २०२२' च्या प्रकाशनास थोडा विलंब होत आहे त्यासाठी दिलगीर आहोत.
दिवाळी अंक २६-१०-२०२२ रोजी प्रकाशित होणे अपेक्षीत आहे.
टिम - मिपा दिवाळी अंक
27 Oct 2022 - 10:48 pm | आलो आलो
नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या.
27 Oct 2022 - 10:48 pm | आलो आलो
नाही म्हणजे आमच्याकडील हि तारीख उलटून गेलीये. ह. घ्या.
24 Oct 2022 - 3:51 pm | विजुभाऊ
अनेक शुभेच्छा
26 Oct 2022 - 11:53 am | चष्मेबद्दूर
अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
26 Oct 2022 - 11:53 am | चष्मेबद्दूर
अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
26 Oct 2022 - 11:53 am | चष्मेबद्दूर
अजून प्रकाशित झाला नाही का? की मला दिसत नाहीये ???
26 Oct 2022 - 8:12 pm | आनन्दा
कुठपर्यंत आली तयारी?
27 Oct 2022 - 2:15 pm | स्वधर्म
दिवाळी अंकाची
28 Oct 2022 - 11:00 am | Jayant Naik
अंदाजे केव्हा प्रकाशित होणार?
28 Oct 2022 - 11:01 am | Jayant Naik
अंदाजे केव्हा प्रकाशित होणार?
28 Oct 2022 - 12:17 pm | Jayant Naik
अंदाजे केव्हा प्रकाशित होणार?
28 Oct 2022 - 2:59 pm | चौथा कोनाडा
मिपाचा दिवाळी अंक येईपर्यंत नुकताच दिवाळी अंकाच्या विश्वातला वेगळा प्रकार पहायला मिळाला त्या बद्दल सांगतो
'ऑल दि बेस्ट' 2022 चा हा दिवाळी विशेषांक इतरांपेक्षा वेगळा म्हणजे Multimedia विशेषांक आहे.कृपया पुढील लिंकवर क्लिक करा
https://tinyurl.com/All-the-Best
हा स्मार्ट दिवाळी अंक असून मजकूर, रेखाचित्रे, फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ एकाच सेल्फ-कन्टेड पॅकेजमध्ये एकत्रित करणारा हा अशा प्रकारचा पहिला प्रकार आहे . क्लिक केल्यावर यातल्या कलाकृतींचे वाचन करता येते ! फॉण्ट मोठा करता येतो ( हे मोबाईल वर खुप फायद्याचे आहे)
वाचून बघा / पाहून वाचा अन सांगा कसा वाटतोय ते !
28 Oct 2022 - 5:05 pm | आलो आलो
हे तर लईच भारिये .
28 Oct 2022 - 5:06 pm | आलो आलो
हे तर लईच भारिये .
29 Oct 2022 - 7:59 am | अनिंद्य
कधी येतोय अंक ?
29 Oct 2022 - 12:55 pm | आलो आलो
अशी संपादक मंडळाला नम्र विनंती
आपले नम्र
मि दी अं २०२२ ची आतुरतेने वाट पाहणारे वाचक मंडळ सदस्य
व
एकही अपडेट्स न देणाऱ्या संपादक मंडळाच्या णिशेध मोर्च्याच्या तयारीतील समूह कार्येकरता.
31 Oct 2022 - 7:30 am | श्रीरंग_जोशी
मराठी कल्चर अॅन्ड फेस्टिवल्स या अमेरिकास्थित संस्थेचा यंदाचा दिवाळी अंक.
मिपाच्या यंदाच्या दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पाहतोय.
31 Oct 2022 - 9:43 am | सस्नेह
अंकाची मांडणी, सजावट सुरेख.
पूर्ण वाचून मग अंतरंगाबद्दल नक्की पोच देईन.
या दुव्यासाठी रंगाभाऊंना धन्यवाद !
स्नेहा
31 Oct 2022 - 12:19 pm | कर्नलतपस्वी
रंगाभौ धन्यवाद.
अंक सजावट छान आहे. वरवर चाळला.
व्यंगचित्रे व मंदिराचे चित्र खुप आवडले.
श्रेया राजवाडे यांची कविता खुप सुंदर आहे.
माझा पाऊस ही कवीता सुद्धा छान आहे.
सवडीनुसार पुर्ण वाचणार आहे.
1 Nov 2022 - 10:14 am | शशिकांत ओक
श्रीरंग जोशी,
आपण सादर केलेली लिंक पाहिली.
अंक दिमाखात सादर केला आहे.
या अंकातील विविध लेखांवर प्रतिक्रिया व्यक्त करायला सोय आहे का?
फ्रान्सुआ गोतिए यांनी लोहगाव पासून ४ किमीवर श्री शिवाजी महाराज म्युझियम बनवले आहे याची ओळख करून दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की मिलिटरी कमांडर्स कंबाईन्ड या बॅनर्स मधून शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या लढाया सध्याच्या मिलिटरी कमांडरांना नियोजन करून पार पाडायची कामगिरी करायची आज्ञा दिली तर ते कसे काय पूर्ण करतील या प्रमेयावर आधारित नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित बॅनर्स प्रदर्शन जून २०२२ पासून कायमचे उपलब्ध आहे.
ते वाचायला हवे असेल तर https://alkaoaksebookshoppy.online
या इथे ईबुकसाठी अधिक माहिती मिळेल.
4 Nov 2022 - 1:08 pm | चौथा कोनाडा
मराठी कल्चर अॅन्ड फेस्टिवल्स या अमेरिकास्थित संस्थेचा यंदाचा दिवाळी अंक
...... सुं द र आहे.... डोळ्यांना सुखावणारा
आशुतोष बापट यांचा मंदिर विषयक लेख वाचला... सुरेख आणि माहितीपूर्ण.
बाकीचा अंक टप्याटप्याने वाचत आहे.
धन्यवाद श्रीजो!
31 Oct 2022 - 8:38 am | Bhakti
मुखपृष्ठ रंगसंगती आकर्षक आहे.
मिपा यंदा लेट पण थेट :)
1 Nov 2022 - 10:02 am | चष्मेबद्दूर
1 Nov 2022 - 10:49 am | चष्मेबद्दूर
अंकाच्या प्रतीक्षेत इतके दिवस गेले आहेत की भाऊंचा पुढचा चघळचोथा " मिपकरांच्या हालाला जबाबदार आघाडी की बिघाडी?(सूज्ञास काय अधिक सांगणे?)" या विषयावर असेल हे नक्की.
1 Nov 2022 - 11:07 pm | आलो आलो
आतां वाट पळोवंक मेळना आतां कितें करचें
2 Nov 2022 - 10:18 am | तर्कवादी
आता काहीशा अशा असतील :
https://youtube.com/shorts/Ie-aPEFceEo?feature=share
2 Nov 2022 - 11:30 am | साहित्य संपादक
दिवाळी अंकाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत अंक प्रकाशित होणे अपेक्षित आहे.
काही अपरिहार्य कारणांमुळे अंक प्रकाशनास होत असलेल्या विलंबासाठी दिलगीर आहोत.
2 Nov 2022 - 12:05 pm | सर्वसाक्षी
आपले अथक परिश्रम प्रशंसनीय आहेत
2 Nov 2022 - 1:19 pm | उग्रसेन
ब्वॉरं.
देर ना हो जाये कही दे ना हो जाये.
2 Nov 2022 - 8:54 pm | सस्नेह
वाचकांपेक्षा लेखकच अंकासाठी बेचैन झाले आहेत.... :)
2 Nov 2022 - 9:03 pm | प्रचेतस
लेखकांना अप्रूप असते हो कधी आपला लेख प्रकाशित होतोय आणि वाचकांच्या त्यावर उड्या पडताहेत :)
2 Nov 2022 - 9:41 pm | सस्नेह
=))
4 Nov 2022 - 12:14 pm | मालविका
अजून किती वेळ / दिवस लागणार?
4 Nov 2022 - 12:19 pm | सौंदाळा
हेच म्हणतो,
आता दिवाळी झाली पण तुळशीच्या लग्नाआधी तरी अंक प्रकशित व्हावा.
4 Nov 2022 - 12:27 pm | श्रीगुरुजी
दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यासाठी काही मदत हवी असल्यास हक्काने सांगावे.
5 Nov 2022 - 9:51 am | सागर
पोटा पाण्याचे उद्योग आणि व्यक्तिगत जीवनातील अडचणी संभाळून संपादक मंडळ मिपा चे व्यवस्थापन बघत असतात याची कल्पना आहेच. या वीकेन्ड ला वेळ मिळेल आणि अंक प्रकाशित होईल अशी आशा आहे. मुद्दाम कोणी करत नाही. अनेक वेळा अडचणी अशा अडचणी येतात की वेळेवर काम करता येत नाही आणि कारण पण सांगता येत नाही. मी स्वतः या स्थितिचा अनेकदा अनुभव घेतला आहे.
तेव्हा माझे संपादक मंडळास समर्थन आहे. जमेल तसे करा. पण नक्की दिवाळी अंक प्रकाशित करा.
धन्यवाद.
5 Nov 2022 - 10:51 am | ॲबसेंट माइंडेड ...
+१
5 Nov 2022 - 11:14 pm | तर्कवादी
मी एक लेख पाठवला होता तो दिवाळी अंकात सामाविष्ट झाला नाही.
आणि आता पुन्हा "पाठवलेले संदेश" बघत असताना तिथेही तो दिसत नाहीये.
५ ऑक्टोबरच्या आसपास मिपा बंद होते तेव्हा काहीतरी गडबड झालेली दिसते. मिपाच्या विदामधून माझा लेख पुर्णतः उडालाय.. असो. वाचक एका लेखाला मुकलेत :)
5 Nov 2022 - 11:33 pm | श्रीगुरुजी
मी सुद्धा दिवाळी अंक २०२२ साठी एका वेगळ्या विषयावरील मोठा लेख ७ ऑक्टोबरला पाठविला होता. लेख लिहिण्यासाठी बरेच दिवस लागले होते. लेख आवडल्याचे संपादक मंडळाने कळविले होते. नंतर काही व्याकरणाच्या चुका सुधारून सुधारीत लेख १-२ दिवसांनी पुन्हा पाठविला होता.
परंतु दिवाळी अंकात तो लेख नसल्याने संपादक मंडळाने तो लेख अंकात समावेश न करण्याचे ठरविले असावे असे मला वाटले. "पाठविलेल्या संदेशा"तही तो लेख दिसत नाही.
नक्की काय झाले आहे ते माहिती नाही.
6 Nov 2022 - 12:02 am | तर्कवादी
५ - ७ ऑक्टोबरच्या आसपास मिपाचे सर्वर क्रॅश झाले असावे आणि जुना विदा पुनर्स्थापित (रिस्टोर) केला असे बहुधा दिसते. अनेक धाग्यांतले प्रतिसाद सुद्धा उडाले होते. पण दिवाळी अंकाबाबत संपादक मंडळाने निदान पुन्हा संदेश पाठवून लेख हरवल्याबद्दल सांगायला हवे होते म्हणजे तो पुन्हा पाठवता आला असता. आणि इतके दिवसांत पाठवलेले संदेश आपण काही पुन्हा तपासले नाहीत त्यामुळे आपल्याही लक्षात आले नाही... असो. आता काही करता येण्यासारखे नाही ...
6 Nov 2022 - 12:21 am | श्रीगुरुजी
२०-२१ ऑक्टोबरला मी "पाठविलेले संदेश" तपासले होते. तेव्हा सर्व संदेश होते. पण आता दिसत नाहीत.
17 Nov 2022 - 6:17 pm | तर्कवादी
दिवाळी अंकाकरिता लेख पाठवून मी तो प्रसिद्ध होण्याची वाट बघत होतो. दिवाळी अंकाला मोठा विलंब झालाच पण माझा लेखही प्रसिद्ध झाला नाही. मिपावरील एक नवीन सदस्य आणि लेखक म्हणून माझा उत्साहभंग झाला. पण नंतर मला दिसले की तो लेख "पाठवलेले संदेश" मधूनही नाहीसा झालाय. तांत्रिक गोंधळामुळे हे झाले असावे म्हणून मी "जाऊ दे झालं ते झालं" म्हणत ते विसरण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझे वरील प्रतिसाद वाचून साहित्य संपादक या आयडीने मला व्यक्तिगत संदेश पाठवून तांत्रिक गोंधळामुळे त्यांच्याकडेही तो लेख आता नसल्याचे सांगितले आणि मला लेख पुन्हा पाठवण्याची सुचना केली, मी लेख पुन्हा पाठवल्यास तो दिवाळी अंकात प्रकाशित केला जाईल असे साहित्य संपादकांनी सुचविल्यामुळे माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. वास्तिविक त्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबरला मी जेव्हा तो संदेश वाचला त्यानंतर काहीच तासांत मला कामानिमित्ताने बेंगळुरुच्या प्रवासाला निघायचे होते. तरीही मी त्या गडबडीतही पुन्हा लगेच लेखाची माझ्याकडील आवृत्ती व्यवस्थित तपासून साहित्य संपादक आयडीच्या संदेशाला उत्तरात लेख पाठवला. आणि पुन्हा एकदा सुरु झाली ती प्रतिक्षा. पण दिवसांमागून दिवस गेलेत पण लेख प्रकाशित झाला नाही. आणि साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेशाद्वारे मोजून ४ वेळा विचारणा करुनही काहीच उत्तर मिळाले नाही. या प्रकारामुळे माझी घोर निराशा झाली आहे. आता दिवाळी अंकातील इतर लेखही वाचायचे मन होत नाही की मिपावर यायचाही फारसा उत्साह राहिला नाही.
मिपाला कदाचित नवीन लेखक नको आहेत असेच वाटते. असो.
18 Nov 2022 - 9:57 am | चांदणे संदीप
स्वानुभवावरून सांगतो, असं आजिबात नाहीये. गैरसमज नसावा. :)
सं - दी - प
18 Nov 2022 - 10:36 am | Bhakti
मीही दोन लेख पाठवले होते,त्यातील एक प्रकाशित झाला.इच्छा असेल तर लेख आताही इतर सदरात प्रकाशित करु शकता.गैरसमज नका करून घेऊ.गोष्टी, थोडं इकडे तिकडे होतं असतं.
18 Nov 2022 - 12:55 pm | तर्कवादी
गैरसमज नाही.
वर म्हंटल्याप्रमाणे आधी तांत्रिक गोंधळामुळे लेख नाहीसा झाला व प्रकाशित झाला नाही हे माझ्या लक्षात आलं.. त्यावर मी "जाऊ दे" म्हणत सोडूनही दिलं पण पुन्हा लेख मुद्दाम मागवणे पण तो प्रकाशित न करणे आणि दहा-अकरा दिवसानंतरही लेखाची पोच, प्रसिद्ध न करण्यामागचे कारण याबद्दल काहीच उत्तर न देणे- ते ही चार वेळा विनंती करुन हे अगदीच निराशाजनक आहे.
त्यात मजा नाही. निदान तो लेख तरी मी इतर सदरात प्रकाशित करणार नाही. दिवाळी अंकाकरिता लिहिलेला लेख दिवाळी अंकाच्या सजावटीसह सन्मानाने प्रसिद्ध झाला तरच गंमत आहे.
बरं लेख प्रसिद्ध न होण्यामागचं कारणही समजत नाही हा खरा उद्वेग आहे. त्या लेखात काहीही नकारात्मक नव्हतं, द्वेषमूलक, कुणावर टीका करणारं, बीभत्स ई असं काहीही नव्हतं... एका यशस्वी गायिकेबद्दल असलेला साधासा लेख होता तो. ..
असो. माझी निराशा मला व्यक्त कराविशी वाटली इतकंच. इतर लेखकांना नाउमेद करण्याचा हेतू नव्हता. तुम्ही लिहीत रहा.
18 Nov 2022 - 9:27 pm | सर टोबी
सहानुभूती दर्शविणारे प्रतिसाद अशा वेळेला दुःखात भरच घालतात हे इतरांना समजावे म्हणून हा प्रतिसाद.
17 Nov 2022 - 6:51 pm | श्वेता व्यास
माझा अनुभव याउलट आहे.
कथा फक्त प्रसिद्धच झाली नाही तर त्यावर टीमने कामही केलं आहे.
मी पाठवलेली कथा आणि अंकात दिसते आहे ती कथा यांची तुलना केली.
बऱ्याच ठिकाणी शुद्धलेखन, विरामचिन्हे यांवर मूळ कथेमध्ये सुधारणा करून ती प्रसिद्ध केली आहे.
नवीन लेखक म्हणून ते वाचून नक्कीच कसं लिहायला पाहिजे हे समजण्यास मदत झाली.
आपली वैयक्तिक कामे, प्राधान्यक्रम सगळं सांभाळून हे करणाऱ्या लोकांबद्दल आदर द्विगुणित झाला आहे.
धन्यवाद मिपा
18 Nov 2022 - 10:32 am | Bhakti
+१
अगदी !मिपा गणेश लेखमाला माझा लेखसुद्धा टर्मिनेटर यांनी व्यवस्थित करुन दिला.पैजारबुवांनीही रेसिपी शुद्धलेखन नीट करुन दिले.मी अनेकदा संपादक मंडळांना शुद्धलेखन व इतर दुरुस्ती करून देण्याची विनंती केली,त्या तत्काळ झाल्या.
धन्यवाद.